निरर्थक

आपल्या शेवटच्या भेटीची
काही मिनिटं उरलेली असताना
आपण टोटली एकमेकांचे
होऊन गेलो होतो
तशा आपल्या प्रत्येक भेटी
या शेवटच्याच.
परत भेटू की नाही
याची खात्री नसताना होणारी भेट
ही शेवटची
असं तुझं म्हणणं
आणि माझंही...

पहिल्या भेटीत जेव्हा
घाबरत घाबरत
हातात हात घेतला होतास
तेव्हा दोघांनाही
सातवं आसमान दिसलं होतं
शरीराचे केस शहारून समांतर झाले
तेव्हा अनेक स्वप्न इकडून तिकडे
ट्रान्स्फर झाली
परवा माझ्या रिझल्टच्या
आदल्या दिवशी तू देवासमोर
हात जोडून बसलेलीस
"मी बाहेर आलेय "
असं खोटं कारण सांगून..
पहिल्या भेटीत हातात हात
घेतल्याचा हा इफेक्ट होता
अशी माझी वायफळ समजूत
यावेळी दोघांचा घामही एक
झालेला मी पाहिलाय...

तुझे डोळे मिटलेले असताना
मी माझ्या ओठांनी
तुझ्या कपाळावर गोंदली
आपल्या दोघांच्या
नावाची पहिली अक्षरं
एकदा समुद्रावर भेटलो
तेव्हा वाळूत असच आपल नावं
लिहित असताना
मला मोहसिनचा
एक शेर आठवलेला
"तेज़ हवा ने मुझ से पूछा
रेत पे क्या लिखते रहते हो"
तेवढ्यात एक लाट येऊन
नाव पुसून गेली
यावेळी असं काही
होऊ नये म्हणून प्रिकॉशन
घेत तुला लगेच
स्कार्फ बांधायला सांगितला
माझा पावसावर भरवसा नाही....

मी हे असे माकडचाळे
करत असताना
माझे गाल ओढत
तू म्हटलीस
"वेडा झाला आहेस तू!"
खरंतर त्यावेळी आपण
दोघेही पुरतेच शहाणे होतो
स्वतःला विसरून प्रेम करणारा
प्रत्येक प्राणी हा शहाणाच
असं माझं ठाम मत..
निघताना मंटोच्या कथेतील
मळक्या कपड्यातील मुलीसारखं
तू देखील सांडून दिलंस
तुझं शरीर माझ्या मिठीत
मग मिळाली एकमेकांना उब
जी आपल्या नशिबी क्वचितच
अगदी मराठवाड्यातील
पावसासारखी

"आता परत कधी?"
तू नेहमीचाच प्रश्न विचारलास
आणि मीही नेहमी सारखाच
निरुत्तर....
फॉर्मात नसलेला फलंदाज
शून्यावर आऊट व्हावा
आणि त्याला कायम भीती असावी
परत संधी न मिळण्याची
तसाच काहीसा मी
घरी गेल्यावर टाळत होतो तुला
पण तूही सीतेसारखी हट्टी
आणि मग आपण रंगवत राहिलो
आपल्या भेटतील किस्से
खरंतर ते एकाअर्थी सांत्वन होतं
"परत कधी भेटणार ?" या प्रश्नाचं
तत्वनिष्ठ रामाने राज्य त्याग केल्यानंतर
त्याला परत बोलावण्यासाठी
गेलेल्या भरताइतकं
हेही निरर्थक...

©कबीर

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सुंदर!!!
_________
आपला ब्लॉग शोधला. तरल लेखन आहे आपले. लिहीत रहा.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवितेला नावच असं दिल्यावर काय म्हणणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

कडक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!