भगवान बुद्ध, राजू गाईड आणि ईरोम शर्मिला

(नुकतीच बातमी वाचली, ईरोम शर्मिलाने १६ वर्षांपासून सुरु असलेले उपोषण तोडले. तिच्या घरच्यांनी आणि तिच्या चाह्त्यांनीच तिचा विरोध केला. अचानक मला गाईड सिनेमातल्या राजू गाईडची आणि भगवान बुद्धाची आठवण आली )

ज्ञान प्राप्तीसाठी भगवान बुद्ध कठोर तपस्या करत होते. उग्र तपस्येमुळे त्यांचे शरीर हाडांचे पिंजर झाले. पण त्यांना ज्ञान प्राप्ती झाली नाही. वीणेची झंकार ऐकून त्यांना जगण्याचा मार्ग सापडला. सुजाताच्या हातची खीर प्रश्न करून ते ध्यानमग्न झाले. त्यांना ज्ञान प्राप्त झाले. ज्ञानप्राप्ती साठी आणि ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी शरीर हे गरजेचेच. म्हणूनच म्हंटले आहे, 'शरीर माध्यम खलु धर्म साधनं'. भगवान बुद्धाचे शिष्य प्रज्ञावान होते, तपस्या अर्धवट सोडली म्हणून त्यांनी आपल्या गुरुचा बहिष्कार नाही केला,अपितु गुरु कडून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा प्रकाश जगभर पसरविला. असो.

राजू गाईडच्या अंगावर भगवे वस्त्र पाहून, भोळ्या-भाबड्या ग्रामस्थांनी त्याला महात्मा समजून त्याचे स्वागत केले. शहरी जीवनातले छक्के-पंजे जाणणारा राजू , ग्रामस्थांच्या नजरेत एक ज्ञानी महात्मा ठरला. दूर पर्यंत त्याची प्रसिद्धी पोहचली. राजू मुफ्तचा माल उडवीत मजेत जगत होता. पण 'जगात काहीच मुफ्तमध्ये मिळत नाही, एक दिवस त्याची किंमत मोजावीच लागते'. गावात दुष्काळ पडला, भयंकर दुष्काळ. गावात पूर्वी हि एकदा असा असा भयंकर दुष्काळ पडला होता, तेंव्हा एका महात्म्याने इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी उग्र तपस्या केली होती. आपले महात्मापण टिकविण्यासाठी राजूला हि तपस्येला बसावे लागले. भुकेने त्याचा जीव कासावीस झाला, पळून जाण्याची इच्छा झाली. पण ज्या प्रमाणे कोळीच्या जाळ्यात अटकलेला कीटक तडफडून मरतो, तसेच आपल्याच महात्म्या रुपी प्रभामंडळात अटकलेला राजू हि उपासमार होऊन मरतो. सिनेमाच्या शेवटी पाऊस पडतो. पण प्रत्यक्षात असे होत नाही. कित्येक बळीराजांनी आत्महत्या केली तरी इंद्र्देवाचे हृदय पाझरताना कधी बघितले नाही. कुणी तपस्या केली कि इंद्रदेव प्रसन्न होत नाही, त्या साठी गोवर्धन पर्वतच उचलावे लागते.

आपले निश्चित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ईरोम शर्मिला हि १६ वर्ष आधी उपोषणाला बसली. तिला उपोषणाची प्रेरणा महात्मा गांधींपासून मिळाली होती. पण तिला एक माहित नव्हते. महात्मा गांधी एक चतुर राजनेता होते. उपोषण त्यांचे एक शस्त्र होते. या उपोषण रुपी शस्त्राचा किती आणि कसा वापर करायचा याची त्यांना चांगली कल्पना होती. त्यांनी या शस्राचा वापर नेहमीच योग्य रीतीने केला आणि आपले हेतू साध्य केले. पण ईरोम ठरली भोळी-भाबडी. तिचा वापर करणार्यांनी तिच्या भोवती एक प्रभामंडळ तैयार केले. ती त्या प्रभामंडळात अटकली.

आता एकच प्रश्न डोळ्यांसमोर येतो. कुणी १६ वर्ष उपाशी राहू शकतो का? उत्तर नाही. सरकारने तिला इस्पितळात बंदिस्त ठेवले होते. तोंडाच्या जागी नाकातून तिला अन्नद्रव्य दिले जात होते.(तांदूळ, भाज्या, डाळ इत्यादी). रुग्णांसाठी असलेली सुविधा तिच्यावर वापरल्या जात होत्या. अर्थात ती उपाशी नव्हती. तिला जिवंत ठेवण्यासाठी सरकारचा भरपूर पैसा हि बरबाद झाला. तिच्या उपोषणातला फोलपणा निश्चित ईरोमला हि कळत असेलच. पण ती हि राजू गाईडप्रमाणे स्वत:निर्मित प्रभामंडळ रुपी जाळ्यात अटकलेली होती आणि तिला त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग सापडत नव्हता. इस्पितळात राहून नाकाने अन्नद्रव्य ग्रहण करण्या अतिरिक्त ती काहीही करू शकत नव्हती. शेवटी हिम्मत करून तिने आपल्या भोवती असलेले प्रभामंडळ तोडले. नाकाच्या जागी तोंडातून जेवण घेण्याचा निश्चय केला. पण घरी आणि गावात तिचे कुणीच स्वागत केले नाही. कारण तिचा वापर करणारे तिच्या विरुद्ध झाले होते . तरीही मी तिची हिम्मतीची प्रशंसा करेल. अन्यथा असेच तडफडत तिचे जीवन व्यर्थ गेले असते.

भगवान बुद्धाने देशभर भ्रमण करून, आपल्या शिष्यांना दूरदेशी पाठवून, धर्माचा प्रसार केला होता. ईरोम शर्मिला हि या १६ वर्षांत देशभर फिरून ASFPA (अफ्सपा) विरुद्ध जनजागृती करू शकत होती. कदाचित तिच्या प्रयत्नांना यश हि आले असते. १६ वर्ष तिने व्यर्थ घालविले. पण म्हणतात ना 'देर आये दुरुस्त आये'. भारतीय प्रजातान्त्रिक व्यवस्थेवर विश्वास ठेऊन तिने निवडणूक लढविण्याचा निश्चय केला आहे. तिचा हा निर्णय निश्चितच योग्य आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

कशासाठी उपोषण हे दुय्यम आहे.मुळात हा मार्ग अगदी चुकीचा नाही पण एक दिवस लाक्षणिक ठीक आहे.प्रत्येक राज्यव्यवस्थेत दोष आहेतच.फारतर विक्रमादित्याची घंटा बांधावी प्रत्येक तालुका मुख्यालयात आणि सहा ते सहा वेळात घंटा वाजवून एक निषेध चिठ्ठी ( आधारची प्रत सहीकरून त्यावरच) पाच ओळींची बाजूच्या पेटीत टाकावी. नेटकर भारतीयांसाठी "घंटा डॅाट गव डॅाट इन" चालू करावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पटाईतकाकांचा हा लेख - फॉर अ चेंज - एकदम पटला.

राजू गाईडच्या अपरिहार्य मृत्यूची गोष्ट खूप आवडते. देवानंदही फेवरिट असला तरी सिनेमापेक्षा पुस्तक कैक पट भारी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

लेख खूप आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असं नै हो ते.

एकदा माध्यम आणि एकदा साधन कसं लिहितील?

शरीरं आद्यम् खलु धर्मसाधनम्।

असं आहे .

आद्यम म्हणजे पहिले, सर्वात महत्त्वाचे.
बाकी वीणेचा झंकार, सुजाताची खीर वगैरे नविन माहिती मिळाली हं!

भगवान बुद्धाला तपस्या अर्धवट सोडली म्हणून त्याग करतील असे भक्त किंवा शिष्य तपस्या सुरू करण्यापूर्वी होते का?

(पटाईत काकांचे लेख सिरीयसली घेऊन सिरीयस प्रतिक्रीया देणं इथे अपेक्षित असतं किंवा कसं यावर मार्गदर्शन इथे मिळालं तर पुढचे प्रतिसाद लिहिन म्हणते.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पटाईत काकांचे लेख सिरीयसली घेऊन सिरीयस प्रतिक्रीया देणं इथे अपेक्षित असतं किंवा कसं...

छ्या: छ्या:!!! काहीतरीच आपलं तुमचं.

असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरं!
कारण उपोषणाशी जोडल्या गेलेल्या तीनही व्यक्तिरेखांचे मर्मच पटाईतकाकांनी चुकीचे जोखले आहे.
सिरीयसली घेण्यासारखे नसेल तर पुढचे प्रतिसाद लिहिण्यात अर्थ नाहि.
उगाच डाटापॅक संपायचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

साती ,तो एक मुद्दा खोडून काढा त्यांना पटेल नक्कीच.नाहीतर पटाइत काकांचे लेख एकाच तराजुने जोखले आणि सिरिअसली घेऊ नयेत असा आपल्यावरही आरोप होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला पटाईत काका खूप!

इरोम शर्मिलाला उपास सोडताना पाहून वाईट वाटलं. पराभव बघवत नाही. विशेषतः हेतू एकदम चांगला असताना. तिचा एक समर्थक टीव्हीवर म्हणत होता की आम्ही गांधीजींच्या आंदोलनाचा अभ्यास केला ( अगदी साबरमतीमध्ये जाऊन,) पण समजल नाही की काय चुकतय आमचं. हा गांधीजींच्या शस्त्राचा पराभव आहे वगैरे वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>>गांधीजींच्या आंदोलनाचा अभ्यास केला -----">>
??
त्याकाळची गोष्टच वेगळी होती.ते दीडशेच वर्षं राज्या करणाय्रा परकी महासत्तेविरुद्ध लढत होते,नउशे वर्षांच्या नव्हे.आता आपल्याच सत्तेविरुद्ध लढणे यात काही फरक आहे ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

महात्मा गांधी एक चतुर राजनेता होते

हे थत्त्यांनाही पटण्यासारखं आहे आणि अनुतैंना सुद्धा.
.
.
बाकी, धागा बघून मला माझा एक जुना प्रतिसाद आठवला --
पिंजरा -- नेमकं काय चुकलं ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऑफकोर्स ते राजनेताच होते. संत वगैरे नव्हते.

----------------------------------------
राजू गाईड ज्या गुंत्यात गुंतला त्याचे सुंदर विवेचन पुलं*च्या तुझे आहे तुजपाशीच्या शेवटी केलेले आहे. "पोहताना हातपाय थकले म्हणून किनार्‍यावर यायचा प्रयत्न केला तर लोकांनी काठ्यांनी ढकलून परत पाण्यात ढकलले. आचार्य, तुम्ही आमच्यासाठी मेलं पाहिजे"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एम्सच्या बोधचिह्नाखाली 'शरीरमाद्यं खलु धर्म साधनं' असं बोधवाक्य आहे.

हे कुठनं आलंय माहित्येय का ?
कुमारसंभवात कालिदासभाऊंनी शंकराकाकांच्या तोंडी घातलंय हे वाक्यं!

पार्वतीकाकू (काकु बनण्यापूर्वी) शंकरकाकांच्या प्राप्तीसाठी ना ना तर्हेची व्रतवकल्ये करित होत्या.
आणि शंकरकाका काही काका बनायला तयार होईत ना.
मग शेवटी काकूंनी त्या पाने वगैरे खाऊन जगायच्या ते ही सोडून दिले.
(अपर्णा - हे पार्वतीचं नाव पानंही खाणं सोडून दिलेली या अर्थाचे आहे असे आमचे शाळेतले गुरूजी म्हणाले होते पण एक कॉलेजातही संस्कृत शिकणार्‍या ताईने पानेही (पानही खरं तर!) ल्यायचं सोडून दिलं असं सांगितलं होतं. खरं खोटं कालिदास जाणे)
भर थंडीत सतत स्नान पूजा अर्चा करू लागल्या

मग शंकरकाका एका साधुच्या वेशात तिथे आले आणि 'बाई तुम्ही स्वतःच्या शरीराला एका गोसावड्यासाठी का बरे कष्टवित आहात. शरीर जपून ठेवा. अश्या व्रतवैकल्यांनी , उपासतापासांनी त्याला हानी पोहोचवू नका , कारण शरीर हेच धर्म साधण्याचे मुख्य(पहिलं) साधन आहे' असे सांगितले.

नंतर मग बरंच काही होऊन ते काका - काकू झाले हे सोडा.

तर आयरनी अशी की 'मनोकामनेसाठी उपासतापास करून शरीराला शिणवू नये' म्हणताना शंकरकाका स्वतः मात्र पार्वतीकाकूंच्या खडतर उपासतपासांनी आणि ते करताना वापरलेल्या मनोबलामुळे प्रभावित होऊन आले होते.

..तर, आता असा प्रश्न आहे की शंकरकाका म्हणतायत म्हणून शरीराला जपून ठेवावे, उपासतापास करू नये की या मार्गाने पार्वतीकाकूंची काकू बनण्याची इच्छा पूर्ण झाली म्हणून हा मार्ग अवलंबावा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान लिहिलं आहे .शुचि.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अपर्णा - हे पार्वतीचं नाव पानंही खाणं सोडून दिलेली या अर्थाचे आहे असे आमचे शाळेतले गुरूजी म्हणाले होते

च्यामारी! कोणी पान खाणं सोडून दिलं म्हणून काय तिला लगेच असं 'अपर्णा, अपर्णा' म्हणून इतकं हिणवायचं?

मग उद्या कोणी जर सिगारेट/गांजा/चिलीम ओढणं सोडून दिलं, तर त्याला काय 'अधुरा, अधुरा' म्हणून हिणवणार काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्तं आहे!

पण पार्वतीने 'पान' नाही , 'पानही' खायचं सोडलं.
म्हणजे अगोदर खाणंपिणं सोडून फक्तं पानं खायची ती, मग पानंही खायची सोडून टोट्टल फास्टींग करायला लागली हो.

तुमच्या वुड बी अधुर्‍याला काही दिवस खाणंपिणं सोडून नुसतं शिग्रेटी फुकत रहावं लागेल, आणि ते ही सोडल्यावर ही कॅन राईज अप टू पदवी ऑफ अधुरा!
कळ्ळं ना!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग उद्या कोणी जर सिगारेट/गांजा/चिलीम ओढणं सोडून दिलं, तर त्याला काय 'अधुरा, अधुरा' म्हणून हिणवणार काय?

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0