तुम्ही कोण आहात?

प्रश्नावली तुम्ही कोण आहात

प्रश्नावली : तुम्ही कोण आहात?

तज्ज्ञ लेखक - अस्वल

प्रश्न पहिला

खालीलपैकी कुठलं वाक्य तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी सर्वाधिक मिळतंजुळतं आहे?
माझी सही दर वेळी वेगळी येते.
At any given point of time, माझ्या सॉक्समधे भोकं असतात.
पानात पडेल ते खातो मी. मीठ कमी, जास्त, नसलं किंवा चुकून सूपऐवजी भांडी विसळलेलं पाणी दिलं तरीही.
गणित किंवा शिवणकाम असा ऑप्शन दिला तर मी नक्कीच शिवणकाम निवडेन.
यांपैकी नाही

प्रश्न दुसरा

some_text
हा माणूस कोण आहे? नाव ओळखा

हरीश
सत्येन कप्पू
किशन कुमार
H D देवेगौडा
दिनेश हिंगू

प्रश्न तिसरा

गोविंदाच्या एका चित्रपटातलं हे कर्णमधुर गाणं पूर्ण करा. "सनसननन साय साय ___________"
फिर ना कभी हाय हाय
हो रही थी रेत मे!
क्यू करू मै रात को?
हो चुकी थी बाग मे
हे काय आहे?

प्रश्न चौथा

माझे मामा गांजा पीत. ह्या वाक्याचा भविष्यकाळ काय?
माझे मामा गांजा पितील.
माझे मामा भविष्यकाळ येण्यापूर्वीच वारले.
माझे मामा त्यांच्या मुलासोबत गांजा पितील.
माझे मामा गांजा प्यायचं सोडतील.
ह्या प्रश्नाचा माझ्याशी काय संबंध?

प्रश्न पाचवा

तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं? खालच्यांपैकी सगळ्यात योग्य पर्याय निवडा.
मला राजकारणातलं ओ का ठो कळत नाही.
पाळीव प्राण्यांपासून १० मीटर लांब असणं हे माझं धोरण आहे.
मराठी/हिंदी सिरीअल्स हा माझा जीव की प्राण आहे. त्या नसल्या तर मी मरून जाईन.
मी शेवटचं पुस्तक वर्षभरापूर्वी वाचलं होतं.
कबड्डी ह्या रानटी खेळावर बंदी आणावी ह्या मागणीला माझा पाठिंबा आहे. शिवाय मला क्रिकेट बघताना झोप येते.

प्रश्न सहावा

लोकल ट्रेनमधून जाताना "मुंबईत सध्या खूपच उन्हाळा आहे, नाय?" असं समोरचा म्हणाला तर तुम्ही काय उत्तर द्याल?
हो/नाही.
मी अनोळखी लोकांशी बोलत नाही.
"नाय त काय! मागच्या वर्षी हे असं नव्हतं. अहो," इ. इ
"दादर?"
"सब ऐसाइच है इधर, पहिले जरा आगे जाओ ना तुम."

प्रश्न सातवा

फेसबुकवर एखादं पोस्ट (फोटो, स्टेटस अपडेट किंवा शेअर) केल्यावर तुम्ही पुढला एक तास काय करता?
काय करणार? जे काय काम असेल ते करतो/करते.
दबा धरून बसतो आणि कोणी लाईक /कमेंट करतंय का त्याची वाट बघतो/बघते
स्वतःच आधी त्याला लाईक करतो/करते आणि मग मिनिटाला एकदा असं फेसबुक रिफ्रेश करून बघतो/बघते.
मी विषेश फेसबुक वापरत नाही.
मी तेच पोस्ट आधी व्हॉट्सअ‍ॅपवर, मग गूगल+वर टाकतो, मग ओळखीच्यांना फॉरवर्ड करतो. टो-सर्वर म्हणून नोकरी मिळेल तुम्हाला.]

प्रश्न आठवा

बाथरूममधे मोठ्याने गाताना जर तुमचा सूर चुकलाय हे तुमच्या ध्यानी आलं तर-
मी थांबून पुन्हा रीतसर गायला सुरूवात करतो/करते.
मला बाथरूममधे गाताना सूर-ताल वगैरे कळत नाही, मी पुढे गात रहातो/रहाते.
मी इन्स्ट्रूमेंटल गातो, त्यामुळे सूर सहसा चुकत नाही. उ.दा. शिटी वाजवणे.
श्रोत्यांशिवाय मी गात नाही.
मी बाथरूममधे गात नाही.

प्रश्न नववा

समजा तुम्हाला मुलगा झाला आणि फक्त खालचेच ऑप्शन्स दिलेत, तर तुम्ही त्याचं नाव काय ठेवाल?
राका
कार्लोस
बिभीषण
घटोत्कच
यांपैकी काहीही नाही.

प्रश्न दहावा

ढेकर देताना तुम्ही -
एक अगडबंब आवाज काढून ढेकर देता.
जे काही पोटातून येईल त्याला घशावाटे वर येऊ देता, स्वतः काही कंट्रोल करत नाही.
मी कधीच मोठ्याने ढेकर देत नाही.
"अर्ह्र्ह्र्ह्रेर्ह्हर्ह्ह्ह" असा काहीसा आवाज मुद्दाम काढून ढेकर देता.
हवा खेळती ठेवण्याचे माझे मार्ग थोडे वेगळे आहेत.

प्रश्न अकरावा

"तुम मुझे खून दो, ________________" .हे वाक्य पूर्ण करा.
मै तुम्हे ब्लडग्रूप बताऊंगा.
या ना दो, मुझे कोई फरक नही पडता.
मै तुम्हे लाचारी दूंगा.
या मेरा खून ले लो.
यांपैकी नाही.

प्रश्न बारावा

समजा तुम्ही एखाद्या एकांडया बेटावर एकटेच आहात. तिथे अल्लाऊद्दीनच्या अंगठीतला राक्षस प्रकट झाला तर तुम्ही त्याच्याकडे काय मागाल?
एक प्लेट चिकन तंदूरी आणि बरोबर कांदा लिंबू
मी परत घरी जाईन.
अख्ख्या विश्वात शांतता नांदो ही मागणी करेन.
त्या बेटावरच आयुष्यभर ऐश आरामात रहाण्यासाठी सबकुछ लागेल ते मागेन.
अल्लाऊद्दिनच्या दिव्यातल्या राक्षसाकडे जास्त पॉवर असते, तेव्हा पहिल्यांदा त्याला बोलावून घेईन.

प्रश्न तेरावा

तुमच्या ओळखीच्या माणसाबरोबर ह्यांपैकी कुठली घटना घडली आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा.
तंबाखू खाताना चक्कर येऊन पडणे.
रेस्टॉरंटमधे बाजूच्या टेबलावर जाऊन "मला ही डिश हवी" असं वेटरला सांगणे
सायकल चालवताना जोरात शिंकल्यामुळे अपघात होणे.
झूमधे माकडांना चिडवल्याबद्दल अधिकार्‍यांकडून ताकीद मिळणे
यांपैकी नाही.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (5 votes)

प्रतिक्रिया

अस्वलरावांना दिवाळीच्या दिवट्या शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धमाल आहे हे. मजा आली Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शि.सा.न.वि.वि.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फारच आवडली प्रश्नावली आणि बुमरँग.
उदा• एकाचे घरी आलेल्या सेल्समनशी (तो नको म्हणत असतानाही) ४० मिनिटं बोलायचा लिमका रेकॉर्ड तुमच्याच नावावर आहे, माहितीये मला.

फारच मजेदार.
अस्वल गुदगुल्या करून हसवून मारते याचा अनुभव घेतला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अस्वलं वायझेड असतात. त्यांच्यापासून हिवाळ्यात जपून राहावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धमाल! ब्येष्ट! चारपाचवेळा उत्तरं उलटीपालटीकरून माझं बहूआयामी व्यक्तिमत्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला, अजून बरीच काँबिनेशन्स बाकी आहेत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

च्यायला ही व्यक्तिमत्व चाचणी आधी का मिळाली नाही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रश्न आठवा पर्याय तिसरा - खिक !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोल! अस्वल ऑन फायर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

समजा, तुमच्या समोर एक बाई आलेली आहे. तर तुम्ही पुढीलपैकी काय कराल?

१. गुदगुल्या कराल.
२. घट्ट मिठी माराल.
३. खाऊन टाकाल.
४. तिचा खेळ आणि छ्ळ कराल.
५. तिच्याकडून नाकांत वेसण घालून घ्याल.

टीपः वरच्या कुठल्यातरी प्रश्नांत तुम्ही मला आगाऊ म्हणालात. म्हणून हा रिटर्न प्रश्न!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

ROFLROFL एकदम अभिनव कौल.
मराठीत प्रश्न विचारला तरी हिंदीत बोलायचं भारी!!! Biggrin
____
हिंटा वाचून तर फुटले ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयुष्यात पहिल्यांदाच असा माजोरडा इंटरॅक्टिव्ह सर्व्हे बघितला! अस्वलाला एक कंबरेतून वाकून कुर्निसात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्व साधारण असे कसे काय निवडले गेले बुआ? Sad सॉरी बर्का..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

>>तिथे अल्लाऊद्दीनच्या अंगठीतला राक्षस प्रकट झाला तर तुम्ही त्याच्याकडे काय मागाल? .....अस्वलासाठी अस्वाहिली भाषेतले 'अरेबिअन नाईट्स' हे पुस्तक मागू. Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धमाल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फुटलो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@तिरशिंगराव - मूहतोड जवाब Biggrin
बाकी सगळ्यांना धन्यवाद, आशा आहे की तुम्हाला तुमच्याबद्दल चिकार माहिती मिळाली असेल!

ह्या प्रश्नावलीमागचा थोडा संदर्भ --
एखाद्या AI (Artificial intelligence) ने नेहेमीच माणसांच्या मदतीला तत्पर असावं, त्यांच्यासाठी अचूक आणि परिपूर्ण वगैरे उत्तरं द्यावीत असा आपला समज असतो. पण अशा एखाद्या फारच पुढारलेल्या AIला कधीतरी कंटाळा येऊ शकतो, किंवा त्याचा मूड खराब असू शकतो, किंवा त्याला टाईमपास करावासा वाटू शकतो.
अशा वेळी जर ह्या मूडी AIला तुम्ही काहीबाही प्रश्न विचारले, तर तो तुम्हाला सोडणार नाही- नक्कीच धोपटेल. त्याचीच ही एक छोटी झलक!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते सगळे ठीक आहे, पण आर्टिफिशियल इण्टेलिजन्स (आधी ए आय ची लिहीले होते. पण वाचताना शिवी वाटते) ची पहिलीच व्हर्जन पुणेरी उत्तरे देण्याइतकी प्रगल्भ निघावी? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुणेरी लोक आयटी सोडून काही नवीन करायला लागले तर त्यांना प्रोत्साहन द्यायचं सोडून ही काय खेकडेगिरी करताय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अहो, ट्यूरिंग टेस्टचा तो निकषच आहे. त्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जर एखादा कॉंप्युटर पुणेकरासारखा बोलताना दिसला तर तो हमखास इंटेलिजेंट म्हणायला हरकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रश्न १० चा दुसरा पर्याय आणि १३ चा तिसरा पर्याय यांची उत्तरं दिसली नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काम चालू, रस्ता बंद. यापेक्षा जास्त खवचट उत्तर अस्वलाने द्यावं. है हिंमत तुझ मे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रस्ता बंद आहे. काम चालू असेलच याची हमी कंत्राटदार घेत नाही. असे चालेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता दिलीत उत्तरं अस्वल यांनी. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अस्वल चक्रम आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

महान!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धमाल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

=)))))))

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

कसली भन्नाट प्रश्नावली आहे. हसतेय केव्हापासून. बाकी माझ्या चित्राबद्दलचं अनुमान बरोबरे. मी एलिमेंटरी देण्यासाठी हात वर केला तेव्हा बाईंनी ज्या हताश नजरेनं माझ्याकडे पाहिलं होतं ते आठवलं.
आणि "होणार सून.. " बघण्यात माझं आयुष्य जाणार या भविष्याबद्द्ल णिशेध.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगोदर लिहून दिलेले एकच उत्तर आले.मला वाटले यातही साताठ साठवलेली असतील आणि कोणतेतरी अचानक फेकले जाईल.
असो.मला खरंतर या अशा कौल/इनपुटचा एचटिएमएल( 4/5?) कोड हवाय.कोणते टॅग,एलमेंट वापरले इतकं सांगितलं तरी पुरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@अचरट - तुम्ही किती "स्कोर" करता त्यावर रिझल्ट अवलंबून आहे.. निरनिराळी उत्तरं दिलीत पण जर एकूण दर वेळी ६०%च मार्क मिळवलेत तर तुमची डिग्री कशी बदलणार? Smile
कोड ह्या पानावरच आहे.. ब्राऊसरमधे उघडून F12/view source केलंत तर दिसेलच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अस्वलाच्या गुदगुदल्या आवडल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चक्रम अस्वलाच्या कौलातून स्वतःचे मूल्यमापन केल्यावर आपण स्वतःला वाटतो त्यापेक्षा फारच निरागस (किंवा काही लोक त्याला होपलेसही म्हणतात) आहोत याचा साक्षात्कार झाला. एखादीतरी हिंट मदत करणारी असू शकेल याबद्दलचा विश्वास अगदी शेवटपर्यंत कायम कसा राहिला याबद्दल स्वतःचेच आश्चर्य वाटले. असो, हे अस्वल थोर आहे.

बरं कौलात दिवाळीनिमित्त एक प्रश्न अ‍ॅड करा की,

प्रश्न: तुम्ही चिवडा कसा खाता?
१) आख्खा डबा समोर घेऊन त्यातले खोबेरे, दाणे, काजू निवडून खातो.
२) प्रत्येक घासाबरोबर खोबेरे, दाणे, काजू, बेदाणे येतील याची खात्री करत खातो.
३) चिवड्यात दही घालून त्याचा लगदास्वरूप काला करून तो स्थितप्रज्ञपणे गिळतो.
४) चिवडा ही काय खायची गोष्ट आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

३.

चिवड्यात दही घालणार्‍यांची बदनामी थांबवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

प्रश्न अपूर्ण आहे.

प्रश्नाचं उत्तर देण्याआधीचा हिंट - चिवडा फार कठीण, त्यापेक्षा कडक बुंदीचे लाडू खा.

प्रत्येक उत्तरासोबत देण्याचा सल्ला -
>> १) आख्खा डबा समोर घेऊन त्यातले खोबेरे, दाणे, काजू निवडून खातो. आज काजू, खोबरे, दाणे खाताय. उद्या वाढलेल्या आकाराचं काय करणार आहात?

>> २) प्रत्येक घासाबरोबर खोबेरे, दाणे, काजू, बेदाणे येतील याची खात्री करत खातो. चिवडा खाताना चिवड्याकडे बघता? मग पुस्तकं आणि दिवाळी अंक कोण वाचणार?

>>३) चिवड्यात दही घालून त्याचा लगदास्वरूप काला करून तो स्थितप्रज्ञपणे गिळतो. वाटलंच मला. मारी बिस्किट आवडतं ना तुम्हाला?

>>४) चिवडा ही काय खायची गोष्ट आहे? चिवड्याची बदनामी थांबवा.

उत्तरानंतरचा हिंट - चिवडे खायचे तर चिवडे खा, प्रश्नोत्तरं-प्रश्नोत्तरं काय खेळताय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आज काजू, खोबरे, दाणे खाताय. उद्या वाढलेल्या आकाराचं काय करणार आहात?

+१

किंवा: 'चिवडा' हे नाम आहे. आज्ञार्थी क्रियापद नव्हे. मो.रा.वाळंबे वाचा दिवाळी अंकाऐवजी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मो. रा. वा'ळिं'ब्यांची बदनामी थांबवा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हे पाहा.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशा प्रकारे मूर्तभंजन करणाऱ्या मेघनाच्या डोक्यावर बुत्तोडा हाणा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझ्या हाताशी आत्ता प्रत नैय्ये म्हणून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मजा आली.
Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुला रे /गं काय हवं?
मला चिवडा!
अधोरेखीत शब्दाचे व्याकरण चालवा.
(सूचक :मोरावळा खाऊन उत्तर दिले तरी चालेल.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ठ्ठो! जरा वेळ काढून रेंगाळायचं ठरवलेलं
चीज झालं Smile

दिवाळीचा सर्वात भारी आपटीबार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!