ध्वनी अनुदिनी - पुष्प 3 - तक्रार मार्गदर्शन - श्री. विवेक पत्की

ध्वनी अनुदिनी पुष्प - 1 - मुंबई ग्राहक पंचायत - ओळख - श्री अशोक रावत

ध्वनी अनुदिनी - पुष्प - २ मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था - श्री. कमलाकर पेंडसे

सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार,
आज आपल्या समोर सादर आहे या ध्वनी अनुदिनीचे (Audio Blog) तिसरे पुष्प.
या भागात आपण तक्रार मार्गदर्शनाची माहिती घेणार आहोत. तक्रार केव्हा, कशी, कोठे करावी, त्याचा पाठपुरावा कसा करावा याचे योग्य विवेचन श्री. विवेक पत्की यांनी या संभाषणात केले आहे.
खाली दिलेल्या लिंकवर टिचकी मारुन आपल्याला ही माहिती ऐकता येईल.

(वरील लिंक ही साउंडक्लाऊड या संकेत स्थळाकडे जाते.)

आपल्याला सदर फाईल खाली दिलेल्या लिंकवर टिचकी मारुन सदर फाईल डाऊनलोड करुन आपल्या मोबाईल, संगणक, पेन ड्राईव्ह ने टिव्हीवर अशा विविध पध्दतीने ऐकता येईल.

सदर डाऊनलोड केलेली फाईल मुंबई ग्राहक पंचायतीच्या पूर्वपरवानगी शिवाय त्यातील माहिती बदलता, एकत्र करता, तसेच व्यावसायिक कामासाठी वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी.

सदर फाईल ही mp3 या स्वरुपातील असून 14 मिनिटे 02 सेकंदाची व 12.8 MB आकाराची आहे.

आपल्या प्रतिक्रीया/सूचना यांचे स्वागत आहे.

धन्यवाद.

अनुदिनी गट, मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभाग

जाता-जाता: दादर (पश्चिम), मुंबई येथील गेल्या दोन वर्षापासून बंद असलेले मुंबई ग्राहक पंचायतीचे तक्रार मार्गदर्शन केंद्र 8 मार्च 2016 पासुन पुन्हा सुरु झालेले आहे. सदर मार्गदर्शन केंद्राचा पत्ता व कामकाजाच्या वेळा - ग्राहक तितुका मेळवावा या मुंबई ग्राहक पंचायतीच्या मुखपत्रात नमूद केलेल्या आहेत.

सदर ध्वनी अनुदिनी मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet