Skip to main content

चित्रकला व ओरिगामी

चित्रकला व ओरिगामी मधे कोणाला रस आहे का?
मी नुकतीच चित्रकलेला सुरुवात केलीये. दर वीकेंड एक तरी चित्र काढतेय. काही टिप्स असतील तर नक्की सांगा.
फुलांपासुन सुरुवात केलीये. फुलं कल्पनेनेच काढलीत. शेजारची मांजर प्रत्यक्षात बघुन काढलिये. आणि हा वटवाघुळ, पहिल्याच प्रयत्नात जमला.

स्पर्धा का इतर?

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 21/06/2016 - 06:07

मांजर फारच छोटी दिसत्ये. मी आमच्या तिर्रीला (मांजर) तुमची तक्रार सांगितली. तिर्री माझ्या अंगावरून सरळ चालत पलीकडे गेली आणि मला लाथा मारत झोपून गेली.

सुमी Tue, 21/06/2016 - 09:59

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मांजर लहानच काढलीये.. स्केचिंग अजुन तेवढं जमत नाही. माझ्या माऊचं नाव शोनी. तुम्ही तिर्री नाव का ठेवलं?

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 21/06/2016 - 18:33

In reply to by सुमी

हा चांगला प्रश्न आहे.

आमच्या मांजरीचं कागदोपत्री नाव चंद्रिका. तिच्या दवाखान्यात फोन केला की चंद्रिका असंच सांगावं लागतं. मला दोन नावं आहेत, एक औपचारिक, दुसरं अदिती, वापरायचं. मग तिला दोन नावं का नकोत! म्हणून मी तिला टिल्लू म्हणायला लागले. तेव्हा ती लहानही होती. 'हे घर आपल्याच मालकीचं आहे आणि घरात राहणारे दोन मनुष्यप्राणी आपलेच गुलाम आहेत,' हे तेव्हा तिला पुरेसं जाणवलेलं नव्हतं; म्हणून टिल्लू. टिल्लू हा शब्द लवकरच डिजनरेट होऊन ती तिर्री झाली. आम्ही दोघं घरात आधीपासून होतो, ही तिसरी म्हणून ही तिर्री, अशी चुकीची व्युत्पत्ती काही लोक लावतात. पण ते तसं नाही. त्यापुढेही तिची काही नावं ठेवली गेली, घबडीस्तान, गालिब, खिल्जी, घुबड, चेंटुकू (एका कंप्युटरगेममधला आवाज), चेटूक वगैरे. पण (ऐसीवरचा) एक मित्र तिर्री ह्या नावातच अडकून राहिला, मग व्यावहारिक सोय म्हणून ऐसीवर तिचा उल्लेख तिर्री असा करते. अभारतीयांना 'घुबड' हा शब्द उच्चारता येत नाही म्हणून त्यांना 'घुबडी' असं तिचं नाव असल्याचं सांगते.

ती मांजर आहे; तिला लक्ष द्यायचं असेल तर 'ए कुतरडे' अशी शिवी दिली तरीही ती लक्ष देते आणि दुर्लक्षायचं असेल तर 'अहो चंद्रिकादेवी' अशी हाक मारली तरीही दुर्लक्ष करते.

'नावात काय आहे' हे शहाणपण शेक्सपियरला मांजर पाळूनच मिळालं असणार ह्याबद्दल मला काहीही शंका उरलेली नाही.

.शुचि. Tue, 21/06/2016 - 18:41

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हाहाहा =)) मस्त.
लहानपणी एक बोका आवडायचा मला. पिंगा आणि गबदुल आणि अत्यंत देखणा. त्याला स्वतःचा देखणेपणा माहीत तर होताच पण सार्थ अभिमान होता.
___
कॉलेजात एक भयंकर व्रात्य बोका होता. आम्ही मुली गटाने असा गोल करुन दुपारचे पोहे, बटाटेवडा वगैरे हॉस्टेलमध्ये खायचो. हा सरळ येऊन एखादीच्या अंगावर शू करायचा :(. तरी बरं तिच्याकडे वर्तमानपत्र होतं. असं एकदाच झालय नंतर सगळेजण तो यायच्यासुमारास त्याला त्वरीत हाकलून देत.

सुमी Wed, 22/06/2016 - 10:16

In reply to by .शुचि.

मला बोकेच जास्त आवडतात, मांजर दुर दुर पळते, हात लावलेला फारसं आवडत नाही. बोके मात्र हात लावु देतात.

.शुचि. Wed, 22/06/2016 - 22:38

In reply to by सुमी

बोके रॉक!!!
_____

.

शुक शुक मन्या जातोस की नाही,
की पाठीत घालू लाटणं?
.
.
निवंत आहे अवतीभवती,
तू संधी शोधली नामी
.
भेटीगाठीला सोकावुन तू
फारच गेलास मन्या ..

सुमी Wed, 22/06/2016 - 10:13

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ती मांजर आहे; तिला लक्ष द्यायचं असेल तर 'ए कुतरडे' अशी शिवी दिली तरीही ती लक्ष देते आणि दुर्लक्षायचं असेल तर 'अहो चंद्रिकादेवी' अशी हाक मारली तरीही दुर्लक्ष करते.

अगदी १०० टक्के खरंय हे.. हाहाहा.. माझी माऊ शोनी नावाला प्रतिसाद देते. :)

राजेश घासकडवी Tue, 21/06/2016 - 17:43

चित्रं आवडली. हा पहिलाच प्रयत्न आहे यावर विश्वास बसत नाही. आणि ते मांजरीचं चित्र क्लोजपमध्ये टाकू शकाल का?

ओरिगामीबद्दल - हे वटवाघूळ कसं केलं याचा हस्तकलेचा क्लास घेता येईल का?

सुमी Wed, 22/06/2016 - 10:11

In reply to by राजेश घासकडवी

धन्यवाद. हो, खरंच पहिलाच प्रयत्न आहे. युट्युब व्हिडीओ शेअर करते. मांजरीचं चित्र क्लोजपमध्ये टाकलं.. perspective अजुन जमत आही. शिकतेय.
ओरिगामीबद्दल - हे वटवाघूळ देखिल मी युट्युब व्हिडीओ बघुन केलंय. सोप्पं आहे अगदी. १० मिन्टात होतं. एकदा करुन बघा.

सुमी Wed, 22/06/2016 - 12:57

In reply to by बॅटमॅन

वटवाघूळ माझा फेवरेट आहे.. बॅटमॅन हे कॅरेक्टर आणि प्राणी देखील. म्हणून तर सगळ्यात पहिले ओरिगामीत वटवाघूळ केला.

Kay Wed, 22/06/2016 - 14:29

माऊ आणि वाघूळ हे माझे दोन्ही प्रिय प्राणी. वाघूळ आवडणारे माझ्या व्यतिरिक्त २ मनुष्यप्राणी या जगात आहेत हे ऐकून अस्मादिकास संतोष जाहला. आत्तापर्यंत मी ओरिगामी वापरून फक्त सारस पक्षी बनवला आहे. पुढील कलाकृतींसाठी शुभेच्छा! :)

बॅटमॅन Wed, 22/06/2016 - 15:00

In reply to by Kay

चक्क ड्रकारिस पेक्षाही उच्चस्थानावर वाघळाची वर्णी लागली हे पाहून मी धन्य झालो, खलीसी. सप्तराज्यविजयार्थ तुला हा वाल्गुदेयही मदत करेल बरं.

Kay Wed, 22/06/2016 - 15:32

In reply to by बॅटमॅन

अग्निमकर सम्राज्ञीच्या कंपूत वाल्गुदेयाचे स्वागत असो. आता पश्चिमभूमी पादाक्रांत होण्यास विलंब लागणार नाही.

सुमी Wed, 22/06/2016 - 15:05

In reply to by Kay

सारस पक्ष्याच्या ओरिगामी चे छायाचित्र दाखवू शकाल काय?

(इतकं शुद्ध मराठीत बोलताना अंमळ दवणिय वाटतंय.)

Kay Wed, 22/06/2016 - 15:28

In reply to by सुमी

भाषाशास्त्र असे म्हणते की भाषा शुद्ध किंवा अशुद्ध यांपैकी काहीच नसते. असो.

तुझ्यासाठी हा दुवा पाठवत आहे: http://www.origami-instructions.com/origami-crane.html