वृत्तदर्शन

संस्कृत, मराठी आणि अन्य भारतीय भाषांतील काव्यरचनेमध्ये वापरल्या जाणार्‍या पारंपारिक वृत्तांचे पठनद्वारा प्रदर्शन करण्याचा एक स्वल्प प्रयत्न मी केला आहे आणि तो http://www.youtube.com/watch?v=CNnUhll0zzA येथे पहाता येईल. पठनासाठी निवडलेले सर्व श्लोक संस्कृतमधील आहेत. अशा प्रकारचे अन्यहि काही प्रयत्न करण्याचे मी योजीत आहे. माझा प्रयत्न हा पूर्णत: home production आहे आणि त्यामुळे सफाईमध्ये थोडा कमी पडत आहे ह्याची मला जाणीव आहे.

पुढील प्रयत्नांसाठी मार्गदर्शन म्हणून सदस्यांनी हा प्रयत्न पाहून आपले अभिप्राय दिल्यास ते मला उपयुक्त ठरेल.

हे प्रदर्शन एकूण सुमारे १५ मिनिटांचे आहे आणि ते इंग्रजीमध्ये आहे. मराठीमधील, संस्कृतमध्ये न मिळणारी साकी-दिंडी-कटावासारखी वृत्ते वापरून असाच एक प्रयत्न, आणि तोहि मराठी भाषेमध्ये, लवकरच करण्याचा माझा विचार आहे.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

वा! प्रकाशित झाले तेव्हा युट्युबचा अ‍ॅक्सेस नव्हता. नंतर बघितले. खूप छान प्रयत्न आहे.

मराठीमधील, संस्कृतमध्ये न मिळणारी साकी-दिंडी-कटावासारखी वृत्ते वापरून असाच एक प्रयत्न, आणि तोहि मराठी भाषेमध्ये, लवकरच करण्याचा माझा विचार आहे.

अरे वा!. याच बरोबर विविध छंद, ओव्या यावरही काही लिहिलेत तर माहितीत भर पडेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!