बागकामप्रेमी ऐसीकर : २०१६ धागा - ३
ठाण्याजवळच्या लोकांनी कोपरी पुलाजवळ सर्विस रोड कडून प्रवेश असणाय्रा दत्ताजी साळवी उद्यानास भेट द्यावी.सार्वजनिक बाग किती चांगली असू शकते याचे उदाहरण.
उन भरपूर मिळतंय असं धरून
उन भरपूर मिळतंय असं धरून चालतो.पाणी कुंडीत (प्लास्टिकची नसेलच)साठतंय का?एका ट्रेत माती पसरून त्यावर कुंडी ठेवा.ती माती पाणी खेचून घेईल.जमत असल्यास ते झाड प्लास्टिक पिशवीत घालून ती मातीवर ठेवा.विणलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवल्यास मुळांना हवा मिळेल.पानांच्यावरून हात फिरवल्यास मलूलपणा जाणवल्यास पाण्याचा निचरा होत नाही हे कारण असते.झाड बाहेर काढून दुसय्रा कुंडीत बदली करताना पांढरी मुळे थोडीतरी दिसायला हवीत.नुसताच काळा झुपका असेल तर कुजताहेत.
एवढं पाहा बुरशी कमी होईल.एकदा पानं आणि शेंडे छाटूनही बुरशी नष्ट करता येईल.
उन भरपुर नाही पण मिळतय
उन भरपुर नाही पण मिळतय बर्यापैकी.
पाणी साठुन देत नाहीये.
पानं एकदम टवटवीत, आणि झाड वाढतय पण चांगले. कधीही त्यावर १०-१२ कळ्या असतात आणि सगळ्या मरतात. कळ्या/शेंडे पोखरणारी आळी असेल म्हणुन ४ महिन्यापूर्वी सर्व कळ्या आणि सर्व पाने काढुन टाकली. झाड पुन्हा तरारले पण कळ्या मरणे चालुच आहे. काही औषध आहे का? इतक्या कळ्या येतायत की टाकवत नाहीये.
मोगऱ्याची नवीन रोपं
साधारण दोन महिन्यांपूर्वी मोगऱ्याचा एक बहर येऊन गेल्यावर छाटणी करताना थोडी जास्त कापाकापी केली. साधारण तीन पानांच्या जोड्या असतील अशी छाटणी केली. सगळ्यात खालची पानं काढून टाकली आणि ती मातीत खोचली. तीनांपैकी दोन रोपं लागली आणि दोन्हींना नवीन फुटवे येत आहेत. आता ह्या मोगऱ्यांसाठी घर शोधायला हवं.
वरच्या फोटोत, उजव्या बाजूला खाली नवा फुटवा आहे. काडी-खोडाच्या वरच्या बाजूला फुलं गळल्यावर उरलेला वाळका भागही दिसतोय.
हे सर्व jasmin या नावाखाली
हे सर्व jasmin या नावाखाली असले तरी फोटोत दिलेली फुलं आपल्याकडे चमेली म्हणतात.जर्मनीच्या आसपास याच्या फुलांतून जझ्मिन ओइल (खरं तेल)काढतात.हंगाम ओगस्ट ते ओक्टोबरचा पहिला आठवडा.पंधरा लाख फुलांतून एक किलो तेल निघते.
तीन पाने बेलासारखी येतात ती जाई( सायली .)छोटी गोल गोल अथवा टोकदार पानांची(पानांना देठ असा फारसा नसतो) आणि छोट्या फुलांची जुई.यातलाच एक प्रकार बंगळुरुहून मुंबईत येतो.मोगय्रात बरेच प्रकार आहेत लांब कळीचा मदनबाण.बटण,दुहेरी गुंडु मल्लिगे वगैरे.झुडुप आणि वेल मोगरा हे झाडाच्या ठेवणीवरून प्रकार.
सांगली भागात जाई,बेळगावात गुंडु मल्लिगे,कोइमतुर ला जुई,आंध्र मदुराई गुलाबी चमेली,कारवारात मल्लिगे.
गवती चहाची हीच कथा.
माझ्याकडेही गवती चहा चिकार वाढला आहे. मी चहा पीत नाही त्यामुळे त्याचा खपही नाही. एका मैत्रिणीने कंद दिला म्हणून मी लावला आणि आमच्याकडे फारच चांगला वाढतोय. उद्याच तो खणून, त्याला मोठी कुंडी देणार आहे; आणखी कंद फुटले असतील तर ते सुद्धा मैत्रमंडळात वाटून टाकण्याचा इरादा आहे.
अरे वा ! तुमची बाग चांगली
अरे वा ! तुमची बाग चांगली फळतीय आणि फुलतीय की ...
शुभ्रं फुले खूप छान दिसतायत.
आणि या वेळी दुप्पट पीक .. दोन भेंड्या दिसतायत . :प
या वांग्यांची भजी सुद्धा चांगली लागतात .
गवती चहा उकळताना त्यात थोडी काळी मीरी आणि लवंग घातले तर चांगला स्वाद येतो. आणि गवती चहा औषधी पण आहे. अधुनमधुन प्यायला काहीच हरकत नाही.
आता भरभरून चेरी टोमॅटो यायला
आता भरभरून चेरी टोमॅटो यायला सुरुवात झाली आहे. एका स्नॅकची सोय सुटेल इतके टोमॅटो एकाच झाडाला आहेत.
पण वांग्याच्याच काय, कोणत्याही पाककृती मला विचारू नका. आणि घेवडा, फरसबी, चवळी वगैरे लावायला सांगू नका. घेवडा खाण्यापेक्षा मी सुरमईचं झाड लावून सुरमई खाईन. चवळी दोन वर्षांपूर्वी लावली होती, पण त्याचा पाला पहिल्यांदा खुडला तो छान लागला, नंतर फार चोथट लागला. त्यामुळे चवळी बंद केली. ज्या भाज्या खात नाही, खायला किंवा करायला आवडत नाहीत त्या लावणं फुकट जाईल.
कालच शेजारची भारतीय बाई भेटली होती. ती मागच्या वेळेस भेटली होती तेव्हा तिला आणि तिच्या धाकट्या मुलाला सगळ्या भाज्या दाखवून झाल्या होत्या. टोमॅटोचं एक आणि भेंडीचं एक झाड घराच्या पुढच्या बाजूला आहे. काल ती म्हणाली की, तिची दोन्ही पोरं जातायेता बाहेरच्या बाजूच्या झाडाला टोमॅटो लागले आहेत का, आणि फुलं कोणती फुलली आहेत हे बघत जातात. एकंदरच घरासमोरून जाणारे-येणारे फुलझाडं बघत जातात असं दिसतं. त्यामुळे पुढच्या बाजूचा गवताचा एक भाग ताब्यात घेऊन तिथे समोर फुलझाडं आणि मागच्या बाजूला भाज्या लावायचा इरादा आहे. घरातला तोच एक भाग आहे जिथे दिवसभर ऊन येतं. त्यामुळे येत्या हिवाळ्यात त्या भागातलं गवत काढणं, तिथे चांगली माती, कंपोस्ट आणून टाकणं आणि पानं/खोडांचं आच्छादन लावणं असं काम असणार आहे.
एरवी हात खराब करण्याची संधी मिळाली तरी हौस नसते. बागकाम हा अपवाद. हा किडा डोक्यात सोडण्याबद्दल रोचनाचे आणि फोनवर बोलून प्रोत्साहन देणाऱ्या रुचीचे अनंत आभार. हां, येत्या वसंत ऋतूत अनंताचं झाड लावण्याचाही इरादा आहे.
घेवडा खाण्यापेक्षा मी सुरमईचं
घेवडा खाण्यापेक्षा मी सुरमईचं झाड लावून सुरमई खाईन.
आग्गो माझ्ये भटणी!! तुझ्ये सगळे पूर्वज कळवळले ना बघ परलोकांत!!!!
:)
हा किडा डोक्यात सोडण्याबद्दल रोचनाचे आणि फोनवर बोलून प्रोत्साहन देणाऱ्या रुचीचे अनंत आभार.
तरी मोठे लोकं सांगून गेलेत की संगत चांगली ठेवा! पण ऐकायचं नाही!! आता लागलं की नाही हे व्यसन?
आता तुमचा सगळा अलाऔन्स बागकामात खर्च झालेला पहाण्यास उत्सुक! (मिझरी लव्ह्ज कंपॅनियनशिप!!)
:)
:-)
आग्गो माझ्ये भटणी!! तुझ्ये सगळे पूर्वज कळवळले ना बघ परलोकांत!!!!
बरोब्बर नेम लागला! :प
आता तुमचा सगळा अलाऔन्स बागकामात खर्च झालेला पहाण्यास उत्सुक! (मिझरी लव्ह्ज कंपॅनियनशिप!!)
आत्ता कुठे उन्हाळा थोडा कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. थंडीतल्या सगळ्या सुट्ट्या बहुदा खड्डे खणणं, माती बदलणं, वाफा बनवणं ह्यातच खर्च होणार.
काश्मिरात ओकटोबरात लावतात,
काश्मिरात ओकटोबरात लावतात, फुले येऊन गेल्यावर मार्चनंतर काढून ठेवतात.उन्हाळ्याचा नो प्राब्लेम.इराण,स्पेनलाही होते पण काश्मिरचं चांगलं.विकिचं मोठं पान सॅफ्रन चांगलं आहे.पिडांकडे सफरचंद होतात म्हणजे केशर होईलच.प्रयोग करायला काय हरकत आहे?इकडे नाशकातही कोणाकडे रुद्राक्ष येतात भरमसाठ!
मदत हवी आहे.
मी तिन महिन्यापुर्वी हॅगींग कुंड्यांमधे चिनीगुलाबाची रोपं लावली. दोन्ही रोपं एकाच जातीची आहेत (असं नर्सरीवालातरी म्हणाला आणि आणली तेव्हा त्याला फुलं होती ती ही सारखीच होती). पण एवढ्यात एकाच कुंडीतल्या चिनीगुलाबाला फुलं येताहेत. दुसरं रोप फक्त फोफावतं आहे आणि दणकून कळ्यायेताहेत पण फुलं काही येत नाहीत. कळ्या कळेपणातच मरतात्,सुकतात आणि झडून जाताहेत. माती बदलून पाहिली, खतं घातली पण अहं. काय कारण असेल?
तसंच दुसर्या दोन रोपांबद्दल आहे (नाव माहित नाही पण शोभेचीच आहेत, अगदी बारीक लव्हेंडर रंगाची फुलं येतात त्याला आणि हरबर्याच्या पाल्यासारखी पानं आहेत). ही दुसरी दोन्ही रोपं फुलं देताहेत पण एका रोपाची पानं झडुन त्याला नवीन जी पालवी आली आहे त्याला मस्त टवटवीत आणि जरा मोठी पानं येताहेत. पण दुसर्यारोपाची नवीन पालवी देखील आधीसारखी बारीक आहे आणि विशेष टवटवीत दिसत नाही. पण फुलं येताहेत त्यामुळे प्रॉब्लेम नाही :)
चिनी गुलाब म्हणतो त्यात ओफिस
चिनी गुलाब म्हणतो त्यात ओफिस टाइम आणि पोर्चुलका हे दोन प्रकार आहेत.ती बारा ताससुद्धा कडकडीत मिळाले तर उत्तम असे उन्हाचे झाड आहे.कीतीही खत टाकले तरी उन्हाची कमतरता भागवू शकत नाही.खरंतर उन हेच त्याचे खत आहे.झाडांस उन मिळाले की हाताला तडतडीत लागतील.ही खूण आहे.नसल्यास विशविशीत नेभळट असतील.थोडक्यात उन्हात ठेवा.
लवेंडर बरीक फुलं हरभय्राच्या पाल्यासारखी पानं व्हर्बिना असेल.त्याला उन नसले तरी चालेल. बय्राचदा हँगिग कुंड्यात असणारी झाडं म्हणजे कमी उन्हाची असं प्रचलित असलं तरी पहिली दोन तडक्याची आहेत.थंडीत मरगळतात.फोटो टाका.
अय्यो. उन्ह अजिबातच नाही येत
अय्यो. उन्ह अजिबातच नाही येत बाल्कनीत (म्हणजे आधी इतकं यायचं की वाळत घातलेले कपडे विटायचे, म्हणून अता छ्प्पर केलंय.) आणि हो तुम्ही म्हणताय तसं ते एक चिनीगुलाबाचं रोप नेभळट दिसतंय - पानांचा रंग पण उडाल्यासारखा पोपटी दिसतो - बघतो उन्हात ठेऊन.
व्हर्बिना गुगलून पाहिला, थोडं तसंच आहे पण अगदी तसं नाही पण पोटजात वगैरे असावी त्याचीच. मी फोटो टाकेनच.
धन्यावाद माहितीबद्दल. (त्या नर्शरीवाल्याचा मुडदा बशिवला - म्हणे बारा महिने फुलतात चिनीगुलाब- उन-वारा काय लागत नै - हलकट!)
या हँगिंगला एक दोरी लावून
या हँगिंगला एक दोरी लावून थोडे खाली तीन फुटांवर जमिनीपासून केल्यास तिरपे उन लागेल.यामध्ये मनिप्लांट ठेवा तो लोंबकळत राहिल आणि छान दिसेल.माझा फोटो टाकतो नंतर.दाखवलेले झाड उन्हाचेच आहे॥तीन तास उन हवेच.वरच्या आताच्या टोपलीत मनी प्लांट आणि त्याच्याचखाली हे झाड असे करा डबलडेकर.
मखमली/ Gomphrena - Gomphrena
मखमली/ Gomphrena
- Gomphrena globosa - Wikipedia, the free encyclopedia href="https://en.m.wikipedia.org/wiki/Gomphrena_globosa
@अचरटराव - धन्यवाद
अचरटराव तुम्ही सांगितलेला उपाय लागू पडला आणि आमच्या चिनीगुलाबाला फुलं यायला लागली :). तुम्ही सांगितल्याप्रमाणे चिनीगुलाबाचं रोप उन्हं येतात त्या भागात ठेवलं आणि तिनच दिवसात कळ्या फुलल्या. आणि फुलंच नाही तर रोपाचा नेभळटपणा पण गळून पडला, रोप तरतरीत दिसतंय अता.
हा पहिल्या फुलाचा काढलेला फोटो- खास तुमच्यासाठी :)
ती साइट( tinypic dot com)
ती साइट( tinypic dot com) ब्यान असेल तुमच्या ब्राउजरमध्ये ,त्यात पा्राइवट सेटिंग नाहीच तरी आता करेक्शन -फ्लिकरमधून देतो.
चिनी गुलाब
१)
२)चिनी गुलाब
3) हे खरे इनडॅार हे वाढेल हँगिंग पण याला फुले येत नाहीत.
वरच्या एक नंबरची पाने धनुच्या गुलाबापेक्षा वुगळी आहेत. . दोन नंबरची पाने सेम आहेतधनुसारखी पण फुले वेगळी आहेत.
सूचना हव्या.
सावलीत वाढणाऱ्या, भरपूर उकाडा (निदान दोन महिने ३५ से च्या वर) आणि थोडी थंडी (वर्षातले काही दिवस शून्य से.च्या आसपास तापमान जातं) वेली कोणत्या? मला घराच्या प्रवेशद्वाराशी एखाद्या उंच मडक्यात अशी एखादी वेल वाढवायची आहे. वेल वाढली की ती मडक्यावरून खाली घसरणार.
मनी प्लांट सावलीत वाढतं का? थंडी सहन करेल का?
मडकं म्हणा वा अर्न
आपल्याकडे माणूस मेल्यावर त्याला जाळून झाल्यावर ज्या अस्थी परत मिळतात त्या विसर्जन करण्यात येईपर्यंत मधल्या काळात घरात न ठेवता अशा घराबाहेर टांगून (मांजर-कुत्र्यांनी उस्कटू नये म्हणून) ठेवतात.
त्याला उद्देश्यून माझा प्रतिसाद होता...
आता परसू-आवार मिळालंय ना, लावा की तिथे काय ते! हे टांगाबिंगायचे उपद्व्याप कशाला?
बाकी इथे असं फ्रंट साईडला काही टांगाटांगी केली की प्रॉपर्टीची परसिव्ह्ड व्हॅल्यू कमी होते म्हणतात. तेंव्हा जरा विचार करून, नायतर तुमचा घोव भडकायचा!
:)
>>मला घराच्या प्रवेशद्वाराशी
>>मला घराच्या प्रवेशद्वाराशी एखाद्या उंच~~~~"
मॅार्निंग ग्लोरी(आइसक्रिमची फुलं इकडचं नाव) नावाची स्वस्त अन मस्त वेल लावून पाहा.बाकी फ्रॅास्टला सहन करणारी झाडं कमीच पण त्याला उपाय करता येईल.तो urn त्यात थेटच वेल न लावता वेलाची बादली त्यात ठेवायची.दोन महिने वेल छाटून थोडाच ठवून घरात उबदार जागी काचेच्या तावदानापाशी ठेवायची.urn विकत न आणता सिमेंटचा मोठा चौकोन करून त्याला बाहेरून मोझेइक टाइल्स तुकडे लावायचे.उन पावसाला टिकेल आणि सुंदरही दिसेल.आतल्या तळापासून दोन इंच उंचीवर पाणी जाण्यासाठी भोक ठेवा.होजने वरून पाणी घालता येईल आणि तुडुंब भरणारही नाही पावसात.
अचरटजी इथे मी अशी हँगिंग रोपे
अचरटजी इथे मी अशी हँगिंग रोपे पाहीलेली आहेत पण ती अतिव नाजूक पाना-फुलांची असतात म्हणजे इतकी की किंचित वार्याच्या झुळकीनेही डहुळतात. अशी चिमुकली फुले, पाने असलेली रोपे लावुन पहावीत असा (अनाहूत) सल्ला देते. तुम्हाला ग्रीन थंब असल्याने पहीली रोपे काढून (अन्यत्र लावुन) त्या जागी नाजूक रोपे लावणे व ती फुलविणे तुम्हाला शक्य आहे. आमच्या डाऊनटाऊनच्या रस्त्यावरील रोपांचे हे फोटो-
.
या झाडाचे नाव::: Odontonema -
या झाडाचे नाव:::
Odontonema - Wikipedia, the free encyclopedia site https://en.m.wikipedia.org/wiki/Odontonema
एनपीके १९:१९:१९ किंवा
एनपीके १९:१९:१९ किंवा १०:१०:१० जे काही मिळेल ते विरघळणारे खत आणा. अर्धा चमचा पाण्यात विरघळुन महिन्यात एकदा घाला. आत्ता घातलेत तर १५ दिवसात फरक दिसेल.
वाटल्यास अर्ध्या चमच्याचे पण २ भाग करा ( पाव चमचा ) आणि एक-एक आठवड्याच्या अंतरानी घाला पाण्यात विरघळवुन. तुळस असल्यामुळे स्प्रे करता येणार नाही.
थेट खोडावर हे खत घालु नका, खोडापासुन ५-६ सेंटीमिटर अंतर सोडुन मातीत घाला.
जमले तर नर्सरीतुन चांगली माती आणुन कुंडीत घालुन हलक्या हातानी दाबुन घ्या.
-----
कर्वेनगर मधे एक दुकान आहे तिथे तुम्हाला ही खते कमी क्वांटीटीत मिळतील. मिनरल्स पण मिळतात तिथे.
अलंकार पोलिस चॉकीजवळ समर्थ अॅग्रो नावाचे छोटे दुकान आहे.
कंपोस्ट
फक्त पानांसाठी झाडं वाढवणं सोपं असतं. त्यांना चार गोष्टी पुरतात; सूर्यप्रकाश, पाणी, मातीतले कार्बन आणि नत्र. त्यासाठी रासायनिक खतं वापरायची नसतील तर वापरलेली चहापूड-कॉफी, भाज्या-फळांचे उरलेले तुकडे ह्या गोष्टी थेट मातीतही मिसळता येतील; किंवा कंपोस्टचा थर कुंडीत घालता येईल.
कुंडी पुरेशी मोठी असेल तर ह्या चार गोष्टींमुळे तुळस टकाटक वाढेल.
अचरटबाबा - अनंताच्या
अचरटबाबा - अनंताच्या झाडाबद्दल प्रश्न आहे. माझ्या कडे कुंडीत अनंताचे झाड आहे आणि कुंडीत असुन सुद्धा ठीकठाक वाढतय. कळ्या भरपुर येतात, चांगल्या दिड-दोन इंच लांब आणि भरलेल्या पण असतात. पण नंतर त्या कळ्यांच्या मुळाशी काहीतरी बुरशी/कीडीचा स्त्राव असे दिसायला लागते आणि आठवड्यात ती कळी संपुन जाते. कधीकधी पुर्ण कळी काळी पण पडते.
आत्ता पर्यंत २ च फुले फुलली आहेत पण ५० तरी कळ्या मेल्या असतील.
काय करावे?