प्रोमेथेउस ( योहान वोल्फगांग फॉन ग्योथे )

प्रोमेथेउस ( योहान वोल्फगांग फॉन ग्योथे )

धूळ भरल्या ढगांनी खुशाल 

झाकून घे तुझे आभाळ            झीयस

डोंगर माथ्यावरचे गवत  आणि 

झाड शेंडे कापणार्या एखाद्या 

तरण्या ताठ्या पोराप्रमाणे

भले मोठे वृक्ष जमीन दोस्त 

करण्याचं तुझं काम चालूच ठेव     झीअस 

या स्त्रग्धरेला माझ्या 

तोडू शकणार नाहीस माझ्यापासून

अन माझ्या मनगटांनी बांधलेली कुटी

राहील अभेद्य

माझ्या कुटीतल्या चुलीचे 

बुंद निखारे पाहून 

ईर्ष्या तप्त होणार्या झीअस चे 

डोळे विझवु  शकणार नाहीत निखार्यांना

तुम्हा देवांपेक्षा कोणी 

केविलवाणा दिसत नाही 

मला या आकाशाखाली अनंत 

फेकलेल्या प्रसाद - तुकड्यांवर 

आणि प्रार्थनेच्या श्वासांवर 

पोसतात तुमची शरीरे

काही पोरटेल्या आणि भिकारयांच्या

आशाळभूत नजरा वजा केल्या तर

भुकेचा डोंब उसळेल तुमच्या आतड्यांत 

नुकतेच उमललेले  फूल

एक अजाण मूल होतो मी 

भिरभिरती दिशाहीन माझी 

नजर  

जेव्हा पडली सूर्यावर तेव्हा तिला

वाटले 

जणू त्या धगधगत्या बिम्बावर

असावा एखादा कान 

आपली करून गाठ ऐकणारा

असावे आपल्यासारखेच कोमल ह्रिदय 

दुखिताला मिठी मारणारे 

टायटनसच्या त्या संघर्षात 

कोण आले माझ्या मदतीला ?

मृत्युच्या अन गुलामगिरीच्या 

सापळ्यातून कोणी वाचवले मला ?

माझ्या प्रकाश ह्रीदया तूच ना !

कधीतरी आयुष्यात वाटून घेतले आहेस

दुख एखाद्याचे?

पुसले आहेस कधी 

एखाद्याचे दुखाश्रू?

माझ्यातले पौरुष शिल्प

या महाविक्राळ काळाने आणि अनंत नियतीनेच घडवले ना ( नियतीच्या छीन्निनेच )

नियती ...तुझी नि माझी

गाढ निद्रेतले प्रत्येक 

उषाकालीन स्वप्ना फुल उमलत नाही 

म्हणून मी जीवनाचा तिरस्कार करेन 

वाळवंटात पळून जाईन

अशा भ्रमात होतास तू 

अन इथे बसून 

मी घडवतो आहे

मनुष्य- शिल्प 

तनाने , श्वास घेणारी , 

माझ्यासारखीच ह्रदये असणारी 

अगदी माझ्यासारखीच 

तुला न जुमानणारी  

मनुष्य -शिल्पे  Poznań- March2012

अनुवाद : सर्व्_सन्चारी

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्रीक मायथॉलॉजी माहीत नाही Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0