सर आले दुरुनी (विडंबन)

(चाल: स्वर आले दुरुनी )

सर आले दुरुनी
गेल्या सगळ्या त्या मैतरणी ||

खुर्चीत उसासे साऱ्यांचे
होस्टेलमधील त्या पोरांचे
कुजबुजही नव्हती पोरींची
धुसफुसही नव्हती कोणाची
ऐशा रमलेल्या त्या स्थानी ||

वर्गात मनोरथ किति रचले
गालावर हासू पाघळले
काही हृदयातचि ते घुसले
बाणांतुनी स्पंदन जाणवले
झेली सुंदर मैत्रीण कुणी ||

प्रतिसाद सरांचा तो न कळे
अवसान परी का पूर्ण गळे
संधीच न मिळता पोरांचे
घबराट पुन्हा सर ते दिसले
चहाडी चुगली का केली कुणी ||

(पूर्व प्रसिद्धी- शब्दगाssरवा २०११)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुमचे विडंबन पघुन आम्हाला आमच्या स्वर आले दुरुनी ची आठवन झाली. असो गेले ते दिन गेले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

झकास ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला पहिली ओळ वाचून कविता काहीतरी अशी असेल असं वाटलं होतं...

सर आले दुरूनी
विझल्या सगळ्या त्या सिग्रेटी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेगळ्याच विषयावरचे विडंबन. झकास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही