फुसके बार – २४ जानेवारी २०१६ - रॅगिंग, वगैरे व (भलतेच) लैंगिक शिक्षण

फुसके बार – २४ जानेवारी २०१६

१) शाळेत असताना सिनियर विद्यार्थ्यांकडून काय काय मार्गदर्शन मिळेल याचा काही नेम नसतो. एरवी शाळा चालू असताना मोठ्या मुलांशी फार संबंध येत नाही. पण सहलीच्या निमित्ताने काही मौक्तिके शिकायला मिळतात.
सहावीत वगैरे असताना वेरूळ-अजिंठा-औरंगाबादच्या सहलीच्या निमित्ताने एक गाणे शिकायला मिळाले.
ओ माय डियर
कम कम हिअर
ओपन युवर साडी
झुकझुक गाडी
तेव्हा त्याचा फार अर्थही कळला नाही. अशा रचनांचे श्रेय कोणाचे असते हे कळत नसते.
‘गोरी गोरी पान, फुलासारखी छान’ या प्रसिद्ध गाण्यावरून बसवलेले गाणे पुढे कॉलेजमध्ये असताना रॅगिंग होत असताना कळले. ते मात्र येथे लिहिण्यासारखे नाही.

२) वर रॅगिंगचा उल्लेख केला आहे. रॅगिंगमुळे अनेक मुलांच्या भावनाविश्वावर विपरित परिणाम झाला आहे, काहींनी आत्महत्याही झालेल्या आहेत. त्यामुळे रॅगिंग हा कायद्याने गुन्हा आहे हे योग्यच आहे. त्याचे समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. हे सारे तीसएक वर्षांपूर्वीचे आहे.

एक तर रॅगिंगचे वातावरण गंभीर असते. एखाद्याला नाचायला सांगितले तर तो त्या वातावरणात तसे करू शकत नसतो. अनेक जणांना नाचताही येत नसते. मग त्याला ते कसे शिकवायचे?

तर सिगरेट ओढून झाल्यावर ती चपलेखाली कशी विझवायची? ज्या पायाने विझवायची त्याने झटके देत विझवायची. एकदा त्याचे प्रात्यक्षिक त्याच्याकडून करून घ्यायचे. मग दोन्ही पायांनी दोन सिगरेटी विझवायच्या. एकाच वेळी. हे करून घ्यायचे. मग दोन्ही पायांनी हे करत असताना दोन्ही हातांनी मधूनमधून सिगरेटीचे झुरके घेण्याचा अभिनय करायचा. की झाला नाच. आहे काय न नाही काय!

३) रॅगिंगच्या वेळी कोणी मुलगा आगाऊपणे बोलू लागला तर त्याला ताळ्यावर आणण्याचे अहिंसक उपायही असायचे.

त्याच्यासमोर एक रिकामी बादली ठेवायची. त्याला सांगायचे की आता तुला आंघोळ करायची आहे. पण पाणी नसल्यामुळे तुला ‘पाणी’ तयार करायचे आहे. ते कसे करायचे, तर हवेतून हायड्रोजनचे दोन अणु घ्यायचे, एक ऑक्सिजनचा. हे तीनही अणू तळहातावर ठेवायचे आणि फट म्हणत टाळी वाजवायची. की झाला पाण्याचा एक रेणू तयार. मग तो त्या बादलीत टाकायचा. ‘रॅगिंग’ चालू असल्यामुळे थोडा तरी धाक असतोच. त्यामुळे नाइलाजामुळे का होईना थोडा वेळ तो ते करतो. मग कंटाळतो. मग त्याला उपहासाने म्हणायचे, एवढा बारावीचा टॉपर ना तू, एवढ्या बादलीत किती रेणू मावतील याचा हिशोव कर. मग दहाचा कितवा घात वगैरे हिशोब करत आपल्याला कितीवेळ टाळ्या वाजवत बसावे लागेल याचे कॅल्क्युलेशन करायला लावायचे. ते करता आले नाही तर त्याचा बौद्धिक उद्धार करायचा. तो आकडा एकदाचा कळला की त्याला सहज समजायचे की आता आयुष्यभर फट म्हणत टाळ्या वाजवत बसलो तरी ती बादली काही पाण्याने भरणार नाही. तेव्हा आपल्यापुढचे संकट केवढे मोठे आहे हे कळले की मग तो मुलगा रॅगिंगच्याबाबतीत सिनियर्सशी आपसुक सहकार्य करू लागे.

मुळातच हिंसक वृत्तीची काही मुले असतात. त्यांच्याबद्दल काही सांगत नाही.

४) रॅगिंगमध्ये जातीभेद वगैरे काही नसे. तेथे फक्त ज्युनियर विरूद्ध सिनियर असा भेद असे. त्याचे एक कारण असे असू शकेल की एखाद्या सिनियरच्या डोक्यात जात असली तरी तो सर्वांसमोर दाखवता येत नसे. आणि मुळातच असे प्रकार जवळजवळ नसतच.

त्यातून काही जणांशी चांगली मैत्रीही जमते. काही जणांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक समस्या समजतात.

माझ्याबरोबर होस्टेलला असलेला एका वर्षाने माझ्या मागे असलेला माझा मित्र नंतर माझ्याबरोबर एका कंपनीत कामही करत होता. त्याने कंपनी बदलण्याचे ठरवले, तेव्हा त्याच्या निरोप समारंभामध्ये मी म्हटले होते की “मी कॉलेजमध्ये त्याला एक वर्ष सिनियर होतो. त्यामुळे आय लिटरली नो हिम इनसाइड आउट. माझ्याइतके त्याला कोणी चांगले ओळखत नाही.”

५) रॅगिंगचा काही फायदाही होऊ शकतो असे खरे तर म्हणू नये, पण सेक्ससंबंधातील अनेकांचे गैरसमज असतात. ते दूर होन्यास मदत होते. अर्थात ही माहिती संवेदनशीलपणे वगैरे पोहोचवली जात नाही की त्यात लैंगिक शिक्षणाचा उदात्त हेतु नसतो. काही जणांना त्याचा जबरी धक्काही बसतो.

रॅगिंग चालू असतानाच्या काळात एक व्हिडियो नाईट होती. पहिलीच ब्ल्यु फिल्म (भन्साळीची नव्हे) दाखवली. त्यात प्राण्यांशी सेक्स करतानाची दृश्ये होती. मोठाच मानसिक धक्का बसला होता बहुतेकांना. दुस-या टप्प्यात कॉलेजमध्ये ज्यांचा प्रवेश झाला, त्यांचे 'ते' रॅगिग हुकले. मग आधीच्यांकडून त्याबद्दल ऐकताना असे काही असते याबद्दल एकीकडे अविश्वास वाटणे आणि दुसरीकडे ते पाहण्याचे हुकल्याबद्दल थोडे वाईट वाटणेही झाले.

अनेकदा स्त्रियांवरून शिव्या देताना शरीराच्या एका भागावरून तर पुरूषांवरून देताना दुस-या (पार्श्व)अवयवावरून दिल्या जातात. ही भानगडही ब-यांच जणांना माहित नव्हती. योनीबद्दल इतके बोलले जात असताना मात्र पुनरुत्पादनासाठी सेक्स करण्यासाठी मागचा मार्ग असतो असा काही जणांचा ठाम समज होता. तसे करून जन्म मात्र योनीतून कसा होतो हा प्रश्नही असा समज असलेल्यांना पडलेला दिसत नव्हता. त्याबद्दल रॅगिंगच्या दरम्यान प्रबोधन झाल्यावर युरेका-युरेकाचे भाव अनेकांच्या चेह-यावर होते.

त्यातच रॅगिंगच्या वेळी सिनियर्सनी एकाची खेचण्यासाठी त्याला सांगितले होते की योनीमार्गात प्रवेश करताना दोन मार्ग असतात. तो प्रवेश नीट झाला नाही, म्हणजे भलत्याच मार्गात प्रवेश झाला तर लिंग काडकन मोडते. त्यामुळे जणु काही मासा खाताना काटा घशात अडकू नये याबद्दल जशी काळजी घ्यावी लागते तशीच तेव्हाही घ्यावी लागते, अशी भीती त्याला घातली होती.
त्यामुळे ‘योग्य मार्ग’ कोणता हे कसे समजावे, यावरून आमचा एक मित्र बरेच दिवस सैरभैर झाला होता.

६) माझा इथला अनुभव

कालपासून मला येथे पोस्ट टाकायला, कमेंट करायला का कोणास ठाऊक मोठाच अडथळा येत आहे. सतत लागोपाठ आपोआप लॉगआऊट होणे, काही तरी एरर मेसेज येणे, लॉगइन केल्यावरही ‘तुम्हाला येथे येण्यास मुभा नाही’ असे संदेश येणे असा प्रकार होत आहे.
मी येथे भारंभार पोस्ट लिहितो म्हणून इथले संपादक मंडळ नाखुश आहे. तरीही मी लिहितो आणि त्यांनी अनेकदा फुसके बार सारख्या रोजच्या सदरासारख्या पोस्ट्स आधीच्या पोस्टला प्रतिसाद म्हणून टाकावे असा आग्रह धरत आहेत. माझ्या पोस्ट्समध्ये काही दम नसतो, दर्जा नसतो वगैरेही मला अनेकदा सांगून झाले आहे. मी पहिलीदुसरीत असल्याचे समजून किंवा या वयातही बौद्धिक वाढ अजिबातच झालेली नाही असे समजून एखादी गोष्ट लिहून झाल्यावर तिच्यावर काही दिवस विचार करून ती कशी झाली अहे याचा विचार करून मगच ती येथे टाकावी वगैरे सल्लेही देऊन झाले आहेत.
फुसके बारच्या पोस्ट्स मी वेगवेगळ्या टाकल्या तर क्वचित कधी एखादी पोस्ट स्वतंत्र ठेवणे, त्यांच्या दृष्टीने कचरा असेल, तर त्या हलवून एका ठिकाणी आणणे असे प्रकार चालू केले आहेत.
संपादक मंडळापेकी कमीत कमी तिघे तर माझ्या पोस्ट्सवर अक्षरश: तुटून पडताना दिसतात. अनेकदा आक्रस्ताळी, असंबद्ध टीका असते. मागे कोल्हटकरांच्या एका कमेंटवरून मी हे दाखवून दिले होते. असे प्रकार कमीत कमी पाच वेळा झाले आहेत.
फेसबुकवर माझ्या लिखाणाला चांगला प्रतिसाद मिळतो, परंतु येथे मात्र टीका होते त्यामुळे मी नाराज असेन असे अनुमान करत त्यांनी माझ्याबद्दल मानसशास्त्रीय आडाखेही बांधले. एकूणात फेसबुकवर फार कोणी चांगले लिहित नाही व ऐसी अक्षरे हे उत्तम लिखाणाचा अर्क असलेले पोर्टल असल्याचा त्यांचा दावा आहे. तरीही माझ्या लिखाणापासून माझ्या फार अवास्तव अपेक्षा नाहीत हे मी अनेकदा सांगितलेले आहे. मी लिहिलेल्यातले सगळेच सगळ्यांना अगदीच बाळबोध वाटते कारण त्याबद्दल सगळ्यांनाच माहित असते असा त्यांचा दावा आहे.
त्यांच्या दृष्टीने इथले एक उत्तम लेखक आहेत, त्यांनीच एकदा फुसके बारचे लेख नियमित सदराच्या स्वरूपात लिहिण्याची शिफारस संपादकांकडे करतो असे लिहिले. मी त्यांना तुम्ही जरूर तशी शिफारस करा, पण येथे अशीअशी परिस्थिती आहे, माझा अनुभव कसा आहे ते सांगितले. हे सदस्य स्वत: त्यांना एखादा मुद्दा पटला नाही तरी कधीही हेटाळणीपूर्वक कमेंट करत नाहीत. मात्र इथल्या मालकांनी निव्वळ हेटाळणीपूर्वकच कमेंट करणएच नव्हे तर माझ्या पोस्टवरून माझा अजेंडा काढायलाही कमी केलेले नाही. मागेही त्यांनी अतिशय असंबद्ध कमेंट्स केल्या होत्या. त्यांना ते ते त्या त्यावेळी उदाहरणासह व्यवस्थित दाखवून दिलेले आहे.
त्यांना मी हेही सांगितले आहे की फेसबुकवरही मी निव्वळ लाइक्समिळण्यासाठी लिहित नाही. मला वाटते म्हणून लिहितो. त्यांच्या मांजराच्या फोटोलाही म्हणे पन्नास-शंभर लाइक्स मिळतात. मी तसे काही करत नाही. तेथे जसे कोणी माझ्या लेखाचे कौतुक करते, तसेच टीकाही होते. त्यांचे म्हणणे मी माझे फेसबुकवरचे लेख येथे कॉपी करतो. माझे म्हणणे असे की मी बाहेर काय करतो ते तुम्ही का पाहता? मी तेथे आधीपासून लिहित आहे, त्यामुळे तसे नैसर्गिकपणे होते. उद्यापासून मी एखादा लेख येथे आधी टाकला व नंतर तो फेसबुकवर टाकला तरी त्यांची हरकत असणार आहे काय?
माझे लिखाण फालतु असण्याबरोबरच पाल्हाळ लावणारे असते हाही त्यांचा आक्षेप. आता असे ठरवून कोण पाल्हाळ लावू शकते हेच मला समजत नाही.
पॉलिसीमध्ये इथले वाचक लेखनावर कठोर टीका करू शकतात असा उल्लेख आहे. ती सदस्यांनी खिलाडूपणाने घ्यावी असाही उल्लेख आहे. ‘कठोर टीके’चा अर्थ मी त्यांना विचारला. ती लेखाला उद्देशून असावी हे समजू शकतो, पण हेटाळणीपूर्वक व असंबद्ध असू शकते असा त्याचा अर्थ होतो का? मग अशा ठिकेला रोखटोक उत्तर दिले की लगेच ‘भाषा सांभाळून वापरावी’ हे उपदेश करायला मोकळे. हेटाळणीपूर्वक व लोकांचे अजेंडे शोधणा-या कमेंट्स खपवून घेतल्या जाव्यात अशी अपेक्षा करण्याचे कारण काय. आणि वर हे सारे खिलाडूपणाने घ्यावे ही अपेक्षा व उपदेश.
तुम्ही इथले लेख प्रसिद्ध करण्याआधी मासिकाच्या संपादकांप्रमाणे लेखांची छाननी करत नाही, तेव्हा लेखांची हलवाहलवी करू नका अशी विनंती मी अनेकदा केलेली आहे. त्यावर मला असे केलेले आवडत नाही तर मी मुळात मी येथे लिहितोच का असा धन्य व मला अगदी निरूत्तर करणारा प्रश्नही संपादकांनी मागे विचारला होता. तेव्हा एवढे सांगूनही मी लिहितो म्हणजे ते त्यांच्यालेखी अगदी माझ्या निलाजरेपणाचे लक्षण आहे हे स्पष्ट आहे.
इथले सगळेच लेखक (अर्थात मी सोडून) सगळ्याच विषयांमध्ये पारंगत व व्यासंगी आहेत असा त्यांचा दावा दिसतो. त्याबद्ल तर मला काहीच म्हणायचे नाही.
काल मला वरील पाठ पुन्हा एकदा पढवून झाला. परंतु मी ऐकत नाही हे पाहिल्यावर इथले संपादक आता माझी काळजी करणार नाहीत, हे पोर्टल हे त्यांचे पोर आहे, त्यावर त्या भरपूर वेळ व उर्जा खर्च करतात असे सांगत त्याची काळजी त्यांनी घेतलीच पाहिजे असे सांगितले. ही काळजी घेण्याचा अर्थ मला आता कळला आहे. कालचा फुसके बार चा लेख ‘केवळ वाचनासाठी’ असा केला गेल्याचे मला दिसले. कदाचित नंतर ते काढूनही टाकले जाण्याची शक्यता आहे. कारण यांचे काळजी घेणे यापुढे कोठपर्यंत जाईल याचा काही नेम नाही. आगामी काळात गच्छंती अटळ असू शकते.
सर्वोत्तमपणाचा ध्यास असणे वेगळे व तसा दावा करणे वेगळे. त्यामुळे त्या नावाखाली स्वत: संपादक माझ्या पोस्ट्सवर कशा स्वरूपाच्या कमेंट्स करतात हे तर मी वेळोवेळी दाखवलेले आहेच, व ते त्यांना शोभते का हेही विचारलेले आहे.
इथे आणखी एक प्रकार आहे. मालक किंवा संपादकाना उद्देशून काही लिहिले की त्यांनी काही म्हणण्याऐवजी दुसरेच सदस्य त्यांच्या वतीने उत्तरे देतात. कसला तरी अडकित्ता नावाचे एक सदस्य आहेत. त्यांचे म्हणणे काय, तर त्या मालक असल्या, तरी माझे ‘फडफडणे’ सहन करत आहेत यातच मी काय ते समजावे. ही अतिशय उच्च दर्जाची कमेंट होऊनही मालकांनी त्याबाबत काही केले नाही. दुस-या एक सदस्य सांगतात की मालकी हक्क म्हणजेच अनिर्बंध हक्क. त्या काहीही करू शकतात. त्यावरही मालकांची किंवा संपादकांची काही प्रतिक्रिया नाही. एकूण काय, यावरून इथले वातावरण कसे आहे याची कल्पना यावी.
तेव्हा मालकी हक्क दाखवताना काय चाललेले आहे त्याबद्दल एक उदाहरण द्यावेसे वाटते. स्वत: क्रिकेटचे साहित्य आणायचे. दुस-यांना खेळायला बोलवायचे. मग त्यांच्या दृष्टीने एखाद्याशी पटले नाही की वर त्याला विचारायचे बॅटबॉल तू आणलास का, मैदान तुझे आहे का, मग तू येथे का खेळायला येतोस, त्याला बॉलिंग-बॅटिंग द्यायची नाही, दिली तर एक ओव्हर खेळून झाली की आता सुटा असे म्हणायचे, फिल्डिंगला शॉर्टलेगवर उभे करायचे, अशा प्रकारे ‘माझे ऐकत नाही काय, मी तर तुला काढून टाकत नाही, पण तू स्वत:च कसा निघून जाशील तसे करतो’ असा थोडा प्रकार चालू आहे.
थोडे जमिनीवर या एवढेच सांगायचे आहे. दुस-याची हेटाळणी करून व करत राहून आपला दर्जा सिद्ध करता येत नाही. त्या समजातच रहायचे असेल तर मात्र काही करू शकत नाही.
एक तर वर उल्लेख केल्याप्रमाणे कालपासून पोस्ट/कमेंट टाकण्यात फार वेळ जात आहे. त्यामुळे या शेवटच्या भागाची वेगळी पोस्ट न करता एकत्रच टाकत आहे. कालपासून फुसके बार ‘केवळ वाचण्याच्या’ श्रेणीत टाकला जाणार असल्याचे दिसते. त्यामुळे त्यावर कोणाला काही प्रतिक्रिय़ा देता येणार नाही असे दिसते. असो. हरकत नाही.
एकीकडे अशा पोर्टलची निश्चित गरज आहे आणि दुसरीकडे माझे अनुभव. फुकटात लिहिता येत असूनही असा उपमर्द करण्याची बुद्धी मला कशी झाली कोणास ठाऊक. शेम ऑन मी. अपेक्षा तरी किती ठेवायच्या?

++++++++++
वरील भागावर संपादकांनी कमेंट केलेली आहे. शिवाय ही पोस्टच वाचनमात्र केलेली असल्यामुळे मी त्यांच्या कमेंटवरच कमेंट करू शकत नाही. त्यामुळे मला नेहमीप्रमाणे दिशाभूल करण्याच्या त्यांच्या सवयीवर येथेच लिहावे लागत आहे.
एखाद्याच्या पोस्ट्सना चपलांची उपमा देऊनच त्यांनी काही नावडत्या किंवा नको असलेल्या सदस्यांबद्दलची भावना दाखवली आहे. सदस्यांच्या पोस्ट्स म्हणजे पादत्राणे आहेत की त्यांनी आणलेली छोटी भेटवस्तु आहे. तेव्हा पोस्ट्स हलवण्याचे वगैरे प्रकार हे ‘आम्हाला तुमची भेटवस्तु आवडलेली नाही, ती एका कोप-यात ठेवा नाहीतर आम्हीच ती अडगळीत टाकून देऊ. आणि जमलेच तर आम्ही मालक/संपादक लोक तुम्हाला त्यावरून टोचूनटोचूनही बोलू, असा प्रकार चालू आहे. चपलांच्या उदाहरणापेक्षा हे अधिक जवळचे वाटते का?
शिवाय अशी पोर्टल्स म्हणजे ‘खासगी’ (खासगी – म्हणजे आम्हाला काय करायचे ते करू, कोणी आम्हाला विचारू शकत नाही – या वर उल्लेख केलेल्या ‘अनिर्बंध स्वातंत्र्यापोटी’च्या उल्लेखाप्रमाणे) घर अहे की एखादे चर्चासत्र घडवणारे सभागृह? मालकांनी/संपादकांनी किती हस्तक्षेप करावा?
इथल्याच राजेश घासकडवी या संपादकांनी मी फेसबुकवर जे लिहितो ते पाहून मला येथे लिहिण्याबद्दल सुचवले होते. तसे करायला सुरूवात केल्यावर मात्र माझे लिखाण त्यांना अपेक्षित असलेल्या ‘दर्जाचे’ नाही असा साक्षात्कार त्यांना झाला आणि तेव्हापासून हा प्रकार चालू झालेला आहे.
वर फेसबुकचा उल्लेख केलाच आहे तर त्यावरून आणखी एक सांगावे वाटते. इथले अनेक सदस्य फेसबुकवरही लिहित असतील. मात्र फेसबुकवरील लिखाण कमी दर्जाचे असते, तेथे लोक केवळ लाइक्ससाठी लिहितात, असा सोयीस्कर समज करून घ्यायचा हाही इथल्या संपादकांच्या समजुतीचा भाग आहे हे दिसते.
अमुक केले तर इतर पोर्टल्सवरील इथल्या संपादकांच्या भाषेत त्या सदस्यांना ‘चपलां’सह बाहेर काढले जाते हा तर अतिशयोक्त कांगावा आहे. फेसबुकवरच नव्हे, तर मायबोलीवरही प्रथमपासून या पोस्ट्स स्वतंत्रपणे रहात आहेत. मिसळपावरही त्या स्वतंत्रच असत. त्या एकत्र करण्यावरून तिथल्या संपादकांकडून कोठेही दबावच काय, साधी सूचनाही नव्हती. तेव्हा तुम्ही तुम्हाला हवे ते करून वर मला येथे राहू देता आहात, यावरून तुम्हीच अभिव्यक्तिस्वातंत्र्य जपता असा स्वत:ला सोयीस्कर असा (नेहमीप्रमाणे) समज करून घेऊ नये. उलट तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याचा संकोचच करत आहात हे लक्षात घ्यावे. “इथे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपण्याचा प्रयत्न करून संस्थळाच्या व्यवस्थापनाच्या सोयीसाठी हे लिखाण एकाच धाग्यावर प्रसिद्ध करा असं म्हटलेलं आहे.” असे संपादकांनी त्यांच्या कमेंटमध्ये म्हटले आहे हाही असाच दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. पोस्ट्स वेगळ्या म्हणजे स्वतंत्र राहिल्या तर त्या व्यवस्थापनाच्या कोणत्या सोयीच्या आड येतात हो? मीदेखील एक टेक्निकल स्वरूपाचे पोर्टल ‘माझ्या खर्चाने’ चालवतो, त्यामुळे ‘व्यवस्थापनाची सोय वगैरे’ गोष्टी मला समजत नाहीत असा सोय़िस्कर समज करून घेऊ नये.
संपादकांच्या या कमेंटवर प्रतिसादही देता येत नाही. म्हणून मूळ पोस्टमध्येच लिहावे लागत आहे. ‘वाचनमात्र’ करण्याची शिक्षा दिलेली आहेच. आता हे आणखी कोणत्या थराला जातील पाहू या.
यावर आणखी कमेंट करणार असाल तर मलाही कमेंट करण्याची सोय ठेवाल अशी अपेक्षा. तुमच्या कमेंटमध्ये 'अबिस्वातंत्र्याचा' सोयीस्कर उल्लेख केला आहेत, म्हणून सुचवले.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आपल्या घरी पाहुणा आला आणि त्याने चपला इकडेतिकडे टाकल्या तर पहिले काही दिवस आपण उचलून ठेवू, त्याला हलकेच - तिथे चपला ठेवा असं सांगू. तो जर घरात भांडणं करत असेल, आणि 'तुमच्या घरात तुम्ही माझ्या चपला तिथे हलवून ठेवता ही तुमची हुकुमशाही आहे, ते मला गैरसोयीचं होतं. त्या स्टॅंडला अमुकच फीचर नाही, तमुकच करता येत नाही' अशा तक्रारी करत असेल तर काय कराल तुम्ही? एक वेळ अशी येतेच की आपण त्या चपला लॉक करायच्या आणि म्हणायचं की त्या जागेवर ठेवा, पुन्हा दिवाणखान्यात दिसल्या तर पुन्हा लॉक करून ठेवू.

इतर संस्थळांवर अशा पाहुण्यांना ताबडतोब 'ह्या तुमच्या चपला घेऊन चालते व्हा' असं म्हणून जबरदस्तीने बाहेर काढलं जातं. इथे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपण्याचा प्रयत्न करून संस्थळाच्या व्यवस्थापनाच्या सोयीसाठी हे लिखाण एकाच धाग्यावर प्रसिद्ध करा असं म्हटलेलं आहे.

राजेश कुलकर्णी यांना व्यवस्थापनाने स्पष्ट सूचना देऊनही हा धागा त्यांच्या फुसके बार संकलनात न प्रसिद्ध करता इथे प्रसिद्ध केल्याबद्दल हा धागा वाचनमात्र करत आहोत. त्यांनी हाच मजकूर फुसके बार संकलनात प्रसिद्ध केल्यास त्यावर चर्चा होऊ शकेल. हे करावं लागण्याची दुसरी वेळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0