मी संपादक होणारच !

आमच्या आंतरजालीय मित्राला तुम्ही सगळे आता चांगलेच ओळखायला लागला आहात. दरवेळी अडचणीत सापडला किंवा एखाद्या नवीन ध्येय धोरणाने पछाडला गेला की आमचा हा मित्र, हा सखा, सुहृद आमच्याकडे धाव घेत असतो. त्याच्या दृष्टीने तो म्हणजे सुदामा आणी मी म्हणजे कृष्ण, तो म्हणजे हृतीक आणि मी म्हणजे राकेश, तो म्हणजे ओमार अब्दुल्ला आणि मी म्हणजे शेख अब्दुल्ला, तो म्हणजे दीप दासगुप्ता आणि मी म्हणजे गांगुली असे बरेच काय काय आहे. त्यामुळे आज सकाळी सकाळी तो असा अवकाळी पावसासारखा धावून आल्याचे आम्हाला मुळीच आश्चर्य वाटले नाही

आल्या आल्या त्याने त्याची ती घुबडासारखी मान चारी दिशांना वळवली. वळवताना ती मान एकदा काही क्षणासाठी समोरच्या सौंदर्याफुफाट्यावरती थबकली आणि पुन्हा मज पामराकडे वळली.

"वाह ! कॅफे बंद करून आता रद्दीचे दुकान का ? छान प्रगती आहे. आता पुढचे ध्येय काय, रस्त्यावरती बाजा वाजवून हात पसरणे का?"

"अरे दादा, बुकशॉप चालू केले आहे री मी आता." मी अगतिकपणे स्पष्टीकरण द्यायच्या प्रयत्नात. पण निर्णय पक्का झाला की आमचा मित्र खुद की भी नही सुनता है.

"श्या ! पुस्तके तर सगळी रद्दीला म्हणूनच आणून टाकल्यासारखी दिसत आहेत." पुढची अब्रू टाळण्यासाठी मी शोकेस मधी अगदी दिमाखात उभे केलेले माझे पुस्तक झाकून टाकले आणि मुद्द्याला हात घातला.

"आज इकडे कसे काय येणे ?"

"का ? इकडे यायला आता तुझी परवानगी घ्यायची का ? का मित्र न विचारता कसे येऊन आदळतात, कसे मॅनरलेस असतात ह्यावर एक लेख पाडायचाय?"

"तसे नाही रे. पण तुझ्या चेहर्‍यावरती काहीतरी निश्चय केल्यासारखे ठाम भाव दिसत आहेत, म्हणून विचारले." ह्या आमच्या वाक्याने मात्र त्याची कळी खुलली.

"आंतरजालीय संपादक व्हायचे ठरवले आहे." ठरवले आहे ? हा सगळे परस्पर ठरवून मोकळा होतच असतो म्हणा.

"अरे असा कसा थेट संपादक होशील ? अजूनही तुझा प्रतिसाद जरी दिसला तरी लोक स्क्रोल करून पुढे जातात. तुझ्या लिखाणा विषयी बोलणे म्हणजे कोळशाला डांबर फासण्यासारखे आहे." मी अस्पष्ट मत देऊन मोकळा झालो. 'तू निवासी आहेस' हे त्याला सांगितले असते तर मत स्पष्ट म्हणता आले असते ना. पण पुढे मागे आमचे पण नाव यादीत लागण्याचे चान्सेस असल्याने आम्ही अस्पष्टच राहिलो.

"अरे ढापण्या ! किती अकलेचे तारे तोडायचे ? अंपायर व्हायला, त्या खेळातले वर्ल्ड रेकॉर्ड नावावरती असण्याची गरज असते का? माइक बनवणार्‍याला गाणे गाता येण्याची गरज असते का ? किरवंताला आधी स्वतः लाकडावरती झोपायची सवय असावी लागते का? संपादक होण्यासाठी भरभरून आणि वाचनीय प्रतिसाद लिहिण्याची, खूप सारे प्रतिसाद मिळण्याची गरज असते असे कोणी सांगितले तुला ? आणि प्रतिसाद काय, तुझ्या सारख्या फडतूस माणसाला देखील तुझ्या कंपूकडून मिळतातच की. "

"अरे पण संपादक होण्यासाठी अंगात काही गुण असावे लागतात, स्वभाव सुद्धा एका ठरावीक वळणाचा हवा. अजून बरेच काय काय असते. कसे समजावू तुला?"

"ते समजवून घेण्यासाठीच आलो आहे तुझ्याकडे. तसेही रस्त्यावरचे काळे कुत्रे देखील तुला विचारत नाही. मीच एक आपला तुझ्यावरती दया करतो झाले. आता फालतूपणा बंद कर आणि काय काय आणि कसे कसे करावे लागेल ते चटचट बोल."

आलीया भोगासी ह्या न्यायाने आम्ही त्याला सल्ला द्यायला सिद्ध झालो.

"बाबा रे, तुला आधी कुठला संपादक व्हायचे आहे ते तू ठरवले आहेस का? "

"हो ! पुरुष संपादक." मित्राने मख्खपणे उत्तर दिले.

"अरे $^$%#^%$ ! मी तुला स्त्री का पुरुष संपादक असे विचारलेले नाही. तुला कोणत्या प्रकारचा संपादक व्हायचे आहे ? संपादकांमध्ये अनेक प्रकार असतात. नुसते संपादक, चाय शिग्रेट वाले संपादक, छुपे संपादक, बाहेरून संस्थळ वाचणारे संपादक, कंपूबाज संपादक, सल्लागार संपादक, खैरनार संपादक, बडे मियाँ - छोटे मियाँ संपादक, निषेधी संपादक, द्वेष्टे संपादक इ.इ.."

"च्यायला, हे येवढे प्रकार असतात ? खुलासेवार डिट्टेल मध्ये सांग, म्हणजे मग तौलनिक अभ्यास करून ठरवता येईल की मी काय बनावे." सुहृदाने हुकूम सोडला.

"कसे आहे, चाय शिग्रेटवाले संपादक असतात ते आपले रोज चाय शिग्रेट मिळाली की खूश असतात. आपण बरे आपले काम बरे अशी ह्यांची वृत्ती. छुपे संपादक असतात ते एकतर संपादक आहेत हे चार टाळकी सोडली तार बाहेर कुणाला माहिती नसते, आणि ते संपादक नसले तरी १/२ संपादकांना घट्ट पकडून रिमोट चालवत असतात त्यामुळे संपादकच असतात. बाहेरुन संस्थळ वाचणारे संपादक गरज पाडल्याशिवाय आतमध्ये येतच नाहीत. ते पाहुणा म्हणूनच राहतात. पुढे जाऊन ह्यांचे रूपांतर वाचनमात्र संपादकांमध्ये होते. कंपूबाज संपादक स्वतःचा एक वाचकांचा कंपू बनवून असतात. त्याला ते 'जनाधार' वैग्रे म्हणतात. ह्या आधारामुळे आंतरजालीय राजकारणात इतर संपादकांवरती पावशेर ठेवून राहता येत आणि पुढे मागे वेळ पडल्यास स्वराज्याची घोषणा करताना मावळ्यांची देखील सोय होते."

"आणि बाकीच्या संपादकांचे काय ?" आमच्या माजोरड्या मित्राच्या चेहर्‍यावरती आता भक्तिभावाचे रंग नुसते फासले गेले होते.

"वत्सा.. आता आपण माहिती करून घेऊ सल्लागार संपादक म्हणजे काय ते. ह्या ठिकाणी सहसा वरिष्ठ आणि ज्येष्ठ अशा सदस्याची नेमणूक केली जाते. सहसा कुठलाही सल्ला न देणे आणि वाचनमात्र राहणे, शक्यतो घेतल्या गेलेल्या प्रत्येक अंतरिम निर्णयावरती कौतुकाची सुमने उधळणे आणि खाजगीत सदस्यांपाशी नाराजी व्यक्त करणे हे ह्यांचे प्रमुख कार्य असते. काही अघटित घडल्यास 'आजकाल माझा वावर कमी असतो' हे बोलता येणे ह्या पदासाठी मस्तच. ह्या पदावरील संपादक पुढे व्यास म्हणून ओळखले जातात. ह्यांना गणपतींची कमतरता भासत नाही."

"खैरनार संपादक असतात ते कुणाच्या बापाला घाबरत नसतात. अधिकार आले रे आले की ते तातडीने साफसफाईच्या कामाला लागतात. अशा वेळी मग कोणाच्याही विरोधात उभे राहायची ह्यांची जिद्द असते. ४ दिवसात संस्थळाला एका वेगळ्याच उंचीवर नेण्याचा ह्यांना आत्मविश्वास असतो. काही काळातच ह्यांचा प्रवास पाहुण्या संपादकाच्या दिशेनं व्हायला लागतो. सगळी स्वप्ने हवेत विरतात आणि मग धड सदस्य नाही आणि संपादक पण नाही असे अवघड जागचे दुखणे होऊन बसते. सगळ्यात सुखी म्हणजे 'बडे मियाँ आणि छोटे मियाँ' संपादक. ह्यातले बडे मियाँ कुठलाही निर्णया आता तरुणांनी किंवा नव्यांनी घ्यावा असे सांगून स्वतः मुकादमगिरी करतात आणि छोटे मियाँ घेतलेले निर्णय बड्यांच्या अकलेने घेतले सांगून निवांत होतात. आता काही संपादक असे असतात ज्यांना खूप काही करावेसे वाटत असते पण धाडस नसते किंवा कोणाला दुखावण्याची वृत्ती नसते. मग हे सहसा फक्त निषेध व्यक्त करून पुढील १-२ दिवस वाचनमात्र राहण्याचे धोरण अवलंबतात. पुढे पुढे हे पण वाचनमात्र मध्ये रूपांतरित होतात. आता राहिले शेवटचे पण महत्त्वाचे द्वेष्टे संपादक. ह्या संपादकांना बहुदा संस्थळ मालकांनी स्वतःच्या मर्जी विरुद्ध संपादक केलेले असते. कधी हात दगडाखाली असतात म्हणून किंवा कधी 'अवघड जागचे दुखणे' म्हणून. ह्या संपादकांच्या निष्ठा ह्या कायम इतर संस्थळांनाच वाहिलेल्या असतात. आपण जिथे संपादक आहोत त्या संस्थळावरती सध्या काय अंतर्गत राजकारण चालू आहे, कोण कोणाला नडतो आहे, वाद-विवाद कुठे आहेत हे सगळे बाहेर पसरवणे आणि असंतुष्ट कोण आहे हे शोधून काढून त्याला 'कुमक' पुरवणे हे ह्यांचे प्रमुख ध्येय असते.

'हम्म्म असे असते काय?' मित्रवर्य मोठे गहन विचारात गढलेले दिसले.

"आता मला सांग तुला कुठला संपादक व्हायचे आहे?"

"पण मी काय म्हणतो... राहू दे, ह्यावर तुझ्याशी चर्चा करून फायदा नाही. मी निघतो आता." असे बोलून आणी एक करुणामय दृष्टी टाकून आमचे मित्रवर्य चालते झाले.

दुसर्‍या दिवशी लॉगईन झालो तर आमच्या मित्रवर्यांच्या नव्या संकेतस्थळाचे अभिनंदन करणारा धागा आमच्या स्वागताला हजर.

field_vote: 
3.166665
Your rating: None Average: 3.2 (6 votes)

प्रतिक्रिया

ह्या पराला मराठीतले प्रत्येक संस्थळ कसे निर्माण झाले, त्याची बीजधारणा, फलनकाल, कारणीभूत घटक सगळे माहीत असते पण गंमत म्हणजे प्रथितयश पेपरात मात्र मराठीच्या प्रसार व संवधर्नासाठीच अमुक संस्थळ आले असेच वाचायला मिळते!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लवकरच 'मराठी संकेतस्थळांचा इतिहास' हे नवं पुस्तक येतय बाजारात असं ऐकल ते खरच म्हणायच तर. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

लेख मस्त आहे. वाचून मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आंतरजालीय संपादकांचे इतके प्रकार आहेत हे पहिल्यांदाच कळले Smile
तौलनिक अभ्यास करायला जरासा वेळ (आणि पुष्कळसा अनुभव) लागेल; त्यामुळे तुम्ही आणखी लेख लिहून प्रकाश टाकलात तर माझ्यासारख्या वाचकांची चांगली सोय होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपादकांच्या वेगवेगळ्या प्रकारात तीर्थप्राशक संपादक कुठे असतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आणि शास्त्रापुरते संपादकही असतात का?

इतिहास इतर कोणी अभ्यासकाने लिहावा; पराला मराठी संस्थळ-संपादकांचा गाळीव इतिहास लिहीणं जमेल. तसंही त्याला पहिल्या धारेचा माल फार आवडतो असं ऐकून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळ्यांचीच खेचलीए त्याने, तुम्ही वैयक्तिक घेऊ नका.. Wink

(माझे प्रतिसाद उडवणार्‍या ह्याच का रे परा?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आता तू आणि मी नेहमी एकाच वेळी ऑनलैन असतो या कर्माला काय करावं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येऊ द्या, अजून बरेच प्रकार असू शकतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निषेध निषेध निषेध...

संपादक बिचारे काही बोलत नाहीत म्हणून कोणीही उठावं आणि त्यांची चेष्टा करावी, ऑ? हिंमत असेल तर संस्थळांवरच्या सामान्य सदस्यांना त्यांनी लेखन कसं करावं, अवांतर का लिहू नये, (व्यवस्थापन पाळत नसलं तरी) त्यांनी नियम पाळणं कसं आवश्यक आहे वगैरे उपदेशाचे डोस देऊन बघा म्हणावं... संपादक कंपूबाजी करतात असं उदाहरण येईल दाखवता तुम्हाला? ऑ ऑ?

बिचारे संपादक आपली व्यक्तिगत आयुष्यं सांभाळून हे महत्त्वपूर्ण काम करण्याचं शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतात. आणि तुम्ही त्यांची अशी टिंगल टवाळी करता? छ्या छ्या छ्या - हे असलं लेखन ऐसी वर येतं म्हणून एक ऐसीकर म्हणून मला शरम वाटली. परिकथेतील राजकुमार यासारख्या प्रस्थापित आयडीकडून आल्यामुळे शरमेने झुकलेली मान आणखीनच खाली गेली.

आतापासून पुढचे काही दिवस ऐसीवर फक्त वाचनमात्र रहाण्याचा निर्णय घेतला आहे. याला जबाबदार कोण? तुम्ही! होय, होय पराभाऊ, तुम्हीच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परिकथेतील राजकुमार यासारख्या प्रस्थापित आयडीकडून आल्यामुळे शरमेने झुकलेली मान...

वाक्याचे पार्सिंग नक्की कसे करावे, हे कृपया सांगता काय, मालक?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घ्या, हे आले विचारजंत! आम्हाला पार्सिंग वगैरे माहीत नाही. रस्त्याचं क्रॉसिंग जेमतेम जमतं.

पराशेठ, तुम्ही या विचारजंतांची का नाही चेष्टा करून बघत? का प्रतिसादाच्या मेगाबायटांखाली तुम्हाला तुमचं सडकं लेखन चेचलं जाण्याची भीती वाटते? म्हणतात ना, बळी द्यायलासुद्धा गरीब बिचारं (संपादकीय) बकरं वापरतात, असल्या (विचारजंती) वाघांच्या मागे कोणी जात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या पोष्टीत काय विनोद आहे ? इनोदी अशी श्रेणी नाही का इथं ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

चुकीच्या ठिकाणी पडल्यामुळे प्रतिसाद काढून टाकलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चुकीच्या ठिकाणी पडल्यामुळे प्रतिसाद काढून टाकलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परा राजवाडे यांचा इतिहास विषय पक्का दिसतोय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

हा लेख नव्याने वाचला. 'निवेदन' आठवले, आणि लेखाची मजा आणखी आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोडक ज्या कॅटेगरीत 'मोडतात' ती राहिली का रे लिहायची? Wink

पळा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

'हम जहाँ खडे हैं, कैटेगरी वहीं से शुरू होती है' असं श्रामो म्हणाल्याचं आठवतं Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'हम जहाँ खडे हैं, कैटेगरी वहीं से शुरू होती है' असं श्रामो म्हणाल्याचं आठवतं
आमच्याकडल्या व्हीसीडीमध्ये,
'हम जहां मोडते है, वहीं कैटेगरी खडी कर देते है' असा त्यांचा बुलंद डायलॉग आहे...
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वादळांची चाहूल लागत नाही का तुम्हाला? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण संपादकांच्या भीतीने लेख बराच गुंडाळल्या सारखा वाटतोय.. यातल्या फक्त एक-दोन प्रकारच्या संपादकांवर आख्खा लेख लिहता येईल.. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

परा म्हणजे मृत्युंजय का ?

लै भारी हाणलंय राव... शब्दाशब्दाशी सहमत...! माझ्याकडून १०० श्रेणी आणि २००० पुण्य !!!! हाकानका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

आधी वाचला होता ( येथे पूर्व प्रकाशित लिहिलेले दिसले नाही ... कदाचित बदल केले असतिल?), पुन्हा तेवढीच गंमत वाटली.

कोटीमास्टर अथवा कोट्याधीश / कोटीभास्कर / कोटीनंदन ( कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या !!!) नंदन यांच्या समवेत काही इतरांनीही केलेल्या मोडकांच्या नावावरच्या कोट्या मजेशीर आहेत. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहज कुतूहल: हा आयडी कोणाचा आहे हे कसे कळेल?

बाकी लेख छानच Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

= )) परा चे लिखाण miss करते.
परत वाचला अन तितकाच फ्रेश, खुसखुशीत वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

लेख छानच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0