ज्ञानेश्वरी- भाग-१ - प्राणेश्वरासाठी

भुमिका
ज्ञानेश्वरी तील स्त्री संदर्भातील या ओव्यांवीषयी वाचकांचे मत काय आहे हे जाणुन घ्यायला आवडेल.आणि ज्ञानेश्वरीतील आणि एकुणच धर्मग्रंथांतुन व्यक्त/ ध्वनित (प्रतिके आदिंतुन ) होणारया मानवी मुल्यां चे समकालीन स्थान, धर्मग्रथांची कालबाह्यता वा कालातीतता, चिकीत्सेतुन निवड करण्याची निकड, या मुल्यांचा आजच्या जगण्याशी संबंध आदि. संदर्भातील मांडणी या अंगाने चिकीत्सा विचारमंथन व्हावे अशी इच्छा. यासाठी माझी निवड ज्ञानेश्वरी हा ग्रंथ. तर स्त्री संदर्भातील या निवडक प्रातिनीधीक अशा ओव्या एकत्र करण्याचा मी एक छोटा प्रयत्न केलेला आहे. या शिवाय अजुन ही आहेत ती त्रुटी एकंदर चर्चेतुन मंथनातुन पुर्ण व्हावी अशी अपेक्षा. जाणकारांनी चुका दाखवल्यास स्वागत आहे. खालील प्रातिनीधीक ओवीत न आलेला स्त्री संदर्भातील एखादा वेगळा विचार असलेली ओवी आल्यास त्याचेही अर्थातच स्वागत त्याने चर्चा व्यापक व अर्थपुर्ण होईल.

ओवी चा संदर्भ लवकर लागावा म्हणुन काहि ठीकाणी पुढची मागची ओवी जोडुन घेतलेली आहे व काही ठीकाणी पुनुरुक्ती टाळण्यासाठी निवडक ओव्या घेतल्या आहेत. शक्यतो संदर्भ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चुकला असल्यास जाणकारांनी दाखवुन द्यावा.

१- दुर्योधना च्या तोंडी आपल्या बाजुच्या वीरांची स्तुती करतांना आलेले खालील उद्बार संदर्भातील ओवी
हे अप्रतिमल्ल जगीं , पुरता प्रतापु अंगीं परी सर्व प्राणे मजचिलागीं, आराइले असती.
पतिव्रतेचे ह्र्दय जैसे, पतीवांचुनी न स्पर्शे, मी सर्वस्व या तैसे, सुभटांसी
अर्थ- अंगी पुर्ण प्रतापी असलेले, जगात अजिंक्य वीर म्हणुन प्रसिद्ध असलेले, प्राणपणाने लढण्यासाठी माझ्या बाजुला आलेले आहेत. पतिव्रतेचे चित्त पतीशिवाय इतरांना स्पर्श सुद्धा करीत नाही. त्याचप्रमाणे या सर्व योद्ध्यांचे मीच श्रद्धासर्वस्व झालो आहे. (अ-१ ओ-११०-१११)

२- अर्जुन मोहित झाल्या संदर्भातील त्याच्या अवस्थेचे वर्णन करणारी ओवी
नविये आवडीचेनि भरें, कामुक निज वनिता विसरे, मग पाडेवीण अनुसरे, भ्रमला जैसा.
अर्थ- नवयौवनाचा बहर असलेल्या नव्या स्त्रीच्या प्रेमभरात लंपट पुरुष स्वत:च्या पत्नीला विसरतो. आणि त्यास्त्रीची योग्यता न पाहता वेडा होऊन बेतालपणे तिच्या म्हणण्या प्रमाणे वागतो.
पाडेवीण- योग्यतेविना, निज वनिता- स्वत:ची पत्नी ( अ-१ ओ-१८७)

३- अर्जुनाने क्षत्रियाचा स्वधर्म आचरला नाही तर त्याची स्थिती कशी होइल या संदर्भातील ओवी.
जैसी भ्रतारेहीन वनिता, उपहति पावे सर्वथा, तैसी दशा जीवीता, स्वधर्मेवीण.
अर्थ- ज्याप्रमाणे पतिविरहीत स्त्री सर्वांकडुन अपमानित होते, त्याप्रमाणे ( हे अर्जुना ) स्वधर्माचा त्याग केल्यावर त्या जीवाची ( अशी ) दशा होते.(अ-२ ओ-१९९)

४- अविवेकी लोक धर्म कसा घालवितात त्या संदर्भातील उदाहरण देणारी ओवी.
जैसी रांधवणी रससोय निकी, करुनियां मोलें विकी, तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मु.
अर्थ- ज्या प्रमाणे गृहीणी स्वयंपाकीणीने ( रांधणारीने ) उत्तम रसपुर्ण स्वयंपाक करावा आणि तो द्र्व्याच्या लालसेने विकुन टाकावा ( कुटुंबीयांना वाढण्याचा धर्म न पाळता ) त्या प्रमाणेच हे अविवेकी लोक सुखोपभोगाच्या लालसेने हाती आलेला धर्म व्यर्थ घालवितात.(अ-२ ओ-२५४)

५- स्वधर्माचे पालन नाना देवदेवतांच्या पुजनापेक्षाही कसे अधिक महत्वाचे आहे या संदर्भातील ओव्या.
देवतांतरा न भजावे, हे सर्वथा कांही न करावे, तुम्ही स्वधर्मयज्ञी यजावे, अनायासे.
अहेतुके चित्तें, अनुष्ठा पां ययाते, पतिव्रता पतीतें, जियापरी
तैसा स्वधर्मरुप मखु, हाचि सेव्यु तुम्हां एकु, एसे सत्यलोकनायकु, म्हणता जहाला
.
अर्थ- नाना प्रकारच्या देवतांचे पुजन करु नका , विनासायास ( सहज ) घडणारा स्वधर्माचरणाचा यज्ञ करीत जा. पतिव्रता स्त्री ज्याप्रमाणे पतीची एकनिष्ठपणे सेवा करते (स्वधर्म आचरते) त्याप्रमाणे निष्काम बुध्द्नीने स्वधर्माचे आचरण करा. कारण तुम्हाला हाच एकमेव स्वधर्मरुपी यज्ञ अनुष्ठान करण्यास उचित आहे. असे सत्यलोकांचा स्वामी ब्रह्मदेव म्हणाला. (अ-३ ओ-९१-९२-९३)

६-
स्वधर्म आचरण्यास कीतीही कठीण वाटला तरी परधर्मापेक्षा तो आचरणेच कसे योग्य श्रेयस्कर आहे ( परधर्मो भयावह:) चे उदाहरण पटवुन देतांना दिलेल्या ओव्या.

सांगे शुद्रघरीं आघवीं, पक्वान्ने आहाती बरवीं, तीं द्विजें केंवी सेवावीं, दुर्बळु जरी जाहला.
हे अनुचित कैसेनी कीजे, अप्राप्य केवीं, इच्छिजे, अथवा इच्छिलेंही पाविजे, विचारीं पां
हें असो वनिता आपुली, कुरुप जरी जाहली, तरी भोगितां तेचि भली, जियापरी.

अर्थ- मला असे सांग, शुद्राच्या घरी मधुर चवीची पक्वान्ने आहेत, आणि एखादा दरिद्री ब्राह्मण आहे म्हणुन त्याने ती सेवन करावी का ? असे अनुचित कृत्य दरिद्री ब्राह्मणाने कसे बरे करावे? जे घेण्यास योग्य नाही अशा गोष्टीची का इच्छा करावी ? इच्छा करुन अशा पक्वान्नांची प्राप्ती जरी झाली तरी त्याचे सेवन करावे का ?
हे असु दे आपली धर्मपत्नी कुरुप असली तरी तिलाच भोगणे हेच योग्य असते याप्रमाणे.(अ-३-ओ-२२१-२२२-२२४)

७- स्वत:च्या साहित्याची बोलण्या ची गुणवैशिष्ट्ये सांगतांना माझे बोलणे कसे आहे ? तर ते
जेथ साहित्य आणि शांति, हे रेखा दिसे बोलती, जैसी लावण्यगुणकुळवती आणि पतिव्रता
आधींच साखर आवडे, तेचि जरी ओखदीं जोडे, तरी सेवावी ना का कोडे नावानावा.

अर्थ- ज्याप्रमाणे एखादि स्त्री लावण्य रुप , गुणसंपन्न आणि कुळ (उच्चकुलीन आहे ) इतकच नव्हे तर शिवाय पतिव्रता देखील आहे ( दुग्ध शर्करा योग जणु ) त्याप्रमाणे माझ्या बोलण्यात साहित्य आणि शांती यांच्यातील बोलक्या सीमारेखा दिसतील.
मुळातच साखर आवडते आणि तीच जर औषध म्हणुन मिळाली तर आवडीने पुन्हापुन्हा (नावानावा) का खाऊ नये ?
(अ-४ ओ-२१८ )

८- भगवंत भक्तीची महती सांगतांना च्या संदर्भातील ओवी ज्यात लक्ष्मी चे वर्णन येते जीच्या घरी श्री सारख्या दासी आहेत, जिच्या संपत्तीची कोणी बरोबरी करु शकत नाही, जिच्या दासींनी एखाद्या झाडाकडे जरी पाहीले तरी तो कल्पवृक्ष होतो आदि वर्णन आलेल्या ३ सलग ओव्यानंतर लक्ष्मी संदर्भात खालील ओवी येतेय
एसे जियेचियां जवळिकां, सामर्थ्य घरिचियां पाइकां, ते लक्ष्मी मुख्यनायका न मनेचि एथ.
मग सर्वस्वे करुनि सेवा, अभिमान सांडुनि पांडवा, ते पाय धुवावयाचिया दैवा, पात्र जाहाली.
अर्थ – अशा जिच्या सहवासांतील दासींची शक्ती आहे, अशी जी ऎश्वर्याची मुख्य मालकीण लक्ष्मी, तिचीही येथे किंमत नाही.
हे पांडुपुत्रा ती अभिमान सांडुन सर्वार्पण (संपुर्ण समर्पण ) भावनेने जेव्हा सेवा करु लागते तेव्हा ती कुठे माझे चरण चुरायला लायक होते पात्र होते.(अ-९-ओ-३७६-३७७)

९- बाहेरी धीट जैसी, दाटुगा पति कळासी, करी टेहणी तैसी प्रवृत्तीसी
जसे घराबाहेर व्याभिचाराचे साहस करणार्याु स्त्रीला जसा खोलीत कोंडुन ठेवतो त्याप्रमाणे अंत:करणाच्या एकुण एक हालचालींवर जो निरंतर नजर ठेवतो. (अ-१३ ओ-५०५)

१०-अज्ञानी पुरुषाची लक्षणे सांगतांना अज्ञानी पुरुष कोण असे सांगतांना आलेल्या ओवींपैकी या ओवी

म्हातारपणी जालें, माणिक एक विपायिलें, तयाचे का जेतुलें, माता पितरा.
तेतुलेनि पाडे पार्था, घरीं जया प्रेम आस्था आणि स्त्री वांचुनि सर्वथा जाणेना जो
तैसा स्त्री देही जो जीवे. पडोनियां सर्वभावे कोण मी काय करावे काही नेणें
चित्त आराधी स्त्रीयेचे आणि स्त्रीयेचेनि छंदे नाचे माकड गारुडीयाचे जैसे होय.
स्त्रीयेचां तरी विखीं भोगुसंपत्ती अनेकी आणी वस्तु निकी जे जे देखे.
प्रेमाथिलेनि भक्ते , जैसेनि भजिजे कूळदैवते, तैसा एकाग्रचित्ते स्त्री जो उपासी.
नायटेयां भेण न मोडिजे नागांची आण तैसी पाळी उणखुण स्त्रीयेची जो
किंबुहना धनंजया स्रीचि सर्वस्व जया आणि तियेचिया जालिया लागी प्रेम
आणिकही जे समस्त तेथिचे संपत्तिजात ते जीवाहुनि आप्त मानी जो का
तो अज्ञानासी मुळ अज्ञाना तेणे बळ, हे असो केवळ तो तेंचि रुप

अर्थ – वृद्धपणी झालेल्या एकमेव पुत्र रत्नाचे आईवडिलास जेवढे प्रेम असते
अरे अर्जुना त्याच प्रमाणे ज्याला घराची आपुलकी आणि प्रेम असते आणि जो स्त्रीवाचुन दुसरे काही मुळी जाणतच नाही.
स्त्री देहाला जो जीव भजुन राहतो आणि मी कोण? काय करावे ? या गोष्टीची ज्याला काहीच जाण नसते.
जसे गारुड्याचे माकड गारुड्याच्या इच्छेप्रमाणे छंदाप्रमाणे वागणारे असते तसा तो स्त्री च्या मनाची पुजा करतो. जो स्त्रीच्या शब्दावर इशार्या वर नाचतो.
तथापि स्त्री साठी ज्या ज्या चांगल्या भेटवस्तु दिसतील त्या आणतो तसेच भोगांची ऎश्वर्य साधने आणतो.
प्रेमळ साधकाने जसे कुलदेवतेला एकनिष्ठेने पुजावे त्याप्रमाणे जो स्त्रीची उपासना एकाग्र चित्ताने करतो.
ज्याप्रमाणे खरुज-नायट्याच्या भयाने घेतलेली देवीची शपथ मोडवत नाही त्याप्रमाणे असा पुरुष स्त्रीची मर्जी सांभाळत असतो.
अरे अर्जुना फ़ार काय वर्णावे, त्याचे सर्व काय ते एकमेव स्त्रीच असते आणि तिच्यापासुन झालेल्या मुलांवर ज्याचा जीव असतो.
त्या स्त्रीचे सर्व वैभव वस्तु त्याला स्वत:च्या जीवापेक्षा अधिक प्रिय असते.
असा हा पुरुष अज्ञानाचे मुळ आहे. आणि अज्ञानाला च त्यायोगे बळ येते.
(अ-१३ ओ-७८७-७८८-७९०-७९२-७९६-७९७-८००-८०१-८०२)

११- गांवा गेलीया वल्लभु, पतिव्रतेचा विरहक्षोभु, भलतेसणी हानिलाभु, न मनीं जेवी.
अर्थ- प्रिय पती गावाला गेल्यानंतर पतिव्रतेला जे विरहाचे दु:ख होते त्या दु:खाने पोळलेली ती कोणत्याच फ़ायद्या तोट्याकडे लक्ष देत नाही तिची वृत्ती पतीकडे लागलेली असते.
(अ-१६ ओ-७९)

१२- क्षत्रिया रणी पळोनि जाणें, तें कोंण साहे लाजिरवाणे, कां वैधव्ये पाचारणें, महासतियेतें.
अर्थ- क्षत्रियाला युद्धातुन पळुन जाणे जसे लाजिरवाणे वाटते, कोण मानी क्षत्रिय ही पळुन जाण्याचे कृती लाजिरवाणी कृती सहन करील ? जसे सौभाग्यवती महापतिव्रतेला वैधव्यवाचक नावाने हाक मारणे जसे तिला लाजिरवाणे वाटते. ( विधवा संबोधन जिला लाजिरवाणे वाटते.) (अ-१६-ओ-१७७)

13- तेज-क्षमा- धैर्य, शौच, अद्रोह, अमानित्व हे गुण दैवी संपत्तीत जन्म पावलेल्या माणसांमध्ये असतात. ( हा अर्थ असलेल्या मुळ गीतेचा श्लोक समजावुन सांगतांना ज्ञानेश्वर खालील उदाहरणाने या ओवीची सुरुवात करतात.)

वोखटे मरणाऎसें, तेंही आले अग्निप्रवेशें, परी प्राणेश्वरोद्देशें, न गणीची सती.

अर्थ –अगोदरच मरणाऎवढा वाईट प्रसंग कोसळलाय, आणि तोही कसा तर अग्निप्रवेश करावा लागेल असा, परंतु पतिव्रता स्त्री सती स्त्री प्राणेश्वरा साठी ( प्राणेश्वरोद्देशे) या मरणाची देखील पर्वा करत नाही.
वोखटे- वाईट, न गणीची – पर्वा करत नाही, गणत नाही.
(अ-१६- ओ-१८६)’

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2.666665
Your rating: None Average: 2.7 (3 votes)

स्तुत्य प्रयत्न. लेख पूर्ण वाचून अधिक लिहितो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्ञानेश्वरीमधील काही ठळक विषय जसे - स्वधर्मपालन, तीन गुण - सत्त्व/रज/तम, इंद्रियांची विषयलोलुपता, कर्मयोग, विविध कीटक्/प्राणी उदा - भुंगे, गोचिड्,कासव, माकड्,चकोर्,काजवा यांचे दृष्टांत आदि सोडून स्त्रियांबद्दलच्या जुनाट = कालबाह्य विचारांबद्दलच आपल्याला रस का वाटावा? - एक कुतूहल म्हणून विचारते आहे.
.
आपली काही विचारप्रक्रिया हा लेख टाकण्यामागे जरुर असावी. ती जाणून घेण्याचा प्रयत्न करते आहे.
.
इथे भरघोस प्रतिसाद मिळतील, या विचारांना झोडपले जाइल (परत rightly so) वगैरे विचार माझ्या मनात येतातच आहेत. ज्ञानेश्वरी झाली म्हणून ती above reproach असावी असे मलाही वाटत नाही. अन तरीही मला ज्ञानेश्वरीतील हाच दृष्टांत आठवतो-
गोचिड आचळाजवळ राहूनही दूध सोडून रक्त पीते.
.
माफ कराल अशी आशा करते.
.
प्रत्येकाने फक्त चांगले तेच उचलावे व टाकाऊ/कालबाह्य/काळाशी विसंगत्/तृटीयुक्त लिखाण सोडून द्यावे हा आग्रह नाहीच. शेवटी कुठे ना कुठे त्यावर चर्चा झालीच पाहीजे नाही का?
.
आफ्टर ऑल सेड - तुमचा लेख परत वाचला अन आपली भूमिका लक्षात आली -

ज्ञानेश्वरी तील स्त्री संदर्भातील या ओव्यांवीषयी वाचकांचे मत काय आहे हे जाणुन घ्यायला आवडेल.आणि ज्ञानेश्वरीतील आणि एकुणच धर्मग्रंथांतुन व्यक्त/ ध्वनित (प्रतिके आदिंतुन ) होणारया मानवी मुल्यां चे समकालीन स्थान, धर्मग्रथांची कालबाह्यता वा कालातीतता, चिकीत्सेतुन निवड करण्याची निकड, या मुल्यांचा आजच्या जगण्याशी संबंध आदि. संदर्भातील मांडणी या अंगाने चिकीत्सा विचारमंथन व्हावे अशी इच्छा. यासाठी माझी निवड ज्ञानेश्वरी हा ग्रंथ.

.
असो. वाचते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्ञानेश्वरीतील अप्रतिम काव्य सौंदर्य मलाहि भुरळ घालते. अनेक ओव्यांनी अंगावर आलेले रोमांच पुन्हा पुन्हा येतात. मात्र त्याहुन अधिक अगत्याचे सध्या मला त्यातील मुल्यांची चिकीत्सा करणे असे वाटते. आज उदा. अंधश्रद्धा निर्मुलन समिती मांत्रिक जादु टोणा विरोधी कायद्याचा आग्रह करते तर मला ज्ञानेश्वरीतील मांत्रिक संदर्भातील भाग ज्ञानेश्वरांनी प्रतिपादलेली अंधश्रंद्धे संदर्भातली भुता खेतां संदर्भातील मांडणीची चिकीत्सा होणे अधिक अगत्याचे वाटते. आज कोणी मला त्यातील स्त्री संदर्भातील ओव्या आजच्या काळात कालोचित आहेत असे आग्रहाने म्हणते तर मला त्याची चिकीत्सा करण्याची निकड त्यातील काव्यसौंदर्याला बाजुला सारुन अधिक वाटते. या संदर्भातील श्री प्रचेतस यांना देण्याच्या प्रतिसादासाठी चा भाग माझी भुमिका अधिक स्पष्ट करतो म्हणुन तो ही येथे जोडत आहे.

या ओवींचे मुल्यमापन करतांना त्या कालाचा तत्कालिक संदर्भ काय होता याचा विचार सर्वप्रथम केला पाहीजे. मात्र त्यानंतर दुसरी पायरी म्हणजे त्या मुल्यांचा समकालीन जीवनाशी कितपत संबंध उरलेला आहे ? ती कालबाह्य आहे की अजुनही कालोचित आहेत. हे देखील तपासणे अगत्याचे आहे असे मला तरी वाटते. या सर्व प्रक्रियेला मी सुसुत्रतेने मांडण्याचा प्रयत्न करतो.
१- सर्वप्रथम या ओवींचा त्यातील मुल्यांचा तात्कालिक संदर्भ काय होता याचा विचार केला पाहिजे.
२- त्यानंतर या ओवींचा समकालीन जीवनात काय रेलेव्हन्स राहिलेला आहे त्यातला कुठला भाग कालबाह्य झालेला आहे कुठला काळाच्या कसोटीवर टिकुन राहिलेला आहे हे बघितल पाहिजे.
३- या चिकीत्सेनंतर जो भाग ग्राह्य आहे तो स्वागतशीलतेने स्वीकारला पाहीजे तसेच जो भाग त्याज्य आहे त्यालाही निसंदिग्धतेने नकार दिला पाहीजे.
४- ही चिकीत्सा करतांना संवेदनशीलता बाळगली पाहिजे त्याज्य भाग हा हळुवारपणे वेगळा काढला पाहिजे (जसे आपण बाळाच्या पायातील काटा काढतांना त्याच्या पायाला जीवाला कमीत कमी इजा होइल याची काळजी वाहतो तसे.) त्यावेळेस जो चांगला कालोचित ग्राह्य भाग आहे त्याला संवेदनशीलतेने आग्रहाने जपलं पाहिजे.
५- चिकित्से चा येथे उदा. ज्ञानेश्वर आहे म्हणुन त्यांचे च उदाहरण घेतो ज्ञानेश्वरीतील फ़ार थोडा भाग काहि मुल्ये काहि ओव्या इतकाच त्याज्य आहे त्यातील ग्राह्य भाग त्या तुलनेने फ़ार मोठा अनमोल असा ठेवा आहे. उदा. त्यातील अफ़ाट शब्द भाषा काव्य सौंदर्य, काहि सद्यस्थितील उत्क्रांत मुल्यांचा प्राथमिक अवस्थेतील अविष्कार, काहि अति प्रगत विचारांचा भाग, काही महान मानवी मुल्ये इ. त्या सर्वांची जपणुक करणे हि तर आपली सांस्कृतिक जबाबदारीच आहे.
६- मात्र याचा अर्थ यातील प्रत्येक अक्षर पवित्र ओवी पवित्र मुल्यभाव योग्यच अचुकच कालातीतच असे नाही असे सर्व च आणि म्हणुन चिकीत्सेस अपात्रच असे नव्हे. म्हणुन चिकीत्सा अधिकाधिक प्रामाणिकपणे खुलेपणाने झाली पाहीजे.
७- हे करतांना यात त्याज्य आहे याने निराश होण्याची गरज नाही तसेच चांगला भाग परंपरे चा स्वीकार अंगिकार पुरस्कार करण्यातही संकोच का करावा.
८- आणि आजच्या काळात जर जुन्या चुकीच्या मुल्यांमुळे आजच्या उन्नत उत्क्रांत श्रेष्ठ मुल्यांना अडसर येत असेल तर अशा जुन्या जाचक मुल्यांचा चिकीत्सेने ठामपणाने जमेल तितक्या हळुवार पणे संवेदनशीलतेने , तार्किकतेने विरोध निषेध नायनाट केला पाहीजे असे मला प्रामाणिकपणे वाटते.
यासाठी ज्ञानेश्वरांच्याच सुंदर ओवीचा आधार घेतो व त्यांनीच प्रोत्साहन दिलेल्या विवेकाचे उदा. देतो.
सलिली पय जैसे, एक होऊनी मीनले असे परी निवडुनी राजहंसे वेगळें किजे.
( पाण्यामध्ये (सलिली) दुध जसे मिसळुन एकरुप झालेले असते पण राजहंस पाण्यातुन दुध निवडुन वेगळे करतो.) किंवा कीं अग्निमुखे किडांळ, तोडोनियां चोखांळ, निवडती केवळ, बुद्धीमंत ( ज्याप्रमाणे चतुर सोनार अग्नीमध्ये सोने तापवुन त्यातील हिन ( किडाळ) जाळुन टाकुन त्यातील शुद्ध सोने चांगले ( चोखाळ ) वेगळे काढतो.
किंवा ना तरी जाणिवेचिया आयणी, करितां दधिकडसणी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे ( किंवा बुद्धीच्या सामर्थ्याने दह्याचे कौशल्यपुर्वक घुसळणे केले असता शेवटी जसे नवनीत वेगळे निघते) किंवा किं भुस बीज एकवट, उपणिता राहे घनवट, तेथ उडे ते फलकट , जाणो आले. ( कोंडायुक्त धान्य वार्यावर धरुन उपणले असता वजनदार कसदार दाणे घनवट खाली राहते पोकळ असलेले फोलकट वार्याबरोबर उडुन जाते
तसे इथे विचारांचे नवनीत काढण्याचा प्रयत्न करण्यास हरकत काय असावी ?
असे आपण केले पाहीजे असे मला प्रामाणिकपणे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

सविस्तर उत्तराबद्दल खरच आभारी आहे. आज सकाळी फक्त "स्त्री" या विषयावरील काही ओव्या राहील्या आहेत का या दृष्टीने एकदा १-२-३ अध्यायांवरुन नजर फिरवली. मला देखील हे तेव्हाच वाटले होते की त्यातील काव्यमयता नक्कीच तुमच्या लक्षात आली असणार. या ३ ही अध्यायात, जातीपातीविषयक तसेच भूतबाधा विषयक ओव्या देखील होत्याच ज्याचा की तुम्ही पुढील भागात उल्लेख करालही. खरं तर एकदा ज्ञानेश्वरी परत वाचण्यास उद्युक्त केल्याबद्दल आपले आभारच.
.
भूमिका लक्षात आली आहे - हीणकस ते टाकून देऊन बावनकशी सोने तेवढे ठेवावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोचिड आचळाजवळ राहूनही दूध सोडून रक्त पीते.

ज्जे बात, शुचि. माझा लाल सलाम तुला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्ञानेश्वरांना धर्म व समाजाच्या अतिरेकी बंधनांचा बालपणी अत्यंतिक त्रास झाला. नंतर त्यांनी निवृत्तीनाथ व गहिनीनाथांकडून दिक्षा का काय ती घेतली व आत्मसाक्षात्कार झाला. व राम शेवाळकर म्हणतात तसे पहिले वाक्य उच्चारताना झुकते माप दुर्जनांना दिले. खलांची व्यंकटी सांडो. त्यांचा विचार प्रथम केला. नंतर इतरांचा. ठीकाय. काय प्रॉब्लेम नाय. ज्ञानेश्वरांना अ‍ॅड-होमिनेम आर्ग्युमेंट्स मधे रस नव्हता. ओके. खलांना मारण्यापेक्षा त्यांच्यातल्या "व्यंकटीला" दूर करण्यात जास्त इंट्रेष्ट होता. ठीकाय. पण आत्मसाक्षात्कार हे extreme thinking आहे असे मानू. एवढं सगळं वैचारिक करून झाल्यानंतरही - तपते दिल पर यूँ गिरती है .. तेरी नज़र से प्यार की शबनम .. जलते हुए जंगल पर जैसे ..बरखा बरसे रुक-रुक थम-थम - अशी अपेक्षा कोणीही केल्यास त्यात वावगे काही नाही. One would expect him to lament if not lambast these restrictions. Not use them as उपमा/अलंकार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्ञानेश्वरांना धर्माच्या अतिरेकी बंधनांचा त्रास झाला हे अगदि खरे आहे. त्याची रीअ‍ॅक्शन म्हणुन त्यांनी उदार मनाने आपल्या विरोधकांप्रती कडवटपणा न बाळगता उलट त्यांच्यातील तया सत्कर्मी रती वाढो हिच अपेक्षा केली. आणि या उपरांत कधी त्यांनी लॅमेंन्टींग केल ही असेल तर त्यात वावग काहीच नाही. हे ही खरच आहे. मात्र याचा वरील माझ्या धागा विषयाशी संबंध कसा आहे ते लक्षात आले नाही म्हणजे असावा या अपेक्षेने मी वाचत होतो.
समजा हा एक धागा विषय निरपेक्ष स्वतंत्र प्रतिसाद आहे. तरी काहीच हरकत नाही यावर मी असे म्हणेन की ज्ञानेश्वरांना त्रास झाला होता म्हणुन त्यांनी हा त्रास इतरांना आपल्या लिखाणातुन कळत नकळत व्हावयास नको याची पुरेशी काळजी वाहलेली दिसत नाही. म्हणजे परंपरे च्या एका वाईट भागाने ते प्रताडित झाले होते तर त्याच परंपरेच्या दुसरया वाईट भागाला काहि ठीकाणी ज्ञानेश्वर कळत नकळत प्रोत्साहन देतांना दिसतात. त्या प्रोत्साहनाची चिकीत्सा हा लेखाचा मुळ उद्देश आहे. ज्ञानेश्वरांनी काही चुकीच्या मुल्यांचे परंपरांचे वहन पोषण केले असे आढळून येते. त्याची चिकीत्सा होणे आवश्यक आहे. त्यातुन खरे खोटे कम अस्सल जे काय असेल ते बाहेर येइल. अशीही शक्यता आहे की काही मुल्ये बरोबर हि असतील. जे असेल ते त्याचा सामना होण आवश्यक आहे.
त्या चुकीच्या मुल्यांचा आजच्या समकालीन जीवनात जो दुरुपयोग होतोय जी कालबाह्य त्याज्य मुल्ये आज अनावश्यक आहेत ती शोधणे त्यावर बोलणे चर्चा चिंतन मंथन अपेक्षीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

प्रणाम मारवा साहेब,

नाय ओ. मला जे म्हणायचं आहे ते मी मांडलेलं आहेच. मला जिथे थांबायचे होते तिथे हेतूपुरस्सर थांबलो. पण यापलिकडे मला जे म्हणायचे आहे ते मूल्यांची मागणी व पुरवठाच ठरवेल. मूल्ये ही मागणी व पुरवठा या नियमांना जुमानीत नाहीत असा माझा समज नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मूल्ये ही मागणी व पुरवठा या नियमांना जुमानीत नाहीत असा माझा समज नाही.

या वाक्याची सही केली तर चालेल का? खरच विचारतेय.
____
काही सो कॉल्ड मूल्ये ओव्हररेटेड असतात ती नामशेषच व्हायला हवीत. परत व्हायला हवीत नव्हे तर वरच्या गब्बर गीत नियम #६५ नुसार ती होतातच. ते दिसतच आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मूल्ये ही मागणी व पुरवठा या नियमांना जुमानीत नाहीत असा माझा समज नाही.

पण पण पण.. मूल्ये ही मागणी व पुरवठा या नियमांना जुमानीत नाहीत असा माझा समज नाही.

असं गिरकीयुक्त वाक्यरचनेत म्हणण्याऐवजी "मूल्ये ही मागणी व पुरवठा या नियमांना जुमानतात असा माझा समज आहे" असं का म्हणत नाही हा गब्बर? किचकट कुठला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदा अमका टमका समज आहे म्हटलं की त्या समजाशी नैष्ठिक बंधन (nailing/pinning down) आलं. याउलट अमकं नाही असा समज नाही म्हटलं की एक मुक्तता असते, बांधिलकी नसते. असे काहीसे कारण असावे.
.
बरोबर आहे का हे? या दोन समान अर्थांच्या वाक्यात कुठेतरी लहानशी मेख आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बर सर

मूल्ये ही मागणी व पुरवठा या नियमांना जुमानीत नाहीत असा माझा समज नाही.

हे विधान अतिशय मार्मिक आहे. आवडल.
या विधानामागे अर्थशास्त्रीय प्रेरणा च आहेत का फक्त ?
हे विधान थोड विस्तार करुन उदाहरणाने समजावल तर अतिशय आनंद होइल.
विद्यार्थी मारवा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

या विधानामागे अर्थशास्त्रीय प्रेरणा च आहेत का फक्त ?

प्रश्न मस्त आहे. उत्तर थोडे विस्कळीत देतो. कारण मला खात्री नैय्ये की मला ते पूर्णपणे समजलेय. कारण या विषयाची मी कोणातीही परिक्षा दिलेली नैय्ये. हौशी वाचक आहे.

मूल्ये ही समाजशास्त्रज्ञांनी, मानसशास्त्रज्ञांनी व अर्थशास्त्र्यांनी अभ्यासली आहेत असा माझा समज आहे. तत्वज्ञांनी सुद्धा. मूल्यांवर ज्यांनी संशोधन केले त्यातल्या काही लोकांनी आपल्या संशोधनासाठी आधार म्हणून अनोख्या लोकांच्या विचारांचा आधार घेतलेला आहे. उदा. बाऊंडेड रॅशनॅलिटी ची संकल्पना मांडणारे हर्बर्ट सायमन हे संगणकशास्त्री व गणिती सुद्धा होते. पण त्यांची स्वतःची Ph.D. राज्यशास्त्रात होती. आज बाऊंडेड रॅशनॅलिटी ही पायाभूत संकल्पना मानली जाते त्यामागे डॅनियल काह्नेमन या मानसशास्त्र्यांनी केलेले संशोधन सुद्धा आहे. मजेशीर बाब म्हंजे सायमन व काह्नेमन हे दोघेही अर्थशास्त्राचे नोबेल पटकावून गेले. बाऊंडेड रॅशनॅलिटी ही Transaction cost Economics च्या क्षेत्रात पायाभूत मानली जाते. व Transaction cost Economics ही मूल्ये, इन्स्टिट्युशन्स च्या विश्लेषणात वापरले जाते. Transaction cost Economics हे समजायला कठिण आहे. मै कोशिश कर रहा हूं. मूल्ये, इन्स्टिट्युशन्स एकत्र कंबाईन का केल्या - त्याचे कारण हे की मूल्ये ही नियम असतात. अनौपचारिक नियम. अनौपचारिक म्हंजे ज्यांच्यासाठी एन्फोर्समेंट ची मशिनरी नसते. इन्स्टिट्युशन्स म्हंजे नियमांचा संच. मूल्ये, इन्स्टिट्युशन्स, कायदे, शिष्टाचार, प्रथा, परंपरा (customs, traditions, norms, convention), मॅनरिझम्स, टाबू, संविधान हे सगळे मिळून आपले (व्यक्तीचे) वर्तन गव्हर्न करतात. म्हंजे राज्यशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र हे सगळे विचारात घ्यावे लागतात. शेवटी - If the researchers take these into account then the reader has less of a responsibility. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बर सर

सर्व प्रतिसाद कळला नाही काही भाग डोक्यावरुन गेला ही अर्थातच माझी मर्यादा आहे. आपले विवेचन मार्मिक च आहे.
आपण क्युरीऑसीटी जागवली मात्र मनात, वरील दोन लेखकांची पुस्तके मिळवुन वाचण्याची भुक निर्माण झाली.
वरील विधानातील डेप्थ मात्र तीव्रतेने जाणवली व आपल्या विचारव्युहाला अधिक व्यापक करण्याची गरजहि तीव्रतेने जाणवतेय.
यापुर्वी फक्त मार्क्स ची अस्पष्ट कल्पना उत्पादन संबंध पिरॅमिड च्या पायथ्याशी मग त्यावर आधारीत सांस्क्रुतिक धार्मिक इमले इ. माहीत होत
अर्थात तेही धड व्यवस्थित अभ्यासलेल नाहीच असच तुकड्या तुकड्यात
दिलसे शुक्रगुजार
इटर्नल स्टुडंट सिंड्रोम ग्रस्त मारवा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

ज्ञानेश्वरीचा अनेक अंगांनी विचार मराठी साहित्यात झाला आहे. आध्यात्मिक दृष्टीने तर अनेकांनी लिहिले आहे. पण कै. म. वा. धोंडांनी ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी या पुस्तकातून ज्ञानेश्वरीचे एक अनोखे अंग समोर आणले आहे. ते म्हणजे तत्कालीन समाजव्यवहार, भाषाव्यवहार आणि संकेत. यादवकालीन समाजव्यवहाराबद्दल कुतूहल हे पुस्तक थोड्याफार प्रमाणात शमवते. हे पुस्तक म्हणजे इतिहास नाही, पण तत्कालीन समाजव्यवहाराचे पुसटसे प्रतिबिम्ब ज्ञानेश्वरीतून कसे प्रत्ययाला येते हे त्यात दाखवले आहे. अशी चिकित्सा झाली पाहिजे कारण त्यातून मूळ ग्रंथाचे सौंदर्य अधिकाधिक उलगडत जाते. हे साधण्यासाठी मूळ पुस्तकाच्या विचारधारेशी सहमत होणे अत्यावश्यक नसले तरी तिचा पुरेसा परिचय पाहिजे; शिवाय मूळ लेखकाशी सहृदयता पाहिजेच पाहिजे. 'गुळाची गोडी तपासण्याचे सोडून तुम्ही त्यातला खारटपणाच का मोजता आहांत' असे प्रश्न योग्य नव्हेत. कारण गुळाची गोडी सर्वमान्यच असते,ती अनेकांनी वर्णिलेली असते, त्यावर कोणी शंका उपस्थित करीत नसते. पण त्यात खारटपणा का शिरला, हेही पाहाणे रोचक ठरू शकते. शिवाय खारटपणा ही देखील एक आवश्यक गोष्ट असतेच.
यादवकालीन मराठी हा तुळपुळे-फेल्ड्हाउस यांचा शब्दकोश प्रसिद्ध आहेच. नुसत्या शब्दकोशवाचनानेसुद्धा नष्ट झालेल्या जुन्या अर्थांची, प्रथापरंपरासंकेतांची माहिती मिळते.
जुन्या ग्रंथांचा मानव्यशास्त्रांच्या दृष्टीने धांडोळा घेतला गेला पाहिजे. मध्यन्तरी गुरुचरित्र या वेगळ्या दृष्टिकोनातून वाचले होते. पण नोंदी आणि निष्कर्ष काढण्याची प्रक्रिया किचकट वाटल्याने ती पूर्ण झाली नाही.
भाविक वाचकांना एक विनंती आहे. त्यांनी बहुतेकांच्या नित्यपाठात असणार्‍या शिवलीलामृत, दासबोध, तुकारामगाथा (यातली भाषा खूपच वेगळी आणि त्यामुळे समजायला कठिण; आता तुकारामांचा आणि रामदासांचा काळ ज्ञानेश्वरांच्या कितीतरी नंतरचा. पण दासबोधाच्या भाषेइतकी तुकारामांची भाषा समजायला सोपी नाही. किंवा नामदेव ज्ञानेश्वरांना समकालीन पण नामदेवांची भाषा त्या मानाने समजायला सोपी, हे लक्ष्यात आले की अनेकानेक संदर्भ आणि संकल्पना समोर उलगडू लागतात आणि वाचनाचा आनंद वर्धित होतो.) मारुतिस्तोत्र, नवनाथभक्तिसार, गजाननमहाराज, साईबाबा यांची मूळ चरित्रे या दृष्टीने वाचावीत. त्या काळातले महात्मे त्या त्या कालात कसे आणि का वागले असावेत हे तर कळतेच पण त्यांना त्या काळाच्या असलेल्या मर्यादा समजून येऊन आजच्या काळात आपण कसे वागावे याची निर्णयक्षमता आपणाकडे येऊ शकते. कदाचित यालाच डोळसपणा म्हणत असावेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रस्तावने शी पुर्णपणे सहमत आहे. अभ्यासाची दिशा दर्शवणारे मार्गदर्शन देखील अचुक आहे.
आता आज २०१५ मध्ये तुमचा जो काही व्यासंग झालेला आहे चिंतन झालेल आहे त्यासर्वांना एकत्रित करुन
ज्ञानेश्वरांचा स्त्री संदर्भातील द्र्ष्टीकोण, पातिव्रत्य हे मुल्य, व त्यांचे या संदर्भातील विचार तुम्हास आजच्या काळाच्या संदर्भात कसे वाटतात?
तुमचे एक स्त्री म्हणुन मत आजच्या काळात जगणारी व त्याकाळाचे संदर्भही जाणणारी म्हणुन काय आहे.
तुम्हास मुळात ते प्रश्न तरी निकडीचे वाटतात का ? की नाही ?
सो व्हॉट इज युवर पॉइंट यु वुड लाइक टु ब्रींग टु टेबल ?
तुमचे नेमके मत काय ?
तुम्ही या पातिव्रत्याच्या जे प्रतिक ध्वनित सरळ वा वक्र अर्थाने उपस्थित आहे ते तुम्ही आजच्या काळात स्वीकाराल नकाराल निषेध स्वीकार काय करणार ?
माफ करा जरा जास्त च टोकदारपणे विचारतोय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

प्रस्तावने शी पुर्णपणे सहमत आहे. अभ्यासाची दिशा दर्शवणारे मार्गदर्शन देखील अचुक आहे.
आता आज २०१५ मध्ये तुमचा जो काही व्यासंग झालेला आहे चिंतन झालेल आहे त्यासर्वांना एकत्रित करुन
ज्ञानेश्वरांचा स्त्री संदर्भातील द्र्ष्टीकोण, पातिव्रत्य हे मुल्य, व त्यांचे या संदर्भातील विचार तुम्हास आजच्या काळाच्या संदर्भात कसे वाटतात?
तुमचे एक स्त्री म्हणुन मत आजच्या काळात जगणारी व त्याकाळाचे संदर्भही जाणणारी म्हणुन काय आहे.
तुम्हास मुळात ते प्रश्न तरी निकडीचे वाटतात का ? की नाही ?
सो व्हॉट इज युवर पॉइंट यु वुड लाइक टु ब्रींग टु टेबल ?
तुमचे नेमके मत काय ?
तुम्ही या पातिव्रत्याच्या जे प्रतिक ध्वनित सरळ वा वक्र अर्थाने उपस्थित आहे ते तुम्ही आजच्या काळात स्वीकाराल नकाराल निषेध स्वीकार काय करणार ?
माफ करा जरा जास्त च टोकदारपणे विचारतोय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

तुमचे नेमके मत काय ?
तुम्ही या पातिव्रत्याच्या जे प्रतिक ध्वनित सरळ वा वक्र अर्थाने उपस्थित आहे ते तुम्ही आजच्या काळात स्वीकाराल नकाराल निषेध स्वीकार काय करणार ?
माफ करा जरा जास्त च टोकदारपणे विचारतोय

माझ्या मते राहींनी काय कोणीच या प्रश्नाचे थेट व्यक्तीगत उत्तर देण्याची गरज नाही. समाजात दिसते आहे ते समोरच आहे. आनि जे वाइडली दिसतय त्या अनुषंगाने ब्रॉड वक्तव्य केले तरी चालणार आहे. अर्थात त्यांना उत्तर द्यायचे असल्यास दिले तरी हरकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचे नेमके मत काय ?
तुम्ही या पातिव्रत्याच्या जे प्रतिक ध्वनित सरळ वा वक्र अर्थाने उपस्थित आहे ते तुम्ही आजच्या काळात स्वीकाराल नकाराल निषेध स्वीकार काय करणार ?
माफ करा जरा जास्त च टोकदारपणे विचारतोय

एक स्त्री म्हणुन माझे उत्तर सरळ साधे आहे, आठशे, नऊशे वर्षापूर्वी कोणी काय लिहुन ठेवले आहे त्या बद्दल "हू केअर्स"
निषेध करावा इतके ही महत्व त्याला द्यावे असे वाटत नाही.

त्याही पेक्षा निषेध करण्यासारख्या गोष्टी ( खरेतर घाबरण्यासारख्या ) सध्या नुस्त्या लिहील्या जात नाहीत तर केल्या जात आहेत, त्या मला महत्वाच्या वाटतात, कारण त्या माझ्या आयुष्याला येऊन भिडण्याची भीती आहे.

मला ज्ञानेश्वरांनी स्त्री बद्दल काय लिहुन ठेवले आहे त्यापेक्षा आय्सिस किंवा श्रीराम सेनेची ( हे नाव फक्त संतुलितपणा साठी ) काय मते आहेत त्या बद्दल जास्त भीती वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे नाव फक्त संतुलितपणा साठी

हाहाहा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक स्त्री म्हणुन माझे उत्तर सरळ साधे आहे, आठशे, नऊशे वर्षापूर्वी कोणी काय लिहुन ठेवले आहे त्या बद्दल "हू केअर्स"
निषेध करावा इतके ही महत्व त्याला द्यावे असे वाटत नाही.

जर तुम्हाला इतके ही महत्व त्याला द्द्यावे असे वाटत नाही. तर ठीक आहे.
पण एक लक्षात घ्या जरी तुम्ही महत्व दिले नाही तरी त्यातील मांडणी ही आज तुमच्या मते महत्व द्यावे असे वाटलेल्या संघटनेच्या
मांडणीचा सोर्स आहे. हा विचार असा एकाएकी निर्माण होत नसतो. एक लांबचा प्रवास करुन येत असतो. आपण मुळे तपासली नाहीत
मुळांना पाणी घालत राहीलो तर नुसती पालवी छाटुन काही होणार नाही. हा ज्ञानेश्वरांचाच दाखला आहे.
अर्थात मुलगामी विचार करावा की करु नये या तुमच्या स्वातंत्र्याचा आदर आहेच.
आपापल्या परीने अधिकाधिक मुलगामी विचार करत राहावा असे मला तरी अगत्याचे वाटते.
किमान स्पष्ट मत तरी मांडले यासाठी धन्यवाद.
आश्चर्य म्हणजे मला या स्त्री विषयक प्रश्न मांडणीला सर्वात जास्त विरोध स्त्रीयांनीच केला आहे.
प्राणेश्वरद्देशे ही ओवी पहिल्यांदा जेव्हा वाचली होती तेव्हा मला धक्काच बसला होता काही काळ मी सुन्न झालो होतो.
की एक इतका संवेदनशील कवी देखील स्त्री च्या बाबतीत मांडणी करतांना
त्यांना काहीच कसे वाटले नाही ? याचेच आश्चर्य वाटलेले......
आता आश्चर्य रोजच वाढतेय........

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

अर्थात मुलगामी विचार करावा की करु नये या तुमच्या स्वातंत्र्याचा आदर आहेच.

अहो मला इतकेच म्हणायचे होते की भारतात रस्त्यावर फिरणार्‍या २ पायांच्या जनावरांना स्त्रीयांबद्दल काय वाटते आहे ते मला जास्त महत्वाचे वाटते. काल पुण्यात गणपतीत असली २०-५० हजार जनावरे तरी बेदुंध होऊन नाचत होती.

हे संकट इतके जवळ असताना, ज्ञानेश्वरांचे स्त्रीयांबद्दलच्या मतांबद्दल कुठे हो विचार करणार?

घराबाहेरची लोक राहू देत, घरातली आणि नात्यातली लोक स्त्रीयांबद्दल मनात काय विचार करतात हे जाणुन घ्यायची पण भीती वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तू फार विचार करतेस. अनाठाई वाटते ही एवढी भीती. थोडी अवास्तवच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१)कोणी कितीही टोकदार प्रश्न अनाहूतपणे विचारले तर समोरच्यावर त्याचे उत्तरदायित्व नसते.
२)भौतिक बाबीत ज्ञानेश्वरांच्या सर्व मतांचा विचार त्या काळाच्या चौकटीत करावा हे मला योग्य वाटते.
३) अ - एक स्त्री म्हणून मते मांडायची मला तितकीशी सवय नाही. 'त्या काळचा संदर्भ जाणणारी' हे विशेषण बहुमानाचे दिसत असले तरी मला लागू होत नाही.
ब - ज्ञानेश्वरीकडे, किंबहुना गोष्टींकडे/प्रत्येक गोष्टीकडे स्त्री-पुरुष, ग्रामीण-शहरी, दलित-अभिजनी अशा दृष्टिकोनातून बघणे आवडत तर नाहीच, पटतही नाही. विशेषतः ज्ञानेश्वरासारख्या महामानवाकडे आणि ज्ञानेश्वरीसारख्या महासाहित्याकडे मी एक मर्त्य मानव, पामर या दृष्टीनेच बघणे योग्य असे मला वाटते.
३) ड - ज्ञानेश्वरी हा चतुर्वर्गचिंतामणि किंवा निर्णयसिंधु या ग्रंथांसारखा धर्म/शास्त्रनिर्णय करणारा ग्रंथ नाही. यात धर्माज्ञा बहुतांश नाहीत आणि त्या पालन करण्याचे बंधन कुणावर नाही. किंबहुना प्राचीन काळातल्या कोणत्याही धर्माज्ञेचे पालन करण्याचे बंधन आजच्या हिंदूवर नाही. मुळात या धर्माज्ञा त्या त्या वर्णापुरत्या मर्यादित होत्या, सर्वंकष आणि सार्वत्रिक नव्हत्या. तो काळ आता नाही आणि ती वर्णव्यवस्था आज मान्यताप्राप्त नाही. शिवाय हिंदू धर्म हा 'किताबी' धर्म किंवा प्रेषितप्रणीत धर्म नाही. परम्परा, रूढी, समजुती आणि समजूतदारपणा यावर तो आधारित आहे म्हणून तो लवचिक आहे. तो बदलांना सामोरा गेला आहे, जात आहे.
४) ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेवरील भाष्य आहे. सामान्य माणसाला समजावे म्हणून त्या काळच्या सोप्या भाषेत लिहिलेले. म्हणून त्यात येणारे दृष्टांतही निसर्गात आणि रोजच्या व्यवहारात दिसणारे असे आहेत. त्या काळातल्या लोकांना दैनंदिन जीवनातले दाखले चटकन समजले असते म्हणून ते दिले आहेत. त्या काळची जीवनपद्धती ज्ञानेश्वरांनी निर्माण केलेली नव्हती. त्यासाठी ते जबाबदारही नव्हते. किंबहुना कोणी एकच व्यक्ती जबाबदार होती असेही नाही. जी व्यवस्था होती त्यातलेच दाखले त्यांनी दिले.
५) माझ्या आधीच्या प्रतिसादातून पुनरुक्त - आजच्या काळात कसे जगावे याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे. त्यासाठी अशा ग्रंथांचे अनुशीलन करून हे महात्मे त्या काळात कसे आणि का वागले असतील याचा विचार करणे साहाय्यभूत होऊ शकते. त्या वागण्याला जी परिस्थिती कारणीभूत होती ती आजही तितकीच तीव्र आहे का, हा डोळस विचार आणि याच्या उत्तरातून येणारी ती डोळस श्रद्धा ठरेल.
६) धागाकर्त्याने उद्धृत केलेल्या ओव्यांमध्ये कुठेही आदेश अथवा आज्ञा नाही. वर्ण्यसिद्धान्त सोपे करून सांगणार्‍या फक्त उपमा आहेत. त्यामुळे फक्त 'उपमेया' चे जनकत्व ज्ञानेश्वरांकडे जाते, 'उपमाना'चे नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विशेषतः ज्ञानेश्वरासारख्या महामानवाकडे आणि ज्ञानेश्वरीसारख्या महासाहित्याकडे मी एक मर्त्य मानव, पामर या दृष्टीनेच बघणे योग्य असे मला वाटते.

या द्रुष्टीनेच बघायचे म्हटल्यास तर चिकीत्सा करणेच शक्य नाही. कारण याचा अर्थ महामानव जे बोलतात त्यातील प्रत्येक अक्षर न अक्षर खर आणि योग्य च आहे पवित्र आहे . व आपण पामर च आहोत तर ना आपल्याला पात्रता ना अधिकार मग चिकीत्सा कशी होणार ?
असाच दृष्टीकोण सहसा इतर क्षेत्रात विशेषतः विज्ञानाच्या आढळत नाही. म्हणुनच तिथे कालचे महामानव व त्यांचे ग्रंथ आज कालबाह्य होऊन जातात. तुम्ही तर वरती खारेपणा शोधण्याला समर्थन दिलेले आहे. तो असा दृष्टीकोण असल्यावर कसे शक्य आहे. यापेक्षा ते सुद्धा एक मानवच होती आपल्यासारखे हाडामासाचे माणुस च होते त्यांना उपलब्ध असलेले अवयव मानवी क्षमता आपल्यालाही उपलब्ध आहेत. त्यांचा एखादा विचार चुकीचा असु शकतो एखाद्या अन्न्याय्य गोष्टीच समर्थन ते करु शकतात. बाकी विदा तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे तरीही गॅलिलीओ बायबल अ‍ॅरीस्टॉटल गुलामी चे समर्थन कोपरनिकस इ. महामानव इ.

६) धागाकर्त्याने उद्धृत केलेल्या ओव्यांमध्ये कुठेही आदेश अथवा आज्ञा नाही. वर्ण्यसिद्धान्त सोपे करून सांगणार्‍या फक्त उपमा आहेत. त्यामुळे फक्त 'उपमेया' चे जनकत्व ज्ञानेश्वरांकडे जाते, 'उपमाना'चे नव्हे.

पुर्णपणे सहमत आहे कुठेही आदेश नाही आज्ञा नाहीच. मी केवळ उद्दात्तीकरण समर्थन आहे असे म्हणतोय. उदाहरण उपमा देतांना माणुस आपल नैतिक पाठबळ देत नाही का ? उपमेतुन ज्याला समर्थन आहे ज्याविषयी आस्था आहे तोच मुल्यभाव व्यक्त होत नाही का ? ती बाई सावित्रीसारखी पतिव्रता होती. तीने पतीची सेवा करुन त्याला कॅन्सर च्या मृत्युच्या दाढेतुन वाचवले. असे उदा. विधान एखाद्याने केले आहे. तर विधान करणारी व्यक्ती कुठल्या मुल्यांना सर्वोच्च मानते समर्थन करते पाठींबा दर्शविते हे कळत नाही का ? या उलट ज्ञानेश्वर जेव्हा जैन धर्मीयांच्या अहिंसे च्या मुल्यावर टीका करतांना असे मुनि लोक अस अस करतात .....इ. म्हणतात तेव्हा ते त्या मुल्यांप्रती असलेला विरोध त्या मुनिंच्या आचरणाची उपमा देउन व्यक्त करत नाही का ?
उपमा देणारी व्यक्ती उपमा निवड करतांना मुल्यनिरपेक्ष चयन करत असते असे आपण म्हणु शकतात ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

पातिव्रत्य हे त्या काळी परममूल्य होते. आजही ते एक मूल्य आहे. पण आज पत्नी पतीला त्याच्या दुर्वर्तनाबद्दल जाब विचारू शकते, सबळ कारण असेल तर घटस्फोटही मिळवू शकते. हा बदल आहे आणि आपण सर्वांनी तो स्वीकारला आहे. शूद्राघरचे सुग्रास अन्न दरिद्री ब्राह्मणानेदेखील स्वीकारू नये अशी त्या काळी रूढी/व्यवस्था होती. आज ती नष्टप्राय आहे. या दोन्ही बाबतीत जुन्या रूढी/ व्यवस्था पुनर्स्थापित कराव्या असा दुराग्रह कोणी धरीत नाही. जे कालविसंगत आहे ते हळूहळू का होईना, नष्ट होते. स्त्रीच्या इशार्‍यावर नाचणे एकेकाळी अनुचित, त्याज्य होते. आज स्त्रीशब्दाला योग्य मान देणे, स्त्रीचा आदर करणे हे सभ्यतेचे लक्षण आणि मूल्य आहे.
धागाकर्त्याने दिलेल्या ओव्यांद्वारे ज्ञानेश्वरांची भूमिका 'तपासण्या'चा हेतु असेल तर तो साध्य झालेला नाही. कारण 'तपासा'साठी इतकासा पुरावा पुरेसा नाही. वरील सर्व मुद्दे हे वैचारिक पातळीवर कधीच मान्यता पावले आहेत. आज वैचारिक पातळीवर तरी संघर्षाची निकड जाणवत नाही. निकड आहे ती ह्या अभिजनमान्य सुधारणा तळागाळात झिरपवण्याच्या प्रत्यक्ष कृतीची.
आज मान्य झालेल्या मुद्द्यांसाठी ८०० वर्षांपूर्वींच्या साहित्याचा अथवा साहित्यकाराचा मी निषेध अथवा धिक्कार करू इच्छित नाही. हे म्हणजे मेलेल्याला जिवंत करून पुन्हा मारण्यासारखे आहे. ती मूल्ये नष्ट झाली. आता त्याचे काय? त्या काळी अशी समाजस्थिती होती, ह्याचा पुरावा (विकीभाषेत साय्टेशन्स) म्हणून कदाचित ही अवतरणे उपयुक्त ठरू शकतील. बाकी काही नाही.
(मनुस्मृती आणि तत्सम ग्रंथांनाही हेच लागू आहे. मनुस्मृती कालसमुद्रात बुडून गेली. पुन्हापुन्हा वर आणून बुडवण्याने अथवा जाळण्याने प्रतीकात्मकतासुद्धा साध्य होत नाही. नवी प्रतीके धुंडाळावी लागतील. पण तिचे इतिहासात्मक मूल्य आहेच.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पातिव्रत्य हे त्या काळी परममूल्य होते. आजही ते एक मूल्य आहे.

आजही हे कसे काय एक मुल्य आहे ? कळले नाही.

(मनुस्मृती आणि तत्सम ग्रंथांनाही हेच लागू आहे. मनुस्मृती कालसमुद्रात बुडून गेली. पुन्हापुन्हा वर आणून बुडवण्याने अथवा जाळण्याने प्रतीकात्मकतासुद्धा साध्य होत नाही. नवी प्रतीके धुंडाळावी लागतील. पण तिचे इतिहासात्मक मूल्य आहेच.)

या विधानाशी शत प्रतिशत सहमत अशाच अर्थाचा एक प्रतिसाद मी तिथे पैसाजींना दिलेला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

लग्नबंधनात असेपर्यंत तरी पत्नीने पतीशी एकनिष्ठ राहाणे आणि त्याच्या हिताची काळजी घेणे हे आजच्या काळातले पती-व्रत आणि पतीनेही तसेच वागणे हे आजच्या काळातले पत्नीव्रत. काळानुसार भर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राही जी
एखादा ग्रंथ ज्यात पत्नीव्रत्य या मुल्यासंदर्भात काही मांडणी गौरव आहे.
माझ्या वाचनात तर आजच पहिल्यांदा हा शब्द आला
पत्नीव्रत्य या संकल्पने विषयी त्याच्या परंपरांविषयी काही विदा असल्यास पुरवावा
अत्यंत नम्रतापुर्वक मागणी करत आहे
कृपया गैरसमज नसावा माझ्यासाठी तरी ही एक नवीकोरी संकल्पना मुल्य आहे.
हा माझ्या अज्ञानाचा भाग च समजावा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

लग्नबंधनात असेपर्यंत तरी पत्नीने पतीशी एकनिष्ठ राहाणे आणि त्याच्या हिताची काळजी घेणे हे आजच्या काळातले पती-व्रत

राही ताई - अजिबात मान्य नाही हं असले पतीव्रत. लग्नबंधन आहे म्हणुन काय झाले, जे मनाला वाटेल तेच करावे. वाटले एकनिष्ठ रहावे तर रहावे नाहीतर राहू नये. पतीच्या हितात जर आपले हित असेल तर त्याच्या हिताची काळजी करावी, नाहीतर गेले त्याचे हित गा च्या गा मधे. नवरा म्हणेल कामधंदा सोडुन घरी लोळत बसण्यात त्याचे हित आहे, मग काय त्याला घरी बसून देवू?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नवरा म्हणेल कामधंदा सोडुन घरी लोळत बसण्यात त्याचे हित आहे, मग काय त्याला घरी बसून देवू?

स्त्रीपुरुष समानता वगैरे शब्दांची आठवण येऊन अंमळ मजा वाटली. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्त्रीपुरुष समानता वगैरे शब्दांची आठवण येऊन अंमळ मजा वाटली

मग मी नोकरी करतेच. पुरुष कसले बायकांच्या बरोबरीचे? कुठ्ल्या अ‍ॅंगल नी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी नोकरी करतो, तू घरी बस असे नवरा बायकोला म्हणू शकतो तर व्हाईसे व्हर्सा का होऊ नये इतकाच प्रश्न आहे. तेसुद्धा "नवरा म्हणेल घरी बसण्यात हित आहे" अशी पुस्ती आपणच जोडलीत म्हणून, नपेक्षा विचारलं नसतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बेसिकमध्येच वांदे की रे बॅट्या तुझ्या!
जरा ती इतिहासाची पुस्तकं सोडून एवोल्युशनरी सायकॉलॉजी वाच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अर्र हो की ढेरेशास्त्री. एवोल्युशनरी सायकॉलॉजी ही एकाच बाजूने अभ्यासायची असते ही मोलाची माहिती विसरलोच होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी नोकरी करतो, तू घरी बस असे नवरा बायकोला म्हणू शकतो तर व्हाईसे व्हर्सा का होऊ नये इतकाच प्रश्न आहे

नवर्‍यानी नोकरी केली तर बायको घरी भरपूर काम करते.
नवरा घरी बसला की फक्त लोळतो आणि बायकोला घरचे आणि नोकरीचे असे दोन्ही काम करावे लागते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हॅ हॅ हॅ, चालूद्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नाही अनु. मी अपवाद पाहीलेला आहे. ज्या काळात माझा नवरा घरी होता त्या काळात माझ्याहून चांगले पेरेन्टींग, कुकिंग व घर नीट्नेटके ठेवण्याचे काम करे. खरं तर मलाच वाटतं त्याने घरी रहावं कारण ही कामं मला त्याच्याइतकी जमत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी अपवाद पाहीलेला आहे.

अपवाद : यु सेड इट शुचि.

तसेही, मुद्दा ठासुन मांडण्यासाठी जरा अतिशयोक्तीकरण करायलाच लागते ना. त्याशिवाय मजा कशी येणार.
खरे तर पतीव्रत वगैरे कल्पनांनी आधी डोके फिरले होते. आणि एकदा ते फिरले की कुठे जाऊन फिरुन येइल काय सांगता येतय Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगं नाही तेच - अपवाद आहे की नियम आय अ‍ॅम नॉट श्युअर. माझ्याकडे विदाच नाहीये अजुन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुढे पत्नीव्रतही लिहिलेय की काळानुसार भर म्हणून. सगळे काही ज्ञानेश्वरांनीच लिहून ठेवायला पाहिजे का? आताच्या पुरुषांना करायला लावावे की पत्नीव्रत. चांगले वठणीवर आणावे. (कारण त्यातच त्यांचे हित असल्याने व त्या हिताची काळजी घेतल्याने पती-व्रतही साधेल.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजिबात मान्य नाही हं असले पतीव्रत. लग्नबंधन आहे म्हणुन काय झाले, जे मनाला वाटेल तेच करावे. वाटले एकनिष्ठ रहावे तर रहावे नाहीतर राहू नये. पतीच्या हितात जर आपले हित असेल तरच त्याच्या हिताची काळजी करावी, नाहीतर गेले त्याचे हित गा च्या गा मधे.

+१ एकदम पटले. राही यांचा तो मुद्दा मलाही आक्षेपार्हच वाटला होता. कोणाशी/कशाशीही बांधिलकी ही बाह्य फॅक्टर्स मुळे असू नये तर "स्वान्ताय सुखाय" या विशुद्ध हेतूने असावी Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्थ- शुद्राच्या घरी मधुर चवीची पक्वान्ने आहेत, आणि एखादा दरिद्री ब्राह्मण आहे म्हणुन त्याने ती सेवन करावी का ? असे अनुचित कृत्य दरिद्री ब्राह्मणाने कसे बरे करावे? जे घेण्यास योग्य नाही अशा गोष्टीची का इच्छा करावी ? इच्छा करुन अशा पक्वान्नांची प्राप्ती जरी झाली तरी त्याचे सेवन करावे का ?

हा नक्कीच नंतर कोणीतरी कर्मठांनी घुसवलेला अर्थ असणार,
किंवा शूद्र म्हणून कोणा एका वर्गाला,जातीला न संबोधता कोणा दुराचारी किंवा दृष्ट लोकांना संबोधले असेल तर माहित नाही. ज्ञानेश्वरांनी असे म्हटले असेल वाटत नाही, आणि जर म्हटलेही असेल तर आता काय बोलावे?

वरील सदस्यांपैकी कोणी या ओवीचा आक्षेप घेतला नाही हे पाहून नवल वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी