आत्ताच ट्रम्प यांनी सत्ताग्रहण केले!

आत्ताच ट्रम्प यांनी सत्ताग्रहण केले आहे. त्यानंतरच्या पहिल्याच भाषणात त्यांनी आपल्या निवडणूक मोहिमेतल्या भूमिकांपासून जराही मागे न हटण्याचे वचन दिले आहे . कोणत्याही रिपब्लिकन प्रेसिडेंटपेक्षा त्यांचे भाषण पूर्ण वेगळे होते. त्याला "इंपिरियल प्रेसिडेन्सी " -रिपब्लिकनांचा आवडता विषय- याचा गंधही नव्हता. इस्लामी दहशतवाद पूर्ण निपटून काढणे, अमेरिकेतले इन्फ्रा-स्ट्रक्चर सुधारणे ( १ ट्रिलियन डॉलर्स !), अमेरिकन नोकऱ्या परत आणणे या सर्वाला पाठिंबा नाकारण्याचे कारण नाही . काँझर्व्हेटिव्ह सोशल अजेंड्यामध्ये (गर्भपातावर नियंत्रणे, समलिंगी विवाहावर बंदी, प्लान्ड पेरेंटहूड संघटन बंद करणे ) याला एक लिबरल न्यूयॉर्कर या नात्याने त्यांचा मनापासून पाठिंबा असणे अवघड आहे . समुद्रात तेल उत्खनन कारण्यावरची बंदी ते उठविणार आहेत, ज्याने पर्यावरणाचा प्रचंड नाश होईल . लॅटिन अमेरिकेतून आलेल्या "बेकायदेशीर" कामगारांना परत हद्दपार करायला त्यांच्याच एम्प्लॉयर्स कडून मोठा विरोध होईल, जे मुख्यतः रिपब्लिकन पार्टीचे आहेत. या हद्दपारीला, काँझर्व्हेटिव्ह सोशल अजेंडा आणि पर्यावरण या विषयांवर ट्रम्प यांना कडोविकडीचा विरोध केला पाहिजे . त्यासगळ्यात मी यथाशक्ती सामील असेन .

field_vote: 
0
No votes yet

काँझर्व्हेटिव्ह सोशल अजेंड्यामध्ये (गर्भपातावर नियंत्रणे, समलिंगी विवाहावर बंदी, प्लान्ड पेरेंटहूड संघटन बंद करणे ) याला एक लिबरल न्यूयॉर्कर या नात्याने त्यांचा मनापासून पाठिंबा असणे अवघड आहे .

(१) प्लान्ड पेरेंटहूड संघटन अस्तित्वात अवश्य असावे. पण करदात्यांवर त्याच्या खर्चाचा भार टाकू नये. तेव्हा फेडरल बजेट मधून एक पै ही त्यांना देऊ नये. सेवा वापरण्याची फी + ऐच्छिक देणगीमधूनच त्याचा कारभार चालवावा.

(२) विवाहाच्या मुद्द्यावर सरकारचे अधिकार काढून घ्यावेत. जास्तीतजास्त नोंदणी ची जबाबदारी सरकारवर ठेवावी.

(३) गर्भपातावर नियंत्रणे नसावीत : व्यक्तीपेक्षा सरकारला नैतिकता फार कळते अशा भ्रमात सरकारने व सरकारवाद्यांनी राहू नये.

(४) लिबरल न्यूयॉर्कर व लिबरल कॅलिफोर्नियन्स या दोघांना प्रेमपूर्वक शाल व श्रीफल द्यावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या हद्दपारीला, काँझर्व्हेटिव्ह सोशल अजेंडा आणि पर्यावरण या विषयांवर ट्रम्प यांना कडोविकडीचा विरोध केला पाहिजे . त्यासगळ्यात मी यथाशक्ती सामील असेन .

सामील म्हणाजे नक्की काय करू शकू असं तुम्हाला वाटतं? सिरिअसली विचारतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी तीसएक कोटीतील एक साधा माणूस आहे , त्यामुळे माझ्या शक्तीवर अत्यंत मर्यादा आहेत हे आधी स्पष्ट करून आता हे पुढचे:
मुख्य करता येणे म्हणजे या सर्व विषयांना वाहून घेतलेल्या शेकडो संघटना आहेत, त्यांच्या निदर्शनात भाग घेणे. आमच्या आसपास (न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी ) अशी निदर्शने कोठे होणार आहेत यासंबंधी माहिती देणारी वेबसाईट, आम्ही काही मित्र (सुमारे पन्नास ते साठ लोक!) मिळून तयार करण्याच्या प्रयत्नात आहोत. झाली की कळवीन . यासंबंधी माझे स्वतःचे काम क्लिकक्लिकाट-संशोधन आणि ईमेला-इमेली करणे असेल .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

(यू एस अमेरिकेत) विधायकाच्या कार्यालयाच्या लँडलाईनवरती फोन करणे हे एक त्यातल्या त्यात प्रभावी साधन आहे.
ईमेल पत्रांकडे आणि कागदी पत्रांकडे विधायक तितकेसे लक्ष देत नाहीत (परंतु काहीच न केल्यापेक्षा थोडेसे लक्ष देतात.)

जास्तीत जास्त लक्ष आपल्या क्षेत्रातल्या मतदारांना देतात. (हाऊसमधील विधायक आपल्या मतदारसंघातील, आणि सेनेटमधील विधायक आपल्या राज्यातील मतदारांनी केलेल्या फोनकडे अधिक लक्ष देतात. इतकेच काय, हाऊसमधल्या विधायकांची अधिकृत संकेतस्थळे आहेत, त्यावर आपला पत्ता द्यावा लागतो. जर पत्ता मतदारसंघात नसला, तर थेट "क्षमस्व, तुम्ही माझ्या मतदारसंघात नाही, येथून संदेश पाथवता येणार नाही" असा एरर येऊ शकतो. माझा असा एक अनुभव आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सूचना क्र . दोन ते चार ला पूर्ण पाठिंबा. विदेशी डॉक्टरांचा आणि नर्सेसचा अमेरिकेत प्रवेश सहजसाध्य झाला (जो नसणे हे प्रोटेक्शनिझम चे उत्तम उदाहरण आहे!) की क्रमांक एकलाही पाठिंबा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

लिबरल न्यूयॉर्कर व लिबरल कॅलिफोर्नियन्स या दोघांना प्रेमपूर्वक शाल व श्रीफल द्यावे.
तसेच काँझर्व्हेटिव्ह न्यूयॉर्कर व काँझर्व्हेटिव्ह कॅलिफोर्नियन्स या दोघांना प्रेमपूर्वक श्रीमुखात द्यावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

तसेच काँझर्व्हेटिव्ह न्यूयॉर्कर व काँझर्व्हेटिव्ह कॅलिफोर्नियन्स या दोघांना प्रेमपूर्वक श्रीमुखात द्यावी.

हे काय बरोबर नाय ओ.

तुम्ही लिबरल. तुम्ही इतरांन्ना श्रीमुखात द्यायची भाषा करता ??

म्हंजे इतरांनी तुम्हाला श्रीफल द्यायचे आणि तुम्ही मात्र इतरांन्ना श्रीमुखात ?

--

लिबरलांना अर्धचंद्र मिळालेला आहे. तेव्हा त्यांनी जरा जपून वागावे असा "आगाऊ" सल्ला देतो.

जाताजाता : ओबामाकेअर ला अनादरपूर्वक बडतर्फी दिली जावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लिबरलांना अर्धचंद्र मिळालेला आहे.
हिलरीला "फक्त" २६.७ लाख मते जास्ती मिळाली आहेत हे नम्रपणे.
तुम्ही लिबरल. तुम्ही इतरांन्ना श्रीमुखात द्यायची भाषा करता ??
म्हणजे कॉन्झर्व्हेटिव्जनी बंदुकांची भाषा करायची (सेकंड अमेंडमेंटचे प्रेमी हिलरीला बघून घेतीलच !: ट्रम्प) आणि आम्ही साधी श्रीमुखातही द्यायची नाही? दया करा!
"जब साथ न दे कोई, आवाज़ हमें देना
हम फूल सही लेकिन पत्थर भी उठाएँगे
"
: बशीर बद्र

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

बोले तो, फूल अ‍ॅज़ इन 'fool' काय हो? तसा अर्थ घेतल्यास अधिकच समर्पक होतेय, म्हणून विचारले.

(म्हणजे, आम्ही मूर्ख असूही कदाचित, पण वेळ पडल्यास एक पत्थर भी तबीयत से उछाल सकते हैं यारों... हं, आता पत्थर न उचलण्याचे घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने, ही बाब अलाहिदा.)

(अतिअवांतर: दुबळ्याची अहिंसा ही अहिंसा नव्हे, तो भेकडपणा आहे, अंगावर उलटले असताना पत्थर उचलण्याची हिंमत नसणार्‍याने पड खाऊन 'मी अहिंसा आचरली' म्हणणे चुकीचे आहे, त्यापेक्षा तशा परिस्थितीत त्याने स्वरक्षणार्थ हिंसा केली, तर ती एक वेळ परवडेल; उलटपक्षी, अंगावर बेतले असताना हिंसेने प्रतिकार करण्याची क्षमता अंगात असूनसुद्धा जाणूनबुजून जो हिंसा आचरणात न आणता हिमतीने प्रतिकार करतो, तो खरा अहिंसक, असे कायसेसे खुद्द गांधीजी बोलून गेले होते, म्हणतात ब्वॉ. In other words, non-violence is a weapon of choice.)

----------

म्हणूनच (कदाचित) fool(s ).

==========

अतिअतिअवांतर: आता देवनागरीत टैप करता येतेय, पण रोमनला स्विच करता येत नैये. त्याकरिता इतरत्र टैपून चोप्यपस्तावावे लागतेय. (मी क्रोम वापरतोय.) संबंधित अधिकारी याकडे लक्ष देतील काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे कॉन्झर्व्हेटिव्जनी बंदुकांची भाषा करायची (सेकंड अमेंडमेंटचे प्रेमी हिलरीला बघून घेतीलच !: ट्रम्प) आणि आम्ही साधी श्रीमुखातही द्यायची नाही? दया करा!

त्यांच्या प्रति (म्हंजे कॉन्झर्व्हेटिव्हज च्या प्रति) सहिष्णुता नाही वाटतं दाखवणार तुम्ही ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हाईट हाऊसच्या संस्थळावरून दोन गोष्टी गायब -
The White House’s LGBT rights page has disappeared
Minutes after Trump becomes president, White House website deletes all mention of climate change

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अमेरिकेतल्या मुक्त विचारांचा आणि पुरोगामित्वाचा आणि सामाजिक बदलांचा आणि अशा सगळ्या महान महान गोष्टींचा दणदणीत पराभव का झाला म्हणे? एवढे ३०० वर्षाची कमाई इतकी कमी होती कि अचानक ओबामासारख्या माणसाने ८ वर्षे सत्ता केल्यानंतरही ही कमाई दणक्यात नष्ट व्हावी.
=============
बाय द वे, भारतात कायमचे परत या. तो आहे डोनाल्ड बाबापासून दूर. दिल्लीत वा पंजाबात आहेत पुरोगामी केजरीवाल जाऊन कवटाळायला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्लान्ड पेरेंटहूड या संस्थेवर धार्मिक रिपब्लिकनांचा राग पाहता, हे लोक टोकाचे स्त्रीवादी असल्याचं घोषित करण्यात यावं. या टोकाच्या स्त्रीवाद्यांना गर्भार राहणं म्हणजे आजार वाटत असे. एकीनं तर प्रसुतीचं वर्णन पोटातून गोळा शिटणं असं केलं आहे. मुळात मुलंच होऊ नयेत, आणि अगदी निरोधावरही खर्च नको म्हणून सरळ समलैंगिकता स्वीकारावी. किंवा 'खुद से प्यार जताऊं' म्हणावं. ना रहेगा बांस, ना बजेगी बासुरी.

पाळीच्या काळात वापरण्याच्या उत्पादनांवर आरोग्यविम्यातून खर्च करता येत होता. श्रीकुमार ट्रंपांनी पुनरुत्पादकता हा मानवांना जडलेला असाध्य रोग समजून त्यावरचे खर्चही विम्यातून वगळून टाकावेत. खरं तर, क्रांतिकारी पाऊल टाकून बायकांनाच अमेरिकेतून वगळून टाकावं; म्हणजे एकोणीसावी घटनादुरुस्ती, 'रो विरुद्ध वेड' असे प्रश्नच उरणार नाहीत. विस्थापितांमध्ये बायका असलेल्या चालतील, कारण विस्थापित म्हणजे माणसं नव्हेतच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सॉलिड!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी निरोधावरही खर्च नको म्हणून सरळ समलैंगिकता स्वीकारावी.

??? नक्की? बहुतेक खर्च कंपल्सरी आहे याबाबतीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ऐसी वर रेसिडेंट भारतीयांचे काही महत्त्व आहे का? एका अमेरिकेचे इतके वर्णन का? जगात अजून बरेच देश आहेत.
============
संस्थळाचे कितीही सदस्य एन आर आय किंवा अमेरिकन नागरिक असतील तरी संस्थळ अशा लोकांचे आहे इतका कंटेंट नसावा.
==========
सामाजिक तुलनांमधे हाच बायस पर्कोलेट होणे घातक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अमेरीकेतील लोक वाचाळ असावेत कदाचित. बाकीचे चिडीचुप्प अथवा खरं तर वाचनमात्रच असावेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

याद कर तूने कहा था प्यार से संसार है
हम जो हारे दिले की बाजी ...
ये तेरी ही हार है...
सुन ले क्या कहती है पायल....
ना जा रे ना जा... रोको कोई....
ओ बसन्ती पवन पागल ....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कार्टुन्स टाकता येत नाहीयेत SadSad

http://www.cnn.com/2017/01/20/opinions/gallery/2017-opinion-cartoon-gall...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0