मसूरभात आणि सोलकढी

मसूरभाताकरता साहित्यः
एक मध्यम कांदा
आवडीप्रमाणे रंगीत भोपळी मिरच्या(हिरव्या मिरच्यांची चव विषेशतः छान लागते)

३/४ वाटी किमान ८ तास भिजवलेले अथवा मोड आलेले मसूर

१ १/४ वाट्या तांदूळ भात करायच्या आधी ३० मिनिटे भिजवून निथळून ठेवावेत.

१/२ छोटा चमचा आले किसून
१/२ छोटा चमचा लसूण बारीक तुकडे करून
१ १/२ मोठा चमचा बिर्याणी पुलाव मसाला(मी बादशहा मसाला वापरते)
१ मोठा चमचा बटर(तेलाऐवजी बटर वापरले असता भात जास्त चवदार होतो)
चिमूट्भर हळद
चवीनुसार मीठ

कृती:
कांदा आणि मिरच्यांचे उभे काप करावे.

पातेले गरम करून त्यात बटर वितळवत ठेवावे.
बटर पुर्णपणे वितळले, की प्रथम कांदा परतून घ्यावा.
कांदा अर्धवट पारदर्शी झाल्यावर मिरच्यांचे तुकडे, आलं-लसूण घालून परतून घ्यावेत व पाऊण चमचा मसाला घालावा.

भाज्या अर्धवट शिजल्यावर(आकारमान साधारणतः निम्मे होईल) मसूर घालून चांगले परतून घ्यावेत.

मग तांदूळ, उरलेला मसाला व मीठ घालून परतावे.

हळद घालून परतावे. हळद केवळ रंग यावा म्हणून घालायची आहे.
४ वाट्या पाणी घालून चांगले ढवळावे व मंद आचेवर भात शिजवावा. हा भात कुकरमधे सुद्धा शिजवता येईल.

या भाताबरोबर सोलकढी छान लागते. सोलकढीची मला सर्वात जास्त आवडणारी कृती खाली देत आहे.
साहित्यः
७-८ आमसोले(कोकमं)

चवीनुसार मीठ
चवीनुसार साखर
छोट्याश्या लसूण पाकळीचे ४-५ पातळ काप
नारळाचे दूध(कोकमांच्या आंबटपणानुसार आपापल्या चवीप्रमाणे वापरावे. बेतसर दाट असल्यास ३-४ वाट्या लागेल)

कृती:
एका पातेल्यात कोकमं ३० मिनिटे भिजत घालावीत.
भिजत घातलेल्या कोकमांचा कोळ, नारळाचे दूध, मीठ आणि साखर एकत्र करून मिसळावे. लसूण पाकळ्या घालून परत ढवळावे. गरज वाटत असल्यात थोडे पाणी घालावे.

मसूरभात, सोलकढी आणि असल्यास मिरगुंड/पोह्याचे पापड!

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

...
...
...
...
...
...
... टाकत नाहीये
रंगीबेरंगी भात मस्त दिसतोय पण सोलकढी का दाखवता? कुठे फेडाल ही पापं?

आवडीप्रमाणे रंगीत भोपळी मिरच्या(हिरव्या मिरच्यांची चव विषेशतः छान लागते)

हिरव्या मिरच्या शिजवलेल्या आवडतात, आणि इतर रंगांच्या मिरच्या सॅलडसारख्या कच्च्या, किंवा किंचित परतलेल्या आवडतात. इतर रंगांच्या मिरच्या शिजवल्यावर थोड्या कडवट वाटतात; ती चव मला आवडत नाही. अर्थात या भातात ती चव लागणार नाही असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मसूरभाताची चित्रे आवडली. खायला उत्सुक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

तुमच्या हातचा मसूरभात खायला मी पण उत्सुक आहे. कधी येऊ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमच्याकरता खास हा मेनू करूण्यात आला जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास

सोलकढी आणि भात म्हंजे आम्हा कोकण्यांचा जीव
शेवटचा फोटो मस्त आलाय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

आमी पापी लोक... आमाला फोटू दिसात नाय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

छ्या! जाऊ दे.. लाळ पुसत असताना अधिक टायपवत नाही! जाऊन आधी नाश्ता करून येतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भन्नाट पाकक्रुती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला चित्रं का दिसत नाहिएत?

मसूर भातात खिमा घालतात असे ऐकले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खिम्याचे माहिती नाही, पण कोलंबी घालून जास्त मसालेदार आणि चमचमीत भात करतात हे माहिती आहे. त्यात खडया मसाल्याचे आणि तिखटाचे प्रमाण जास्त असते.

वरील भात हा तुलनेने सौम्य आहे. खिचडी-कढी, वरण-भात यांसारख्या 'कंफर्ट फूड' मधे गणता येईल असा.

बाकी चित्रं का दिसत नसावीत, हे सांगण्यास असमर्थ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्हाला पण दिसत नाहीये फोटो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेदिनी..