दखल
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२०
दिनवैशिष्ट्य
१७ एप्रिल
जन्मदिवस : संतकवी सूरदास (१४७८), ब्रिटिशांविरोधात तमिळनाडू भागात उठाव करणारा धीरन चिन्नामलाई (१७५६), कोशकार यशवंत रामकृष्ण दाते (१८९१), जगातल्या पहिल्या महिला पंतप्रधान सिरीमाओ बंदरनायके (१९१६), सिनेदिग्दर्शक लिंडसे अँडरसन (१९२३), माजी पंतप्रधान चंद्रशेखर (१९२७), बिलिअर्डसपटू गीत सेठी (१९६१), तमिळ अभिनेता विक्रम (१९६६), अभिनेत्री जेनिफर गार्नर (१९७२), क्रिकेटपटू मुथैया मुरलीधरन (१९७२), 'स्पाईस गर्ल' गायिका व्हिक्टोरिया बेकहम उर्फ पॉश स्पाईस (१९७४), अभिनेता सिद्धार्थ (१९७९)
मृत्युदिवस : 'भारत सेवक समाजा'चे आजीव सदस्य श्रीनिवास शास्त्री (१९४६), शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन (१९७५), राजा केळकर संग्रहालयाचे संचालक दिनकर गंगाधर केळकर (१९९०), वनस्पतीशास्त्रज्ञ, महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी या संस्थेचे माजी संचालक डॉ.वामन दत्तात्रय वर्तक (२००१), कन्नड लेखक वसंत दिवाणजी (२०१२), कवी, पत्रकार नित्यानंद मोहपात्रा (२०१२), गायक पं. शरद साठे (२०१९)
---
१३९७ : जेफ्री चॉसरने प्रथमच आपल्या 'कँटरबरी टेल्स' सांगितल्या.
१९५२ : भारताची पहिली लोकसभा स्थानापन्न.
१९६१ : पिग्सच्या आखातातील आक्रमण - क्युबात फिडेल कॅस्ट्रोची कम्युनिस्ट राजवट उलथवण्यासाठी सी.आय.ए. कडून प्रशिक्षित हल्लेखोर क्युबात उतरले.
१९७० : चांद्रयान अपोलो १३ मधले अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.
१९७१ : बांगलादेश प्रजासत्ताकाची स्थापना.
१९७३ : कुरियर कंपनी फेडेक्सची सुरुवात.
दिवाळी अंक २०२०
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- रूबाबदार हत्ती
- ओंकार
हम्म, भारीच आहेत. गुल पन्राला
हम्म, भारीच आहेत.
गुल पन्राला बघितलं, जरा जरा नर्गिस फखरी आहे काय वाटलं. भारी दिसती एकदम. आतिफ अस्लम नेहमीप्रमाणेच.
पाक कोक स्टुडिओ!
भारतीय कोक स्टुडिओपे़क्षा पाक कोक स्टुडिओ शतपटीने चांगला आहे.
गरज बरस सावन - सदाबहार. हे कधीही आणि कितीही वेळा ऐकू शकतो. मित्रांबरोबर फिरायला/ट्रेक्/गेट्टुगेदर वगैरे असेल तर परत येताना हे गाणं मूड फार भारी बनवतं. पब्लिक रडणार जरूर.
दूर जेव्हा हिंदी गाणी प्लॅटॉनिक होती आणि त्यांवर इंग्रजीचे अत्याचार झालेले नव्हते, त्या काळातलं हे शेवटचं गाणं. वाद्ये झक्कास. हे गाणं ओरिजिनल इथे.
मियां की मल्हार गायिकांचा आवाज फार (मला तरी) आवडण्यासारखा नाही. वाद्ये अक्षरशः जबरदस्त. बासरी तर वाहवा घेऊन जाते.
झिन्दा हे गाणं भन्नाट. वाद्ये झकास. ओरिजिनल इथे साधारण ०५-०६ च्या सुमारास हे गाणं टीव्हीवर फार वेळा लागायचं.
छाप तिलक हे व्हिवा मध्ये त्या बुवाच्या सदरात मिळालेलं. छान आहे.
आफरीन लेटेस्ट, आणि प्रच्चंड गोड गाणं. शब्दही प्लॅटॉनिक.
कंडे उत्ते हे सगळ्यांना आवडण्यासारखं नाही, पण लेट मी क्वोट,
मी अक्षरश: वेड्यासारखी कोक स्टुडिओची मिळतील ती गाणी ऐकलेली आहेत. अजिबात, कुठल्याही बायसशिवाय माझं हे मत झालेलं आहे की भारतीय कोक स्टुडिओमध्ये फक्त भपकेबाजपणा/दिखाऊपणा जास्त प्रमाणात असतो. अर्थात सावन में, बन्नाडो, छन कित्थन, कजर बिन कारे इ. मास्टरपीसेस आहेतच, पण अॅव्हरेज, किंवा अक्षरशः वैतागच आणणारी तेरियां तू जाने, कट्टे, निमोली इत्यादीच जास्त आहेत. हे लोक गायचं सोडून अभिनय का जास्त करतात? बायका पुरुषांसारखं गायचा का प्रयत्न करतात? इ. प्रश्न फार मनात येतात, आणि मग मी दुसरी गाणी शोधतो.
Hope is for sissies.
छाप तिलक
यांतलं 'छाप तिलक' मलाही आवडतं. आधी फक्त आबिदाचं 'छाप तिलक' ऐकलं होतं; गाताना ती ज्या तल्लीनतेनं गाते ते बघत बसावंसं वाटतं. ऐकताना या दोन्हींतलं जास्त कोणतं आवडतं वगैरे विचारात पडले नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हरयाणवी भजन
आवाज गोड आहे, आणि भाई म्हणायची लक़ब खासच!ऐका
माझे मनोरथ पूर्ण करी देवा
http://www.aathavanitli-gani.com/Song/Majhe_Manorath_Poorna
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हेच गाणे कर्नाटकी स्टाईलमधे
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हरिभजनाविण काळ घालवू नको रे
http://www.aathavanitli-gani.com/Song/Hari_Bhajanavin_Kaal
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
उगीच चिखल कालवू नको रे
हरिभजनाविण काळ घालवू नको रे ॥१॥
दोरीच्या सापा भिवुनी भवा ।
भेटी नाही जिवाशिवा ।
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे ॥२॥
विवेकाची ठरेल ओल ।
ऐसे की बोलावे बोल ।
आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे ॥३॥
संत संगतीने उमज ।
आणुनि मनी पुरते समज ।
अनुभवावीण मान हालवू नको रे ॥४॥
सोहिरा ह्मणे ज्ञानज्योती ।
तेथ कैचि दिवस-राती ।
तयावीण नेत्रपाती हालवू नको रे ॥५॥
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
किती सुंदर भजन आहे.
किती सुंदर भजन आहे.
दळिता कांडिता तुज गाईन अनंता
http://www.aathavanitli-gani.com/Song/Dalita_Kandita
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
जिया ले गयो जी मोरा सावरिया
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हे एक अत्यंत दुर्लक्षित पण
हे एक अत्यंत दुर्लक्षित पण उच्च गाणं आहे. मदनमोहन ने कमाल केल्ये. लताबाईंनी मदनमोहन साठी स्पेशल आवाज लावून भेदभाव केलाय.
ब्रीदिंग अंडर वॉटर
खूप दिवसांपूर्वी हा मोती मिळाला. कर्ष काळे आणि अनुष्का शंकर ह्यांचा फार महान अल्बम आहे. ह्यातला पहिला ट्रॅक Burn हा टॉप फेव्हरिट. नंतर Oceanic Part 1. ज्यात रविशंकरही येऊन जातात. नीट ऐकल्यास कळतं की पूर्ण अल्बम मध्ये एकाच बंदिशीचा वेगवेगळा मुक्त विस्तार केलेला आहे. मूड सेट करायला भन्नाट गाणी.
Hope is for sissies.
१९२० च्या आसपास ग्रिअरसन नामक
१९२० च्या आसपास ग्रिअरसन नामक ब्रिटिश अधिकारी भारतभर फिरला, आणि जागोजागच्या स्थानिक बोलीभाषांचे रेकॉर्डिंग करून त्याने ते सेव्ह केले. तत्कालीन अनेक भाषांचे सँपल आयतेच ऐकता येईल, मस्त प्रकार आहे. मराठीचेही खूप प्रकार आहेत, ते सर्वही ऐकायला तितकेच भारी वाटतात.
http://dsal.uchicago.edu/lsi/Language/Indo-Aryan-southern-group
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कोक स्टुडिओ परत.
अजून एक गाणं गवसलंय. चाल, आवाज्, वाद्ये उत्तम. शब्दांचा अर्थ कळत नाही मात्र. आधी ते नेहमीप्रमाणे आजकाल माजलेल्या दिखाऊ गाण्यांसारखं वाटलं, पण कर्ष काळेबाबाने कमाल केलीए.
Hope is for sissies.
शब्द इथे आहेत.
शब्द इथे आहेत.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
धन्यवाद चिंतातुर जंतू.
शब्द तर व्हिडीओच्या माहितीतही आहेत, पण तरीही अर्थ कळत नाहीये.
Hope is for sissies.
काय कळलं नाही?
काय कळलं नाही? गीतातल्या कल्पना आणि प्रतिमा खूप पारंपरिक आहेत.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अर्थ
अर्थच नाही कळलाय गाण्याचा, म्हणजे, धृपद - 'पिया तोरे कारन बदलूं मैं चोला' , किंवा, 'दिया ना बुझा, सावरे पल छिन, काया की चुनर ओढी... ' काय म्हणायचंय कळत नाहीये. ऐकायला मात्र स्वर्गीय आहे.
Hope is for sissies.
अध्यात्मिक वाटतंय. आत्मा
अध्यात्मिक वाटतंय. आत्मा शरीररूपी चोला बदलतो Type .
हो तत्समच आहे ते. माझा तो
हो तत्समच आहे ते. माझा तो प्रांत नाही पण ह्या शास्त्रीय संगीतातल्या बंदिशींत वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक आध्यात्मिक प्रतिमा आहेत.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मस्त गाणे! अनोखे बोल सुपर्ब्
थिरकवा साहेबांनी स्वता
थिरकवा साहेबांनी स्वता गायलेली भैरवी कोणाच्या तरी खाजगी मैफीलीत्. रेकॉरडींग केलय म्हणजे त्यांचे वय ७०+ असणार्.
सांगितले नाही तर वाटेल कोणी गाण्यातल्या उस्तादानीच गायली आहे.
(No subject)
(No subject)
मस्त धागा.
मस्त धागा.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=6Pev6QX
अस्तित्वात नाही.
धिस व्हिडीओ डझ नौट एक्झिस्ट बरंका...
Hope is for sissies.
अरेच्या काल रात्री ऐकत झोप
अरेच्या काल रात्री ऐकत झोपले होते. आज काढला शिंछ्यांनी

___
कुआन यिन चा मंत्र होता १४टॅन
चिटींगे.
ऐकता ऐकता झोपण्यासारखं काहीतरी?
आता तर ऐकायचंच्च्च आहे मला. >
Hope is for sissies.
आज दुवा पाठवते.
आज दुवा पाठवते. आत्ता वेळ नाही.
१४टॅन सॉरी आत्ता आठवलं आज
१४टॅन सॉरी आत्ता आठवलं आज नक्की दुवा देते. कुआन यिन ची गाणी शोधा. कुआन यिन ही बुद्ध धर्मातील करुणेची देवी. स्त्रीरुपातील बुद्ध्.
बुद्ध हे तत्व आहे. आपण सारेजण बुद्ध आहोतच पण आपण विसरलोय वगैरे वगैरे.
तेव्हा स्त्रिया बुद्ध असू शकतात्.
तर डाटा सेट अप कंप्लीट्.
कुआन यिन चे मंत्र्/गाणि वगैरे शोधा.
ऐकलं.
एकेकाळी मेटलहेड असलेला मी सध्या एकाएकी एकदम शांत गाण्यांच्या मागे धावतोय. कुआन यिनचे मंत्र ऐकले.
खरं सांगू? फारसे आवडले नाहीत. सॉरी!
रात्री झोपण्यापूर्वी ऐकण्याच्या गाण्यांची एक खास प्लेलिस्ट आहे माझ्याकडे. त्यातील काही वानगीदाखल-
०. अ थाऊजण्ड इअर्स
ह्या गाण्याला ० क्रमांक ह्यासाठी, की 'झोपण्यापूर्वी ऐकायच्या' गाण्यांत हे गाणं त्रिकालाबाधित ध्रुवपदावर आहे. स्टिंग फार थोर कलाकार आहे. त्याचं डेझर्ट रोझ हे गाणं एकेकाळी बर्रंच गाजलं होतं.
१. आहिस्ता आहिस्ता हे गाणं, अतिशय कमीत कमी वाद्यं आणि अतिशय गोड आवाजांमुळे कायमचं लक्षात राहीलंय. स्वदेस मध्ये हे घेण्यात का आलं नाही, माहित नाही.
२. लेरा लिनची ट्रू डिटेक्टिव्ह मधली सगळीच. ह्यांबद्दल मी आधी लिहीलंय कुठेसं.
..... आणि बरीच.
त्या पार्श्वभूमीवर कुआन यिनचं संगीत फार 'रिल्याक्सींग' वाटत नाही. ते नक्कीच 'सुमधुर' आहे, पण (माझ्या मते) 'शांत' नाही.
तरीही थॅंक्स. अज्ञात कलाकारांबद्दल, एकदमच वेगळ्या जॉन्रबद्दल कळणं हे मी परमभाग्य समजतो!
Hope is for sissies.
ह्म्म्म्म! खरे आहे कुआन यिन
ह्म्म्म्म! खरे आहे कुआन यिन ची सर्व व्हर्शन्स मस्त नाहीत्. पण एक विशिष्ट मूड येतो माझा मग त्या दिवशी ॐ मणी पद्मे हुम्" हा अवलोकितेश्वरांचा मंत्र, क्वान यिन चे मंत्र लावुन, माझे बुद्धाच्या शांत मुद्रेचे अल्बम स्लाईड शो वर लावुन ऐकते. मेडिटेशन्.
____
डेसर्ट रोझ मस्त आहे ऐकले आहे.
शांत
शांत गाणं हवं असेल तर, मदनमोहन-लताचे, 'चॉंद मद्धम है, ऑंसमॉं चुप है' हे गाणं ऐका. एका वेगळ्याच लेव्हलवर जाल.
https://www.youtube.com/watch?v=abcnIgwy5Tg
मात्र, आजुबाजुला अत्यंत शांत वातावरण पाहिजे.
ही जंतुंची इतकी गर्दी जगात आहे का रास्त |
भरती विषाणुंचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त ||
काय झक्कास गाण्याची आठवण
काय झक्कास गाण्याची आठवण काढलीत राव !!!
यू मेड माय डे !!!
कंट्टाळा.
प्रतिसादाच्या प्रतिसाद दुव्यावर क्लिक करून लॉगिन केलं तर प्रतिसाद स्वतंत्र होतो, त्याच प्रतिसादाखाली येत नाही. दोनदा बिन्दू झालेयत टाकून.
Hope is for sissies.
जुने ते सोने ..
*********
उजेडात होते पुण्य - अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे - कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी- घडे लोकसेवा
उघड दार देवा आता.......
Don Williams - I'll Never Be In Love Again
झक्कास!
जरा व्यवस्थित वेळ मिळाला की तुमचा, भलिमोठ्ठी यादी असलेला तो जुना दुवा नीट पाहायचाय.
Hope is for sissies.
हा माझा चॅनल्- https://www
हा माझा चॅनल्- https://www.youtube.com/watch?v=gCxbgqyC2Wg&list=PLo4u5b2-l-fCd7jiLGLeof...
CLASSIC
https://www.youtube.com/watch?v=AXDnfm7qqZ4
आस्तिक नास्तिक लोकांनी एकमेकांच्या परंपरेचा काचून नव्हे पण निदान वरवर आदर करणं महत्वाचं वाटतं. सिंगल लोकांनी कपलचा आदर करण्याचं सौजन्य निदान दाखवावं ह्यात वावगं काही नसतंय.
किशोरीताई १९६२, ६५, ८०
गेला संपूर्ण आठवडा 'सहेला रे,' 'आज सजनसंग मिलन बनिलवा' आणि इतर अनेक श्रवणीयांमध्ये गेला. त्यात आकाशवाणीच्या सेंट्रल आर्काइव्समधलं हे लडिवाळ रत्न सापडलं. १९६२, १९६५, १९८० मधल्या किशोरीताई. हे ते ध्वनिमुद्रण.
२ मिनिटे ३५ सेकंदांपासून सुरू.
वनवास
वनवास
हे पुस्तक वाचायला जितकं आवडलंय, तितकाच ह्या ध्वनी-आवृत्तीतला आवाज इरिटेटिंग आहे.
Hope is for sissies.
भरम भाप के
हे गाणं आधीपासूनच फेवरिट आहे, परवा पियुष मिश्राबद्दल वाचताना कळलं की हे गाणंही त्यांनीच लिहिलंय म्हणून.
रिस्पेक्ट++.
जन्ग का रंग सुनेहरा समझा..
लेकिन बाद मे गहरा समझा..,..
जंग का रंग था काला रे
==================
जगातला सगळ्यात भारी टाईम पास!!
(No subject)
.
.
सिली सॉंग
I got the first kiss and she
पंडित नारायणराव व्यास यांनी
पंडित नारायणराव व्यास यांनी म्हटलेली ही बंदिश वििवध भारती वर काही वर्षांपूर्वी ऐकली होती...
‘बन में बजावत बंसी,
ए री कैसी मनहरणी,
बन में बजावत बंसी...’
यू ट्यूब वर शोधतांना त्यांच्या इतर चिजा सापडल्या, पर वरील बंदिश काही सापडली नाही. म्हणजेच ही बंदिश विविध भारती जवळच असेल...
गुरुवारी दुपारी यू ट्यूब वर सर्च करतांना त्यांची दूसरी बंदिश सापडली
-‘बलमा बहार आई...’
त्यांच्याच इतर चिजां मधे एक दिसली
ये मन हमीर...
बंदिश कळलीच नाही...एेकली नाही. काम हाेतं, राहून गेली.
रात्री घरी पोचलो तर अडीच वाजले होते. इयरफोन लावून यू ट्यूब वर जुन्या आठवणीतील एक चीज शोधत होतो. ती म्हणजे पं. नारायण राव व्यास आणि पं. विनायकर राव पटवर्धन यांची जुगलबंदी...
बन में चरावत गैंया,
लाल मुकुट, सिर मोर पंख धरे,
बन में चरावत गैंया...
चीज काही मिळाली नाही. पण विनायकराव पटवर्धन यांची एक तासाची रिकार्डिंग दिसली. राग होते पूरिया, सागर आणि एक भजन...
माहिती दिली होती 1970 मधे कोलकाताला झालेल्या सुरेश संगीत महोत्सवातील ही रिकार्डिंग आहे...सोबत सारंगी वर आहेत पंडित गोपाल मिश्र. तबला संगतकार आहेत कुणी पंडित शांताप्रसाद यांंचे पुत्र.
उत्सुकते मुळे ऐकली...
रात्री अडीच वाजता घरचे सगळे ढाराढूर झोपलेले होते...
मध्य लय मधे तबल्याशी सवाल-जवाब सुरू झाले आणि ताडकन उठून बसलो....
वाट्स अप वर काही वीडियो मधे जाकिर हुसैनला तबल्यावर हु ब हू बोल काढतांना बघितलंय....
तर या ‘पूरिया’ मधे सारंगी आणि तबल्या सोबत विनायकारावांचे सवाल-जवाब अप्रतिम आहेत...
‘पूरिया’ मधील तराना मधे अस्थायी 11 आवर्तनांची अाहे. ही सगळी माहिती गाणं म्हणतांना विनायकराव स्वत:च देतात...
रागों का समूह...
सागर बद्दल त्यांनी सांगितलं-रागों के समूह को राग ‘सागर‘ कहते हैं। इसकी कविता ऐसी है-
अस्थायी
ये मन है मीर
छाया परे श्याम की
अंतरा
चहुं देश में होवे कल्याण
हर दरबार में कहावे नायकी
इस कविता के अस्थायी में चार राग (यमन, हमीर, ) हैं और अंतरे में चार राग (देस, कल्याण, दरबारी व नायकी कानडा) हैं। मग ते चीज गाऊन दाखवतात...
रागमाला ऐेकलेली होती...
सागर हा प्रकार मी पहिल्यांदाच ऐकला.
---------
रवींद्र दत्तात्रय तेलंग
विनायकराव पटवर्धन
रागसागर म्हणजेच रागमाला. रागसागर हे विनायकरावांनी रागमालेला दिलेलं नाव आहे.
'बलमा बहार आयी' गौड मल्हार आहे. चिजेची अक्षरं अशी आहेत -
स्थायी - बलमा बहार आयी, दादुर मोर पपीहा पिया पी बोले घन छाये
अंतरा - निशि अंधियारी दामिनी डराये कोयल शबद सुनाये
बापूराव पलुसकरांची आकाशवाणीची ध्वनिमुद्रिका आहे ती ऐकून पहा.
'बन में चरावत गैंया' मालगुंजी मध्ये आहे. त्यातला तराणापण सुंदर आहे. पं. विनायकराव पटवर्धन आणि पं. नारायणराव व्यास यांची जुगलबंदी हा एक लै भारी आयटम होता असे असं ऐकीवात आहे. विनयाकबुवांच्या चरित्रात बिहारमध्ये (नक्की जागा आठवत नाही, बघून सांगतो) एका ठिकाणी खास यजमानांच्या आग्रहास्तव विनायकराव, नारायणराव आणि ओंकारनाथ ठाकुर असं तिघांचं सहगायन झाल्याचा उल्लेख आहे. सुमारे दीड तास तिघांनी मिळून बागेश्री रंगवला असे लिहिलेले आहे. ती मैफिल कशी असेल या कल्पनेनेच अंगावर रोमांच उभे राहातात.
विनायकराव आणि नारायणरावांच्या जुगलबंदीचा एक फोटो

असे जुने फोटो बघायला मजा
असे जुने फोटो बघायला मजा येते भटोबा.
कालच तुनळी वर एक फोटो बघितला. मालिनीबाई गातायत, पुल पेटिवर आणि गोविंदराव पटवर्धन चक्क तबल्यावर्.
छान माहिती...
'बन में चरावत गैंया' मालगुंजी मध्ये आहे....
बरोब्बर...
चीज मजजवळ आहे...तराना देखील...
पण तो मी यू नळीवर शोधत होताे...नाही दिसला...
विद्याधर व्यास यांचा आमच्या इथे गायनाचा कार्यक्रम होता...इंटरवेल मधे माझा एक तबलची मित्र ग्रीन रुम मधे त्यांना भेटला. तो म्हणाला आकाशवाणीवरील संगीताच्या तुमच्या कार्यक्रमात मालगुजी सुुरू असतांना मला झोप लागली...खूप सुंदर प्रस्तुति होती...
व्यासजींनी काय केलं असेल...
इंटर नंतर पहिलाच राग घेतला मालगुजी...त्यांत दोन बंदिशी आणि तराना सादर केला...
या दोघांचा फोटो इंग्रजी दैनिकात (बहुधा टाइम्स होता) मधे बघितलेला आठवतो...कटिंग संग्रहात आहे माझ्या....
ते काही असो...गायन अफलातून होतं या तिघांचं...विनायकराव पटवर्धन, नारायणराव व्यास आणि पं. ओंकारनाथ ठाकुर...
रवींद्र दत्तात्रय तेलंग
बाहुबली पार्ट २ मधील मला स
बाहुबली पार्ट २ मधील मला सर्वाधिक आवडलेले गाणे हे. तेलुगुमध्येच गाणी ऐकावीत, हिंदी डब्ड गाण्यांच्या वाटेस जाऊ नये. वरिजिनल ते वरिजिनलच. त्यातला तो प्राकृतस्टाईल "हेsssssसाss रुद्रस्साss हे सरवत्रसमुद्रस्साss" घोष मला फार म्हणजे फारच आवडला. पिच्चरमध्ये बरोब्बर प्ले होत राहतो. व्हायोलिनादिंचा यूजही मस्तच. थोडा चिनीस्टाईल वाटतो अधूनमधून.
https://www.youtube.com/watch?v=ROAC01oYW4I
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पुन्हा एकदा मोत्सार्ट चे
पुन्हा एकदा मोत्सार्ट चे निवडक राँडो ज . आज मजा आएगा .
मझा आ गया
मझा आ गया
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
तू तलम अग्नीची पात ....
http://www.aathavanitli-gani.com/Song/Tu_Talam_Agnichi_Paat
शब्द फार उत्कट आहेत्.
कवि - मल्लिका अमर शेख्
___________
http://www.aathavanitli-gani.com/Song/Valan_Vatatalya
ना धों महानोर्. सुंदर शब्द.
__________________--
शंकर रमाणी तर माझे आवडते गीतकार आहेतच्.
ओहोहो!!
तारुण्यसुलभ हा शब्द
तारुण्यसुलभ हा शब्द कितीही क्लिशे वाटला तरी हे गाणे म्हणजे त्याचा मूर्तिमंत आविष्कार आहे. अतिशय सरळसाधं आणि म्हणूनच एकदम भिडणारं गाणं. अंमळ पौगंडसुलभ म्हटलं तरी चालेल, पण खूप भारी आहे, उगीच नाय त्याला नऊ कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज!
https://www.youtube.com/watch?v=PoaT6WXUV_M
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हे एक डच लव्ह सॉङग, म
हे एक डच लव्ह सॉङग, मस्त आहे.
https://www.youtube.com/watch?v=4aAyblVa1po
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बॅक टू हमारे जमानेके ....
बॅक टू हमारे जमानेके .... ऐकतोय uptown girl .... बिली जोएल ... 1983 ...
पारंपरिक स्कॉटिश गाणं
पारंपरिक स्कॉटिश गाणं
यातला चार्ली म्हणजे स्कॉटिशांचा 'बॉनी प्रिन्स चार्ली' याची श्टुरी लय मस्त आहे.
यूट्यूब व्हिडियोच्या तुलनेत एडिंबराच्या रस्त्यावर हे गाणं म्हणणाऱ्या बाईचा आवाज जरा चिरका होता, पण व्हिडियोमध्ये जिथे व्हायोलिन आहे त्याऐवजी बॅगपाईप वाजवत होते. मस्त अनुभव.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
ही असली स्कॉटिश आणि आयरिश
ही असली स्कॉटिश आणि आयरिश गाणी म्हणजे जगातला भारी प्रकार असतो राव, असल्या गाण्यांचा मी गरगरां फिरणारा विंड टनेलातला पंखा आहे. टायटॅनिक पिच्चरमध्ये अशा संगीताशी प्रथम परिचय झाला तेव्हापासून केल्टिक गाणे म्हटले की कद्धी चुकवत नै ऐकायचे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मखमली आवाजाच्या
मखमली आवाजाच्या जादूगाराच्या आवाजातील हे गाणे -
.
.

संगीतही असे आहे की पाऊस पडतोय असे वाटते.
__________
अर्थात सॅड गाण्यांत त्यांचा आवाज कमालीचा निखरतो. रत्नाला कोंदण लाभते. That quiver in voice....!!!
.
______________________
यार वेखो रंग लाया है / मन कुंतो मौला
सनम मारवीने गायलेले 'यार वेखो रंग लाया है' उत्तम आहे.. सुलतान बाहू आणि इतर दोन सूफी संतांच्या रचना एकत्रित गायल्या आहेत .
https://www.youtube.com/watch?v=SiIu-COuHKw
साउंडक्लाऊडवर शेर अली मेहेर अली ग्रुपने गायलेले 'मन कुंतो मौला'चे वर्जनही खूपच सुंदर आहे :
https://soundcloud.com/house-of-music-1/man-kunto-maula-by-sher-ali
The Lost Thumris of PAKEEZAH (1972)
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
फार आवड्ले.
फार आवड्ले.
मस्त धागा!
काल हे ऐकले, आवडले! Saptasur
(No subject)
.
.
.
.
मोत्सार्ट चा त्यातल्या त्यात
मोत्सार्ट चा त्यातल्या त्यात आपल्याकडे थोडाफार माहित असणारा रॉंडो . Alla turca .. सगळ्यांनी कुठंतरी ऐकलेलं असतो.
परत ऐकतोय शेकडोव्यांदा ...
https://www.youtube.com/watch?v=quxTnEEETbo
.
.
.
विश्वाचा विश्राम रे ... स्वामी माझा राम रे ... आनंदाचे धाम त्याचे .....
.
.
.
चांगलय ... (आधी ऐकले न
चांगलय ... (आधी ऐकले नव्हते )
कुठल्यातरी खाजगी कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग वाटते आहे हे ..
*********
उजेडात होते पुण्य - अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे - कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी- घडे लोकसेवा
उघड दार देवा आता.......
अनुराधा
संगीतकार - पंडित रविशंकर
*********
उजेडात होते पुण्य - अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे - कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी- घडे लोकसेवा
उघड दार देवा आता.......
झकास गाणं आहे. ऋषिदांचा
झकास गाणं आहे. ऋषिदांचा पिक्चर आहे असं वाचल्याचं आठवतंय्. "कैसे दिन बीते कैसी बीती रतियां" सुद्धा मस्त आहे. त्यात ल्या दुसऱ्या कडव्यात लताबाई जरा चिरकतात्.
"हाये रे वो दिन क्यों ना आये" पण झक्कास आहे. लताबाईंचा खासमखास आवाज.
.
.
.
.
.
जाओ रे जोगी तुम जाओ रे
.
.
आम्रपाली मधलं "नील गगन की छांव्" पण मस्त आहे.
.
पं. वेंकटेश कुमार - जोग !
(No subject)
हा जोकर Totally Awesome दिस
हा जोकर Totally Awesome दिसतो.
हा वरचा जोकर वाईट अर्थाने
हा वरचा जोकर वाईट अर्थाने जोकर आहे. नुस्ता कार्टून साला. नायतर आमचा हीथ लेजर बघा. एका सीनमध्ये एक सहकलाकार याचा आवेश बघून आपल्या लायनी विसरला.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बाप रे!!!
बाप रे!!!
हीथ लीजर वरची यावर्षीची
हीथ लीजर वरची यावर्षीची
I Am Heath Ledger ही फिल्म पहा. एकच नंबर आहे.
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
धन्यवाद, नक्की पाहतो.
धन्यवाद, नक्की पाहतो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
छान आहे suicide squad
छान आहे suicide squad
तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी
त्या जोकरकरता पहायचाय.
त्या जोकरकरता पहायचाय.
एम एस सुब्बुलक्ष्मी यांचे म
एम एस सुब्बुलक्ष्मी यांचे मधुराष्टकम आणि व्यंकटेश स्तोत्र..
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
व्यंकटेश सुप्रभातम्?
व्यंकटेश सुप्रभातम्? फार मधुर आहे ते.
मला काशी विश्वनाथ सुप्रभातमही आवडतं.
________
भीमसेन जोशींचे - भाग्यदा लक्ष्मी बारम्मा व राजस सुंदर मदनाचा पुतळा - ही देखील ऐका पुंबा.
हो सकाळ कसली प्रफुल्लीत
हो सकाळ कसली प्रफुल्लीत होऊन जाते अम्मांच्या आवाजातील व्यंव्यंकटेश स्तोत्र ऐकले की. आज काल मधुराष्टकावर प्रेम जडले आहे. फार फार मधुर्. नक्की ऐका. 'काशी विश्वनाथ सुप्रभातम' ऐकतो आज.
ऐकलीयेत मामी. फार फार सुंदर आहेत दोन्हीही भजने. 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' हे युट्युबवर 'नवदुर्गा' नावाच्या छोटुकल्या मुलींच्या ग्रुपमधील एका गोड पोरीनी गायले आहे. अक्षरश्: स्वर्गीय. नक्की ऐका. त्याच ग्रुपचे 'अयगिरी नंदिनी' हे महिषासुरमर्दिनी स्तोत्र सुद्धा अफाट सुंदर आहे.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
(No subject)
अधीर मन...
पावसाळ्याच्या सुरुवातीला हे मधूर गाणं ऐकायला हरकत नाही. चित्रपट, निळकंठ मास्तर.
https://m.youtube.com/watch?v=JLf2YK4Z_oc
तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी
अधीर मन...
पावसाळ्याच्या सुरुवातीला हे मधूर गाणं ऐकायला हरकत नाही. चित्रपट, निळकंठ मास्तर.
https://m.youtube.com/watch?v=JLf2YK4Z_oc
तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी
अधीर मन...
पावसाळ्याच्या सुरुवातीला हे मधूर गाणं ऐकायला हरकत नाही. चित्रपट, निळकंठ मास्तर.
https://m.youtube.com/watch?v=JLf2YK4Z_oc
तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी