स्त्री-मुक्ती: एक थोतांड

स्त्री आणि पुरुष हे भेद अनादि काळापासून आहेत. कित्येक सहस्रकांपूर्वी मनू हा जो एक थोर तत्त्वज्ञ होऊन गेला, त्याने ह्या विषयाचा सांगोपांग विचार करून ‘मनुस्मृती’ नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला आहे. त्यात त्याने ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति’ असा अत्यंत मौलिक विचार मांडला आहे. आधुनिक काळात मात्र काही स्त्रिया पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाच्या आहारी जाऊन मनूबद्दल गैरसमज करून घेऊ लागल्या आहेत. ‘स्त्री-मुक्ती’ हे त्यांनीच आणलेलं थोतांड आहे. स्त्री ही कधीच मुक्त असू शकत नसल्यामुळे ‘स्त्री-मुक्ती’ हा वदतोव्याघात आहे. केसांच्या झिंज्या करून हिंडणाऱ्या अशा काही स्त्रियांनी मनुस्मृतीच्या प्रती आकसाने जाळल्याच्या बातम्या कधीकधी ऐकायला मिळतात. पण मनुस्मृती जाळली तरी तिच्यात सांगितलेला विचार चिरंतन राहील.


स्पष्टीकरण

पहिल्या वाक्यातल्या ‘स्त्री’ ह्या शब्दाचा अर्थ एक्सेक्स गुणसूत्रं वागवणारी व्यक्ती असा घ्यायचा नाही, तर ‘स्त्री’ ही एक वृत्ती आहे. ‘गुलामगिरीत सुखी राहणारी, स्वातंत्र्याबद्दल आकस किंवा अविश्वास बाळगणारी व्यक्ती’ म्हणजे ‘स्त्री’, मग ती कुठल्याही जीवशास्त्रीय लिंगाची असो. त्याचप्रमाणे ‘पुरुष’ ह्या शब्दाचा अर्थ एक्स्वाय गुणसूत्रं वागवणारी व्यक्ती असा घ्यायचा नाही, तर ‘पुरुष’ ही एक वृत्ती आहे. ‘स्वातंत्र्य हे सर्वोच्च मूल्य समजणारी व्यक्ती’ म्हणजे ‘पुरुष’, मग ती कुठल्याही जीवशास्त्रीय लिंगाची असो. ‘अनादि’ याचा अर्थ शब्दश: म्हणजे ‘प्रारंभ नसलेला’ असा घ्यायचा नाही, तर ‘बराच जुना’ असा घ्यायचा.

दुसऱ्या वाक्यातल्या ‘कित्येक’ आणि ‘मनू’ यांचा शब्दश: अर्थ घ्यायचा नाही. मनू खरंच होऊन गेला की नाही याबद्दल शंका आहे, आणि झालाच असेल तर त्याला दोनतीनच सहस्रकं झाली असणार, ‘कित्येक’ नव्हे. शिवाय ग्रंथ मौखिक परंपरेने चालत आलेला असल्यामुळे ‘लिहिला’ चाही अर्थ शब्दश: घ्यायचा नाही. ‘संस्कृत’ याचा अर्थ ‘संस्कृत भाषेतला’ असा घ्यायचा, cultured असा घ्यायचा नाही.

एवढं झाल्यावर ‘ज्या व्यक्तीला स्वातंत्र्य नको आहे ती त्याला अपात्र आहे’ इतका सरळ अर्थ तिसऱ्या वाक्यात आहे. जिला स्वातंत्र्य नको आहे तिला मारून मुटकून कशाला द्यायचं? ज्या व्यक्तीला बेसबॉल आवडत नाही ती बॅसबॉल गेमचं फुकट तिकिट घ्यायला अपात्र असते तसंच ते आहे. विचार मौलिक का तर तो tautologous आहे म्हणून. ‘Tautology’ ही लॉजिकमधली एक मौलिक संकल्पना आहे.

चौथ्या वाक्यातल्या ‘स्त्रिया’ चा अर्थ एक्सेक्स गुणसूत्रं वागवणारी व्यक्ती असा घ्यायचा. (हा अर्थ पहिल्या वाक्याशी विसंगत वाटेल, पण तसा तो नाही. एकच ध्वनिसमुच्चय दोन अर्थांनी वापरायला परवानगी आहे. उदा. बुद्धिबळातला check आणि अमेरिकेतल्या बॅँकेतला check.) आता त्यांचा मनूबद्दल गैरसमज झाला आहे हे उघड आहे, कारण त्या स्त्रिया ‘स्त्री’ या शब्दाचा चुकीचा अर्थ लावताहेत. इथे ‘पाश्चिमात्य’ याचा अर्थ शब्दश: घ्यायचा नाही, कारण हा विचार युरोपात जन्माला आला असल्यामुळे अमेरिकेकडून बघितलं तर तो पौर्वात्य आहे. आता पुढची दोन वाक्यं स्पष्ट आहेत. ‘स्त्री’ याच्या पहिल्या वाक्यातल्या अर्थात ‘जिला मुक्ती नको आहे अशी व्यक्ती’ हे अंतर्भूतच असल्यामुळे ‘स्त्री-मुक्ती’ हा उघडच वदतोव्याघात आहे. इथे ‘वदतोव्याघात’चा अर्थ शब्दश: घ्यायचा. ‘थोतांड’ ला धार्मिक संदर्भ आहे, तर ‘स्त्री-मुक्ती’ हा विचार (जो काही असेल तो) धर्माशी थेट संबंधित नाही. तेव्हा ‘थोतांड’ चा अर्थ शब्दश: घ्यायचा नाही.

‘केसांच्या झिंजा’ याचा शब्दश: अर्थ घ्यायचा नाही, कारण अशा काही स्त्रियांचा बॉयकटसुद्धा असतो. झालंच तर ‘ऐकायला मिळतात’ याचाही अर्थ शब्दश: घ्यायचा नाही, कारण मला बातम्या ऐकण्यापेक्षा वाचायला आवडतात. शेवटच्या वाक्यातल्या ‘चिरंतन’ चा शब्दश: अर्थ घ्यायचा नाही, कारण सूर्याचा सुपरनोव्हा की व्हाइट ड्वार्फ की काय ते झाल्यावर पृथ्वीवरचं सगळं मनुस्मृतीसकट जळूनच जाणार आहे.

वरची ‘सैद्धान्तिक मांडणी’ मी माझ्या इच्छेने केलेली आहे. तुम्हाला हवी तर दुसरी करा, पण माझ्या मांडणीवर आक्षेप घेऊ नका. इथे ‘दुसरी’ चा अर्थ शब्दश: घ्यायचा नाही, तर ‘वेगळी’ असा घ्यायचा.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

लेखातलं काय घ्यायचं कसं समजायचं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेरे को भी सेम क्वेश्चन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजुन सावरतोय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

ROFL
मी म्हटलं ऐसीवर असा लेख टाकण्याची जुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्त कोणा पराक्रमी पुरुषाने केली असावी आणि आता काय होणार बिचार्‍याचं तवर याचा अर्थ असा अन त्याचा अर्थ तसा असे कळले व जीव भांड्यात पडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्त्रीयांना गाडी चालवता येत नाही या विधानातदेखील स्त्री हा शब्द गाडी न चालवता येणार्‍या लोकांसाठी वापरलेला आहे काय? त्याचा आणि क्ष-क्ष गुणसुत्राचा संबंध असेलच असं नाही. बरोबर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

२०१४ सालाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मी फेसबुकवर स्वानुभव लिहिला होता, तो पाहा -

आज मला स्त्री-पुरुषांच्या ब्यूटी रेजीमबद्दल नवी माहिती मिळाली.

आज मला दोन दुकानांमध्ये जाऊन काही वाणसामान आणणं क्रमप्राप्त होतं. सहसा हे काम मी नवऱ्याशिवाय करत नाही. तो नसेल तर गाडी कोण चालवणार? हे बाईमाणसांचं काम नाही. बायकांनी गाडी चालवली की घोळ होणारच. तसंच झालं.

पहिल्या दुकानाच्या जवळ पोहोचते तर माझ्या पुढच्या गाडीने डावा दिवा लावला. मी सुमडीत ब्रेक मारून गाडी डाव्या लेनमध्ये जायची वाट बघत होते. मनात राग आलाच होता, "टवळे, इथे रस्ता उजवीकडे वळायची वेळ आली तरी काय डावीकडचा दिवा दाखवतेस?" गाडी उजवीकडे वळली. गाडीचालकाला मोठी लांब दाढी. स्त्रीवाद बोकाळल्यापासून या बायका डोक्यावरचे केस कापतील पण चांगली फूटभर लांब दाढी वाढवतील.

दुकानातलं काम झालं. निघाले. सिग्नलला थांबले होते. माझ्या उजव्या बाजूच्या लेनमध्ये पुढे एक गाडी होती. ती लेन फक्त सरळ जाण्यासाठीच आहे. तरीही ती गाडी डावीकडे वळली. वळली तर वळली, मी आणि माझ्या पुढच्या गाडीला त्रास न देता डावीकडे आली. इतरांचा एवढा विचार करणारा चालक नक्की पुरुषच असणार. चेहेरा दिसला नाही, पण गुळगुळीत हात दिसला. पुरुषही हातांचं वॅक्सिंग/शेव्हींग करू शकतात की. मेट्रोसेक्शुअालिटी म्हणजे काय माहीत नाही का?

घरी येण्यासाठी मग मोठ्या रस्त्यावर आले. साधारण ५५-६० मैल प्रतितास असा वेग. एक बिच्चारा पुरुष एक मोठा ट्रेलर चालवत होता. केवढा मोठा ट्रेलर होता, आणि किती ते वाईट डिझाईन. बाईने केलं असणार. तो ट्रक लेनमध्ये ठेवायला किती त्रास होत होता बिचाऱ्याला. आणखी पुढे आल्यावर मागून दुसरा ट्रक आला. हा ट्रक तसा स्टँडर्ड डिझाईनचाच. तो ट्रक तीन वेळा माझ्या लेनमध्ये आला; मी घाबरून कचकून ब्रेक मारला; लेनमध्ये दुसऱ्या बाजूला मला जायला लागलं आणि काय न् काय. या बाईने पण दाढी केली नव्हती. स्त्रीवादाचे दुष्परिणाम.

आजकालच्या बायका दाढीच करत नाहीत, अशी तक्रार आता फेसबुकावर करावी असा विचार करत मी दुसऱ्या दुकानातून बाहेर पडत होते. हा नेहमीचा रस्ता. दुकानातून गाडी बाहेर काढण्यासाठी उभी होते, तर एक काळीशार गाडी मला कट् मारल्यासारखी भस्सकन दुकानाच्या आवारात शिरली. माझी गाडी दोन इंच पुढे असती तरी कल्याण झालं असतं. एवढं अचूक मोजमाप म्हणजे चालवणारा पुरुषच असणार. मला काही ते दिसलं नाही, काचा सगळ्या काळ्या होत्या. एखाद्या बाईला, टळटळीत उन्हात त्या गाडीच्या आतमध्ये काळे धंदे चालवता येतील अश्श्या काळ्या काचा होता.

आजच्या अनुभवामुळे कानाला खडा. मी नाही बै पुरुषांच्या ड्रायव्हींगला नावं ठेवणार. स्त्रीवादामुळे या बाया एकतर दाढ्या फूटफूट लांब वाढवतात आणि वर गाडी नीट चालवत नाहीत.

काय? मी आरडाओरडा केला का? नाही हो. म्हणजे मी पण गरीब बिच्चारा पुरुष आहे? असेन ब्वॉ!

---

गेल्या महिन्यातला अनुभव. मी आता गाडी चालवत नाही. नवऱ्याला वेळ नव्हता म्हणून एका मित्राबरोबर दुकानात गेले होते. त्याचाही असाच दावा आहे की बायकांना गाडी चालवता येत नाही. तो पुरुष आहे, म्हणजे तो म्हणतो ते खरंच असणार.

तर दुकानातून परत निघालो; त्यानं गाडी पार्किंगमधून बाहेर काढायला घेतली. मध्ये यायला-जायला रस्ता आणि दोन बाजूंना पार्किंग. अशा पार्किंगमधून बाहेर पडताना, गाडी नुकती रिव्हर्स घेऊन, हा मित्र रस्त्याच्या डाव्या बाजूला होता. (अमेरिकेत उजव्या बाजूनं गाड्या चालवतात.) समोरून दुसरी गाडी आली. दोन मांजर-मैत्रिणी समोरासमोर आल्या की कशा एकमेकींच्या नाकाला नाक लावतात, तशी त्यानं त्याची गाडी मित्राच्या गाडीच्या जवळ आणली. मित्रानं गाडी आणखी मागे घातली, पण रस्त्याच्या डाव्या बाजूलाच. तर समोरची गाडी आणखी नाकाशी आली. मग त्यानं गाडी आणखी मागे आणि रस्त्याच्या उजव्या बाजूला नेली. मग त्याला तिथून गाडी बाहेर काढता आली. निघता-निघता आम्ही बघितलंच. त्याला मी म्हटलं, "ही बाई स्त्रीवादामुळे फार माजल्ये." तो म्हणाला, "चल गं, तो पुरुष होता." मग मी काय त्याला आव्हान देणार, "असेल बुवा, तू म्हणतोयस तर तो पुरुषच असेल. पण मी सांगते तुला, त्यानं सेक्स-रीअसाईनमेंट सर्जरी करून घेतलेली असणार. त्याची गुणसूत्रं एक्सेक्सच असणार."

एवढा महत्त्वाचा विषय सोडून माझा मित्र "ऑस्टीनातले ड्रायव्हर्स फार वाईट झाल्येत. हा इसम नक्की न्यू इंग्लंड भागातून इथे आला असणार" वगैरे बडबडत होता. तो, एक पुरुष, म्हणत होता म्हणजे खरंच असणार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमच्या अनुभवकथनात इस्लामोफोबिया दिसला. निषेध!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अय्या, किती गोड!

(फक्त माझ्या सोयीनं शब्दांचा अर्थ शब्दशः घेऊ नये.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेखक मूर्ख आहे.
लेखकचा अर्थ या लेखाचा लेखक असा घ्यायचा नाही तर असा विचार करणारा कोणिही.. मूर्ख चा अर्थ मूर्ख असा घ्यायचा नाही.. दुसरा किंवा वेगळा काहिही घ्या..
माझ्या प्रतिसादावर आक्षेप घेउ नका..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'टारगेट' प्रतिक्रीया नंतर वाचली..
आता वरची प्रतिक्रीया त्या लेखाला/प्रतिक्रीयेला लागू करावी.. पॉइंटर टू पॉइंटर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तय... पॉइंटर कशासाठी आहे ते लगेच कळतय ते जास्त चांगले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लय भारी!

शब्दशः अर्थ न घ्यायच्या वळवळीत आपलं स्वागत आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

LOL
--------------------
I have progressed quite a bit. I understood what Jaideep is saying. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बाबौ!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खल्लास. एकही मारा पर क्या शॉल्लीट मारा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आक्षेपार्ह लिखाण. बॅन केलं जाईल.

(फक्त इथे 'आक्षेपार्ह'चा अर्थ शब्दशः घेऊ नये आणि 'बॅन'चाही अर्थ शब्दशः घेऊ नये.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

शब्दश: अर्थ घ्यायचा नाहीअसे कोण म्हणाले? मोदी? जैटली? फडणवीस?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

या लेखातलं बरचसं शब्दशः घ्यायचं नाही हे कळलं. त्याचप्रमाणे आयडी पण शब्दशः घ्यायची नाहीत हे लॉजिक बरोबर आहे का ?
मनू हे व्यक्तिमत्व सहस्त्र वर्षांपूर्वी होऊन गेलं तर तो मनू की ती मनु ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. आपल्याला सोयीस्कर अर्थ काढले की कुठलाही शब्द जहाल विषारी ते मवाळ अमृतीपर्यंत नेता येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज वल्ड हिजाब डे आहे. काय प्लान्स लोकांचे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

डुप्लिकेट आयडी काढायचा आणि वापरायचा. शब्दशः.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हिजाब प्राईड परेड काढा म्हणावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तशी निघणारच आहे बॅटोबा. उद्या ऐसीवर फोटो बघायला मिळतील आपल्याला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बढीया! राजेश घासकडवींनी ब्राह्मणी शब्दाचा अर्थ सरळ न घेता तो "प्रस्थापित" अर्थ घ्यायचा म्हटले ही प्रेरणा आहे का?
=======
गंमत म्हणून पाहिलं किंवा नाही तरी लेख वाखाणण्याइतका कंसिस्टंट आणि अर्थपूर्ण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

थोतांड शब्द वाचला की मला फलज्योतिष एक महाथोतांड पुस्तकाची आठवण येते http://faljyotishachikitsa.blogspot.in/2013/10/blog-post_2718.html

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आपल्या सुरुवातीच्या परिच्छेदाबद्दल काय लिहावे? प्रत्येक वाक्य इतके हिडीस लिहिण्यास विशेष टॅलेन्ट लागतो! "स्त्री" म्हणजे स्वातंत्र्य नको असणारी प्रवृत्ती"! क्या बात है!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

स्त्री मुक्ती म्हणजे नक्की काय हे मुक्त होण्याची इच्छा असणाऱ्या स्त्रियांना पण माहीत नाही.
स्त्री मुक्ती साठी ज्या स्त्रिया पुढाकार घेत आहेत त्या एक तर अतिशय कमी बौद्धिक कुवतीच्या आहेत किंवा ठराविक आर्थिक वर्गाचे ,ठराविक लोकांचे हित जपण्यसाठी साठी प्रयत्न करत आहेत.
त्यांच्या उचापती मुळे स्त्री मुक्त ,स्वतंत्र,सक्षम कधीच होणार नाही उलट पुरुषांचे खेळणे नक्कीच होईल..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी4
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्त्री मुक्ती म्हणजे नक्की काय हे मुक्त होण्याची इच्छा असणाऱ्या स्त्रियांना पण माहीत नाही.
स्त्री मुक्ती साठी ज्या स्त्रिया पुढाकार घेत आहेत त्या एक तर अतिशय कमी बौद्धिक कुवतीच्या आहेत किंवा ठराविक आर्थिक वर्गाचे ,ठराविक लोकांचे हित जपण्यसाठी साठी प्रयत्न करत आहेत.
त्यांच्या उचापती मुळे स्त्री मुक्त ,स्वतंत्र,सक्षम कधीच होणार नाही उलट पुरुषांचे खेळणे नक्कीच होईल..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

तुमच्या या सुंदर बिनडोकपणाचे रहस्य काय?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

स्त्रीचे सगळे पाश सोडून तिला मुक्त केले पाहिजे. पण कोणती स्त्री ही ज्याने त्याने ठरवावी.
स्त्रीला सहन खूप करावे लागते म्हणून तीने केलेल्या सगळ्या गोष्टी सहन केल्याच पाहिजेत.
स्त्रीला पुरुषप्रधान समाजातून मुक्ती मिळायलाच पाहिजे आपापल्या घरापुरती.
स्त्रीने वाट्टेल तसे स्वच्छंदपणे जगावे पण आम्ही सांगू त्याच नियमाप्रमाणे.
Wink Biggrin (^^)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

नुकतीच एक बातमी वाचली.
त्याबद्दलचे ट्विट.

म्हणजे स्त्रीयांनी स्वतंत्र झाले पाहिजे धर्माच्या नियमानुसार.
म्हणजे धर्माचा अतिरेक जेवढा जास्त तेवढी स्त्रियांची गुलामी जास्तच.
सद्सद्विवेक आणि बुद्धीमत्ता भ्रष्ट होण्याचे प्रमाण त्याहून जास्त. त्यानंतर
स्वयंघोषित सोशल रिफॉर्मरांचे मौनव्रत सुरू.
अवघड आहे सगळे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू