कॉकटेल लाउंज : मार्गारीटा (फ्रोझन)
आजपासून ऐसीअक्षरेवर पाकृती विभागात माझ्या कॉकटेल रेसिपींची मालिका चालू करतो आहे.
मॉडरेटर्सची ह्या विषयाला हरकत असल्यास हा धागा उडवावा.
‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “मार्गारीटा (फ्रोझन)”
पार्श्वभूमी:
माझी कॉकटेलच्या रंगबीरंगी आणि मादक विश्वाची सफर ह्या कॉकटेलपासूनच झाल्यामुळे हे कॉकटेल मला जास्त जवळचे आहे.
ह्या कॉकटेलच्या उगमाच्या फार दंतकथा आहेत. एका कहाणीप्रमाणे एका मोठ्या समारंभात त्या समारंभाच्या प्रमुख पाहुण्याच्या मुलीच्या नावाने एक नविन ड्रिंक बनवले ते म्हणजे मार्गारीटा. तर एक कहाणी सांगते की एका बारटेंडरने ह्या ड्रिंकचा शोध लावला आणि तीच्या नावाचे स्पॅनिश रुपांतर होत होते मार्गारीटा म्हणून ह्या कॉकटेलला मार्गारीटा हे नाव पडले.
पण मी म्हणतो आपण 'गुठलीया गिननेकाच क्यू, डायरेक्ट आमंच खाने का ना'
तर जरी हे कॉकटेल मेक्सिकन टकीलापासून बनवले असले तरीही हे पुर्णतः अमेरिकन कॉकटेल आहे. मेक्सिकोमधे हे तितकेसे लोकप्रिय नाहीयेय.
प्रकार: टकीला बेस्ड कॉकटेल
साहित्य:
टकीला | 1.5 औस (45 मिली) |
कॉईंत्रु (दुसरा पर्याय – ट्रिपल सेक) | 1 औस (30 मिली) |
मोसंबी ज्युस | 0.5 औस (15 मिली) |
लिंबू ज्युस | 10 मिली |
एक कप बर्फ | |
मोसंबीची साल सजावटीसाठी | |
ब्लेंडर | |
मोजण्याचा जिगर |
ग्लास: – कॉकटेल किंवा मार्गारीटा
कृती:
सर्वप्रथम कॉकटेल ग्लासमधे पाणी आणि बर्फाचे खडे टाकून फ्रीझमधे फ्रॉस्टी करण्यासाठी साधारण तासभर ठेवून खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे मस्त फ्रॉस्टी करा.
आता एका प्लेट मधे मीठ पसरवून घ्या. लिंबू कापुन ते ग्लासच्या तोंडावर एकसारखे चोळून घ्या. आता ग्लासाचे तोंड त्या मीठाच्या प्लेटमधे गोल फिरवून घ्या. खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे ग्लासच्या तोंडावर मीठ बसलेले असले पाहिजे.
आता मोसंबीचा आणि लिंबाचा रस काढून घ्या.
आता टकीला, कॉइंत्रु (किंवा ट्रिपल सेक), आणि मोसंबी आणि लिंबू रस ब्लेंडर मधे ओतून घ्या.
आता बर्फ ब्लेंडर मधे टाका आणि मिडीयम स्पीडवर बर्फाचा चुरा होईपर्यंत व्यवस्थित ब्लेंड करून घ्या.
आता ब्लेंड झालेले मिश्रण ग्लासमधे ओतून घ्या. मोसंबीची साल सजावटीसाठी ग्लासमधे अलगद सोडा.
चुरा झालेला बर्फ म्हणजे बर्फाचा गोळा खाताना होतो तसा झालेला चुरा. पण त्यात थोडे थोडे तुकडे असलेले मला आवडतात.
मस्त चवदार फ्रोझन मार्गारीटा तयार आहे
ब्लु मार्गारीटा
वरच्या रेसिपीमधे कॉईंत्रु किंवा ट्रिपल सेक ऐवजी 'ब्लु कुरासाओ (Blue Curacao)' ही लिक्युअर वापरल्यास तेवढ्याच प्रमाणात वापरल्यास 'ब्लु मार्गारीटा' हे एक व्हेरिएशन कॉकटेल तयार होते.
ब्लु कुराकाओ हे कॉईंत्रु किंवा ट्रिपल सेक प्रमाणेच एक ऑरेंज लिक्युर आहे. अधिक माहितीसाठी.
(ब्लु मार्गारीटाचे चित्र आंजावरून साभार)
प्रतिक्रिया
कॉकटेलची जनक मार्गारिटा?
आंबटगोड चवीमुळे हे कॉकटेल आवडतं. कॉकटेलच्या उद्गातीविषयी एक गमतीशीर कहाणी (तिच्या फोटोसह) इथे सापडली.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
धन्यवाद, चिंतातूर,मस्त होता
धन्यवाद, चिंतातूर,
मस्त होता दुवा! मी ही माहिती माझ्या ब्लॉगवर बापरली आहे.
पण हे असे कॉकटेल कोणी शोधले हे सांगणे तसे कठीणच आहे असे मला वाटते.
- (साकिया) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
दिसाला छानच आहे.. इफेक्ट
दिसाला छानच आहे.. इफेक्ट बरोबर जमलाय... आम्हाला अपेयपान वर्ज्य असल्यामुळे चवीला आमचा पास.
झक्कास रे सोकाजी.
दिसतंय तर छान. बनवण्याचे कष्ट घेऊन कोणी पाजणार असेल तर घेण्याचीही तयारी आहे. आमंत्रण कोण देतंय?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आवडले
हे कॉकटेल आवडले. ख्रिसमस व नवीन वर्षाची चांगली भेट म्हणायची.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
अतीव आकर्षक
हायला! ते निळेशार कॉकटेल अतीव आकर्षक वाटले!
अर्थात तुम्ही बनविलेले वर्जिनलही छान दिसते आहे!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पेहला प्यार
कृती आणि फोटू मस्त. विशेषतः मोसंबीची साल लावून आणि मीठ लावून फारच भारी दिसतेय.
कॉकटेल विश्वातलं मार्गारिटा हे माझं पहिलं प्रेम. तसं जिमलेटचं काहीसं वरवरचं आकर्षण निर्माण झालं होतं. पण मार्गारिटा चाखली आणि त्या बर्फाळ पेयाच्या प्रेमात मी आकंठ बुडलो. अजूनही मार्गारिटा अतिशय आनंदाने करतो.
सोत्रि, तुम्ही फ्रोझन म्हटलं आहे पण ती आइस्ड दिसते आहे - पेय वेगळं आणि त्यात अर्धा पाउण इंचाचे बर्फाचे तुकडे. मी जी फ्रोझन मार्गारिटा म्हणून बाहेर प्यायली आहे व करतो, त्यात बर्फाचा चुरा इतका बारीक असतो पेय आणि बर्फ एकजीव होतात. प्रत्येक घुटक्याबरोबर बर्फाचे कण जातात. त्याचंच एक व्हेरिएशन मी करतो. मार्गारिटा तयार झाल्यावर पिचर थोडा वेळ फ्रीझरमध्ये ठेवतो. त्यामुळे ती आणखीन घट्ट होते. इतकी की ती श्रीखंडासारखी जेमतेम ओतता येते, पण पिता येत नाही. ती कपात घेऊन चमच्याने घोट घोट खायची. जीभ गारेगार होऊन कप केव्हा रिकामा होतो कळत नाही. उन्हाळ्यात मस्त!
धन्यवाद!
वरून घेतलेल्या फोटोमधे डावीकडच्या ग्लासात तुम्ही म्हणता तशी फ्रोझन मार्गारीटा आहे. उजवीकडच्या ग्लासातही तशीच आहे पण मला बर्फाचे किंचीत खडे आवडतात चुर्यापेक्षा.
खरंच ह्या पेयाची महिमा वर्णावी तेवढी कमीच आहे.
- (कॉकटेलप्रेमी) सोकाजी
ब्लॉग हा माझा...