कर्म माणसाचे, दोष "कर्त्याला"!!

माणसाची देवाला विनंती:
असूनही रणरणत्या उन्हाची वेळ
का चालवलायस तू पावसाचा खेळ?
बिघडलाय सगळा ऋतूंचा मेळ
सांग नेमकी कधी आहे पेरणी ची वेळ?

देवाचे सडेतोड उत्तर:
माणसा तू वृक्षतोड करताना बघितला नाहीस काळवेळ
सिमेंट चे जंगल उभारताना तू ठेवला नाही कसलाच ताळमेळ
आलाय तुझ्या अंगाशी तुझाच हा खेळ
बंद कर मला दोष देण्याचा तुझा हा पोरखेळ

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अर्र!
सारी पृथी व ऋतूचक्रसुद्धा देवच सांभाळतो असे मी काही आस्तिकांकडून ऐकले होते.
नी हे काय?
देवानेही आपली जबाबदारी एखाद्या कारकूनासारखी दुसर्‍यावर (मर्त्य मानवावर) ढकलावी! हा हन्त हन्त!

तरी मी सांगत असतो एखादी गोष्ट करणे कितीही आवडती असो, एकदा का काम म्हणून हातात घेतली की त्याचे हे असे होते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ऋषी वचन आहेच "तेन त्यक्तेन भुञ्जीथा" "न कर्म लिप्यते नरे" त्याग सहित भोग केल्याने, कर्म बंधनात मनुष्य अटकट नाही. अन्यथा कर्मांचे भोग भोगावेच लागतात. उदा: एक झाड तोडल्या वर आपण दुसरे लावले नाही, अर्थात निसर्गाकडून आपण जे घेतले आहे, ते त्याला परत केले नाही तर त्याचे परिणाम भोगण्या शिवाय गत्यंतर नाही. यालाच देवाच्या कामात ढवळाढवळ म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

करम निमिषाचे दोष वाचकाला... (खोडसाळ अथवा मिळणारी इतर श्रेणी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!