नव्या वादळी नाव हाकारतो

पुन्हा भेदुनी दाट अभ्रांस थोडा
फिका चंद्र क्षणमात्र तेजाळतो
निळी पेटती रेष रेखीत व्योमी
अनामिक उल्केस बोलावितो

भणाणून आवर्त झोंबे शिडांसी
सुकाणू दिशाहीन कैसे फिरे
पुन्हा का अकस्मात तारा खुणेचा
कुणाला न ठाऊक कोठे विरे

जिभा अंध:कारास फुटती हजारो
तशी गाज ह्या सागराची उठे
रोरावती मत्त लाटा अनादि
किनाऱ्यावरी गर्व त्यांचा फिटे

उद्याच्या उषेचीच आता प्रतीक्षा
उद्याच्याच सूर्यास मी जाणतो
तमाची तमा नाही आता जराही
नव्या वादळी नाव हाकारतो

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

उत्तम कविता. तुम्ही कविता कशी लिहावी ह्यावर लेखन करावं अशी विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

छान कविता. १४, फुकटचा सल्ला, प्रेम कर (कशावरही), कविता सुचेल.
("प्यार करनेवाले औकातसे बडा काम भी कर जाते है" असं ऐकून आहे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

पृथ्वी वृत्त! त्याला साजेसे शब्द आलेले आहेत.

तीन व चार क्रमांकाच्या कडव्यांमध्ये अजून एक कडवं आवडलं असतं. पहिल्या तीन कडव्यांत आकाश, रात्र, ते भीषण समुद्र इथवर वर्णन आलेलं आहे. चौथ्यात ते अचानक 'मी'वर येतं. प्रश्न पुरेसा स्पष्ट होण्याआधीच धारदार उत्तर येतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

‛१४टॅन’ यांच्या मताशी सहमत.

‛घासकडवी’ यांनी नेमकं ओळखलं आहे.

‛MindsRiot’ यांच्या सल्ल्याप्रमाणे माझी छंद-मात्रा-वृत्तात अज्जिबात न बसणारी अशी ओबडधोबड रचनेची कविता तयार होते. उदा. :

जळजळ

कसं कळणार (छळणार) तुला,
आर्त हाक आहे...
कसं तुट-तुटणार आता,
पाणी पुलावरूनही वाहिलं आहे!

किती जाऊ मागे,
किती रुष्ठ होऊ...
नजीक फूल उभे,
कसे दुष्ट होऊ...

कसं गीत दिसणार,
ती नजर वाकली आहे...
कसा गंध येणार,
ती माती कोरडी आहे...

बोललो खूप सारे
बोलायचे बोललोची नाही...
पाऊस पडून गेला,
नदी वाहिलीच नाही...

वरीलप्रमाणे मी कविता करून कविता असल्यासारखा आव आणत असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

जिभा अंध:कारास फुटती हजारो

..शब्द अंध:कार नसून अंधकार आहे (जसे - अंधश्रद्धा). उच्चारतानाही 'ध'वर जोर देऊ नये.
अंधकार असं सरळ (ध विनाघात) उच्चारल्याने तुमच्या कवितेतल्या वृत्तातही तो कसा चपखल बसतो आहे पहा!
--
अवांतर :-

नियमानुसार गेल्यास अशा चुका टाळता येतात.
इंग्रजीत शब्दाचं स्पेलिन्ग आपल्याला पाठ करावं लागतं. उलट मराठीत एकदा नियम माहीत / पाठ करून घेतले, की प्रत्येक मराठी शब्दाचं 'स्पेलिन्ग' पाठ असावं लागत नाही. स्पेलिन्ग असो की नियम. अंगवळणी पडण्याशी मतलब!

नियम:
दोन शब्दांचा संधी होताना मध्ये विसर्ग येण्यासाठी पहिल्या शब्दाच्या अखेरीस र् किंवा स् (उदा. पुनर्, दुर्, मनस्, श्रेयस् इ.) आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीस अनुक्रमे कठोर व्यंजन किंवा व्यंजन असावे लागते. अंधकार शब्दात पहिला शब्द 'अन्ध/अंध' आहे. अन्धर् किंवा अन्धस् नाही. त्यामुळे विसर्ग येणाचा प्रश्नच येत नाही. म्हणून सरळसोट अंधकार.
--

अधिक तपशील -
...र् ‌+ कठोर व्यंजन => 'र्'च्या जागी विसर्ग.
...स् + मृदू/कठोर कुठलेही व्यंजन => 'स्'च्या जागी विसर्ग.

आपल्या वर्णमालेतल्या ३४ व्यंजनात मृदू नि कठोर विभागणी अशी -
क् ख् ......ग् घ ङ्
च् छ्.......ज् झ् ञ्
ट् ठ् .......ड् ढ् ण्
त् थ् .......द् ध् न्
प् फ् .......ब् भ् म्
............य् र् ल् व्
श् ष् स्
.............ह् ळ्

डावीकडे सारलेली कठोर, उजवीकडे सारलेली मृदू.
(क्ष् = क् + ष्, ज्ञ् = ज् + ञ् ही व्यंजने नसून जोडाक्षरे आहेत)
--

'र्'ची उदाहरणे
दुर् + शासन = दु: + शासन = दु:शासन, कारण 'र्'पुढे श् हे कठोर व्यंजन आहे.
परंतु,
दुर् + योधन = दुर्योधन, कारण 'र्'पुढे य् हे मृदू व्यंजन आहे.

आपण पुन:पुन्हा म्हणतो. पुनर्पुना नव्हे. का? तर -
पुनर् + पुन्हा = पुन: + पुन्हा. कारण 'र्'च्या पुढे प् हे कठोर व्यंजन.
ह्याप्रमाणे,
पुनर् + संपादन ‌= पुन:संपादन. पुनर्सँपादन नव्हे. कारण स् कठोर व्यंजन.
म्हणूनच पुनर्स्थापना, पुनर्प्रक्षेपण इ. सगळे शब्द चूक. पुन:स्थापना, पुन:प्रक्षेपण इ. बरोबर.

तसेच,
पुनर् + जन्म ‌= पुनर्जन्म. पुन:जन्म नव्हे. कारण ज् हे मृ.व्यं.
पुनर् + निर्मिती ‌= पुनर्निर्मिती. पुन:निर्मिती नव्हे. कारण न् हे मृ.व्यं.
पुनर्मुद्रण, पुनर्लेखन, पुनर्वसन, पुनर्विवाह इ. सर्व योग्य.

ह्याप्रमाणेच,
अंतर् + ज्ञान = अंतर्ज्ञान. अंत:ज्ञान नाही, कारण ' ज्ञ् = ज् + ञ्' आणि 'ज्' हे मृ.व्यं.
अंतर् + गत = अंतर्गत. अंत:गत नाही, कारण 'ग्' मृ.व्यं.
अंतर् + पुर = अंत:पुर. 'प्' क.व्यं.
अंतर् + श्वसन = अंत:श्वसन. 'श्' क.व्यं..
---
'स्'ची उदाहरणे
मनस् + शांती = मन:शांती. 'श' व्यंजन.
मनस् + पूर्वक = मन:पूर्वक. 'प' व्यं.
मनस् + ताप = मन:ताप. 'त' व्यं.
इथे आणखी पुढला नियम > विसर्गापुढे त्, थ् आले तर विसर्गाचा स् होतो. म्हणून मन:ताप --> मन स् ताप --> मनस्ताप. मन:स्ताप नव्हे.

ह्यावरून कुणी म्हणेल, की मग मनस्थिती का नाही लिहीत आपण? मन:स्थिती का? तर ते असं -
मनस् + स्थिती = मन: + स्थिती. कारण 'स्'च्या पुढे 'स्' व्यंजन आले.
इथे विसर्गापुढे 'त्' वा 'थ्' न आल्याने विसर्गाचा पुन्हा स् होत नाही. म्हणून विसर्ग तसाच राहतो. म्हणून
मनस् + स्थिती --> मन:स्थिती (मनस्थिती नव्हे).

अधिक खोलात -
मनस् + कामना = मन: ‌+ कामना. कारण 'क' व्यं.
पुढला नियम > विसर्गामागे अ, आ हे स्वर आणि विसर्गापुढे मृदू व्यंजन आले तर विसर्गाचा उ होतो.
इथे विसर्गामागे अ असला, तरी पुढे क् हे कठोर व्यंजन आले आहे. म्हणून मन:कामना असेच राहील. मनोकामना चूक!

विसर्गाचा उ होण्याचे उदाहरण
मनस् + रंजन = मन: + रंजन. कारण 'स्'च्या पुढे व्यंजन.
विसर्गामागे अ आणि पुढे र् हे मृदू व्यंजन. म्हणून विसर्गाचा उ होईल.
मनस् + रंजन --> मन: + रंजन --> मन उ रंजन --> म + न् + अ + उ + रंजन --> म + न् + ओ + रंजन (अ + उ = ओ) --> म + नो + रंजन --> मनोरंजन.
ह्याचप्रमाणे मनोविकास, मनोरुग्ण इ. शब्द होतील.

संदर्भस्रोत: अरुण फडकेकृत 'शुद्धलेखन ठेवा खिशात'.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एवढ्या उत्तम प्रतिसादात 'स्पेलिन्ग' वाचून दाताखाली खडा आला. 'स्पेलिंग' किंवा 'स्पेलिङ्ग' किंवा गेला बाजार 'स्पेलिङ्' न लिहिता 'स्पेलिन्ग' असे का लिहिले आहे? तसा उच्चार अगदीच अनैसर्गिक वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे अवांतर होईल म्हणून व्यनि धाडेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर मांडणी! काव्य आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही आता मराठी साहित्यातले नावाजलेले कवि वाटता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0