हिरोशिमा नंतर ७० वर्षे

६ ऑगस्ट २०१५ पासून ७० वर्षांपुर्वी १९४५ साली जपान च्या हिरोशिमा शहरावर (अमेरिकेच्या कपटी हेरी ट्रुमन या राष्ट्राध्यक्षांनी परवानगी दिल्यावर) 'little boy' हा Uranium आणि ९ ऑगस्ट रोजी 'fat man ' हा plutonium बॉम्ब नागासाकी शहरावर टाकला. विध्वंस जास्तीत जास्त व्हावा यासाठी little boy हा जमिनीच्या वर २,००० फुटावरच फुटेन असा time केला होता आणि अपेक्षेप्रमाणे प्रचंड विध्वंस झाला. याबद्दल बरेच वाचनात आले असेल सगळ्यांच्या.
पण आता ७० वर्षांनतर काय परिस्थिती आहे?
जगातल्या १९६ देशांपैकी ९ देशांकडे अण्वस्त्र आहेत. किती? तब्बल १५,७००! (जर कोणाचा छुपा कार्यक्रम असेल किंवा जर खरे आकडे जाहीर केले नसतील तर हा आकडा वाढू शकतो) यातला सर्वात शक्तिशाली अस्त्र आहे B८३ ज्याची संहार क्षमता little boy च्या २०० पटीने अधिक आहे. जर याच्या क्षमतेची १२,४१,१६६ अण्वस्त्रे एकदम पृथ्वीवर टाकली तर या ग्रहावरचा प्रत्येक प्राणी नष्ट होईल. म्हणजे आता जवळ जवळ याच्या १०% साठा पृथ्वीवर आहे.
तर हे ९ देश कोणते? कोणाकडे किती अण्वस्त्र आहेत?
२३ जून २०१५ रोजी,
१. रशिया : ७५००
२. अमेरिका : ७१००
३. फ्रांस : ३००
४. चीन : २५०
५. यु. के. : २२५
६. पाकिस्तान: १२०
७. भारत : ११०
८. इस्रायेल: ८०
९. उत्तर कोरिया: (अधिक माहिती साठी ploughshares.org हि वेब साईट चाळा, इथे सर्व ९ देशाच्या अण्वस्त्र संबंधीचे शोध निबंध प्रकाशित केले आहेत)
विशेष म्हणजे ९ पैकी ३ देश आशियातले आहे. त्यातल्या त्यात भारताचे उरलेल्या दोघांशी काही खास जमत नाही. जर विश्व युद्धाऐवजी आशिया युद्ध जरी झाल आणि कोणीहि पहिला बॉम्ब टाकण्याच्या आगावू पण केला तर परिस्थिती कठीण होऊ शकते.
हे बॉम्ब टाकणार कसे ?
हिरोशिमा वरचा बॉम्ब विमानातून टाकला होता. पण आता तंत्रज्ञान प्रगत झाल्याने हे शक्य नाही. (शत्रू विमान पाडून टाकेन म्हणून). तर मग हि अण्वस्त्र कशी वापरणार? त्यासाठी मिसाईल वापरतात. मिसाईल बॉम्ब वाहून नेण्याच आणि योग्य ठिकाणी पाडण्याच काम करतात.
यांचे बरेच प्रकार आहेत. जसे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे, जमिनीतून हवेत मारा करणारे, पाण्यावर आणि पाण्यात मारा करणारे वगैरे वगैरे. तर फक्त जमिनीवरून जमिनीवर (ICBM - Intercontinental Ballistic Missile) मारा करणाऱ्या मिसाईल मध्ये सर्वात लांब पल्ल्याचा मिसाईल आहे रशिया कडे, R36M. याचा पल्ला १६,००० कि.मी., दुसरा आहे चीन कडे- १३,००० कि.मी. (भारताकडचे अग्नी - ५ हे सर्वात लांब पल्ल्याचे आहे, ५,००० कि.मी. ज्यामुळे चीन आणि युरोप आपल्या टप्प्यात आलाय, आणि हो पाकिस्तान सुद्धा. तर पाकिस्तान कडे आहे शाहीन - ३, बरोब्बर ओळखलं, पल्ला - ३,००० कि.मी. चा). तर भारताचे अग्नी ५ हे पहिल्या दहा मिसाईल च्या पंगतीत पण येत नाही कारण ती पंगत संपते १०,००० कि.मी वर.
बर मग?
मग काय? अमेरिका आणि रशिया यांतील (अंदाजे, राजधानी ते राजधानी) अंतर आहे ८,८५० कि.मी. चीन आणि अमेरिका यातलं अंतर आहे ११,६५० कि.मी. , भारत आणि चीन चे अंतर आहे ४,४०० कि.मी. तर भारत आणि पाकिस्तान मधले अंतर आहे अवघं १,५०० कि.मी.
जर जगाचा नकाशा टेबलावर ठेऊन पहिला तर साधारणपणे अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यात त्रिकोण तयार होतो. आणि या त्रिकोणातून सुटतात ते ऑस्ट्रेलिया आणि जपान.
आणि जर कोणी अण्वस्त्र घेऊन कोणावर मिसाईल सोडलंच तर?
तर असा काही झालंच तर Missile Defense System (MDS) हे तंत्रज्ञान बर्याच देशांनी विकसित केलंय. त्यात चीन, फ्रांस, यु. के., इटली आणि भारत यांचा समावेश आहे.
गोची!
खरी गोची अशीये कि सगळे मिसाईल तांत्रिक दृष्ट्या अचूक आणि प्रगत आहेत पण हे MDS च्या अचूकते बद्दल अजून वाद आहेत. आहे कि नाही गम्मत.

गेल्या ७० वर्षात आपल्या पृथ्वीवर आपण, आपल्याच विध्वंसाची भरपूर तयारी केलीये. पृथ्वीच्या बाहेर दुसर्या ग्रहावर जीवसृष्टी असली तरी ती आपल्या पृथ्वीवर यायचं टाळत असेन कारण माणूस हा बुद्धीने हुशार आणि अकलेने मुर्ख होत चाललेला प्राणी आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

प्रतिक्रिया

अण्वस्त्रांमुळे जगाबद्दल काळजी वाटणं ठीक आहे. पण गेल्या साठसत्तर वर्षांत घडलेल्या घटना आशादायी आहेत.

१. कोल्ड वॉर संपल्यानंतर अण्वस्त्रांचा साठा सुमारे दोन तृतियांशांनी कमी झालेला आहे. संदर्भ.
Since their peak in the mid-1980’s, global arsenals have shrunk by over two-thirds. More countries have given up weapons and programs in the past 30 years than have tried to acquire them.
२. एकंदरीत युद्धखोरपणाच कमी झालेला आहे.

३. एकेकाळी आत्यंतिक दुर्बळ आणि दोन महासबळ देश होते. आता सबळ देशांची संख्या वाढलेली आहे, आणि दुर्बळही दुर्बळ राहिलेले नाहीत. त्यामुळे आपला स्फिअर ऑफ इन्फ्लूअंस वगैरे शस्त्रबळावर राखण्याचा कल कमी झाला आहे. (हे विधान सिद्ध करायला माझ्याकडे काही विदा नाही, हा नुसता अंदाज/वैयक्तिक निरीक्षण आहे)
४. हुकुमशाह्या कमी झाल्या आहेत, आणि लोकशाह्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या राष्ट्राला युद्धात झोकण्यापूर्वी सरकारं खूप अधिक विचार करतात.
५. सर्व देशांत आपापसात जास्त जास्त व्यापार करायला लागले आहेत. त्यामुळे युद्धांची शक्यता कमी होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोन महायुद्धाचे परिणाम जगाने भोगल्यामुळे आता सहसा कोणी युद्ध करायला धजावणार नाही याचा अर्थ ते होणारच नाही असे पण नाही.त्यामुळे तुमच्या अर्ध्या मताशी सहमत. (अमेरिका सगळीकडे नाक खुपसतच असते की.) प्रगतिशिल देश संख्येने वाढलेत पण त्याचवेळी प्रगत देश बरेच पुढे निघुन गेलेत. हुकुमशाही देश कमी झालेत पण तशा मानसिकतेचे, लष्करशाही असलेले आणि आतंकी शक्तीचा पगडा असलेले देश वाढताय. सुदैवाने आतंकी देशांकडे अण्वस्त्र नाही असा जगाचा समज आहे आणि तो खरा असावा. बाकी शेवटच्या मताशी सहमत..
पण जर गोळ्या भरलेली बंदुक जर समोरच्या व्यक्तिच्या कमरेला लटकत असेल तर असुरक्षित वाटणारंच मग भले त्यात ६ गोळ्या असोत कि १.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~ योगी

हुकुमशाही देश कमी झालेत पण तशा मानसिकतेचे, लष्करशाही असलेले आणि आतंकी शक्तीचा पगडा असलेले देश वाढताय.

याबद्दल काही विदा आहे का? लोकशाही वाढली आणि हुकुमशाही कमी झालेली आहे हे खालील चार्टवरून दिसतं.

लोकशाही

पण जर गोळ्या भरलेली बंदुक जर समोरच्या व्यक्तिच्या कमरेला लटकत असेल तर असुरक्षित वाटणारंच मग भले त्यात ६ गोळ्या असोत कि १.

जर बंदूकवाला माणूस आपल्याकडच्या गोळ्या फेकून देत गोळ्यांचा साठा कमी करत असेल तर नक्कीच भीती कमी व्हावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

युद्धाचे स्वरुप बदलतय. खालील लिंक बहुदा आपल्या प्रश्नाचं उत्तर देउ शकेन.
http://www.huffingtonpost.com/michael-vlahos/is-the-world-falling-apart-...
बाकी जगाला अक्कल शिकवणार्‍या लोकशाही अमेरिकेकडे सर्वधिक शस्त्रसाठा आहे तो का? चीन, पाकिस्तान, उ. कोरिया आणि इस्त्रायल मधल्या लोकशाहीबद्द्ल आपलं काय म्हणनं आहे? जोवर सगळेजण अण्वस्त्र सोडत नाही तोवर मानवजात सुरक्षित नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~ योगी

तो लेख वाचला. सेबर रॅटलिंगपलिकडे काहीही विश्लेषण नाही. युद्धं का होतात, अथवा पूर्वी व्हायची याबद्दल निश्चित काहीच म्हटलेलं नाही. उगीच अमेरिकेविषयी अतिरेकी अभिमान, आणि त्यातून या चीनला धडा शिकवायला पायजेलाय वगैरे विधानं आहेत. १९३७ साली वसाहतवादाचं वर्चस्व होतं. देशांवर राज्य करायचं आणि बाजारपेठा ताब्यात घेऊन तिथे माल विकून पैसा मिळवायचा हा प्रगत देशांचा धंदा होता. आता तसल्या भानगडीत कोणीही पडत नाही. सध्याची युद्धं ही पहिल्या दुसऱ्या महायुद्धांइतकी जीवघेणी नसतात.

चीन, पाकिस्तान, उ. कोरिया, इस्रायल यांना मी कधीच लोकशाही म्हटलेलं नाही. तेव्हा त्यांच्याबद्दल मी का उत्तर द्यावं हे कळत नाही. जगात लोकशाह्यांचा विस्तार झालेला आहे एवढंच म्हणणं आहे. हा लेख वाचल्यावर त्याचा युद्धाशी काय संबंध आहे ते कळेल.

What is the democratic peace?

It is the web of factual propositions that:

Democracies do not make war on each other.
The more two nations are democratic, the less their mutual violence.
Democracies have the least foreign violence.
Democracies have, by far, the least internal violence.
Modern democracies have virtually no democide (genocide and mass murder)

Putting all this together, democracy is a method of nonviolence. And therefore, the democratic peace.

लोकशाही वाढलेली आहे आणि युद्धं आणि त्यातले बळी कमी झालेले आहेत हे साधं सत्य स्वीकारायला अडचण का येते आहे? त्यावरून जग अधिक सुरक्षित होतं आहे हे मान्य करणं का जड जातंय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राजेश साहेब, मी आपल्या पहील्याच कमेंट मधे बोललो कि लोकशाही, व्यापार उदीम यामुळे युध्द कमी झाले आहेत. युध्दाचे स्वरुप बदलुन आता आतंकवादी कारवाया वाढ्लेल्या आहेत आणि त्यातल्या बळींच प्रमाण पण कमी झालंय. त्यात अडचण कसली? पण जग अधिक सुरक्षित नक्कीच नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~ योगी

वाचतोय. चांगली चर्चा !
बाय द वे तुम्हाला राजेश आलेखकर किंवा राजेश ग्राफकाढवी असे सदस्यनाम घ्यायला आवडेल काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही रश्यन अण्वस्त्रांमुळे अमेरिकन घरांमध्ये वीज येते, अण्वस्त्रांचा वापर एकमेकांना धमकवण्यासाठी जास्त आणि खरोखर फटाके फोडण्यासाठी कमी असा गेल्या ७० वर्षांचा इतिहास असे काही तपशील वाचायला जास्त आवडतील. अणूभट्ट्याही प्रत्येक अपघातानंतर अधिकाधिक सुरक्षित होत गेल्या, चर्नोबिलच्या क्षेत्रात आज काय परिस्थिती आहे हाही अभ्यासासाठी रंजक विषय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अणूभट्ट्याही प्रत्येक अपघातानंतर अधिकाधिक सुरक्षित होत गेल्या, चर्नोबिलच्या क्षेत्रात आज काय परिस्थिती आहे हाही अभ्यासासाठी रंजक विषय आहे.

असं काहीतरी लिहून अमेरिकनांनी भारतीय जनतेची दिशाभूल करायचा प्रयत्न करू नये!
आम्ही जैतापूरच्या प्लान्टला विरोध करनारच!
पायजे तर तो प्लान्ट नागपुरात नायतर दिल्लीत नेऊन बसवा!!!
च्यामायला, काय जबरदस्ती चालवलीये?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असा पवित्र घेणारे बघुन एक गोष्ट आठवते. स्वातंत्र्याआधी जेव्हा रेल्वे आली आणि काही दशकांपुर्वी जेव्हा गॅस सिलींडर आले तेव्हा आपल्या आधीची पिढी / पिढ्या भयंकर घाबरली होती आणि वापरायला नको म्हणत होती. तेव्हा पण काही डांबिस लोकांनी अपप्रचार करून डांबिसपण केला होता. आज काय परिस्थिती आहे या दोन्हींची? ऊड्या पडताय आणि टंचाई आहे. असेच काहीतरी होईल अणु ऊर्जेचे काही दशकांनी. भारतात बहुतेक शतक ऊजाडावे लागेल एवढंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~ योगी

भारतात बहुतेक शतक ऊजाडावे लागेल एवढंच.

मग एक शतकानंतर आम्ही आणि आमची पोरंबाळं नैसर्गिक मरण मेल्यानंतर काय राडा करायचा तो करा, आम्ही कुठं नाय म्हणतोय?
आत्ता हा हुमदांडगेपणा नाय पायजेल!
आणि प्लांट लावायचाच असेल तर त्या घारापुरीच्या बेटावर लावा की. काय फारशी शेती-बागायती नाय तिथे. सगळ्या वीस कोटी मुंबईकरांना जगू देत त्या प्लांटच्या मायाळू छायेखाली! लावता?
उगाच आयजीच्या जिवावर बायजी उदार!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नविन अणुप्रकल्प लावायचा का? आणि हो, लावायचा. तर कुठे लावायचा? हे २ वादाचे मुद्दे आहेत. जर पहिल्या वादावर हो चा पडदा पडला तर दुसर्या मुद्द्याला हात घालण्यात अर्थ आहे. बाकी दुरदृष्टी पोटी काळजी फक्त एकाच पिढीपुरती मर्यादीत आहे हे खरतर शोचनिय आहे.
बाकी विज्ञानवाद्यानी आपल्याला अभिप्रेत असलेला "हुमदांडगेपणा" नेहमीच केलेला आहे, मग तो पृथ्वी गोल असो कि पृथ्वी सुर्याभोवती फिरते हा सिद्धांत असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~ योगी

>>बाकी विज्ञानवाद्यानी आपल्याला अभिप्रेत असलेला "हुमदांडगेपणा" नेहमीच केलेला आहे, मग तो पृथ्वी गोल असो कि पृथ्वी सुर्याभोवती फिरते हा सिद्धांत असो.

अजो इज ब्याक?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा अजो काय प्रकार आहे? "अजोंना अनावृत्त पत्र" ही लिंक दिसली पण वाचता येत नाहीये म्हणुन ऊत्सुकतेने विचारतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~ योगी

अरुणजोशी हे एक सदस्य ऐसीवर होते आणि त्यांना "अजो" या नावाने ओळखले जायचे.
नितिन थत्ते = थत्तेचाचा
राजेश घासकडवी = राघा = घासुगुर्जी
सदस्यनाव आणि त्यांचे टोपणनाव असा धागा काढा कुणीतरी नवीन मेंबर्ससाठी आणि FAQ मध्ये टाका. "शुचि"ची सर्व सदस्यनावे पण लिहा त्यात Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा ROFL
काडी टाकलीत Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यातल्या डॉटयुक्त सदस्यनामातले नेमके नंबर ऑफ डॉट्सदेखील इच्यारूण ठेवावेत ही णम्र इणंटी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अणुप्रकल्प "लावणे" हे जबरदस्त आवडलेलं आहे. मराठीतलं मल्टीपर्पज क्रियापद. (चायनीजची गाडी लावणे ते गायछाप लावणे ते घोडा लावणे ते शेंड्या लावणे - केवढी प्रचंड रेंज!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

त्याप्रमाणेच 'मारणे' हेही क्रियापद प्रचंड बहुमतलबी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अणुप्रकल्प "लावणे" हे जबरदस्त आवडलेलं आहे.

ठॅन्क्यू, ठॅन्क्यू!!!!
हम आपके शुक्रगुरूवार है!!!!
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शुक्रगुरुवार>>> हा हा हा ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहा ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अण्वस्त्रांमुळे विज येते? अमेरिकेच्या घरात रशियाच्या अण्वस्त्रांमुळे? तुम्हाला अणुशक्ती / अणुऊर्जा म्हणायचं असावं.अणुबाँब हे काही फटाके नव्हे. अणुप्रकल्पांबद्दल लिहीतोय पण एकुणच आकडेवारी फार गुंतागुंतीची आहे. म्हणुन वेळ लागतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~ योगी

hydrogen bomb, mass destruction weapons पण आहेतच की.
यातल्या केवळ ऐकाच्या वापरानेही संपूर्ण पृथ्वी नष्ट होऊ शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमेरिकेच्या कपटी हेरी ट्रुमन या राष्ट्राध्यक्षांनी परवानगी दिल्यावर

च्यायला, ह्याच जपानने युद्ध जाहीर करायच्या अगोदरच हव्वाई बेटांवर हल्ला चढवून बेसुमार विध्वंस केला ते सोईस्करपणे विसरलांत!!!
आणि हॅरी ट्रूमन कपटी काय?
ती अमेरिका होती म्हणून, जपानला त्याच्या कृत्याचं फळ मिळालं!!
आणिक दुसरा कुठ्ला बोटचेपा देश असता तर मग आहेच, हा करार आणि तो करार!!!!
लॉन्ग लिव्ह हॅरी ट्रूमन!!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जपानला धडा शिकवायचे अनेक मार्ग होते. अणुहल्ल्याचा कट कसा शिजला याचा अभ्यास आपण केलाय का? अशा प्रकारची अस्त्रे पहिल्यांदाच वापरात येणार होती आणि ती वापरण्याआधी २ पर्याय ट्रुमन समोर ठेवले होते जे त्याने हेकेखोरपणे नाकारले. म्हणुन कपटी.
युद्ध ही मुळात विध्वंसाकरीताच होतात आणि त्यात जीवीत आणि वित्त हानी गृहीतच असते. जपानचं केलेलं नुकसान या सगळ्याच्या पलिकडे होतं. अर्थातच जपान काही धुतल्या तांदळातला नव्हता पण तरीही दिलेल्या २ पर्यायांचा विचार करण्याची आवश्यकता होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~ योगी

अणुहल्ल्याचा कट कसा शिजला याचा अभ्यास आपण केलाय का?

तुम्ही हॅरी ट्रूमनच्या चरित्राचा अभ्यास केलाय का? असता, तर त्याला कपटी म्हणाला नसतात.
जपानने युद्ध जाहीर करण्याअगोदर हव्वाई बेटांवर हल्ले केले हे तुम्ही नाकारताय का? नसेल तर जपानने त्यावेळेस अमेरिकेचा दगाबाज शत्रू होणं आपणहून स्वीकारलं होतं.
मग नंतरच्या युद्धात ते भुईसपाट झाले तर मानवतेच्या दृष्टीने ते काहीसं दु:ख्खदायक असलं तरी युद्धनीतीच्या दृष्टिने ते साजेसंच होतं. देअर चिकन्स केम होम टू रूस्ट.

आणि तुम्हाला कटाची ती आतली माहिती असेल असं गृहित धरून विनंती करतो की तो कट कसा शिजला आणि ते दोन पर्याय कोणते याची जबाबदार स्त्रोतासकट माहिती इथे द्या.
तोपर्यंत स्क्रू तत्कालीन जपान!!!!!

हे म्हणजे जर मी हाती कोयता घेउन तुझ्याशी भांडण उकरून काढतोय आणि तू मात्र बंदूक वापरून माझ्यासकट माझं सगळं कूळच मारून टाकतोस म्हणजे काय? अशापैकी आर्ग्युमेंट आहे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जपानी सैन्याने जे भिषण प्रकार व्याप्त प्रदेशात केले आहेत ( सरसकट पणे, अपवादात्मक नाहीत ) त्याचा विचार केला तर अणुबाँम्ब समर्थनियच ठरतो.

तसेही, युद्ध आम्हाला ( पक्षी जपान ) जेंव्हा पाहीजे तेंव्हा, जसे पाहिजे तेंव्हा चालू करणार. युद्ध चालू असताना पकडलेल्या शत्रुपक्षाच्या सैन्यावर अत्याचार करणार. पण युद्ध संपवायचे कसे ते ठरवण्याचा अधिकार मात्र तुम्हाला ( पक्षी अमेरीका ) नाही.
असले तर्कशास्त्र भारताबरोबर चालले असते, अमेरीकेबरोबर नाही.

नशिब ओबामा सारखा कोणी १९४५ साली नव्हता प्रेसिडंट, नाहीतर आत्ता जपान भारताचा सख्खा शेजारी असता ( बर्मा मुळे ).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारत जपानचा शेजारी असता की भाग असता? थॅंक्स टु सुभाष बोस......

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तर काय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते काहिही असो, ज्याच्याने वर्तमानावरच नाही तर भविष्यातल्या काही पिढ्या बरबाद केल्यात अशा हल्ल्याच समर्थन मी तरी करु शकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~ योगी

अशा हल्ल्याच समर्थन मी तरी करु शकत नाही.

ते ठीक आहे. तुम्ही नका समर्थन करू हो. लोकशाही असल्याने तुमच्या त्या चॉईसचा आदर आहे.
पण म्हणून विरोध करून वरती उगाचच कुणाला कपटी वगैरे म्हणू नका. वाद त्यावर होता....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जपानी सैन्याने जे भिषण प्रकार व्याप्त प्रदेशात केले आहेत ( सरसकट पणे, अपवादात्मक नाहीत ) त्याचा विचार केला तर अणुबाँम्ब समर्थनियच ठरतो.

युद्धशास्त्रात प्रावीण्य मिळवलेले इतिहासाभ्यासक काही निराळंच सांगतात बुवा. अगदी अमेरिकेतल्या अणूसंशोधन-संग्रहालयातल्या ब्रेनवॉशी, देशप्रेम-ताप (jingoist) वातावरणातही 'अणूबाँबशिवायही लवकरच जपानने शरणागती पत्करली असती,' अशा अर्थाचे माहितीपट आणि फलक दिसतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"अणूबाँबशिवायही लवकरच जपानने शरणागती पत्करली असती"
सहमत! वर दिलेली यु ट्युब लिंक ते पण अधोरेखित करतेय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~ योगी

युद्धशास्त्रात प्रावीण्य मिळवलेले इतिहासाभ्यासक काही निराळंच सांगतात बुवा.

हे कोणसेसे युद्धशास्त्रात प्राविण्य मिळवलेले इतिहासाभ्यासक जपानने भीषण अत्याचार केलेच नाहीत, किंवा युद्ध जाहीर करण्यापूर्वी पर्ल हार्बरवर हल्ले केलेच नाहीत असं सांगतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी अमेरिकेतल्या अणूसंशोधन-संग्रहालयातल्या ब्रेनवॉशी, देशप्रेम-ताप (jingoist) वातावरणातही 'अणूबाँबशिवायही लवकरच जपानने शरणागती पत्करली असती,' अशा अर्थाचे माहितीपट आणि फलक दिसतात.

खाल्या घरचे वासे मोजणारी मंडळी सगळीकडेच असतात हो. ( उदा. भारतातील टिपीकल सेक्युलर समाजवादी - ह्यांना आयसीस संघा पेक्षा चांगली वाटते ).
ही लोक प्रचंड व्होकल असतात, त्यामुळे त्यांचा आवाज मोठ्ठा असतो आणि त्यांना पैसे पुरवणारे लोक असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFL

तुम्ही या संग्रहालयांमधलं काहीही बघितलेलं नाही आणि अमेरिकेत अशा ठिकाणी काय पातळीवर देशप्रेमताप चढलेला असतो, खरंतर या संग्रहालयांसाठी पैसा कुठून येतो या कोणत्याही गोष्टींची तुम्हाला कल्पना नाही एवढंच समजलं. बाकी नेहेमीप्रमाणेच, चालू द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझ्याकडच्या किंचित माहितीची भर टाकत आहे.
जपानची आर्थिक ताकत, लढाय्चा दारुगोळा, रसद ही सतत क्षीण होत चाललेली होती. जपानचा पराभव तसाही निश्चित होता.पण त्यासाठी नक्की किती अमेरिकन जवानांचे प्राण गमवावे लागतील हे समजत नव्हतं. हरणार्‍या युद्धातल्या हरेक लढाईतही जपान कामिकाझे (आत्मघाती हल्ले) करत समोरच्याला किती भयानक नुकसान पोचवू शकतो हे ओकिनावा बेटावरच्या लढाईवरुन दिसलेलं. ते प्रमाण अचाट-अफाट होतं.
जपाननं शरणागती पत्करण्यासाठीचा एक मार्ग म्हणजे तोवर शांत असलेली यू एस एस आर (म्हंजे रश्या) - जपान ही आघाडी सुरु होणं. रश्यानं हल्ला केला तर आधीच कमकुवत झालेली,झिजत गेलेली जपानी युद्धव्यवस्था ताबडतोब कोसळणार हे ही स्पष्ट होतं. युरोपिअन आघाडीवरचं सगळं स्थिरस्थावर झाल्याशिवाय रशिया इकडे उतरायला तयार नव्हता. (एप्रिल-मे महिन्यात युरोपात जर्मनी वगैरेंचा पराभव झाला तरी जिंकलेल्या भूभागावर पूर्ण ताबा मिळवून व्यवस्था लावणं, विद्रोह दाबणं/संपवणं हे करण्यात पुढचे दोन तीन महिने जात होते.) ९ ऑगस्टच्या आसपास आपण युद्धात यू एस एस आर नं आम्रिका-ब्रिटनला कळवलं. दरम्यान ६ ऑगस्टला आम्रिकेनं हिरोशिमावर बॉम्ब टाकला ह्तोआ, तरी उरलय सुरल्या शक्तीनिशी जपानी लढतच होते.
रश्या युद्धात उतरला तर आपण संपलो, लढणं थांबवू असच तेही म्हणत होते.
रश्यानं ठरल्याप्रमाणं ९ऑगस्टच्या आसपास जपानवर एकदम हल्ला केला उत्तरेकडून. गेम ओव्हर.
पण हे होणार हे ठाउक असतानाही अमेरिकेनं नागासाकी अजूनच मोठ्ठा अणुबॉम्ब टाकून दिलेला होता, काहिच तासांपूर्वी.
पहिला अणुबॉम्ब टाकण्याचं समर्थन नेमकं काय आहे ते ठाउक नाही. मला त्या एव्हरग्रीन वादात उतरायचही नाही.
पण दुसर्‍या अणुबॉम्बची नेमकी गरज काय होती ते मात्र समजलेलं नाही.
तो टाकून किमान काही अमेरिकन जवानांचे प्राण वाचले असंही झालं नाही म्हणतात.
जपान तरीही शरण येत होताच.(अमेरिकेचा पहिला अणुबॉम्ब हिरोशिमावर पडणे + रशिया युद्धात उतरणे ह्याचा एकत्रित परिणाम म्हणून.)
दुसरा अणुबॉम्ब हा प्रत्यक्षात आधीच मेलेल्या जपानला पूर्ण चिरडून रशियाला परस्पर अप्रत्यक्ष धमकावण्यासाठी होता, असं म्हणतात.
(कम्युनिस्ट रशिया व ब्रिटन-आम्रिका हे जरी जर्मनी-इटालीविरुद्ध एकत्र असले तरी त्यांच्यात आपसात स्पर्धा होतीच.
जर्मनीचा संपूर्ण पाडाव निश्चित झाल्यावर त्यात कडवटपणा येत गेला.)
.
.
थोडक्यात पहिला टाकणे चूक-बरोबर काय ते असेल. पण दुसरा टाकणे म्हणजे ......
असो.माझं ह्या विषयावर काहीही मत नाही.
जी माहिती आहे ती टंकली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जपानचा पराभव निश्चित होता असे मानले तरी ते हार पत्करण्यास तयार न्हवते, हा मूळ मुद्दा आहे.

२६ जुलैला जपानला सांगण्यात आले की तुम्ही बिनशर्त शरणागती पत्करा, पण त्यांनी दाद दिली नाही. (Potsdam Declaration, defining "Unconditional Surrender")
त्यानंतर पहिला अणुबाँब ६ ऑगस्टला टाकूनही जपानने शरणागती पत्करली नाही.
The Japanese Army and Navy had their own independent atomic-bomb programs and therefore the Japanese understood enough to know how very difficult building it would be. Therefore, many Japanese and in particular the military members of the government refused to believe the United States had built an atomic bomb, and the Japanese military ordered their own independent tests to determine the cause of Hiroshima's destruction. Admiral Soemu Toyoda, the Chief of the Naval General Staff, argued that even if the United States had made one, they could not have many more. American strategists, having anticipated a reaction like Toyoda's, planned to drop a second bomb shortly after the first, to convince the Japanese that the U.S. had a large supply

विकीपिडीयानुसारः

Following the atomic bombing of Nagasaki, Truman issued another statement:

The British, Chinese, and United States Governments have given the Japanese people adequate warning of what is in store for them. We have laid down the general terms on which they can surrender. Our warning went unheeded; our terms were rejected. Since then the Japanese have seen what our atomic bomb can do. They can foresee what it will do in the future.

The world will note that the first atomic bomb was dropped on Hiroshima, a military base. That was because we wished in this first attack to avoid, insofar as possible, the killing of civilians. But that attack is only a warning of things to come. If Japan does not surrender, bombs will have to be dropped on her war industries and, unfortunately, thousands of civilian lives will be lost. I urge Japanese civilians to leave industrial cities immediately, and save themselves from destruction.

I realize the tragic significance of the atomic bomb.

Its production and its use were not lightly undertaken by this Government. But we knew that our enemies were on the search for it. We know now how close they were to finding it. And we knew the disaster which would come to this Nation, and to all peace-loving nations, to all civilization, if they had found it first.

That is why we felt compelled to undertake the long and uncertain and costly labor of discovery and production.

We won the race of discovery against the Germans.

Having found the bomb we have used it. We have used it against those who attacked us without warning at Pearl Harbor, against those who have starved and beaten and executed American prisoners of war, against those who have abandoned all pretense of obeying international laws of warfare. We have used it in order to shorten the agony of war, in order to save the lives of thousands and thousands of young Americans.

We shall continue to use it until we completely destroy Japan's power to make war. Only a Japanese surrender will stop us.

ऑगस्ट १३-१४
Via Ultra intercepts, the Allies also detected increased diplomatic and military traffic, which was taken as evidence that the Japanese were preparing an "all-out banzai attack." President Truman ordered a resumption of attacks against Japan at maximum intensity "so as to impress Japanese officials that we mean business and are serious in getting them to accept our peace proposals without delay." The United States Third Fleet began shelling the Japanese coast. In the largest bombing raid of the Pacific War, more than 400 B-29s attacked Japan during daylight on August 14, and more than 300 that night.

At the suggestion of American psychological operations experts, B-29s spent August 13 dropping leaflets over Japan, describing the Japanese offer of surrender and the Allied response. The leaflets had a profound effect on the Japanese decision-making process.

दुहेरी अणुबॉम्ब हल्ला आणि रश्याचा हल्ला यानंतरही शरणागती पत्करण्यास १५ ऑगस्टच्या दुपारची वाट बघावी लागली. तिसर्‍या अणुबाँबची तयारी सुरू झाली होती आणि १९ ते २१ ऑगस्टच्या दरम्यान तो तयार होणार होता. जपानने शरणागती पत्करली नसती तर तिसरा अणुबाँबपण वापरला गेला असता, पण तो टाळला गेला. २६ जुलैपासून ते ६ ऑगस्टच्या हल्ल्यानंतर जर जपानने लगेच शरणागती पत्करली असती तर दुसरा अणुबाँबपण (कदाचित पहिलापण) वापरावा लागला नसता. पण जपानमध्ये लढायची खुमखुमी शिल्लक होती, ज्यामुळे प्रथम ६ ऑगस्टला आणि नंतर ९ ऑगस्टला अणुबाँब हल्ला झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम प्रतिसाद. यापुढे काही लिहायची गरजच नाही. इथले पुरोगामी लोक तरीही अमेरिकेला नावे ठेवत राहतीलच. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे. अमेरिकेच्या नावाने बोंबाबोंब करणे हा त्यांचा रोजीरोटीचा व्यवसाय आहे. ते तो कस्सा काय सोडतील? आणखी एक गोष्ट म्हणजे २ बॉम्ब पडूनही जपान शरणागती पत्करत नव्हते. शेवटी राजे हिरोहिटो यांनी पुढाकार घेऊन शरणागती पत्करायचा आग्रह धरला. सगळी सूत्रे टोजोच्या हातात असती तर जपानने १५ ऑगस्टलाही शरणागती पत्करली नसती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी पुण्याचे वटवाघूळ,आयाळ वाढलेला सिंह आणि जिभल्या चाटणारा बोका ही इतर नावे आहेत.भविष्यात नव्या मराठी संकेतस्थळांवर मला "दोन मदारींचा उंट","लांब मानेचा जिराफ","जाड कातडीचा गेंडा" आणि "दाट केसांचे अस्वल" ही नावे घ्यायची आहेत. ही नावे कॉपीराईटेड आहेत.

च्यायला काहीही कुणालाही आवडलं नाही तर मधे उगाच "पुरोगामी" आणू नका हो!
कुठेही काहीही झालं तरी पुरोगामी!
---

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहितीपूर्ण प्रतिसाद.
आभार.बरीच नवीन माहिती मिळाली.
आणि लोकं पोतडीतून कोणती आणि किती माहिती काडह्तील ह्याचा नेम नाही,
त्यामुळं माझं काही मत नाही ह्या विषयावर हे मी जाहिर केलं होतं. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही प्रतिसाद पुर्ण वाचला नाही बहुदा. मी जपान धुतल्या तांदळचे नव्ह्ते असे म्ह्टले आहे. युद्धात नुकसान अपेक्षित आहे हे देखिल म्ह्टल आहे. राहीली गोष्ट आतल्या बातमिची तर खाली दिलेला विडिओ पुर्ण बघा म्हणजे ते समजेल. आणि अण्वस्त्राचा वापर पहिले जपानने केला असता तरी त्यांचा इतकाच निषेध किंबहुना जरा जास्तच निषेध नोंदवला असता.

https://www.youtube.com/watch?v=9-WnLNLe3sk&index=4&list=FLDKVUGu-l_1Drz...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~ योगी

अण्वस्त्राचा वापर पहिले जपानने केला असता तरी त्यांचा इतकाच निषेध किंबहुना जरा जास्तच निषेध नोंदवला असता.

जपान ला जर आधी अणुबॉम्ब तयार करता आला असता तर ते दोन वर थांबले असते का सर्व जग जाळुन मोकळे झाले असते?
तुम्ही निषेध करायला जन्मालाच आला नसता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

युद्धनीतीच्या दृष्टिने ते साजेसंच होतं. देअर चिकन्स केम होम टू रूस्ट.

सहमत. जपानवर अमेरिकेने अणुबाँब टाकला, याला माझा पाठिंबा आहे. युद्धात आणि प्रेमात सर्वकाही चालते, असे म्हणतातच ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उदयभाऊ, जोरदार सहमत.

क्रूरपणे प्रतिसाद दिला की त्याचा कसा परिणाम होतो ते पहा. दोन बाँब पडल्यावर जपान ने पॅसिफिस्ट कॉन्स्टिट्युशन स्वीकारली.

क्रौर्य हे सिरियसली अत्यंत उपयुक्त मूल्य आहे. Highly undervalued. अतिउपेक्षित.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्रौर्य हे सिरियसली अत्यंत उपयुक्त मूल्य आहे.

क्रौर्य वेगळे आणि स्वतःच्या बचावाकरता घेतलेल्या ड्रास्टिक स्टेप्स वेगळ्या.
क्रौर्य नकारात्मकच आहे. उदा- वाघ हा क्रूर असतो. सिंह तत्सम प्राणी जिथे फक्त भूक भागविण्याकरता शिकार करतात तिथे वाघाबद्दल असे म्हटले जाते की तो उगाचच कारणाशिवायही शिकार करतो.
.
तुम्हाला क्रौर्य म्हणायचे नसून कदाचित बचावात्मक अंगिकारलेली हिंसा म्हणावयाचे आहे. आणि ते मूल्य मान्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही झाले तरी क्रौर्याची उपयुक्तता ही आहेच की. भले मग एकासाठी उपयुक्त असेल ते दुसर्‍यासाठी नसेलही. सो व्हॉट? युनिव्हर्सली उपयुक्त असेल तरच ते उपयुक्त असे तर नाही ना?

( हा फक्त युटिलिटी सांगायचा प्रयत्न आहे. हे मूल्य कितपत अ‍ॅक्सेप्टेबल आहे हे समाजासाठी सद्यकालीन परिस्थितीत कोणती मूल्ये आधारभूत आहेत त्यावर ठरते. त्यामुळे हे मूल्य उपयुक्त आहे असे सांगितले म्हणजे त्याची सद्यकालीन स्वीकार्यता अधोरेखित केलीय असे आजिबात नाही. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

क्रौर्य हे मानसिक आनंद देते असे तुम्हाला म्हणायचे आहे की त्याची अन्य युटिलिटेरिअन व्हॅल्यु आहे, जी मी मिस करते आहे?
उदा. - युद्धखोरीमुळे लोकसंख्या आटोक्यात रहाणे वगैरे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मानसिक आनंद- मेबी, येस. नाकारत नाही पण मुख्य पैलू हा नव्हे.

बाकी युटिलिटॅरियन व्हॅल्यू आहेच की. क्रूरतेमुळे काही समाजघटक रिसोर्सेसवर दावा सांगत नाहीत आणि काँपिटिशन कमी होते, अर्थात बळी तो कान पिळी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शक्य आहे.
कोकरु आणि वाघ दोन्ही एकाच निसर्गात घडले , एकाच पृथ्वीवरती नांदतात आणि तरीही दोघे किती भिन्न आहेत हे विलिअम ब्लेकच्या २ कवितांमधून जाणवते.
- कोकराची कविता आहे Song of innocence
- वाघाची - Songs of Experience

पैकी वाघाची अतिशय आवडते. विशेषतः त्यातील क्रूर स्वभावाचे वर्णन.
___
खरे आहे बाबा क्रौर्य हे मूल्यच आहे. mesmerizing & same time repulsive ...... Smile

'Little Lamb who made thee
Dost thou know who made thee
Gave thee life & bid thee feed,
By the stream & o'er the mead;
Gave thee clothing of delight,
Softest clothing wooly bright;
Gave thee such a tender voice,
Making all the vales rejoice:
Little Lamb who made thee
Dost thou know who made thee
______
Tyger Tyger. burning bright,
In the forests of the night:
What immortal hand or eye,
Could frame thy fearful symmetry?

In what distant deeps or skies.
Burnt the fire of thine eyes!
On what wings dare he aspire!
What the hand, dare sieze the fire?

And what shoulder, & what art,
Could twist the sinews of thy heart?
And when thy heart began to beat,
What dread hand? & what dread feet?
What the hammer? what the chain,
In what furnace was thy brain?
What the anvil? what dread grasp,
Dare its deadly terrors clasp!

When the stars threw down their spears
And water'd heaven with their tears:
Did he smile his work to see?
Did he who made the Lamb make thee?
Tyger, Tyger burning bright,
In the forests of the night:
What immortal hand or eye,
Dare frame thy fearful symmetry?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजूनेक उदा. मेलियन डायलॉग.

अथेन्स व्हर्सेस स्पार्टा या रेड्यापाड्यांच्या झुंजीत अथेन्सजवळचे मेलॉस नामक छोट्टेसे बेट आम्ही न्यूट्रल राहणार म्हणाले, कसे चालावे ते? अथेन्सवाल्यांनी बेटाला वेढा दिला. निगोशिएशन्स झाली, मेलॉसवाले म्हणाले की नैतिकदृष्ट्या आम्हांला असे न्यूट्रल राहण्याचा हक्क आहे. अथेन्सवाले म्हणाले की नीती-अनीती वगैरे बाता फक्त बरोबरच्यांतच चालतात. द स्ट्राँग डू व्हॉट दे कॅन & द वीक सफर व्हॉट दे मस्ट....

मग काय, त्यांनी मेलॉसमधील सर्व धडधाकट पुरुषांना ठार मारले, बायका, लहान पोरे आणि म्हातार्‍यांना गुलाम केले आणि अथेन्समधून ७०० लोक तिथे आणून वसवले. सो मच फॉर अथीनियन डेमॉक्रसी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी लॉब्संग रांपा ची पुस्तके वाचली आहेत त्यांवर बंदी होती म्हणे का तर चीनी लोकांनी तिबेटीअन लोकांवरती केलेल्या अत्याचारांचे भयानक वर्णन होते.
पैकी एक वर्णन आठवते - लामांचा एका गाडीला एक पाय अन दुसर्‍या गाडीला दुसरा पाय असे बांधून त्या गाड्या चालवत म्हणे.
याइक्स Sad
___
तिबेटीयन लोक बुद्धाच्या करुणेचा संदेश देणारे , अवलोकितेश्वर क्वान यिन सारख्या परोपकारी देवतांचे उपासक ..... त्यांच्यावर त्या चिनी कॄरकर्म्यांनी राज्य केलच ना? Sad
तेव्हा क्रौर्याला उपयुक्तता मूल्य आहे - हे मान्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चांगले संकलन!
येत रहा लिहित रहा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद ऋशिकेश

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~ योगी

मतभेद काय होतच रहातात.
पण येत रहा, लिहीत रहा...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय डाम्बिसा, तुमच्यासारखे आहेत म्ह्णुनच चर्चेला वेगळे आयाम मिळतात. आणि मतभेद हवेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~ योगी

युद्धाचे स्वरुप बदलतय. खालील लिंक बहुदा आपल्या प्रश्नाचं उत्तर देउ शकेन.
http://www.huffingtonpost.com/michael-vlahos/is-the-world-falling-apart-...
बाकी जगाला अक्कल शिकवणार्‍या अमेरिकेकडे सर्वधिक शस्त्रसाठा आहे तो का? जोवर सगळेजण अण्वस्त्र सोडत नाही तोवर मानवजात सुरक्षित नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~ योगी

जोवर सगळेजण काही देश अण्वस्त्र सोडत नाही बाळगून आहेत तोवर मानवजात सुरक्षित नाही आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"जेव्हा काही वाईट करायचे असते तेव्हाच ताकदीची गरज भासते नाही तर प्रेमाने जग पण जिंकता येते" या विचाराचे उपयोग मुल्य सरत चालले आहे याचा प्रत्यय वरिल वाक्यावरुन सहज येतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~ योगी

ती बुद्धिस्ट तत्व थिअरी मध्ये बरी पडतात ओ. त्यांचं अवलंबन करायला गेलं की आपला तिबेट होतो Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"जेव्हा काही वाईट करायचे असते तेव्हाच ताकदीची गरज भासते नाही तर प्रेमाने जग पण जिंकता येते" या विचाराचे उपयोग मुल्य सरत चालले आहे याचा प्रत्यय वरिल वाक्यावरुन सहज येतो.

अगदी. तुम्ही तसा अर्थ काढू शकता.

दुसरा अर्थ हा आहे की - जेव्हा काही वाईट घडण्यापासून प्रिव्हेंट करायचे असते तेव्हा सुद्धा ताकदीची गरज भासते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जेव्हा काही वाईट घडण्यापासून प्रिव्हेंट करायचे असते तेव्हाच सुद्धा ताकदीची गरज भासते.

"कोण पुसे अशक्ताला?
रोगीसे बराडी दिसे.
कळा नाही, कांती नाही
शक्तीबुद्धी दुरावली!

दास म्हणे ऐसे करा,
सदा मारुती हृदयी धरा!"
-समर्थ रामदास

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रस्तुत लेखात हिरोशिमाचा आधार फक्त प्रसंगाचे औचित्य म्हणुन घेतला होता जो फक्त २०%च आहे. बाकी ८०% भाग हा अण्वस्त्रांची सद्य स्थिती सांगण्याचा प्रयत्न होता. परंतु ईथे झालेली चर्चा ही ८०%

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~ योगी

हिरोशिमा हा इतिहासच ना? आणि पुरंदर्‍यांचे पारितोषिक हे वर्तमान आहे

तुम्ही लेख विश्लेषणात्मक लिहीत आहात तर त्यात तुमचे मत/ओपिनियन आला आणि तो स्ट्राँग असेल तर असे होते - "कपटी" मुळे तुम्ही त्या पॉइंटला पिक अप केले जाईल याची व्यवस्था तुमच्या नकळत करून ठेवलीत Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऋ.जो. यांच्या पंचांगानुसार तुम्ही "तु" राशिचे असावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~ योगी

काय राव, लेखावरच्या प्रतिक्रिया तुम्हाला अपेक्षित का आल्या नाहीत याचे जरा उदारमतवादी (म्हणजे जरा डिप्लोमॅटिक भाषेत लिहीलेले) स्पष्टीकरण दिले तर तुम्ही माझीच रास काढून राहिलात :). हे ऋ जो कोण मला माहीत नाही. तेव्हा ही तू रास काय असते तुम्हीच सांगा.

मात्र ट्रूमन कपोती म्हणून एक होता. त्याबद्दल काहीतरी ऐकताना चुकून ट्रूमन कपटी झाला नाही ना? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऋ.जो. (ऋषिकेश जोशी) यांना तुम्ही मराठी चित्रपटसृष्टी आणि टी.व्ही. मालिकांतुन पाहिले असेलच. लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार. त्यांनी जे पंचांग बनवलंय त्यात शेष(मेष), तु (तुला) वगैरे राशी आहेत. त्यातली 'तु' रास सर्व गोष्टींसाठी समोरच्याला जबाबदार धरते. जसे की तु(म्ही) असे लिहीले म्हणुन तसे झाले वगैरे. Wink (मला खात्री आहे तुमची विनोद बुध्दी फार उच्च प्रतीची आहे)
बाकी "हॅरी ट्रुमन" बद्द्ल काहीही गल्लत नाही झालेली असं मी तुम्हाला शपथेवर लिहुन देउ शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~ योगी

ते असो, पुढले लेखन कधी येतेय? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!