हुंडा एक रास्त पध्दत

हुंडा घेणे (आणी बहुदा मागणेही) कायद्याने गुन्हा आहे. हुंडा देउ नका, घेउ नका.

पण मज वाटते ती एक रास्त पध्दत होती. किंबहुना मुलीचा हक्क कुंटुंबाच्या संपत्तीवर सर्वात आधि आहे हे अधोरेखीत करणारी प्रथा होती. सर्वसाधारणपणे संपत्तिचे हस्तांतरण हे त्याची मालकी असलेल्या व्यक्तीच्या इछ्चेने त्याच्या म्रूत्युपुर्व अथवा म्रूत्युनंतर होते. परंतु नॉमीनी जर स्त्रि असेल तीचे लग्न होतानाच तिला तिचा हीस्सा मिळण्याची केलेली व्यवस्था म्हणजे हुंडा पध्दती होय.

यामधे सदरील स्त्रिचे आर्थीक हितसंबंध जपण्याची अतिशय चोख व्यवस्था या प्रथेत केलेली दिसत आहे. व नॉमीनी स्त्रिच्या हिश्याची संपत्ती (लवकरच, अत्यंत लहान वयात) तिच्या नावावर* होणे बंधनकारक झालेलं दिसत आहे. ही गोष्ट कुटुंबातील पुरुष सदस्यांबाबत मात्र झालेली जाणवत नाही. अर्थात हा अन्याय नाही कारण जेंव्हा ते स्त्रियांसोबत लग्न करत त्यावेळी सोबत हुंडा येतच असे व त्यांवरही अन्याय होत नसे. एकंदरच हुंडा पध्दती मला आपल्य संस्कॄतीमधील अतिशय समतोल मानसिकतेच्या हुशारीची निर्मीती वाटते. दुर्दैवाने काळासोबत काही वाइट चालीरीती यात घुसल्या अन होत्याचं न्हवतं झालं... काय म्हणता ?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

ह्म्म! वेगळाच विचार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

धन्यवाद ब्रिंदाजी आपण व ऋषिकेश यांनी प्रतिवाद (तातपुरता सापडत) नसल्यास कसलाही कावा न करता समतोल प्रतिसाद लिहले याबद्दल आभारी आहे. इतरांनी सुधा काही रास्त मुद्दे उपस्थीत केले जे वाचुन बरे वाटले. पण... काही सदस्य म्हणजे ना.... चिकटुन असतात जुनाट कालबाह्य विचारसरणीला... आणी मुद्दे मिळाले नाहीत की वैयक्तीक शेरेबाजी सुरु करतात त्याचेही प्रत्यंतर आले. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

नाय पटत.

"पित्याच्या संपत्तीचा हिस्सा" वगैरे उदात्त हेतू असता, तर:

- हुंड्याची रक्कम ठरवायचा गणिती फॉर्म्यूला असायला हवा होता (उदा. एकाला तीन मुली आणि एक मुलगा आहे, तर हुंड्याची रक्कम बापाच्या नेट वर्थच्या २५% पेक्षा जास्त नको)
- हुंड्याच्या रकमेवर लग्न झालेल्या स्त्रीचा अधिकार असायला हवा होता, कारण ती तिला मिळालेली तिच्या बापाची संपत्ती आहे. सासू-सासरे तर सोडाच, पण नवर्‍याचाही त्यावर अधिकार नसायला हवा होता.

दुसरं म्हणजे, मुलीच्या लग्नानंतर पित्याची संपत्ती वाढली किंवा कमी झाली, तर पित्यापश्चात झालेल्या मुलीचा त्यावर अधिकार असावा की नसावा?

जर एखाद्याला मुली आणि मुलं दोन्ही असतील, तर मुलींना हुंड्यारुपात संपत्तीवर "राईट ऑफ प्री-एंप्शन" आणि मुलांना "रेसिड्युअल इस्टेट" असा त्याचा अर्थ होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मध्यंतरी मुलीला माहेरच्या संपत्तीत वाटा मिळण्याच्या निर्णयाचे स्वागत करणार्‍या धाग्यावरही हीच चर्चा केली होती. अशिक्षित/कमी शिकलेल्या, घरकामाशिवाय काहीही इतर कौशल्य नसलेल्या बाईला पारंपारिक असो वा कायदेशीर, माहेरच्या संपत्तीतला एक पैसा तरी पाहायला मिळणार आहे का?
पारंपारिक असो वा आता नवा सरकारी; हुंडा वाईटच.
लग्नासारख्या गोष्टी आर्थिक बाबींवर बेतणे हेच मुळात चूक असताना हुंड्याचे समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही. मुळात माझा तर कोणत्याही वारसांना संपत्ती देणे या प्रकारालाच विरोध आहे.
पाश्चात्त्य लोकांमध्ये असे काही दिसतात की बाप तालेवार असला तरी पोरगा/पोरगी शिक्षण संपलं की आई-बापाचं काहीही घेत नाहीत. आपल्याकडे मात्र सगळं पैशाभोवती फिरतं आणि आव मात्र फार स्पिरिच्युअल लोक आहोत असा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यकाळी विनीमयाचे चलन हे नक्किच स्थिर नसणार त्यामुळे सुवर्णमुद्रा वगैरे सोडले तर इतर बाबींचा फॉर्म्युला जरा कठीन आहे. तसेच कोनाला किती हिस्सा द्यावा हे घरातील जबाबदार व्यक्तीच ठरवत असणार त्यामूळे शक्य आहे मुलीला वाटा कधी कमी तर कधी जास्त मिळणार. त्यामुले फॉर्म्युला असणे अवघड आहे पण जर शोध केला तर ढोबळमनाने कलात्मक संस्कृतमधे कदाचीत काही सापडण्याची शक्यता वाटते. आम्हाले फकस्त अर्ध राज्य अन राजकन्या Smile एवडाच फॉर्मयुला माहित आहे Biggrin Wink नुसती राजकन्या काय कामाची Smile

दुसरं म्हणजे, मुलीच्या लग्नानंतर पित्याची संपत्ती वाढली किंवा कमी झाली, तर पित्यापश्चात झालेल्या मुलीचा त्यावर अधिकार असावा की नसावा?

हे संपुर्णपणे संपत्तीधारकाच्या इछ्चेवर अवलंबुन आहे. आणी ते मुलीच्या हुंडा अधिकारा अंतर्गत येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

आम्हाले फकस्त अर्ध राज्य अन राजकन्या (स्माईल) एवडाच फॉर्मयुला माहित आहे (दात काढत) (डोळा मारत) नुसती राजकन्या काय कामाची (स्माईल)

अगदी बरोबर! राजकन्या दिली, नि तिला पोसण्याची काही तजवीज करून नाही दिली, तर त्या राजकन्येचा पांढरा हत्ती नाही होणार?

हे म्हणजे, बक्षिसात मर्सिडीज़ तर मिळाली, पण पेट्रोल परवडत नाहीये, नि मेंटेनन्सपायी दिवाळे काढायची पाळी आलीये, अशातली गत. पाहिजे कोणाला असले बक्षीस? त्यापेक्षा, ठेवा तुमची ती हाय मेंटेनन्स मर्सिडीज़ तुम्हीच - बोले तो, तुमच्याकडेच! आम्हाला लूना बरी. च्यायला, घरचे झाले थोडे, नि होऊ पाहणार्‍या सासर्‍याने धाडली घोडी! (किंवा, मान ना मान, मी तुझा सासरा?)

(ते 'नेव्हर लूक अ गिफ्ट राजकन्या इन हर माउथ' वगैरे सगळे झूट आहे, बकवास आहे!)

----------

('म्हणजे राजकन्या ही तुमच्या लेखी निव्वळ विनिमयवस्तू आहे तर!' वगैरे संभाव्य आरोपांना गब्बरष्टाइल नुसतेच मांडून मोकळे होऊन सोडून देण्याऐवजी उत्तर देण्याचा आगाऊ प्रयत्न: अहो, हे तर केवळ टिप ऑफ द ऐसबर्ग आहे! देश (किंवा राज्य) म्हणजे देशातील (किंवा राज्यातील) दगड, धोंडे नि माती नव्हे. देश (किंवा राज्य) म्हणजे देशातील (किंवा राज्यातील) लोक. इथे निम्म्या राज्यातल्या जनतेच्या विनिमयाची गोष्ट चाललीये, एका फुटकळ राजकन्येचे काय घेऊन बसलात! निम्म्या राज्याच्या जनतेपुढे तुम्हाला एक राजकन्या महत्त्वाची वाटते काय? रॉयालिष्ट कुठले(/ल्या)!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठीत लिहला तर छानच. कारण माझ्या प्रतिसादातील कोठलेतरी र्‍याण्डम वाक्य औट-ऑफ-कॉण्टेक्ष्ट कसेही करून एवीतेवी जिथे डकवायचेच ठरवुन त्यावर प्रतिवाद करणे म्हणजे....

....असो, तुम्हाले कोणताही बाप आपल्या मुलीला राजकुमारी समजत नाही असे वाटते काय ? ****ष्ट कुठले(/ल्या)!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

लग्नासाठी हुंडा मागण्याचा व तो देण्याचा विकल्प अवश्य असावा

-रब्बर सिंग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते वाक्य 'लग्नासाठी हुंडा मागण्याच्या व तो देण्याच्या विकल्पाचे मी समर्थन करतो.' असे पाहिजे.

'अरुणजोशी' अशी एक श्रेणी असावयास हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'गब्बर होणे' याकरिता रब्बर सिंग हे नाव बरोबर वाटत नाही. आयमाय स्वारी पण गब्बर तुझे नावच असे आहे त्याला मी काय करणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'गब्बर होणे' याकरिता...

कोणाला गब्बर झाला म्हणायचा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बर होणे म्हणजे धनसंपत्तीसंदर्भाने हो. जन्मणे न्हवे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माहितीकरिता धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रीमंत होणे = खाऊन पिऊन सुखी होणे = अंगे सुजल्यासारखी दिसणे = जाड दिसणे = मोठे पोट असणे = गर्भार होणे = गब्बर होणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

रोचक!

असा विचार यापूर्वी केला नव्हता कधी. शोलेतील महामुहिम (की महामहोपाध्याय काय जे असेल ते) श्री श्री श्री गब्बर सिंग रामगढ़वाले यांच्यावरून हे नाव पडलं असा आमचा जुना समज होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अजो- कै च्या कै फेकताय. ही असली शब्दोत्पत्ती नक्की नाहीये गब्बर ची

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवाढव्य शरीयष्टी/संपत्तीच्या मालकाला बघून घाबरलेली आई आपल्या मुलाला 'गप बरं. रडू नकोस. सिंग आलाय,' असं म्हणते. ते गप बरंचं पुढे गब्बर झालं.
उदा.
गप्प बरं
गप बरं
गब बरं
गब्बर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोजिक ठीक आहे पण हुंडा मुलीला न मिळता मुलीच्या सासर्‍याला मिळतो एवढाच तपशीलात थोडा फरक आहे. Smile

-----
चित्रपट : आम्ही जातो आमुच्या गावा.

श्रीकांत मोघे (वडिलांस): बाबा, मला हुंडा घेणं मान्य नाही.
दत्ता भट (वडील): हो का? छान छान !! पण महाशय, हुंडा आपण घेणार नाहीत; मी घेणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बाकी हुंडा, दिला बापाने... गेला बापाकडे... लॉजीक योग्यच. पण मुलीलाच दिला. त्याकाळी एवडी स्पर्धात्मकता, फ्लॅट संस्कृती, मी माझे टाइप विभक्त कुटूम्ब पध्दती वगैरे न्हवतीच त्यामुळे... पैसा मुलीच्या एका कुटूंबातुन मुलीसोबत दुसर्‍या कुटुंबाकडे गेला. मुलगी गेली नसती तर गेला असता काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

या प्रतिसादाला खोडसाळ श्रेणी देणार्‍यांचे हसू येते.

म्हणजे जॅकी चॅन यांच्या. आमच्या नव्हे. (वैसे त्याचेही येतेच तो भाग अलाहिदा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वरकरणी पाहता हा धागा केवळ वावदूक आणि आत्तापर्यंतच्या इतिहासाला आणि अनुभवाला डोक्यावर उभे करणारा वाटू शकेल पण तोहि अगदी निरर्थक आहे असे नाही

भारतीय धर्मशास्त्रामध्ये 'स्त्रीधन' अशी एक कल्पना आहे. मनुस्मृतीच्या ९व्या अध्यायामध्ये त्याचे काही विवेचन आहे. स्त्रीधन म्हणजे काय हे श्लोक ९.१९४ मध्ये असे सांगितले आहे:
अध्यग्न्यध्यावाहनिकं दत्तं च प्रीतिकर्मणि।
भ्रातृमातृपितृप्राप्तं षड्विधं स्त्रीधनं स्मृतम्॥
विवाहसमयी अग्निच्या साक्षीने, पित्याने दिलेले, पतीने प्रेमाने दिलेले, भाऊ, माता आणि पिता ह्यांच्याकडून मिळालेले असे सहा प्रकारचे 'स्त्रीधन' असते.

हा कोणालाहि पटेल असा नियम सांगितल्यानंतर मनुस्मृति ह्या स्त्रीधनावरच्या मर्यादा सांगते. हे स्त्रीधन स्वतःला हवे तसे वापरायचा स्त्रीला अधिकार नाही.
न निर्हारं स्त्रिय: कुर्यु: कुटुम्बाद्बहुमध्यगात्।
स्वकादपि च वित्ताद्धि स्वस्य भर्तुरनाज्ञया॥ ९.१९९
मोठया कुटुंबातील स्त्रियांनी स्वतःच्या धनामधूनहि पतीच्या आज्ञेशिवाय खर्च करू नये.

(स्त्रीच्या आयुष्यात अन्य कुटुंबियांनी तिच्या स्त्रीधनावर नजर ठेवू नये. तिच्या मृत्यूनंतर ते धन कोणास मिळावे इत्यादि अन्य नियम आहेत पण येथे त्यांचा उल्लेख करीत नाही.)

लग्नाच्या संदर्भात दिला जाणारा 'हुंडा' ह्या वरच्या स्त्रीधनाच्या व्याख्येत बसू शकला तर धाग्यात काही जीव आहे असे म्हणता येईल पण तसे वाटत नाही. 'स्त्रीधन' ठरण्यासाठी ते धन पित्याने कन्येला अग्निसाक्षीने विवाहसमयी द्यायला हवे. 'हुंडा' बहुधा लग्नापूर्वी वा नंतर, पण मुख्य विवाहविधीबाहेर, देवाणघेवाणीचा व्यवहार म्हणून दिला-घेतला जातो. तोहि कन्येला न दिला जाता वराला वा त्याच्या वडिलधार्‍यांना दिला जातो. त्याला 'वरदक्षिणा' असे संस्कृत नावहि दिलेले आहे जेणेकरून त्याचा 'उकळणी' वा 'लग्नासाठी लाच' हा दुर्गन्धियुक्त अर्थ जाऊन त्याला एक संस्कारपूत 'पावित्र्य' चिकटले आहे असे देणारे आणि घेणारे दोघांसहि वाटते.

कसाहि प्रयत्न केला तरी सध्याच्या हुंडयाचे उदात्तीकरण होणे अशक्य वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनुस्मृती समोर आपलं काहीच चालत नसल्याने संपुर्ण पास... किंबहुना "मनुस्मृती" माझ्या धाग्याचा आधार दुरुनही होऊ शकतो हे मी स्वप्नातही कल्पु शकत नाही. असो, कसाहि प्रयत्न केला तरी सध्याच्या हुंडयाचे उदात्तीकरण मी करणेही अशक्य वाटते. मला ही प्रथा स्त्रियांसाठी असावी त्यांचे हितसंबंध जपले जावेत म्हणून असावी असे सहज विचार करता वाटुन गेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

हुंडा नेहमी मुलाची लायकी पाहून दिला जातो. पण कधी कधी मुलगा मुलीच्या रुपाकडे बघून वेडा होतो व कमी हुंडा घेऊन लग्नाला तयार होतो अशी असंख्य उदाहरणे पाहण्यात आहेत. या गोष्टीमुळे आणि अशा इतर काही गोष्टींमुळे मुलाची किंमत बाजारभावाप्रमाणे होत नाही. माझ्यामते लग्नाळु मुलांसाठी सरकारने रेडी रेकनरप्रमाणे दर जाहिर करावेत. उदा. डॉक्टर असेल तर १५ लाख, इंजिनिअर असेल तर १० लाख, सरकारी अधीकारी असेल तर २५ लाख वगैरे वगैरे (टीप : हे दर चुकीचे असल्यात कृपया दुरुस्त करावेत.) शिवाय लग्न झाल्यावर मुलीला मुलं होतात त्यांचा खर्च, त्यांचे शिक्षण व त्यानंतर त्यांची लग्ने होईपर्यंतचा खर्च देखील वधूपित्याकडून वसुल केला जावा. जर मुलीला मुलगा झाला व त्याने प्रेमविवाह किंवा मुलाशीच विवाह न केल्यास ह्या खर्चाची भरपाई त्याच्या होणार्‍या सासर्‍याकडून चक्रवाढ व्याजाने केली जाऊ शकते म्हणून मुलगा जन्माला घालणार्‍या स्त्रीच्या वडीलांनी दिलेला हुंडा त्यांना नातवाच्या लग्नात परत करण्याचा देखील पर्याय विचारात घेता येऊ शकतो. अजून काही सुचवता येईल काय जॅकी चॅन साहेब !!

टीप : वरील सर्व लिखाण उपरोधीक आहे हे तुम्हाला समजले असेलच. तसेच माझे लग्न झालेले असल्यामुळे माझा हुंडापद्धतीला तीव्र आक्षेप आहे असे नोंदवितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसेच माझे लग्न झालेले असल्यामुळे माझा हुंडापद्धतीला तीव्र आक्षेप आहे असे नोंदवितो.

हे आवडले. लग्न झाल्याने माझाही हुंडापद्धतीला विरोध आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलीचा हक्क कुंटुंबाच्या संपत्तीवर सर्वात आधि आहे

का?

नॉमीनी जर स्त्रि असेल तीचे लग्न होतानाच तिला तिचा हीस्सा मिळण्याची केलेली व्यवस्था ...

लग्न ही अशी काय खास गोष्ट आहे?

सदरील स्त्रिचे आर्थीक हितसंबंध जपण्याची अतिशय चोख व्यवस्था ...

हुंडा मिळाल्यामुळे चोख व्यवस्था कशी काय लागली?

कसाहि प्रयत्न केला तरी कोणत्याही प्रकारच्या हुंडयाचे उदात्तीकरण होणे अशक्य वाटते.

---

रेडी रेकनरप्रमाणे दर - Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लग्न ही अशी काय खास गोष्ट आहे?

वेल, आता जर कोणी सगळी गंमत आधीच केली असली तर हा प्रश्न व्हॅलिड आहे. पण नसली तर लग्न लै खास गोष्ट आहे.
-----------
मला हे माहित आहे कि पाणी पिणे, जेवण करणे जीवनावश्यक आहे, पण असं खास वैगेरे नाही.
१. प्रत्येक जेवण केल्यावर (म्हणजे केले म्हणून) कायमचे अन्य घरी जात नाहीत.
२. प्रत्येक जेवण केल्यावर घराचे वाटे करायची मागणी जोर धरत नाही.
३. जेवण केले म्हणून लेकरे होत नाहीत.
४. प्रत्येक जेवण केल्यामुळे एकदम अनोळखी घरात बापाचे घर असल्यासारखे राहायला मिळत नाही.
५. प्रत्येक जेवण करण्याचे पंजीकरण सुद्धा करत नसावेत.
६. प्रत्येक जेवण करण्यासाठी शेकडो पाहुण्यांना निमंत्रित करत नाहीत.
अशा प्रकारे खास व आम गोष्टींतला फरक विषद होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मराठी लोकांना एकुणात पाच्कळ विनोदांबद्दल खूप आकर्षण आहे का? किंवा प्रत्येक गोष्टीत शाब्दीक किंवा कायिक कोट्या करणे ह्या बाबत अति आकर्षण आहे का?
कदाचित ह्याच प्रत्येक गोष्टीत विनोद आणण्याच्या आवडीमुळे मराठीतले हिरो हे लक्षा, अशोक सराफ, भरत जाधव वगैरे असतात. हॉलिवूड ( गेला बाजार बॉलिवुड मधले पण ) हीरो हे स्टाइलिश, मॅच्युअर वगैरे असतात पण मराठीतले सर्वात लोकप्रिय हीरो हे विदुषकासारखे चाळे करत असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"महाराष्ट्रीयन वूड राथर लूज हिज फ्रेन्ड दॅन लूज अ‍ॅन अपॉर्चुनिटी टू मेक जोक अ‍ॅट हिज एक्स्पेन्स"
- गेल्या पिढीतील एक 'मराठी' विचारवंत (तूर्तास त्यांचे नाव आठवत नाहीय).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुर्णपणे असहमत. तुमची पाच्कळ विनोदाची व्याख्या काय आहे ? तुम्ही कॉमेडी नाईटस विथ कपील सारखे टीव्ही शोज आणि क्या सुपरकुल है हम, मस्ती, ग्रँड मस्ती, हाऊसफुल, नो एन्ट्री सारखे हिंदी चित्रपट बघतच नसाल असे म्हणण्यास नक्कीच वाव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुर्णपणे असहमत. तुमची पाच्कळ विनोदाची व्याख्या काय आहे ?

जो धाग्याचा विषय होता आणि प्रतिसाद म्हणुन जो प्रश्न विचारला होता, ते सोडुन काहीतरीच निरर्थक विनोदनिर्मीती करणे ह्याला आक्षेप आहे.
विनोद आवडणे/करणे आणि प्रत्येक गोष्टीत्/ठीकाणी विनोदीच कोट्या करत रहाणे हा पाच्कळ पणा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी लोकांना विनोदामागे गंभीर तत्त्वज्ञान असते हे माहित नाही. एका अतिगंभीर तत्त्वज्ञानाला दुसरे अतिगंभीर तत्त्वज्यान काटछेद देते तेव्हा विनोद उत्पन्न होतो. विनोद हॅज टू बी नेसेसरीली बिग एक्सेप्शन.
--------------
लेखकाने हुंडाच्या टायमिंगचे समर्थन केले आहे. अदितीने खंडन केले आहे. हे खंडन अतिशय हास्यास्पद आहे. म्हणे लग्न कै खास असतं का? आमच्या बॉलिवूडच्या ८०-९०% पिच्चंरांचा शेवट यशस्वी लग्नांत होतो. तीच मेन स्टोरी असते. यावरून व्यक्तिगत जीवनातील, कौटुंबिक जीवनातील लग्न या गोष्टीचे महत्त्व लक्षात यावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लेखकाने हुंडाच्या टायमिंगचे समर्थन केले आहे. अदितीने खंडन केले आहे. हे खंडन अतिशय हास्यास्पद आहे. म्हणे लग्न कै खास असतं का?

आदीतीचा प्रश्न सरळ होता की वाटण्या, हिस्से करायला लग्नच कशाला पाहीजे? ( म्हणुन लग्न काही खास आहे का? हा प्रश्न ). त्यात समजुन घेण्याचा प्रश्न असा होता की मुलीला वाटणीच द्यायची असेल तर लग्ना आधी किंवा नंतर कधीही द्यावी ना.

त्या प्रश्नाला तुम्ही गंभीर उत्तर पण देवू शकला असता पण कारण नसताना विनोदी करायचा प्रयत्न केलात, जे माझ्या मते अस्थानी होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिस्से करायला लग्नच कशाला पाहीजे?

हीस्से हे संपत्तीमालकाच्या मर्जी नुसार त्याच्या म्रूत्युपुर्वी अथवा म्रुत्यु नंतर होत असत हे आधीच लिहले आहे.

पण लग्नामधे हिस्से केले गेले नाहीत आणी संपत्तीमालकाच्या म्रूत्युनंतर त्याच्या कुटुंबीयांनी लोभ अथवा इतर कारणामुळे पाठवणी केलेल्या मुलीवर अन्याय केला हे घडणेही शक्य असते म्हनून लग्न ही अतिशय महत्वाची बाब ठरते संपत्तीचे हिस्से करण्याबाबत अथवा किमान मुलीला तिचा वाटा देण्याबाबत. अदिती यांना हे अवश्य समजवा. व मला रिप्लाय कळवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

हुंड्याचे टायमिंग लग्नाचे कसे योग्य आहे यावर अगोदर चर्चा झालेली आहे. How the wealth is added to a family, how it is inherited, how new members join the family and how the old members leave it (die)...इ इ.
-----------------
मुलीच्या लग्नानंतर (फक्त) भावांनी, त्यांच्या बायकांनी, लेकरांनी कमावलेली संपत्ती किती आणि बापाने कमावलेली किती हे वेगळे काढणे अवघड आहे, इ इ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

का?

कारण नवीन पिढी निर्माण करण्यात व तिचे सबलीकरण करण्यात स्त्रिचे योगदान जास्त आहे म्हणून. (युक्नो एक स्त्रि शिकली तर अख्खे कुटुम्ब शिकते वगैरे वगैरे....)

लग्न ही अशी काय खास गोष्ट आहे?

लिवीन अथवा नाइट स्टँड फक्त नवीन पिढी जन्माला घालायला उपयोगी ठरेल... पण लग्न व्यवस्था एक नविन कुटुंब वसवते म्हणून ही खास गोष्ट आहे.

हुंडा मिळाल्यामुळे चोख व्यवस्था कशी काय लागली?

लेखातच उत्तर दिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

ह्म्म तुमच्या मनात आलेला एक विचार असाय तर!
असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अतिशय फाल्तू लेख आहे, त्याचा प्रतिवाद सुद्धा करायची इच्छा नाही. असले विचार वाचुन सकाळ खराब जाणार आहे.
J)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
@ अनु राव तुमच्याशी सहमत होईन असं कधी वाटलं नव्हतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व प्रथम याला लेख समजल्या बद्दल आपले आभार. हे वरील लिखाण करायला मला काही मिनीटे गेली असली तरी एका हाताच्या बोटावर मोजता येतिल इतके सेकंद मी ह्या लेखातिल विचार तयार करायला खर्च केले आहेत देन आय क्विकली मुव्ह्ड ऑन .. म्हणून याला लेख म्हटल्याबद्दल आपले अतिशय आभार. तुमची सकाळ खराब जाओ म्हणुनच हा लिहला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

फक्त काही सेकंद केलेले विचार तातडीने जालावर टाकायची तुमची अभिव्यक्तीची हौस मानण्यासारखीच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या अभिव्यक्तीवर इतरांनी अभिव्यक्त होण्याची हौस खरी जास्त मानण्यासारखी आहे.... तिथे मजा सुरु होते.

ज्यांनी हुंड्याचे समर्थन होउ शकत नाही असे म्हणायची घाइ/हौस केली आहे असे सर्व प्रतिसादक बहुदा या लेखाच्या शेवटी मी दुर्दैवाने काळासोबत काही वाइट चालीरीती यात घुसल्या अन होत्याचं न्हवतं झालं... काय म्हणता ? हे वाक्य लिहलेले आहे हे बहुतेक विसरले आहेत असे वाटत आहे. का तुम्हाला जगाच्या निर्मीतीपासुनच स्त्रियांवर अन्याव होण्यास सुरुवात झाली हा सिध्दांत रुजवायची इछ्चा आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

>>तुम्हाला जगाच्या निर्मीतीपासुनच स्त्रियांवर अन्याव होण्यास सुरुवात झाली हा सिध्दांत रुजवायची इछ्चा आहे ?

जगाच्या सुरुवातीला स्त्रीपुरुषच काय अमीबासुद्धा नव्हते असं म्हणतात ब्वॉ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ठीक आहे मग आपण "स्त्रियांच्या निर्मीतीपासुनच...स्त्रियांवर अन्याव होण्यास सुरुवात झाली हा सिध्दांत रुजवायची इछ्चा आहे..?" असा बदल करुया.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

स्त्रियांवर अन्याव

स्त्रीयांवरील अन्याय या विषयाचा गवगवा करण्याची (म्हणजे तिखट मीठ घालून सांगण्याची) प्रामुख्याने खालिल कारणे असावीत -
१. सदर अन्याय असेल तिथे बंद व्हावा.
२. ज्याला अन्याय वा गुन्हा म्हणता येणार नाही असा सामान्य पुरुषी इगो ताळ्यावर यावा.
३. स्त्रीयांची भौतिक व भावनिक काळजी कोणते पुरुष अधिक चांगली घेऊ शकतात याचे प्रदर्शन करायला फोरम मिळावा.
४. श्रेष्ठतर स्त्रीने शरण आणले तर ते समाजात दर्शवायला गोंडस रुप मिळावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

या धाग्यात मी हुंड्याच्या प्रचलीत पध्दतीचे चुकनही समर्थन केले न्हवते किंबहुना त्यात अनिष्टता आहे हे निसंधेग्दपने स्पश्ट केले होत्या. तरीही हुंडा या एकमेव शब्दाखातर माझे विचार न ऐकता कसलाही हुंडा समर्थनीय नाही अशी मुक्ताफ्ळे ऐकवली गेली, हे कमी की काय एका सिक वैचारीकतेने तर मी माझे मत केवळ ४ सेकंदात बनवुन टंकले याबद्दल सुनावले.. आता तुम्हाला जर प्रतिवाद करता येत नाहीये अथवा जो विचार तुम्हाले समजायला/करायला ४० तास लागतात तो मी ४० मीलीसेकंदात करत असेन तर त्यासाठी इतके सिक व्हायचे काय कारण आहे ?

बरं तुम्हाला हुंडा समर्थनीय नाही म्हणता ना ? मग जे काही तुम्हाले तुमचे लग्नात माहेरुन स्वेछ्चेने मिळाले ते मला दान करुन टाका मी ट्रस्ट उघडुन त्यातुन गरीब मुलींच्या फिया भरायच्या विचारात आहे जेणे करुन त्यांची मानसीकता तरी हुंड्याबाबत सिक असणार नाही. हुंडा हा स्त्रिचा हक्क आहे... अभिमान आहे त्यांना तो हक्क मिळाला पायजेच पण सालं आवक्याबाहेरच स्थळ मिळवायच्या लोभापायी स्त्रिकुटूंबीयांनी हुंडा पध्दातीची गोची केली.. अनिष्ट प्रथा घुसवायला समाजमान्य करायला कारणीभुत ठरले, त्या कुटुंबातील स्त्रियाही या इरोधी आवाज (नाइलाजाने छुपा स्वार्थ हा हेतु ठेउनच) उठवेणाश्या झाल्याने चुकीच एपायंदे ध्रूड झाले... आणी आता समतेच्या या युगात स्त्रियांना यात आपला कोनताही हात्/दोष दिसुन येत नाही हे मह्त आशचरय आहे...

ज्या वरुन लक्ष उडावे चर्चेचा मुळ मुद्दा भरकटावा म्हणून अन्यायाचा गवगवा करणे हे ह्त्यार उपसले जाते आहे का हा प्रश्न मनी येतो. अजुनही भरकटलेल्यंना विनंती आहे वैयक्तीक प्रतीसाद टाळा मुड्यानी चर्चा करा... तुमच्या वैयक्तीक व्हायच्या कृतीने मलाही वैयक्तीक शेरेबजी करण्यास भ्भडकाउ केले जात आहे याची नोंद घ्यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

जॅकी, आपण मांडलेल्या वेल्थ ट्रांसफर इ इ मुद्दे नक्कीच महत्त्वाचे आहेत. अर्थातच आपल्या लाईन ऑफ थिंकिंगबद्दल माझं काहीही निगेटीव, इ इ म्हणणं नाही. बाकी अवांतर मुद्दे मांडून चर्चा भरकटावल्याबद्दल क्षमस्व, पण मला खरोखरच "तुम्ही" गवगवा करत आहात असे सुचवायचे नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आणी आपल्या विरोधात तर मला काहीच म्हणने नाही. मग कसलं क्षमस्व अन कसलं काय...! गवगवा करणारे मुळ चर्चाविषय सोडुन कशाचा गवगवा करत आहेत, ते सदस्य कोण आहेत हे तर आधीच स्पष्ट आहे. तरीही संवेदनशीलता राखुन आपण हा प्रतिसाद लिहला हा आपला मोठेपणा आहे. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

>>स्त्रियांच्या निर्मीतीपासुनच

म्हणजे अ‍ॅडमची बरगडी काढली तेव्हापासून?

------
मानव (होमो-***) उत्क्रांत व्हायच्या आधी ऑस्ट्रेलोपिथेकस आणि त्यापूर्वी प्रायमेट्स असतानाही माद्यांवर अन्यायच होत असेल. कदाचित बलात्कार होत नसेल. (म्हणजे तो बलात्कार आहे असे तेव्हाच्या माद्या आणि नर मानत नसतील).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ऑल वी केर अबॉट व्हाट आर दे(फिमेल स्पिसीज) डूइंग सिन्स देन....

मानव (होमो-***) उत्क्रांत व्हायच्या आधी ऑस्ट्रेलोपिथेकस आणि त्यापूर्वी प्रायमेट्स असतानाही माद्यांवर अन्यायच होत असेल. कदाचित बलात्कार होत नसेल. (म्हणजे तो बलात्कार आहे असे तेव्हाच्या माद्या आणि नर मानत नसतील).

दॅट्स अ कंफ्युसिंग येट व्हेरी रोचक स्टेट्मेंट. जर आपण यावर ठाम असाल व आपणास यावर खरच चर्चा करायची असेल तर वेगळा धागा अवश्य काडावा संदर्भासहीत स्पष्टीकरण करायचा नक्कि यशस्वी प्रयत्न करेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

अवांतर:- ज्याना हा धागा निट समजला नसेल अथवा काही शंका उरल्या असतिल त्यांना गुगलची मद्त इथे घेता येइल. सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!


37.gif

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-