..विचारेन त्यालाच कॉफी चहा..

..विचारेन त्यालाच कॉफी चहा..

भरोसा करावा कुणाचा जरी..
भरोसाच नाही कशाचा जरी..!

विचारेन त्यालाच कॉफी चहा
घरी दूत आला यमाचा जरी

मिळो गार माझी तुला सावली
किती त्रास मजला उन्हाचा जरी

मनी मान्य केले शशीचोर मी!
खुळा आळ आहे नभाचा जरी.

म्हणे वाघ गेल्याच जन्मातला
अता जन्म आहे सशाचा जरी

किती त्यात जो तो पुरा गुंतला
खरा खेळ होता मनाचा जरी

अरे वाकला तो कशाने असा.?
तसा भार नव्हता जगाचा जरी!

खरा भक्त त्याला मिळो एकदा
तिथे प्रश्न असला युगाचा जरी!

- कानडाऊ योगेशु

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

मस्तच!
"विचारेन त्यालाच कॉफी चहा
घरी दूत आला यमाचा जरी!" : क्या बात है!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

धन्यवाद मिलिंद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पक्के पुणेकर दिसता राव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पटाईतकाका,
हा अर्थ लक्षात आला नाही.
विचारेन त्याला कॉफि चहा ह्याचा मी मांडलेला अर्थ अरे चहा कॉफि घेणार का? असा आहे.
तुम्हाला जाणवलेला अरे तू चहा कॉफि घेऊन आलाच असशील असा आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"च" मुळे घोटाळा झाला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यम (वा त्याचा दूत यानी कि पर्सनल रेप्रेझेंटेटिव) जर घरी आला, तर फक्त त्याला कॉफी-चहा विचारणे बरोबर आहे काय? त्याच्याबरोबर आलेल्या त्याच्या रेड्याचा काही विचार? तो तर बिचारा इतकी तंगडतोड करतो, वर मेलेल्यांची ओझी (= dead weight)... त्याची थोडीसुद्धा विचारपूस नको? अरे, काही माणूसकी आहे की नाही? निदान त्याला हवे-नको ते विचारून, फुटक्या/कान तुटलेल्या कपातून का होईना, पण अर्धा कप चहा तरी द्यायचा. (रेड्याला कॉफी म्हणजे टू मच होते हे एक वेळ मानून चालू. पण चहासुद्धा नाही? काय दार्जीलिंग द्यायला नाही सांगत आहे; पण गेला बाजार 'वाघ बकरी' तरी द्याल की नाही?) पण नाही!

- ('च'ची भाषा चांगलीच समजणारा) 'न'वी बाजू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL नबा आता यम खूष आणि रेडा तर डबल खूष बर्का तुमच्यावरती. आता एक वोह द्वापार के त्रेता जुग का अश्वत्थामा और कलिजुग मे एक आप!! आता घाबरायचं कारणच नाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ख्या ख्या ख्या!

एखाद्याचा जीव जातो आणि ते म्हणतात कि साधा चहा सुध्दा विचारला नाही.!

वेल इन दॅट केस तो शेर असा होऊ शकतो

विचारेन त्यांनाहि कॉफि चहा
घरी दूत आला यमाचा जरी!

यम खूस रेडा भी खूस!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0