कवितेचा दिवस

क्वचित एखादा wistful अन विरही दिवस उगवतो. कुंडलीतील १२ व्या , सर्व boundaries, भिंती गळून पडणार्‍या घरात माझा भ्रमण करणारा चंद्र आलेला असतो. शहाण्या ज्योतिष्यांनी आधीच warn केलेले असते - Spin slow, vortex ahead. अंतर्मुख होण्याचा काळ आहे. अन खरच अनुभवास येते ही अंतर्मुखता. काहीतरी हरवल्याची, दुरावल्याची तीव्रमनस्क जाणीव घेऊन येते. background ला सतत मंद स्वरात गुणगुणल्यासारखं एक deep longing मनात गुणगुणत रहातं. बरं कोणासाठी, किंवा कशासाठी, काय हरवलय म्हणून हे longing आहे ते देखील काही केल्या कळत नाही.

मात्र पक्ष्यांना ज्याप्रमाणे instinctively स्थलांतराचे ज्ञान होते त्याच instinctively मला काही विशिष्ठ गाण्यांची ओढ दाटून येते. "विरहीणी" येस्स .. wistful बंगाली बाऊल संगीत ऐकावेसे वाटू लागते.

आज सजन मोहे अंग लगा लो,
जनम सफल हो जाए ...
हृदय पीडा, देह की अग्नी,
सब शीतल हो जाए|

आहाहा गाणं ऐकतानाच डोळे झरु लागतात. सैरभैर होते मी.

प्रेमसुधा इतनी बरसा दो, जग जलथल हो जाये ...

या ओळीतील उत्कट विरहीणीची व्यथा, दु:ख mysteriously खेचून घेते, अगदी त्याशी तादत्म्य पावते मी.
हा दिवस कवितांचाही असतो .... नव्हे १००% असतो.

"युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करु प्रीतीची याचना"

वा!! हा दिवस असतो, पृथ्वीची प्रीती, ओढ अन सूर्याकरताचे आकर्षण अनुभवण्याचा, समजून घेण्याचा. मुख्य म्हणजे अप्राप्यतेतून टोकेरी झालेला eros समजण्याचा.

गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

एकीकडे असे वाटत असते Ego ची प्रत्येक भिंत गळून पडावी, अन जशी मीठाची बाहुली समुद्राच्या खार्‍या पाण्यात विरघळून जाते तसे कुणाच्यात तरी किंवा कशाच्यात तरी विरघळून जावे. म्हणजे काय ते कळत नाही, कोणात-कशात एकरुप व्हायचे ते दिसत नाही, पंचेंद्रिये तोकडी पडतात पण मनाचे(चंद्र) longing थांबत नाही.

अशा वेळी उपाय चालत नाहीत - coffee घेणे, walk घेणे, TV, Internet कशात म्हणून मन रमत नाही. मग सर्व दूर करुन मी माझ्या कल्पतरुकडे - कवितेकडे वळते. अन काय सांगू जे कधीही normal/ordinary दिवशी सापडले नसते असे काही मला गवसते. एका बुद्धीस्ट Smile कवयित्रीने लिहीलेली अफाट उत्कट अन प्रर्थनासदृश शांतवणारी कविता. मला कळते कोणत्यातरी प्रतलावर मला कळते - This is my chance...tuning to Pisces love- Pisces (venus) lover - energy. कविता वाचल्यावर मी अगदी शांत होऊन जाते.

lake-and-maple-jane-hirshfield ही ती कविता असते. कवितेची सुरुवातच असते -

I want to give myself
utterly
as this maple
that burned and burned
for three days without stinting

"give myself utterly" , मेपलचं पान पिवळं-लाला लाल बुंद होऊन गेलं आहे पण ना कडवटपणा ना भीती फक्त एक स्वीकार- केवढी जादू आहे माझ्या मनस्थितीशी tune होणारी , तंतोतंत शब्द्बद्ध करणारी ही सुरुवात ...... एका प्रार्थनेची (१२ वे घर) सुरुवात....हा विचार करत मी पुढे वाचू लागते अन कवितेत फक्त deeply absorb होत जाते. माझा श्वास-प्राण-मन शांतवत कविता माझ्यात भिनत जाते.

In the still heart,
that refuses nothing,
the world is twice-born—
two earths wheeling,

.
.
let go-let go-let go

मला तरी अजुन नीट माहीत असलेली पण २ दा न जन्मलेली व्यक्ती भेटायची आहे. कधी तीव्र आजारपणातून उठून तर कधी डिव्होर्स (घटस्फोट्)च्या पश्चात, कधी स्वतःच्या अपत्याचा मृत्यु या दुर्दैवाशी सामना करुन, पण प्रत्येक जण २ दा जन्मलेला पाहीला आहे. अशी घटना घडण्यापूर्वी एक अगदी भिन्न व्यक्ती अन घटनेपश्चात एक अत्यंत वेगळे व्यक्तीमत्त्व - होय विशिष्ठ प्रतलावरील पुनर्जन्मच असतो.

मला खात्री पटलेली आहे योग्य ते stars align झाले, की फक्त प्रेमिकच भेटतात असे नाही तर आयुष्यात अनवट अन खास आपल्याकरता लिहीलेल्या कविताही अशाच मुहूर्तांवर आपल्याला भेटतात. कविता परत परत वाचून रॅशनल (विवेकपूर्ण) अन व्यवहारी पातळीवरुन खोलात हाडात उतरवायची आहे. या कवितेचे पापुद्रे उलगडून तिच्यातील अमृत रक्तात झिरपवायचे आहे.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

ओहो.. जियो !
असे अनपेक्षीत क्षण / दिवस वारंवार आयुष्यात यायला हवेत. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लिहीलय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद टिंकू Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयुष्यात अनवट अन खास आपल्याकरता लिहीलेल्या कविताही अशाच मुहूर्तांवर आपल्याला भेटतात. कविता परत परत वाचून रॅशनल (विवेकपूर्ण) अन व्यवहारी पातळीवरुन खोलात हाडात उतरवायची आहे. या कवितेचे पापुद्रे उलगडून तिच्यातील अमृत रक्तात झिरपवायचे आहे.

अगदी. सुंदर लिहील आहे. सुंदर कविता आहे.
असा झाडासारखा,पाण्यासारखा सहज स्वीकार केव्हा जमायचा?
पण २ दा जन्मण्याबद्द्ल सहमत नाही. उलट मला असं वाटतं की माणूस त्या संकटापुरता बदलतो . ते निघून गेलं की पहीला स्वभाव परत . (बाबाची संध्या मुळावर अशी काहीतरी म्हण पण आहे ना?) अशीच माणसं बघण्यात आली आहेत. कदाचित तुझे माझे चष्मे वेगळे असतील. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद अंतरा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आणि कविता आवडली. कधी-कधी मन अशा गर्तांमधे जातं खरं.
दुसर्‍या जन्माबाबत मात्र साशंक आहे. दुसरा जन्म म्हणायचं तर दुसर्‍या जन्माच्या वेदना खूपच जास्त आणि दुसरी आई खूपच दुष्ट असते असं म्हणावं लागेल. उलट काहीतरी माणसातलं संपून जातं आणि उरलेला माणूस आधीच्यापेक्षा वेगळाच वाटतो असं मला वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तरी अजुन नीट माहीत असलेली पण २ दा न जन्मलेली व्यक्ती भेटायची आहे. - दुसर्यांदा जन्म घ्यावा लागेल ताई. बाकी लेख मस्त होता. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. 'कित्येक चकरा मारल्या तरी ही ती भेटली नाही, अगदी सूर्यासारखी दुरूनच मोठ्या डोळ्यांनी घायाळ करत राहिली. शेवटी आईने निश्चित केलेल्या मुलीच्या गळ्यात हार घातला.(सौ.चे डोळे ही मोठे मोठे आहेत). दोन जन्म झालेच कि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ननि अन पटाईतजी धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॉलिड. जुने माझे लेख वाचताना जाम मजा येतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जिओ.. सुंदर लिहीलंय. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0