उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - १५
आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती? हॉटेलचा अॅम्बियन्स कसा होता वगैरे हवं ते लिहू शकता. पदार्थाचा फोटो असेल तर उत्तमच. अर्थातच हे फक्त खाण्याबद्दल नाही, तर पिण्याबद्दलही आहे
आधीच्या भागात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू करत आहोत.
============
मुळगापुडी ऊर्फ गनपौडर
मुळगापुडी ऊर्फ गनपौडर
यालाच 'पर्पपुडी' म्हणतात का?
रेकमेण्डेशनसाठी धन्यवाद. अस्सल ट्ययामब्र्याम लोक दहीबुत्तीत 'मनत्कली'** नावाचे दाणे घालतात. मस्त कडवट चव येते त्याने द० बु० ला. तशीच मिळते का इथे?
**हा मला ऐकू आलेला उच्चार आहे.
बाय द वे, मोहरिवरून आठवलं
बाय द वे, मोहरिवरून आठवलं - लहानपणी मोहरी चांगली तडतड उडे आणि अंगावर पडली तर चटके बसत्. म्हणून मोहरि टाकताना जरा भिउनच असायचो. आता काही असं होत नाही. मोहरि अंगावर आल्याचं अलिकडे आठवत नाही . काय भानगड असावी? मोहरिच्या जातीत फरक आहे कि तेलात (कि आगित?)
आमची स्किन जाड झालिय हे स
आमची स्किन जाड झालिय हे सत्य आहे, पण या सत्याचा उपयोग एकदा का गरम मोहरि अंगावर आलि कि ती पोळते का नाही हे ठरवायला व्हावा. मोहरी मूळात ऊडतच नाही. शेवटची मोहरि उडाली कि लसून (का जिरे) टाकायचं असं सूत्र होतं. ते काय वापरता येत नाही हो आजकाल्. नक्कि काय होत असेल्?
फोडणी
दुधापासून जे पदार्थ बनले असतात त्याना बहुतेक तुप , जिऱ्याची फोडणी देतात. (कोशिंबीर, कढी इत्यादी).
वरण म्हणजे साधं किंवा गोडं वरण , फोडणी दिली की, फोडणीचं, आंबट , चिंचगुळाच असे प्रकार होतात. (त्याला डाळ किंवा आमटी म्हणतात काही लोकं) फोडणी नुस्त्या मोहरीची, जिरं मोहरीची, किंवा नुस्त्या जिऱ्याची देखील असते.
बाकी काही असो , जिरं किंवा मोहरी, तडतडायला मात्र हवी....
परप्पु
>>यालाच 'पर्पपुडी' म्हणतात का?<<
>>पण पर्प = पर्रप्पु = डाळ असावे. तेच असणार मग ते.<<
मलगा पुडी वेगळी आणि परप्पु पुडी वेगळी. परप्पु पुडी मी तेलुगू लोकांकडे खाल्ली आहे. ती मेतकुटाच्या जवळ जाणारी असते. तूपभातमीठ आणि सोबत परप्पुपुडी म्हणजे सुख.
असं? पाहिलं पाहिजे मग. मुळ
असं? पाहिलं पाहिजे मग. मुळगापुडीच्या रेसिपीत दोनपाच प्रकारच्या डाळी दिसतात. परप्पुपुडीतही तसेच असणार, फक्त प्रमाण किंवा एखादी डाळ आणि मसाला यातला फरक असेल. पाहिले पाहिजे. उत्तर कर्नाटकात ज्याला चटणीपुडी म्हणतात त्यासारखी असते का परप्पुपुडी? वर्णनावरून तसेच वाटते आहे. त्यातही डाळच असते. अर्थात डाळ हाच मुळात वैविध्याने नटलेला प्रकार असल्याने वैविध्य असणारच म्हणा.
तुरी
>>मुळगापुडीच्या रेसिपीत दोनपाच प्रकारच्या डाळी दिसतात. परप्पुपुडीतही तसेच असणार, फक्त प्रमाण किंवा एखादी डाळ आणि मसाला यातला फरक असेल. पाहिले पाहिजे. उत्तर कर्नाटकात ज्याला चटणीपुडी म्हणतात त्यासारखी असते का परप्पुपुडी?<<
स्ट्यु आर्ट
हे बघ
https://www.zomato.com/pune/stew-art-kothrud
नकाशापण आहे इथे.
स्ट्यू आर्ट ला दोनदा जाऊन आलो
स्ट्यू आर्ट ला दोनदा जाऊन आलो गेल्या वर्षी . फार लिमिटेड मेन्यू ( आणि गिऱ्हाईक ) . त्यांनी नुकतेच नॉन व्हेज चालू केले होते तेव्हा म्हणून ऑर्डर केले तर गरम स्ट्यू मध्ये थंडगार चिकन चे पिसेस आले ( बहुधा फ्रोझन चिकन पिसेस नुसतेच मिसळले होते ) एकदा जायला ठीक आहे असे वाटले .
फूडस्मिथ
ममव कोथरुडात , करिष्मा सोसायटी च्या थोडे पुढे , स्टारबक्स च्या बरोब्बर समोर एक "फूडस्मिथ "नावाचे रेस्टोरंट काल परवाच चालू झाले आहे .
मेन्यू मध्ये ऑल डे ब्रेकफास्ट ( इंग्लिश /कॉंटिनेंटल /फार्मर्स ) , सिझलर्स , पास्ता , सूप, सॅलड वगैरे वगैरे .
मेक युअर सिझलर असल्याने आम्ही क्रम्ब चिकन इन ब्लॅक बीन सॉस ऑन अ बेड ऑफ बटर गार्लिक नूडल्स /व्हेजीज /चिप्स आणि Panzanella सॅलड घेतले.
कुणी दोन तरुण मालक असावेत .
पोर्शन्स मध्यम आहेत . (म्हणजे द प्लेस ,झामुज पेक्षा छोटे , पण एकास more than enough ) ब्लॅक बीन सॉस अतिउच्च दर्जाचे होते. सॅलड् उत्तम .
चवीचवीने खाऊन पॉट तुडुंब भरले . चविष्ट ...
पोस्ट स्क्रिप्ट : आज मराठी भाषा दिन .
समोर स्टारबक्स , शेजारी सबवे , पलीकडे मॅडीज पास्ता बार ,मधे मॅकडी आणि पित्झा हट , थोड्या अंतरावर बॅरोमीटर,.........
भरल्या पोटावर विमनस्क होऊन विचार करू लागलो ,
माझ्या ममव कोथरुडातील मराठी खाद्य संस्कृतीची काय हि ससेहोलपट ?
तेवढ्यात ......... तेवढ्यात
फूडस्मिथ च्या मागे झळकणारा बोर्ड दिसला .
" खमंग ... लाडावलेल्या जीभे का कशातरी साठी .. "
आणि फूडस्मिथ च्या वरून फ्लॅश होणारा सरकता मेन्यू दिसला .......
"वरणभाततूपलिंबू ,मसालेभातटोमॅटोसार,धपाटे,घावन,आंबोळी,उपासाचेथालीपीठ,फोडणीचाभात,फोडणीचीपोळी,ब्रेडचिवडा,अँड द लिस्ट कन्टीन्युड ... "
निर्धास्त मनाने घरी गेलो. आणि तृप्त मनाने स्वीगीवर कॅडबी ऑर्डर केले आणि निःश्वास टाकला ,
निदान आपल्या हयातीत तरी कोथरुडातील खाद्यसंस्कृती संकटात नाही .
संस्कृतीचं ती ... काळजी वाटते . ...
लाभले भाग्य आम्हा , शेवटी खातो मराठी ...
शेवटी खातो मराठी
माझ्या ममव कोथरुडातील मराठी खाद्य संस्कृतीची काय हि ससेहोलपट ?...
संस्कृतीचं ती ... काळजी वाटते . ...
लाभले भाग्य आम्हा , शेवटी खातो मराठी ...
..........मराठी लिहिण्याचीही अशीच चिंता करीत आहात हे पाहून आनंद झाला. तरी काही शब्द नि त्यांलगतच्या विभक्त्यां/अव्ययांमधल्या जागाही खाल्ल्यात हे काही बरं नाही.
उदा. कोथरुडा तील, संस्कृती ची, मना ने, खा ऊन, पोटा वर .. असं लिहिण्याऐवजी 'कोथरुडातील', 'संस्कृतीची', 'मनाने', 'खाऊन', 'पोटावर' असं का बरं लिहावं ते ?
उचलेगिरी
निळे गोल फलक लावून अमुकतमुक माणूस इथे राहात होता याची झैरात करणे
ही गोष्ट पुण्यानं लंडनकडूनच उचलली आहे. ही गोष्ट वगळता -
तऱ्हेवाईक सर्किट लोक, फालतूतल्या फालतू गोष्टीचं कौतुक असणे, खाण्यापिण्यावर प्रेम,
निळे गोल फलक लावून अमुकतमुक माणूस इथे राहात होता याची झैरात करणे,पॅसिव्ह ॲग्रेसिव्हनेस, असे अनेक कॉमन गुण आहेत.
हे सगळं पॅरिसलाही फिट्ट बसू शकतं. :-)
भारी
मुंबईत पिझ्झाबेस त्याच दुकानाने बनवणं बरंच कॉमन आहे. एका जागी एका मराठी कुटुंबाने 'पिझ्झेरिया हाऊस' काढलं आहे, ज्यात बेस ते स्वत: बनवतात, शिवाय चीझबर्स्ट मध्ये वरुन चीझचा तलाव न करता, बेसच्या मधोमध चीझ भरतात. जबरी लागतो. मोझारेला स्वत: बनवणं हे खरंच युनिक आहे.
अवांतर: कुलाबा, मालाड आणि अंधेरीस्थित पिझ्झेरिया १४४१ मध्ये अक्षरश: सत्राशे टॉपिंग्ज निवडू शकतो, मासे, चिकन, मटण, डुक्कर, (सॉसेज-खीमा इ. उपलब्ध प्रकारांमध्ये) भाज्या, वगैरे. पिझ्झा कमी आणि वोक बनवत असल्याचा भास जास्त होतो. शिवाय ९५ रुपयांत अमर्यादित कोक/स्प्राईट हेही एक आकर्षण.
दोन एक महिन्यांपुर्वी
दोन एक महिन्यांपुर्वी कुठल्याशा उपोषणाआधी काँग्रेसनेत्यांचे छोले भतुरे खातानाचे फोटो प्रसिद्ध झाले होते. ते फोटो पाहुन वेगवेगळ्या ठिकाणचे छोले भटुरे खायची इच्छा झाली होती. त्या तल्लफीत राजपुत डेअरी आणि लक्ष्मी रोडवरचं शाहजी'ज इथले छोले भटुरे खाल्ले. दोन्ही खुप आवडले. दर्शनपेक्षा कैक पटीने चांगले वाटले.
पुण्यात अजुन कुठे कुठे उत्तम छोले भटुरे मिळतात?
रिसेन्ट खादाडी
बॉक्सेठातून बटर चिकन आणि खोबरं-अननस ह्या विचित्र कॉम्बिनेशनचं आईस्क्रीम मागवलेलं. खोबरं चक्क खवट लागत असल्याने गारेगार आईस्क्रीमची मजा पार गेली. बटर चिकन मात्र झक्कास. दिल बहला गया.
नंदू डोसा डिनर इथे अक्षरश: डोसा मॅरेथॉन केली. तब्बल आठ डोसे. ऑनिअन उत्तप्पा झक्कास. तब्बल इंचभर जाड उत्तप्प्यात करपलेल्या मऊसर खमंग कांद्याने जी मजा आणली आहे राव!
अक्कड बक्कड बॉम्बे बू मधून चिली चीज ग्रील खाल्लं. जबरी. एक अख्खं खाल्लंत तर तडस लागते. सगळ्या चवी जिभेवर ज्या ओघवतात त्या टेक्स्चरसाठी तरी खावं.
स्वीट बंगालमध्ये आत्तापर्यंत प्रच्चंड खादाडी केलेली आहे. त्यांच्यासमोर मोडकं बंगाली पाजळून दाखवण्याची इच्छा बाकी अपुरी आहे अजून. जायफळाचा रसगुल्ला खाल्ला. रेग्युलर रसगुल्ल्याला त्रिभुवनात तोड नाही. नॉलेन गुरेर रोशोगुल्ला अतिशय ओव्हररेटेड आहे. बाकी लामछा, चोमचोम इत्यादी गोष्टी इथल्या विश्वास, जैन वगैरे फूडचेन्सनी रेग्युलर क्रॅश कोर्स करुन शिकून घ्याव्यात इतक्या तोडीच्या आहेत.
छान शब्द वापरलात - त्रिभुवन!!
छान शब्द वापरलात - त्रिभुवन!!
फारा दिवसांनी ऐकला.
एम एस सुब्बारावांच्या तेलुगु 'सुंदर कांड' मध्ये मला वाटतं मंदोदरीला उद्देश्युन हा 'त्रिभुवनसुंदरी' शब्द ऐकलेला आहे. त्यानंतर आजच.
___________
सॉरी सुंदरकांडात त्रैलोक्यसुंदरी असे वर्णन आहे. त्रिभुवनसुंदरी असे नाही. तपशिलात चूक झाली.
काल माकिआटो कॉफीची चव पाहीली.
काल पारंपारिक माकिआटो कॉफीची चव पाहीली. एxप्रेसो शॉट आणि थोडे फेसाळ (फोमड) दुध असे मिश्रण होते. मला फार कडक वाटली. मग बरच क्रीमर घालुन संपवली. परत घेइन कदाचित (५०-५०).
माकिआटो इटालियन नाव आहे त्याचा अर्थ आहे - ठीपक्यांची कॉफी म्हणजे दुधाचे ठिपके असलेली.
डागदर
१. Macchiato चा शब्दश: अर्थ म्हणजे डाग असलेला. कॉफीत दुधाचा किंचित डाग.
२. Macular degeneration, ज्यात पाहताना डोळ्यांसमोर डाग दिसू लागून हळूहळू दृष्टी अंधुकावते तो आजार.
३. लाक्षणिक अर्थाने, मेरी इमॅक्युलेट म्हणजे कुठलाच डाग नसलेली - व्हर्जिन कन्सेप्शन इत्यादी आठवावं.
४. विधान २ आणि विधान ३ यांच्यातली 'लीप ऑफ फेथ' चित्तचक्षुचमत्कारिक आहे की दृष्टी अंधुकावण्याचा परिणाम - यावर वाद रंगू शकतील.
५. एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल, इमॅक्युलेट व्हर्जिन आणि कॅरॅक्टरवाली माकियातो कॉफी ही इटालियन प्रेय/पेय त्रिनीती मजेदार आहे :)
पुण्यात नवीन दक्षिणायन
कोथरुडातले जगप्रसिद्ध दुर्गा कोल्ड कॉफीचे हाटेल जे आहे एमायटीजवळचे, त्याला लागूनच इड्डोस नामक मद्रासी हाटेल सुरू झाले आहे. म्ह. खरेच मद्रासी आहे, कारण मुळगापुडी ऊर्फ गनपौडर इडलीसोबत तीन चटण्या देतात. रसमही कडक. फिल्टर कॉफीही मस्त. एकुणात तब्येत खूश झाली, माझ्याकडून दणदणीत शिफारस. कदाचित याचा उल्लेख इथे आलेला असेल (जंतूंनी केला होता काय?) पण काल मी पहिल्यांदा गेलो तिथे आणि एक नंबर आवडले. तोंडाला चव आली.