एक लैंगिक समस्या

मी मराठी नव्याने शिकत असल्यामुळे अधिक जाणकार वाचकांसाठी एक शंका उपस्थित करतो अाहे. कोणी काही प्रकाश पाडू शकल्यास मला अानंद होईल.

पुढच्या दोन वाक्यांत मी (माझ्या कानाला) जे बरोबर वाटतं ते क्रियापद वापरलेलं अाहे.

(१) एक गलेलठ्ठ कुत्रा अाणि एक उफाड्याची पोरगी रस्त्याने हळूहळू चालत गेले.
(२) मला बराच अस्वस्थपणा अाणि किंचित धास्ती वाटली.

क्रमांक (१) मध्ये 'चालत गेली' हे बरोबर वाटत नाही, अाणि क्रमांक (२) मध्ये 'वाटले' हे बरोबर वाटत नाही. पण या दोहोंत विसंगती नाही का? जर (२) मध्ये क्रियापद 'धास्ती'च्या लिंगाला अनुसरून असेल तर (१) मध्ये ते 'पोरगी'च्या लिंगाला अनुसरून का नाही?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2.8
Your rating: None Average: 2.8 (5 votes)

विसंगती वाटण्यासारखी आहे खरी, पण आहे हे असे आहे. (दोन्ही वाक्ये माझ्याही कानांना ठीक वाटली. नियम माहीत नाही, नियम आहे की नाही हेही माहीत नाही, पण 'दोन्ही वाक्ये कानांना ठीक वाटली' हे महत्त्वाचे.)

मला वाटते हा प्रश्न साधारणतः पी-यू-टी पुट तर बी-यू-टी बुट का नाही (किंवा टी-ओ टू, डी-ओ डू तर जी-ओ गू का नाही - 'चुपके चुपके'मधून साभार!), या स्वरूपाचा आहे. 'अशीच पद्धत आहे म्हणून' याव्यतिरिक्त (किंवा याहून चांगले) उत्तर त्याला नसावे.

भाषेला सहसा नियम असतात याबाबत फारसे कोणाचेच दुमत नसावे, पण शेवटी भाषा जशी आहे त्याप्रमाणे नियम असावेत, की नियम आहेत त्याप्रमाणे भाषा चालली पाहिजे, हा प्रश्न आहे. म्हणजे, कुत्र्याला बहुधा शेपूट असते हे कोणीच नाकारणार नाही (काही जण अट्टाहासाने ते छाटून टाकतात हा भाग अलाहिदा!), पण कुत्र्याने शेपूट हलवावे की शेपटाने कुत्रे हलवावे, हे महत्त्वाचे. शिवाय, प्रत्येक कुत्र्याचे शेपूट निराळे, हाही भाग आहेच.

असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखाचे शीर्षक भलतेच रोचक आहे!

१) सीता आणि गीता एकत्रच गेल्या.
२) परेश आणि नरेश एकत्रच गेले.
३) सीता आणि परेश एकत्रच गेले.
४) नरेश आणि गीता एकत्रच गेले.

५) आमचा टॉमी आणि शेजारच्यांचा पॉमी एकमेकांवर भुंकले.
६) आमची एल्सी आणि शेजार्‍यांची चेल्सी एकमेकांवर भुंकल्या.
७) आमचा टॉमी आणि शेजारच्यांची चेल्सी एकमेकांवर भुंकले.
८) आमची एल्सी आणि शेजारच्यांचा पॉमी एकमेकांवर भुंकले.

९) हा व्यवहार करण्यात मला थोडा धोका आणि थोडी भिती वाटते.
१०) हा व्यवहार करण्यात मला थोडी भिती आणि थोडा धोका वाटतो.

निष्कर्ष -
१) सजीव व्यक्ती वा प्राणी यांच्याबाबतीत -
क्रियापद हे नपुंसकलिंगी अनेकवचनाप्रमाणे चालते. अपवाद - सर्व कर्ते स्त्रीलिंगी असतील तर क्रियापद हे स्त्रीलिंगी अनेकवचनाप्रमाणे चालते.

२) निर्जीव पदार्थ वा भावना इत्यादींबाबतीत -
क्रियापद हे शेवटच्या कर्त्याच्या लिंगाप्रमाणे चालते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

> १) सजीव व्यक्ती वा प्राणी यांच्याबाबतीत -
क्रियापद हे नपुंसकलिंगी अनेकवचनाप्रमाणे चालते.
> २) निर्जीव पदार्थ वा भावना इत्यादींबाबतीत -
क्रियापद हे शेवटच्या कर्त्याच्या लिंगाप्रमाणे चालते.

ठीक अाहे. अाता:
एक मुंजा अाणि एक चिंच झाडाला लटकलेले होते (की लटकलेली होती?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

माझ्या कानांना इथे 'लटकलेली होती' ठीक वाटते. तुमच्या?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उफाड्याची असल्याने तिच्या बॉयफ्रेण्डचा उल्लेख गलेलठ्ठ कुत्रा असा केला असले तर "चालत गेले" हे बरोबर आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अश्या प्रकारचे प्रश्न अशी वाक्य लिहिताना अनेकदा पडतात, सरावाने बरोबर लिहिले जात असावे. नक्की नियम नाहित नाही
कॉलिंग धनंजय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ही भाषिक समस्या आहे की लैंगिक?
माझ्या मते ती भाषिक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भाषेतील लिंगवाचक समस्या आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

दोन वाक्यांचा संबंध आहे का ? तसे असल्यास आणखी बरेच प्रश्न उपस्थित होतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

कठिण आहे. याबाबत रमेश धोंगड्यांनी चांगले वर्णन केले आहे. शोधून बघतो.
-----

उदाहरणातली वाक्ये थोडी सोपी करता येतील काय?

मी टांगा पाहिला.
मी गाडी पाहिली.
मी टांगेवाला पाहिला.
मी गाडीवाली पाहिली.

मी टांगा आणि गाडी पाहिली.
मी गाडी आणि टांगा पाहिला.

मी टांगेवाला आणि गाडीवाली पाहिली? पाहिले? (येथे दोन्ही पर्याय चालतात का?)
मी गाडीवाली आणि टांगेवाला पाहिला? पाहिले? (येथे दोन्ही पर्याय चालतात का?)
(*शिवाय ही भावेप्रयोगी पळवाट : "मी गाडीवाली(ला) आणि टांगेवाल्याला पाहिले." पण ही पळवाट या चर्चेत अवांतर आहे.*)

दोन्ही पर्यायांत वाक्यरचनाशास्त्राचा ("सिंटॅक्टिक") फरक आहे. दोन पर्यायांत वेगवेगळी गाळलेली अध्याहृते आहेत :
मी टांगेवाला (पाहिला, अध्याहृत) आणि (मी, अध्याहृत) गाडीवाली पाहिली.
मी टांगेवाला आणि गाडीवाली (हे दोघेजण, अध्याहृत, मिश्र अनेकवचनात पुंल्लिंग शिल्लक) पाहिले.

तर मग हेच वाक्यरचना-अध्याहाराचे पर्याय अचेतन "टांगा" आणि "गाडी" यांच्याकरिता का चालत नाहीत?

आता मिश्र चेतन-अचेतनांची उदाहरणे :

मी टांगेवाला आणि टांगा पाहिला.
मी टांगेवाला आणि गाडी पाहिली.
मी गाडीवाली आणि टांगा पाहिला.
मी गाडीवाली आणि गाडी पाहिली.

वर दिलेले दोन वाक्यरचना-अध्याहाराचे पर्याय अचेतन "टांगा" आणि "गाडी" यांच्याकरिता का चालत नाहीत?

आता लांब वाक्यांची उदाहरणे बघूया :
मी सकाळी फाटकापाशी अवचित टांगेवाला आणि गाडी पाहिली.
परंतु जर प्रश्न असा असला "टांगेवाला आणि गाडी पाहाण्याबाबत तू काय सांगू शकतोस?" तर उत्तर-वाक्यात शब्दांचा क्रम वेगळा आहे :
टांगेवाला आणि गाडी मी सकाळी फाटकापाशी अवचित पाहिली. (पाहिले?)

मी सकाळी फाटकापाशी अवचित टांगेवाला आणि गाडीवाली पाहिली/पाहिले.
टांगेवाला आणि गाडीवालीला मी सकाळी फाटकापाशी अवचित पाहिले.

अधोरेखित "ला" अपरिहार्य आहे. शिवाय "पाहिले" हे नपुंसकलिंगी एकवचन आहे. पर्यायी दोन "ला" वापरता येतात :
टांगेवाल्याला आणि गाडीवालीला मी सकाळी फाटकापाशी अवचित पाहिले.
टांगेवाला आणि गाडीला?? मी सकाळी फाटकापाशी अवचित पाहिले.
टांगा आणि गाडी मी सकाळी फाटकापाशी अवचित पाहिले/ली(?).

माझा कयास आहे, की वाक्याचा हेल आणि शब्दांचे आघात यांचा सखोल अभ्यास केला तर यातील काही पर्याय हे "पर्याय" म्हणून राहाणार नाहीत. अमुक थिकाणी जोर दिला, तर आपोआप एकच पर्याय उपलब्ध असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा गोंधळ अधिकच वाढलाय ! Wink
आधी एकेक गोंधळ निस्तरूया.. एकावेळी एकच प्रश्न विचारतो Smile

मी टांगेवाला पाहिला.
मी गाडीवाली पाहिली

जर कर्त्याप्रमाणे क्रियापद चालवायचं असेल आणि जर 'मी' पुरूष असेल तरीही "मी गाडीवाली पाहिली" कसे होते? (म्हंजे ते होते हे कबूल आहे.. पण का/कसे?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

क्रियापद प्रयोगानुसार चालते (कर्त्यानुसार, असे नेमके नव्हे).
कर्तरिप्रयोगात क्रियापद कर्त्यानुसार चालते, कर्मणिप्रयोगात कर्मानुसार चालते, आणि भावेप्रयोगात नपुंसक-एकवचनात चालते.
पूर्ण स्पष्टीकरण "मराठीतील क्रियापद रूपे - एक संदर्भतक्ता"

मी टांगेवाला पाहिला.
मी गाडीवाली पाहिली.

"ल" आख्यातात (भूतकाळ, सामान्य क्रियाव्याप्ती, तथ्यनिवेदन, हे अर्थ) सकर्मक क्रियापदे कर्मणिप्रयोगातच असतात... वगैरे मुद्दे त्या तक्त्यात दिलेले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी टांगेवाला पाहिला.
मी गाडीवाली पाहिली
जर कर्त्याप्रमाणे क्रियापद चालवायचं असेल आणि जर 'मी' पुरूष असेल तरीही "मी गाडीवाली पाहिली" कसे होते? (म्हंजे ते होते हे कबूल आहे.. पण का/कसे?)> ऋषिकेश.

ह्याचे उत्तर सरळ आहे. ही तिन्ही वाक्ये कर्मणि प्रयोगात असून येथील 'मी' हा खरा तृतीय विभक्तीतील 'म्या/मिया' किंवा जुन्या शुद्धलेखनाच्या नियमांनुसार 'मीं' (अनुस्वारासह) आहे. येथे क्रियापद कर्त्याप्रमाणे नाही तर कर्माप्रमाणे चालते आणि म्हणून 'टांगेवाला पाहिला', गाडीवाली पाहिली' आणि 'कुत्रे पाहिले' (जुन्या शुद्धलेखनानुसार 'कुत्रें पाहिलें) हे योग्य आहे.

क्रियापद कर्त्याप्रमाणे (मी) चालवायचे असले तर मी 'टांगेवाला/गाडीवाली/कुत्रे पाहता झालो' असा कर्तरि प्रयोग करता येईल. येथील 'मी' प्रथमा विभक्तीमध्ये आहे आणि क्रियापद त्याच्या लिंगानुसार आहे, कर्माच्या लिंगानुसार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छ्या! कर्तरी-कर्मणी साफ दुर्लक्षिले Sad
धनंजय, अरविंदराव आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उभयान्वयी जोडलेल्या नाम/सर्वनामांचा क्रियेशी अन्वय काय असतो?
स्रोत : "Dhongde RV and Wali K. Marathi प्रकाशनवर्ष २००९, प्रकाशक John Benjamins Publishing Company, Amsterdam/Philadelphia"
- - -

नामांच्या बाबतीत मराठीत तीन प्रकारचे नियम असतात, आणि ते वेगवेगळ्या परिस्थितीत कार्यान्वित होतात :
(अ) शेवटच्या अवयवाशी अन्वय
(आ) अनेकवचनी अन्वय
(इ) पुंल्लिंग-प्रधान अन्वय

शेवटचा अवयव अनेकवचनी असला, तर शेवटच्या अवयवाशी क्रियापदाचा अन्वय होतो :
- दोन्ही अवयव अनेकवचनी -
(१) ते नोकर आणि त्या मुली पळून गेल्या.
(२अ) त्या मुली आणि ते नोकर पळून गेलेत.
(२आ) त्या मुली आणि त्या बायका पळून गेल्या.

-पहिला अवयव एकवचनी आणि दुसरा अवयव अनेकवचनी -
(३) तो नोकर आणि त्या मुली पळून गेल्या.
(४अ) ती मुलगी आणि ते नोकर पळून गेलेत.
(४आ) ती मुलगी आणि त्या बायका पळून गेल्या.

पहिला अवयव अनेकवचनी असला, आणि दुसरा अवयव एकवचनी असला, तर दुसरा अवयव पुंल्लिंगी असल्यास त्याच्याशी अन्वय होतो, दुसरा अवयव स्त्रीलिंगी असल्यास मात्र (काही बोली सोडल्या तर) पुंल्लिंगी अनेकवचन होते.
(५) त्या मुली आनि तो नोकर पळून गेला. (*गेल्या असे चालत नाही.)
(६) ते नोकर आणि ती मुलगी पळून गेलेत. (?गेली असे काही बोलींमध्ये चालते.)

दोन्ही अवयव एकवचनी असले, तर शेवटचा अवयव पुंल्लिंगी असेल, तर क्रियापचाचे पुंल्लिंगी एकवचन पर्यायाने होते, शेवटचा अवयव नपुंसकलिंगी असला, तर क्रियापदाचे नपुंसकलिंगी एकवचन पर्यायाने होते, या दोन्ही ठिकाणी पुंल्लिंगी अनेकवचनाचा दुसरा पर्याय असतो.
(७) ती मुलगी आणि तो नोकर पळून गेला/गेलेत.
(८) तो नोकर आणि ते माकड पळून गेले/गेलेत.

दोन्ही अवयव एकवचनी असले, पण शेवटचा अवयव स्त्रीलिंगी असला, तर क्रियापदाचे पुंल्लिंगी अनेकवचन होते. (पर्याय नाही.)
(९) तो नोकर आणि ती मुलगी पळून गेलेत.

दोन्ही अवयव स्त्रीलिंगी एकवचनी असले, तर क्रियापदाचे स्त्रीलिंगी एकवचन होते.
(१०) ती बाई आणि ती मुलगी पळून गेली. (येथे धोंगड्यांनी "गेल्या" असा अनेकवचनी पर्याय दिलेला नाही. माझ्या घरगुती बोलीत तसा पर्यायसुद्धा आहे. तिरप्या ठशातले वाक्य तितके धनंजय आयडीचे मत.)

- - -
सर्वनामे : प्रथम पुरुष एक अवयव असला, तर अन्य अवयव द्वितीय किंवा तृतीय पुरुषी असला, तरी प्रथम पुरुषाप्रमाणे क्रियापद चालते (क्रम काही का असेना)
(११) मी आणि तू (अथवा तू आणि मी) उद्या घरी जाऊ.
(१२) मी आणि ती (अथवा ती आणि मी) उद्या घरी जाऊ.

एक अवयव द्वितीय पुरुषी असला, आणि दुसरा अवयव तृतीय पुरुषी असला, तर क्रियापद द्वितीय पुरुषाप्रमाणे चालते :
(१३) तू आणि त्या मुली बागेत जाणार आहात.

- - -
वर (पहिल्या भागात) शेवटच्या एकवचनी अवयवासारखे क्रियापद चालण्याचे नियम आहेत, त्याला अपवाद असलेली काही क्रियापदे आणि संदर्भ आहेत : त्यात अपरिहार्यपणे अनेकवचन होते :
-एकमेक प्रयोग -
(१४) लिली आणि बाबू एकमेकांशी नेहमी भांडतात.
(१५) लिली आणि मिनी एकमेकांसारख्या दिसतात.
(१६) लिली आणि मिनी जुळ्या बहिणी आहेत.

- - -

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(१) ते नोकर आणि त्या मुली पळून गेल्या.

याला समांतर प्रयोग

(२अ) त्या मुली आणि ते नोकर पळून गेलेत.

ऐवजी 'त्या मुली आणि ते नोकर पळून गेले' असा हवा ना? 'गेल्या' आणि 'गेले' किंवा 'गेल्यात' आणि 'गेलेत' समांतर वाटते. 'गेल्या' आणि 'गेलेत' वाटत नाही. 'गेलेत' हे 'गेले आहेत' चे लघू रूप वाटते. ही simple past आणि present perfect ची उदाहरणे वाटतात (अनुक्रमे). चुभुद्याघ्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उदाहरणे धोंगड्यांच्या पुस्तकातली आहेत.

पण तुम्ही म्हणता तसे वाटते खरे. माझ्या घरगुती बोलीत "ते नोकर पळून गेले" असे म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी मराठी नव्याने शिकत असल्यामुळे

जचि काकाचं मराठी शिक्षण कुठवर आलं मग?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

शिर्षक वाचुन केवढ्या उत्सुकतेने धागा उघडलेला. श्याऽऽ Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्याकरण आणि लैंगिक समस्याच विचार करताना कायम intuition ला follow करावे असा लहान तोंडी मोठा घास घेऊन मी सांगतो.

लैंगिक प्रश्न म्हंटल्यावर या धाग्याला काही डीप लेयर्स आहेत का काय अस वाटत आहे.
प्रश्नात दोन उदाहरण आहेत एक म्हणजे गल्लेलाठ कुत्रा आणि दुसरी म्हणजे उफाड्याची मुलगी.
न्यूझीलंड मधील टोगो चीम्बोरा नामक आदिवासी जमातीमध्ये जाड कुत्रा हा भयंकर लीबिडो चे प्रतिक आहे.
उफडा म्हंटला कि उकडलेला बटाटा कुकरमधून बाहेर काढल्यासारख वाटत. असो खूपच अवांतर झाल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!