हॅमर कल्चर

बाविसाव्या शतकातील बाप-लेकीत घडलेला हा संवाद.
"पपा, पपा, तुम्ही सतत माझ्यापासून तो हातोडा का लपवून ठेवता?"
"त्याच्यामागे एक फार मोठी गोष्ट आहे."
"पपा सांगा की ती गोष्ट मला"
"विसाव्या शतकात घडलेली ही गोष्ट आहे. त्याकाळी एक ‘प्रगत’ समाज होता. अचानक एके दिवशी एकमेकांच्या डोक्यावर हातोडा मारण्याची लाट उठली. काही महिन्यातच ही क्रेझ सर्वांच्या अंगवळणी पडू लागली. लोकांना दुसरे काही सुचेनासे झाले. जो उठतो तो हाण दुसऱ्याच्या डोक्यावर हातोडा. हळू हळू हा समाज बदलला. सर्व काही हातोडामय झाले.
मागणी तसा पुरवठा या तत्त्वाप्रमाणे काही चाणाक्ष उद्योजकं, लोकांची आवड ओळखून वेगवेगळया प्रकारचे हातोडे बाजारात आणू लागले. घडीचे, क्षणात उघडणारे, उघड-झाप, लांब, आखूड, नक्षीदार, बॅटरीवर चालणारे, रबराचे, प्लॅस्टिकचे, सोन्याचे, जोराने मार बसणारे, मार न बसणारे, पाळण्यातल्या व रांगणाऱ्या बाळासाठी, मुलींसाठी, बायकांसाठी, म्हाताऱ्यांसाठी, सुशिक्षितांसाठी, अशिक्षितांसाठी, तरुणांसाठी, तरुणींसाठी कोमल, असे विविध प्रकारचे, विविध प्रसंगासाठी, विविध वयोगटांसाठी, विविध मानसिकतेसाठी हातोडयांचे उत्पादन, वितरण व विक्री व्यवस्था रूढ झाली.
हातोडे बनवण्यासाठी लागणाऱ्या लोखंड, लाकूड, रबर, प्लॅस्टिक इत्यादी कच्च्यामालांचा पुरवठा करणाऱ्यात चढाओढ लागली. काही भूवैज्ञानिक व धातुशास्त्रज्ञ नवीन प्रकारच्या धातूसाठी संशोधन करू लागले. हातोडयांचे वर्गीकरण व प्रमाणीकरण करण्यात आले. इतर अनेक वैज्ञानिक हातोडा मारण्याच्या व मारून घेण्याच्या सिध्दांतावर मूलभूत संशोधन करू लागले. हातोडा कसा मारावा, कुठे मारावा, का मारावा, केव्हा मारावा याचे विश्लेषण करून एक सर्व मान्य आचारसंहिता बनवण्यात आली. अशा प्रकारच्या शोधनिबंधांची मागणी वाढली. प्रयोगशाळेत संशोधन होऊ लागले. लोकांच्या ज्ञानात भर पडू लागली. या ज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून हा विषय शाळेत शिकवू लागले. हातोडयासंबंधीचे टयूशन क्लासेस धंदा करू लागल्या. पाठयपुस्तकात याबद्दलची माहिती देण्यात आली. हातोडा-मारच्या परिणामांची गणीतीय समीकरणात मांडणी करण्यात आली. सूक्ष्मात सूक्ष्म व महाकाय हातोडयांच्या इष्ट परिणामासंबंधी चर्चा, शिबिरं, कार्यशाळा, संमेलनं भरविण्यात येवू लागल्या. संपूर्ण शिक्षण व संशोधन पध्दती हातोडयास केंद्रबिंदू समजून विकसित करण्यात आल्या.
याच सुमारास हातोडयापासून रक्षण करून घेण्यासाठी वेगवेगळया प्रकारचे हेल्मेट्स पण बाजारात येऊ लागले. संरक्षक कवचांची मोठया प्रमाणात विक्री होऊ लागली. हेल्मेट्सचा आकार, वजन, बनवण्याची प्रक्रिया त्याचे प्रमाणीकरण इत्यादीवर संशोधन होऊ लागले. हेल्मेट्सची विक्री जोरदार होवू लागली. काही जण हातोडा मार संबंधीचे क्रीडा आयोजन करू लागले. खुल्या मैदानात, बंदिस्त हॉलमध्ये मुलं-मुली , तरुण-तरुणी, सराव करू लागले. फुटबॉल-क्रिकेट स्पर्धेप्रमाणे एक तास, एक दिवस, पाच दिवसाचे हातोडा-मारचे सामने होऊ लागले. प्रेक्षकांचा फारच चांगला प्रतिसाद मिळू लागला. हातोडा-मार यासंबंधी कथा-कादंबऱ्या, कविता-चारोळया-गझल, वैचारिक-वैज्ञानिक लेखन, शब्दकोश, ज्ञानकोश, अशा साहित्याला प्रचंड मागणी होती. हातोडयाची चित्रकला, शिल्पकला विकसित झाली. हातोडयाचा सार्वजनिक उत्सव साजरा होऊ लागला. हातोडयांचे सवलतीच्या दरातील विक्री व प्रदर्शन भरविण्यात येऊ लागले. त्याच पैशातून ते हातोडयांची खरेदी करू लागले. व ही संस्कृती चांगलीच मूळ धरली.
हातोडा-मार संस्कृतीचे काही उपदुष्परिणाम पण जाणवू लागले. हातोडयाचा मार बसल्यामुळे काही जणांना दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार करणारे स्पेशालिटी हॉस्पिटल्स निघाले. उपचार करणाऱ्या विशेषज्ञांची फौज उभारली. रुग्ण डोकेदुखी, पाठदुखी, डोळयांची आग आग होणे, आपस्मार, रक्तस्राव, मेंदूज्वर, ताण तणाव इत्यादींच्या तक्रारीवर इलाज करून घेऊ लागले. काहींच्या मेंदूवर परिणाम झाल्यामुळे, ते बरळू लागले. हातोडा-मार उपचारासाठी वेगवेगळया उपचार पध्दती रूढ झाल्या. काहींना पाला पाचोळा, काहींना ऊद भस्म, व इतर काहींना साबुदाण्याच्या गोळया घेतल्यामुळे बरे वाटू लागले. आपल्याकडेच जास्त रुग्ण यावेत यासाठी त्यांच्या आपापसात चढाओढ सुरु झाली. परंतु रुग्ण निमूटपणे उपचार घेत होते. पूर्ण बरे झाल्यानंतर हातात हातोडा घेवून मारत होते किंवा मारून घेत होते.
हातोडयाच्याविरोधात बोलायची हिंमत कुणातही नव्हती. बहुतांश लोकांना हातोडा मार संस्कृतीमुळे भरपूर त्रास होत आहे हे जाणवत होते. परंतु मूठभर लोकांच्या हातोडा-मार संस्कृतीच्या उदात्तीकरणाच्या जाहिरातबाजीमुळे, खरोखरच यात काहीतरी तथ्य असावे म्हणून सहन करत होते. हातोडा-मार संस्कृतीतून भरपूर काही मिळणार आहे यासाठी आपण दिलेली ही छोटी किंमत म्हणून त्रास सहन करत होते. नेमके काय मिळणार आहे याची कुणालाच कल्पना नव्हती. याविषयी विचार करणेच लोकांनी सोडून दिले. शेजारचा करतोय ना मग आपण पण करावे हीच वृत्ती जोपासली जात होती.
समाजाच्या परिघाबाहेर असलेले काही सुज्ञ हताशपणे हे सर्व बघत होते. अधोगतीला चाललेल्या समाजाला सावध करावे या हेतूने हातोडा संस्कृती विरुद्ध ते आवाज उठवू लागले. परंतु गुंडागर्दी करून दडपशाही करून त्यांचा आवाज दडपला. त्यातील काही सुज्ञ चिवटपणाने ही हातोडा-संस्कृती समाजघातक व बेकायदेशीर आहे म्हणून आंदोलन करू लागले. समाजातील इतर त्यांना वेडे म्हणून हिणवू लागले. आमच्या मुलाबाळावर या वेडयांच्या वक्तव्याचा वाईट परिणाम होईल म्हणून त्यांना जेलमध्ये ठेवावे किंवा तडीपार करावे ही मागणी जोर धरू लागली. व्यापारी व उत्पादक धंदा कमी होईल या भीतीने विरोध करु लागले. या मूठभर हातोडा-विरोधकाविरुध्द वैद्यकीय तज्ञ, संशोधक, वैज्ञानिक, शिक्षणतज्ञ आरडा ओरडा करू लागले. हातोडा-मार अर्थव्यवस्थेला धक्का लावणाऱ्यांचा निषेध होऊ लागला. स्त्रियांना नोकऱ्या मिळणार नाहीत, राजकीय पुढऱ्यांना मतं मिळणार नाहीत, म्हणून हातोडा-मार विरोधकांची हकालपट्टी करावी या मागणीला जोरदार पाठिंबा मिळू लागला. लोकमतापुढे मान झुकवून विरोधक गप्प झाले. हातोडा-मार संस्कृती रक्षकांची सरशी झाली. आता तर हातोडा-मार संस्कृती शिवाय दुसरे कुठलेच विचार सुचेनासे झाले. यामुळे हळू हळू हा समाज विनाशाकडे जावू लागला व एके दिवशी पूर्ण अस्तंगत झाला.
उरलेल्या विरोधकांनी कुठे तरी लांब जावून एक नवा समाज निर्माण केला. व आपण त्या नव्या समाजाचे वंशज आहोत. हा समाज मात्र विचारपूर्वकपणे हातोडा मार संस्कृतीच्या अवशेषापासून दूर राहिला. हातोडयावर बंदी घालण्यात आली. म्हणून मी तुला हातोडयांना हात लावू देत नाही."
मुलगी सुज्ञ होती. विचार करणारी होती. तिच्या पपाने तिला एक रूपक कथा सांगितल्याचे तिच्या चटकन लक्षात आले. या रूपककथेत हातोडयाऐवजी ईश्वर, धर्म, योग, ध्यान, राष्ट्रवाद, भाषिक अस्मिता, राम मंदिर, इत्यादी प्रकारची कुठलिही चित्र-विचित्र कल्पना वापरली तरी रूपककथेतील हा समाज रसातळाला जाणार, याबद्दल तिला अजिबात संशय नव्हता. विसाव्या शतकाचा इतिहास वाचत असताना हा समाज अशा अनेक प्रकारच्या क्रेझी कल्पनांचा बळी झालेला होता हे तिच्या लक्षात होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हातोडयापासून चार हात दूर राहणे हेच शहाणपणाचे लक्षण ठरेल याची तिला खात्री पटली.
सुज्ञास सांगणे न लगे!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे हातोडे फार डोक्यात बसतात

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

लेखात काळा विनोद उत्तम जमला आहे. वाचून लॉटरी ही सुप्रसिद्ध कथा आठवली.

मात्र शेवटच्या परिच्छेदात 'हातोडामार' संस्कृतीची उदाहरणं दिल्यामुळे लेखाची तोपर्यंत राहिलेली उंच पातळी किंचित खाली येते. माझ्या मते ती किंवा इतरही कोणती विशिष्ट उदाहरणं देणं टाळलं असतं तर लेख खूपच व्यापक आणि परिणामकारक झाला असता. अर्थात हे गालबोटच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी सहमत आहे.मलाही ते जाणवल.अशामुळेच "या" लोकांच्या हेतुविषयी शंका निर्माण होते असे "ते"लोक म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

शिवाय 'त्या' लोकांबद्दल काही बोलत नाही हे पण म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लॉटरी कथा वाचली. त्या कथेबद्दल ची मते व त्या कथेचा अ‍ॅनॅलिसिस वाचला. Strange that the story evoked response of that magnitude. या कथेस, व्यापक व विचित्र प्रतिसाद का मिळाला असावा?
.
त्यातील एकंदर रानटीपणामुळे, मला "शांतता कोर्ट..." ही कथा तर आठवलीच पण मिपावरती माझ्या "दत्त" कथेनंतर झालेला गदारोळही आठवला.
.
ही कथा एकदम प्रायमल लेव्हलवरची अगदी सुसंस्कृत समाजातही, मनुष्याची मूळात असलेल्या सेडीस्ट टेन्डन्सी वर प्रकाश पाडणारी वाटली. लॉटरी कथेचा अ‍ॅनॅलिसिस अनेक अंगांनी करता येईल बहुतेक, वन ऑफ विच इज तुम्ही जो अर्थ लावला तसा.
.
कथेचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या कथेत सेडिस्ट प्रवृत्तीपेक्षा 'हे करायचं कारण गेली कित्येक शतकं हे करण्याची परंपरा, प्रथा आहे म्हणून!' या ठाम युक्तिवादावर टीका आहे. कथेत एक म्हातारा निराशेने म्हणतो 'मी असं ऐकलंय की त्या गावात आता लॉटरी थांबवलेली आहे.' सतीची प्रथा काही भागांत बंद झाल्यावर कदाचित काही संस्कृतीच्या दुराभिम्यानांनी असेच सुस्कारे टाकले असतील अशी कल्पना करता येते. 'आजकाल काय, आनिपानीवालेही शिकवायला लागले आहेत' ही तक्रार तर अजूनही होते.

हातोडा-मार संस्कृतीचंही टिकून राहाणं हे 'आत्तापर्यंत टिकलेलं आहे म्हणून' या एकाच कारणास्तव आहे. अशा प्रथा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करता की त्या मोडून टाकण्याचा प्रयत्न करता यात कॉंझर्व्हेटिव आणि लिबरल असा फरक होतो. क्लासिक टिळक विरुद्ध आगरकर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या कथेत सेडिस्ट प्रवृत्तीपेक्षा 'हे करायचं कारण गेली कित्येक शतकं हे करण्याची परंपरा, प्रथा आहे म्हणून!'

होय तुमचे म्हणणे बरोबर आहे. हे रॅशनल व ऑब्जेक्टिव्ह थिंकिंग करणार्‍यांनाच कळू शकेल. समहाऊ हा मुद्दा जर तुम्ही यापूर्वी मांडला नसतात म्हणजे "हॅमर" कथेच्या संदर्भात मांडला नतात तर माझ्या लक्षातही आला नसता (कदाचित). कारण I was overpowered by the Sadism & emotion of fear that slowly creeps on the reader.
भिन्न प्रवृत्तीच्या लोकांना भिन्न गोष्टी अधोरेखित होतात. तुम्ही सुचविलेला मुद्दा माझा ब्लाईंडस्पॉट असता याची मला खात्री आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेवटचा परिच्छेद नसता तर कल्पनाशक्तीला खूपच वाव मिळाला असता. तो जोडल्यामुळे हातोड्याचा घाव वर्मी बसणार नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

असा सगळा प्रकार झाला तर

आम्हांला निळू फुले गुर्जींचे एक वाक्य पटते - "तमाशानं समाज बिघडत नाही अन कीर्तनानं सुधरत नाही."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पटाइतांचा आय डी नानावटी यांच्या आय डी बरोबर मिक्स अप झाला आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथा बावीसाव्या शतकात संपत नाही.

तेविसाव्या शतकात काय घडले ???

जॉर्ज टॉवेल यांच्या आगामी २३८४ ह्या कादंबरीमधून साभार --

तेविसाव्या शतकाच्या प्रारंभी समाजातल्या अनेक समाजधुरीणांना या सगळ्या मारामारीचा उबग आला होता. समाजधुरीणांचं म्हणणं असं होतं की धर्म, जात, प्रांत आदि अस्मिता असाव्यात पण अगदी मर्यादित प्रमाणावर असाव्यात. मर्यादा नेमकी कुठे सुरु होते व कुठे संपते त्या बाबतीत मात्र प्रत्येकाला आपापल्या मर्यादा समजायला हव्यात हा समाजधुरीणांचा आग्रह सर्वानुमते स्वीकारला गेला. असहमती, शंका व्यक्त करायचीच नाही असा निग्रह करण्यात आला. संशयात्मा विनश्यति ची औषधी मात्रा प्रत्येकास देण्यात आली. या सगळ्या अस्मितांमधे को-ऑर्डिनेशन व्हायला हवे, कुठली जास्त, कुठली कमी असे प्रश्न उद्भवू नयेत व प्रत्येक अस्मितेस समान आदर मिळावा म्हणून एक नवीन को-ऑर्डिनेटिव्ह अस्मिता पुढे आणण्यात आली. सर्वेस्मितासमभाव असे तिचे नामकरण करण्यात आले. तिची व्याख्या प्रत्येकास समजलेली आहे असे जाहीर करण्यात आले. ती को-ऑर्डिनेटिव्ह अस्मिता गेली अनेक शतके या देशातच अस्तित्वात होती असेही ठासून सांगण्यात आले.

या समाजधुरिणांनी समाजाच्या प्रत्येक घटकांचं व विशेषतः दुर्बल घटकांचं भलं व्हावं म्हणून एका कायद्यान्वये सगळे हातोडे जप्त केले. हातोडे फक्त एलिजिबल लोकांकडेच असतील अशी उपाययोजना करायचं ठरलं. एलिजिबल कोण व कोण नाही हे सुद्धा त्यांनीच ठरवायचं ठरलं. अशा एलिजिबिलिटी क्रायटेरियातून जे तावून-सुलाखून येतील त्यांनाच हातोडे मिळतील असंही ठरलं. अर्थातच ह्या सगळ्या प्रकाराला मुख्य आक्षेप होता तो म्हंजे "तुम्हीच कोण ठरवणार की एलिजिबल कोण ते ?". आक्षेप घेणारे सुद्धा अस्तित्वात होते पण त्यांच्याकडे आक्षेप घेण्यासाठी पुढे येण्याचे धाडस नव्हते. कारण त्यांच्याकडचे हातोडे आधीच जप्त करण्यात आलेले होते. त्यामुळे त्यांनी आक्षेप घेण्यासाठी पुढे आल्यास त्यांना समाजधुरीणांकडे व/वा एलिजिबल लोकांकडे असलेल्या हातोड्यांचा सामना करावा लागेल ही भीती होती.

एलिजिबल लोकांची एक मोठी संघटना बांधण्यात आली. एलिजिबिलिटीचे चे कठोर क्रायटेरिया ठरवले गेले. एलिजिबिलीटी सिद्ध केल्यावर ट्रेनिंग ची सोय पण करण्यात आली. हातोडा कसा, कोणावर, केव्हा, व कितपत वापरायचा ह्याची नियमावली सुद्धा बनवण्यात आली. जोडीला नियमावली मधे अनेक एक्सेप्शन्स घालण्यात आली कारण हे एलिजिबल लोक समाजाच्या भल्यासाठीच काम करणार होते असा समाजधुरीणांचा पक्का विश्वास होता. तथाकथित दुबळ्यांना नियम लावताना कोणत्याही परिस्थितीत नियम कठोरपणे न लावता ... अत्यंत हळुवारपणे, कोमलपणे लावावेत अशी अलिखित तरतूद करण्यात आली. तथाकथित बलवंतांवर वेसण घालणे आवश्यक आहे असं वाटल्यामुळे त्यांच्यावर विशेष कठोर नियम लावून वचक ठेवायचे ठरले.

एलिजिबल लोकांच्या संघटनेतील मंडळींना हे पक्के माहीती होते की त्यांच्याशिवाय इतर कोणाकडेही हातोडे नाहीत. त्यामुळे ते जास्त धाडसी बनले. जोडीला ते स्वतः पब्लिक स्पिरिट मधे काम करत आहेत असं त्यांना पक्कं माहीती असल्यामुळे त्यांना अनेक नियम न पाळण्याचे व एक्सेप्शन्स वापरण्याचे अलिखित अधिकार दिले गेलेले होते. त्यामुळे एलिजिबल लोकांनी अनेक समाजकंटकांवर आपल्या हातोड्यांचा वापर सुरु केला. समाजकंटक म्हंजे नेमके कोण हे ठरवण्याचा अधिकार फक्त एलिजिबल लोकांनाच होता त्यामुळे लोक त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायला तयार होते. याचे मुख्य कारण म्हंजे एलिजिबल लोकांच्या निर्णयांवर आक्षेप घेणे म्हंजे सेडिशन असे ठरवण्यात आले. त्या बदनामीला भिऊन लोक एलिजिबल लोकांच्या म्हणण्यास प्रमाण मानू लागले. प्रसारमाध्यमे ही देशांतर्गत मालकीचीच असायला हवीत (म्हंजे परकीय मालकीची नसायला हवीत) असा आग्रह बालसुब्रमण्यम असामी यांनी धरल्यामुळे माध्यमे चांगल्यापैकी अनुवर्ती/आज्ञाकारी होतीच. जोडीला त्यांना सरकारी जाहीरातींचे लालूच दाखवून व सरकारवर टीका केल्यास खटल्यांचा दंडूका दाखवून आणखी कॉम्प्लायंट बनवण्यात आले.

--

पुस्तकातील मजकूराची ही एक झलक होती.

पुस्तक प्रकाशित झाल्यावर अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे वर उपलब्ध होईलच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुलगी सुज्ञ होती. विचार करणारी होती. तिच्या पपाने तिला एक विवेकाची कास सोड्लेल्या समाजाची रूपक कथा सांगितल्याचे तिच्या चटकन लक्षात आले. या रूपककथेत हातोडयाऐवजी ईश्वर, धर्म, योग, ध्यान, राष्ट्रवाद, भाषिक अस्मिता, राम मंदिर, इत्यादी प्रकारची कुठलिही चित्र-विचित्र कल्पनेचा अतिरेक वापरला तरी रूपककथेतील हा समाज रसातळाला जाणार, याबद्दल तिला अजिबात संशय नव्हता. विसाव्या शतकाचा इतिहास वाचत असताना हा समाज अशा अनेक प्रकारच्या उपयोगी, कल्पक, मूल्याधारीत कल्पनांच्या अतिरेकाचा बळी झालेला होता हे तिच्या लक्षात होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हातोडयापासून चार हात दूर न रहाता अतिरेकापासून दूर रहाणे हेच शहाणपणाचे लक्षण ठरेल याची तिला खात्री पटली. जेवणात मीठ जास्त झाले म्हणुन माणूस मीठावरच बहिष्कार घालत नाही तर विवेक वापरुन मीठाचे प्रमाण ठरवितो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मूळ लेखात नसलेले शब्द या प्रतिसादात घालण्याचे कारण समजले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा लेख सुधारण्याचा प्रयत्न आहे. मूळ लेख, शेवटचा परिच्छेद सोडला तर कुठच्याही अनिष्ट परंपरांना लागू होता. शेवटच्या परिच्छेदात लेखकाला वाटणाऱ्या विशिष्ट अनिष्ट परंपरांचा उल्लेख केल्यामुळे त्या लेखाची व्यापकता कमी झाली, आणि तो थोडा वैयक्तिक झाला. त्याऐवजी हे शब्द वापरले तर ती व्यापकता कायम राहील असं सुचवण्याचा प्रयत्न आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेवटच्या परिच्छेदाबद्दल माझीही तक्रार.

काही आठवड्यांपूर्वी वाचलेल्या लेखातला हा भाग पुन्हा आठवला; लेखाचा दुवा
Let’s Call the Whole Thing Off

Where is all this anger coming from? It’s viral, and Trump is Typhoid Mary. Intellectually and emotionally weakened by years of steadily degraded public discourse, we are now two separate ideological countries, LeftLand and RightLand, speaking different languages, the lines between us down. Not only do our two subcountries reason differently; they draw upon non-intersecting data sets and access entirely different mythological systems. You and I approach a castle. One of us has watched only “Monty Python and the Holy Grail,” the other only “Game of Thrones.” What is the meaning, to the collective “we,” of yon castle? We have no common basis from which to discuss it. You, the other knight, strike me as bafflingly ignorant, a little unmoored. In the old days, a liberal and a conservative (a “dove” and a “hawk,” say) got their data from one of three nightly news programs, a local paper, and a handful of national magazines, and were thus starting with the same basic facts (even if those facts were questionable, limited, or erroneous). Now each of us constructs a custom informational universe, wittingly (we choose to go to the sources that uphold our existing beliefs and thus flatter us) or unwittingly (our app algorithms do the driving for us). The data we get this way, pre-imprinted with spin and mythos, are intensely one-dimensional. (As a proud knight of LeftLand, I was interested to find that, in RightLand, Vince Foster has still been murdered, Dick Morris is a reliable source, kids are brainwashed “way to the left” by going to college, and Obama may yet be Muslim. I expect that my interviewees found some of my core beliefs equally jaw-dropping.)

A Trump supporter in Fountain Hills asks me, “If you’re a liberal, do you believe in the government controlling everything? Because that’s what Barry wants to do, and what he’s pretty much accomplished.” She then makes the (to me, irrational and irritating) claim that more people are on welfare under Obama than ever were under Bush.

“Almost fifty million people,” her husband says. “Up thirty per cent.”

I make a certain sound I make when I disagree with something but have no facts at my disposal.

Back at the hotel, I Google it.

Damn it, they’re right. Rightish.

What I find over the next hour or so, from a collection of Web sites, left, right, and fact-based:

Yes, true: there are approximately seven million more Americans in poverty now than when Obama was elected. On the other hand, the economy under Obama has gained about seven times as many jobs as it did under Bush; even given the financial meltdown, the unemployment rate has dropped to just below the historical average. But, yes: the poverty rate is up by 1.6 percentage points since 2008. Then again the number of Americans in poverty fell by nearly 1.2 million between 2012 and 2013. However, true: the proportion of people who depend on welfare for the majority of their income has increased (although it was also increasing under Bush). And under Obama unemployment has dropped, G.D.P. growth has been “robust,” and there have been close to seventy straight months of job growth. But, O.K.: there has indeed been a “skyrocketing” in the number of Americans needing some form of means-tested federal aid, although Obama’s initiatives kept some six million people out of poverty in 2009, including more than two million children.

So the couple’s assertion was true but not complexly true. It was a nice hammer with which to pop the enemy; i.e., me. Its intent: discredit Obama and the liberal mind-set. What was my intent as I Googled? Get a hammer of my own, discredit Bush and the conservative mind-set.

Meanwhile, there sat reality: huge, ambiguous, too complicated to be usefully assessed by our prevailing mutual ambition—to fight and win, via delivery of the partisan zinger.

LeftLand and RightLand are housemates who are no longer on speaking terms. And then the house is set on fire. By Donald Trump. Good people from both subnations gape at one another through the smoke.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कल्पनाविस्तार म्हणून कथा ठीक असली, तरी शेवटी जो निष्कर्ष काढला आहे, तो वाचून आश्चर्य वाटले. एकाद्याने बंदुकीने खून केला म्हणून त्या बंदुकीलाच फाशी देणे वा तुरुंगात टाकण्यासारखा हा उपाय वाटला.

विशेषतः योग, ध्यान (लेखकाच्या मते 'चित्रविचित्र' 'क्रेझी' गोष्ट) यांचा जर मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला तर समाज रसातळाला जाणार हे वाचून तर हसावे की रडावे हेच कळेनासे झाले.

आजच्या परिस्थितीतील बर्‍याच समस्या (आतंकवाद, ड्रग्स-दारू वगैरे व्यसने, गरिबी, अज्ञान, रोगराई, जंकफूड-बैठी जीवनशैली वगैरेतून निर्माण होणार्‍या व्याधि, व्यर्थ करमणुकीत वेळ घालवणे, परस्पर संबंधातील तणाव, इ.इ.) यांच्या मुळाशी -- अमर्याद स्वार्थ, सत्ता- संपत्ती- कीर्ती यांच्या अनिवार लालसेपायी निर्माण केले जाणारे जगड्व्याळ जाळे -- हे आहे, आणि त्याच्यावर उपायांपैकी एक योगसाधनेतून (यम-नियम-आसन-प्राणायम-प्रत्याहार-धारणा-ध्यान-समाधी) स्वतःचे उन्नयन घडवून आणणे हा आहे.

लेखकाच्या मते समाजाला रसाताळाला नेणार्‍या अन्य काही 'चित्रविचित्र' 'क्रेझि' संकल्पना म्हणजे 'ईश्वर, धर्म, राष्ट्रवाद, भाषिक अस्मिता' या आहेत. या सर्वांत मुळात गैर काय आहे ? उलट या सर्वांचा सृजनशील उपयोग करणारांनी या आधारे शतकानुशतके उत्तमोत्तम काव्य, संगीत, साहित्य, कला, वास्तुकला एवढेच नव्हे तर पृथ्वीचे भौगोलिक सर्वेक्षण, इतिहासाचा अभ्यास वगैरे केलेले आहे. प्राचीन भारतातील ऋषिंचे आश्रम, युरोपातील चर्चच्या आधारे चालणार्‍या युनिवर्सिट्या, मठ वगैरेतून प्रचंड ज्ञानोपासना, संशोधन झालेले आहे.

वैज्ञानिक म्हटला म्हणजे त्याने सतत देव धर्म योग यांचा विरोधच केला पाहिजे का ? सदर लेखकाला योगाभ्यासाचा काही अनुभव आहे का ? पातंजलयोगसूत्र या अद्वितीय ग्रंथाचा काही अभ्यास केला आहे का?

मागे एकदा माशेलकरांशी बोलताना मी त्यांचे ज्योतिषविद्येबद्दल काय मत आहे असे विचारले होते, त्यावर ते म्हणाले की एक वैज्ञानिक म्हणून (being a scientist) मी ते मानत नाही. म्हणजे एकदा कोणी आपण म्हणजे अमूक एक असा शिक्का लावून घेतला की मग अन्य सर्व वाटा कायमच्या बंदच करून टाकायच्या का ? जिज्ञासा, कुतुहल, काही नवीन दिशा हुडकणे, आजवर ठाऊक नसलेल्या अनवट वाटांवर मुशाफिरी करणे हे सर्व वर्ज्य? मग कडवा धार्मिक आणि वैज्ञानिक यात फर्क तो काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'ईश्वर, धर्म, राष्ट्रवाद, भाषिक अस्मिता' या आहेत. या सर्वांत मुळात गैर काय आहे ? उलट या सर्वांचा सृजनशील उपयोग करणारांनी या आधारे शतकानुशतके उत्तमोत्तम काव्य, संगीत, साहित्य, कला, वास्तुकला एवढेच नव्हे तर पृथ्वीचे भौगोलिक सर्वेक्षण, इतिहासाचा अभ्यास वगैरे केलेले आहे. प्राचीन भारतातील ऋषिंचे आश्रम, युरोपातील चर्चच्या आधारे चालणार्‍या युनिवर्सिट्या, मठ वगैरेतून प्रचंड ज्ञानोपासना, संशोधन झालेले आहे.

काही संकल्पना ठरावीक मर्यादेत उपयुक्त असतात आणि त्यांचा उपयोग करून घ्यावा. एकेकाळी धर्मालयांमध्ये संशोधन, अभ्यास झाले आणि त्या काळात धर्मालयं समाजासाठी उपयुक्त होती. आज धर्माची परिस्थिती काय आहे? उदाहरणार्थ हिंदू धर्माचं लोकांच्या खाजगी आयुष्यांमध्ये असलेलं स्वरूप आज काय आहे किंवा हिंदू धर्माच्या नावाखाली ज्या काही संस्था चालवल्या जातात तिथे समाजोपयोगी संशोधन, अभ्यास अशा गोष्टी होतात का? किंवा ख्रिश्चन धर्मगुरूंनी जिऑर्दिनो ब्रूनोला मारलं तेव्हापासून ख्रिश्चन धर्मपीठांचा संशोधनात किती वाटा आहे? हीच गोष्ट कलेच्या बाबतीत म्हणता येईल. एकेकाळी धर्माने कला आणि विज्ञानाला तारलं, आज निराळ्या प्रकारच्या संस्था कला आणि विज्ञानाला आश्रय देत आहेत. एकेकाळी धर्म समाजोपयोगी होता, म्हणून तो आजही आहेच असं ठाम विधान करता येत नाही.

राष्ट्रवाद, भाषिक अस्मिता ह्यांचा सध्या कितपत उपयोग होतोय आणि लोकांना उपद्रव कितपत होतोय?

कडवा धार्मिक आणि वैज्ञानिक यात फर्क तो काय ?

एकेकाळी उपयुक्त असणारी गोष्ट आता फार उपयुक्त नाही हे समजल्यावर सोडून देणारी ती वैज्ञानिक. उदाहरणार्थ, न्यूटनचे गतीविषयक नियम ठरावीक मर्यादेपलीकडे लागू पडणार नाहीत हे लक्षात आल्यावर ते सोडून देणारा पहिला वैज्ञानिक आईनस्टाईन. पण हे उदाहरण तितकसं चपखल नाही. विशेषतः प्रतिसादातल्या वरच्या भागाशी तुलना करता. दुसरं आणि चपखल उदाहरण देता येईल ते 'इथर' नावाचं माध्यम सगळ्या अवकाशात आहे आणि प्रकाशलहरी त्या माध्यमातून प्रवास करतात ह्या गृहितकाचं. ते उपयुक्त वाटत होतं तोवर वापरलं; पण ते सिद्ध करता येत नाही म्हटल्यावर सोडून दिलं गेलं आणि नवीन सिद्धांत प्रचलित झाला.

"... वैज्ञानिक म्हणून (being a scientist) मी ते मानत नाही"; ह्या विधानात काही खाचाखोचा असतील. कोणाला मनःशांतीसाठी ते वापरायचं असेल तर वापरा बुवा, असं त्यांचं व्यक्तिगत मत असू शकेल; कदाचित ज्योतिषावर भक्ती असणाऱ्या माणसांना त्यांना दुखावायचं नसेल. पण ही त्यांची भावना झाली आणि विज्ञानाला भावना नसतात. ज्योतिष वैज्ञानिक कसोट्यांवर उत्तीर्ण होऊ शकत नाही, ही गोष्ट ते दुर्लक्षित करू शकत नाहीत; ह्यातच त्यांनी विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन व्यवस्थित आत्मसात केलेला आहे हे दिसतं. डॉ. माशेलकर उच्च दर्जाचे वैज्ञानिक ठरण्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे; पण कदाचित डॉ. माशेलकर चांगले मानसोपचारतज्ञ होऊ शकणार नाहीत, एवढाच त्याचा अर्थ. माशेलकरांच्या संशोधनाच्या विषयात चांगले मानसोपचारतज्ञ असण्याची आवश्यकताही नाही.

१. उदाहरणार्थ, मोहम्मद अकलाख, श्रीराम सेना, आयसिस, टेक्सासमध्ये 'प्लॅन्ड पेरेंटहूड'ची पिछेहाट, मनसे, इ. अनेक
२. सिद्ध करणारा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वैज्ञानिक म्हटला म्हणजे त्याने सतत देव धर्म योग यांचा विरोधच केला पाहिजे का ? सदर लेखकाला योगाभ्यासाचा काही अनुभव आहे का ? पातंजलयोगसूत्र या अद्वितीय ग्रंथाचा काही अभ्यास केला आहे का?

लौकिकार्थाने अवैज्ञानिक असलेल्या विषयांवरील एखाद्या वैज्ञानिकाच्या भूमिकांबद्दल त्याला प्रश्न विचारून त्यावरून त्याचे मूल्यमापन, त्याची निर्भत्सना दरवेळी केली च पाहिजे का ??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या रूपककथेत हातोडयाऐवजी ईश्वर, धर्म, योग, ध्यान, राष्ट्रवाद, भाषिक अस्मिता, राम मंदिर, इत्यादी प्रकारची कुठलिही चित्र-विचित्र कल्पना वापरली तरी रूपककथेतील हा समाज रसातळाला जाणार, याबद्दल तिला अजिबात संशय नव्हता.

हे वाचून हे असले सॉफ्ट पॉइझनिंग टाइप लेख लिहायला प्रकाश घाटपांडे आणि प्रभाकर नानावटी अश्यासारख्यांना किती मोबदला मिळत असेल असा प्रश्न पडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुजबूज कँपेनर्सना मोबदला मिळतो त्याच्या तुलनेत घाटपांडे आणि नानावटींना काहीच मिळत नसणार ह्याची खात्री आहे. लेखनाचा परतावा म्हणजे शिव्या आणि/किंवा दगड (दाभोळकर, कलबुर्गींच्या बाबतीत बंदुकीच्या गोळ्याही) म्हणत असाल तर उजव्यांच्या तुलनेत बरेच जास्त मिळत असतील, ह्याबद्दलही खात्री आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला व्यक्तिशः शेवटचा पॅरा खटकला. पण यावर नानावटींशी माझे नेहमी मतभेद असतात.पण सश्रद्धांमधे जसे अतिरेकी सश्रद्ध असतात तसे अश्रद्धांमधे पण अतिरेकी अश्रद्ध असतात.पण यातूनच विचारमंथन होत असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मुलगी सुज्ञ होती. विचार करणारी होती.

निव्वळ या वाक्याने संपूर्ण लेखाची क्रेडिबीलिटी संपली उरला तो फक्त अट्टहास अनमुद्देसूद असल्याचा आविर्भाव

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

जेव्हा मानव रानटी अवस्थेमधुन (हंटर + गॅदरर) या अवस्थेमधुन प्रगत झाला (फार्मर) तेव्हा संस्कृतीने जन्म घेतला आणि संस्कृतीबरोबरच, सामुदायिक संकेत, रुढी, बंधने, परंपरा, यम-नियम येत गेले. तेव्हा समाजाने एक सुघड अथवा विघड रुप घेणे अपरिहार्यच होते. काही गोष्टी या जशा त्याज्य ठरविल्या (उदा - कितीही सुखद हवा असो परंतु, नग्न फिरणे) त्याचप्रमाणे काही गोष्टी वरिष्ठ ठरल्या ज्याला धर्मसंमत्/मूल्याधारीत आचरण म्हणु. तेव्हा कोणतीतरी संस्कृती ही अपरिहार्यच आहे.
आपल्याला त्याज्य वाचणार्‍या गोष्टी आपण 'हातोडा' या शब्दाच्या जागी घालू शकतो. उदा - जातपात भेदभाव. हे मात्र खरे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0