कृपया सल्ला द्या

माझे वय ४८, . बीकॉम आ हे, पण Accounts मधे Interest नाही. आता एका लहान कंपनीत २० वर्षापासून कॉम्पुटर operator आहे, पगार १३,०००/- (आत्ता आल्येल्या Driver एवढा)आहे, Provident Fund दोन वर्ष्या पूर्वी चालू .झाला , Sales Bill करणे, Quotation करणे हि कामे करतो. हि कंपनी कदाचित २ वर्षात बंद होईल. आणि जरी कंपनी बंद नाही झाली तरी या कंपनीत Rretirement पर्यंत राहिलो तरी पगार १७,०००/- पर्यंतच असेल. कंपनीचे मालक एका मोठ्या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आहेत, त्या संस्थेची काम (+) ऑफिस ची काम, हि दोन्ही काम करून Driver एवढा पगार घेण पटत नाही व यातून बाहेर हि पडता येत नाही. भविष्याच्या दृष्टीने काय कराव ते काळात नाही

मी बीकॉम झाल्यानंतर एवढे कोर्से नव्हते व कोर्से करण्या ऐवढे पैसे नव्हते व मुख्य म्हणजे सांगणार कोणी नव्हते.
लग्ना पूर्वी Software Engineering चा कोर्स केला होता पण तो माझ्या बौद्धिक क्षमते मुळे मला जमला नाही असे मला घरी कोर्स बद्दल सांगणारे कोणी नाही, कारण आई व वडील दोघे प्राथमीक शिक्षक लग्ना पूर्वी हि नौकरी सोडून दुसरया कंपनित गेलो होतो. पण तेथे जास्ती त्रास झाला, महणून परत या कंपनीत आलो.

पत्नी M.CCom आहे. सरकारी कर्मचारी. तिला मी councilor कडे जाण पटत नाही.

धन्यवाद

सुरज भोसले

field_vote: 
0
No votes yet

भोसलेसाहेब एक सांगू का? तुम्हाला नोकरीच करायची आहे असं धरलं तर करियरची ६०-४८ = १२ वर्षं राहिली आहेत. त्यामध्ये रु. १२-१७ ह० पेक्षा जास्त पगार हवा असेल तर "इंटरेस्ट नाही", "जमत नाही", "पटत नाही", "त्रास झाला म्हणून परतलो" वगैरे भाषा आणि अ‍ॅटिट्यूड सोडला पाहिजे. आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येताना भरपूर वेदना होतात.

प्रत्यक्ष कृतींच्याबद्दल म्हणाल तर तुमच्या जवळच्या तीन मित्र/हितचिंतकांसोबत हे सगळं बोला, त्यांचा सल्ला घ्या. ते मित्र/हितचिंतक असे हवेत की (अ) तुम्हाला जवळून ओळखतात, (ब) कोणतीही भीडभाड न बाळगता कटू गोष्टही तोंडावर सांगतील, (क) यथाशक्ती मदत करू शकतील. त्या तिघांचा सल्ला घ्या, पण शेवटी निर्णय तुम्हीच घ्या. (हे स्वानुभवाने सांगतो आहे.)

तुम्हाला अनेक शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

वय 48 म्हणता मग मुलगा वगैरे असेल आणि हाताखाली आला असेल(म्हणजे मिळवता झाला असेल)
तर फार चिंता करणे व्यर्थ आहे,
नोकरीबद्दल म्हणाल तर B'COM झाले आहे आणि account मध्ये इंटरेस्ट नाही म्हणता?
मग कमी पगारात अॅडजस्ट करणे अनिवार्य आहे.
कंपनी बंद पडली तर दुसरी शोधणे अनिवार्य आहे.
पत्नी M'COM आहे आणि सरकारी कर्मचारीही आहे मग त्यांचाही थोडा हातभार असेलच कि!
बौद्धिक क्षमतेमुळे कोर्स जमला नाही म्हणता?बरं असू दे.
पत्नीशी,जवळच्या मित्रांशी योग्य ती चर्चा करणे,अशा वेळेस आपली माणसेच कामाला येतात.
.
.
.
गावाकडे शेती वगैरे असेल तर नोकरी सोडा असा आगाऊ सल्ला देतो.आधुनिक शेतीकडे वळा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुणाच्या बुडाखाली किती अंधार हाय,त्ये समद्या तालुक्याला माहित्ये.

याठिकाणी मुख्यतः समस्या जे काम करताय त्याविषयी किंवा पगाराविषयी नसून सध्या त्याच पगाराचा ड्रायव्हर आल्यावर तुलनाजन्य बोच मनात शिरल्याने उत्पन्न झालेली तात्पुरती समस्या आहे असं वाटतं (भासतं). वर्क सॅटिस्फॅक्शनचा मुद्दा वाटत नाही कारण वीस वर्षं तुम्ही तेच काम ऑलरेडी केलंत (आणि या पगारावर) म्हणजे यू आर व्हेरी मच (टू मच) कम्फर्टेबल विथ दॅट वर्क असं म्हणता येईल..

आहे तो पगार तुम्हाला पुरत नाहीये हा मुद्दा आहे की केवळ ड्रायव्हरइतका पगार घेणं आता कमीपणाचं वाटू लागलं आहे इतकाच प्रश्न आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नोकरी चांगली ( कमी जबाबदाय्रा ,फक्त नियोजित वेळच आणि भरपुर पगार ) हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं.
ती मिळाली तर निवृत्त होण्याअगोदर चारदोन छंद करणे ( शनि रवी सुट्टी ,वामकुक्षी धरून ) ,चारदोन नावाजलेल्या लेखकांची पुस्तके वाचून त्यांना श्रीमंत होण्यास हातभार लावणे हे करू शकतो.
बाकी असं काही सर्वांच्याच वाटेला येत नसलं तरी शिक्षण संपताक्षणीच तीन चार महिन्यात हातात छनछन नोकरीच देते.एक दोन वर्षांनी पगार म्हणजे कँटिनवाल्याने ताटात डावल्याने वाढलेले थोडे अन्न असते ही जाणीव होते व हे तरी कुठं मिळतया असे वारंवार सांगणारे मन व हितचिंतक झेप घेण्याच्या तयारीला खो देत असतात ..बाकी धंधा करून आख्ख पातेलंच ताब्यात घेण्याची दुर्दम्य इच्छा हवी.
मला रडणारी प्रवृत्ती अजिबात आवडत नाही.ती कोणत्याही आर्थिक थरातल्या मनुष्यास असू शकते.आजुबाजूचे मार्केट संधी शोधा आणि सुरुवात करा.व्यवसायाला वयाची अट नसते.रडायचंच म्हटलं तर भारतातले नव्वद टक्के लोक रडू शकतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचं लिखाण प्रामाणिक वाटलं. स्वतःच्या आयुष्याबद्दलच्या संवेदनशील, गंभीर विषयांना सार्वजनिक संभाषणांमधे आणणं याला लागणारं धैर्य आपण दाखवलं आहे.
वयाच्या पन्नाशीच्या आसपास पोचल्यावर आयुष्यामधे दिशाहीन असल्यासारखं वाटणं, भविष्याची काळजी वाटणं असं वाटणारे तुम्ही एकमेव असाल असं वाटत नाही. या टप्प्यावर आल्यानंतर नवी स्किल्स आत्मसात करणं कठीण वाटतं, निवृत्ती तर दूर आहे परंतु आहे त्या नोकरीमधे stagnation आहे आणि नोकरी बदलणं अशक्यप्राय आहे अशी गुंतागुंतीची परिस्थिती उद्भवू शकते.

आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जायला कुणाला विशेष आवडत नाही परंतु जेव्हा कोंडी होते आहे असं वाटतं तेव्हा ती कोंडी फोडण्यावाचून इलाज नसतो. याकरता आतापर्यंत न करून पाहिलेल्या गोष्टींकरता प्रयत्न करणं, त्याकरता कष्ट उचलणं किंवा काही मर्यादित धोके पत्करणं (किंवा या दोन्ही गोष्टी करणं) हे आवश्यक ठरतं. नवं काहीतरी व्यावसायिक कौशल्य आत्मसात करणं, नव्या जोडधंद्याचा विचार करणं, उद्योजकतेच्या दृष्टीने जगाकडे पाहाणं या सुचणार्‍या गोष्टी वाटतात.

तुमच्या पुढील प्रवासाकरता शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

"तुमचं लिखाण प्रामाणिक वाटलं. स्वतःच्या आयुष्याबद्दलच्या संवेदनशील, गंभीर विषयांना सार्वजनिक संभाषणांमधे आणणं याला लागणारं धैर्य आपण दाखवलं आहे."
बरोबर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यांचा हा किंवा असाच धागा आधी कुठेतरी वाचल्यासारखा का वाटतो आहे? मिपा किंवा माबोवर वर्ष-दोन वर्षांत टाकला होता का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मलाही तसेच वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वांच्या प्रतिसादा बद्दल आभार
मी या आधी मिपा वर असा धागा टाकला होता त्यावर मला काहीच reply मिळाला नाही.
कितीही व कोणत्याही कामाला माझी तयारी आहे. या ऑफिस मध्ये हि भरपूर काम करायला लागत. एवढ काम करूनही जर Driver व नवीन लोकांएवढा पगार मिळाला तर वाईट वाटणारच. या कामा पेक्षा वेगळ काम करायच होत, पण मी आजून काय करू शकतो हे आज पर्यंत मला कळाल नाही. हे विचित्र वाटेल पण एका व्यक्ती ने मला कल चाचणी करण्याचा सल्ला दिला. मिसेस ला मी councilor कडे जाण पटत नाही.
माझ शिक्षण नाशिक जवळ खेड्यात झाल. इथ माझे कोणीही मित्र नाहीत.
माझ लग्न उशिरा झाल, मुलगा आत्ता ९ वर्ष्याचा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्या बायकोला जर सरकारी नोकरी असेल तर तुम्ही इतके का काळजीत आहात?
जी आहे ती नोकरी मजेत करा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> एवढ काम करूनही जर Driver व नवीन लोकांएवढा पगार मिळाला तर वाईट वाटणारच.

ड्रायव्हरची नोकरी म्हणजे अनस्किल्ड लेबर नव्हे. साधारणतः ड्रायव्हरचे कामाचे तास जास्त असतात. त्यात तुम्हाला कंपनीतल्या बड्या अधिकारी लोकांना कारमध्ये बसवून न्यायचं असलं तर जोखीम वाढते. त्यात तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी ड्रायव्हर असाल, तर जोखीम वाढते. परवाच एका कंपनीच्या ड्रायव्हरची रस्त्यात तंतरलेली पाहिली. गाडी नवी कोरी मर्सिडीज होती. मागून कुणी तरी ठोकलं. गाडीला किती डॅमेज झालंय ते दिसेपर्यंत ड्रायव्हर चांगलाच घाबरलेला होता. त्यामुळे आपल्यावरची जबाबदारी, कामातली जोखीम, कामाचे तास वगैरेंची तुलना करा आणि मगच वाईट वाटून घ्यायचं का, ते ठरवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माझ्या एका नातेवाईकाची बायको सरकारी नोकरीत आहे. ती नोकरी करते. याने सुरवातीला काही नोकर्‍या केल्या. पण नंतर कुटुंब व घर सांभाळले. मुलगा आता मोठा होउन लष्करात अधिकारी आहे. त्याचे ही आता लग्न झाले.
कुटुंब व घर सांभाळणे हे देखील मोठे व जबाबदारीचे काम आहे. त्यात कमीपणा वाटून घेउ नका. बायकोला नोकरी करु द्या तुम्ही घर सांभाळा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

गविंनी सांगितलं तसं ड्रायव्हरशी तुलना हा मूळ मुद्दा दिसतोय.
एक सांगू. ड्रायव्हरला कमी लेखणं सोडा. दुसर्‍याला किती मिळतय यापेक्षा आपल्याला किती गरज आहे आणि काय मिळवायच याकडे लक्ष द्या. कुठल्या कामाला किती पैसे मिळावेत या विचारात खरचं पडू नका.. तिथे न्याय्य वगैरे असं काही नसतं.. thats the fact of life. आणि तुम्ही आम्ही ते बदलूही शकत नाही. मग कशाला त्यावर डोकं फोडा??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सूरजजी तुमची अवस्था समजू शकतो. माझ्या एका जवळच्या नातेवाईकाची गरवारे नायलाॅन्स बंद पडल्यापासून (गेल्या वीस वर्षांपासून) अशीच अवस्था अाहे. त्यांनाही अशाच छोट्या दोन तीन कंपन्यात काम करावे लागले. चहा पुरवण्याचा व्यवसाय करून पाहिला, पण उधारीने घात केला. मग सध्यादेखील अशाच छोट्या कंपनीत काम करतात. सुदैवाने ४ पैकी ३ मुली शिकल्या व सध्या सरकारी नोकरीत अाहेत. पण लग्ने झालीत व यांची अवस्था पुन्हा नाजूकच अाहे. पण अाता या वयात नवी नोकरी देणार तरी कोण? सांगायचा उद्देश असा की अापण अापल्या अवस्थेसाठी अापल्यालाच जबाबदार धरलं पाहिजे. तरीही अाधिक चांगल्या संधीच्या शोधात रहा व मिळताच उडी मारा. काही वाईट होणार नाही.
धंद्याचं म्हणाल तर, अाताशा भारतात नविन व छोटा उद्योग करणं अाधिकाधिक कठीण बनत चाललं अाहे, असं माझं व्यक्तीगत मत अाहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वधर्म
हे खर आहे कि माझ्या या अवस्थेसाठी मीच जबाबदार आहे. या कंपनीत मी लागलो व दुसऱ्या कंपनीत नौकरी साठी मी प्रयत्न केले नाहीत (दुसरी नौकरी मिळाली असती किंवा नाहि हे माहित नाही.) जास्ती वर्ष या कंपनीत राहिल्या मुळे कंपनीच्या मालकाना हे समजले कि याला पगार कमी दिला तरी चालेल.
संधी च्या शोधात नक्कीच आहे.
प्रकाशजी
घरातली बरीचशी काम मी करतो, त्यात मला कमीपणा काहीच वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमची कंपनी बंद पडण्याची शक्यता असेल तर तातडीने नोकरी बदला. हाती नोकरी असताना नोकरी शोधणे आणि हाती नोकरी नसताना नोकरी शोधणे यात जमीन अस्मानाचा फरक असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

चिंतातुर जंतू
तुम्ही ड्रायव्हरच्या कामाच्या तसा बद्दल लिहील त्यांचे कामाचे तास जास्ती असतात, पण I.T. (information Technology) मधल्या लोकांनाहि १४ ते १६ तास काम कराव लागतच कि त्यांना लाखो रुपये पगार मिळतो कि. (मी माझी तुलना I.T. (information Technology) मधील लोकांशी किंवा ड्रायव्हरशी करत नाही). शिक्षणाला काही अर्थ आहे किंवा नाही. माझ काही चुकत असले तर नक्की सांगा. मी ऑफिस नंतर च्या वेळात काय काम करावे ते कोण सांगू शकेल (कल चाचणी (Aptitude Test)) हे जर कोणी सांगू शकत असेल तर खूप उपकार होतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी ऑफिस नंतर च्या वेळात काय काम करावे ते कोण सांगू शकेल कल चाचणी (Aptitude Test)) करावी किंवा नाही किंवा या वयात बराबोर आहे किंवा नाही हे जर कोणी सांगू शकत असेल तर खूप उपकार होतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो ४८ व्या वर्षी कसली कल चाचणी करताय? काही करु नका.

मी वर लिहीले च होते, पुन्हा लिहीते.

तुमची बायको सरकारी नोकरीत आहे. तिची नोकरी पण २०+ वर्ष झाली असेल. तुम्ही का काळजी करताय? आहे ती नोकरी मजेत करा कुठलाही विषाद न ठेवता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सूरज भाई एवढा लोड नाँय घ्यायचा--चालिसव्या वर्षी तर लाइफ़ सुरु होता -- नोकारी के बाद जानेका कोपरखेरने प्रियंका बार --अभी चालू किया है फिरसे--एंज़ोय करनेका--उधारिच कल चाचनी होगा-- ऐप्टिटूड
बाहर आएगा निकलके-- हाहा मज्जा करतोय

मला एक गोश्त कलत नाही इतक़ी वर्ष समजाला नाही का? हेच नाही ,तेच नाही, मार्गदर्शन नाही-- गेट आउट दिस थिंग डूड। गेट अ लाइफ़। बोलन्या वरुण तरी मुंबईकर वाटताय।।मज़ा सल्ला आहें एवढाच ईगो हर्ट झालाय ना आनी तसपन कम्पनी बंद
पड़नार आहें--लाथ मारो नोकरिपे। मिसेस ला विश्वासात घ्या। तुम्हाला जे वाटताय ते करा --स्टार्टअप वैगेरे , फ़ोटोग्राफ़ी काहीपन। बेसिक फ़ोटोग्राफ़ी शिकला तर मी देतो गारंटी जॉब मिलायची- आयला पण जे काय करनार ते मनापसुन करा। जेवहा तुम्हीं नोकारी धरली तेव्हा घरगूति प्रॉब्लम असतिल पण आता चिल मारा--दोन महीने रजा घेंउन कोंकनात जा विचार करा--ड्राइवर सोबत तुलना नका करूँ तो जॉब कठिन असतो। ड्राइवर डिज़र्व that पेमेंट।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!