तोच थंडगार भात
( चालः तोच चन्द्रमा नभात )
तोच थंडगार भात तीच प्लेट पाहुनी
एकांती मजसमीप तीच भीति का मनीं !
खारट चटणी तशीच रोज तेच भांडणे
पोळ्यांनी सोडियले नीट येथ भाजणे
भाजीचा गंध तोच तीच कुबट फोडणी !
सारे जरि ते तसेच संधि आज ती कुठे ?
मीहि तोच, तीच तीहि, दुसरी मेस ती कुठे ?
ती कपात ना दरात अश्रु दोन लोचनी !
त्या पहिल्या आम्टीच्या आज लोपल्या खुणा
डाळ ह्या जलात व्यर्थ मूढ शोधतो पुन्हा
नीट ये न ते कळून भंगल्या भुकेतुनी !
(पूर्व प्रसिद्धी- शब्दगाssरवा २०११)
प्रतिक्रिया
छान
होस्टेलवर राहिलेल्या अगणित लोकांच्या भावना व्यक्त झालेल्या आहेत. जुने दिवस आले आणि पोटात ढवळून आलं.
अगदी अगदी. आमच्या होस्टेलवर
अगदी अगदी. आमच्या होस्टेलवर साबूदाण्याची खिचडी मात्र जाम छान व्ह्यायची.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
होस्टेलच्या बाबतीत आम्ही
होस्टेलच्या बाबतीत आम्ही नेहमीच सुखी राहीलो. पण बाकी मैत्रिणी व मित्रांच्या याबद्दलच्या व्यथा जाणून आहोत.
विं दां च्या 'तेच ते आणि तेच ते ' ची आठवण झाली.....
हे हे हे मस्त! लोकहो! तारे
हे हे हे
मस्त!
लोकहो! तारे द्या तारे द्या! आळशीपणा करू नका!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
(No subject)