उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - १८
आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या / नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती? हॉटेलचा अॅम्बियन्स कसा होता वगैरे हवं ते लिहू शकता. पदार्थाचा फोटो असेल तर उत्तमच. अर्थातच हे फक्त खाण्याबद्दल नाही, तर पिण्याबद्दलही आहे.
---
अधिक तपशील प्रतिसादात -
केपी आले कोथरुडा : भाग पाच :ऑलिव्ह व्हीट ग्रेप
प्रभात रोड आणि कमला नेहरू पार्क रस्ता जिथे क्रॉस होतो तिथे पूर्वी सुवर्णरेखा नावाची खानावळ होती ( गेली बिचारी) तिच्या जागी आता सुवर्णरेखा बुलेव्हार्ड(!) नावाची बिल्डिंग झाले आहे.तीमध्ये ऑलिव्ह व्हीट ग्रेप नामे रेस्टॉरंट चालू झाले आहे. आत्ता तरी संपूर्ण मेन्यू मेडीटेरेनियन आहे. पुणे पश्चिम ( खरं तर संपूर्ण पुण्यात ) याची उणीव होती.
मोरे नावाचे मालक असावेत. कुणी लिमये म्हणून प्रसिद्ध शेफ असावेत त्यांनी हे रेस्टॉरंट 'रचले' आहे म्हणे. ओपन किचन आहे. अजून बार नाही.
मोठ्या काचा सगळीकडे. निसर्गरम्य प्रभात रोड बघत जेवणेची सोय आहे.
हम्मस पिटा व लेमन चिकन मोरोक्कन घेणेत आले.
हम्मस उत्तम, पिटाब्रेड हे साधारण पुऱ्यांच्या एवढे मोठठे होते .
लेमन चिकन मोरोक्कन उत्तम. वर मामींनी लिहिलेले कुस्कुस या बरोबर होते.
पुन्हा जाणेत येईल
अवांतर :आम्ही वर्किंग डेला लंचला गेलो होतो. गर्दी कमी होती.
जुन्या सुवर्णरेखामधे आल्यासारखे काका मामा आजी वगैरे जनता आली होती.
मेन्यू मेडीटेरेनियन होता पण काका मामा चर्चा आमरसाची करत होते.
Sounds interesting, ट्रायला
Sounds interesting, ट्रायला हवं. लिमये म्हणजे निलेश लिमये असावेत.
बाकी सुवर्णरेखात मिळणारा तुकडा-तांदळाचा भात नी गरम गरम आमटी, बिटाची कोशिंबीर, दही/ताक डोळ्यासमोर आलं नी तों.पा.सु. (अर्थात कोरड्या पिठाळ पोळ्या, अति शिजलेल्या भाज्या, वाढप्यांचे रागीट + वैतागलेले चेहरे या डाव्या बाजू होत्याच, पण चालायचंच आम्हा कालेजात जाणाऱ्या/ होस्टेलाईट लोकांना त्याची सवय होतीच :P).
घनोबा, तुम्ही इतके महिने
घनोबा, तुम्ही इतके महिने/वर्षे नुसते घरी वरणभात नक्कीच खात नसणार.
तुम्ही ओरिजिनल रेस्टॉरंट शोधे.
जरा तुमचे शोध इथे मांडा की,जरा कळू देत इतरांना काय काय कुठे कुठे नवीन ते...
घनोबा, तुम्ही इतके महिने
:D:D:D:D:D:D
हो अबा नक्की.
वा वा
अबा, अगदी आमच्या घराजवळच्या हाटेलांत येऊन गेला म्हणे!
अगदी..मायदेशी कधी परत येणार
अगदी..मायदेशी आगमन कधी ?
आलात की जाऊ तिथे.
?
मायदेशी???
तिरसिंगराव तुमच्या देशी.
तिरसिंगराव तुमच्या देशी.
ओह!
ठीक.
@अबा,
@अबा,
ऐसी मात्र उशिरा सापडले.
La Gustosa
कर्वे पुतळ्याच्यामागे एक जुनी नॉनडिस्क्रिप्ट गचाळ त्रिकोणी बिल्डिंग आहे. याच बिल्डिंगीत कोथरूड पोष्ट हापिसाशेजारी उपरनिर्दिष्ट नावाचे पाश्चात्य व्यंजने देणारे छोटेसे रेस्टो आहे. अजून एक मराठी तरुणाने चालू केलेलं ..( म्हणजे अखेर मराठी तरुण वडापाव गाडीच्या बाहेर पडले ..
)
हल्लीच्या अशा रेस्टो मधील ट्रेंडनुसार मेन्यू कार्ड नसणे व फळ्यावर खडूने मासिक मेन्यू लिहिणे वगैरे प्रकार.
केवळ उत्तेजनार्थ गेल्याने फक्त ग्रील्ड चिकन व अरबी पेने पास्ता खाल्ला
बरे होते.
एसी आहे
बार नाही.
( हाटेलवाल्याना साप्ताहिक उत्तेजन देणे मी आता थांबवावे म्हणतो.
जरा नवीन पिढीने ही धुरा सांभाळावी.
घनू, बॅटोबा, ढेरे, मनोबा वगैरेंनी हे सदर आता पुढे चालवावे ....)
आम्ही परवाच सुधीर भटांना
आम्ही परवाच सुधीर भटांना बांगडा थाळी खाऊन उत्तेजना दिली.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
कुझिना दे गोवा
शिवाजी पुतळ्याजवळ आहे. सुकट चटणी आणि सोलकढी अतिशय रुचकर. वास मस्त आणि किमती भटांच्या खानावळीहुन कमी आहेत. शिवाय गोव्याचेच कुणीतरी लोक चालवत आहेत. बांगडा थाळी उत्तम होती.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
गुड. इथे चालत फिरताना दिसले
गुड. इथे चालत फिरताना दिसले होते. जमेल तेव्हा जाऊन बघतो.
- ओंकार.
भटांकडचा बांगडा बोर होता
भटांकडची थाळी बोर होती एक्दम. मजा नाय आली. तुम्ही म्हण्ता त्या ठिकाणी जाईन.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
सहमत्
भटांचं फि. क. आता ओरे च वाटतं, चवीच्या आणि लिटरली रेटच्या बाबतीत !
मागे कोथरूडात इटालियनची सोय
मागे कोथरूडात इटालियनची सोय बघताना हे दिसले होते.पण बाकी लोकांना झेपेल की नाही म्हणून पॅडीज कॅफे मधे गेलो. सोलारिस जिम च्या शेजारी आहे. पॅडीज कॅफे चांगले आहे छोटेखानी ओपन कॅफे आहे. बार नाही. मागच्या रविवारी परत गेलो होतो. उन्हाचा त्रास होईल असे वाटले होते पण तेवढा झाला नाही. मेनू, चव चांगली आहे.
- ओंकार.
क
काय स्वरूपाचा मेनू आहे ?
मिक्स मेन्यू आहे. फ्राईज,
मिक्स मेन्यू आहे. फ्राईज, वेजेज, नाचोज, पिझ्झा, पास्ता, बर्गर, सॅलड, रिसोटो, मेन्स मध्ये चिकन, बासा, इ. दुवा इथे
- ओंकार.
कोणत्या हाटेलात आज काय मेन्यु
कोणत्या हाटेलात आज काय मेन्यु/नवीन आहे हे फोन करून विचारतात / अॅप आहे?
--
मालक लोक नेहमीच्या खवय्यांना कसंकाय, सूचना विचारणे, वार्तालाप करतात का?
झोमॅटो वर हाटेलातील मेनू
झोमॅटो वर हाटेलातील मेनू कार्ड असते.
काही काही नवीन हाटेलात वार्तालाप होतो.
जिमीज् परत
आधी एकदा त्यांच्या 'जॉब्रेकर' पाऊण फुटी बर्गर बद्दल लिहीलंय. तिथे परत गेलो काही मित्र बऱ्याच दिवसांनी आलेले म्हणून. चिकन जॉब्रेकर, पोर्क जॉब्रेकर, अनिअन रिंग्ज(कांदाभजी तिच्यायला), चिझी फ्रेंच फ्राइज विथ क्रिस्पी बेकन, पीच आईस टी इ. चरलो. कोट्यवधी क्यालरी इ. इ. प्रचंड गिल्ट इ. इ. आता जोराने व्यायाम सुरू.
पीच आईस टी झक्क्कास होता. आईस टी हे माझं नवीन फ्याड ठरू शकेल.
संपादन:
आता जिमीज् बऱ्यापैकी मोठं झालंय. तीसचाळीस पान जेवून उठेल! ते एक्झॉस्टमुळे एसीचा मृत्यू वगैरे होण्याइतकी छोटी जागा नाही. तिथून ते हलून साधारण पन्नास मीटर अलिकडे आलंय. जागेचा पर्फेक्ट वापर केलेला आहे. काऊच टेबल २, टॉल स्टूल्स ३, साधी टेबल्स ४. आऊटडोअर सीटिंग अजून साताठ टेबल. मांस(कुक्कुट, वराह, हम्मा) ताजं, रसरशीत, कुरकुरीत आणि चविष्ट असतं. मटण फक्त क्लासिक बर्गरांत. जे देतात त्यामानाने किंमती भन्नाट स्वस्त आहेत.
झोमाटू दुवा इथे:
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
!!!
मुंबईत हम्मा??????
ती शिवसेना, मनसे, भाजप, झालेच तर संकीर्ण हिंदुत्ववादी औटफिट्स वगैरे मंडळी काय झोपा काढून राहिलीत काय?
हम्मा
शंभर पावलांवर स्टॅक्स ॲण्ड रॅक्स आहे. तिथे तर फक्त हम्मा खायला जातात म्हणे रसिक. गौराक्कांनी पहिलं डुक्कर इथे खाल्लं.
Find this restaurant on Zomato | Stacks And Racks, Malad West http://zoma.to/r/18408295
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
गौराक्का तुमच्या कोण ?
गौराक्का तुमच्या कोण ?
मी पूर्वीदेखील हा प्रश्न
मी पूर्वीदेखील हा प्रश्न विचारलेला आहे. मला वाटतं कुटुंबात असाव्यात.
अटकळ
बहुधा ज्येष्ठ भगिनी असाव्यात. (चूभूद्याघ्या.)
+१
+१
कोsहम्मा
इथल्या भाषेचाच आधार घेऊन सांगायचं झालं तर:
पुरूषाच्या आयुष्यात एकच अशी स्त्री असते जिचं वर्णन तो 'हम्मा' असं आजन्म करू शकतो.
--
उद्योग नाहीत का पब्लिकहो दुसरे?
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
प्रश्न
१. कधी होते?
२. का असावेत?
खी: खी: खी:
खी: खी: खी:
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
म्हैसह्म्मा असेल.
म्हैसह्म्मा असेल.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
हम्मा
@'न'वी बाजू
मुंबईत हम्मा बऱ्याच ठिकाणी अगदी राजेरोसपणे मिळतं.
योको, कॅफे युनिवर्सल ला मी स्वतः पाहीले आहे.
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
कोरेगाव पार्कातल्या
कोरेगाव पार्कातल्या स्टारबक्सजवळ ॲबिसिनियन नावाचे हबशी हाटेल सुरू झाले आहे तरी भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा.
१. मिटमिट सोडा- स्पाईस घातलेला सोडा.
२. मसूर डाळीचे सारण असलेला समोसा.
३. नाचणीचा आंबट डोसा हा बेस घेऊन-
४. अंडाकरी विथ इथिओपियन गरम मसाला बर्बेरे
५. मटनकरी विथ छोले पेस्ट.
६. इथिओपिअन बक्लावा.
७. इथिओपियन कॉफी. त्यात फक्त वितळलेले लोणी आणि मीठ घालून न ढवळता. तशीच पद्धत आहे म्हणे. माझ्यासारख्या चहाकॉफीद्वेष्ट्यालाही तब्बल तीन छोटे कप भरून प्यावी वाटली.
इथिओपियन हाटेल पुण्यात नाही याची इतके दिवस वाटणारी खंत आता उरली नाही. अवश्य जावे, सर्व काही अत्युत्तम आहे. फक्त किमती जास्त आहेत तेव्हा खूप वारंवार जाता येणार नाही इतकेच काय ते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हबशी खाणावळ
मस्त बातमी! आभार!
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
छान
काल गेले होते ॲबिसिनियनला. मिटमिट सोडा सोडून सगळं आवडलं. मी कदाचित तो जास्त ढवळला. तिखटाचा खकाणाच.
कॉफी फारच आवडली.
छान बातमी.. अनेक धन्यवाद..फार
छान बातमी.. अनेक धन्यवाद..फार दिवस वाट बघणे चालू होते. इंजेरा कसा होता ? बरबेरे म्हणजे काय ?
इथे पांढरे, पिवळे व काळे
इथे पांढरे, पिवळे व काळे पापलेट विकायला होते. काळा पापलेट म्हणजे हलवा ९९% असेच वाटते. मी नवीन मासा आणला आहे - मिल्कफिश म्हणुन. तैवानी मासा आहे. आज भात-कालवण केलेले आहे. बघू यात कसा लागतो ते. मात्र गुगल केल्यावरती सापडले की फार काटे असतात. पाहू कसे जमते ते. नवऱ्याला काटे आवडत नाहीत; नाही खाणार तो. कसला आलाय डोंबल्याचा सीकेपी मग मी बरी सासरी आल्यावर आनंदाने बाटले
_____________________
खूप छान होता. काटे होते पण अति नव्हते.
———————————
बाकी अप नाॅरथ म्हणजे विस्काॅन्सिन मध्ये आलं व बटर सद्रृश म्हणजे लाईट्ट आॅलिव्ह देखिल असू शकते मधील व्हाईट फिश फार आवडलेला स्मरते.
पहिल्यांदाच ऐकला मिल्कफिश -
पहिल्यांदाच ऐकला मिल्कफिश - बघतो सापडतो का इथे.
पाप्लेट - मी चिनी मार्केटातून एकदा घेतलं होतं - गोल्डन पाँफ्रेट का असं काहीचं - अगदीच "हे" निघालं - तेव्हापासून इथलेच लोकल मासे खातो.
-------------
काटेवाले मासे असले तरी इकडे फिले (फि-ले-ट.) करून मिळतात. साफही करून देतात हवं तर -
==================
भूतकाळातील आस्वल्य.
होय फिले मस्तच असतात. अस्वल
होय फिले मस्तच असतात. अस्वल फ्लाउंडर खाल्लाय का? मस्त असतो एकदम चवीला.
नाय बा.
नाय बा.
चवीला खाल्ला असावा पूर्व किनाऱ्यावर कधीतरी -पण नेहेमी नाही.
-----
इथले मासे म्हणजे
साल्मन - विविध प्रकारचे.
ट्राऊट
तिलापिया (बोअर मासा.)
कधीमधी रॉकफिश, हालिबट वगैरे.
=========
माझे आवडते छोटे मासे नाही मिळत जास्त इथे.
स्मेल्ट म्हणून छोटे मासे असतात ते कधीतरी अचानक दिसतात - मस्त लागतात. एकहाती १०-१२ तरी खावेत,सोबत भात आणि माशाची आमटी.
पण तेही क्वचित.
anchovy (मांदेली बहुधा?) म्हणतात ते कधी कधी दिसतात, पण ताजे मिळत नाहीत. इंडियन रेस्टॉरंटात मग मटकावतो कधीतरी.
पण मस्त्यपुराण इतकंच.
खेकडे, शिंपलेवर्गीय गोष्टी घरी आणून करायचा कंटाळा- नाहीतर ते मिळतात मस्त.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
होय्य्य्य्य्य्य स्मेल्ट मस्त
होय्य्य्य्य्य्य स्मेल्ट मस्त लागतात. येस्स्स्स्स!! स्मेल्ट तर मी काटेही खाते. कसले लहान असतात. मला आवडतात. मुलीला नाही आवडत.
_________
तिलापिया फार बोअरिन्ग आहे हे सत्य आहे.
-----------
हां हालिबट इज ओके टू. ट्राऊट खाल्ला नाही कधी. आणेन आता.
हे मोठ्ठाले मासे फार ओवररेटेड
हे मोठ्ठाले मासे फार ओवररेटेड आहेत - सुरमई,सरंगा, पापलेटं, साल्मन, हालिबट वगैरे मातबर मंडळी.
म्हणजे ते चवीला चांगले आहेत, नाही असं नाही पण छोट्या माशांची सर नाही.
छोटे मासे खरं तर कसले चविष्ट लागतात! आणि काट्यांसकट तर आणखीच सॉलिड.
पेडवे, तारले, मांदेली, मुडदुशा, (छोटे) बांगडे, येरल्या,मोदकं अप्रतिम चवीची मासळी आहे.
सुदैवाने त्यांना फारसा भाव नाही त्यामुळे त्यांना अतिमत्स्यशेतीचा धोकाही नाही
आणखी काही वर्षं तरी (मिळाली तर!) छोटी मासळी बेष्ट!
==================
भूतकाळातील आस्वल्य.
पेडवे, तारले, मांदेली,
हे प्रकार नाही खाल्लेले. पण खायची इच्छा आहे. हां मोरी (शार्कची पिल्ले) खाल्ली आहेत.
पाप्लेट - मी चिनी मार्केटातून
आम्हाला चालते. नव्हे, पळते. ('कारण शेवटी आम्ही भटेच. त्याला काय करणार?' - पु.ल.)
न.बा - तुम्हाला झाडं सोडून
न.बा - तुम्हाला झाडं सोडून उरलेले सजीव खायला कुठल्या क्रमाने आवडतात सांगा जरा?
==================
भूतकाळातील आस्वल्य.
...
डिपेंडिंग ऑन व्हॉट आय ॲम ईटिंग, हम्मा आणि बोकड यांच्यात पहिल्या क्रमांकासाठी चुरस आहे. (देशी अथवा जमैकन गोट करी त्रिभुवनाच्या तोंडात मारते. अर्थात कारण शेवटी आम्ही, इ.इ.)
बाकी, समुद्राहारातले मला फारसे काही (किंवा खरे तर काहीच - कारण शेवटी आम्ही इ.इ.) कळत नाही. परंतु मासे कच्चे खात असल्यास (अर्थात सुशी/साशिमी) साल्मन (बोले तो मराठीत रावस ना?) तथा मॅकरेल (बोले तो मराठीत बांगडा ना?) आवडतात, तथा नारळाच्या दुधातून (अर्थात थाई करी) खात असल्यास श्रिम्प (कोळंबी?) आवडतात.
बाकी कोंबड्या वगैरे... आपल्या जागी ठीकच आहेत.
माणसे अद्याप खाऊन पाहिलेली नाहीत. बेडकाच्या तंगड्या एकदाच खाल्ल्या होत्या. आवडल्या नाहीत. (त्यापेक्षा माणसाने थर्माकोल/स्टायरोफोम चघळावा.) गोगलगाय किमान दोनदा खाल्लेली आहे (एकदा अटलांटात आणि एकदा पॅरिसमध्ये). आवडली, परंतु वारंवार खाणे खिशाच्या आरोग्यास पोषक नाही, असे जाणवले. (तशी सुशीसुद्धा (झालेच तर उत्तम दर्जाचा ष्टेक) वारंवार खाणे खिशाच्या आरोग्यास पोषक नाहीच, परंतु... माणसाने मग जगावे तरी कशासाठी?)
डुक्कर... वर्ज्य नाही (तसे आम्हाला काहीच वर्ज्य नाही), परंतु... काही तुरळक अपवाद वगळता (स्मोक्ड सॉसेज, वगैरे) फारसे आवडतही नाही.
गोट करी - हम्म्म .. चुक्क का
गोट करी - हम्म्म .. चुक्क का अशा काहीशा नावाची एक ज्वालाजहाल गोट करी मी खाल्ली होती. मेंदू शिणल्याचे आठवते. असो.
माणसे खाऊही नका. कुरू अर्थात वेडगायरोग होतो त्याने असं म्हणतात.
बाकी खाणारे काहीही खातात. परवा एका ठिकाणी ऑक्टोपस बॉल्स खायला ठेवलेले पाहिले. ऑक्टोपसलाही गोट्या असतात हे कळलं. त्या मृत ऑक्टोपसची आणखी अवहेलना करू धजलो नाही.
तसंच कोंबड्यांचे पाय, बेडूक तंगड्या वगैरे प्रकार. अद्याप खाऊ धजावलो नाही.
त्यामानाने (भटें असूनही) तुम्ही प्राणीखाण्यात बरीच मजल मारलीत. ऐकून बरं वाटलं
==================
भूतकाळातील आस्वल्य.
...
आय वोण्ट बी सर्प्राइझ्ड. माणसाइतका विकृत प्राणी त्रिभुवनात नसेल. (चूभूद्याघ्या.)
का असू नयेत? (त्याशिवाय ऑक्टोपशणीची अंडी फर्टिलाइझ कशी होत असतील बरे? पुराणांतल्यासारखी कोण्या ऋषीच्या आशीर्वादाने?)
(बाकी, मृत ऑक्टोपसची अधिक विटंबना म्हणून नव्हे, परंतु सुशीस्वरूपातला ऑक्टोपस खाऊन जुन्या काळातल्या बाटा, करोना अथवा स्वस्तिक रबर कंपनीच्या हवाई चपला चघळण्याचा आनंद मनमुराद लुटलेला आहे, त्यावरून धसका घेऊन ऑक्टोपसचे उर्वरित उभ्या आयुष्यात काहीही खाण्याची इच्छा उरलेली नाही.)
का बुवा? आमचे भटें असणे हे आमच्याच वाटेल ते खाण्याच्या आड का यावे?
'गाय खाणारा भट' हे तुम्हाला अप्रूप असेलही कदाचित. मला असण्याचे काहीच कारण मला दिसत नाही. (होय, मी भट आहे. आणि होय, मी गाय खातो. (गोगल, बिगरगोगल, दोन्हीं. परवडेल तशा, आणि तेव्हा.) या प्रत्यक्ष उदाहरणावरून, जगातील किमान एक तरी भट गाय खातो, हे सिद्ध व्हावे१; तस्मात्, यात अशक्यकोटीतील काहीही नाही, हे उघड आहे. सबब, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही आहे, असे निदान आम्हांस तरी वाटत नाही. जे गायींबद्दल, तेच इतर प्राण्यांबद्दल.)
(हं, आता गायी, अथवा वेगवेगळे प्राणी, अथवा कोणतेच प्राणी, न खाणारी भटें जगात असतीलही. नव्हे, आय डेअरसे, पुष्कळ असतील. तो अर्थात सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. परंतु तरीही, तसे नसणाऱ्या भटांमध्ये (विशेषेकरून इतरांस) आश्चर्य, कौतुक अथवा फॉर्दॅट्मॅटर निव्वळ बरे वाटण्यासारखे नक्की काय असावे, हे कळत नाही. तोही सर्वस्वी त्या (तसे नसलेल्या) भटांचा प्रश्न असावा, नाही काय?)
==========
१ शिवाय, तसे करणारा/करू शकणारा त्रिभुवनातील मी एकमेवाद्वितीय भट आहे, असाही माझा दावा नाही.
माईल हाय बॉल्स
डेन्वरमधल्या एका रेस्तराँत वृषभवृषणे खायचा योग आला होता. किंचित लपवाछपवी म्हणून त्यांना ह्या नावाने संबोधतात: https://en.wikipedia.org/wiki/Rocky_Mountain_oysters
बैलाची जीभ ही देखील खास
बैलाची जीभ ही देखील खास पाककृती असल्याचे वाचलेले आहे.
हो हो
पहिल्यांदाच हिंदुस्थानातून बाहेर पडलो होतो, तेव्हा (सान फ्रान्सिस्कोच्या वाटेवर) वाटेत सिंगापूरला बऱ्यापैकी लांब स्टॉपोव्हर होता, म्हणून एअरलाइनने हॉटेलात ठेवले होते, तिथल्या बफेमध्ये बैलाची जीभ होती. ती (कुतूहल म्हणून) आवर्जून खाल्ली नसती, तर आम्ही आमच्याच नजरांतून गिरलो असतो. खाल्ल्यावर पुन्हा त्या वाटेस जाऊन आवर्जून खाण्यासारखी वाटली नाही, ही बाब अलाहिदा.
मात्र, येथे संयुक्त संस्थानांत क्यूबन तथा जमैकन रेष्टारण्टांत बैलाची शेपूट खाल्ली आहे. बरी लागली, परंतु बैलाच्या शेपटीला हाडे कोठून येतात, ते अद्याप कळलेले नाही. (बैलाच्या जिभेस मात्र हाड असल्याचे आढळल्याचे आठवत नाही.)
असो चालायचेच.
तसंच कोंबड्यांचे पाय, बेडूक
अगदी अगदी.
सासूबाई खायच्या. माझ्यात मात्र गटस नाहीत.
???
तुमच्यात गट्स नाहीत? बोले तो, तुमच्या जठराच्या पोकळीत आतडी नाहीत?
की तुम्ही ट्राइप कधी खाल्लेले नाही१, असा तुमचा दावा आहे?
----------
१ मी खाल्लेय!१अ टुकटुक!
१अ गेला बाजार, अतिशय सामान्य प्रकारच्या पाककृतीत तरी खाल्लेले आहे. फारसे आवर्जून खाण्यालायक नसते१अ१, परंतु तरीही. (खाल्लेले आहे, बीन देअर डन दॅट, एवढेच ठासून सांगावयाचे आहे.)
१अ१ इट इज़ चीप फॉर अ रीझन.
परिशिष्ट
एकदा आमच्या स्थानिक ग्रोसरी ष्टोरात (चुकून - बोले तो, नेहमी ठेवत नाहीत, पण एकदा ठेवले होते ते कुतूहल म्हणून आणले होते) मगरीचे मांस मिळाले होते. नाही आवडले.
तसेच, एकदा आमच्या स्थानिक फार्मर्स मार्केटात ससा मिळाला होता. चांगला होऊही शकला असता कदाचित. (कल्पना नाही.) परंतु, शिजविताना, कुकिंग वाईनमध्ये अगोदरच बचकभर मीठ घालून ठेवलेले असते, हे विसरलो, नि व्हायचा तो घात झाला.
असो चालायचेच.
:)
कुठलीही गोष्ट 'Take it with a pinch of salt' घेण्याची सवय ही तेव्हापासूनची?
अवांतर: न्यू ऑर्लिन्स/केजन कुझिनमध्ये मिळणारे ॲलिगेटर सॉसेजेस वा तत्सम पदार्थ चांगले असतात चवीला. अर्थात त्यात अन्य घटकांचा वाटा अधिक.
इथली
इथली माशांवरची चर्चा वाचून, फक्त आम्हीच ममव आहोत, याची खात्री पटली! सर्वात आवडता पदार्थ: वरणभात.
तिरशिंगराव, आता पाहिली तुमची
तिरशिंगराव, आता पाहिली तुमची प्रतिक्रिया.
अस्संच म्हणणाऱ्या एका माणसाला मी बऱ्यापैकी मासेखाऊ बनवलं आहे.
तस्मात अजूनही वेळ गेली नाही ..
चलो फिशमार्केट!
==================
भूतकाळातील आस्वल्य.
सत्कार
परवा सत्कारात दह्याची सोलकढी प्यायले.
आता खुद्द मुंबईत पुणेरी बाणा आला म्हंटल तर आपण डोळे मिटुन घ्यावेत, म्हंजे जिवाला त्रास नको.
----------------------------
मामासाहेबांची पोस्टींग आय एन एस अश्विनी मध्ये असल्याने नेव्ही नगरात जायचा योग आला. त्या निमित्ताने उत्तम फिश सिझलर्स यु. एस. क्लब वर खायला मिळाले. डोळ्यांचे पारणे फिटेल अशी जागा आहे. जावयास मिळाल्यास चुकवू नये. नाही तऱी आपल्या सारख्या "BLOODY CIVILIANS" ना हे भाग्य कुठुन लाभायचे.
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
(संकीर्ण प्रश्न / सत्कार)...
- आणि सासऱ्यास मिळाल्यास?
- कोणाच्या सत्कारात?
- मराठी सत्कार की बंगाली सत्कार?
गोरेगावातलं सत्कार..
गोरेगावातलं सत्कार.. मासेखाऊंसाठी प्रसिद्ध आहे.
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
एकेकाळी (२००० च्या आसपास)
एकेकाळी (२००० च्या आसपास) सत्कारात जाऊन मासे खाणं हा नित्यनियम होता.
तेव्हाच माझ्या एका नातेवाईकांनी "पूर्वीचं सत्कार" राहिलं नाही असं म्हणायला सुरूवात केली होती- त्यांच्यामते माशांची साईझ कमी झाली होती.
नंतर सुरमईच्या कापांची जाडी मिलिमीटरवर आल्यावर मलाही हेच वाटलं.
नशीब थोर असल्याने घरी आणि इतर नातेवाईकांकडे चांगले आलंलसूण-मसाला वगैरे घालून साग्रसंगीत मासे मिळत असल्याने हे दु:ख मला फार वाटलं नाही.
सोलकढीत दही म्हणजे बहुतेक म्यानेजमेंटने खुल्लमखुल्ला नकली झाल्याची कबुली दिली आहे.
आता सोयाबीनच्या बांगड्यांचे तुकडे आणि गाभोळीच्या नावावर तिखट जेली द्यायला सुरूवात होईल ....
==================
भूतकाळातील आस्वल्य.
सोलकढीत दही
याईक्स!!!
चुक्क कापी, परोटा सालन, पणीयरम आणि बरच काही
डिसेंबरात तामिळनाडला (तामिळनाड च बरोबर आहे
तामिळनाडूहे हुच्चभ्रु१ नॉर्थ इंडियन्सनी केलेलं नामकऱण आहे) जाण्याचा योग आला. अम्मा माझ्या क्याटेगरीतल्या खादाडबुचक्या असल्याने रस्त्याने२ येता जाता जे दिसेल ते स्वाहा करणं ओघाने आलं.सुक्कु कापी (उच्चारी चुक्क कापी) : सुंठ३ घातलेली काळी कॉफी रस्तोरस्ती मिळते. थोडीशी तिखट, कडवट (हलक आंबट, लिंबू पिळून घेतल्यास) अप्रतिम लागते. इथे मुंबईला हौसेने चुक्क कापी शोधून प्यायला गेले, लई भंगार निघाली
केप्पै कूळ - (नाचणीचं आंबिल) - हे प्यायला तिथेच जायला हवं. लोट्यात (उच्चारी चेंब) ताक , कच्चा कांदा, हिर्वी मिर्चि घातलेलं नाचणीचं आंबिल त्या सोबत ताकातली मिर्चि (उच्चारी मोर मिळगी) म्हणजे त्या काहीलीमध्ये स्वर्गसुख आहे. हे बाजरीचं (कांबू कूळ) ही मिळतं
सुंदल - उकडलेले काबूली चणे, त्याला हलकी फोडणी, भेळवाल्या भैय्यासारखं त्रिकोणी कागदाच्या पुडीत वर कच्ची कैरी, कांदा , टोमॅटो घालून देतात.
पणियारम - आपले आप्पे हो. पण ते आपल्या डोळ्या समोर गर गर फिरवून सर्कन केळीच्या पानवर त्यावर त्या तीन तीन चटण्या ओतून देतात त्याचं कवतिक
इडीअप्पम - शेवयांची इडली, पण ती केळीच्या पानात कुस्करुन वर ओलं खोबरं आणि साखर पेरून देतात
मुट्टाई डोसा (उच्चारी मुट्ट दोसाय) - अंड घालून केलेल डोसा, मऊसूत अगदी लुसलुशीत असतो.
परुथ्थी पाल - ( कापसाच्य बीच पेय) - थोड गुळमट / तिखट, आतून थंडावा देणारं
केप्पई पुट्ट - नाचणीची इडली , फक्त लंबगोलाकार स्वरुपात, अम्मानी ते ही खोबरं , साखर घालून घेतलं, भारी लागतं
भज्जी - केळ्याची भजी , पण वरचे आवरण लई जाड आणि तिखट असते.
पराठा (उच्चारी परोटा) - मैद्याच्या असंख्य आवरणानी बनवलेला असतो. ह्याचं अजून एक भावंड म्हण्जे कुत्थू परोटा, अंड, मसाला, कांदा वगैरे घालून त्याला तव्यावर बदड बदड बदडतात, पार खचाखच आणि ती सगळी खिचडी केळीच्या पानावर ओतून तुम्हाला देतात.
पोंगल - आपली खिचडी.
तकाली चटणी - टोमॅटोची चटणी, सहसा इथे खोबऱ्याच्या चटण्या असतात, पण हा एक भारी प्रकार आहे. थोडाशी आंबट तिखट चव असते. इटली आणि तकाल चटणी म्हणजे स्वर्गसुख आहे.
तेन्नई कुरुत्त - नारळाच्या कोवळ्या बुंध्याच्या गाभ्याच्या अती पातळ चक्त्या.
शहाळे - हे सगळी कडे मिळतं पण अण्णानी ते सोलून दिल्यावर लगेच तोंडाला लावून४ एका पेट्टात संपवणे हा भारी प्रकार होता
वाटेत एकदा अतिशय मळकट खानावळीत जेवायला गेलो, ढिगभर भात त्यात रसम आणि सांबार, त्या सोबत मुरूंकाई (शेवग्याच्या शेंगा) ची भाजी, दुसऱ्या भातावर मोर रसम( ताकची तमीळ कढी) तिसरा भात घ्यायची पण सोय होती पण आपल्याच्याने दुसराही पार थांबू थांबू संपतो. त्यात वत्त कुळंबचाही ऑप्शन होता (टर्की बेरी - मराठीत याला काय म्हणतात माहीत नाही) पण ते लई कडवट तिखट प्रकार असल्याच माहीत असल्याने काही घेतला नाही. त्यात आणि केळीच्या पानवर इथे तिथे धावणारं रसम, सांबार सांभाळताना लई दमछाक होत होती.
खानावळ कळकट्ट असली तरी जेवण एक नंबर होतं
-----------------------------
१. हि माझी ॲडिशन आहे, बाकी अम्मांची.
२. हे सगळे पदार्थ रस्त्यावर अम्मा आणि अण्णाकडे खाल्लेले आहेत. किंमत ५० च्या वर कुठेही नाही.
३. सुंठ . मिरी आणि काय्काय असतं त्यात , आपण गटकायचं काम केलं
४. स्ट्रॉ वगैरे परत नॉर्थ इंडियन्सचे चोचले आहेत.
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
वा वा, गौराक्का
वा वा, गौराक्का
झकास माहिती. (आमचा चौदावा होता का बरोबर ? )
तामिळनाड मधे होतं जाणं कधीकधी. पण आमची मजल खेडोपाडी मिळणाऱ्या केळीच्या पानावरच्या 'सापड' च्या पुढे नाही गेली कधी.
पुन्हा जाण्याचा योग आला तर यातील काही गोष्टी चाखण्याचा नक्की प्रयत्न करेन.
केपपै कुळ, परुथी पाल याची चव घ्यायला नक्की आवडेल.
आता जरा हे कुठे खाल्लत ते सांगितलंत तर लै उपकार होतील.
नो
टॅनुल्याला त्याच्या लई बिज्जी शेड्युलातून वेळ नसल्याने तो आला नव्ह्ता.
हे सगळं रस्त्यावर येता जाता ठुसलं असल्यामुळे नाव गाव काही नैये.
अंदाजाने रस्ता सांगू शकते. तुम्च्या वाटेवर असेल तर पहा.
१. चुक्क कापी, - कोण्तीही टपरी. राजन चे चुक्क कापीचे पिवळे डबे दिसले की बिन्धास विचारा अण्णा चुक्क कापी इरका? हो आलं की ओरु चुक्क कापी, पाल वेंडा, पुधु पन्नंग म्हणून सांगा. बिना दुधाची , ताजी बनवून देणार
२. केप्पई कूळ - आम्ही दिमभिम फारेष्ट ओलांडून तामिळनाड बॉर्डर ओलांडल्यावर रस्तोरस्ती मडकी घेऊन बसलेले लोकं होते. गाडी थांबवून एका ठेल्यावर प्यायलो
३. सुंदल : तिरुनेलवेल्लीला फुल मार्केटात सुकी भेळवाल्यासार्खे पोतं घेउन बसलेल्या अम्मांकडे आणि एक देऊळ आहे मोठं त्याच्या आसपास गल्लीत आपला चनाजोरगरम वाल्यासार्खी हातगाडी वाल्याकडे सुंदल खाल्लं.
४. पणियरम: जिथे दिसेल तिथल्या रस्त्यावर (त्या मानाने येताना कोल्हापूरच्या देवळाबाहेरचे आप्पे खाल्लेले इतके भंगार लाग्ले की विचारू नका)
५. पोंगल : मदुरई ला टिफीन मध्ये
६. इडिअप्पम : मदुरईला, एक अम्मा आहेत बर्मा इडिअप्पम शॉपवाल्या तिथे.
७. परोटा : वेलंकन्नी ला फुड स्टॉलवर
८. शहाळे : कर्नाटक पासून, अख्या तामिळनाड भर जिथे जाल तिथे , बँगलोर हायवे वर पंक्चरलेल्या सायकलीवर सायकलीच्या किमान २० पट जास्त वजनाचे नारळ ठेवलेले लोक प्रत्येक किलोमिटरवर दिसतात.
९. मुट्ट दोसाई : दिमभिम उतरलं की छोट्या छोट्या टपऱ्या दिसायला सुरु होतात. एका ठेंगण्या ठुसक्या टपरी बाहेर दोरीचा आणि लाकडी ओंडक्यांचा झोपाळा टांगलेला होता, मग काय तिथेच डेरा टाकला. थालावडि असा काहीसा मैलाचा दगड पाहिल्याचे आठवते आहे.
अवांतर :
मायसोरला पाणीपुरी खाल्लि , प्यालेस बाहेर, पुरीत किसलेलं गाजर घातलं म्हंटल्यावरच त्यावरचा विश्वास उडालेला, इतकी भंगार पाणीपुरी आयुष्यात कधी खाल्ली नव्हती, तिथे सगळेच पाणीपुरी, दहीपुरीवाले गाजर घालतात. नुसता गलिछपणा. मग परत येताना टुमकुरुला पाणीपुरी खाल्ली त्यात छोले टाकलेले पाहील्यावर आपण हात टेकले. आम्च्या मुंबई सारखी मस्स्स्स्स्त पाणीपुरी कुट्ठे म्हणून मिळत नाही..
पर्वा नौऱ्याने चेन्नैहून अड्यारचा मायसोरपाक आणला. तुपाने अजिबात न बरबटलेला, थोडासा कमी गोड पण तितकाच मुलायम होता. लई जबऱ्या.
अति अवांतर
१. महाराष्ट्राची सीमा ओलांडली की कर्नाटकचे रस्ते लागतात, टोलचे पैसे स्वताःहून द्यावेसे वाटतात. ओहोहोहो... काय मखमली काळेशार रस्ते...लई म्हणजे लई मज्जा राव. १५ १६ च ॲवरेज देनाऱ्या सियाझ ने २२ चं दिलं त्या पॅचवर.
२. दिमभिम फॉरेस्ट , २७ हेयरपिन बेंड्स आहेत या वाटेवर. तेही एकामागोमाग एक. अतिशय सुंदर, देखणा रस्ता आहे.
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
आभारी आहे.
आभारी आहे.
खाणंपिणं भारीच
... मात्र विभक्ती प्रत्यय शब्दापासून तोडून लिहिणं हेही उत्तर भारतीय चोचले आहेत. मराठी लोक लिहिताना, बोलताना, चौथी सीट माववत, तमिळनाडला जातात, वत्त कुळंबूचा पर्याय कसा होता ह्याबद्दल बोलतात, इत्यादी.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
माल्कीणबाई, ते चोचले नव्हेत
माल्कीणबाई, ते चोचले नव्हेत टायपताना झालेली मिश्टेक आहे बरका..
चुक झाली मापी द्यावी...
----------
तरी म्हंटलं एव्ढं ढोसून आल्यावर जड जड वाटत होतं
आता कसं दोन चार कुजकट्ट बोल आईकल्यावर पट्ट्कन पचलं
----------------------
मराठी लोकांचं चौथ्या सिटेवरून तामिळनाडला जाणं म्हंजे उत्तर भारतीय चोचले आहेत हे वाचून लई मज्जा वाटली
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
झकास!
प्रतिसादाची वाचनखूण साठवून ठेवली आहे. पुन्हा तामिळनाडला जायचा योग आला की निश्चितच उपयोगी ठरावी.
अवांतर - ह्या मदुरै फूड टूरच्या व्हिडिओत वरच्या यादीतले काही पदार्थ पाहता येतील:
Bacharika की बकरिका ?
तर त्याचे असे झाले , घरातील बहुतेक मंडळी देशाबाहेरून शनिवारी रात्री परतली.आणि कितीही कॉस्मोपोलिटन वगैरे असली तरी त्यांच्या जिभा भारतीय खाण्याला उत्सुक होत्या (मी वरणभात कुकर लावायला विसरलो होतो, नाहीतर तेवढ्यात पण भागलं असतं .कारण न बा म्हणतात त्याप्रमाणे शेवटी आम्ही सगळे भटे च)
मग घराजवळ ,लवकर वगैरे अशा शोधशोधित ही जागा सापडली.
म्हणजे पूर्वी कर्वे पुतळ्याजवळ नागपूरकरांचा बंगला होता (काय झाडी ,काय झाडी)त्याजागीनेक तथाकथित मॉडर्न कुरूप बिल्डिंग उभी झालीय, ११ मयूर कॉलनी नावाने.
तिच्या गच्चीओ ही उपरनिर्दिष्ट जागा आहे.
सध्याच्या पद्धतीनुसार 'ग्लोबल मेन्यू 'आहे.शनिवार रात्र असूनही भरपूर रिकामी जागा होती.
आम्हास हवे होते भारतीय.
चिकन काठियावडी नावाचा हिरव्या रंगाचा अतिशय चविष्ट पदार्थ खाल्ला.
बटर चिकन मेन्यू कार्डमधे नसूनही प्रेमाणे त्यांनी करून वाढले.उत्तम होते.
अधून मधून अभ्यंकर नावाचा दाढीधारी तरुण अगत्याने चौकशी करून जात होता.
एव्हाना हाटेल भरले होते .
गर्दी झाल्यावर वेटर्स व मालक गोंधळून गेल्याचे जाणवले.
बिल येण्यास पंधरा मिनिटे लागली..
जेवण उत्तम.
हवामान उत्तम.
बाकी अजून तयारी हवी.
बाकी सर्व ठीक, परंतु...
१. शीर्षकाचा अर्थ/संदर्भ लागला नाही.
२. 'कारण शेवटी आम्ही भटेच. त्याला काय करणार?' या महोक्तीचे जनक आम्ही नाही. (पु.ल. आहेत.)
असो.
ते त्या हाटेलचे नाव आहे.
ते त्या हाटेलचे नाव आहे. Bachrika
भश्रिका ?
भश्रिका ?
कपालभाती वगैरे लायनीतली?
हे ग्रीक आहे
ग्रीक शब्द मसाल्यांसाठी.
बाकी इथे कुणी हॉटेलांचे नाव "मसाले" ठेवलं तर जाम मजा येईल.
--------------------
अपवाद : ३०० कोटींची मालकीण बाई असलेल्या राधिकाताई हे करू शकतात.
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
?
या कोण?
नागपुरनिवासी एका मराठी
नागपुरनिवासी एका मराठी मालिकेतल्या. पण दोन बायकांचा दादला हा विषय आहे मालिकेचा. मसाला उगाच.
सहसा हा धागा उघडत नाही पण
सहसा हा धागा उघडत नाही पण एवढे प्रतिसाद का पडताहेत म्हणून उघडला.
गौराक्का म्हणतात तसं टपरीवर झकास मिळतं खायला .
माझे पाय टपरीकडेच वळतात. मोठ्या हॉटेलांचं ब्वॉक वाटतं. मालकास/ गल्लेवाल्यास फक्त तमिळच येतं. मी दहा,पन्नास, सुटी नाणी समोर धरतो. तो हवे तेवढे काढून दाखवतो इतके झाले. तेवढ्या रकमेत इकडे रिक्षावाला हाड करेल.
बाकी चालू द्या.
एकदा लहानपणी भूगोलात शिकले
एकदा लहानपणी भूगोलात शिकले होते - डेन्मार्कला दुग्धजन्य पदार्थांची विपुलता आहे. तेव्हापासूनदूध + विपुलता + डेन्मार्क हे समीकरणाचा डोक्यात फिट झाले. डेन्मार्कला जाण्याचे स्वप्न तेव्हापासूनच. कारण एकंदर दुग्धजन्य मिठाई ची आवड व खादाडपणा. लहानपणी आई-बाबा म्हणायचे तुझं लग्न हलवायाशी लावून देउ मग खा हवी तितकी मिठाई. त्याही पूर्वीचे म्हणजे खूपच लहानपणीचे आठवते, बाटलीतून दूध प्यायचे. खूप उशिरापर्यंत बाटली सुटली नव्हती. त्या रबरी बुचाचा व दुधाचा एका संमिश्र अतिशय मस्त वास व चव असते. ती विलक्षण आवडत तर असेच. अजूनही ती चव आठवते. पुढे बाटलीतील दुधाची जागा, पेल्यातील दुधाने घेतली तेव्हाही दुधात बुडवून खाल्लेले ग्लुकोज बिस्कीट आठवते. त्या निरागस चवीला, बाळबोध चवीला कोणत्याही पंचपक्वांनाची सर नाही. जशी पुजेमधील वाटुलीतील नैवेद्याच्या, गोड मिट्ट साखर दुधाची सर कोणत्याही पदार्थाला नाही तशीच. अरे हो मग आले - मेतकूट दूध भात, लिंबाची फोड घातलेला दही भात, कोणतीही मसालेदार भाजी घालून खाल्लेला दही दूध भात. अरे हां आणि सायटे, साय - भात. किंवा साय-साखरही यमी! अजून एक टप्पा म्हणजे - आई लोणी कढवून तूप कढवत असे. ती प्रोसेसही अतिशय आवडीची. साय पातेल्यात काढून फ्रीजमध्ये ठेवायची व फक्त एकदा विरजण लावावे लागायचे, त्या पातेल्यात रोजची सायीवरती साय जमा होता जाई. नंतर मग ताक व लोण्याचे गोळेच्या गोळे. पैकी लोणी ब्रेडला लावून साखर वरती चोपडून खाणे तसेच ताक पिणे हे तूप चापण्याहूनही अधिक आवडत असे. पुढे कॉलेजात जाई जाईपर्यंत दर रविवारी, नाश्त्याला, अमूल बटर लावून सर्वाबरोबर गप्पा मारता, चहा व तव्यावरुन जस्ट उतरलेली पोळी खाणे, हा इतका आनंदाचा ठेवा असे. बालपणीचे हे काही अतिशय आनंदी क्षण दुग्धजन्य पदार्थापाशी जोडले गेलेले आहेत. अमेरिकेत, आल्यानंतर या दुग्धजन्य पदार्थांचे नवीन दालन खुले झाले ते म्हणजे योगर्ट. दह्यासारखेच पण किंचित वेगळे. गोड व अनेकानेक चवींचे - स्ट्रॉबेरी, अननस, ब्लु बेरी, पीच, रास्पबेरी. वरती घट्ट योगर्ट व खालती फळांचा पाक, मिश्रण. पैकी ग्रॅनोला योगर्ट कधीच आवडले नाही. हे म्हणजे मुलायम तरुणीचे रांगड्या , राकट रेमडोक्याशी लग्न लावून दिल्यासारखी जोडी. तो ग्रॅनोला टोचतो काय, दाढेला घट्ट चिकटतो काय, एकंदरच रसभंग. रसमलाई, कुल्फी मात्र विशेष आवडली नाहीत. ते कोणाच्यातरी लग्नात एंजॉय करण्याचे पदार्थ. तांदळाची खीरही आपण पितृपक्ष अथवा श्राद्धाला करतो, इथे मात्र भारतीय बुफेत सर्रास असते. तिचेही कौतुक नाही. शेवयांची खीर खूप आवडते. त्या दुधात भिजलेल्या, नाजूक शेवया खाताना स्वर्गप्राप्तीचा आनंद होतो. अरे हो राजकोटची रबडी एक भन्नाट प्रकार आहे. दुध, विपुल प्रमाणात सुकामेवा. दर दुधाचे वावडे तर नाहीच उलट खूपच कोडकौतुक आहे. ग्लासभर दूध अजूनही पट्टकन गट्ट होऊन जाते. मात्र तो फॅट फ्री मिल्क एका दुधाला लांच्छनास्पद प्रकार आहे. इतका फुळकवणी आणि बेचव प्रकार , याला दूध का म्हणायचं? ते १%, २% नखरेही आवडत नाहीत. Whole मिल्क बेस्ट. दूध घालून, कणकेच्या जशा दशम्या करतात, तसा मी भातही दूध घालून लावलेला आहे. पण चवीत विशेष फरक जाणवलेला नाही. अमेरिकेत आल्याआल्या सर्व भारतीयांना त्रास होतो तो म्हणजे कॉफीमध्ये इकडे दूध देत नाहीत क्रीमर नावाचे दाट क्रीम वाले २ चमचे दूध देतात. ते दुधाची सवय असलेल्या आपल्याला, पहिल्यांदा पहिल्यांदा पुरतच नाही. चिडचिड होते.
तर असे हे दुधाचे प्रकार. ते डेन्मार्कला जायचे अजूनही स्वप्न आहे ते आहेच.