एन आर आय ची प्रवासी भारतीयांची भेट किंवा भारतीयाची परदेशात एन आर आय/ पी आय ओ भेट

गविंच्या 'एनआरआयची भारतभेट...' या धाग्याची मिरर इमेज म्हणून हा धागा ' भारतीयाची परदेशात एन आर आय/ पी आय ओ भेट 'काढतोय .
गेल्या काही वर्षात परदेशी (यात सगळे आले , प्रगत अप्रगत , अमेरिकाज , युरोप , आफ्रिका , ऑस्ट्रेलेशिया , मिडल ईस्ट वगैरे ) अत्यंत कमी कालावधीकरिता जाणाऱ्या भारतीयांची संख्या लक्षणीय आहे .

भाग १ : हा भाग एन आर आय यांच्या साठी : या अल्प कालावधीकरिता परदेशात येणाऱ्या या भारतीयांची एन आर आय/ पी आय ओ शी ( पूर्वपरिचित /अपरिचित ) भेट हि बहुधा होतेच . अशा वेळचे स्थानिक एन आर आय मंडळींचे अनुभव काय ?
गवींनी लिहिले होते तसे स्पेसिफिक प्रश्न लिहीत नाहीये , जे बरेवाईट अनुभव/ इम्प्रेशन्स आलेत तसे लिहा .. कृपया

भाग २ . हा भाग भारतातून पळत पळत परदेशी काही कामानिमित्त /उगाचच गेलेल्या भारतीयां करिता : या धावत्या / अल्प कालावधीकरिता जाणाऱ्या भारतीयांची पूर्व परिचित किंवा अपरिचित स्थानिक एन आर आय/ पी आय ओ शी भेट बहुधा होतेच .
या भेटींमध्ये त्यांना काय अनुभव येतो ?
(माझे ९० टक्के अनुभव अत्यंत प्रसन्न आहेत ( आणि १०% वैतागाचें आहेत ) अर्थात यु एस मधील अनुभव आणि आफ्रिकेतील अनुभव यात बराच फरक आहे ._)
स्पेसिफिक प्रश्न मुद्दाम लिहीत नाहीये . जे बरेवाईट अनुभव/ इम्प्रेशन्स आलेत तसे लिहा .. कृपया ..

field_vote: 
0
No votes yet

अण्णा वेळ‌ जात‌ नाहिए का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

म‌ला हेच सांगाय‌चे होते अण्णा की वेग‌ळा धागा काढा. पोटेन्शिअल आहे.
___________
आम्हाला भेट‌ दिल्यांम‌ध्ये आय‌ आय टी चे एक प्राध्याप‌क् आहेत , माझे आईबाबा आहेत्. पैकी प्राध्याप‌क एक २-३ दिव‌स राहीले होते. आई बाबा ४ म‌हीने राहीले.
पैकी प्राध्याप‌कांना तो किंचीत‌काळ‌ स्टे फार‌ आव‌ड‌ले अस‌ल्याचे स्म‌र‌ते.
.
आई बाबांना विल‌क्ष‌ण क‌ंटाळा आलेला कार‌ण टेक्सास‌म‌ध्ये माझ्याक‌डे कार न‌व्ह‌ती. रोज‌ स‌ंध्याकाळी मी घ‌री आले की त्यात‌ल्या त्यात क‌र‌म‌णुकीचे काय‌ केले हे ते म‌ला सांग‌त‌ अस‌त‌. म‌ग‌ त्यात गाणी ऐक‌ली ते ब्लु जे ची जोडी दिस‌ली प‌र्य‌ंत‌ रेंज‌ असे. उकाड्यात आम्ही आपार्ट्मेन्ट‌च्या स्विमिंग‌ पुल‌व‌र‌ जाऊन‌ ग‌प्पा मार‌त‌ असू. त्यात‌ मी पाण्यात (३ फुट‌च‌ ब‌र्का ;)) आणि ते काठाव‌र्. माझ्या मैत्रिणीने एल‌न‌ ने व‌ तिच्या न‌व‌ऱ्याने आईबाबाआल्याआल्या जोर‌दार स्वाग‌त‌ केलेले आठ‌व‌ते. आम्हाला घेऊन‌ दोघे आऊट बॅक‌ स्टेक‌ हाऊस‌ ला गेले होते. प‌ण आई प‌ड‌ली व्हेजिटेरिअन प‌ण‌ बाबांनी त्यांच्या स्वाग‌ताचा योग्य‌ स‌माचार‌ घेत‌ला. मात्र दोघांना अमेरीक‌न लोकांपुढे स‌ंकोच‌ल्यासार‌खे होत‌ असे हे ल‌ख्ख आठ‌व‌ते. पुढे स‌ंपूर्ण स्टेम‌ध्ये आईस‌ भार‌तिय भाज्याच‌ लाग‌त‌ प‌ण त्या मिळ‌णार कुठे. कार‌ण मी र‌हात होते न्यु ब्राऊन‌फेल्स ला अग‌दी खेडेगावात. मात्र् डेलावेअर‌ला न‌व‌ऱ्याक‌डे गेलेलो होतो तेव्हा मात्र आईबाबांना फिराय‌ला आव‌ड‌ले होते. स‌र्व‌ भाज्या स‌ह‌ज‌ उप‌ल‌ब्ध होत्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नोट: या मामी आपणां सर्वांच्या ओळखीच्या मामी नाहीत हे लक्षात येईलच, पण तरी.
नोट2: हा खरा किस्सा आहे. आ र श.
-----

मामी: अरे आदूबाळ! तुझ्याकडे यायचंय.
आबा: या की मामी! यू आर मोस्ट वेलकम!
मामी: आयफेल टॉवर, चीजची फ्याक्टरी सगळं सगळं पाहायचंय.
आबा: अहो ते इथे... असो. मग महिना काढून या.
मामी: तू ये आमच्यासोबत आम्हाला सगळं दाखवायला.
आबा: अहो एवढी सुट्टी मला नाही मिळायची. पुन्हा माझ्याकडे शेंगेन व्हिसा नाही.
मामी: तुलाही लागतो का 'चेंज इन' व्हिसा?
आबा: (फुलटॉस सोडून देत) लागतो ना हो. ते राहू दे, सगळी युरोप टूर जमवून देतो तुम्हाला इथून.

[मामी 'स्टार टूर्स'ला जातात. पंधरा दिवस, सतरा देश टैप.]

[दोन महिन्यांनंतर मामींचा (भलत्याच मावशीला दिलेला) रिपोर्ट:]
- टूर तशी बरी होती, पण जेवायचे फार हाल झाले. रोज गोडूस गुजराती जेवण करून कंटाळा आला.
- काय ते सारखं हा पॅलेस आणि तो पॅलेस. कंटाळा आला.
- लंडनमध्ये काही मजा नाही. लघवीला जायचं असेल तरी सोळा रुपये पडतात.
- सग्गळं सग्गळं मिळतं हो तिथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

एका ब्यांकेतला उच्चपदस्थ पुतण्या: आबा! अमुक तारीख ते तमुक तारीख आहे. भेटूया?
आबा: क्या बात! या ब्यांकेचं हापिस कनेरी व्हार्फला आहे ना? मी येतो तिकडे.
पुतण्या: चालेल! इथे भेटू [एका मिशेलीन स्टार रेस्टोरंटचा पत्ता देतो. या ठिकाणी जायचा धीर मी बरेच दिवस गोळा करतोय.]
आबा: अरे कशाला इथे? फार महाग आहे हे प्रकरण. आपण कुठल्याही टावरणात भेटू शकतो.
पुतण्या: अरे डोन्ट वरी. मला डेली अलाऊन्स आहे [क्ष] पौंड. (क्ष पौंड माझ्या आठवड्याच्या पगाराइतके असतात.)
आबा: (मनात) बरमंगमाझ्याबाचंकायजातंय.

[भेटतो. गप्पा मारतो. त्या मिशेलीन स्टार हाटेलाच्या बबर्जीला जॉब सॅटिसफ्याक्षन वाटावं इतका आडवा हात कोणीतरी मारतो. निघताना...]

पुतण्या: अरे हे एक कार्ड मिळालं - बरी आहे का ही सर्व्हिस? (एका एस्कॉर्ट सर्व्हिसचं कार्ड दाखवतो.)

आबा: ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ब‌ब‌र्जी हा श‌ब्द‌ बाव‌र्चीचा अप‌भ्रंश‌ आहे हे उघ‌ड‌ आहे. प‌ण‌ इज‌ धिस‌ रिअली अ थिंग‌? आय‌मीन‌ पुलंच्या लिखाणात‌ सोडून‌ क‌धी हा श‌ब्द‌ वाच‌ल्याचे किंवा जुन्या पिढीच्या तोंडून‌ ऐक‌ल्याचे आठ‌व‌त‌ नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हो - ब‌हुदा ल‌ष्क‌रात‌ल्या आचाऱ्यासाठी अजून‌ही वाप‌र‌ला जातो. मागे एक‌दा 'लाज‌र‌स‌' (Lazaros) नावाच्या आर्मीत‌ल्या आचाऱ्याला त्याच्या पेन्श‌न‌स‌ंद‌र्भात‌ काही म‌द‌त‌ केली होती. त्याचं 'स‌र्व्हिस‌ बुक‌' की काय‌स‌ं खाकी चोप‌डं होतं, त्यात‌ त्याच्या प‌दाचा उल्लेख‌ 'ब‌ब‌र्जी' असा केला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अतिरोच‌क‌. ध‌न्य‌वाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ज‌र‌ बाव‌र्ची --> ब‌ब‌र्जी असेल‌, त‌र‌ स्प‌ष्ट‌प‌णे 'अव्व‌ल‌ इंग्र‌जी' काळात‌ला अप‌भ्र‌ंश‌ आहे. त‌स‌ं असेल‌ त‌र‌ हॉब्स‌न‌ जॉब्स‌न‌ कोशात‌ साप‌डाय‌ला ह‌वा.

----------

BOBACHEE साप‌ड‌ला

BOBACHEE , s. A cook (male). This is an Anglo-Indian vulgarisation of bāwarchī, a term originally brought, according to Hammer, by the hordes of Chingiz Khan into Western Asia. At the Mongol Court the Bāwarchī was a high dignitary, 'Lord Sewer' or the like (see Hammer's Golden Horde, 235, 461). The late Prof. A. Schiefner, however, stated to us that he could not trace a Mongol origin for the word, which appears to be Or. Turki. [Platts derives it from P. bāwar, 'confidence.']

रोच‌क‌!

ही क‌विताही भारी आहे:
"And every night and morning
The bobachee shall kill
The sempiternal moorghee,
And we'll all have a grill."
The Dawk Bungalow, 223

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

क्या बात‌! अनेक‌ ध‌न्य‌वाद‌.

ज‌से या श‌ब्दाचे मूळ‌ मंगोल‌ आहे त‌सेच‌ दारोगा या श‌ब्दाचेही मूळ‌ मंगोल‌च आहे बाय‌द‌वे. दारुगाची हा त्याचा रूट‌ फॉर्म‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा हा हा.. या दोन्ही किस्स्यांम‌ध्ये तुमचं ते "आलं का आलं आलं?" गोष्टीचा भाग म्ह‌णून‌च‌ वाचलं.. फिट‌ ब‌स‌तंय ते प‌ण‌. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदैव शोधात..

यातल्या गमतीजमती कळायला आपण परदेशात असायला पाहिजे.
ज्याच्याकडे /ज्याच्या जबाबदारीवर राहिले असतात इथले भारतिय त्यांच्या धडपडण्या आणि हरवण्याबद्दल तिकडचे लोक फार घाबरून असतात असं ऐकलं आहे. मेडिकल विमा नसतो,वेळ थोडा असतो.
एकूण वाचनातून असं मत झालंय की शाकाहारींनी उगाच तिकडे जाऊन कुणाला त्रास देऊ नये. शेक्सपिअरच्या हॅमलेट पलिकडे वाचन न झालेल्याने त्याचे घर पाहून काय दिवे लावावेत? अथवा गपचीप टुअरमधून स्वतंत्र जावं आणि आइफेल टावरचा एक सेल्फी हालमध्ये मोठा करून लावावा.

बापट,धागा छान!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.... यातल्या गमतीजमती कळायला आपण परदेशात असायला पाहिजे.....
किंवा परदेशात जायला पाहिजे !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी लिहित‌ अस‌लेलं तुम‌च्या कॅटेग‌रीत ब‌स‌तं का माहित‌ नाही.
माझे सास‌रे त्यांच्या मुलाक‌डे अनेक वेळा जाऊन आले. प‌ण द‌र‌ वेळेस‌, त्यांना तिथ‌ल्या उच्चारांचा प्र‌श्न भेड‌स‌वाय‌चा. त्याव‌र उतारा म्ह‌णून ते एक‌ छोटं पॅड‌ ब‌रोब‌र‌ ठेवाय‌चे. स‌मोर‌च्या विदेशीला, जे म्ह‌णाय‌चं आहे ते लिहून दाख‌वाय‌चे. एक‌दा ते मुलाब‌रोब‌र, बाहेर‌, काही खाय‌चे आणाय‌ला गेले होते. ऑर्ड‌र‌ देऊन मुलाने त्यांना तिथे उभे केले आणि तो ज‌व‌ळ‌च्या दुस‌ऱ्या दुकानात गेला. एव‌ढ्यांत‌ काऊंट‌र‌व‌र‌च्या माण‌साने त्यांना काही विचार‌ले. त्यांना ते क‌ळ‌त‌च‌ न‌व्ह‌ते. ते काहीसे," हिअ टु गो?" असे होते. भार‌तात आप‌ण पार्स‌ल‌, कॅरी होम‌ असे काही म्ह‌ण‌तो. तेव‌ढ्यांत मुल‌गा आला आणि त्यांची संक‌टातून सुट‌का झाली. त्याशिवाय‌ त्यांना तिथ‌ल्या आणि म‌ध‌ल्या युरोप‌ हॉल्टच्या टॉय‌लेट‌सची भीति वाटे. प्र‌त्येक ठिकाण‌चा न‌ळ‌ वेग‌ळ्याच‌ प्र‌कारे उघ‌डे. ते गोंध‌ळून जात अस‌त‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिरसिंगराव ,बसतेय कि हो दुसऱ्या कॅटेगरीत . मी पण लिहिणारे दुसऱ्या कॅटेगरीत नंतर ... त्याची सुरुवात इथे करतो ....
अम्रीकेत दोनदा जाणे झाले , २०१२ साली एका शिष्यवृत्तीवर संशोधनाकरिता ४-५ महिन्यांकरिता आणि पत्नी आणि मोठा मुलगा अम्रीकेत वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे मुलाच्या 'टोप्या उडवणे' समारंभाच्या निमित्ताने फॅमिली रियूनियन म्हणून महिन्याभराकरिता . तेव्हा आलेले जवळच्या मित्रांचे , नातेवाईकांचे , आणि नवीन झालेल्या गोऱ्या मित्रांचे अनुभव रोचक होते . आफ्रिकेतील गोष्टच वेगळी , तिथले अनुभव वेगळे .
अर्थात हे सगळे लिहिणार ते परदेशस्थ ऐसीकरांचे अनुभव आल्यानंतर ...
ऋषिकेश मला वाटते , दोन्ही कॅटेगरीत लिहू शकेल ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन अनुभव : दोन्ही रोचक
पहिला जवळच्या मित्रांचा : १९८० च्या दशकामध्ये माझा एक जवळच्या मित्रांचा ग्रुप होता. काळाच्या ओघात मी सोडून उर्वरित सर्वजण इकडेतिकडे जाऊन अखेर अम्रीकेत स्थिरावले . २०१२ साली माझे अम्रीकेत काही काळाकरिता वास्तव्य होणार हे कळल्यावर तात्काळ ४ फोन आले कि सोयीचा विकेंड कळव आपण सगळे भेटतोय . मी मिशिगन स्थित असल्यामुळे मला जवळ पडेल अश्या ठिकाणी म्हणजे शिकागो ला राहणाऱ्या मित्राकडे भेटणे ठरले. इतर तिन मित्र अनुक्रमे प्लेनो टेक्सास , जर्सी आणि सॅन फ्रान्सिस्को इथे ( म्हणजे लांब लांब ) राहणारे . तो विकेंड आम्ही शिकागो ला एकत्र जमलो आणि १९८० चे दशक जगलो ( म्हणजे तेव्हा जे एकत्र करायचो ते म्हणजे दंगा , कल्ला , रॉक म्युझिक , खाणे , व मद्य .आणि शिकागोतील "भारतीय चायनीज'' खाणे ) (मित्राच्या पत्नीने घरात असूनही न दिसून मजा आणली ) आम्ही सगळे २५ वर्षांनी एकत्र आलो. लय लय मजा आली .
२०१६ ला पुन्हा एकदा हाच कार्यक्रम सॅन फ्रान्सिस्को इथे पार पडला .
जर कधी पुन्हा चुकूनमाकून अमेरिकेत गेलोच तर हेच रिपीट होईल याची खात्री
तात्पर्य : जवळची मोलाची मैत्री असेल तर लोकेशन मुळे फरक पडत नाही .
अनुभव दोन : आमचे एक नातेवाईक , जे दर वर्षी पुण्यात येऊन नक्की घरी येतात . ते शिकागो जवळच्या उपनगरात राहतात .अमेरिकेत असताना फोन करायचे माझा प्रोग्रॅम विचारायचे . आणि योगायोगाने मी त्या भागात जेव्हा असण्याची शक्यता असायची तेव्हा ते बाहेर असायचे ( तशी माझी जायची फार इच्छा वगैरे नव्हतीच पण तरीपण या योगायोगाची गम्मत वाटायची ) नंतर माझा शिकागो चा मित्र म्हणाला कि अरे ते फार श्रीमंत आहेत ... फार विचार करू नकोस त्यांचा .. ( श्रीमंती हि संज्ञा सापेक्ष असली तरी .. पण रेफरन्स ला हा मित्र पुण्यात असताना १९८० च्या दशकात घरात मर्सिडीझ असणारा होता ) तर असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा अनुभ‌व‌ कै खास‌ त‌ऱ्हेवाईक‌ व‌गैरे नाही प‌ण‌ रोच‌क‌ आहे.

ज‌र्म‌नीत‌ फ्रॅंक‌फ‌र्ट‌ इथे रा.रा.अमुक‌च‌न्द्र‌राव‌जीसो| यांच्याक‌डे गेलो अस‌ताना तिथ‌ल्या स‌र‌व‌णा भ‌व‌नात‌ थाळी ओर‌पाय‌ला गेलो. क्राउड‌ ब‌हुतांश‌ देसी होता अॅज़् एक्स्पेक्टेड‌. त्यात‌ एक‌ जोड‌पे म‌राठी बोल‌ताना ऐक‌ल्याव‌र‌ कान‌ ट‌व‌कार‌ले. ते ब‌हुधा ओळ‌खीचे असावेत‌से वाट‌ले प‌ण‌ खात्री न‌स‌ल्याने म्ह‌ट‌ले पोप‌ट‌ होईल‌ त‌री डिष्ट‌र्ब‌ न‌को क‌राय‌ला. बाद‌ में जा के प‌ता च‌ला के वो स‌च‌ मे ओळ‌खी के थे. मिपाक‌र‌ स्वाती दिनेश‌ अन मिष्ट‌र‌ स्वाती दिनेश‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भारतातून‌ उत्त‌र‌ अमेरिकेत‌ तात्पुर‌ते आलेल्या लोकांचा टेलिफोन न‌ंब‌रांचा फार‌ घोळ‌ असतो. येथे हे न‌ंब‌र‌ ३-३-४ किंवा १-३-३-४ असे ग‌ट‌ पाडून‌ सांग‌ण्याची प‌द्ध‌त‌ आहे. ती शिस्त‌ मोडून‌ सांगित‌लेला न‌ंब‌र‌ इथ‌ल्यांना क‌ळ‌त‌ नाही. तो जे काय‌ विचार‌तो ते फोन‌व‌रून‌ पाहुण्याला स‌म‌ज‌त‌ नाही असा मोठाच‌ स‌ंश‌य‌क‌ल्लोळ‌ होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वस्तुत:, भारतातले जे मोबाइल नंबर आहेत, त्यांची विल्हेवाट ५+५ अशी लागते. परंतु त्या शिस्तीत ते नंबर सांगणारे भारतीय विरळा. (आणि त्यातही आजच्या सीनियर सिटिझन पिढीतले भारतीय असल्यास तर काय, आनंदीआनंद! बोले तो, त्याहूनही दुर्मिळ.)

आता, स्वत:च्याच देशातले नंबर सांगताना शिस्तीने सांगण्याची बात तर सोडाच, पण अशी काही शिस्त म्हणून अस्तित्वात असते, हे ज्यांच्या गावीसुद्धा नसते, अशांकडून दुसऱ्या देशातले नंबर सांगताना ती शिस्त पाळण्याची तर सोडाच, पण गेला बाजार ती शिस्त समजण्याची - डोक्यात शिरण्याची - अपेक्षा तरी काय करणार? (तरी बरे, ही सो-कॉल्ड सुशिक्षितांची गत. पण पुढच्या पिढ्यांकडून अपेक्षा/आशा जरा बऱ्या आहेत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुंब‌ईचे लोक‌ स‌ह‌सा एक‌ एक‌ आक‌डा आणि तो ही इंग्र‌जीत‌ असा न‌ंब‌र‌ सांग‌तात‌.

म्ह‌ण‌जे माझा न‌ंब‌र‌ ९८९२४१... हा मी (आणि मुंब‌ई प‌रिस‌रात‌ले इत‌र‌ लोक‌) नाईन‌ एट‌ नाईन‌ टू फोर‌ व‌न‌ .... असा सांग‌तो. पुण्यात‌ले लोक‌ हा न‌ंब‌र‌ अठ्ठ्याण्ण‌व‌ ब्याण्ण‌व‌ एक्केचाळीस‌.... असा सांग‌तात‌ (आणि तो म‌ला क‌ळ‌त‌ नाही).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

म्ह‌ण‌जे माझा न‌ंब‌र‌ ९८९२४१... हा मी (आणि मुंब‌ई प‌रिस‌रात‌ले इत‌र‌ लोक‌) नाईन‌ एट‌ नाईन‌ टू फोर‌ व‌न‌ .... असा सांग‌तो. पुण्यात‌ले लोक‌ हा न‌ंब‌र‌ अठ्ठ्याण्ण‌व‌ ब्याण्ण‌व‌ एक्केचाळीस‌.... असा सांग‌तात‌ (आणि तो म‌ला क‌ळ‌त‌ नाही).

फ‌क्त‌ पुण्यात‌ले न‌व्हेत त‌र‌ मिर‌ज‌सांगलीकोल्हापुरात‌ले लोक‌ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

न‌ऊशे एकोण‌न‌व्व‌द‌ दोन‌शे एकेचाळीस‌..... असा सांगित‌ला त‌र‌ म‌ग‌ म्येलोच‌ !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ब‌हुतेक‌दा दोनदोन‌ आक‌ड्यांचे ग्रूप्स अस‌तात‌. अठ्ठ्याण्ण‌व‌ ब्याण्ण‌व‌ एक्केचाळीस‌ व‌गैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काही वर्षांपूर्वी आमच्याकडे बऱ्या अर्ध्याच्या माहेरचे लोक आले होते. (त्याच्या भाषेत 'भारतीय'.) आमच्याच गावात राहणाऱ्या इतर कोणा ओळखीच्या लोकांना भेटण्यासाठी भारतीयांना घेऊन जायचं होतं. तेही भारतातून काही महिन्यांपुरते अमेरिकेत आलेले.

एका शनिवारी सकाळी लवकर उठून, बाहेर बरेच भटकून दमून आम्ही घरी आलो होतो. दहा-पंधरा मिनीटं आडवं पडावं, असा विचार करून मी बेडरूमच्या दिशेनं निघाले. तर त्या ओळखीच्या लोकांना फोन लावून देण्याची विनंती आली. फोन लावून दिला आणि मी लोळायला आत गेले तर पुन्हा हाकारे सुरू झाले. हाकारेसुद्धा मुलाच्या नावाचे नाहीत; त्यानं फाट्यावर मारलं असतं ना! दुसऱ्या बाजूचे लोक इमेलवर पत्ता पाठवून खुश नव्हते तर 'पिंपळाच्या मागे डाव्या हाताला वळा; मग भैरोबाच्या डोक्यावर फूल वाहा आणि ते फूल ज्या दिशेला पडेल तिथे वळा' छापाचा पत्ता सांगायला सुरुवात झाली.

मी महाप्रचंड गुंगीत होते. 'हो-हो' केलं. फोन ठेवला. तर भारतीय - "पत्ता समजला?"
"हो."
"किती लांब आहे त्यांचं घर?"
"थोडं."
"रस्ता समजला?"
"हो."
"काल आपण गेलो होतो, तिकडेच जायचंय ना?"
"नाही." मी एवढी गुंगीत होते त्यामुळे 'या लोकांना माझ्या मिताक्षर-उत्तरांचा अन्वय समजत नाही का', हा प्रश्नही पडला नाही. आदल्या दिवशी दक्षिणेला गेलो होतो. हे लोक उत्तरेला राहतात.
"मला सांगितलं त्यांनी. त्याच दिशेला जायचंय."
मग माझा संयम संपला. "ही घ्या गाडीची किल्ली. त्यांनी कसं जायचं ते तुम्हाला सांगितलंय. तुम्हीच जा. मी तशीही फार दमल्ये. आत्ता गाडी चालवली तर अपघात होण्याची शक्यता जास्त." एक घाव दोन तुकडे केल्यावर मात्र थोडा वेळ लोळता आलं.

मग प्रवास सुरू झाला. हायवेला लागल्यावर दर एक्झिटला "इथेच जायचं म्हणाले होते," हा जप. एका एक्झिटला गाडी खरंच बाहेर काढावी, एखाद्या दुकानाच्या पार्किंगमध्ये गाडी घुसवावी आणि मागे वळून विचारावं, "सांगा बघू तो पिंपळाचा पार आणि भैरोबा कुठे आहे?" अशी इच्छा झाली होती. पण टेक्नोमंद, दिशामंद, रस्तामंद आणि सूचनालोलुप लोकांच्या नादी लागून आपल्यावरच डोकं आपटण्याची वेळ येणार हे वेळेतच लक्षात आलं. "आता मला दिशादर्शन करू नका. ह्या गावातले रस्ते आणि गूगल मॅपचं अॅप मला तुमच्यापेक्षा जास्त माहित्ये," अशी तंबी देऊन गाडीतल्या गाण्यांचा आवाज मोठ्ठा केला. ती युक्ती कामी आली.

आता कोणीही दिशादर्शन करायला लागले की मी त्यांना थांबवते. "मी माझ्या घराचा पत्ता पाठवते; तुम्ही मला दिशादर्शनाची गूगलची लिंकच पाठवा. मला नकाशेच समजतात," असं सांगते. मला नकाशेच चांगले समजतात आणि हवेतल्या हवेत सांगितलेल्या दिशा समजायला त्रास होतो हे खरंच आहे. विकाराचा उपयोग होतो खरा! टेक्नोमंद एका सेकंदात नामोहरम होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण टेक्नोमंद, दिशामंद, रस्तामंद आणि सूचनालोलुप लोकांच्या नादी लागून आपल्यावरच डोकं आपटण्याची वेळ येणार हे वेळेतच लक्षात आलं.

पिढी! त्याला इलाज नाही.

(बाकी, टेक्नोमंदी/दिशामंदी/रस्तामंदी आणि सूचनालोलुपता यांचे नाते साधारणत: वर्गाच्या प्रमाणात असते, हे लक्षात आले असेलच.)

"ही घ्या गाडीची किल्ली. त्यांनी कसं जायचं ते तुम्हाला सांगितलंय. तुम्हीच जा. मी तशीही फार दमल्ये. आत्ता गाडी चालवली तर अपघात होण्याची शक्यता जास्त." एक घाव दोन तुकडे केल्यावर मात्र थोडा वेळ लोळता आलं.

नशीबवान आहात, की त्यातल्या त्यात मवाळ नग तुमच्या वाट्याला आले. अन्यथा, त्या डेमोग्राफिकमध्ये शेमलेस/कोडगे (आणि तितकेच यूसलेस) यांचा तुटवडा नसावा.

(सगळेच तसले होते, असे म्हणण्याचा इरादा मुळीच नाही. मात्र, तसल्यांचे प्रमाण अंमळ जास्तच असावे. किंवा, सगळेच तसले आमच्याच वाट्यास आले असावेत किंवा कसे, कोणास ठाऊक!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नशीबवान आहात, की त्यातल्या त्यात मवाळ नग तुमच्या वाट्याला आले. अन्यथा, त्या डेमोग्राफिकमध्ये शेमलेस/कोडगे (आणि तितकेच यूसलेस) यांचा तुटवडा नसावा.

नशीब, मी आणि बरा अर्धाही कोडगे/शेमलेस आणि यूसलेस आहोत. मी थेट सत्याग्रहच सुरू करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या अमेरिका भेटीत, अदितीक‌डे डोकावाय‌चे योज‌ले होते. प‌ण आता विचार ब‌द‌ल‌ला आहे. (कार‌ण मी टेक्नोमंद‌ आहे)
हे ह‌ल‌केच‌ घ्यावे, प्र‌त्य‌क्षांत‌ इत‌क्या लांब‌ प्र‌वास‌ क‌र‌णे क‌ठीण‌च‌ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय‌ म‌स्त व‌र्ण‌न‌ केल‌य‌स्. ब‌र‌ं सुच‌त‌ं. लिही ना अस‌ं म‌जेम‌जेच‌ं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रस्ता लक्षात ठेवायला , कोपऱ्यावर गाय उभी होती हे सांगितल्यावर त्या माणसाला मी साष्टांग नमस्कार केला होता ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

या धाग्याच्या निमित्ताने एक‌ प‌र्स‌णल‌ प्र‌श्न‌

प्यारिस‌म‌ध्ये कोणी ऐसीक‌र‌ राह‌तात‌ का? (व्य‌नि ने स‌ंप‌र्क‌ क‌रावा. घाब‌रू न‌ये. तुम‌च्याक‌डे र‌हाय‌ला येणार‌ नाही Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

फोन नंबराच्या मागे साधे लॅाजिक आणि गणित आहे हे बय्राच लोकांना माहित नसते. ( वायर्ड फोन )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय आहे ते लॉजिक आणि ग‌णित्?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वात शेवटचे चार आकडे आपला फोन नंबर असतो तो बदलत नाही. गाव, शहर लहान असल्याने अगोदर ९९९९ ग्राहक। ते वाढल्यावर १९९९९,२९९९९ याप्रमाणे। पुढे चार आकदे आणखी ग्राहक सामावण्यासाठी लक्ष,दशलक्ष वगैरे। त्या शिवायचे चार आकडे जिल्हा आणि राज्यांसाठी, आणखी चार आकडे जगातले देश वगैरे.
एखादा फोन नंबर अशाप्रकारे चार चार असा योग्य जागी तोडून लिहिला तर वाचायला सोपा जातो,समजायला सोपा जातो परंतू एसेमेस पाठवल्यास तो क्लिक करून डाइअल होत नाही ही अडचण येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चार आकडे जगातले देश

दोन आक‌डे ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वात शेवटचे चार आकडे आपला फोन नंबर असतो तो बदलत नाही. गाव, शहर लहान असल्याने अगोदर ९९९९ ग्राहक। ते वाढल्यावर १९९९९,२९९९९ याप्रमाणे। पुढे चार आकदे आणखी ग्राहक सामावण्यासाठी लक्ष,दशलक्ष वगैरे। त्या शिवायचे चार आकडे जिल्हा आणि राज्यांसाठी, आणखी चार आकडे जगातले देश वगैरे.
एखादा फोन नंबर अशाप्रकारे चार चार असा योग्य जागी तोडून लिहिला तर वाचायला सोपा जातो,समजायला सोपा जातो परंतू एसेमेस पाठवल्यास तो क्लिक करून डाइअल होत नाही ही अडचण येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्वी चार‌ आक‌ड्यांच्या आधीचा न‌ंब‌र‌ तो कोण‌त्या भागात‌ आहे हे द‌र्श‌व‌त‌ असे. ज‌से ५३३, ५३४, ५४२, ५४७ हे ठाण्याच्या वेग‌वेग‌ळ्या एक्स्चेंजेस‌चे कोड्स‌ होते. प‌ण‌ म‌टेनिलिच्या कार्याल‌यात‌ गेल्यास‌ त्यांना "लेव्ह‌ल" असे स‌ंबोध‌ले जाते असे दिसेल‌.
त्याला लेव्ह‌ल‌ का म्ह‌ण‌तात‌ हे आज‌तागाय‌त‌ क‌ळ‌ले नाही. क‌दाचित‌ कोणी टेलिक‌म्युनिकेश‌न‌वाला इथे असेल‌ त‌र‌ सांगू श‌केल‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ब‌हुदा त्या "स्विचिंग‌ लेव्ह‌ल्स‌" या अर्थी लेव्ह‌ल्स‌ असाव्यात‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.