मी आणि माझी चित्रकला - हौशी चित्रकारांसाठीचा धागा

लहानपणी माझी चित्रकला चांगली होती ह्याला प्राथमिक शाळेतले निकालपत्र ह्याशिवाय दुसरा पुरावा नाही. माध्यमिक शाळेतला चित्रकलेचा तास हा केवळ ह्याच कारणासाठी आठवतो कि एक तर तो सलग दोन तास असत असे आणि दुसरे म्हणजे इतर तासांच्या तुलने निवांत असे, म्हणजे हे दोन तास चित्रकले व्यतिरिक्त काहीही केलं तरी चालत असे.

माझ्या आईची चित्रकला खूप चांगली ( म्हणजे फक्त माझ्यापेक्षा चांगली असं नाही तर बहुतांश लोकांपेक्षा चांगली Smile ) तिने काढलेली जलरंग आणि पेन्सिलशेडींग ची चित्रं हा वेगळ्या धाग्याचा विषय होवू शकेल. त्यामुळे आणि मला एकंदर कलाकुसर आणि रंगसंगतीची जाण आहे असं तिला वाटल्यामुळे तिने मला एक-दोनदा चित्रकलेच्या ईलिमेण्टरि , वगैरे परीक्षांना बसण्याबद्दल सुचवले होते. पण मला माझी चित्रकलेतली एकंदर गती (?) माहिती असल्याने , मी त्याऐवजी इंग्रजी आणि हिंदीच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठांच्या परीक्षा देणं प्रेफर केलं !! चित्रकलेच्या पेपर मध्ये मी चित्रांपेक्षा कल्पकतेवर जास्ती भर देत असे . उदाहरणार्थ माझा आवडता प्राणी असा विषय असेल तर कुत्रा काढण्याची हिम्मत नसल्याने ( किंवा काढला तरी तो कुत्रा आहे हे परीक्षकांना कळेल ह्याची खात्री नसल्याने) मी मासा किंवा हत्ती असा काढायला ( आणि ओळखायला ) सोप्पा प्राणी काढत असे . अर्थात पेपर चित्रकलेचा असल्याने कल्पकतेला मार्क नव्हते . शाळेत चित्रकला आणि शारीरिक शिक्षण ह्या विषयांमुळे माझी टक्केवारी खाली जायची . असो.

कोल्हापुरात आईचा चित्रकार मित्र-मैत्रिणींचा एक ग्रुप होता , ते लोकेशनवर जाऊन जलरंग चित्रकला करत. आईची चित्र किंवा एकंदरीतच चित्र आवडत असली तरी आपण पण चित्र काढावीत असं कधी वाटलंच नाही . आणि ह्या बाबतीत मी बाबांवर गेलीये असं समजून आईनेही कधी माझ्यावर चित्रकला फोर्स केली नाही .

मधल्या काळात इथे लिहिण्यासारखं विशेष काही झालं नाही.

लग्नानंतर पहिल्यांदाच आई-बाबा माझ्याकडे एक दीड महिन्यासाठी आले होते. कॅलिफोर्नियातला हिवाळाही त्यांना थंड वाटत होता . शिवाय संध्याकाळी ४ वाजता अंधार होत असल्याने बाहेर फिरण्यावर अजूनच मर्यादा.
मग एक दिवस मी आईला घेवून michaels मध्ये गेले आणि रंग, कुंचले आणि मुख्य म्हणजे कॅनवास विकत आणले.
भारतात आईची नेहमी एक तक्रार असायची कि निवांत चित्र काढायला सलग असा वेळच मिळत नाही . "जरा चित्र सुरु केलं कि बेल तरी वाजते किंवा बाबांना तेव्हाच काहीतरी विचारायचं/ सांगायचं असतं किंवा कोणाचा फोनच तरी येतो! सुट्टी असली तरी माझा असा वेळच नसतो . " ( अवतरणचिन्हातली वाक्यं आईची . स्पेसिफिकली, बरेच दिवस नवीन चित्र नाही का काढलस ह्या प्रश्नाचं उत्तर).

तर मी तिला सांगितलं, इथे तुला कोणी डिस्टर्ब करणारं नाही तू निवांत चित्र काढत आणि रंगवत बस . त्या स्टे मध्ये तिने काढलेली, रंगवलेली चित्र आणि इतरही वस्तू हा परत वेगळ्या धाग्याचा विषय होईल . पण मग परत जाताना तिच्याकडे फारशी जागा नसतानाही मी उरलेले रंग आणि कॅनवास तिला न्यायला लावले . मी कधी जन्मात चित्र काढणार नाही आणि ते रंग उगीचच वाळून जातील त्यापेक्षा आईने नेलेले बरे असा माझा विचार होता.

नंतर एका ऑक्टोबरमध्ये मला एका रीट्रीटला जावं लागलं. तिथे एका activity मध्ये आम्हाला एक ८बाय १२ चा कॅनवास आणि रंग साहित्य देवून सांगितलं कि तुमच्या संशोधना बद्दल सांगणारं चित्र काढा ( represent your research through art) . माझ्या प्रोफेसरनि सोयीस्करपणे ते रंग आणि कॅनवास माझ्याकडे सरकवून दिले आणि मग मी पण सरसावून चित्र काढलं. ते हे :

1

हे चित्रकलेच्या दृष्टीने काही फार भारी चित्र नसलं तरी माझ्या डोक्यात जसं होतं तसं उतरलं म्हणून मला खूप आवडलं . अजून एक गोष्ट ह्या चित्रामुळे झाली ती म्हणजे आपल्याला चित्र काढायला आवडतं असा एक शोध माझा मलाच लागला !!

आमच्या गावात वाईन आणि रंग असे क्लासेस चालू असतात . दोन किंवा तीन तासात वाईन पीत पीत चित्र काढायचं आणि प्रशिक्षक , रंग, कॅनवास आणि वाईन हे सगळं ते क्लासवाले पुरवतात. काही दिवसांपूर्वी जोडप्यांनी अशा क्लासला जाण्याचं फॅड आलेलं मला माहिती होतं.

मग seattle हून परत आल्यावर मी नवर्याच्या मागे लागले की आपण अशा क्लासमध्ये चित्र काढायला जाऊ. त्याला आत्तापर्यंत माहिती झालय कि मला असं अचानक काहीतरी हॉबी निर्माण होते आणि काही वेळाने ती अदृश्य पण होते . त्यामुळे तोही "हो जाऊ. कुठे जायचं , तू बघ ऑन -लाईन." म्हणून मी कितपत खोल पाण्यात आहे ते बघत होता . (कारण जनरली मला हे ऑन -लाईन शोधणं , बुक करणं वगैरे खूप जीवावर येतं आणि मी ते टाळत असते .) तर माझ्यावर पेंटिंगचा अंमल असल्याने मी येल्पवर रिव्यू बघून चांगला क्लास शोधला मग ग्रुपऑन वर त्या क्लासच कुपोनसुद्धा शोधलं. पण एवढं करून झालं असं कि त्या क्लासच्या कॅलेंडर मध्ये त्या महिन्यात असलेलं एकही चित्र आम्हाला पसंद पडेना . शिवाय दोघांनी एकच चित्र करून परत एकाच घरात दोन एकसारखी चित्रं नको असं पण वाटायला लागलं. मला तर चित्र काढायचंच होतं.
त्यावर उपाय म्हणून आम्ही घरीच वाईन आणि रंग करायचं ठरवलं. कशाप्रकारचं चित्र काढायचं ते आधीच ठरवलं. मग रंग-कुंचले , कॅनवास ( आणि मुख्य म्हणजे वाईन Blum 3 ) आणून घरीच चित्रं काढलं. हा आमचा वीकेंड चा उद्योग. दोन कॅनवास मी आणि दोन नवर्यानी केलेत :

2

हे झालं ऑक्टोबर मध्ये. नंतर नेहमीप्रमाणे आणि as expected माझी चित्र काढायची लहर गेली . नाही म्हणायला मधल्या सुट्टीत किंवा दोन तासांच्या मधल्या वेळात काही चित्र / रेखाटन माझ्या फाईल मध्ये आकाराला येत होती.. पण एकंदरीत चित्रकलेची पॉवर गेल्यासारखं झालेलं.

मग मागच्या वर्षी मस्त कलंदर ह्यांनी मधुबनी चित्रकलेची ओळख करून दिली. प्रिंट काढायच्या कागदावर एक-दोन रेखाटनं काढून बघितल्यावर परत माझी चित्रकलेची पॉवर आली आणि मग ६बाय ८ च्या छोट्या कॅनवास च्या टाइल्सवर मी तीन मधुबनी चित्रं काढली :

31

32

33

मग दोन कॅनवास उरले आणि मधुबनी करण्याइतकी चिकाटी नसल्याने सोप्पी चित्र करू म्हणून मग हा गणपती आणि विठोबा. ह्या चित्रात केवळ रंग-काम मी केलं . गणपती आणि विठोबाचा आकार पेन्सिलने नवर्याने काढून दिला.

4

5

आणि मग हे असच टीव्ही बघत बघत एकीकडे केलं.

6

झालं . आत्ता एवढंच . मागच्या वर्षी खूप सारी झेनटँगल प्रकारची चित्रं काढली , त्यांचे फोटो प्रतिसादातून देईन.
पण त्याआधी बाकीच्या हौशी आणि इतरही चित्रकारांनी आपापले चित्रकलेचे अनुभव आणि चित्रं टाकायला सुरूवात करावी ही विनंती.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

खी खी खी. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विनोद होता तो.

बरोबर. समजवावा लागेस्तोवर तो प्रतिसाद विनोदीच होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळ्यांची चित्रे आवडली. सुंदर काढली आहेत. मीही नुकतीच चित्रे काढायला सुरुवात केलीये. acrylic रंग वापरुन केलेले हे bookmarks.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! फारच सुंदर. तो चिटुकला पक्षी, ढग, डहाळ्या सर्वच किती गोड आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला उजवीकडचा अधिक आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला ढग म्हणजे बुढ्ढीके बाल किंवा आईस क्रीम सारखे डिलिशिअस (या शब्दाची सर स्वादिष्ट ला नाही) वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचि आणि आदिती, खूप खूप धन्यवाद. Angel

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रकलेसाठी थोक मधे सामान घ्यायचं असेल तर पुण्यात स्वस्तात कुठे मिळेल? मला acrylic colours, ब्रश, drawing sheets, स्केचबुक, पॅलेट असं बरंच सामान घ्यायचं आहे. रंगांच्या मोठ्या (१२०ml) ट्युब्स हव्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रविवार पेठेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

गेल्या भारतवारीत मी रवीवार पेठेत जाऊन आलेले. मस्त वाटलं होतं. ती ट्रीप विसरताच येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रविवार पेठेत नेमकं कुठलं दुकान? मला फक्त पुरोहित स्वीट्सचं दुकान आणि ती गल्ली माहित आहे Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Pune to pay tribute to Vincent Van Gogh

Pune, 26 July: Paying a tribute to the popular post-impressionist painter, Vincent Van Gogh on his 126th death anniversary, Dream a Painting, a unique art studio and digital art e-commerce website is organising a unique exhibition. Based on the life of this great Dutch painter, the exhibition titled as ‘Vincent Van Gogh – the genius’ will be free and open to all from July 29th to July 31st between morning 10:30am & evening 8:00pm at The Ravi Paranjape Art Gallery, near Model Colony Post Office, Shivaji Nagar.

The exhibition will be inaugurated on Friday, 29th July at 5:45pm by Sunil Vanarase, Head of Pune IT Park where Ravi Paranjape, a very senior and acclaimed Indian artist will also pay his tribute by taking the art lovers through an Art-Walk between 6:00pm and 7:00pm. Addition to this, Dream A Painting will also host few interesting programs which will be based on the paintings and life of Van Gogh.

On 30th July between 6.30pm to 7.30pm Ravi Paranjape will deliver an Art-Talk on Van Gogh’s most famous and critically acclaimed painting ‘Starry Night’.

On the last day that is 31st July between 6.30pm to 7.30pm there would be a screening of a documentary on the life of Vincent Van Gogh produced by BBC and Australian Network Television.

This exhibition will not only be an interesting & entertaining affair but will also educate the art lovers of Pune about the legend and his immense talent.

Registration is necessary for the Art-Talk & Documentary Screening. Interested art lovers can register themselves on the spot at the venue or can visit on www.dreamapainting.com ordreamapainting@gmail.com for online registration.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे वॅन गॉ ची ओरिजिनल चित्रं आणणार आहेत??? लयच भारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ओरिजिनल नाय ओ.. ओरिजिनल सारखं दिसतं. प्रिंटिंगची टेक्निक वेगळी असते बहुतेक. रंग, स्ट्रोक्स हुबेहुब दिसतात. ओरिजिनल शक्य तरी आहे का आणणं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी जवळ जाऊन बघितल्याशिवाय पेंटिंग आणि प्रिंटिंग यातला फरक कळणार नाही असे इको सॉलव्हन्ट प्रिंटर आहेत. डायरेत्त कॅनव्हास वर प्रिंट होते. कित्येक आर्टिस्ट आजकाल आमच्याकडून कॅनव्हासवर लाईट कलरामध्ये कंप्युटराईज्ड इमेज प्रिंट करून घेतात, नंतर त्यावर अकरेलीक थापतात. बरेच इंटेरिअर डेकोरेटर अशा इमेज रिप्रिन्ट करून खपवतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कित्येक आर्टिस्ट आजकाल आमच्याकडून कॅनव्हासवर लाईट कलरामध्ये कंप्युटराईज्ड इमेज प्रिंट करून घेतात, नंतर त्यावर अकरेलीक थापतात.

काय गरिबी आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

+1.. गरिबी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा गोष्टीसाठी तरी माणसाने मोठ्या गावात राहावे. Sad
मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Documentary screening साठी प्रत्येकी 200rs ticket आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने