Skip to main content

क्रोशाची स्ट्रॉबेरी पर्स

काय बर नवीन बनवावे ? याचा मी गुगल वर शोध घेत असताना ही स्ट्रॉबेरीच्या आकाराची पर्से मला दिसली.मी पाहता क्षणी ह्या पर्सच्या प्रेमात पडले आणि कधी एकदा ही पर्स बनवते असे मला झाले.
तुम्हाला पण ही पर्स निश्चितच आवडेल.

ऋणनिर्देश: http://primrosehillstudio.blogspot.com/2009_06_01_archive.html

ऋषिकेश Tue, 06/03/2012 - 09:42

अरे वा.. ऐसीअक्षरेवर या वेगळ्या कलाकृतीसह आगमन केलेल्या नव्या कलाकाराचे स्वागत! :)

क्रोशाच्या या आकाराच्या पर्सची मेख सांगाल का?
सगळे सरळ एकेरी खांब दिसताहेत. मग तो गोल आकार कसा केलात?
आधी एक साखळी --> खांब --> एका खांबातून दोन खांब असं करत गेलात का?
गोलाकार यायला एका बाजूने शिवावं लागतंच का?

रोचना Tue, 06/03/2012 - 11:29

ऐसीअक्षरेवर स्वागत!
बटवा सुंदर आहे! कोणती लोकर वापरलीत? विणकाम-क्रोशा च्या कृतींच्या शोधात असलात तर"रॅवेल्री.कॉम" या विणकरांच्या पंढरीला भेट दिलीत का? हजारो, लाखो पॅटर्न तिथे आहेत.

दुवा योग्य जागी निर्देशीत केला आहे: संपादक

शहराजाद Tue, 06/03/2012 - 13:00

ऐसीअक्षरेवर स्वागत
छान दिसतेय थैली.
अजून येऊद्या.

अश्विनि Wed, 07/03/2012 - 08:19

सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद.

@रोचना ....मी Vanna’s Choice य कंपनीची लोकर वापरली. "रॅवेल्री.कॉम" ची मी सदस्य आहे.खरेच खूप छान पॅटर्नस् आहेत तिथे.

@ऋषिकेश... पॅटर्नच आहे तसा ज्यामुळे आकार येत गेला.एका बाजूने शिवलेले असे काही नाही यात.मी ऋणनिर्देश करताना जी लिंक दिली आहे ती पाहिल्यास पॅटर्न दिसेल .