हृदयात ऋकार आहे. (हृ = ह् + ऋ)
'ऋ'चा मूळ उच्चार काय होता कोण जाणे, दक्षिणेत रु आणि उत्तरेत रि करतात.
(मंगेशकर उत्तरेकडचे का असा प्रश्न क्रिप्या विचारू नये. जय श्रीक्रिश्न!)
प्रतिप्रश्नः सुधीर फडके आदि मंडळी 'राजा' या संस्कृतातून घेतलेल्या शब्दाचा उच्चार करताना राज़ा का म्हणतात?
//'ऋ'चा मूळ उच्चार काय होता
//'ऋ'चा मूळ उच्चार काय होता कोण जाणे, दक्षिणेत रु आणि उत्तरेत रि करतात.//
'ऋटुरषाणां मूर्धा' इति पाणिनि. त्यामुळे अमेरिकन रोल्ड आर सारखा उच्चार असावा.
//जय श्रीक्रिश्न!//
यू मीन, जय श्रीक्रष्ण. पुण्यात झांगीर हॉस्पिटलसमोर एक मेडिकलचं दुकान आहे कॄष्णा मेडिकल्स म्हणून. त्याचं इंग्लिश स्पेलिंग पाहून डोळे डबडबून आले. krsna असे स्पेलिंग आहे, पैकी r, s, n यांपैकी प्रत्येकाखाली डॉट दिलाय. नक्कीच सखाराम गटण्याकडे साईनबोर्ड दिला असावा रंगवायला.
//प्रतिप्रश्नः सुधीर फडके आदि मंडळी 'राजा' या संस्कृतातून घेतलेल्या शब्दाचा उच्चार करताना राज़ा का म्हणतात?//
हा प्रकार जुन्या पिढीत होता, उदा. बाबासाहेब पुरंदरे हेही राज़ा असाच उच्चार करतात. १९५३ सालचा छत्रपती शिवाजी हा पिच्चर जो आहे त्यातही एका पंडिताच्या तोंडीही हाच उच्चार आहे.
"r, s, n यांपैकी
"r, s, n यांपैकी प्रत्येकाखाली डॉट दिलाय."
च्या मारी! डोळे डबडबण्यासारखाच प्रकार!
अगदी अगदी. जमेल तेव्हा फोटोच
अगदी अगदी. जमेल तेव्हा फोटोच काढून सादर करतो.
"कॄष्णा मेडिकल्स म्हणून.
"कॄष्णा मेडिकल्स म्हणून. त्याचं इंग्लिश स्पेलिंग पाहून डोळे डबडबून आले. krsna असे स्पेलिंग आहे, पैकी r, s, n यांपैकी प्रत्येकाखाली डॉट दिलाय."
=))
आजकालची fashion आहे असा वाटतंय . काही लोकांच्या नावाचे स्पेलिंग असंच पाहिलंय .
आजकालची नाय हो. कालची फॅशन
आजकालची नाय हो. कालची फॅशन आहे. १९व्या शतकातील इंडॉलॉजिस्ट वगैरे मंडळींची
काय सांगता? अहो
काय सांगता? अहो भाषाशास्त्राची चार पुस्तके सोडल्यास घण्टा कुण्णा कुण्णालाही हे माहिती नसतंय. आजकालची फ्याशन करणारांना हे माहितीही असेल किंवा नै याबद्दल डौट आहे.
राज़ा: एक शंका
'राजा'चा 'राज़ा' असा उच्चार कोल्हापुराच्या बाजूचा असावा काय?
नाही म्हणजे, कोल्हापूर काळे की गोरे ते मी पाहिलेले नाही, परंतु आमचे दिवंगत तीर्थरूप कोल्हापुरात वाढले, नि त्यांचे तोंडून असा उच्चार ऐकलेला आहे खरा.
नाही
कोल्हापुरात कोणाला 'राज़ा' म्हणताना अजून ऐकले नाही. उलट पुण्यातले लोक 'ज़े' म्हणतात (उदा. ज़े वेड मजला लागले), तिथे कोल्हापुरात सर्रास 'जे' असाच उच्चार ऐकलाय. पुण्यातले काही लोक तर इंग्रजी 'जे'लाही 'ज़े' म्हणतात!
Just checkin'
एकदा खात्री करून घेण्यासाठी -
ज चा उच्चार जग या शब्दात होतो तसा
आणि
(नुक्तावाल्या) ज़ चा उच्चार जमीन या (मराठी) शब्दात होतो तसा.
हे बरोबर आहे का?
व्हय.
व्हय.
गृहपाठः ज चा उच्चार जग या
गृहपाठः
'अरे मिरचीच्या रोपा, तू जग' या वाक्यातील 'जग'चा उच्चार करून बघा.
'आमच्या जिमीनीत वांगी उगवली हायेत' यातील 'जिमीनी'चा उच्चार करून बघा.
शेंगा-टरफलं.
पहिला गृहपाठ करेन. जग हे नाम म्हणून वापरलं आहे, क्रियापद म्हणून नाही. पण बाई, दुसरा गृहपाठाचा शब्द फाऊल आहे. तुम्ही शब्दच बदलता, बोलीभाषा बदलता आणि पुन्हा पुन्हा काम करायला सांगता. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही.
जे जे
जे जे जगी जगते तया
ह्यातल्या प्रत्येक ज चे उच्चार करा. नाहीतर अभिषेकींच्या तोंडून ऐका.
उलट पुण्यातले लोक 'ज़े'
सहमत! बर्याचदा त्याचा "त्से" असा उच्चार ऐकू येतो.
राज़ा असा उच्चार नसला तरी
राज़ा असा उच्चार नसला तरी राज़ं हा उच्चार आहे. पण राज़ा हा उच्चार जुन्या पिढीत होता हे खरे. मजा म्हणजे इच्छा या शब्दातील छ हादेखील दंततालव्य उच्चारणारे लोक आहेत, उदा. नरहर कुरुंदकर. ऐकताना तो शब्द खड्यासारखा लागतो.
बोळ-वण
dotted for extra pleasure? ;)
doting over dots?
doting over dots? ;)
बिंदूगामी
That'd be dotage :)
coz in dotage, one can only
coz in dotage, one can only dot over the dots of yore. :)
निओ-लॉजी
किंचित असहमत, ज्याचं त्याचं 'डॉट मॅट्रिक्स' निराळं :D
k r s n
पैकी r, s, n यांपैकी प्रत्येकाखाली डॉट - This is a kind of standard Transliteration system used by Western academicians, especially for Sanskrit.
ऋ'चा मूळ उच्चार काय होता कोण
बरं झालं हे तुम्हीच विचारलंत ;)
मला व्यंजनात मिसळलेला ऋकार आणि रुकार यातील उच्चारांतील फरक कानांना व जिभेला दोन्हीला वेगळा करता येत नाही
वृक्ष/व्रुक्ष किंवा तृटी/ त्रुटी यांचा उच्चार वेगळा कसा करायचा?
१) ते पंख मेघदुतातले आहेत. २)
१) ते पंख मेघदुतातले आहेत.
२) संस्कृतात राज्ञ आहे,फारसीत राज़ा.त्याचे मिसळून मराठीत अगे { वैकुंठीचा } राज़ा झाला असावे आणि संबोधन मात्र हे
राजन् अथवा हे राजा केले असावे.
३) ज़मिन फारसी आहे.मराठीत जमिन,जिमीन,ज़मीन काहीही करू शकतो.
४) क्रश्न उच्चार गुजरातीत आहे,उत्तरभारतातल्या क्रिश्ण याचे इंग्रजीत krisna.
संस्कृतात राज्ञ आहे,फारसीत
* मूळ संस्कृत शब्द 'राजन्' हा अन्नन्त ('अन्'अन्त) शब्दच आहे. त्याचे पंचमी-षष्ठीचे एकवचन राज्ञः असे होते. त्याचे प्रथमा एकवचन राजा तर संबोधनाचे एकवचन राजन् होते.
* ज़, झ़ हे दंततालव्य उच्चार मराठीत फारसीमधून आले, यात शंका नाही. त्यामुळे ज़मीन या फारसीतून आलेल्या शब्दात त्याचा उच्चार दंततालव्य होतो यात आश्चर्य नाही. पण मराठीतील अनेक संस्कृत तत्सम व तद्भव शब्दांच्या उच्चारात ज़, झ़ आणि मुळात फारसीत नसलेला च़ घुसणे (उदा. काच) ही गंमत आहे. (दंततालव्य छ़ वापरात असल्याचे माहीत नव्हते. नुकताच बॅटमनने दाखला दिला.) फारसीत राजा़ हा शब्द आहे की नाही, मला माहीत नाही. पण फारसीचा मराठीशी संबंध येण्याच्या आधीपासून राजा हा संस्कृत शब्द मराठी भाषकांना माहीत होता हे निश्चित. (राया या स्वरूपात तो मराठीत प्रचलित असावा. कदाचित राजा व राया या दोन्ही स्वरूपात असेल.) या मराठीतील संस्कृत तत्सम शब्दाचा उच्चार फारसी वळणाने होणे हे गमतीचे आहे, एवढेच. काही फारसी शब्दांतील 'ज़'चा मराठीत ज उच्चार करणे हीपण आणखी एक गमतीदार गोष्ट. उदा. जिमीन.
पण मराठीतील अनेक संस्कृत
तेलुगुमध्ये च़ आणि ज़ आहेत हे मला तसे अलीकडेच कळाले. चार मुख्य द्राविडी भाषांमध्ये हे वर्ण असलेली तेलुगु ही एकमेव भाषा आहे. सी पी ब्राऊन या इंग्रजाने ते वर्ण वेगळे दाखवायची सोय केली. सबब प्री-पर्शियन काँट्याक्ट काळातील दंततालव्य उच्चारांबद्दल बोलायचे तर बहुधा अतिप्राचीन तेलुगु प्रभाव किंवा इण्टर्नल डिव्हेलपमेण्ट हीच कारणे असावीत. तसे अजूनेक उदा. म्हणजे 'बाङाल' भाषा. कोलकाता येथील घोटी भॉद्रोलोक लोकांच्या भाषेपेक्षा यात च़, ज़, इ. खूप वापरतात. "डोइशुन्नो रो" पेक्षा "बोइशुन्नो रो" चे प्रमाणही इथेच जास्त आहे. तिथे या वर्णांची डिव्हेलपमेंट कशी झाली हे पाहिले तर कदाचित इण्टर्नल डिव्हेलपमेण्ट हेच उत्तर यावे असे वाटते. तेच लॉजिक बहुधा इथेही लागू पडावे...
च्च्च्च्च्
* हो का! तेलुगुबद्दल माहीत नव्हते! तेलुगुत हे ध्वनी फारसी-संबंध-पूर्व काळापासून होते का?
* मराठीत फारसी-संबंध-पूर्व काळात दंततालव्य उच्चार असण्याची पुरावे कुठे पाहिले आहेत का? (अर्थात उच्चारांचे पुरावे नसणार, पण त्याविषयी चर्चा असू शकते.)
* बाङ्गाल भाषेतले दंततालव्य पाहता इण्टर्नल डिव्हेलपमेण्ट हे कारण पटण्यासारखे आहे. अर्थात या भाषेवरही फारसीचा पगडा भरपूर आहेच.
हो का! तेलुगुबद्दल माहीत
ते माहिती नाय, पहावे लागेल. पण च़ च्या अस्तित्वामागील कारण इण्टर्नल डिव्हेलपमेण्ट हेच असावेसे वाटते. ज़ बद्दल पहावे लागेल.
हेमचंद्राचे प्राकृत व्याकरण आणि ज्यूल्स ब्लोख चाळून सांगतो कुठे काय आहे ते. ब्लोखमध्ये याची चर्चा दिसली नाय पण माझे स्मरण आता अतिपुसट आहे.
सहमत.
आज़ा असतो पण आज़ी नसते असे का
आज़ा असतो पण आज़ी नसते असे का असावे?
हरेक भाषेच्या लकबी, दुसरे
हरेक भाषेच्या लकबी, दुसरे काय.
ज जा जि जी जु जू जे जै जो जौ जं जः
यांपैकी जि, जी, जै या ठिकाणी ज़ हा वापरला गेलेला कधीच पाहिला नाही.
जि, जी जींदगी मधे काय असते?
जींदगी मधे काय असते?
ऊप्स डिस्क्लेमर लिहायचा राहून
ऊप्स डिस्क्लेमर लिहायचा राहून गेला.
वरील यूज़ केसेस या मराठी भाषेतील शब्दांकरिता आहेत. लोनवर्डांपैकी तत्समांना हे नियम अर्थातच लागू होत नाहीत.
ज़िंदगी
ज़िंदगी
जैसे शारदियिचे चंद्रकळे
जैसा या शब्दात? मी तरी ज़ उच्चारते
तुम्ही जेंव्हा ज़ वापरता
तुम्ही जेंव्हा ज़ वापरता तेंव्हा तो लोन्ड शब्द असतो.
किती तो प्रॉम्प्ट प्रतिसाद.
किती तो प्रॉम्प्ट प्रतिसाद. चूक सुधारू दिली नाहीत :-प
ते 'शारदीचिये' हवे होते
मी दिलेली स्कीम मोल्सवर्थमधून
मी दिलेली स्कीम मोल्सवर्थमधून घेतलेली आहे. पण जरा विचार करता लक्षात आले की क्वचितप्रसंगी मीही ज़ वापरतो जै वगैरे म्हणताना. त्यामुळे तो क्लेम अंशतः मागे. पण जि आणि जी बद्दल मात्र दावा मेण्टेन आहे.
अवांतरः बहुधा कोब्रा लोक्स अन्य कुठल्याही कम्युनिटीपेक्षा हे ज़ जास्त उच्चारतात असे निरीक्षण आहे. काय कारण असावे हे माहिती नाही. कोकणातल्या अन्य जातींचे लोकही असेच बोलतात का? अन्य म्हणजे कोब्रा, सारस्वत, प्रभू हे सोडून बाकी.
बहुधा कोब्रा लोक्स अन्य
बहुधा कोब्रा लोक्स अन्य कुठल्याही कम्युनिटीपेक्षा हे ज़ जास्त उच्चारतात असे निरीक्षण आहे.
कारण त्यांच्यात ज़हर जास्त असते.
ज़हर जास्त असलेला साप
ज़हर जास्त असलेला साप प्स्स्स्स असा आवाज़ करतो बॉ.
+
साधारणपणे सहमत. 'जे' हा देखील 'ज़े'पेक्षा जास्त वापरात असावा. इ, ई, ए, ऐ हे स्वर तालव्य असल्याने हे असावे बहुतेक. त्यातही इ, ई ला ए च्या तुलनेत तालव्य जास्त आवडतात.
च़े, ज़े, झ़े हे शक्यतो जर त्या नामाचे दुसरे एखादे रूप च़ा, ज़ा, झ़ा वापरणारे असले तर असतात. उदाहरणार्थ: त्याच़े. इथे ह्या शब्दाचे 'त्याच़ा' असे रूप प्रचलित आहे, म्हणून 'त्याच़े'मधला च़ दंतमूलीय. सुटे असलेले शब्द घेतले तर बऱ्याच ठिकाणी तालव्य च, ज दिसतील. उदा. जेवण, चेटकीण, चेला, चेंडू इ. (झेरॉक्स, झेब्रा हे शब्दही तालव्य झ ने उच्चारणारे भरपूर सापडतील. ज़े, ज़ैसे वगैरे काही बोलींतले अपवाद. च़े, ज़े असलेले इतर मराठमोळे शब्द माहीत असल्यास सांगावेत.) इकारांना तालव्य इतके आवडतात की ते 'च़े'चा नियमही पाळत नाहीत. 'त्याच़ा'चे सामान्यरूप असले तरी उच्चार 'त्याची' होतो, 'त्याच़ी' नव्हे. (हा आपला ढोबळ नियम)
तेलुगू गाण्यांमध्ये 'च़' तसा बऱ्यापैकी ऐकू येतो. हे पाहा. 'ज़'पण बऱ्यापैकी ऐकू येतो, पण अपवाद वगळता बऱ्याच मित्रांना ती गाणी तालव्य च, ज वापरत गाताना ऐकलेय. कदाचित हा 'च़' केवळ औपचारिक उपयोगात उरला असावा. सगळ्यात विचित्र म्हणजे मी 'आमि चिनि हो चिनि' ह्या बंगाली गाण्याच्या काही व्हर्जनांमध्ये 'च़िनि' असा उच्चार ऐकलाय. त्याचे कोडे अजून उलगडले नाही आहे.
च़े, ज़े, झ़े हे शक्यतो जर
अतिरोचक निरीक्षण. सहमत!
दक्षिण महाराष्ट्रात तरी खूपच. इनफॅक्ट माझे, त्यांचे, इ. शब्दही तालव्य उच्चारणारे आहेत कैकजण.
हे गाणे अपवादच म्हणायला हवे. माझ्या एका मित्राला जरा डीटेलमध्ये समजावून सांगितल्यावर त्याने अजून दोनेक क्लिप्स दाखवल्या ज्यात च़ होता. पण ते दुर्मिळच आहे एकूण. मोर दॅन ९५% लोकांना तो फरक कळत नाही.
विचित्र इंडीड. पण नॉट मच सो इफ द व्हर्जन इज़ संग बाय अ बांग्लादेशी ऑर बाङाल. त्या रीजनमध्ये च़, ज़, आहेत. तेव्हा ही व्हर्जन कुठली, हे समजले तर कोरिलेट करण्यास मदत होईल.
बर्याच जुन्या काळातला बाया
बर्याच जुन्या काळातला बाया वत्सला हा शब्द वत्छला (विथ दंत्य छ)
+१
हे प्रत्यक्ष ऐकलेले नाही, परंतु जुन्या कागदपत्रांत आणि शिलालेखांत संवत्सर हा शब्द संवछर असा लिहिलेला पाहिला आहे. हाही त्यातलाच प्रकार झाला. वत्सलाहरण नामक नाटक किंवा कादंबरीचे नावही वत्छलाहरण असे लिहिलेले पाहिलेय.
* चिनि हो चिनि नाही हो, आमि
* चिनि हो चिनि नाही हो, आमि चिनि गो चिनि =))
('आम्ही ठाकर ठाकर' सारखं 'आमि चिनि हो चिनि' असं म्हणून बंगाली माणसं नाचत आहेत असं दृश्य डोळ्यासमोर आलं)
च़िनि असा उच्चार मी कधी ऐकला नाहीये, पण तो पूर्व बंगालच्या बोलीचा 'बाङ्गाल' भाषेचा प्रभाव असेल. (अधिक माहितीसाठी बघा: गोयनार बाक्शो नावाचा एक मजेदार पिक्चर, त्यात बाङ्गाल बोलीचा भरपूर वापर आहे.)
* च़े, ज़े, झ़े हे शक्यतो जर त्या नामाचे दुसरे एखादे रूप च़ा, ज़ा, झ़ा वापरणारे असले तर असतात.
हां, बरीच उदाहरणं आठवून पाहिली, तुम्ही म्हणताय तसंच दिसतंय. उदा. कच्चे, काचेचा इ. च़ेचा शब्द आठवला नाही. ज़े मात्र विकल्पाने कुठे कुठे दिसतो: म्हणजे, जाणिजे,
'च़े'चं शब्दातील स्थान यावर त्याचा उच्चार अवलंबून आहे असं काही असू शकेल का? म्हणजे शब्दान्ती आला तर दंततालव्य, पण शब्दाच्या सुरुवातीस आला तर तालव्य असं काही?
*
हे फार रोचक वाटलं.
(अतिअवांतर)
ही 'आमि चिनि गो चिनि' भानगड नक्की काय आहे? ('आम्ही ठाकर ठाकर'च्या धर्तीवर) 'आम्ही साखर साखर' असले काही आहे काय?
आमि चिनि म्हणजे 'मी
आमि चिनि म्हणजे 'मी ओळखतो/ते'. समुद्रापार राहणार्या विदेशिनीला उद्देशून गाणे आहे.
एटा होच्चे अॅकटा बोहु पुरोनो
एटा होच्चे अॅकटा बोहु पुरोनो गान.
https://www.youtube.com/watch?v=_HinFn8DWSo
আচ্ছা?
আমি জানতাম না। অনেক ধন্যবাদ।
.
टायपो झाला गो! ;)
मी सांगितलेला नियम दक्षिण महाराष्ट्रीय बोलीला जास्त लागू होतो (कमी अपवाद). मी जे, जैसा, म्हणजे, जाणिजे ह्या शब्दांत साधारणपणे तालव्य 'ज'च उच्चारतो.
असू शकेल. सामान्यरूप होताना शेवटचे व शेवटून दुसरे अक्षरच बदलते फार तर. आणखी उदाहरणे बघायला हवीत.
आणखी
स-श जोडीदेखील काही प्रमाणात च़-च सारखी आहे. स हा दंतमूलीय तर श हा तालव्य आहे. 'कसा' शब्दाची स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी रूपे अनुक्रमे 'कशी' आणि 'कसे' होतात. सी > शी अशी प्रवृत्ती मराठीत दिसते. झाँसी - झाशी, सीट - शीट, फार्सी - फार्शी (?) इ. इंग्रजी 'बस'चं सामान्यरूप करताना 'बशी' केले जाईल, 'बसी' नव्हे: मी बशीतनं गेलो. पैसे, कसे हे शब्दही अनेकदा बोलताना पैशे, कशे असे वापरले जातात.
ऋ = र्र+उअसा उच्चार असतो असं
ऋ = र्र+उअसा उच्चार असतो असं मागे एकदा वाचलेलं इयत्ता दहावीत असतांना, नुक्ता आला की जगाचं जहाज होतं. उर्दूे धडे घेतांना काहीसं हे ज्ञान प्राप्त झालेलं. वर कोणीतरी म्हंटलंय की राजा चं राज़ा केलं जातं ते तर गाणी ऐकतांना खूपदा खटकतं, मंगेशकरांचे उच्चार (हिंदी, उर्दू ) बरीक स्पष्ट वाटत आलेत. क़, ग़ नीट नाही उच्चारलं तर मजा( की मज़ा) येत नाही. एक जनरलंच सिनेमा आलेला मध्यंतरी 'हनिमून ट्रॅव्हल्स....' त्यात शबाना बोमन ला ग़ालिब चा उच्चार करायला शिकवत असते सतत ते आठवलं :)
'ऋ'चा उच्चार रु आणि री च्या
'ऋ'चा उच्चार रु आणि री च्या मधला काहीतरी होतो.. ओठाचा चंबू करावा लागत नाही रु प्रमाणे .. री प्रमाणे तोंड वेंगाडावे लागत नाही..
जय स्रीक्रश्ण :-)
'ऋ' उच्चाराल्गोरिदम
१. री उच्चारतानाचे फक्त तोंड करा. म्हणजे say cheese म्हटल्यावर जसे आपण तोंड करतो तसे.
२. तोंड तसेच आडवे फाकलेले ठेवून रु उच्चारायचा.
असे करून जो नाद ऐकू येईल तो सवयीने इतके तोंड न वेंगाडता सहज म्हणता येऊ लागतो.
या विषयाबाबत माझा पॉडकास्ट
पॉडकास्टचा दुवा
(या "स्वरांचे उच्चार" दहा मिनिटांपैकी काही थोडाच भाग "ऋ"विषयी आहे. भाषामाध्यम इंग्रजी आहे.)
या निमित्ताने एक जुनीच
या निमित्ताने एक जुनीच शंका.
ऋ हा स्वर मानला आहे. आणि स्वर हे संयोगाने गुरुत्व देत नाहीत. तस्मात दंतमूलीय उच्चार संयोगाने गुरुत्व देत असल्याने ग्राह्य ठरणार नाही असे वाटते. यावर काय मत आहे? किंवा ह्या विरोधाभासावर पूर्वसूरींनी काय विवेचन केलेले आहे?
बापरे ! दंतमूलीय उच्चार
बापरे ! दंतमूलीय उच्चार संयोगाने गुरुत्व … !?! सलग एका श्वासात वाचता पण नाही आलं.
जार्गन आहे ओ ही फक्त. कंटेंट
जार्गन आहे ओ ही फक्त. कंटेंट चिंधीसा आहे.
दंतमूलीय उच्चारही गुरुत्व देत नाही
खुलासा : वरील पॉडकास्ट पाणिनीय आणि त्यापेक्षा प्राचीन संस्कृताबाबत आहे, त्यामुळे पुढील उत्तरही त्या विषयाबाबतच आहे. मराठीत "ऋ" असा कुठलाच उच्चारी स्वर नाही. प्रमाण बोलीत "र्+उ" किंवा "रु" असा उच्चार होतो (काही बोलींत "रि") त्या व्यंजन-स्वर जोडीकरिता एक चिन्ह आहे. व्यंजन-स्वर-जोडीकरिता सोयीसाठी एक चिन्ह असले, तर त्याला स्वर वा व्यंजन म्हणणे आणि गुरुत्व वगैरे मुद्दे तपासणे नि:संदर्भ आहे. (खुलासा समाप्त)
-------------
ऋकाराचा दंतमूलीय उच्चारही गुरुत्व देत नाही. त्यामुळे शंका नीट समजलेली नाही.
(जुन्या, स्वर) ऋकारात "रेफ" (गुंजन/कुजबूज/जिभेचे कंपन) होता हे निश्चित. याला इंग्रजीतून ध्वनिशास्त्र शिकणारे "r-colored vowel" म्हणतात. हे गुंजन होताना जीभ दंतमूलाजवळ आहे, मूर्धेजवळ आहे, की, पाठीमागे जिह्वामूलाजवळ आहे, हा माझ्या पॉडकास्टमधील मुद्दा आहे. दंतमूलाला स्पर्श करून स्वर थांबवला जात नाही, तर त्या ठिकाणाजवळ जाऊन गुंजन होते. स्वराला गुंजनाचा रंग दिला म्हणून काही त्यात व्यंजन, आणि आजूबाजूला संयोग (अनेक-व्यंजने-स्वराशिवाय-एकापाठोपाठ-एक करिता संस्कृत व्याकरणातली संज्ञा) होत नाही.
शिवाय मला "संयोगाने गुरुत्व" हा शब्दप्रयोगही थोडा गोंधळात टाकणारा आहे.
पाणिनीचे "संयोगे [ह्रस्वं] गुरु"सूत्र बघता
पहिले पद "संयोगे= संयोग-पुढे-असता", यातील संयोग-संज्ञेचा निर्देश स्वरांना लागूच नाही, कारण त्याच्या व्याख्यांमध्ये "संयोग"संज्ञा स्वरांना कधी लागू होऊच शकत नाही. संयोग = एकापेक्षा-अधिक-व्यंजनांचा-विना-अडथळा-समूह
आणि "गुरु" हे सूत्रातील दुसरे पद फक्त स्वरांनाच लागू होते.
त्यामुळे अशी स्थिती आहे
ह्रस्वस्वर + पुढे-अनेक-व्यंजनांचा-विना-अडथळा-समूह-हे-निमित्त
अशा स्थितीत ह्रस्वस्वर गुरु असतो.
खुद्द ऋकार गुरु होऊ शकतो :
"कृष्ण" या शब्दरूपात आपण पाणिनीची वरची व्याख्या तपासूया
क् + ऋ + ष्+ण् + अ
येथे [ष्+ण्] अनेक-व्यंजनांचा-विना-अडथळा-समूह आहे = संयोग
तो पुढे आहे, असा "ऋ" हा ह्रस्व स्वर आहे.
तर पाणिनीच्या व्याख्येनुसार "कृष्ण" या शब्दरूपात "ऋ" गुरु आहे.
"कृष्ण" मध्ये "ऋ" गुरु असल्याचे उदाहरण काशिका या व्याकरणग्रंथात पाणिनीच्या ८.२.८६ सूत्राच्या व्याख्येच्या संदर्भात दिलेले आहे. अर्थातच "ऋ"पुढे अनेक-व्यंजनांचा-विना-अडथळा-समूह नसता, असे वेगळे कुठले शब्दरूप असते (काशिकेत नव्हे, पण माझे उदाहरण, "कृत") तर त्यातील "ऋ" लघु असता, गुरु नसता.
आता छंदशास्त्रात "गुरु" म्हणायचा होता का?
तर कालिदासाच्या रघुवंशातील ही ओळ बघा :
पूर्यमाणमदृश्याग्निप्रत्युद्यातैस्तपस्विभिः । । १.४९ । ।
येथे पुढे "दृ" आदला म लघुच आहे. (पुढे मराठीतील उदाहरण वेगळे आहे, त्याच्याशी तुलना करावी.)
(त्याही पुढच्या "श्य्" मुळे खुद्द "ऋ" गुरु आहे, ही बाब अलाहिदा.)
---
(मराठीत -- हे लिहायचेच होते, तर खुलासा का केला?)
मराठीत मनाच्या श्लोकातील हे चरण बघूया :
नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा।
येथे लेखी "दृ" = उच्चारी "द्रु"
म्हणून त्याच्या आदला "अ" गुरु उच्चार होतो. आणि भुजंगप्रयात नीट चालू राहाते.
मराठीत "ऋ" असा कुठला स्वतंत्र स्वर नाहीच. "रु" (काही बोलींत "रि") करिता सोयीस्कर खूण आहे, इतकेच.
मराठी नव्हे, संस्कृतच
विस्तृत खुलाशाबद्दल धन्यवाद. छंदःशास्त्रदृष्ट्याच गुरु अभिप्रेत होता. संयोग ह्रस्वास गुरुत्व देतो यात ऋकार प्रथम असल्यास तो गुरु होणारच हे आलेच, तो मुद्दा नव्हता. जर दंतमूलीय उच्चार फॉलो केला तर ऋकार अन्य ह्रस्व स्वरानंतर आल्यासही तसे होते/होत असावे हा मुद्दा होता.
पॉडकास्ट ऐकल्यानंतर जिव्हामूलीय 'ट्रिल'छाप उच्चार करताना असे वाटले नाही. जिह्वामूलीय आणि मूर्धन्य उच्चारात हे सहज शक्य आहे. पण दंतमूलीय स्थानवाला पॉडकास्टातील उच्चार करून श्लोक म्हटले तर संयोग-गुरुत्व वगैरे जाणवले. गुंजनाचा रंग दिला हे समजले पण त्या स्थानामुळे गडबड होते असे वाटते...
विवक्षित बोलीत, वा सरावाने
पाॅडकास्ट या क्षणी मलाच मिळत नाही, त्यामुळे त्यात संदर्भ दिला आहे की नाही ते तपासले नाही, आणि संदर्भग्रंथही हायाशी नाही. परंतु दंतमूलीय स्थानाचा प्राचीन उल्लेख आहे (ऋग्वेदाच्या उच्चारशास्त्रात). त्या बोलीत सरावाने दंतमूलाजवळ जीभ नेऊन गुंजन करत असावेत.
र् हे व्यंजन मी खुद्द सवयीने कधी मूर्धेत, कधी दंतमूलाजवळ उच्चारतो.
हम्म्म्म्म तसे असेल.
हम्म्म्म्म तसे असेल. पॉडकास्टात संदर्भ दिलाय, तैत्तिरीय संहितेचा. प्रत्यक्ष वैदिक ब्राह्मणांचे ऑडिओ सॅम्पल्स ऐकून ठरवावे लागेल.
धन्यवाद
अनेक धन्यवाद. मजा आली ऐकताना.
* शंका: ज्याला मराठीत रफार म्हणतात (मूर्धा इ. शब्दांतील) त्याचे (उच्चार)स्थान काय आहे? रफार हा ऋकारच आहे का?
नाही. तो रफार म्हणजे
नाही. तो रफार म्हणजे नेहमीच्या र चा स्वररहित उच्चार. दंतमूलीय स्थान आहे. रफार हा ऋकार नव्हे कारण उच्चार हा स्थान आणि प्रयत्न या दोहोंनी बनतो. ऋ चे जे तीन उच्चार सांगितलेत त्यापैकी एकाचे स्थान या रफाराशी जुळत असले तरी प्रयत्न वेगळा आहे. ऋकारात गुंजन अर्थात बझिंग साउंड आहे तर रफारात तसे नाही.
चार्वी, मूर्च्छा आणी मूर्ध्नी
चार्वी, मूर्च्छा आणी मूर्ध्नी हे शब्द ऐकून आहे. हे वार्धा सारखं मूर्धा काय असतं? हां अर्धामूर्धा का?
मूर्धन् शब्दाचे रूप आहे मूर्धा
प्रथमा एकवचन
धनंजय मूर्धन चा अर्थ का? कसा
धनंजय मूर्धन चा अर्थ का? कसा वापर करायचा वाक्यात तेही सांगाल का प्लीज?
____
वरील चर्चेतून - मूर्धा म्हणजे टाळू दिसतय. प्लीज कन्फर्म.
* 'मूर्धन्/ मूर्धा'चा शब्दशः
* 'मूर्धन्/ मूर्धा'चा शब्दशः अर्थ माथा, शिखर. तोंडाच्या आतला सगळ्यात 'टॉप'चा भाग मूर्धा. ट्, ठ्, ड्, ढ् वगैरे उच्चारताना जिभेचा स्पर्श होतो तो भाग.
हा शब्द मराठीत फारसा वापरात नाही, संस्कृतमध्ये जास्त वापरात आहे. वाक्यात वापर करताना (प्रथमा एकवचनात) मूर्धा असाच वापर होईल.
* तालु हा भाग त्याच्या किंचित मागच्या (घशाच्या दिशेला) बाजूला. 'चिकट'मधल्या 'च'चा वगैरे उच्चार करताना जीभ टेकते तो भाग. 'तालु'ला मराठीत 'टाळा' किंवा टाळूही म्हणतात, पण टाळू हा शब्द जास्तकरून डोक्यावरचा भाग यासाठी वापरतात (उदा. बाळाचे टाळू भरणे).
धन्यवाद चार्वी.
धन्यवाद चार्वी.
मराठीत मी तरी एकवचन आणि अनेक
मराठीत मी तरी एकवचन आणि अनेक वचनात हे बघितले आहे.
आंब्यांची पेटी = आंब्यांच्या पेट्या.
कपड्यांचे कपाट = कपड्यांची कपाटं/टे
ज्या वस्तुचे अनेक वचन होते त्याच्या आधीच्या शब्दात पण बदल करते मी तरी.
हे सर्वसामान्य मराठी आहे का?
हे असे इतर भाषेत होते का?
जर असे होत असेल तर ह्याला नाव काय आहे?
हा एक माझ्या वयाप्रमाणे बालिश प्रश्न आहे. पटला नसला तर खिल्ली उडवा.
१. हे सर्वसामान्य मराठी
१. हे सर्वसामान्य मराठी आहे.
२. हिंदीत असे होते - उदा. मेरा भाई - मेरे भाई, उसका पपीता- उसके पपीते, इ.इ.
ऑब्जेक्टप्रमाणे सब्जेक्टच्या विभक्तीप्रत्ययांत बदल होतो खरा. संस्कृतात असे होत नाही. द्राविडी भाषांची मला जितकी माहिती आहे (त्यातही मुख्यतः कन्नड-तेलुगुच्या आधारेच बोलतोय) त्याप्रमाणे असे होत नाही. बंगालीतही असे होत नाही. मराठी आणि हिंदीत तरी होते. याचे कारण माहिती नाही. व्याकरणदृष्ट्या या गोष्टीला काय नाव आहे ते पाहिले पाहिजे, नाव मला माहिती नाही.
चा ची चे ..राजवाडे
@ अनुताई: चा, ची, चे हे षष्ठीचे विभक्ती प्रत्यय लागलेले शब्द विशेषणांसारखे वागतात असे दिसते. नामाच्या लिंग-वचनाप्रमाणे विशेषणाच्या लिंग-वचनात जसा बदल होतो, तसा बदल त्यांत होतो.
याचे कारण राजवाड्यांनी असे दिले आहे:
राजवाड्यांच्या मते चा ची चे प्रत्ययान्त शब्द हे 'खर्या' षष्ठी विभक्तीचे शब्द नाहीतच! अज्ञानाने व्याकरणकार त्यांना षष्ठी म्हणतात! मदीय, पाणिनीय इ. शब्दांतील संस्कृत ईय प्रत्ययापासून चा ची चे हे प्रत्यय निघाले आहेत (ईय -> इज्ज -> ईच -> च). हे ईय प्रत्ययान्त शब्द नामे किंवा विशेषणे असल्याने लिंग-वचनांनुसार त्यांना विकार (बदल) होतो.
अतिरोचक. राजवाड्यांच्या
अतिरोचक.
राजवाड्यांच्या कुठल्या खंडात/पुस्तकात ही माहिती आलेली आहे?
ब्लोखचे पुस्तक चाळायलाही वेळ होईना....
संस्कृत षष्ठी प्रत्यय->मराठी द्वितीया प्रत्यय (व्युत्पत्तीपुरते)
बालस्य/बालानां => बाळास/बाळांना
बाकी +१ आहेच.
अृ
'ऋ' हे अक्षर मी 'अृ' असे लिहिलेले पाहिले आहे. (स्मरणशक्ति दगा देत नसेल तर र. कृ. जोशी ह्यांनी). उच्चार समजण्यास ह्याची मदत होईल असे वाटते. युनिकोड फॉंट वापरून -हस्व ऋ कसा लिहितात माहीत नाही.
(की हाच -हस्व आणि हाच दीर्घ आहे?)
...
लिहिणारास (सकाळीसकाळी) सावरकर चावले काय?
आज बहुधा सावरकरांनी सुद्धा
आज बहुधा सावरकरांनी सुद्धा ह्या प्रकाराला शुद्ध आचरटपणा असेच म्हटले असते.
जुन्याला चिकटून राहणे हे त्यांना मान्य नसणारच.
(ऱ्हस्वदीर्घ)
ऱ्हस्व ऋ
दीर्घ ॠ
ऱ्हस्व ऌ
दीर्घ ॡ
सावरकरी अृ, अॄ, अॢ, अॣ.
आता वि. का. राजवाडे असते तर
आता वि. का. राजवाडे असते तर त्यांनी पॉडकास्ट टाकले असते.
धन्यवाद.
ऌ आणि ॡ बद्दल शंका नाही. मात्र ऋ चा उकार (की ऋकार) डावीकडे वळल्यास ऱ्हस्व आणि उजवीकडे वळल्यास दीर्घ असे लहानपणी शिकलो होतो ते चुकीचे असावे!
deleted
deleted
.
(धागा वर आणण्याकरिता तथा जुने प्रतिसाद दृश्य करण्याकरिता.)