आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती? हॉटेलचा अॅम्बियन्स कसा होता वगैरे हवं ते लिहू शकता. पदार्थाचा फोटो असेल तर उत्तमच. अर्थातच हे फक्त खाण्याबद्दल नाही, तर पिण्याबद्दलही आहे
आधीच्या भागात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू करत आहोत.
=======
पुण्यातल्या टिळक रोडनजीक असलेल्या, लालन सारंगांच्या 'मासेमारी' हॉटेलात जाणं झालं.
सुरमई चांगली होती, नाही असं नाही; पण आता अॅज फार अॅज मच्छी इज कन्सर्न्ड, हेमंताशी तुलना होतेच आणि त्यापुढे बाकी ठिकाणचं 'ठीक' वाटतं, त्याला काही इलाज नाही.
चिकन आणि कोंबडीवडे चांगले होते.
दुसर्या दिवशी वैशालीत जायचं ठरलं. अस्सल पुणेकरांच्या या अभिमानस्थळाला पहिल्यांदाच जाणार असल्याने खूपच उत्सुकता होती.
पण तिथल्या कुंभमेळासदृश गर्दीपुढे आमच्या पेशन्सचा काही टिकाव लागू शकला नाही.
हेमंताशी हे काय आहे?
हे काय आहे?
ठाण्यातलं एक हॉटेल आहे
ठाण्यातलं एक हॉटेल आहे छोटस्सं.
ओह ओके.. धन्यवाद
ओह ओके.. धन्यवाद
अंगारकीबिंगारकीला ते बंद
अंगारकीबिंगारकीला ते बंद असतं. येऊन चापण्याचं ठरवलंत तर जरा पंचांग पाहून या... :(
वार्निंगसाठी आभार!
वार्निंगसाठी आभार!
आता जाणे आले. अरेरे.. मला
आता जाणे आले. अरेरे.. मला कसे माहीत नव्हते?
कुठेशी आहे हे हाटेल ?
.. डिनर बरे की लंच ? पार्किंगबिर्किंग आहे का?
बिट्टूदा ढाबा माहीत आहे का?
बिट्टूदा ढाबा माहीत आहे का? सर्विस रोडवर लुईसवाडीत शिरताना आहे ते? तिथून आत जायचं आणि पहिली डावी घ्यायची. लगेच आहे डाव्या हाताला छोटीशी टपरी. हेमंत स्नॅक्स.
ओह ओके.. राधिकाताईंनी किंवा
ओह ओके.. राधिकाताईंनी किंवा कोणीतरी एकदा लुईसवाडीतल्या चार टेबले असलेल्या छोट्या टपरीचा खास रेकमेंडेड म्हणून उल्लेख केला होता ती हीच असावी.. ओक्के , उत्तम. धन्यवाद.
होय, तीच ती.
होय, तीच ती.
सकाळी ११:३० ते दुपारी २:३० आणि रात्री ८ ते ११:१५.... अशा साधारण वेळा असतात. पण फारच लहान जागा. जेमतेम चार बाकडी. स्वच्छता आहे, पण थाट नाही. शिवाय गर्दी. सुरमई आणि पापलेट आणि कोंबडी. बस...
लहान जागा? बाकडी ? मग आमचे
लहान जागा? बाकडी ?
मग आमचे बूड तिथे टेकणे कठीणच आहे. पार्सल न्यावे अन गरम करुन खावे हे ब्येष्ट.
सुरमई आणि पापलेटच?
म्हणजे? मासे म्हणून तिथे फक्त सुरमई आणि पापलेटच ठेवतात की काय? ठाणेकरांच्या रुचीविषयी अनादर उत्पन्न होईल की काय, अशी भीती वाटू लागली आहे ;-)
आधी आदर होता असं गृहीतक आहे
आधी आदर होता असं गृहीतक आहे तुमच्या वाक्यात, ज्याबद्दल मला शंका आहे.
पण इतर मत्स्यावतारांकरता तितकासा चांगला बाजारचा स्रोत मला मिळालेला नाही, हे इथे खेदाने नमूद करणे भाग आहे...
पुण्यात "नाश्त्या"चे ठिकाण
पुण्यात "नाश्त्या"चे ठिकाण म्हणून अनेक काका सकाळी नाही का स्टॉल लावत. मोजके दोनतीनच पदार्थ.. म्हणजे बायकोने सकाळी उठून बनवलेले आणि तीन वेगवेगळया कॅसेरोलमधे भरुन आणलेले.
साबुदाणा खिचडी,
पोहे
आणि उपमा
..दॅट्स ऑल.
गारढोण गिळा आणि तीही ठराविक प्लेट भरल्या की "संपली" असे म्हणून कॅसेरोल पिशवीत टाकून घरी परत.
तरीही अमुकच्या बाहेर नाश्ता फार छान मिळतो अशी अभिरुची पुणेरी लोक्स दाखवतात आणि गर्दी करुन हे पदार्थ घेतातच.
त्यापेक्षा फक्त सुरमई, पापलेट आणि कोंबडी, पण गरमागरम देणारं स्पेशालिटी हॉटेल बरं.
(दोन्ही चित्रे शहराच्या एकूण अभिरुचीच्या दृष्टीने तितपतच रिप्रेझेंटिटिव्ह..!! :) )
पुणे तेच ठाणे... तेच उणे!
साबुदाणा खिचडी, पोहे आणि उपमा हीच ज्यांची चांगल्या नाश्त्याची परिसीमा असते त्यांनी 'फक्त सुरमई, पापलेट आणि कोंबडी'ला 'चांगला मांसाहार' म्हणावं हे सार्थच. मात्र, मत्स्याहाराच्या बाबतीत पुणेकरांहून खाडीकाठचे ठाणेकर अधिक साक्षेपी निघाले नाहीत ह्याचंच दु:ख वाटतं हो ;-)
इथे मिळणारी सुरमई चांगली
इथे मिळणारी सुरमई चांगली असते, इतकंच माझं विधान आहे. कृपया साक्षेपी-आवाका-गृहीतीकरण आणि सर्वसाधारणीकरण टाळावे ही साक्षेपी समीक्षकांना नम्र विनंती... ;-)
साबुदाणा खिचडी, पोहे आणि उपमा
पुण्याचेच तुम्ही.. खवचट बोलण्यात आम्हाला थोडेच ऐकणार..?!! :) तुम्हा पुणेकरांना दु:खे अन काळज्याच फार.
जंतू, या निमित्ताने सुरमई,
जंतू, या निमित्ताने सुरमई, पापलेट, बांगडा नी क्वचित हलवा सोडून इतर मत्स्याहारासाठी पुण्यातील ठिकाणे सांगा की. धागा वसूल!
बघ की. वर एवढं 'कुठले कुठले
बघ की. वर एवढं 'कुठले कुठले कप्पे हो?' विचारलंय नम्रपणे, तरी यांचं आपलं भलतेच किल्ले लढवणं चाललंय. :(
दाम करी काम!
ती सगळी महाग आहेत हीच तर माझी पुण्याविषयी तक्रार आहे! उदा. 'निसर्ग'मध्ये मांदेली, बोंबील, बांगडा मिळतात. मासेमारीमध्ये मुडदुशे, सौंदळे, म्हाकुलं मिळतात.
अपडेट : 'फिश करी राईस'मध्ये बांगडे, बोंबील आणि मुडदुशे मिळतात. शिवाय, तिन्ही ठिकाणी रावस आणि तिसऱ्या मिळतात.
पवईत आयायटी गेटच्या समोरच्या
पवईत आयायटी गेटच्या समोरच्या बाजूला एका गल्लीतल्या संतोष नामक टपरीमध्ये स'लि'ल यांनी एक बांगडा खाऊ घातला होता. तिथला गोमांसाचा पदार्थ तितका आवडला नव्हता. अंमळ चामट होता. पण बांगडा? अहाहा...
बदलापुरात 'मालवणी दरबार' नामक बर्याशा हाटेलात तळलेला बोंबील उत्तम मिळतो, असंही ऐकून आहे. पण तो चाखण्याचा योग अद्याप आलेला नाही.
>>मासेमारीमध्ये मुडदुशे,
>>मासेमारीमध्ये मुडदुशे, सौंदळे, म्हाकुलं मिळतात.
अत्यंत आभार! सध्या एखादवेळी महाग का होईना या गोष्टी मिळतील याचाच आनंद व्यक्त करतो आणि तुम्हाला नववर्षाच्या पौष्टिक शुभेच्छा देतो ;)
म्हाकुलं म्हणजे स्क्वीड काय?
म्हाकुलं म्हणजे स्क्वीड काय? एकदा असच जोशात येऊन ट्राय केलं. लय बोर होतं राव... वातड
स्क्विड
हो. त्याला माकुळसुद्धा म्हणतात.
तुम्हाला म्हाकुल म्हणजे "महा
तुम्हाला म्हाकुल म्हणजे "महा कुल" मासा वाटल्याने तुम्ही घेतला असेल ;)
+१ फॉर महा-कूल.
+१ फॉर महा-कूल.
हा हा, खरय. असंच एक मित्र
हा हा, खरय. असंच एक मित्र म्हणाला काय फक्त सुरमै पाप्लेट खातोस सारखा. हे खाऊन बघ...
होय स्क्विड काहीतरीच वातड
होय स्क्विड काहीतरीच वातड असतात. अमेरीकेत चायनीज बुफेमध्ये टोपलीभर असतात. मीठ-मिरी-मसाला लाऊन तळलेले (डीप फ्राय) दिसतातही छान पण बापरे. त्यांमुळे (वातडपणामुळे) मी कधीच घेत नाही.
अन दुसरे बेडकांचे पाय ठेवलेले असतात, जे की मी कधीही खाल्ले नाहीत. एकदम कसंतरीच वाटतं.
बेडकांचे पाय...
...मी खाल्लेले आहेत. एकदा(च).
तळलेला स्टायरोफोम (मराठीत: थर्माकोल) खाल्ल्याचे समाधान मिळते.
पाहा खाऊन. एकदा(च).
तुम्ही खाल्लेली माकुलं कशी
तुम्ही खाल्लेली माकुलं कशी केली होती? फ्राईड/स्टफ्ड/ग्रेवी? (कोणती पद्धत माहिती असल्यास अधिक छान)
विकत मिळणार्यांमध्ये गोअन व केरळी पद्धतीने केलेली माकुलं त्यातल्यात्यात बरी लागली होती.
------
मला आगरी-ख्रिश्चन पद्धतीने (उत्तन वगैरे भागांत) केलेले भरली माकुलं चांगली लागतात.
त्यांच्याचकडे काहि चांगल्या प्रसंगी व्हाईट वाईन घातलेल्या ग्रेवीतही माकुलं बनतात. (घालताच त्यातील अल्कोहोल जाळून टाकले जाते पण अरोमा उरतो). आणि त्याची चव अत्यंत जीवघेणी छान असते. पण अशी प्रीपरेशन्स विकत (हाटिलांत) मिळणार नाहीत हे खरंच!
मुंबईं परिसरात पॉप टेट्स
मुंबईं परिसरात पॉप टेट्स रेस्टॉरंटमालिकेत बटर गार्लिक स्क्विड खाऊन पहावा. मसालेदार नसूनही स्वादिष्ट.
ग्रेवीच होती. पण त्यात
ग्रेवीच होती. पण त्यात अल्कोहोल्चा वगैरे काही स्वाद नव्हता.
कोथरूड बागेसमोर मालवणी नाका
कोथरूड बागेसमोर मालवणी नाका नामक जागा आहे. स्वस्त आणि मस्त २०० ते ३०० दरम्यान फिश थाळी.
पात्रानी मासा, बोंबिल फ्राय उत्तम!
मालवणी पद्धतीची करी, भात आणि त्यात थोडीशी सोलकढी.. वाह..वाह..
बाकी पण प्रकार उत्तम असावेत असा अंदाज आहे.
कोथ्रूड बाग नक्की कुठेशी आली
कोथ्रूड बाग नक्की कुठेशी आली कोथरुडात? की नाव कोथ्रूड पण आहे दुसरीकडेच?
थोरात उद्यान, शिवाजी पुतळा
थोरात उद्यान, शिवाजी पुतळा
ओक्के. म्हणजे कर्वेपुतळ्याहून
ओक्के. म्हणजे कर्वेपुतळ्याहून जवळच ना? यश्वंत्राव नाट्यग्रुहाजवळ?
गेलोय एक्दा तिकडं. बरयं. तिखट
गेलोय एक्दा तिकडं. बरयं. तिखट जाळ होत्या पण एक दोन डिशेस...
लुईसवाडीत हे एवढंच मिळतंय
लुईसवाडीत हे एवढंच मिळतंय याबद्दल किरकीर वाचून "सिर्फ मामूलोग मासे खाते है" असं काही म्हणावंसं वाटलं.
आजचा कॅच
कुठलेही उत्तम मत्याहारी पदार्थ देणारे रेस्टॉरन्ट कायम ठराविक अशी माशांची यादी देत नाही.
याउलट, त्यांच्या बोर्डावर 'आजचा कॅच' अशा मथळ्याखाली मोजकी ५-६ माशांची नावे असतात. त्यातील कुठलेही मागवावे. उत्तमच असणार!
हा हा
पुण्यात फारतर "कालचा/परवाचा कॅच" किंवा "आज फ्रिझरमधून काय निघेल?" असे मथळे देता यावेत ;)
अंगारकीबिंगारकीला ते बंद
डुप्रकाटाआ
मी मासेमारीत गेलो नाहीये पण
मी मासेमारीत गेलो नाहीये पण मला पुण्यातलं कलिंगा आवडलेलं मत्स्याहारासाठी. पण फार पुर्वी तिथं खाल्लं असल्याने अता तिथे त्याच चवीचं मिळत असेलच ह्याची खात्री नाही. (एक वैयक्तिक मत - निसर्ग फार ओवर-हाय्प्ड वाटलं. असो, अता मी मांसाहार करत नाही आणि करत होतो तेव्हाही फार काही कळत नव्हतं).
निसर्ग फार ओवर-हाय्प्ड
मला ते चवीच्या मानाने ओव्हर प्राईज्ड वाटतं ;)
बादवे, मासेमारी आता बावधनला नुकतंच उघडलंय
ओके. दोन्ही नाही माहित.
ओके.
दोन्ही नाही माहित. :)
पुण्यात मासे
पुण्यात मासे मिळणारी रेस्टॉरंट्स दोन कप्प्यांमध्ये मोडतात - एका कप्प्यात मासेमारी, निसर्ग, फिश करी राईस वगैरे महागडी रेस्टॉरंट्स असतात. ती झोमॅटो किंवा गूगल मॅप्स वगैरेंवर सहज सापडतात. दुसऱ्या कप्प्यात छोटी छोटी स्वस्त रेस्टॉरंट्स असतात. ती चालता चालता अपघातानंच सापडून जातात. परवाच सहज चक्कर मारता मारता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला (राजा मंत्री रोड आणि पटवर्धन बाग रोड परिसरात) एक रेस्टॉरंट दिसलं. आता त्याचं नावही आठवत नाही, पण 'रेस्टॉरंट अँड बार' अशी पाटी अपेक्षित होती त्याऐवजी रेस्टॉरंट अँड सीफूड' अशी पाटी दिसली म्हणून गेलो. कोकणी माणसानं चालवलेलं असावं. बांगड्याचं कालवण सुरेख होतं.
हे असे कप्पे सगळ्याच
हे असे कप्पे सगळ्याच खाद्यपदार्थांच्या बाबतीत आणि पुणंच काय सगळ्याच ठिकाणी असावेत.
>> हे असे कप्पे सगळ्याच
पुण्यात शाकाहारी आणि चिकन जेवण्यासाठी पर्याय खूप आहेत आणि किंमत/दर्जानुसार त्यांचे अनेक कप्पे करता येतात, पण मासे आणि मटण म्हटलं की असे दोनच कप्पे आढळतात.
कुतूहल
कुठलेकुठले कप्पे हो?
- साळसूद मेघना
तुमच्या आधीच्या प्रतिसादात
तुमच्या आधीच्या प्रतिसादात 'बहुपरिचित/प्रसिद्ध/सहज माहिती मिळवता येण्यासारखे (ज्याला तुम्ही महाग गृहित धरलंय) v/s हिडन जेम्स/कमी परिचित पण उत्तम (ज्याला तुम्ही स्वस्त गृहित धरलंय)' असे जे तुम्ही दोन कप्पे केलेत (केल्येत ना? की मला उगाच असं वाटतंय?) ते कप्पे सगळ्याच खाद्यपदार्थांच्या बाबतीत (फक्त मासे नाही) आणि सगळ्याच ठिकाणी असणार (फक्त पुणे नाही) असं म्हणायचं होतं मला.
पुण्यात शाकाहारी आणि चिकन जेवण्यासाठी पर्याय खूप आहेत आणि किंमत/दर्जानुसार त्यांचे अनेक कप्पे करता येतात >>
शाकाहारी आणि चिकन विकणारेपण नवनवे पर्याय येत असावेत आणि ते पण त्या दोन कप्यात कधी ना कधी मोडत असावेत.
असो.
>> तुमच्या आधीच्या प्रतिसादात
सुपरिचित, गर्दी असणारे पण किंमत वरच्या दोन टोकांच्या दरम्यानची असणारे आणि दर्जाही चांगला / सरासरी असणारे पर्याय शाकाहारी आणि चिकनच्या बाबतीत अधिक प्रमाणात उपलब्ध आहेत.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या
नोंद घेतली आहे. :)
आभार
देवबाप्पा शोल
देवबाप्पाटी.एम. शोल असले विचित्र नाव असलेले हॉटेल नर्हे गावाच्या फाट्याला, नवले ब्रिजच्या बाजूला आहे.
नववर्षानिमित्त आत्ताच तेथे नेण्यात आले, तेव्हा बांगडा आणि रावस खाल्ले. सपक खाऊन विटलेला जीव शमवण्याचा प्रयत्न केला. किमती जराशा जास्त आहेत, दोन माणसांचा खर्च साडे-तीनशे/चारशे पर्यंत होऊ शकतो. मालवणी, मराठा अश्या पद्धतीने मिळण्याची सोय आहे. कालवण उत्तम होते. परंतु काही गोष्टी खटकल्या त्या : माशांच्या कालवणाबरोबर चपाती किंवा भाकरी मिळण्याची सोय नाही. तंदुरी रोटी आणि मासे हे कॉम्बीनेशन मला पटत नाही. जर तुम्ही माशांचे स्टार्टर्स घेणार असाल तर गंडाल. सहाच पीस दिले जातील. तेव्हा त्याऐवजी कालवण घ्यावे. स्वतंत्र रित्या माशांचे स्टार्टर्स घेतलेत तर बजेट वाढेल. इतर तंदुरी चिकन-बिकन खाण्यात हशील नाही. भात खाणार्यांसाठी सावधान, फुल राईस दोघांसाठी पुरू शकतो. स्टीम्ड राईस मागवावा. पण तोही बिर्याणीचा लांबडा तांदुळ असल्याने थोडा हिरमोड होण्याची शक्यता आहे. खेकडे (बोनलेस/बोनी ??? असे प्रकार) मिळतात, पण महाग आहेत. त्यामुळे डाव लावावा लागेल. दारू मिळते.
पार्सल देतात की ते ठाऊक नाही पण देत असावेत असा अंदाज आहे. वरील वर्गीकरणानुसार हे पहिल्या वर्गातच/कप्प्यात बसावे.
ब्रिटिश ब्रूईंग कंपनी
ठाण्यातील विवियाना मॉलस्थित ब्रिटिश ब्रूईंग कंपनीत कुणी गेले आहे काय?
प्लॅन पेंडिंग आहे. येता काय
प्लॅन पेंडिंग आहे. येता काय ? चला.
रामदासकाका आहात का? थत्तेचाचा ?
चलतोच!
एकदा पहायचं होतच. गेला आहात काय? कसं वाटलं?
तारीख-वेळ फिक्स करूया. निघालोच!! ;)
काय म्हणता रामदास आणि थत्ते?
अद्याप बाहेरुनच बघितलंय. आत
अद्याप बाहेरुनच बघितलंय. आत जाण्याची इच्छा आहेच भरपूर. म्हणून विचारलं.
(अतिअवांतर कुतूहलात्मक शंका)
'बोलाईचे मटण' या संज्ञेचा नक्की अर्थ काय? ('बोलाई' बोले तो?)
................................
('कारण शेवटी आम्ही भटेच! त्याला काय करणार?' - पु.ल.)
बोल्हाई देवीचा संदर्भ
शिर्काई, बुधाई , शिवाई वगैरे कमी परिचित स्थानिक देवींची नावे ऐकली आहेत.
बोल्हाई देवीच्या भक्तांना (एका विशिष्ट परिसरातील एका विशिष्ट समाजाला/जातीतल्या लोकांना) बोकडाचे मटन चालत नाही.
त्यांना मेंढीचे का कोणत्यातरी इतर प्राण्याचे मटन चालते.
तर "बोल्हाई देवीच्या भक्तांना चालणारे मटन " म्हणजे बोलाईचे मटन असा अर्थ आहे.
ते बहुतेक अधिक तेलकट्/स्निग्ध/"ओशट" असते.
त्यामुळेच ते प्राबल्याने जिथे अधिक सेवन केले जाते तिथे ओशट/वशाट हा शब्द कित्येकदा विशेषण म्हणून भाषेत वापरला गेलेला दिसतो.
.
.
अंदाज :-
बहुतेक आपण रुढार्थाने ज्याला पश्चिम महाराष्ट्र म्हणतो; तिथे ही डिश अधिक लोकप्रिय आहे.
धनगर मंडळींकडे अधिक चालत असावी.
अर्थात हा फक्त अंदाज.
धन्यवाद
माहितीकरिता धन्यवाद.
अच्छा, म्हणजे ते बोकडाचे मांस नसते तर.
१. स्पेसिफिकली कोणत्या प्राण्याचे असते?
२. 'येथे खास बोलाईचे मटण मिळेल' अशी पाटी लावलेल्या खाणावळींत, बोलाईभक्तांकरिता खास त्या ज्या कोठल्या वेगळ्या प्राण्याचे असेल ते मांस आणि बिगरबोलाईभक्त गिर्हाइकांकरिता बोकडाचे मांस, अशी वेगळी व्यवस्था असते काय?
३. बोलाईभक्तांपुरती वेगळ्या मांसाची व्यवस्था करणे हे खाणावळचालकास आर्थिकदृष्ट्या घाट्याचे जाणार नाही, इतका त्या मांसास खप/उठाव/मागणी असावी काय? बोले तो, बोलाईभक्तांचे इतके संख्याप्राबल्य असावे काय?
जास्ती आयड्या नै ब्वा
जास्ती आयड्या नै ब्वा
...
ही पुरवणी नंतर वाचली.
रोचक माहितीकरिता पुनश्च आभार.
उत्तरे
१. स्पेसिफिकली कोणत्या प्राण्याचे असते?
मेंढीचे
२. 'येथे खास बोलाईचे मटण मिळेल' अशी पाटी लावलेल्या खाणावळींत, बोलाईभक्तांकरिता खास त्या ज्या कोठल्या वेगळ्या प्राण्याचे असेल ते मांस आणि बिगरबोलाईभक्त गिर्हाइकांकरिता बोकडाचे मांस, अशी वेगळी व्यवस्था असते काय?
हो.
३. बोलाईभक्तांपुरती वेगळ्या मांसाची व्यवस्था करणे हे खाणावळचालकास आर्थिकदृष्ट्या घाट्याचे जाणार नाही, इतका त्या मांसास खप/उठाव/मागणी असावी काय? बोले तो, बोलाईभक्तांचे इतके संख्याप्राबल्य असावे काय?
हो. किंबहुना बोलाईभक्तीशी संबंध नसूनही मला लहानपणी फक्त बोलाईचेच मटण माहिती होते. ह्या मेंढीच्या मटणाचा संबंध बोलाईदेवीशी आहे हे आताच कळले. :) निदान आमच्या गावातील मटण शॉप वाल्यांचा नॉन-मुस्लिम ग्राहकांचा बहुतांशी बिझनेस हा बोलाईचाच असायचा.
आभार
सविस्तर माहितीकरिता धन्यवाद.
माहितीसाठी थँक्स मनोबा. आणखी
माहितीसाठी थँक्स मनोबा.
आणखी एक.. मटणाबाबतीत मांडीला रान का म्हणत असावेत ? कुठून उद्भवला असेल हा शब्द. अरबी फारशी वगैरे की कसे?!
फारसी
फारसीत 'रान' म्हणजे मांडी.
अच्छा!
म्हणजे विदर्भाप्रमाणेच इराणातही कशासही काहीही म्हणतात तर.
('माहितीपूर्ण' अशी श्रेणी देत आहे.)
धन्यवाद! पंजाब ग्रिल मध्ये
धन्यवाद! पंजाब ग्रिल मध्ये "रान हरीसिंग नलवा" खाल्लं होतं तेव्हा विचारायचं राहून गेलं होतं. मसाल्यात गुदमरलेलं रान होतं ते (मेंढीचं असावं बहुतेक हरीसिंग नलवाची फक्त रेशिपी.)
पंजाब ग्रिल ओव्हरहाईप्ड वाटलं.
बोलाई
माहिती बरोबर वाटते आहे.
आमचा एक मित्र आम्रविकेत असताना लॅमचे मटण खायला तयार असायचा परंतु भारतीय/पाकिस्तानी दुकानातून गोटचे मटण आणायला मात्र नाखूष!
होता देशावरचाच. जात/समाज (अर्थातच) मी विचारली नव्हती/त्याने सांगितली नव्हती.
मला वाटतं बोलाईचं म्हणजे
मला वाटतं बोलाईचं म्हणजे मेंढीचं मटण. बोकडाचं जरा गेमी असतं तसं मेंढीचं नसतं पण फॅट थोडं जास्ती असतं वाटतं.
देव्यांच्या नावावरून
देव्यांच्या नावावरून आठवलं.
कोकणात संगमेश्वरजवळ कुठेतरी (एक्झॅक्ट लोकेशनबद्दल जरा साशंक आहे) 'काळकाई'(की असंच काहीतरी देवीचं नाव, बहुदा काळकाईच) नावाची एक टपरी होती. चार बांबू रोवून वर ताडपत्रीचं छत आणि बसायला जुनी पुराणी बाकडी. अतीव साधं. पण तिथलं भाकरी-चिकन कायच्याकाय उत्कृष्ट होतंसं स्पष्ट आठवतंय.
रुढार्थाने पश्चिम महाराष्ट्र नसावा
रुढार्थाने पश्चिम महाराष्ट्र म्हटल्यावर जे समोर येते ते बारामती, सातारा, कराड वगैरे परिसरात तरी बोकडच लोकप्रिय आहे. बोलाईचे मटण नगर जिल्हा व पुणे जिल्ह्याचा उत्तर-वायव्य भाग इथे जास्त लोकप्रिय आहे.
कोल्हापूर????? तिथेही स्वच्छ
कोल्हापूर????? तिथेही स्वच्छ व ताजे बोल्हाईचेच मटण मिळते.
‘मेतकूट’™ - Culinary Heritage of Maharashtra
·
कल्पना करा बरं... की तुम्ही सहकुटुंब एखाद्या हॉटेलात गेला आहात... आणि ऑर्डर केली आहे की आम्हाला सुरुवातीला दोन सोलकढी, एक मुगाचे कळण - दोघांत एक, सोबत एक प्लेट कोथिंबीर वडी, एक प्लेट अळूवडी द्या. नंतर जेवणासाठी एक प्लेट अळूची पातळ भाजी, एक प्लेट डाळींब्यांची उसळ, चार घडीच्या पोळ्या, मसाले भात, दोन बाजरीच्या भाकर्या आणि एक वांग्याचे भरीत द्या. सर्वात शेवटी आंबा पियुष व रस शेवई दोघांमध्ये चार द्या !
तिथला स्टिवर्ड तुम्हाला सुचवतोय की कधीतरी त्यांच्याकडच्या कोळाचे पोहे, केळ्याची तिखटगोड भजी, शहाळ्याची भाजी, मुगाची सावजी उसळ, कुळथाचं पिठलं, पाकातल्या पुर्या, रताळ्याचा कीस अशा 'मेतकूट खास' पदार्थांचाही तुम्ही आस्वाद घ्यावा...
तुम्ही म्हणाल, काय राव..... आज भंकस करायला दुसरं कोणी भेटलं नाही का?
आहो... ही आता कल्पनेतली गोष्ट नाही. ठाण्यात सुरु झाले आहे. मराठी आहारसंस्कृतीचे खाद्यपीठ ! कोकण, कोल्हापूर, मराठवाडा, विदर्भ, नाशिक अशा ठिकठिकाणचे पारंपरिक खाद्यपदार्थ आता मिळतील ... ‘मेतकूट’™ - Culinary Heritage of Maharashtra मध्ये.
नवीन वर्षात १ जानेवारी रोजी शुभारंभ होत असलेल्या या नवीन खानपानगृहास आवर्जून सहकुटुंब, सहपरिवार भेट द्या. आपल्या सोसायटीमधील, कार्यालयातील खन्ना, गिडवानी, अय्यर, चटर्जी यांनाही घेऊन जा. त्यांनाही कळूदे अस्सल चव महाराष्ट्राची !
पत्ता - १,२, वाटीका सोसायटी, घंटाळी देवी पथ, नौपाडा, ठाणे (प) संपर्क - ०२२२५४१०८२१
किरण भिडे यांनी हे हाॅटेल सुरु केलं आहे. ही कल्पना आवडल्यास इतरांकडे हे मेसेज पाठवा. आवर्जून 'मेतकूट'ला भेट द्या.
C/P-Suruchi Gurjar
धन्यवाद
धन्यवाद!
नोंद घेण्यात आली आहे. लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न केला जाईल, हे नक्की.
डिस्कवरी /स्ट्रीट फुड
डिस्कवरी /स्ट्रीट फुड /रिवाइवल रेस्टो-क्रॉफर्ड मार्केटजवळ दाखवलं. कसं आहे ?कोणी गेलं आहे का ?
[र्यांडंम =उटपटांग /भंपक /शेंडाबुडखा नसलेलं /अनिश्चित /तारतम्य नसलेलं /अंदाजपंचे ?]
कोरेगाव पार्कातल्या दारिओ'ज
कोरेगाव पार्कातल्या दारिओ'ज नावाच्या हाटिलात गेलो होतो. फोकाचिया, एक सॅलड (नाव विसरलो) आणि स्ट्रॉंबोली पिझ्झा हे खाल्लं. जोडीला दारिओ'ज हाऊस वाइन. अप्रतिम होतं सगळं! मजा आली.
पण एक समजलं नाही. प्युअर वेज इटालियन हाटेलांचं काय फॅड आलय समजत नाही. लिटील इटली, औंध ला एक ऑलिव्स अॅण्ड ग्रीन्स आणी आता हे, ही तीनही हाटेलं प्युअर वेज आहेत. यामागे काही कारण आहे काय? की इटालियन अन्न हे मूळ शाकाहारीच असतं वगैरे?
पण एक समजलं नाही. प्युअर वेज
अगदी सहमत. आम्ही पण परवा कोरेगाव पार्कातल्या (ए.बी.सी. फार्म) 'द बेसील डेक' नावाच्या रेस्टॉरंट मधे गेलो होतो, हे ही एक इटालियन व्हेजीटेरीयन रेस्टॉरंट आहे. बाकी पदार्थ उत्कृष्ट होते. पास्ता, रिझोटो विथ पेस्तो सॉस विशेष मस्त. पण फार व्हराईटी नाहीये मेनू मधे, सुदैवाने जे काही थोडेफार पर्याय आहेत ते चांगले आहेत (जे घेतले नाहीत/ट्राय केले नाहीत ते ही चांगले असावे).
एक अवांतर प्रश्न - ह्या बर्याच फाईन डाईन रेस्टॉरंट मधे पहिले विचारतात ' रेग्यूलर वॉटर ऑर मिनरल', मग आपण रेग्यूलर म्हणालो की जे पाणी येतं त्याला त्या बोअरवेल च्या पाण्याची एक विशिष्ट चव असते. अता पुणे, मुंबई, नाशिक (बाकी शहरांचा अनुभव नाही) इथल्या शहरात डायरेक्ट नळाला जे पाणी येतं म्हणजे अगदी वापराच्या पाण्याच्या नळालाही असल्या चवीचं पाणी येत नाही, मग हे लोक काय मुद्दाम असं बेचव पाणी देतात का? म्हणजे मग लोकांनी झक मारत मिनरल वॉटर घेतलं पाहीजे? आणि २० रु. ची बाटली ४०-५० रु. विकायची.
पुणे तेथे सकलमांसभक्षण उणे...
एके काळी खरं इटालियन जेवण पुण्यात ज्या किमतीत मिळत असे ती फारशा नेटिव्हांना परवडत नसे. ओशो आश्रमातल्या फिरंग्यांना मात्र ती परवडे. मात्र, ओशो आश्रमातले फिरंगी बहुशः शाकाहारी असत. त्यामुळे ही रेस्तराँ शाकाहारी असत. (हे बंड गार्डन रोडवरच्या 'लिटल इटली'त त्या काळी मला मिळालेलं अधिकृत उत्तर आहे.) आता नेटिव्हांना हे जेवण परवडू लागलं आहे, पण त्यांतही भारतीय मसाल्यांच्या वर्षावात न चिंबलेल्या, किंवा इटालियनांच्या मते शिजलेल्या (पण अनेक नेटिव्हांच्या मते अर्धकच्च्या) मांसाहाराचे भोक्ते कमीच आहेत. शिवाय, पुणेरी वणिकांची बाळंदेखील (जैन, मारवाडी, इ.) शाकाहाराची भोक्ती आहेत. तद्वत...
शिवाय, पुणेरी वणिकांची
+१. ज्यांना मांसाहारी हाटेलातलं वेजही चालत नाही त्यांना आकर्षित करण्याची ट्रिक वाटतीये ही.
रोचक स्पष्टीकरण! माझ्याही
रोचक स्पष्टीकरण! माझ्याही मनात असाच प्रश्न होता खरा. उत्तराबद्दल बहुत धन्यवाद.
इंट्रेष्टिंग. पण मग हे
इंट्रेष्टिंग. पण मग हे चायनीज, थाई, इ. हॉटेलांबाबतही लागू व्हायला पाहिजे.
मसालेदार बोनलेस चिकन
चिनी वगैरे पदार्थ मसालेदार करता येतात. भरपूर शिजवलेलं बोनलेस चिकन घातलेले काही पुरेसे मसालेदार पदार्थ मिळत असतील, तर तशी ठिकाणं पुष्कळशा भारतीय मांसाहारींना चालून जातात.
आहेत
घराजवळच एक शुद्ध शाकाहारी चीनेतर दक्षिण अशियायी रेस्टॉरन्ट (बोले तो थाइ, कोरियन, विएतनामी, जपानी इ.इ.) चालू झालय. अद्याप जाणे झाले नाही पण लवकर जाऊन येईन म्हणतो.
कोथरूड मधल्या शिवतीर्थ नगर
कोथरूड मधल्या शिवतीर्थ नगर च्या कमानीमधून आत जायचं . उजव्या बाजूला झकास non-veg नावाच छोट शॉप कम टपरी आहे . फ़क़्त संध्याकाळी ७ ते ९ या वेळात उघडी असते . फक्त पार्सल मिळत . तिथल्या चिकन ची चव कातिल असते . कोथरूड मधल्या लोकांनी लाभ घ्यावा . दोन तासात चिकन संपत . तेल मसाले तिखट याचा सढळ वापर असतो . जहाल चव असते . त्याच्याकडे पोळ्या असतात . त्या पण छान . कधी मधी फिश पण असत . ह्याची टपरी पहिले मोरे विद्यालय स्टोप समोर होती .
सबवेमधली सँडविचेस बरी लागतात
सबवेमधली सँडविचेस बरी लागतात की चवीला! उगीच गेलो नव्हतो इतके दिवस.
वेल्कम तु द क्लब! माझ्याकडे
वेल्कम तु द क्लब!
माझ्याकडे काय हा हुच्चभ्रु/आम्रिकाळलेला मुलगा असा दयार्द्र कटाक्ष टाकणार्या कैकांची हे सँडविच खाल्ल्यावर हीच रिअॅक्शन होती! :)
इतका ताजा ब्रेड नी त्यात छान ताज्या भाज्या असल्यावर का वाईट लागेल?
माझी जीभ फारच भारतीय आहे मग.
माझी जीभ फारच भारतीय आहे मग. कधीतरी एखाददा बरी लागतात. पण निवड करायची झाल्यास, मला सपक चवी तितक्या नाही आवडत. कदाचित रोजच मसालेदार खाल्ल्यावर आवडतीलही...
एकाहून एक उत्कृष्ट सब्ज असतात
एकाहून एक उत्कृष्ट सब्ज असतात तिथे...आपले फेवरिट आहे. सॉसेस स्वतः निवडून घ्यावीत. आवडत नसल्यास स्वच्छपणे आंबटपणा आणणारे पोटेन्शियल पदार्थ कमी घालायला सांगावेत. यांच्या सँडविचमधे एकच धोका असतो तो चव आंबट होण्याचा.
आंबटषोकीनांना तर त्याचेही
आंबटषोकीनांना तर त्याचेही टेन्षन नस्ते.
तदुपरि नेक्ष्ट टैम तिथे फूटलाँग सँडविच खावे असा बेत आहे. पाहू.
अगदी अगदी....ताजा ब्रेड हे
अगदी अगदी....ताजा ब्रेड हे मेन अॅट्रॅक्षन.
तदुपरि जरा स्पायसी बनवावयास सांगून त्यात यालापेनो जरा जास्ती टाकावयास सांगितले की भारतीय आवडींचीही पूर्तता होतेच.
...
यालापेनो नव्हे बरे का, माष्टर ब्याटम्यान, हालापेन्यो! हालापेन्यो!!
- 'न'. बा. ठिगळे (सर!!!)
हयगय
हालापेन्योच्या बाबतीत कसलीच ह-य-गय चालणार नाही ;)
ओह अच्छा, माहितीकरिता
ओह अच्छा, माहितीकरिता धन्यवाद! तरी नशीब, शुद्ध तुपातला 'जालापेनो' हा उच्चार नै केला. ;)
होय होय.. नवी बाहू यांचे
होय होय.. नवी बाहू यांचे होग्य उच्चारासाठी आभार.
हेलोपेन्यो आणि ऑलिव्हज नाही
हेलोपेन्यो आणि ऑलिव्हज नाही आवडत त्या सँडवीच मधे. बाकी भरपूर मेयोनीज टाकलेले आणि ग्रिल केलेले ब्रेड आणि पाणीदार फ्रेश लेट्यूस ची चव... अहाहा.. मस्तच!
प्रत्येक शब्दाशी सहमत.
प्रत्येक शब्दाशी सहमत. हालापेनो अन ऑलिव्ह्ज कटाप करुन सर्व उत्तम. ऑलिव्ह्ज तरी परवडले. करवंद समजून खायचे.
मी भारतातल्या सबवे मधून कांदा
मी भारतातल्या सबवे मधून कांदा नी ढोबळी मिरची वगळतो. भारताबाहेर घेतलं तर नुसता कांदा वगळतो. बाकी सगळं घालतो.
सॉसमध्ये नुसता मस्टर्ड सॉस (हनी मस्टर्ड चालतो) कधीही घालत नाही. शिवाय कोणते सँडविच आहे, कोणता ब्रेड आहे, चीज मध्ये व्हरायटी अव्हेलेबल असेल तर कोणते चीज आहे त्यानुसार आणखी एक-दोन सॉस घालायचे की नाही ते ठरवतो.
माझी जीभ तितकीशी मसालेदार/चटकदार/द्राष्ट चवींची प्रेमी नाही. (पंजाबी म्हणून ज्या तीन ग्रेव्ह्यांवर आधारीत भाज्या हाटिलांत/लग्नांत/हल्ली बहुतेक सर्वत्र दिल्या जातात त्यांचा तर मी द्वेष्टा आहे). त्यामुळे की काय माहिती नाही ऑलिव्ह्ज, यलापिनो (आम्ही नाही म्हण्णार हालापेनो, त्या सबवेवाल्यालाच नै कळायचे ;) ) - नी बहुतांश मंडळी टाळतात तो हनी-मस्टर्ड नावाचा गोडूस सॉस किंवा मिंट सॉस वगैरे मी आवडीने खातो.
'सुला'ची दिंडोरी नावाने विकली
'सुला'ची दिंडोरी नावाने विकली जाणारी शिराझ प्यायली. बरी लागली. भारतात आणखी कोणत्या रक्तवारूण्या चांगल्या मिळतात?
इतकी ड्राय आवडली? पसंत अपनी
इतकी ड्राय आवडली? पसंत अपनी अपनी.
आता ही स्वस्त आणि मस्त घ्या:
:D
Image from http://www.indianwineacademy.com
वाईन ड्राय असते म्हणजे नक्की
वाईन ड्राय असते म्हणजे नक्की कशी असते. तोंडाला कोरड वगैरे पडते काय ती प्यायल्यावर?
साखरेचे प्रमाण कमी
http://en.wikipedia.org/wiki/Dryness_%28taste%29
आम्हां कडवट लोकांना
आम्हां कडवट लोकांना दिंडोरीपेक्षा जास्त कोरडी वारुणीही आवडते. त्यामुळे फार चढल्याशिवाय पोर्ट वाईनला तोंड लावणे नाही.
ड्रायची टेस्ट ज्यांची डेव्हलप
ड्रायची टेस्ट ज्यांची डेव्हलप झाली आहे त्यांना शिराझच वन ऑफ द बेस्ट आहे. ब्रँड कोणता चांगला ते ठरवणं कठीण आहे पण सुलाची शिराझ चांगली आहेच.
टायगर हिल (नाशिकचाच) ब्रँडही चांगला आहे. ड्रायमधे Tiger hill Siraz & Merlot (अतिड्राय) दोन्ही उत्तम.
पोर्ट वाईन ही डिझर्ट वाईन
पोर्ट वाईन ही डिझर्ट वाईन आहे. जेवण झाल्यावर घेतात. अतिगोड असते (माझ्यामते) त्यामुळे एव्हढी आवडत नाही.
त्यापेक्षा कोन्याक एक्स.ओ. (रेमी मार्टिन किंवा मार्टेल) किंवा चॉकलेट लिक्युअर (गोडायव्हा) ट्राय करून बघा कधीतरी जेवणानंतर.
व्हॅलेंटाईन डे येतोच आहे पुढच्या आठवड्यात. ;)
.
फोर्टात बर्मा-बर्मा येथे या
This comment has been moved here.
कर्वे रोड ला कोथरूड च्या
This comment has been moved here.
हो मस्तय हे हॉटेल. खूप पुर्वी
This comment has been moved here.