"स्त्रीवादाची पश्चिमेतली "तिसरी लाट""

लिंगाधिष्ठीत समाजव्यवस्था , शोषण आणि अत्याचार यांच्या विरोधात उभी राहणारी चळवळ म्हणजे स्त्रीवादी चळवळ होय. याला वैचारिक अधिष्ठान पुरविणारा विचार म्हणजे स्त्रीवाद . स्त्रीवाद तीन सूत्रांवर आधारलेला आहे :
१. मानवी जगाच्या रचनेच्या प्रत्येक पैलूत स्त्रिया महत्वाचे योगदान करतात .
२. समाजाने केलेल्या पद्धतशीर वंचनेमुळे स्त्रियांना आजतागायत आपले योग्य स्थान मिळू शकलेले नाही .
३. स्त्रीवादी चळवळीने वैचारिक संशोधन जरूर करावे , परंतु त्याचा रोख समाज-परिवर्तनाकडे असला पाहिजे .
पाश्चिमात्य देश, विशेषतः अमेरिकेत स्त्रीवादाच्या तीन "लाटा " आल्याचे आढळते . त्यापैकी सध्याच्या, म्हणजे तिसरया लाटेवर या लेखात भर आहे .

१. पहिली लाट : (एकोणिसावे शतक, आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध):
घटस्फोट कायदेशीर होण्याचा आग्रह . अमेरिकन आदिवासी स्त्रियांकडून घेतलेल्या काही संकल्पना : उदा . कुटुंबाची जबाबदारी झटकून टाकणाऱ्या पुरुषावर सामाजिक बहिष्कार टाकणे . मतदानाच्या अधिकाराची मागणी .
२. दुसरी लाट : (१९६० ते १९९०):
या काळात अमेरिकेत विएतनाम युद्ध विरोधी, उपेक्षितांच्या बाजूने, कृष्णवर्णीयांना नागरी हक्क आणि मतदानाचा अधिकार मिळवून देण्याची चळवळ, या जातीचे वातावरण होते . या पार्श्वभूमीवर स्त्रीवादी लढाही फोफावला, अधिक तीव्र झाला . कृष्णवर्णी स्त्रिया, तिसऱ्या जगातील स्त्रिया , इतर अश्वेत स्त्रिया यांना सामावून घेतले गेले . स्त्रीवादी संघर्षाला मार्क्सप्रणीत वर्ग संघर्षाचे परिमाण दिले गेले.
काही महत्वाच्या घटना :
अ. अमेरिकेत नागरी हक्क कायदा-१९६४ पास होणे .
ब. अमेरिकेत "राष्टीय महिला संघटना" स्थापन होणे .
क. महिलांना कायदेशीर गर्भपाताचा हक्क देणारा "रो विरुद्ध वेड " हा कायदा.
ड . बेटी फ्रीडन यांच्या "फ़ेमिनाइन मिस्टिक " या पुस्तकाचे प्रकाशन .

३. तिसरी लाट : १९९० पासून आजपर्यंत :
मुख्य प्रवाहातील पुरुष-सत्ताक माध्यमांनी स्त्रीवाद्यांचे "कर्कश, पुरुष-विरोधी , ब्रा जाळणाऱ्या , लेस्बियन बायका " असे चित्रीकरण समाजमनात ठसविण्यात इतके यश मिळविले की अनेक हुशार मुलीही स्वतःला उघडपणे "स्त्रीवादी " म्हणवून घेणे नाकारू लागल्या . मात्र स्त्रीवादी लढा त्यातील अनेकींना पूर्ण मान्य होता/आहे . काहींना मात्र आता आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे, आता असल्या लढ्याची गरजच काय असेही वाटते आहे .

तिसर्या लाटेतल्या मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात, नैसर्गिकपणे, चारचौघींसारखे जगायचे आहे . लिपस्टिक , सेक्सी ड्रेस, उंच टाचांचे बूट यांना त्यांचा विरोध नाही . हे पाहून दुसऱ्या लाटेतल्या स्त्रिया जरा बुचकळ्यात पडल्या आहेत . त्यांच्या दृष्टीने हे सर्व करणे म्हणजे पुरुषी नजरेला अवास्तव महत्व देणे आहे .

पण यात महत्वाची मेख अशी की स्त्री जीवनाचे कोणते स्वरूप, कोणते पर्याय, एखाद्या स्त्रीने स्वीकारावे हे तिसऱ्या लाटेचा स्त्रीवाद सांगू इच्छित नाही, तर कोणतेही स्वरूप, कोणताही पर्याय स्वीकारण्याचे स्त्रीला स्वातंत्र्य असावे यासाठी तो लढतो .

नैसर्गिक रित्या तरुण स्त्रीला कामसबंध हवेसे वाटणारच- लग्नांतर्गत किंवा लग्नाबाहेरचेही. हे संबंध जीवनाला पोषक , आनंददायी आणि सुरक्षित होण्यासाठी मुलींनी आणि समाजाने काय करावे हा या स्त्रीवादासाठी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे .

कृष्णवर्णी , अश्वेत , तिसऱ्या जगातून आलेल्या स्त्रियांना आपण खरेच सामावून घेत आहोत का असा प्रश्न या वर्तुळांमध्ये नेहमीच विचारला जातो . विद्यापीठीय स्त्रीवादाने सर्वसामान्य स्त्रीच्या गरजा पूर्ण होत नाहीत, त्यासाठी समाजात कार्यकर्त्यांवर आधारित चळवळच उभारावी लागते असे हा स्त्रीवाद मानतो . मात्र वैचारिक संशोधन पुढे चालू ठेवायला त्यांची ना नसते .

आंतरजालीय क्रांतीनंतर कोणतीही मुलगी, गट किंवा संघटना स्वतःची वेब साईट सहजपणे प्रस्थापित करून आपला विचार समाजात मांडू शकतात . पाश्चिमात्य मुलींनी याचा मोठ्या प्रमाणात फायदा उठविला . या वेब साईट्स केवळ वैचारिक न राहता "धमाल' करणाऱ्याही होत्या .

दुसर्या लाटेतल्या अनेक विचारवंत लेखिका अजूनही कार्यरत आहेत . त्यामुळे दुसर्या आणि तिसर्या लाटे मधली सीमारेषा तशी अस्पष्टच आहे . ल्यूस इरीगाराय या लेखिकेने (जन्म १९३०) अत्यंत महत्वाचे विचार मांडले आहेत, त्याचं संक्षिप्त गोषवारा असा की परंपरागत भाषा हे माध्यमच पुरुष-मानसिकता-केंद्रित आहे आणि स्त्रीच्या दुय्यम स्थानाचे ते महत्वाचे कारण आहे . स्त्रियांनी स्वतःची (मानसिकता मांडू शकणारी ) भाषा पूर्णपणे नव्याने निर्माण करायला पाहिजे , तसेच तिच्यातून स्वतःला देव स्वरुपात परत पहायला शिकले पाहिजे . देव-धर्म हेही पुरुषांच्या ताब्यात असल्यामुळे हे होत नाही आहे .
हे झाल्यावरच स्त्रिया पूर्ण मुक्तपणे, स्वतंत्रपणे, पुरुषांबरोबर एक बरोबरीची सहचरी म्हणून संबंध ठेवण्यास मोकळ्या होतील .
xxx

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

झोपेचे सोंग घेतलेल्यांची करमणूक होणे साहजिकच आहे.
आणि माझ्या प्रतिसादात तर्काच्या उड्या कुठे आहेत? जे आहे ते निखळ सत्य आहे.
बाकि,फुक्कटचा आव आणणे फार सोपे असते,मग तो पुरोगामीत्वाचा आव असेल किंवा स्त्रीवादाचा.
:
:
(सत्य is very very कटू)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी

निळ्या, तू झोपेचं सोंग घेतलेलं आहे. जगातला सगळा दुर्व्यवहार बायकांमुळे होतो. बायका पावरबाज असतात. त्या काही कामं करत नाहीत, आळशीपणा करतात तेव्हा जगात बऱ्या गोष्टी करायला पुरुषांना उसंत मिळते. बायकांच्या असण्या-नसण्यामुळेच जग आता आहे तसं आहे, हे तुला माहीत कसं नाही?

आत्तापर्यंत नसेल माहीत तर राहू दे. आता तुला हे ज्ञान एक बाई देत्ये ते घेऊन टाक बघू!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वरील प्रतिसाद हा झोपेच्या सोंगेचे आणखी एक उत्तम उदाहरण आहे.
माझ्या प्रतिसादात मी कोठेही सरसकटीकरण केलं नाही.प्रतिसाद नीट वाचला असेल तर कंसामध्ये "अपवाद" हा शब्द मी वापरला आहे.

त्या काही कामं करत नाहीत, आळशीपणा करतात तेव्हा जगात बऱ्या गोष्टी करायला पुरुषांना उसंत मिळते

शेवटी पुरूषांवर घसरलातच.
हीच ती टिपिकल सो काॅल्ड फुक्कटचा आव आणणारी स्त्रीवादी भूमिका.तुम्ही ती दाखवून दिली त्याबद्दल आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी

अच्चं जालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एखादी सुशील,समजूतदार,कमी बोलणारी,कटकट न करणारी,फालतू हट्ट न करणारी,नखरे न करणारी,इकडचे तिकडे न करणारी स्त्री आयुष्यात कधी भेटलीच तर तिच्या पायावर लोटांगण घालेन म्हणतो!

कधी येता मालक आमच्याकडे आहे एक अशी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या धाग्यातील स्त्रीवादावाबद्दल वाद मुद्देसूद आहेत की नाहीत, या तपशिलात मी शिरलेलो नाही, मूळ धागाकर्त्याची क्षमा मागतो.

एका फुटलेल्या व्यक्ति-वा-वादपद्धतीची टीका/टिंगल मला काहीशी विचार करण्यालायक वाटली.

मुद्दा : डॉकिन्सने इरिगारायच्या भौतिकशास्त्राबाबतच्या अज्ञानमय मताबाबत ताशेरे ओढलेले आहेत.
१. स्त्रीवादातील सध्याच्या धाग्यातील मुद्द्यांबाबत प्रतिवाद म्हणून हे प्रमाण मानावे काय?
२. जर एखाद्या व्यक्तीने डॉकिन्सचे अन्य विषयावरील मत प्रमाण म्हणून दिले असेल, मात्र येथे ते प्रमाण म्हणून स्वीकारले नाही, तर त्या व्यक्तीच्या विचारातील अवैज्ञानिक अशी विसूत्रता मानावी काय.

---------------

माझे मत आणि तत्त्वे येणेप्रमाणे :
वैज्ञानिक दृष्टिकोनात आणि पद्धतीत कोण्यासन्माननीय गुरूचे म्हणणे (त्या गुरूचे म्हणणे आहे, याच निकषावर) प्रमाण होऊ शकत नाही.
गुरू सन्माननीय होण्याचा मार्ग असा की, योग्य निष्कर्षापर्यंत पोचण्याकरिता (प्रत्यक्ष, अनुमान, उपमान प्रमाणे वापरून) युक्तिवाद दिल्याची अनेक उदाहरणे असतात. हे युक्तिवाद सारस्वरूपाने सहज पटू शकतील असे घडवण्याची हातोटी असते, अशा गुरूबद्दल मला सन्मान वाटतो.
असा युक्तिवाद मला पटला, तर तो युक्तिवाद मी (गुरूचा संदर्भ देऊन) खुद्द वापरू लागतो. येथे गुरूचा संदर्भ (गुरू आहे, हे इतक्यापुरता) प्रमाण म्हणून काहीच वजनाचा नाही. तो युक्तिवाद कुशल सारांशाने मांडल्याबाबत गुरूला पोच असते, इतकेच.
त्यामुळे त्या गुरूने जर कुठल्या विषयाबाबत न पटणारा युक्तिवाद केला असला, तर (गुरूने केला म्हणून) त्याला प्रमाण म्हणून काहीच वजन येत नाही. अर्थात त्या युक्तिवादाचे खंडन केले म्हणून गुरूने अन्यत्र काही पटण्यासारखा युक्तिवाद केला त्या अन्य युक्तिवादाचे काही नुकसान होत नाही.

तस्मात् समर्थ युक्तिवाद वापरताना गुरूचा संदर्भ देणे ही सोय आहे, वैज्ञानिक विचारातील शब्दप्रामाण्य नव्हे. संदर्भ न देणे हे अवमानकारक वागणे ठरेल, युक्तिवाद सुचला त्या गुरूचा संदर्भ जरूर द्यावा. परंतु गुरूचे नाव हे प्रमाण नव्हे. त्यातील युक्तिवाद प्रमाणाकरिता वापरावा.
उलट गुरूचा प्रत्येक युक्तिवाद अंतर्गत निकषांवर तोलणे, आणि योग्य वाटल्यास स्वीकारणे वा न स्वीकारणे, या धोरणात वैज्ञानिक सुसूत्रता आहे. विस्कळितपणा नाही.

वैज्ञानिक चर्चेत आपण गुरूच्या मतांचा संदर्भ देतो, ते व्यक्तिपूजा-प्रामाण्याकरिता असतात, आणि एखाद्या व्यक्तीचे मत संदर्भ देऊन स्वीकारले, तर ते शब्दप्रामाण्यामुळे स्वीकारले, अशी श्रोत्याची किंवा वाचकाची कल्पना होऊ शकते. ती चुकीची आहे. अशी चुकीची कल्पना झाली, तर पुढच्या वेळी त्या गुरूचे मत स्वीकारले नाही, तर वैचारिक विस्कळितपणा असल्याचा भास होऊ शकेल. पण तसा भास व्हायला नको.

म्हणूनच की काय वैज्ञानिक निबंधात बहुतेक करून मूळ वाक्यांत पूर्वसूरीचा नामोल्लेखही टाळतात (क्वचित नामोल्लेख करतातही), पण (बहुतेक करून) अंत्यटीप किंवा तळटीप म्हणून त्या नावांची यादी दिलेली असते. असे केल्यामुळे गुरूचा सन्मानही होतो, पण वाचकाला प्रथम युक्तिवाद दिसतो, बाबावाक्यप्रामाण्याचा भास होत नाही.

परंतु वैज्ञानिक निबंधातली अंत्यटीप-तळटिपांची शैली सामान्य चर्चेकरिता बोजड होऊ शकते - गुरूच्या नावाचा उल्लेख युक्तिवादाच्या वाक्यातच करणे प्रवाही म्हणून आपण स्वीकारले पाहिजे. तरी सन्मानासाठी नामोल्लेख, प्रमाणाकरिता युक्तिवाद, असा नीरक्षीरविवेक करूनच वाचन/चर्चा केली पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटतं निवाडा देताना दोन्ही पक्षांना 'आपल्यालाच त्याने बरोबर म्हटलं आहे' असं म्हणायला लावायची हातोटी धनंजयकडे आहे. Smile

दुर्दैवाने डॉकिन्सने ज्या विधानांची खिल्ली उडवली आहेत ती माझ्यासमोर नाहीत. पण तशी विधानं केलेली असतील तर ती निश्चितच खिल्ली उडवण्याच्या लायकीची आहेत. यावरून त्या बाईने मांडलेली संपूर्ण भूमिका चुकीची ठरते का? वाटत नाही. मात्र 'मानवी भाषाव्यवहार पुरुषप्रधान आहे. बघा भौतिकशास्त्रासारखं शास्त्रही पुरुषवादी आहे' यासारख्या भूमिकेला पुष्टी देण्यासाठी तिने ज्या पातळीवर जाऊन प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नांबद्दल किंवा तिच्या क्षमतेबद्दल निश्चितच मोठी प्रश्नचिन्हं उभी राहातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मानवी भाषाव्यवहार पुरुषप्रधान आहे. बघा भौतिकशास्त्रासारखं शास्त्रही पुरुषवादी आहे' यासारख्या भूमिकेला पुष्टी देण्यासाठी तिने ज्या पातळीवर जाऊन प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नांबद्दल किंवा तिच्या क्षमतेबद्दल निश्चितच मोठी प्रश्नचिन्हं उभी राहातात.

फ्याशनेबल नॉन्सेन्स नामक पुस्तकाचा दुवा वर दिलेला आहे. त्यात बेसिकली हेच सांगितलेलं आहे. हे सोशल सायन्सेसवाले काही लोक्स उगा मोक्कार फॉर्म करायचा म्हणून क्वांटम फिजिक्स, सेट थेरी, रिअल अ‍ॅनॅलिसिस, इ. मधल्या काही संज्ञा अतिढिसाळपणे वापरतात. त्यांचा आड्यन्स हा बेसिकली सायन्सगणितशत्रू असतो फॉर द मोस्ट पार्ट, त्यामुळे ते खपून जातं- रादर लोकं डोक्यावर घेतात कारण त्यांना ते लै भारी वगैरे वाटतं. या लोकांना तशीही सायंटिफिक अ‍ॅप्रोचची सवयबिवय कितपत असते याबद्दल डौटच आहे. त्यामुळे यांच्या थेर्‍या कैकदा 'थेरे' भासतात. सारांश इतकाच की काय लिहायचे ते लिहा, मात्र निव्वळ परिभाषा रोचक वाटते म्हणून हवामहल बांधले तर ते हवामहल आहेत हे कधी ना कधी तरी समजेलच.

बायदवे प्रिन्सिपिआ हा ग्रंथ म्हणजे पुरुषी सायन्सने स्त्रीत्वयुक्त निसर्गावरती केलेला बलात्कार अशी मांडणी करणार्‍या सँड्रा हार्डिंग या फेमिनिष्ठ बाई.

https://en.wikipedia.org/wiki/Sandra_Harding

अशी मांडणी होण्याचे मुख्य कारण म्ह. एव्हरिथिंग इज़ कल्चरल हे अ‍ॅक्झिअम. आता एखाद्या संस्कृतीला काय आणि कितपत महत्त्वाचे वाटते त्यावरून कुठली शास्त्रे कितपत विकसित होतात हे ठरते, उदा. ग्रीकांची भूमिती आणि भारतीयांचा अल्जेब्रा. पण याचा अर्थ युरोपियन अल्जेब्रा आणि भारतीय अल्जेब्रा एकमेकांच्या विरोधी आहेत असे कुठेय? पण हा नुआन्स दुर्लक्षिला तर फेमिनिस्ट सायन्स वगैरे थेरे सुरू होतात. सायन्समध्ये स्त्रियांना स्कोप जास्त दिला पाहिजे वगैरे वाक्यांनी सुरू झालेली मांडणी मग मास एनर्जी वाले समीकरण हे लिंगाधारित भेदभाव करणारे आहे वगैरेपर्यंत जाऊन पोहोचते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

राजेश मेटाविचार करणार (आणि तो मेटाविचार योग्यही आहे).

माझा रोख येथील सदस्यांनी एकमेकांना वैज्ञानिक विचारसरणीवर जोखण्याबाबत आहे.

डॉकिन्स आणि डॉकिन्सने सूचित केलेली भौतिकशास्त्राचे अज्ञान दाखवणारी इरिगाराय हे निमित्त होते. "डॉकिन्सचे ताशेरे" ही साधनसामग्री वापरताना येथील सदस्यांनी एकमेकांच्या (म्हणजे येथील सदस्यांच्या) वैज्ञानिक विचारसरणीबाबत शंका विचारणे, त्याबाबत धोरणे आणि तत्त्वे मी सांगत होतो.

डॉकिन्सचे काही संदर्भ ग्राह्य मानणे, आणि काही संदर्भ अग्राह्य मानणे, या इतपतच जर असेल तर ती वैज्ञानिक दृष्टीतील विसंगती मानता येत नाही. डॉकिन्सचे उत्क्रांतिविषयक युक्तिवाद तपासले आणि पटले, स्त्रीवादविषयक युक्तिवाद तपासले आणि पटले नाहीत, हे उत्तर वैज्ञानिक दृष्टीशी सुसंगत आहे. असे उत्तर देणे, म्हणजे डॉकिन्सचा स्त्रीवादविषयक युक्तिवाद चूक आहे असे नव्हे. पण मग डॉकिन्सचा स्त्रीवादविषयक युक्तिवाद येथील सदस्याने युक्तिवाद म्हणून पटवला पाहिजे - तुम्ही डॉकिन्सचा उत्क्रांतिविषयक युक्तिवाद मानता, म्हणून स्त्रीवादविषयक युक्तिवाद मानला पाहिजे, हा युक्तिवाद ठीक नाही.

अर्थात डॉकिन्स वा त्याच्या वक्तव्यातील इरिगारायचा वैज्ञानिक दृष्टिकोन विचार घेणेही कुठल्यातरी मेटा मेटा-मेटा स्तरावर उचितच आहे.
म्हणजे डॉकिन्सने "ही बाई स्त्रीवादाची आणि भौतिक-अज्ञानाची सरमिसळ करते, अशी सरमिसळ स्त्रीवादी तत्त्वांमध्ये अंतर्भूत आहे काय?या सरमिसळीच्या बाबतीत ही बाई प्रातिनिधिक आहे काय? डॉकिन्स प्रातिनिधित्व सिद्ध न करता त्या बाईचे citation प्रातिनिधिक म्हणून देत असेल जर त्याने योग्य युक्तिवाद केला आहे काय? समजा त्या बाईची अनेक मते आहेत. त्यात काही स्त्रीवादी तत्त्वे ठोस आधारावर आहेत. वेगळी काही तत्त्वे भौतिकशास्त्र विरोधी आहेत. डॉकिन्स तत्त्वेची खिल्ली उडवत थेट युक्तिवाद न करता तत्त्वेचा प्रतिवाद केल्याचा आभास निर्माण करत आहे का? डॉकिन्स बाबावाक्यप्रामाण्य वापरतो, की संदर्भांचा युक्तिवादांमध्ये सुयोग्य उपयोग करतो>
असाच मेटा-मेटा विचार डॉकिन्सच्या संदर्भातील अंतर्गत इरिगारायच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाबाबत विचार करणेही उचितच आहे. इरिगाराय बाबावाक्यप्रामाण्य वापरते, की संदर्भांचा युक्तिवादांमध्ये सुयोग्य उपयोग करते.

हे सर्व मेटा मेटा-मेटा स्तरावर उचित असले, तरी माझा प्रतिसाद येथील चर्चेबाबत होता.
जर येथील कोण्या सदस्यांनी डॉकिन्सचे वक्तव्य युक्तिवाद म्हणून अनुचित ठरवले (डॉकिन्सचे म्हणून नव्हे, तर युक्तिवाद म्हणून), तर मग डॉकिन्स वैयक्तिकदृष्ट्या वैज्ञानिक दृष्टीचा आहे की नाही, ही बाब येथील चर्चेत नि:संदर्भ ठरू लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Right Diet for Gender Equality -

Gender inequality begins in the womb. Every year, 16 million adolescent girls give birth, most in low- and middle-income countries. If a mother lives in an area where stunting rates are high and she is in her mid-teens, her child is more likely to be stunted – and thus more susceptible to disease and largely irreversible cognitive underdevelopment, adversely affecting their ability to benefit from education and reach their full potential.

These children will usually go on to earn less, which increases their likelihood of living in poverty, being malnourished, and, as a result, facing a higher risk of developing chronic diseases such as diabetes and hypertension later in life. And, given the societal and economic biases against women in most countries, these early life circumstances place girls at an even more severe disadvantage. The cycle then repeats itself; these disempowered and malnourished women give birth to stunted babies, perpetuating the cycle of inequality.

(१) गरीब स्त्रियांना कुपोषणास तोंड द्यावे लागते.
(२) त्यातून डायबेटिस व रक्तदाब यासारखे विकार उद्भवतात
(३) जोडीला स्त्रियांच्या विरुद्ध बायस असतोच
(४) गर्भवती स्त्रियांची मुलं कमकुवत निपजतात
(५) परिणाम : १ ते ४ चे सायकल सुरुच राहते

आणि म्हणून -

We must eliminate all factors that perpetuate gender inequality. And that starts with better nutrition for all. The next century of progress depends on it.

याला लागणारा निधी कोण देणार ?

उत्तर सोपं आहे. या शोषितांकडे पैसे नसतातच. तसेच त्यांच्याकडून निधी अपेक्षित करणं हा त्यांच्यावर अन्याय्य नाही का ? त्यांच्याकडून निधी घेणे हे Morally Repugnant नाही का ?

मग उरलं कोण ?

हां सापडलं उत्तर - मध्यमवर्ग व उच्चभ्रू. नाहीतरी यांनीच शोषण केलेय या उपेक्षितांचे. मध्यमवर्ग व उच्चभ्रू मंडळींना दुसरा उद्योगच नसतो ना. आणि जोडीला एकतर हिपॉक्रसी असते नाहीतर आपमतलबीपणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणाला कशाचं ही म्हण कुणाकुणाला आठवली?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'It is difficult to get a man to understand something, when his salary depends on his not understanding it. ___ Upton Sinclair

कॉस्ट्स इग्नोअर करणे ही काही समानतावाद्यांची (उदा. जेंडर इक्वॅलिटी) लाडकी स्ट्रॅटेजी असते. कॉस्ट्स अस्तित्वात नसतातच आणि सगळं नि:शुल्क असतं असं गृहित धरलं की मस्त लेख पाडता येतात. संयुक्त राष्ट्रात मानद पदावर बसून मिरवता येतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

> कॉस्ट्स इग्नोअर करणे ही काही समानतावाद्यांची (उदा. जेंडर इक्वॅलिटी) लाडकी स्ट्रॅटेजी असते.
आणि सोर्स ऑफ वेल्थ इग्नोर करणे त्यांच्या विरोधकांची.

कॉस्ट आहे, की रीपेमेंट अथवा फी/प्रोटेक्शन मनी आहे, हे ठरवायच्या आधीच त्याला कॉस्ट म्हणणे म्हणजे वाद करण्यापूर्वीच व्याख्येद्वारा उत्तर ठरवणे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॉस्ट आहे, की रीपेमेंट अथवा फी/प्रोटेक्शन मनी आहे, हे ठरवायच्या आधीच त्याला कॉस्ट म्हणणे म्हणजे वाद करण्यापूर्वीच व्याख्येद्वारा उत्तर ठरवणे आहे.

(१) मुलीचे आईवडील मुलीला लहानाची मोठी करतात. मुलगीला कमी पोषक आहार देतात. व मुलग्याला जास्त पोषक आहार देतात.

(२) मूळ लेखात लेखिकेने मुलींना पोषक आहार दिला जावा अशी आग्रहाची मागणी केलेली आहे.

(३) पोषक आहार देणे ही मुलगी ला रीपेमेंट अथवा फी/प्रोटेक्शन मनी म्हणायला तोपर्यंत माझा विरोध आहे जोपर्यंत तो मनी त्या मुलीच्या आईवडिलांव्यक्तिरिक्त इतर कोणाकडूनही घेण्याचा सरकार्/युनो चा इरादा आहे तोपर्यंत. रिपेमेंट जी काय द्यायची ती द्या पण ती फक्त त्या मुलीच्या आईवडिलांकडून वसूल करा प्लस वसूलीचा खर्च पण वसूल करा. पण समस्या अशी आहे की ते आईवडील बहुतेक वेळी आर्थिक दृष्ट्या दुर्बल असतात व म्हणून इतरांकडून ते पैसे उकळून घेऊन ही योजना राबवायचा युनो चा इरादा असतो.

( इथे मुलगीच्या ऐवजी मुलगा असता तरीही मी आर्ग्युमेंट बदलले नसते. माझे नेमके म्हणणे हे आहे की अपत्यांची पूर्ण जबाबदारी आईवडीलांचीच असायला हवी. इतरांवर त्या जबाबदारीचा भार जबरदस्तीने टाकणे अनिष्ट आहे. मग ते अपत्य मुलगी असो वा मुलगा. केवळ युनो म्हणतं म्हणून हे धोरण विश्वावर लादले जाता कामा नाही. आईवडील अपत्याला कमी पोषक आहार देतात म्हणून इतरांकडून पैसे उकळून त्या अपत्याला पोषक आहार देणे हे मला अमान्य आहे. इतरांनी स्वेच्छेने दिले तर ठीक आहे. )

थोडक्यात सांगायचे तर या लेखाच्या लेखकांनी (Ngozi Okonjo-Iweala, LAWRENCE HADDAD) फेमिनिझम व सोशॅलिझम ह्या दोन्ही बाबी मिक्स केलेल्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे बराच ग्रे झोन आहे.

(पुढील प्रतिसादादात सर्व महत्त्वाच्या वाक्यांत "अपत्य" हे लिंगनिरपेक्ष पद वापरले आहे. त्यामुळे "अमुक रंगाची अदलाबदल केली तर माला काही फरक पडत नाही" असे वेगळे सांगायची गरज पडू नये.

आईबापांनी जन्मलेल्या अपत्यांना पाळताना त्यांचा खून करू नये, वगैरे, कायदे असतात.

त्यांच्याबाबत आर्थिक नीतिमत्ता बघायची तर विश्लेषण असे काही असावे. आईच्या शरिरापासून सुटे झालेले अपत्य काही प्रमाणात आईवडलांच्या मालकीचे नसते. काही आईबाप अपत्यांना टाकतात आणि सार्वजनिक अनाथालय त्यांची जबाबदारी स्वीकारते.

त्यामुळे असे दिसते की अपत्य हे आईबाप व बाकी-सगळे-लोक यांच्यात संगोपनाची जोड-जबाबदारी असते. एका टोकाला आईबाप जबाबदारी पूर्ण झुगारून मूल (कुणीतरी जबाबदार व्यक्ती उचलेपर्यंत लगेच मरणार नाही अशा स्थितीत) त्यागू शकते. बाजारात आईबापांना ही मुभा आहे, तर ते अपत्य पाळताना घ्यावी लागणारी काळजी, त्यावर अन्य लोकांची देखरेख, ही मर्यादा=किंमत मोजावी लागेल. हा नुसताच कॉस्ट नाही, तर बाजारभावाने ठरवला जाईल असा व्यवहार आहे.

लिंग अथवा लिंगचे अपत्य नीट पाळायचे नसेल तर आईबापांनी टाकून द्यावे. काहीतरी सुख मिळते, म्हणून ते अपत्य आईबापांना आपल्या घरीच पाळायचे असेल, तर त्या अपत्य-लालन-सुखासाठी त्या अपत्याच्या अन्य मालकांनी ठरवलेली किंमत मोजावी. ती ठरवलेली किंमत आईबापांच्या वैयक्तिक ऐपतीनुसार कमीअधिक (स्लायडिंग स्केल) आहे (किंवा नाही), पण त्याचा बाजारभाव अपत्याच्या लिंगाने विवक्षित आहे की नाही, ते बाजार अजून ठरवतो आहे. बाजारभाव चढेल-उतरेल, त्याबाबत आर्थिक नीतिमत्ता/जुलूम काय आहे?

---
बीजसंयोगाच्या (कन्सेप्शन) वेळी, की २० का २८ आठवड्यांनी का जन्म झाल्यावर असे वेगवेगळ्या समाजांत फरक असतात. पण साधारणपणे कुठल्यातरी अशा वेळी आई(बापां)ना अपत्यावर असलेला पूर्ण अधिकार संपवून अन्य लोकांना आईबापांच्या वागण्यावर अंकुश आणता येऊ शकतो.
हे वाक्य "अनाथालयात टाकून द्यावे" अशा संदर्भात आहे. पण लिंगविवक्षित गर्भपाताशी काही थोड्याच विषयांतराने संबंध येतो. गर्भजलपरीक्षणानंतर एका वा दुसर्‍या लिंगाच्या गर्भांचा अधिक प्रमाणात पात (कायद्याने संमत अशा काळात) होत असेल, तर [भारताच्या कायद्याच्या विपरीत] माझ्या मते हे फौजदारी कायद्याच्या आख्त्यारीबाहेर आहे. मात्र हे आकडे एक सामाजिक आणि आर्थिक निर्देशांक म्हणून महत्त्वाचे आहेत, म्हणून जरूर मोजले जावेत, मी त्यांच्याकडे लक्ष ठेवून असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा मूळ मुद्दा वेगळ्या शब्दात सांगतो. जर मुलींना असमान वागणूक मिळते असा दावा करून जगाकडून निधी जमवून त्या कुपोषित मुलींना सकस आहार पुरवणे ह्याचे मुख्य दुष्परिणाम - (अ) अविकसित आईवडिलांच्या बेजबाबदारपणाला खतपाणी मिळते. कारण आईवडिलांना असा संदेश जातो की ते कसेही वागले तरी त्यांच्या मुलींना सकस आहार पुरवला जाईल. त्या मुलीवर अन्याय होत असेल वा नसेल ... आईवडिलांच्या free-rider वृत्तीस खतपाणी मिळते. (ब) हा आहार पुरवण्यासाठी जो पैसा उभा केला जातो तो विकसितांच्या खिशातून घेतला जात असल्यामुळे विकसितांच्या मुलांच्या तोंडचा घास (तो अत्युच्च दर्जाच्या खाद्याचा असला तरी) काढून घेतला जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...आईवडिलांच्या free-rider वृत्तीस खतपाणी मिळते.

हा जरी सर्वमान्य शब्दप्रयोग असला तरी ह्या संदर्भात free-rider चा निराळाच अर्थ लक्षात येऊन 'ख्खिक!' झालं!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

We must eliminate all factors that perpetuate gender inequality. And that starts with better nutrition for all. The next century of progress depends on it.

ही तीन वाक्ये तुम्ही वर उद्धृत केलेली आहेत, आणि "काय केले पाहिजे" याबाबत यातील पहिली दोन वाक्ये आहेत.

तुम्ही दिलेल्या दुव्यावर दिलेला निबंध वाचला. "काय केले पाहिजे" याबाबत तुम्ही म्हणता, की दुव्यावरच्या लेखाच्या संदर्भात :

जगाकडून निधी जमवून त्या कुपोषित मुलींना सकस आहार पुरवणे

या मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. परंतु हा मुद्दा लेखात मला सहज सापडला नाही. नजरचुकीने राहिला असेल, म्हणून तुम्ही उद्धृत करून द्यावा.

To improve nutrition outcomes for girls and women|, we need to scale up proven nutrition interventions and ensure that other development programs take nutrition into account|. It is critical, for example, that we promote early and immediate breastfeeding| – an incredibly powerful tool against both stunting and obesity.

उपवाक्य जरी लिंगविवक्षित असले, तरी उपवाक्य| आणि उपवाक्य लिंगविवक्षित नाहीत. म्हणजे स्तनपान देणे हे बापाला जमत नाही, आईला जमते इतपत लिंगविवक्षित आहे, परंतु तुमचा मुद्दा अपत्याच्या लिंगाबाबत विवक्षित आहे. तसा मुद्दा येथे दिसत नाही.

----

आईवडिलांच्या free-rider वृत्तीस खतपाणी मिळते.

हा मुद्दा अपत्याच्या लिंगाच्या विवक्षित नाही, खरा. पण आईवडील नाहीतरी अपत्याचा अनाथालयात त्याग करू शकतात - म्हणजे पूर्णच free-rider. परंतु त्या अपत्यावर बाकीचे लोक लालनपालनाचा हक्क सांगतात, आणि अनाथालय चालवतात, हे विशेष. कारण असावे काहीतरी - कुतूहल असेल तर सर्वेक्षण करू शकू. परंतु त्या अपत्याने केलेल्या भावी आर्थिक व्यवहाराबाबत आशा असावी. (नाहीतर जॉनथन स्विफ्ट म्हणतो, तसे टाकून दिलेले अपत्य बिस्मिल्ला करून मटनाने कितीतरी पोटे भरता येतील. त्यापेक्षा अधिक अर्थकारण ते अपत्य जिवंत राहिले तर होत असावे, म्हणून मूल जिवंत ठेवण्याची खटपट होत असावी. माझा आपला कयास. पण कारण शोधण्यात माझा कयास चुकला असला तरी the market has spoken की मूल जिवंत ठेवणे तुलनात्मक फायद्यात पडत असावे.) आईवडील अनाथालयात टाकत नसतील, तर पूर्ण free-riderपेक्षा काहीसा फायदाच.

विकसितांच्या खिशातून घेतला जात असल्यामुळे विकसितांच्या मुलांच्या तोंडचा घास

पण मुद्दा हा आहे, की आईवडील सोडून बाकीच्या लोकांना ही अपत्ये धडधाकट तगण्यात किंमत देऊन विकत घेण्यालायक काही फायदा आहे का?
विकसितांच्या अपत्यांच्या मोठेपणी त्यांची मजुरी करण्यासाठी धडधाकट लोक उपलब्ध असावेत, म्हणून विकसित लोक निव्वळ किंमत देत आहेत. विकसित मुलांच्या भावी सोयीसाठी - कॉलेज शिक्षणासाठी, किंवा भावी नोकरचाकराच्या उपलब्धतेसाठी - विकसित आईबाप गुंतवणूक करत असतील, आणि त्यासाठी विकसित अपत्याच्या तोंडून घास काढत असतील, तर त्यांची मर्जी (?). पण एक विकसित कुटुंब भावी धडधाकट नोकरचाकरांसाठी गुंतवणूक करत असेल, आणि दुसरे विकसित पालक अशी सोय न करता अपत्याच्या मोठेपणी डल्ला मारून धडधाकट नोकरचाकर शोधून वापरत असतील, तर विकसितांपैकी free-rider मुद्दा येतोच. त्यामुळे भावी धडधाकट नोकरचाकरांच्या उपलब्धतेकरिता बाकी विकसित लोक किमतीचा भार कसा वाटून घेतात, त्याबाबत त्यांच्यांत लिलाव होतो आणि ठराव होतो. विकसितांपैकी free-rider जे आहेत, त्यांच्याकडून बाकीचे विकसित लोक वसुली करून घेतील. ही केवळ free-rider कडून वसुली आहे, त्याच्या अपत्याच्या तोंडून घास वगैरे काढणे नाही.
उपयुक्त गुंतवणूक करणारेही विकसित, free-riderही विकसित, आणि वसुली करणारेही विकसितच.

---

अ‍ॅटलस श्रग्ग्ड ही कल्पितकथा आहे, पण या जगातही श्रगण्याचे स्वातंत्र्य आहेच की अ‍ॅटलसांना. तरी फारसे श्रगताना दिसत नाहीत. बाजारात न-श्रगण्याच्या किमतीत काहीतरी उपयुक्त विकत मिळत असावे, म्हणून श्रगत नाहीत - the market has spoken! बाजाराने ठरवलेली किंमत चुकलेली आहे, तर ते गणित अ‍ॅटलासांना द्या - गणित बरोबर असले आणि पटले, तर अ‍ॅटलस नक्कीच श्रगतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख लिहिणार्‍या दोघांनी लेखामधे निधी चा उल्लेख केलेला नाही पण लेखामधे Global Nutrition Report चा दुवा दिलेला आहे. या रिपोर्ट च्या २९ व्या पानावरून -

To improve accountability, all countries
should establish national nutrition targets, based
on the WHA global targets to improve maternal, infant,
and young child nutrition and on the nutrition-related
targets of WHO’s global monitoring framework for
noncommunicable diseases

DELIVER BETTER NUTRITION OUTCOMES WITH EXISTING
FUNDING. To justify calls for more funding, governments
and donors should continue to invest in ways
of delivering better nutrition outcomes with existing
funding. They should also demonstrate how they are
seeking to improve the quality and effectiveness of
current spending. Governments should continue to
document their nutrition spending and engage with
researchers to determine costs of nutrition strategies.
Donors should report their disbursements, and
civil society organizations should continue to call
for transparent budgets. Governments and donors
should increase their work with researchers to estimate
budget allocations to obesity and nutrition-related
noncommunicable diseases.

यात देणगीदारांचा उल्लेख आहे. पण प्रत्येक देशाच्या सरकारने सुद्धा खर्च करणे अपेक्षित आहे. व जोडीला ट्रॅकिंग, मॉनिटरिंग व रिपोर्टिंग चा खर्च देखील आहे.

---------------

कुपोषण :

म्हणून तुम्ही उद्धृत करून द्यावा.

याच रिपोर्ट मधे "malnutrition" हा शब्द किमान २०० वेळा आलेला आहे.

---

हा मुद्दा अपत्याच्या लिंगाच्या विवक्षित नाही, खरा. पण आईवडील नाहीतरी अपत्याचा अनाथालयात त्याग करू शकतात - म्हणजे पूर्णच free-rider. परंतु त्या अपत्यावर बाकीचे लोक लालनपालनाचा हक्क सांगतात, आणि अनाथालय चालवतात, हे विशेष. कारण असावे काहीतरी - कुतूहल असेल तर सर्वेक्षण करू शकू. परंतु त्या अपत्याने केलेल्या भावी आर्थिक व्यवहाराबाबत आशा असावी. (नाहीतर जॉनथन स्विफ्ट म्हणतो, तसे टाकून दिलेले अपत्य बिस्मिल्ला करून मटनाने कितीतरी पोटे भरता येतील. त्यापेक्षा अधिक अर्थकारण ते अपत्य जिवंत राहिले तर होत असावे, म्हणून मूल जिवंत ठेवण्याची खटपट होत असावी. माझा आपला कयास. पण कारण शोधण्यात माझा कयास चुकला असला तरी the market has spoken की मूल जिवंत ठेवणे तुलनात्मक फायद्यात पडत असावे.) आईवडील अनाथालयात टाकत नसतील, तर पूर्ण free-riderपेक्षा काहीसा फायदाच.

मुद्दा सुयोग्य आहे. सहर्ष मान्य. इस बात पर आपको पार्टी. सिरियसली.

---

पण एक विकसित कुटुंब भावी धडधाकट नोकरचाकरांसाठी गुंतवणूक करत असेल, आणि दुसरे विकसित पालक अशी सोय न करता अपत्याच्या मोठेपणी डल्ला मारून धडधाकट नोकरचाकर शोधून वापरत असतील, तर विकसितांपैकी free-rider मुद्दा येतोच. त्यामुळे भावी धडधाकट नोकरचाकरांच्या उपलब्धतेकरिता बाकी विकसित लोक किमतीचा भार कसा वाटून घेतात, त्याबाबत त्यांच्यांत लिलाव होतो आणि ठराव होतो. विकसितांपैकी free-rider जे आहेत, त्यांच्याकडून बाकीचे विकसित लोक वसुली करून घेतील. ही केवळ free-rider कडून वसुली आहे, त्याच्या अपत्याच्या तोंडून घास वगैरे काढणे नाही.

साफ अमान्य.

तुमची मुलं आम्हाला भावी नोकर म्हणून मिळू शकतील म्हणून तुमच्या मुलांच्या पोषणाचा खर्च आमच्यावर (सरकारच्या माध्यमाद्वारे) लादला जावा - हा चलाखपणा आहे. तुमच्या मुलांना आमच्याकडे नोकरी करणे हे वैकल्पिक आहे - तुमच्यासाठी व तुमच्या मुलांसाठी. आम्ही तुमच्या मुलांना आमच्याकडे नोकरीला ठेवायचे की नाही हे सुद्धा वैकल्पिक आहे - आमच्यासाठी.

पण म्हणून आम्ही तुमच्या मुलांच्या पोषणाचा खर्च द्यायलाच पाहिजे - हे आमच्यासाठी वैकल्पिक नाही. बळजबरी आहे.

------

अ‍ॅटलस श्रग्ग्ड ही कल्पितकथा आहे, पण या जगातही श्रगण्याचे स्वातंत्र्य आहेच की अ‍ॅटलसांना. तरी फारसे श्रगताना दिसत नाहीत. बाजारात न-श्रगण्याच्या किमतीत काहीतरी उपयुक्त विकत मिळत असावे, म्हणून श्रगत नाहीत - the market has spoken! बाजाराने ठरवलेली किंमत चुकलेली आहे, तर ते गणित अ‍ॅटलासांना द्या - गणित बरोबर असले आणि पटले, तर अ‍ॅटलस नक्कीच श्रगतील.

मानवतावाद्यांचा आवडता मुद्दा की मार्केट च्या समर्थकांना मुख्यत्वे आयन रँड चे तत्वज्ञान पुढे रेटायचे असते व त्या "cult" चे ते लाईफ मेंबर असतात. तेव्हा आमचा पास. तसंही मी स्वतः रँड च्या अनेक पुस्तकांच्या शेकडो पानांपैकी जास्तीतजास्त दोनचार पानेच वाचलेली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही तुमच्या मुलांना आमच्याकडे नोकरीला ठेवायचे की नाही हे सुद्धा वैकल्पिक आहे

त्याच विकल्पाची ही मार्केट प्राईस आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याच विकल्पाची ही मार्केट प्राईस आहे.

तुमचा युक्तीवाद Laura Tyson च्या युक्तीवादाच्या जवळपास जातो. की कॉर्पोरेशन्स चे अस्तित्व हे समाजाने परवानगी दिल्यामुळेच चालू असते व म्हणून कॉर्पोरेशन्स नी जास्त त्याग केला पायजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जास्त त्याग नाही. जास्त त्याग आणि बळजबरी असती व ती परवडत नसती तर कॉर्पोरेशन्स अस्तित्वातच नसत्या. ज्या अर्थी त्या अस्तित्वात आहेत त्या अर्थी त्यांना हे परवडून वर फायदाही होतोय. बाकीचा केवळ आणखी काही द्यावे लागून नफा कमी होऊ नये म्हणून व समाजाच्या सेवांची किंमत पाडून मिळावी म्हणून केलेला नॉईज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे काही उपप्रतिसाद गैरसमजुतीतून आलेले आहेत.
तुम्हाला वाटले की मी malnutrition शब्द सापडला नाही, असे उद्धरण मागत होतो. हे गैरसमजुतीतून आहे. माझी विचारणा "कुपोषित मुलींना" याबाबत होता. ही शब्दजोडी तुमच्या आदल्या प्रतिसादात दिसते. स्पष्ट व्हावे, म्हणून मी आता "मुलींना" शब्द अधोरेखित केलेला आहे. "कुपोषित+मुलींना" दोन्ही शव्द असलेल्या वाक्याचे उद्धरण देण्याची मी विनंती केली होती. "कुपोषित" सुटे, किंवा "मुली" सुटे शब्द सापडून तुमच्या आदल्या प्रतिसादातील मुद्द्यास संदर्भ येत नाही.

तुमची मुलं आम्हाला भावी नोकर म्हणून मिळू शकतील म्हणून तुमच्या मुलांच्या पोषणाचा खर्च आमच्यावर (सरकारच्या माध्यमाद्वारे) लादला जावा - हा चलाखपणा आहे.

पुढील वाक्य मी ठळक ठशात दिले होते.
उपयुक्त गुंतवणूक करणारेही विकसित, free-riderही विकसित, आणि वसुली करणारेही विकसितच.
हे भांडण काही विकसित विरुद्ध अन्य विकसित यांच्यामध्ये आहे. "मुले मारण्यापेक्षा जिवंत राहाण्यात तुलनात्मक फायदा आहे" या बाबतीत तुम्ही अनुमोदन/टाळ्या दिलेल्याच आहेत.
ती मुले कशी जिवंत ठेवायची त्याचे भांडण विकसित विरुद्ध विकसित यांच्यामध्ये आहे.
अविकसित लोक चालाखपणा करत असतील, कारण तुम्ही टाळ्या दिलेला फायदा घेण्यासाठी विकसित लोक आतुर आहेत, म्हणून करू शकतात. नुसताच तोटा होत असेल, तर बाजार चालाखी कशाला चालवून घेईल?

पण हा फायदा घेण्यासाठी जे विकसित लोक गुंतवणूक करतात, ते free rider विकसित लोकांकडून वर्गणी गोळा करत आहेत. नाहीतर free rider लोकांच्या मुलांना धडधाकट नोकर मिळवण्यापासून प्रतिबंधित करण्याची यंत्रणा उभारली पाहिजे. असे करणे अन्यायकारक असण्याची शक्यता आहे. ती प्रौढ-झालेली-free-rider-लोकांची मुले म्हणतील, की आमच्या आईबापांनी गुंतवणूक केली नाही, त्याची शिक्षा म्हणून आम्हाला धडधाकट नोकरांपासून वंचित कसे करता?

तुम्ही दुवा दिलेल्या लेखाचा/ची लेखक वैयक्तिक दृष्ट्या विकसित आहे की अविकसित हे थेट शब्दांत सांगितलेले नाही. परंतु वैयक्तिक दृष्ट्या अविकसित नसण्याची शक्यता मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे काही उपप्रतिसाद गैरसमजुतीतून आलेले आहेत.

अमान्य.

---

म्हणून मी आता "मुलींना" शब्द अधोरेखित केलेला आहे. "कुपोषित+मुलींना" दोन्ही शव्द असलेल्या वाक्याचे उद्धरण देण्याची मी विनंती केली होती.

लेखातले खालील मजकूरात तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे का ??

We can no longer treat gender discrimination and malnutrition as separate issues. The two are inextricably linked; they reinforce each another in a pattern that touches women at every stage of their lives. Malnutrition – in all of its forms – is both a cause and an effect of the profound power imbalance between men and women.

---

ती मुले कशी जिवंत ठेवायची त्याचे भांडण विकसित विरुद्ध विकसित यांच्यामध्ये आहे.

मूळ मुद्दा ज्या मुलांबद्दल आहे त्या सेट मधे बव्हंशी मुलं ही पालकांकडे असलेली आहेत. जिवंत कशी ठेवायची हा प्रश्न नाही. मुलगे व मुली याच्यामधील न्युट्रिशन ची दरी कशी बुजवायची हा प्रश्न आहे.

हे भांडण विकसित वि. विकसित असे नाही.

लेखिकेचा खालील प्यारे पुन्हा पहा -

Gender inequality begins in the womb. Every year, 16 million adolescent girls give birth, most in low- and middle-income countries. If a mother lives in an area where stunting rates are high and she is in her mid-teens, her child is more likely to be stunted – and thus more susceptible to disease and largely irreversible cognitive underdevelopment, adversely affecting their ability to benefit from education and reach their full potential.

These children will usually go on to earn less, which increases their likelihood of living in poverty, being malnourished, and, as a result, facing a higher risk of developing chronic diseases such as diabetes and hypertension later in life. And, given the societal and economic biases against women in most countries, these early life circumstances place girls at an even more severe disadvantage. The cycle then repeats itself; these disempowered and malnourished women give birth to stunted babies, perpetuating the cycle of inequality.

लो इन्कम देशातील व स्टंटेड(अविकसित) भागांमधे राहणार्‍या मातांबद्दल (ते सुद्धा कुमारवयीन मातांबद्दल) लेखिका बोलत आहे. त्या अविकसित असतात - म्हंजे गरीब, व शारिरिक दृष्ट्या अपरिपक्व.

या कुमारवयीन मातांनी जन्म दिलेल्या अपत्यांपैकी मुली ह्या विशेष दखलपात्र आहेत असा लेखिकेचा मुद्दा आहे. कारण त्या मुलीं गरीबी असल्याने योग्य पोषण न मिळाल्यामुळे त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही व जोडीला त्यांना समाजाच्या स्त्रिविरोधी बायस ला तोंड द्यावे लागत असल्यामुळे या मुली मोठ्या झाल्यावर अविकसित बालकांना जन्म देतात. व हेच ते दुष्टचक्र चालू राहते.

आता ह्यातून त्यांची सुटका करायची कशी ?

उत्तर - देशोदेशीच्या सरकारांना या मुलींना कुपोषणापासून वाचवण्याच्या युनो च्या उद्दिष्टाप्रति अकाऊंटेबल बनवणे (असे लेखिकेचे मत)

याची इम्प्लिकेशन्स काय - देशोदेशीची सरकारे पुढारलेल्यांवर, विकसितांवर ट्याक्स लावणार आणि ही जबाबदारी पूर्ण करणार. अर्थात काही स्वेच्छेने निधी देणारे देणगीदार सुद्धा आहेतच. पण मुख्यत्वे ट्याक्स हा स्त्रोत.

---

बाय द वे ऐसीवरच्या दुसर्‍या युजर ने (जो anonymous राहू इच्छितो) तुम्हास खालील प्रश्न विचारलेत -

(१) धनंजय, काय म्हणणं काये तुमचं नक्की? कोंबडी, गाय, बकरी यांच्याकडून उपयुक्त पशु(अपत्य) काढून घेतो तसेच निम्न वर्गातल्या स्त्रियांकडून माणसांचे चीप लेबर काढून घेऊयात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धनंजय आपले म्हणणे कळले मला. आपण एकदम वेगळ्या तर्‍हेने विचार करता. म्हणजे आपला मेंदू खूपच वेगळा चालतो अर्थात ही कॉम्प्लिमेन्ट आहे. हे परत एकदा पटले.-
(१) काही लोकं WHO म्हणा युनो म्हणा ला पैसे भरायला तयार आहेत
(२) काही लोक तयार नाहीत
गब्बर म्हणतात हे जे स्वेच्छेने पैसे देताहेत त्यांना देऊ देत ना का.
पण हा जो दुसरा गट आहे, त्याला का भुर्दंड?
यावर धनंजय म्हणतात - दुसर्‍या गटातील लोक हे समाजाचा म्हणजे अपत्यांचा उपयोग तर करुन घेतात पण टॅक्स भरायला कां कूं करतात. म्हणजे ते फ्री रायडर्स आहेत
___
मग धनंजय म्हणतात या फ्री रायडर्स कडून वसुली केलीच पाहीजे आणि म्हणूनच युनोतर्फे त्यांच्यावर कर(टॅक्स) लागणे सुयोग्यच आहे.

_____________

मग गब्बर प्रतिवाद करतात -

तुमची मुलं आम्हाला भावी नोकर म्हणून मिळू शकतील म्हणून तुमच्या मुलांच्या पोषणाचा खर्च आमच्यावर (सरकारच्या माध्यमाद्वारे) लादला जावा - हा चलाखपणा आहे. तुमच्या मुलांना आमच्याकडे नोकरी करणे हे वैकल्पिक आहे - तुमच्यासाठी व तुमच्या मुलांसाठी. आम्ही तुमच्या मुलांना आमच्याकडे नोकरीला ठेवायचे की नाही हे सुद्धा वैकल्पिक आहे - आमच्यासाठी.

पण मग ननि म्हणतात -

तीच मार्केट प्राइस आहे.

मला ननिंचे पटते. ही जी अव्हेलेबिलिटी आहे त्याची किंमत तो टॅक्स जो युनो ला जातो.
साधं आहे क्रेडिट्लाइन = पैशाची अव्हेलेबिलिटी ही फुकट नसते.

मग लेबरची अव्हेलेबिलिटी फुकट का असावी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Upton Sinclair

मी चुकुन sinful Kate Upton वाचलं ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही मिलिन्द उडिपी कॅफेमध्ये जाऊन 'तीन मसाला डोसे' रिचवून आलो तरी इथे चर्चा चालूच!
कमाल आहे ह्या ऐसीकरांची!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कृपया त्याबाबत गरिबास दोषी न धरणे . थोर्थोर विद्वानांचे असेच असते .
तीन डोसे मिळाल्याचा अत्यंत हेवा वाटला .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

"विरुद्ध" बाजूची मराठी उच्च मध्यम-वर्गाविषयी ची अनेक निरीक्षणे वरवर पहाता पटण्याजोगी आहेत. कर्वे-फुले-आगरकर यांच्यामुळे महाराष्ट्र (आणि त्यातही पुणे-मुंबई) याबाबतीत बरेच पुढे गेले आहेतच. पण मराठी उच्च-मध्यमवर्गीय म्हणजे सर्व भारतीय समाज नव्हे . ऐशी टक्के स्त्रियांची वस्तुस्थिती वेगळी आहे . मुख्य म्हणजे स्वातंत्र्यची कृती करायला लागणारी राजकीय मोकळीक (political space) स्त्रियांजवळ फार कमी असते (उदा. दलित समाजापेक्षा), कारण सासरी (किंवा माहेरीही ) मारहाण इत्यादीतून तिला सहज गप्प बसविता येऊ शकते . त्यामुळे "स्वातंत्र्य आहेच, फक्त ते घेण्याचा प्रश्न आहे" या प्रकारची बडबड अत्यंत हास्यास्पद ठरते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

इन केस तुम्हाला हसायची घाई नसेल तर,

इतर बायका बरोबरीची भाषा करत नाहीत. त्यांचे प्रश्न वेगळे असतात.

असं लिहीलेलं दिसेल वरती कुठेतरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बास करा राव ,डोक्याचा बोर्या वाजला .anthropology नुसार स्त्रीया ( मादी) या बहुतांश पॅरासाईटिक लाईफस्टाईलसाठी adapted आहेत,त्यामुळे स्त्री स्वातंत्र्याचा कीतीही बोभाटा वाजवला तरीही स्त्रीयांना पुरुषांवरच अवलंबुन रहावे लागणार आहे.पुरुषांनी निश्चिंत रहावे.

पुरुषाकडून हवं ते पदरात पाडुन घेण्यासाठी स्त्रीया सेक्सचा वापर करतात,बाकी त्यांचा सेक्स ड्राईव्ह natural नसून instrumental आहे.लौकीक अर्थाने त्यांना सेक्समध्ये इंटरेस्ट नसतो.
vagina monologue सारखी नाटकं बघीतली की पुरुषांचे प्र्बोधन करण्याच्या नादात स्वतःचं हसं करुन घेण्याचा यांचा प्रयत्न फारच मनोरंजक वाटतो.एकंदरीत हे inferior gender कधी सुधारणारं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

अय्या, किती गोड बोलता हो तुम्ही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला जेलसी होते अदिती. मला तुझ्याहून जास्त आवडलय ते माचो माचो बोलणं Wink तू कशाला मधे मधे करतेस? Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कसं जमतं ना एकेकाला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

dick Masterson हा male chauvinist आहे ,त्याची www.menarebetterthanwomen.com ही वेबसाईट चाळुन बघा ,नुसता सुसाट सुटलाय तो,वानगीदाखल हे वाचा....
Dick’s Top Ten Reasons MenAreBetterThanWomen.com
10. Men do not have Tourette Syndrome
I believe all women suffer from a mild and extremely
localized form of Tourette Syndrome. The afflicted organ?
Their tongues. That’s why women cannot shut their fucking
mouths for ten seconds while adults are speaking around
them. Their tongues are battling around in their mouths like
drunken Vipers.
9. Men are not sponges
Women are social chameleons — or better yet: social
vampires. Women walk into a situation and before you know
it they’ve completely changed their wardrobe and
mannerisms as if they’ve joined a fucking cult. Men are not
sheep. Everyone knows the word for a female sheep is ewe,
but what about the male word? There isn’t one because
sheep is something men are not.
8. Women are racists
Women’s entire lives and social circles are based around
hatred. Do they hate their boyfriends? Do they hate their
wardrobe? Do they hate each other? Yes, yes and fuck
definitely. Men don’t go in for that silly sort of nonsense. If
we’re dissatisfied, we pick up and move out. Or we take our
mighty man muscles and lift fucking mountains so the world
looks exactly the way we want it to. Men do more world
changing before 9:00 AM than any woman ever has done in
her whole life.
7. Men live less than women
The last thing a society needs is a bunch of non-contributing
members laying around and sucking all the juice from the
young. Men know this so they blast off from birth like
shooting man stars — burning out ten years faster, but
setting the whole night ablaze with manness. Women just
kind of lie around like big fat pigs in big fat puddles of shit.
Congratulations women. You really earned those rights!
6. Men write illegibly
Writing is stupid and an ineffective way to communicate.
Men know this so they don’t give a shit about handwriting
things with big hoops and loops and squiggles and shit so
aliens can read notes about remembering to pick up your
birth control pills after 6th period from space.
5. Jesus was a man
Whether or not you believe in Jesus, there is one fact you
can’t argue with: he was a man. No religion anywhere has
ever put a woman in charge of shit. That’s called dogma —
man-dogma — and it means men are better than women.
4. Men wear watches
Do you know why men wear watches? It’s because there’s
a limited amount of time in the day and men need to know
how much of it there is so they can efficiently allocate their
man ass kicking for the day. Women don’t wear watches;
they wear bracelets. Women wearing bracelets is like
dropping a bus of retarded kids off in front of a taffy pulling
machine. They can just stare for hours and never get bored.
A watch says, ‘Get up and go! Move your man ass and take
care of your fucking man business!’ That’s why 60 minutes
uses a ticking watch for its theme song. ‘Important shit is
going down and we’re about to talk about it in a fucking
fastidious manner, so get the fuck ready,’ says a ticking
watch. A bracelet says, ‘You’re most likely ugly, but look at
how much money you’re worth!’ What a joke.
3. Boys destroy things
The only thing that has ever lifted our species out of the
trees where we came from is our ability to destroy. Take
paper: the cornerstone of the modern world. That was
invented because man wanted to destroy trees and beat
them into pulp. How about nuclear power? Men invented
that too. Men are natural destructors. We pop right out of
the man-womb and start on a life-long tirade of progress by
tearing down the Earth with our mighty, man-manly man-
fists. Goddammit, that’s awesome!
2. Marriage is stupid
Marriage is 100% the fault of women. It was invented by
men though! Did you know that? Marriage was invented
because women were too busy whoring it out to fuck the
only the guy who was paying their rent and feeding their fat
asses French bon-bons every day. Men invented marriage
as a way of telling women who they could and couldn’t fuck.
Like everything else men have ever invented, it completely
worked and worked way better than any man thought it
would. Women became so indoctrinated by the man-
invention of marriage that they’re fucking obsessed with it.
Marriage is still stupid. It’s a stupid game invented to
entertain stupid minds and to teach basic lessons of fidelity
that even invertebrates are born with.
1. Men have penises
When it comes to being a man, being quick at identifying
problems is tantamount to fixing them. In fact it’s
tantamount-ier. Having a penis — in other words looking like
a man and having man parts — is a man’s way of telling
other men, ‘Hey. Look at me. I’m a man. I won’t fuck up
whatever it is that you’re trying to do. If you need some
help, maybe ask me and I’ll see if I can lend a man-hand.
It’s the least I could do to be fucking courteous.’

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

concluding lines from the Gospel of Thomas: “Simon Peter said to them, ‘Let Mary leave us, for women are not worthy of life.’ Jesus said, ‘I myself shall lead her in order to make her male, so that she too may become a living spirit resembling you males. For every woman who will make herself male will enter the kingdom of heaven.’”

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

एम.एससी. च्या अ‍ॅडमिशनच्या वेळची सत्यकथा. पांच सीटस मेरिटनुसार भरल्या गेल्या. पाचव्या सीटवर ज्या मुलीला जागा मिळाली तिच्यापेक्षा माझ्या मित्राला २ गुण कमी पडले होते. त्यामुळे त्याला ती सीट मिळाली नाही. दोन वर्षांनी डिग्री घेऊन आम्ही सगळे त्यांच विषयांत नोकरी वा उच्चशिक्षण हे पर्याय निवडले. त्या मुलीने मात्र, म्युनिसिपालिटीत क्लर्कचे काम स्वीकारले. त्याचा विषयाशी काहीच संबंध नव्हता. आमच्या मित्रावर अन्याय झाला असे आम्हा चौघांनाही वाटले.
स्त्रियांनी उच्च शिक्षण घ्यावे,असे प्रत्येकाला वाटते. पण ते मिळाल्यावर असे वाया घालवणे कितपत योग्य आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(उच्च)शिक्षण वाया घालवलेला* एकही पुरूष तुमच्या ओळखीचा नाही वाटत?

*शब्द साभार तिरशिंगरावांकडून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

त्रासलेले ४५ पती पोलिसांच्या दारात.

ही लाट कसली, ही तर स्त्रीवादाची सुनामीच दिसतीय.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शतकांच्या अन्यायाला यामुळे वाचा फुटु लागली हे बरेच झाले. पुरुषांना दरबारी त्यांचा त्रास मांडण्याची संधी उपलब्ध्द करुन दिल्याबद्दल गवरमेंटचे अभिनंदनही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

बायका पुरुषांवर अत्याचार/बलात्कार करूच शकत नाहीत असे ठो ठो दावे करणार्‍या अनुताई स्वतःच ते दुवे देऊ लागल्याने अच्छे दिन आल्याची प्रचितीच आली असे म्हणावे का? Wink

बाकी तक्रार निवारण केंद्रात पुरुषांच्याही तक्रारी ऐकून घेतल्या जाताहेत हे स्तुत्य पाऊल आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझे ते मत ऋ अजुन बदललेले नाहीये.

हे कसले पुचाट पुरुष. पोलिसांमधे कंप्लेंट करायला निघाले बुळचट.

शिवसेना स्टाईल ने बांगड्या भरायला पाहिजेत पोलिसांनी त्या तक्रार करणार्‍या पुरुषांच्या हातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हांगाशी! आता कसं! अच्छे दिन अजून यायचेत सांगायची स्टाईल आवडली! Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पाने