ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट २०१५: अर्थात आपल्या परसातील/परीसरातील पक्ष्यांची मोजणी

गेल्या वर्षी आपण याच सुमारास पक्षीनिरिक्षण केले हे आठवत असेलच. याही वर्षी १३ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी या दरम्यान जगभरात 'ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट' होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही थोर करायचं नाहिये तर या चार दिवसांत तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला जे जे पक्षी दिसले त्या त्या पक्षांची नोंद करून ती तुम्ही www.ebird.org वर करायची आहे.

कोणताही पक्षी असो, कुठेही दिसला असो. या दिवशी तुम्ही घरी असा, ग्यालरीत असा नाहितर बागेत नाहितर जंगलात, पक्षी हे हमखास दिसणारच (कै नै तरी कावळा/चिमणी आहेतच). तुम्हाला लगेच दुर्मिळ पक्षी दिसेल असे नाही पण असं ठरवून पक्षी बघायचा प्रयत्न केल्यावर जाणवेल आपण कुठेही असलो तरी सभोवताली किती प्रकारचे जीव/पक्षी असतात.

यासाठी आपल्याला ऐसीअक्षरेवर असं करता येईल:

१. या चार दिवसांत तुम्हाला दिवसाच्या १२-१४ तासांपैकी (तुम्ही जंगलात/झाडे असणार्‍या जागी असाल तर रात्रीचे तासही आहेत) कोणतीही १५-२० मिनीटे निरिक्षण करायचे आहे आणि त्या दरम्यान तुम्हाला कोणते पक्षी दिसताहेत याचा अंदाज घ्या.
२. पैकी जे पक्षी माहितीतले आहेत, त्यांचे नाव लिहून ठेवा, साधारण किती संख्येने दिसले ते लिहा व ढोबळ वेळ लिहून घ्या
३. पैकी जे पक्षी कोणते ते माहिती नाही, त्यांचा शक्य असल्यास पक्ष्याचा फोटो काढा. नाहितर त्यांचे वर्णन लिहून घ्या (मुख्यतः आकार, स्वरूप/फ्यामिली, रंग [अंगाचा/चोचीचा, पंखांचा, पोटाचा, पंखाखालचा - जितके नोटीस कराल तितके सोपे], ऐकु आल्यास आवाज, दिसल्यास घरट्याचा आकार वगैरे)
४. मग ऐसीअक्षरेवर पक्षाचा फोटो किंवा वर्णन टाका आपण सगळे मिळून त्या पक्षाचं नाव शोधायचा प्रयत्न करूयात.
५. त्या व्यतिरिक्त जे पक्षी तुम्ही ओळखले आहेत त्यांच्याबद्दलही ऐसीवर लिहा.

गेल्या वर्षीच्या अनुभवाने तुमचे डोळे अधिकच तयार झाले असतील.

टिपः
१. १४ फेब्रुवारीला सर्रास दिसणार्‍या लव्हबर्डस ना या गणनेतून वगळले आहे Wink
२. यात जगभरतून कोणालाही सहभागी होता येईल. भारतात असायची पूर्वअट नाही.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

आमचे खिडकीखालचे रेसिडेंट घुबड दांपत्य धरायचे का यात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो तर! ते तर हवेच! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अतिहिमामुळे फक्त कावळे व कबुतरेच दिसतात Sad
धागा खूप आवडला मात्र.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

जरा गरम कपडे घालून एखाद्या नदीजवळ किंवा झुडुपांजवळ (पानगळ झाली असली तरी) निरीक्षण करत थांबलात तर अधिक पक्षी नजरेस पडावेत.
हिवाळ्यात सगळे पक्षी स्थलांतर करत नाहीत (अगदी न्यूयॉर्क शहरामध्येही हिवाळ्यात किती पक्षी वैविध्य आहे हे एका हिवाळ्यात "बॅकयार्ड बर्ड वॉक" ला सेंट्रल पार्कात गेलो असताना समजले होते. अर्थात त्यांनी "प्रमाण नावे" (अर्थात नीरस नावे) सांगितल्याने एकही लक्षात नाही Sad

कदाचित हा दुवा किंवा असेच जालावरील दुवे उपयुक्त ठरावेत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आज बसमधून जाताना, अंग फुलवून झाडावर बसलेल्या कावळ्याकडे कौतुकाने पहात बसले होते अन एक लहान पक्षी सुर्रकन गेला. टिपताच नाही आला Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

प्रतिसाद आलेला दिसत नाही. Sad

माझेही नोंदवणे राहून गेले काही कारणाने ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे नोंदवूया Smile

मी विकांताला दोनदा निरीक्षण केले.
-- अनेकदा दिसणार्‍या चकचकीत निळ्याशार (व वाकलेल्या अणकुचीदार चोचीच्या) शिंजीर पक्षाचा रंग बदलू लागला आहे. (तोच तो पक्षी जो गेल्या वर्षी (बहुधा) टिंकुला तिच्या घराजवळही दिसला होता).
-- वेडा राघुच्या जोडल्याचे समोरच्या एका बोगनवेलीच्या झुडुपांत नी एका बॉटलपफच्या गर्दीत सारखे जाणे येणे चालले आहे. बहुदा घरट्याचा बेत असावा
-- उंबराची फळे खाण्यासाठी काही हरीतालक आले आहेत
-- तांबटाचा आवाज येतोस सकाळी पण दिसला नाही.
-- यंदा अजून तरी राखी धनेश आलेले नाहीत. बहुदा अधिक उन्हाळा सुरू झाल्यावर पानगळ झाली की दिसतील.
-- सातभाईं पूर्वी टेकटीवरच्या जंगलात दिसत ते आता सोसायटीजवळच्या एका पंपहाउसभोवतीही घुटमळू लागले आहेत. (नुसत्याच झालेल्या एका विदर्भातील फार्म हाउसमध्ये हे मोप दिसले होते)
-- बाकी नेहमीचे बुलबुल, चिमण्या, पारवे, कावळॅ, डोमकावळे दिसतात ते दिसलेच.

===

गेल्या उन्हाळ्यात देवकावळ्याचे दर्शन कोकणात झाले होते. यंदाच्या ट्रीपला पुन्हा झाले तर काय मज्जा! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आमच्याकडे सोसायटीच्या आवारात दिसणारे पक्षी -

१. कावळे
२. डोमकावळे
३. कबुतरे
४. लालबुड्या बुलबुल (साधे आणि तुरेवाले)
५. पोपट
६. कोतवाल
७. वेडा राघू
८. राखी धनेश
९. राखाडी रंगाचाच चिमणी सारखा दिसणारा पक्षी (याला इंग्रजीत 'ग्रेट टिट' असे अश्लील नाव आहे)
१०. साळुंकी
११. कोकिळ आणि कोकिळा
१२. घार
१३. फुलचुख्या
१४. ओरिएन्टल मॅगपाय रॉबिन
१५. तांबट
१६. भारद्वाज
१७. स्पॉटेड आऊलेट (हे अगदी कधीतरी दिसते, पण आमच्या इथे आसपास आहे एवढे नक्की. कारण आसपास झाडी भरपूर आहे).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे हो! अतिपरिचयात अवज्ञा होऊन कोतवाल नी भारद्वाजांचा उल्लेख राहिलाच की माझ्या यादीत.

आउलेट्स बद्दल उत्सुकता आहे. कधी फोटोत टिपता आले तर बघा.
फुलचोच्या म्हणजे हा निकेलचा /टिकलचा फुलटोच्या म्हणायचाय का शिंजिर का आणखी कोणी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आमच्या घराच्या आजूबाजूला दिसणारे पक्षी :
१. पारवा
२. साळुंकी
३. कावळे
४. चिमण्या (क्वचितच दिसतात आजकाल, 'या चिमण्यांनो परत फिरा रे' हे गाणं खरोखरच्या चिमण्यांसाठी म्हणावं वाटतं).
५. सावळ्या वा करड्या रंगाची बुलबुल
६. घार (एवढ्यात एका जागी स्थिर बसलेल्या घारी फार पहायला मिळाल्या, सहसा उडणार्‍याच घारी पहाण्यात येतात. ह्यादिवसांमधे घारी विश्रांती करतात असं काही असतं का? की केवळ योगायोगाने मला एवढ्यात बसलेल्याच घारी दिसल्या?)
७. काल-परवाच पोपटांचे खूप आवाज ऐकायला मिळाले, बाहेर डोकावल्यानंतर दिसले मात्र नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काल-परवाच पोपटांचे खूप आवाज ऐकायला मिळाले, बाहेर डोकावल्यानंतर दिसले मात्र नाही.

त्यानंतर स्वतःला मोजले की नाही ??! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पोपटांमधे आमची काय हो गणना- एवढं कुठलं भाग्य... आमची गणना पारव्यांमधे - त्यांचे सारखे विध्वंस करणारे आणि नतद्रष्ट समजतात ना आमच्या सारख्या गरिबाला . Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता खरंतर गविंची गणना व्हायला हवी Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हाहाहा गविंनी केलेला विनोद प्रचंड आवडलेला आहे. पण त्यांचाच पोपट झाला हेही खरय Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

अनेकदा लकडीपुलाच्या आजुबाजुच्या झाडीत पोपटांचे थवे विसाव्याला येतात.
नदीपुलातून डेक्कन बसस्टॉपच्या मागील बाजूने पलिकडे जाताना समोरच्या झाडांवरही संध्याकाळी पोपटांचे लहान थवे विसाव्याला येताना हमखास दिसतात.

हिंजवडीतही अनेकदा पोपट दिसतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

झाडांव्यतिरिक्त पोपटांचं वास्तव्य मला सिमेंटच्या इमारतींपेक्षा दगडी किंवा मातीच्या इमारती/घरांच्या भिंतीमधे दिसलं आहे. ह्याचं काही विशेष कारण? कदाचीत तिथे गारवा जास्त असतो म्हणून काही? हा पक्षी गारवा जास्त प्रेफर करतो असं काहीसं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गारव्यापेक्षा दगडी भिंतीमध्ये - भेगांमध्ये खोबण/ढोलीसदृश जागा मिळात असेल. सिमेंटच्या गिलाव्यात ते शक्य होत नसावे.
अर्थात अंदाज!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

साळुंकी बद्दल एक निरीक्षण, एवढ्यात हे पक्षी फार घोळक्याने दिसत नाही. तसा त्यांचा विशेष घोळका असतो असं नाही पण ज्या २-४ बरोबर असतात त्याही दिसत नाही. दिसली तरी एकटी-दुकटी दिसते.
नाशिकला आमच्या घरापुढे बदामाचं झाड(डं) आहे त्यावर तर घोळक्याने किलबिलाट चालू असतो, एवढ्यात तिथेही अश्या घोळक्याने फार साळुंकी पहायला मिळाल्या नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो की! आमच्या सोसायटीतही मध्येच एखादी साळुंकी दिसते हल्ली. पुर्वी सतत दिसायच्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

साळुंकी ऊर्फ मैना हिच्या नेहमीच्या अवताराखेरीज काही गावांमधे ब्राह्मणी मैना हा प्रकारही दिसतो. (मी पुण्यातही एरंडवणे भागात पूर्वी पाहिली आहे) डोक्यावर घेरायुक्त शेंडी असावी तसा आकार, तांबूस गोरा रंग वगैरे कारणांमुळे ब्राह्मणी म्हणत असणार. डोळे एकदम निळे असतात. वेगळीच खास छटा.

चित्रः विकीपीडियावरुन साभार / Wikipedia

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डोक्यावर घेरायुक्त शेंडी असावी तसा आकार, तांबूस गोरा रंग वगैरे कारणांमुळे ब्राह्मणी म्हणत असणार. डोळे एकदम निळे असतात.

ही कोकणस्थ ब्राह्मणी दिसतेय Wink

हो अश्या साळुंकी दिसतात आमच्या आवारात. शक्यतो ह्या साळुंकींना जमिनीवर जास्त पाहीलं आहे - बहुतेकदा पार्किंग वगैरे भागात आणि शक्यतो सावलीतच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वरच्या पक्ष्यांबरोबर आमच्या इथे अजून काही दिसणारे पक्षी:
१. दयाळ
गौरीच्या एका पुस्तकात बहुधा उत्खनन मध्ये नायकाचे नाव "दयाळ" असत.. आणि ते सुद्धा त्याला जन्मतःच कानाच्या मागून आहे त्या केसांच्या रंगापेक्षा भुऱ्या रंगाचा छोटासा पट्टा/बट असते.अस्सल भारी वाटलं होत ना!!
२. पांढरा/करडा धोबी (विंग्रजीमधले wagtel) : धूण बडवण म्हणजे नेमक काय ते यांच्याकडे बघून कळत Smile
३. नाचरा : इतकी गोड शीळ असते त्याची..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता महाजनांच्या "ब्र" मध्येही नायकाचं (?) नाव दयाळ आहे. आता हे नाव आहे की आडनाव याचा कधीच पत्ता लागला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

धोबी सहसा नदीकिनारी दगडांत घरटे करतात, त्यामुळे खडकाळ नदीकिनारी ते सहसा भटकत असतात त्यावरून हे नाव पडले आहे

दयाळ - होय हा अनेकदा दिसतो. त्याची विनीच्या हंगामातील शीळ मात्र खरोखरच भारी असते. दयाळ गातो हे एरवीच्या त्याच्या एकसुरी आवाजावरून पटणार नाही पण विणीच्या हंगामात तो खरोखर अनेक आवाज - सुरावटी काढतो त्या मोहक असतात. (कोकीळ झक मारेल - तरही ते भल्या पहाटे कर्णभेदक किंचाळून आमची झोपमोड करणारे मिस्टर कोकीळ सुरवातीचे क्वचित येणार्‍या आवाजाचे दोन दिवस गेले की आम्हाला नावडू लागतात)

नाचरा हा लढवैय्या पक्षी आहे. कावळे याला खूप घाबरतात. याचे घरटेही शँपेनच्या ग्लाससारखे असते (जमिनीपासून ६-८ फुटांवर असते - मी चिकू नी डाळिंबांच्या झाडुआंच्या बेचक्यात बघितले आहे). अंडी घातल्यावर तर हा शेवटी फुलवून त्यांचे ज्या सजगतेने रक्षण करतो ते पाहणे रोचक असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

थोड्याच दिवसांपूर्वी म.बळेश्वरला कड्याच्या टोकावर अत्यंत भीतीदायक जागी हे मलबार चंडोल गवतात चरताना पाहिले.

Image from ibc.lynxeds.com

वरील वेबसाईटवरचा फोटोही योगायोगाने महाबळेश्वरलाच काढलेला दिसतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वॉव. पहिल्यांदाच पाहतोय.
किती मोठा असतो? फोटोवरुन चिमणीसारखाच वाटतोय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चिमणीइतकाच आकार. जरासा गुंजभर मोठा उगीच.

सांगली कोल्हापूर साईडला माळरानावर याचे अनेक प्रकार पाहिले होते. जमिनीवरच अंडी घालतात. क्रेस्टेड लार्क बोले तो तुरेवाला चंडोलही कॉमन आहे.

फोटोग्राफीचं अंग आपल्याला नाही याचं वाईट वाटतं. कोणता कॅमेरा घेतल्यास किमान दाखवण्याच्या लायकीचे निसर्ग छायाचित्रण करता येईल ? किमान बजेट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिमणीसारखी चोच नाही मात्र. चांगली धारदार अन बाकदार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

दयाळाची सुरावट खरंच मोहक असते. उन्हाळ्यात भर दुपारी हूं हूं असा वेगळाच आवाज ही काढतो दयाळ. बुलबुलाचा ही आवाज सुरेख वाटतो. कोकीळ तानेचं प्रस्थ उगाच वाढवून ठेवलय. उन्हाळ्यात भर दुपारी तर कोकीळा नको वाटतात. (त्यामुळे परिक्षेच्या जुन्या आठवणी येतात ते एक वेगळचं)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(त्यामुळे परिक्षेच्या जुन्या आठवणी येतात ते एक वेगळचं)

कोकिळाच का, उन्हाळा म्हटले की मला परीक्षांचा मोसमच आठवतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला घरभर पसरलेला पेंढ्याचा नि हापूसचा वास, लायब्रीची पुस्तकं, दिवसरात्र कुटलेले पत्ते, दारावर येणारा गोळेवाला, पॉटचं आईसक्रीम, बालनाट्यांची तिकिटं... आठवतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

दिवसरात्र कुटलेले पत्ते

वाह.. काय आठवण! मलाही दुपारची जेवणं झाल्यावर ४-५ तास खेळायचो ते आठवले.

दारावर येणारा गोळेवाला

हे भाग्य फार लाभलं नाई. "कुठल्या पाण्याचा बर्फ बनवत असतील कोण जाणे" हे वाक्य ऐकायला लागायचं. आजही बर्फाचा गोळा खाताना भीती वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आमच्या मातोश्रींनाच बर्फाचा गोळा फार आवडतो, ही एक देवानं* केलेली सोय. Wink

*देवाचं नाव बघून लग्गेच धावत निघणार्‍यांसाठी पेश्शल तळटीपः आधी भाषिक आवाका वाढवून या नि मग माझ्याशी या शब्दाच्या निवडीबद्दल बोला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मला उन्हाळ्यातील सुखद गार वारा अन आईने केलेले पन्हे व कुल्फी आठवते Smile .... भेळे सकट Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

बुलबुल
दयाळ
मुनिया
चिमण्या
कावळे
कबुतरे
पोपट

मागील वर्षाभरात एकदा हळद्या दिसलेला.
पूर्वी दिसणारे कोतवाल, भारद्वाज बरेच वर्षात दिसलेले नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी भारतात गेले होते तिथे आमच्या भागात भारद्वाज रो-ज दिसला. कारण दुपारी तो रो-ज समोरच्या झाडावरती विश्रांती घेई. एकदम निवांत!!! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

आणि या सगळ्यात आपला दिमाखदार किंगफिशर राहिला की. शिवाय मधून मधून ठिपकेवाली मुनिया आणि चष्मेवाला पण दिसतो आमच्या इथे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

योगायोगाने कर्जत परिसरात होतो. खूप पक्षी पाहिले नावं आणि फोटोऐवजी जूनमध्ये घरातून आवाज मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते त्याची लिंक

१)बुलबुल ,दयाळ http://vocaroo.com/i/s07eFNqxIqlS 570kb २) खंड्या http://www.divshare.com/download/26372198-f80 160kb REPEAT ३)शिंपी http://vocaroo.com/i/s0dXMu6W7434 240kb ४)खंड्या , दयाळ http://vocaroo.com/i/s0VhB0CGZUMY 670kb ५)दयाळ,बुलबुल http://vocaroo.com/i/s0viPqm5lPsH 1400kb
आमच्या घरून शेजारच्या सोसायटिच्या ओ हेड टाकीचे पाणी वाहिले की त्यात कांचन आंघोळ करताना दिसतो. त्यावेळी आनंदाने पिसे फुलवतो आणि खर्रर्रऽऽ ओरडतो.

व्यवस्थापकः दुवे सुधारले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वॉव! कांचन आजवर एकदाच खोपोलीजवळ बघितला आहे.

आवाजी माहितीबद्दल पेश्शल आभार! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आवाजी दुवे सुधारल्याबद्दल धन्यवाद. लिँक मोड a href मध्ये टाकले असते परंतू बाह्य दुव्यांतून जंतूसंसर्ग होइल का काय अशी भीती नको , कोणत्या साइटचे दुवे आहेत ते कळावे याकरिता तसेच ठेवले होते. vocaroo पेक्षा DIVSHARE साईट अधिक सुरक्षित आहे असे ऐकले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0