ही बातमी समजली का? - ४९

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा/जाईल.
===========

(मोदी प्रणित - मेक इन इंडिया मधील) मॅन्युफॅक्चरिंग वरील अतिरेकी भर

यातले डॉ. राजन यांचे हे वाक्य जास्त लक्षणीय आहे - "...I am counselling against an export led strategy that involves subsidising exporters with cheap inputs as well as an undervalued exchange rate, simply because it is unlikely to be as effective at this juncture," he added.

.
.
.
.

field_vote: 
0
No votes yet

Corporate Germany on the cusp of a gender revolution

The bill, which is now moving to Parliament for final approval, will require large listed companies to fill 30% of their supervisory board seats with female non-executive directors and force thousands of large and midsize businesses to set binding targets for women top managers.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑस्ट्रेलियात लिंट चॉकलेट्च्या दुकानात काहीतरी मोठा होस्टेज क्रायसिस चालू आहे इतके कळले. हपीसात जास्त माहिती मिळवता येत नव्हती. आता गूगलून पाहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बातमी.
Man who has hostages in an Australia cafe is a self-styled Muslim cleric, official source says.
Sydney gunman reportedly demands ISIS flag as some hostages escape.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओलिस ठेवण्यात आलेल्या लोकांची सुटका करण्यात आली आहे. २ व्यक्तींना आपला प्राण गमवावा लागला आहे. बंदूकधारी व्यक्तीही पोलिसांच्या गोळ्यांनी मारली गेली आहे. या संकटामधून भारतीय लोक जिवंतपणे सुटले आहेत.

Hostage Crisis

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगातल्या सगळ्याच राष्ट्रांनी मिळून ही ISIS ची विषवल्ली कायमची संपवली पाहिजे. एक समजत नाही बाकी राष्ट्र इराण, रशियावर आर्थिक निर्बंध आणून त्यांना जेरीस आणतात तर ISIS ची अशी आर्थिक कोंडी का करू शकत नाहीत ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साधे सरळ जगू इच्छिणार्‍या मुस्लिम लोकांची तर डबल वाईट अवस्था होतेय. उदा. लोकल ट्रेनच्या इत्यादि स्फोटांत किंवा ओलीस प्रकरणात सापडून जीव जाण्याची शक्यता /रिस्क ही इतर धर्मीय नागरिकाइतकीच आणि वरुन सार्वजनिक पातळीवर वाढत चाललेला घाऊक तिरस्कार, त्यातून उद्भवू शकणारी वाढीव व्यक्तिगत हानीची रिस्क, संशयाच्या सुया, अधिकचे चेकिंग, स्क्रुटिनी, डावलले जाणे, अपमान असे बरेच काही जास्तीचे पोटेन्शियल डॅमेज...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+कितीही वेळा अनुमोदन!

माझे कित्येक अल्पसंख्यांक मित्र, मुस्लिमच नाहीत विविध प्रकारे अल्पसंख्य - धार्मिक, जातीय, भाषिक इत्यादी - त्यांचीही हीच व्यथा आहे.
नी गंमत अशी त्यातील कित्येक जण ज्या टर्म्सवर बहुसंख्यांत असतो तिथे मात्र अल्पसंख्यांकांबद्दल सहिष्णुता दाखवतोच असे नाही.

उदा. माझा एक मुस्लिम मित्र वरील प्रमाणे भारतात व्यथित/भयशंकीत वगैरे असला तरी "अल्पसंख्य ज्यूंना त्यांचा देश दिलाय ना! मग इतरत्र त्यांना ठेचून मारले पाहिजे" अशा जहाल मताचा आहे!
किंवा एका मागासवर्गीय जातीतील मित्राच्या व्यथा कितीही सच्च्या असल्या तरी त्याचे समलैंगिकांबद्दल अशाच स्वरूपाचे जहाल मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बहुजन आणि अल्पसंख्याक हे विरुद्धार्थी शब्द आहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

नाही. मी बहुसंख्य वापरलाय ना? बहुजन कुठे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हो तुम्ही बहुसंख्यच म्हटलं आहे. मी एक शंका विचारली जनरल की बहुसंख्य आणि बहुजन यात फरक काय अशी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

एकेकाळी माझे मुख्यतः मुस्लिम मित्रच होते. कारण तामिळनाडूत जिथे मी हॉस्टेल म्हणून राहात होतो तिथे तसा योगायोग घडला होता. त्यांच्यासोबत रोजचे उठणेराहणे, रमजानच्या महिन्यात पहाटे उठून त्यांच्यासोबत खाणे, गप्पागोष्टी, खेळ, पत्ते-बुद्धिबळे असे सर्व चालायचे. पण एरवीच्या नॉर्मल विषयांवरच्या चर्चेत धर्माकडे झुकणारा विषय जरा जरी निघाला तरी धक्का बसेल आणि चकित होऊ इतका कडवेपणा अन कडवटपणा वर यायचा. तो एक विषय निघाला की व्यक्ती बदलूनच जायची. डोळ्यांवर पूर्ण पडदा. नो अपील, नो चेंज, नो डिस्कशन. देश, मित्र, संबंध, दैनंदिन कामकाज हे सर्व एका पातळीवर , पण तो एक विषय घेतला तर या सर्व इतर प्रायॉरिटीज एकदम एकत्रित निखळून दहाव्या क्रमांकावर जायच्या.

लहानपणापासून ज्यांच्यासोबत मोठा झालो असे अत्यंत प्रेमळ फॅमिली फ्रेंड मुस्लिम काका एक दिवस सहज उदाहरण देताना म्हणाले की "बताओ अगर एक मुसलमान को एक "क्ष्क्ष" दिखा और हिंदू दिखा तो वो किसको मारेगा?"

हे मला सर्वथैव अनपेक्षित होतं. त्यांच्यामते "क्ष्क्ष" अत्यंत वाईट असतात.. पण ते पटविण्यासाठी दिलेल्या उदाहरणात नकळत कुठेतरी आपण काय बोलतोय हे त्यांच्या लक्षातच आलं नव्हतं.

धर्म एकतर कोणताही नसावाच.. पण हे आयडियल झाले. तो असणं अपरिहार्य असेल तर तो फ्लेक्झिबल असावा. बंदिस्त नव्हे.

हिंदू कट्टरांनीही असे धक्के दिलेच आहेत. त्यावरुन हे किती खोल रुजलेलं आहे ही अस्वस्थ जाणीव होते..

सर्व धर्म बारा गडगड्याच्या विहिरीत घालून काही गाण्यागिण्याचं बोला अशी रावसाहेबांसारखी कितीही इच्छा केली तरी तसं होताना दिसत नाही याचं वाईट वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लहानपणापासून ज्यांच्यासोबत मोठा झालो असे अत्यंत प्रेमळ फॅमिली फ्रेंड मुस्लिम काका एक दिवस सहज उदाहरण देताना म्हणाले की "बताओ अगर एक मुसलमान को एक "क्ष्क्ष" दिखा और हिंदू दिखा तो वो किसको मारेगा?"

अरब लोक 'डीसेंट फ्यामिली मेन, सिटिझन्स' असू शकत नाहीत???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ्यामिली मेन नव्हे हो.. फ्यामिली फ्रेंड.. म्हंजे माझ्या घरातल्या सर्वांचे मित्र. प्रेमळ वगैरे ही विशेषणं त्यांच्याविषयी होणार्‍या इंप्रेशनची.

बादवे.. आता ते प्रेमळ होते हे आवर्जून सांगायची गरज काय इत्यादि असे प्रश्न कोणी उत्पन्न करु नयेत.. कोणीही प्रेमळ असू शकतो. तेही होते. ड्याट्स इट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ्यामिली मेन नव्हे हो.. फ्यामिली फ्रेंड..

'फ्यामिली मेन' तुमच्या प्रतिसादातून नव्हते. जॉन मकेनच्या (ओबामासंबंधीच्या) वक्तव्यातून होते. (ती व्हीडियोक्लिप संपूर्णपणे पहा.)

बादवे.. आता ते प्रेमळ होते हे आवर्जून सांगायची गरज काय इत्यादि असे प्रश्न कोणी उत्पन्न करु नयेत..

नाही. तो प्रश्न उपस्थित करीत नाही.

मात्र, उदाहरणांतले मुसलमान हे (पु.लं.च्या आजीच्या गोष्टींतल्या यक्षाप्रमाणे) नेहमी हिंदीतच का बोलतात, हा प्रश्न मात्र पडलाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म. तुनळी कार्यालयात पाहणे शक्य नसल्याने नंतर पाहीन. खुलाश्याबद्दल धन्यवाद.

हो..ते हिंदी का बोलयचे हा प्रश्न आहेच. पण एक निरीक्षण. कोंकणातले मुसलमान मराठीच बोलतात. देशावर हिंदी बोलण्याची पद्धत आढळली. हे देशावरचे होते.

अर्थात आपापला मर्यादित निरीक्षणस्कोप.

देश = कोंकण वगळता महाराष्ट्राचा बाकीचा भाग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो..ते हिंदी का बोलयचे हा प्रश्न आहेच.

ते प्रत्यक्षात हिंदीत बोलत असतीलही. प्रश्न तो नाही. (त्यांनी प्रत्यक्षात कोणत्या भाषेत बोलावे, हा सर्वथैव त्यांचा प्रश्न आहे.) प्रश्न हा आहे, की मुसलमान सामान्यतः (मराठीतून दिल्या जाणार्‍या) उदाहरणांत हिंदीतूनच का बोलतात?

उद्या पुतिनबद्दलचा एखादा विनोद मराठीतून सांगायचा झाल्यास त्याच्या पंचलैनीतले पुतिनचे उद्धृत रशियनमधून सांगितले जाईल काय?

(हा आक्षेप नाही. केवळ एक सामान्य निरीक्षण आहे. आम्हीही हे किंवा यासारखे पाप अनेकदा करतो. नि करत राहू. असो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उद्या पुतिनबद्दलचा एखादा विनोद मराठीतून सांगायचा झाल्यास त्याच्या पंचलैनीतले पुतिनचे उद्धृत रशियनमधून सांगितले जाईल काय?

अत्यंत रोचक प्रश्न.

उ: रशियन आणि मराठी अश्या दोन्ही भाषा जर उदाहरण देणार्‍याला अवगत असतील तर अवश्य तेवढं मधलं उद्धृत रशियनमधूनच सांगितलं जाईल. आपल्याला दोन्ही भाषा येतात हे सांगण्याकरिता. आणि ऐकणार्‍याला फक्त मराठी येत असेल तर आधी रशियन भाषेत उद्धृत उच्चारुन मग समोरच्यांचे बावचळलेले चेहरे पाहून त्याचा अनुवाद कम निरुपण केलं जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी पुलंच्या गोष्टीतल्यावरुन आठवलेले:

"हरितात्यांचे ते त्या वेळचे मुसलमान म्हणजे" हेही आठवले. आणि त्यांच्याच कथेवरुन भवानीमाता मेकअप फेम कल्याणच्या सुभेदाराची सून आठवली. हिची कथा बर्‍याचदा ऐकली आहे. तिथेही पडदा हटाओ हा संवाद हिंदीत व्हायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(महिलांच्या अब्रूची चाड असणार्‍या) शिवाजी महाराजांनी सुभेदाराच्या सुनेला (त्या काळी वर्ज्य) असलेले पडदा हटवून चेहरा दाखवण्याचे कृत्य करण्यास का सांगितले असावे? असाही एक प्रश्न येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मात्र, उदाहरणांतले मुसलमान हे (पु.लं.च्या आजीच्या गोष्टींतल्या यक्षाप्रमाणे) नेहमी हिंदीतच का बोलतात, हा प्रश्न मात्र पडलाच.

दूरदर्शनवरील 'चाणक्य' मालिकेतील अलेक्झांडर इंग्लिशमध्ये बोलताना का दाखवला होता?

असो.

अवांतर - 'पढणे' हे हिंदाळलेले मराठी क्रियापद फक्त 'नमाज पढणे' हया एकाच वाक्यप्रयोगात वापरलेले ऐकले आहे. अन्यत्र कुठे असेल तर ते जाणण्याची उत्सुकता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दूरदर्शनवरील 'चाणक्य' मालिकेतील अलेक्झांडर इंग्लिशमध्ये बोलताना का दाखवला होता?

टुमने हिन्डी मूवी में बॉब ख्रेस्टो नाम के ब्रिटिश खो हिन्डी बोलटे हुवे नह्य देखा क्या??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सावरकर या सिनेमातही दोन ब्रिटीश अधिकारी एकमेकांशी हिंदीतून बोलताना दाखविल्याचं आठवत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

'पढणे' हे हिंदाळलेले मराठी क्रियापद फक्त 'नमाज पढणे' हया एकाच वाक्यप्रयोगात वापरलेले ऐकले आहे. अन्यत्र कुठे असेल तर ते जाणण्याची उत्सुकता आहे.
..............क्रियापदाच्या रुपात आठवत नाही पण 'पढतमूर्ख' ह्या विशेषणाच्या रुपात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साधारण याच अर्थानं 'पढीक विद्वान'ही वापरतात ना? मजा म्हणजे दोन्ही ठिकाणी 'पढणे'च्या छटा नकारात्मक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हे निरिक्षण चिंविंनी एका ठिकाणी फार पूर्वी एकदा केलेलं आहे. तुच्छतादर्शक, निगेटिव्ह अश्या पद्धतीच्या उल्लेखात अरबी, फारसी, उर्दू-हिंदीप्रचुर शब्दांचा वापर.. आणि त्याच अर्थाच्या पॉझिटिव्ह छटेच्या शब्दात मराठी संस्कृतप्रचुर शब्द.

उदा.
संतती व्हर्सेस अवलाद
प्रजनन व्हर्सेस पैदास
शिष्य व्हर्सेस चेला
गुरु व्हर्सेस उस्ताद
(१९२०-४० दरम्यान गाणे, वादन, नाच इत्यादि गोष्टींना व्हाईट कॉलर्ड मानले जात नसावे, तेव्हा या कलांबाबत आणि जादूटोणा, हाथ की सफाई, चोर्‍या आणि तश्या निगेटिव्ह गोष्टींबाबत उस्ताद आणि त्याचा चेला असे म्हटले जायचे. शागीर्द हा शब्द कितपत डेरोगेटरी होता ते माहीत नाही.)
तसेच
पंडित व्हर्सेस पढीक

झालस्तर अद्दल घडवणे, नक्षा उतरवणे, पर्दाफाश करणे, बेचिराख करणे (बे चिराग) वगैरे शब्दही पाहता येतील इन जनरल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहाहा! काय इंट्रेष्टिंग तुलना आहे! आभारी आहे.

@संपादक
याचा स्वतंत्र धागा कराल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

रोचक आहे!

'जाज्वल्य' अँग्लो-सॅक्सनही आपल्या पुस्तकांच्या प्रस्तावनेसाठी Foreword हा शब्द योजतात; फ्रेन्चाळलेला Preface नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यात नुसतेच शब्द दिले. मुद्दा लक्षात आलेला आहेच तरीपण उदा.

मनुष्याची संतती, कुत्र्याची किंवा "हरामखोराची" (हेही नोंदवणीय) अवलाद.
आपले प्रजनन व्हर्सेस गायीबैलांची पैदास
शाळेत शिष्य व्हर्सेस गायनशाळेत चेला
अभ्यासात गुरु व्हर्सेस कुस्तीच्या फडात उस्ताद इत्यादि.

आणखीही असे आठवू शकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थछटेतला बदल नोंदण्यासाठी परभाषेतला शब्द वापरणं तसं नवीन नाही. ज्या भाषेला प्रतिष्ठा असेल, त्या भाषेतला शब्द प्रतिष्ठित छटेसाठी वापरावा, असा कल दिसतो.

पण या तर्काला धरून जसे शब्द सापडतात, (वाह्यात / फाजील - अति), तसेच अशी नकारात्मक छटा नसलेले, पण अर्थछटेत बाऽरीक बदल असलेलेही, शब्द सापडतात असं आता लक्षात येतं आहे हां पण.

माहौल - वातावरण
मौसम - ऋतू
मैफल - सभा / मेळावा (?)
बाग - उद्यान / वन / वाटिका
बहार / मजा - आनंद / उल्लास
धुवॉंधार - मुसळधार
सरहद्द - सीमा

आणिही आठवतील...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

शहीद, जिंदादिल, मौज, मजा, खुद्द असे नकारात्मक छटा नसलेलेही दिसतातच अर्थात.

शिवाय बदलत्या नव्या काळात खूप प्रमाणात मेल्टिंग पॉट इफेक्ट होत असल्याने वर उल्लेखलेले डेरोगेटरी शब्दही आता तितके डेरोगेटरी मानले जात नाहीत. इनफॅक्ट उस्ताद वगैरे आता गौरवानेही वापरतात. मूळ कृतीला किती प्रतिष्ठा आली यावरही हे अवलंबून आहे, पण त्याचप्रमाणे एकूण भाषांमधला दुरावा कमी होण्याचीही ही लक्षणं आहेत आणि हे उत्तम आहे. ठराविक भाषेची अस्मिता हा माझ्या अत्यंत नावडत्या विषयांपैकी एक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे खरे आहे. या घटनेनंतर माझ्या टीमचा एकजण दुसर्या दिवशी मला म्हणाला की "त्या आतंकवादयाचे नाव पण 'हारून' होते". असलं काही मला अनपेक्षित होतं. पण मग म्हणालो की 'माझं नाव बदनाम केलं xxxने ' . माझा एक मिश्किल सहकारी म्हणाला " अरे बरोबरच आहे हा पण ५० जणांना रोज ८ तास ओलिस ठेवतोच ना". माझ्या प्रोजेक्ट टीममध्ये ५४ लोकं आहेत आणि मी प्रोजेक्ट मॅनेजर. आता अश्या विनोदाने वेळ निभाऊन जाते कधी कधी पण त्या आतंकवादयाचे नावपण 'हारून' होते. माझ्या बॉसचे नावपण 'हारून'. दोघेही मुसलमान आहेत. यांचा धर्म आतंकवाद शिकवतो. अशी अढी "त्या आतंकवादयाचे नाव पण 'हारून' होते" असे मला आवर्जुन सांगणाऱ्या माझ्या टीममेटच्या मनात निर्माण झाली असल्यास मला कधीच कळू शकणार नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हारुन शेख अपल्या मताबद्दल आदर आहे. त्या टीममेट ने देखील असे अजिबात करावयास नको होते. याबद्दल वादच नाही.
___________

मुस्लिम समाजाची overall hijack केली जाणारी प्रतिमा याबद्दल एक चांगली post मागे वाचनात आली होती. Being a facebook follower, मागे मंदार काळे यांची ही पोस्ट वाचनात आलेली होती जिचा मतीतार्थ व tone साधारण असा होता की -

जेव्हा अन्य अरब, मुस्लिम मातब्बर, दिग्गज ISIS बद्दल मौन पाळून, शेपूट घालून बसले आहेत तेव्हा जॉर्डनची राणी रानिया या एका स्त्रीने ISIS विरुद्ध मत मांडले व स्वतःचा stand clear केला. -

रानिया यांचे भाषण येथे वाचता येइल.

...what ISIS is doing to the Arab world -- and all of us. A minority of irreligious extremists is using social media to rewrite our narrative… hijack our idetity and rebrand us.

Ladies and gentlemen… This is their version of the Arab World story. Their plot. Their narrative. Their heros. And the rest of the world is listening and watching.

These images don’t represent me anymore than they represent you. They’re alien and abhorrent to the vast majority of Arabs -- Muslims and Christians. And they should make every Arab across this region seethe. Because they’re an attack on our values as a people. And on our collective story.

But we – the moderate majority - are equally to blame. They say, “a story is told as much by silence as by speech”. Well, our silence speaks volumes. We are complicit in their success.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आतंकवादयाचे नावपण 'हारून' होते. माझ्या बॉसचे नावपण 'हारून'. दोघेही मुसलमान आहेत. यांचा धर्म आतंकवाद शिकवतो. अशी अढी "त्या आतंकवादयाचे नाव पण 'हारून' होते" असे मला आवर्जुन सांगणाऱ्या माझ्या टीममेटच्या मनात निर्माण झाली असल्यास मला कधीच कळू शकणार नाही

"निर्माण"???

कार्यकारणभावाचा क्रम चुकतोय काय, मालक?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी राष्ट्र इराण, रशियावर आर्थिक निर्बंध आणून त्यांना जेरीस आणतात तर ISIS ची अशी आर्थिक कोंडी का करू शकत नाहीत ?

बिनडोकाचा शिरच्छेद करता येत नाही, नागड्याचे कपडे उतरवता येत नाहीत, तद्वत काहीसे?

ज्या दुकानात मी मुळात कधी जातच नाही, त्या दुकानावर मी बहिष्कार टाकू शकतो काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही घ्या एक मार्मिक (आता नबा, हा हन्त हन्त करणार! त्यांची लाडकी भडकाऊ दिली नाही ना! :P)

अर्थात ISIS ला जेरीस आणायला त्यांना मदत करणार्‍या देशांवर निर्बंध घालता यावेत मात्र!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

परतफेड केलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरुण शौरी यांनी मोदी सरकारचं केलेलं वर्णन -
प्लेटों के आने की आवाज तो आ रही है, खाना नही आ रहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

She is the first member of our family who is out on bail for refusing the summons which were not served for building a house which we have not built on a plot that we do not own.

झक्कास. लई आवडले. दोस्तानु, तो शौरींचा व्हिडिओ अवश्य बघा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वामी,शौरी असल्या बुद्धिवंत कम् उजव्या विचारसरणीच्यांचा वापर करवून घेवून नंतर त्याना फेकून दिले. आता बसलीयत ही मंडळी भजन करत नाहीतर मुलाखती देत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.

वरचा अनुस्वार आधी न वाचल्याने काहीतरी हाय लेव्हलचे - प्लेटो विचारवंत वगैरे- वाक्य आहे असे समजून विविध कोनांतून समजावून घ्यायचा विचार केला. शेवटी सोडून दिले. आज पुन्हा वाचताना अनुस्वार दिसला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अडवाणी सुद्धा रामायण व महाभारतानंतर काही राजकारण/गव्हर्नन्स आणि त्याविषयक ज्ञानामधे काही संशोधन्/विकास्/वृद्धी झालीच नाही अशा थाटात - पुंगी वाजवून बघत आहेत.

आमच्या संस्कृतीत जे कै सांगितलेले आहे ते ग्रेट शिवाय दुसरे काही असूच शकत नाही व आमची संस्कृती महान नसण्याची सुतराम शक्यता नाही - अशा भ्रमातून हे लोक कधी बाहेर येणारेत कोण जाणे !!!

(आता लगेच - गब्बर, ते महाभारतातले ज्ञान बेसिक आहे ओ. आधी बेसिक तरी येऊ द्या ... मग अ‍ॅडव्हान्स्ड च्या गप्पा मारा - असे म्हणायला माझे डिट्रॅक्टर्स हिरीरीने पुढे येतीलच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय ही भाषा रे - पुंगी वगैरे ROFL

(आता लगेच - गब्बर, ते महाभारतातले ज्ञान बेसिक आहे ओ. आधी बेसिक तरी येऊ द्या ... मग अ‍ॅडव्हान्स्ड च्या गप्पा मारा - असे म्हणायला माझे डिट्रॅक्टर्स हिरीरीने पुढे येतीलच.)

हाहाहा Smile
___
त्या आऊटडेटेड वस्तूंमध्ये व शब्दांमध्ये "पुंगी" टाकायला हरकत नाही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अडवाणी महाभारत्/रामायणाला एवढं मानत असतील तर वानप्रस्थाश्रम स्वीकारून चुपचाप हिमालयात जायला पाहिजे होतं त्यांनी...२० वर्षांपूर्वीच.
बात करता है!

आमच्या संस्कृतीत जे कै सांगितलेले आहे ते ग्रेट शिवाय दुसरे काही असूच शकत नाही व आमची संस्कृती महान नसण्याची सुतराम शक्यता नाही

+१११ for this.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी बातमी २ वेळा वाचली. तुम्ही ज्या प्रमाणे प्रतिसाद दिला आहे तसा मसुदा/अविर्भाव मला त्यांच्या quote केलेल्या भाषणामध्ये दिसला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाकिस्तान मधील पेशावर मध्ये शाळेवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये १०० हून अधिक मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

http://www.ndtv.com/article/world/over-100-killed-as-taliban-suicide-bombers-attack-peshawar-school-pakistani-officials-635327?pfrom=home-lateststories

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Pakistani English press asks govt to take tougher line on terror

पाकी एस्टॅब्लिशमेंट वर प्रेशर वाढत आहे. व एस्टॅब्लिशमेंट कंबर कसून कामाला लागली आहे - असे निदान चित्र तरी उभे केले जातेय.

याचे ४ परिणाम होऊ शकतात -

१) (Success) : - पाकी एस्टॅब्लिशमेंट (पॉलिटी + मिलिटरी) मंडळी दहशतवादी नेटवर्क्स वर यशस्वीरित्या तुटुन पडतील खरे ... पण समूळ उपटून फेकणार नाहीत (अन्यथा काश्मिर मधे राडे करायला कोणाला पाठवणार ???). त्या दहशतवाद्यांनी फक्त पाकीस्तानात दंगामस्ती करू नये याची खबरदारी पाकी एस्टॅब्लिशमेंट ची मंडळी घेतील. पण त्याचा परिणाम असा होईल ... की पाकिस्तानात शांतता नांदेल पण त्यानंतर लगेच पाकी जनता पुन्हा - मला जो पर्यंत याची झळ पोहोचत नाही तोपर्यंत मी ओके आहे. मग एकदा आमच्या भागात शांतता असली की आमचे पाकी नेते व मिलिटरी व दहशतवादी एकत्र मिळून भारतात काही का राडे करेनात ... मला काय त्याचे - असे म्हणून गप्प बसतील. व भारतात हल्ले सुरुच राहतील.

२) (Mixed Success) : - पाकी एस्टॅब्लिशमेंट (पॉलिटी + मिलिटरी) मंडळी दहशतवादी नेटवर्क्स वर तुटुन पडतील खरे व त्यांना थोडेसे यश मिळेल खरे ... पण फार यश मिळणार नाही. मिक्स्ड स्वरूपाचे यश मिळेल. मग पाकिस्तानात पुन्हा एकदा वादळापूर्वीची शांतता नांदेल. कुछ दिन असेंब्ली मे शोर मचेगा ... और फिर ... ये रे माझ्या मागल्या. पाकिस्तानात व भारतात दोन्हीकडे हल्ले चालू राहतील पण हल्ल्यांचे स्वरूप बदलेल व वारंवारता बदलेल ... ठिकाणे बदलतील ... टार्गेट्स बदलतील ... वगैरे.

३) (Failure) : - पाकी एस्टॅब्लिशमेंट (पॉलिटी + मिलिटरी) मंडळी दहशतवादी नेटवर्क्स वर तुटुन पडतील खरी पण अयशस्वी ठरतील. मग आता या अपयशाकडून जनतेचे लक्ष दुसरीकडे कसे वेधायचे ??? उत्तर सोप्पंय !!! भारताविरुद्ध कार्गिल टाईप घुसखोरी करायची. किंवा एखादा मोठ्ठा घातपात घडवून आणायचा. किंवा एखादा संपूर्णतया दुसरा मोठ्ठा मुद्दा अजेंड्यावर आणायचा. झालं. लोक विसरले की भारतात राडे चालूच ठेवायचे.

४) (Abort Mission) : - पाकी एस्टॅब्लिशमेंट (पॉलिटी + मिलिटरी) मंडळी दहशतवादी नेटवर्क्स वर तुटुन पडतील/नाटक करतील. पण ते मिशन मधेच सोडून देतील कारण - प्रतिहल्ल्याची भीती किंवा इतर दुष्परिणाम (उदा. एखादा प्रांत/प्रदेश फुटुन निघण्याची भाषा करेल). पण भारतातले राडे चालूच राहतील.

थोडक्यात काय की पाकिस्तान फक्त ट्रेडमिल वर पळणार किंवा चालणार किंवा जॉगिंग करणार. पण भारतात राडे चालूच ठेवणार.

I am just thinking out loud.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

" Peace will come when the Pakistanis* will love their children more than they hate us "

श्रेयअव्हेर - Golda Meir

* मूळ वाक्यात इथे 'अरब' असे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Peace will come when the Pakistanis will drop Jammu & Kashmir from their dreams. ___ My Wife.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ड्रॉप करतील याबद्दल शंका आहे.

"वॉर इज पीस" या वाक्याची आठवण आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

शंका मला ही आहे. पण व्यक्त केल्यास माझी एकुलती एक वाईफ मला "ड्रॉप" करेल ओ !!!

"वॉर इज पीस" या वाक्याची आठवण आली.

लग्न झाल्यापासून एक दिवस ही असा गेला नाही की ज्या दिवशी मला या वाक्याची आठवण झाली नाही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://www.thehindu.com/sci-tech/science/india-successfully-test-fires-g...

इस्रोच्या अ‍ॅट्मोस्फेरिक री-एन्ट्री मॉड्युलची चाचणी यशस्वी. अंतराळात मानव पाठवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल. वेगळ्याच घरवापसीची चर्चा चालू असताना ही घरवापसी पाहून छान वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

एकदम!
खूप मस्त वाटलं हे वाचून. अर्थात क्रायो स्टेज डमी होती ह्यात, पण असं re-entry वाहन आपण वापरतोय हेच मला खूप आशादायक वाटलं. आगे बढो इस्रो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे ड्युअल युज आहे का ? म्हंजे - याचा MIRV मधे उपयोग केला जाऊ शकतो का ? की याचा व MIRV चा काही च संबंध नाही ???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://www.yahoo.com/travel/man-finally-finds-an-elizabeth-gallagher-to...

ही बातमी मजेशीर आहे अन दोघे बर्‍यापैकी हॉट अन तरुण आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्यावरुन आठवलं मला पण घरी लाडाने elizabeth-gallagher च म्हणतात. चालेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.

हाहाहा मस्त!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://news.yahoo.com/3d-printed-legs-help-disabled-dog-run-for-the-firs...

सुंदर बातमी आहे. विशेषतः जेव्हा नकारात्मक छटा असणार्‍या बातम्यांच्या भडीमारात.
पाळीव अपंग(अधू) कुत्र्याला कृत्रिम पाय लावले. आता तो मजेत पळू शकतो, उड्या मारु शकतो. व्हिडिओ छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जयंत नारळीकरांना साहित्य अकादमी पुर्स्कार मिळाला आहे त्यांच्या आत्मचरित्राबद्दल.

=> मला तरी ते पुस्तक फारसं आवडलं नव्हतं. पाल्हाळिक आणि अगडबंब वाटलं. त्यापेक्षा नारळीकरांच्या काही काही विज्ञानकथा आणि आकाशाशी जडले नाते हा पुस्तक प्रयोग भारी वाटले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारसं काय ? बिलकुलच आवडलं नाही मला. नुसतं स्थळ्,काळ् ,काम यांची जंत्री म्हणजे आत्मचरित्र का? अर्थात पुस्तकाच्या नावाएवढंच भोंगळ आत्मचरित्र आहे. आता या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालाय तर लेखकाचं अभिनंदन करायचं का अकादमी सदस्यांनी पुरस्कार कश्याशी खातात हे (पुन्हा एकदा) दाखवून दिल्याबद्द्ल त्यांचं अभिनंदन करायचं?
(मला नारळीकरांबद्दल त्यांच्या आयुकामागच्या कष्टांबद्द्ल आणि विज्ञानकथा या प्रकाराला मराठीत आणल्याबद्द्ल पुर्ण आदर आहे पण साहित्यअकादमी सारखा पुरस्कार देताना पुस्तकाची साहित्यिक मुल्य जास्त महत्वाची मानली जायला हवीत हे निर्विवाद.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी पुस्तक वाचलेलं नाहीये, पण इतरांना ते आवडावं असा पुरस्काराचा क्रायटेरिआ असतो का/असावा का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुब्रह्मण्यन स्वामीचं एक खरं फेसबुक खातं होतं आणि एक त्याची खिल्ली उडवणारं. अनेकदा स्वामींच्या भक्तांना हा गोंधळ कळतच नसे इतकं तोतया खातं 'विश्वासार्ह' होतं. खिल्ली उडवणारं खातं उडवा अशी स्वामींनी विनंती केली असता फेसबुकनं चुकून खरं खातंच उडवलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आता त्याला unofficial subramanian swamy असे नाव आहे.
पण हे फॉलो करणारे मुस्लीम व forward caste चे जास्त आहेत. पण तिथेही नमो-भक्तानी राडा करण्याचा प्रयत्न केलाय. By the way newsX, newsminute ही pro-bjp channels आहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.

Tavleen Singh : Fifth column: Jihadi horror

When the school massacre happened, Nawaz Sharif said that the children who were killed were his children so deeply did he feel their loss. Then why mere weeks before the massacre did he provide special trains for jihadis attending a rally called by Hafiz Saeed in Lahore?

----------------

खालील वाक्य समस्याजनक आहे -

It is only a matter of time before jihadi spillover begins to affect us in horrible ways. Already we see signs of ISIS recruitment drives, already we see signs of radical Islamism in Muslim communities across the country. And now there is even an excuse: ascendant Hindutva.

येमेन हे दहशतवादाचे मोठ्ठे केंद्र आहे. पण तिथे कुठे ascendant Hindutva आहे ?

पाकिस्तान हे त्याही पेक्षा मोठे दहशतवादाचे केंद्र आहे. पण तिथे कुठे ascendant Hindutva आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पी आय एल मधील मागणी काय आहे ते सोडून दिले तरी "टॉयलेट्स फॉर विमेन" यामध्ये किमान अपेक्षा काय असतील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्रश्नच नाही कळला.
'किमान अपेक्षा काय असावी' म्हणजे? का।इ ठराविक अंतरावर (माझ्या मते हे अंतर प्रत्येक रस्त्यावर दर किमीवर एकावेळी किमान २ महिलांना जाता यावे व दर ५ किमीवर एकावेळी किमान १० महिलांना जाता यावे अशी सोय) महिलांना मुत्रविसर्जनाची स्वच्छ व नि:शुल्क सोय असावी ही मागणी योग्य वाटते.

प्लॅटफॉर्मवरील सुविधा ही प्रत्येक प्लॅटफॉर्मच्या दोन्ही टोकांना असणे रेल्वेसाठीही सक्तीचे असले पाहिजे (हे स्त्री व पुरूष दोघांसाठीही)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्लॅटफॉर्मवरील सुविधा ही प्रत्येक प्लॅटफॉर्मच्या दोन्ही टोकांना असणे रेल्वेसाठीही सक्तीचे असले पाहिजे (हे स्त्री व पुरूष दोघांसाठीही)

अत्यंत सहमत. अशी सुविधा, तसेच जागोजागी कचराकुंड्या/पेट्या उपलब्ध करुन देऊन, त्या चोरीला न जाण्यासाठी जे लागतील ते उपाय करुन या सोयी दिल्या की मग खुशाल रस्त्याची मुतारी बनवणार्‍या किंवा कचरा फेकणार्‍यांना जबरी दंड करावा. देन इट विल बी जस्टिफाईड.

उत्सर्जनाची जागाच उपलब्ध नाही आणि मग पुरुष कुठेही करतात आणि स्त्रिया खोळंबून सहन करत राहतात हे चित्र फार वाईट. अशा वेळी "घाण करतात" म्हणून कोणालाच शिक्षा करण्याची सोय राहात नाही..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरुषांसाठी जी टॉयलेट्स असतात त्यात एक भिंत, त्याच्यालगत एक गटार, त्या भिंतीवर वाहते पाणी (कधीकधी), त्या भिंतीकडे तोंड करून भिंतीवर लघवी करणार्‍या दोन व्यक्तींच्या मध्ये एक विभाजक भिंत आणि पार्शल आडोसा इतकी किमान अपेक्षा असते. तशी महिलांसाठी असलेल्या टॉयलेटमध्ये किमान अपेक्षा काय असतील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कायदेशीर अपेक्षांबद्दल बोलणं चाललं आहे की खरंच गरज कशाची असते, अशा अर्थानं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सोय हवी ही मागणी रास्तच आहे. फक्त सोय म्हणजे काय याचा विचार व्हावा म्हणून ही उपचर्चा...

खरंच गरज कशाची असते या अर्थाने.... (तक्रार करण्याच्या पलिकडे जाऊन काय करता येईल या अर्थाने).

पूर्वीपासून सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेत महिला बर्‍या संख्येने कार्यरत आहेत तेव्हा त्या महिलांनी या विषयावर काही काम/विचार केलेला असेल तर त्यांनी महिलांसाठी काही खास टॉयलेट डिझाइन्स केली आहेत का?

काही रोचक लिंक्स :

http://www.wikihow.com/Urinate-Standing-Up-as-a-Female ....
http://www.magic-cone.com/ ....
http://en.wikipedia.org/wiki/Female_urination_device ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

- आत शिरून वळून दार लावून घेता येईल आणि उकिडवं बसताना इकडेतिकडे धक्का लागणार नाही इतपत जागा असलेला, आतून कडी लावता येईल असा स्वच्छ आडोसा
- पुरेसं पाणी
- सॅनिटरी नॅपकिन्स टाकण्यासाठी कचराकुंडी
- पिशवी / ओढणी अडकवून ठेवण्यासाठी दरवाजाला पुरेशा उंचीवर हूक
- हात धुण्यासाठी एखादं तरी चालू स्थितीतलं बेसिन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धन्यवाद.

यात दोन गरजांची सरमिसळ आहे. राइट टु पी मधल्या "पी"पुरता विचार केला तर या गरजांमध्ये काही फरक पडेल का?*

*प्रश्न खोडसाळपणे विचारलेला नसून जेन्युइन आहे. इफ मेल मेंबर्स कॅन बी ऑफ एनी हेल्प विथ आयडिआज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सॅनिटरी नॅपकिन्स टाकण्यासाठी केराची टोपली आणि बेसिन हे काढता येईल फारतर. शब्दांना चिकटून राहायचं झालं तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

शब्दांना चिकटण्यापेक्षा कशासाठी हे सुरू आहे - आरोग्य, मूलभूत हक्क - यांचा विचार करता बेसिन तर हवंच शिवाय साबणही हवा. (बायकांचे लाड जरा जास्तच होतात असं वाटत असेल तर पुरुषांसाठीही बसून लघवी करायची सोय करून द्यावी किंवा बायकांना वापरून फेकता येतील असे दोन्ही बाजू उघडे असणारे शंकू तिथे उपलब्ध करून द्यावेत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला प्रश्न कळला आहे. महिलांची केवळ मुतारी (मलविसर्जनाची सोय नाही) अशा पद्धतीचे काही डिझाईन आहे का? असा प्रश्न असावा.
भोकाच्या खुर्च्यांसदृश रचना चालावी काय? भोकाखाली पन्हाळे लाऊन ते एका गटारात/टाकीत सोडलेले. थोडक्यात कमोडसारखेच पण "वॉटरलॉकिंग" नाही


समांतर आठवणः
कर्नाटकातील तिबेटी सेटलमेंटच्या एका पॅगोडाच्या आवारात स्त्री-पुरूषांची कॉमन मुतारी होती. पुरूषांच्या भागात नेहमीसारखे पॉट होते व स्त्रियांनाही त्याच्याच समोरच्या रांगेत तसेच (व तितकेच) कंपार्टमेंट्स होते, त्यालाही पुरूष मुतार्‍यांप्रमाणे फक्त दुभाजक होते. फक्त पॉट्स नव्हते, खाली गटार सदृश खाच होती. दार नाही की काही नाही.

ते वापरायचे कसे हे मात्र कळले व झेपले नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अगदी लहान मुलींच्या युरिनल्समध्ये अशीच खाच आणि दुभाजक असलेली सोय पाहिली आहे. पण त्या ठिकाणी उकिडवं बसावं लागणं, वाहत्या पाण्याची सोय नसणं आणि शू वाहून जाण्यासाठी पुरेसा उतार नसणं या तिन्हीमुळे फारच गैरसोय आणि किळस वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पुरुषांसाठी जी टॉयलेट्स असतात त्यात एक भिंत, त्याच्यालगत एक गटार, त्या भिंतीवर वाहते पाणी (कधीकधी), त्या भिंतीकडे तोंड करून भिंतीवर लघवी करणार्‍या दोन व्यक्तींच्या मध्ये एक विभाजक भिंत आणि पार्शल आडोसा इतकी किमान अपेक्षा असते. तशी महिलांसाठी असलेल्या टॉयलेटमध्ये किमान अपेक्षा काय असतील?

या तपशिलाने इथे कितपत काय साध्य होईल असा प्रश्न पडला.

सर्वसाधारणपणे प्रायव्हसीमधे एकावेळी किमान एका स्त्रीला आयसोलेशनमधे मूत्रविसर्जन करता यावे इतकी सोय अपेक्षित असावी.

मुळात ते केलेच पाहिजे हे ठरले की मग त्याची किमान / कमाल रचना आणि अंतर्गत बारीकसारीक तपशील हे म्युनिसिपालिटी किंवा ते बांधणार्‍या सरकारी/ बिगरसरकारी एन्टिटीज ठरवू आणि अंमलात आणू शकतीलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रास्तं मागणी आहे याबाबत शंकाच नाही. पण अशी एखादी पॉलिसी बनवा असं सांगण कोर्टाच्या अख्त्यारित येतं का? केलेली पॉलिसी कायदेशीर आहे का नाही हे सांगण येत असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मागणी रास्तच. त्याबद्दल दुमत नाहीच. परंतु, आजकाल बरेचदा कोर्ट आपली पायरी सोडून वागत आहे, हेदेखिल खरेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तपशील माहित नाहीत. अशी पॉलिसी असावी/असल्यास हरकत नाही अशी भुमिका राज्यसरकारने कोर्टात घेतली असेल किंवा अशी पॉलिसी असणे एखाद्या कायद्यानेच बंधनकारक असेल तर कोर्टाने तसे कराच हे सांगणे योग्य वाटते.

शिवाय कोर्टाने पॉसिली घोषित करा म्हटले आहे. त्यात काय असावे याचे निर्देश नाहीत. (जर राज्यस्तराअवरील कायदा/अधिसुचना/राज्य सरकारने कोर्टात एका बाजुने व्यक्त केलेले मत नसले तर) उदया एखाद्या शहराच्या म्युनिसीपाल्टीने ही सोय देण्याचे बंधन म्युनिसीपाल्टीवर नाही, अशी 'पॉलिसी' घोषित केली तरी कोर्टाच्या निकालाचा आदर राखला जाईल बहुदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

किमान अपेक्षांमधे एक अतिमाफक अपेक्षा - दरवाज्याची कडी ही व्यवस्थित काम करत असायला हवी. कडी लावताना कसल्याही प्रकारची तोशीश पडता कामा नये. लावल्यानंतर it must work as intended.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बातमीत लिहिल्याप्रमाणे ...observed the division bench of justices Abhay Oka and Ajey Gadkari....
यात Oka म्हणजे ओक (Oak) हे आडनाव आणि Ajey म्हणजे अजय (Ajay) का? यात नावे बदलण्याचे खूळ आहे का खरोखरच नावे तशीपण लिहिली जातात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://www.ndtv.com/elections/article/cheat-sheet/election-results-bjp-t...

झारखंडमध्ये भाजपा सरकार येणार अस दिसतय. जम्मू-काश्मिर मध्ये त्रिशंकू स्थिती. भाजपा आणि पीडीपी सगळ्यात मोठे पक्ष होणार असं दिसतय. पूर्ण बहुमत नसलं तरी भाजपासाठी हे बरच मोठं यश आहे. सरकारसाठी (पीडीपी + कॉंग्रेस) असा एक पर्याय आहे. भाजपा बरोबर युती करणार नाही असं नॅ.कॉ.चे ओमर अब्दुल्ला म्हणाले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

झारखंडमध्येही बहुमत मिळत नाहीये असं दिसतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हो.
लज्जास्पद आहे ते. मतदानाच्या फेज वाईज निकालाचा अभ्यास केला पाहिजे. ही जी घरवापसीची थेरं सुरु झाली त्यानंतर जिथे मतदान झालय अशा ठिकाणी निकाल काय लागले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

फायनली निसटतं बहुमत मिळालं आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आजच्या लोकसत्तेच्या अग्रलेखात काही गंभीर म्हणता येतील अशा चुका आहेत . छत्तिस गड च्या अजित जोगी ना त्यांनी झारखंड मध्ये नेउन टाकले आहे . नुकत्याच झालेल्या झारखंड निवडणुका मध्ये त्यांनी कॉंग्रेस च नेतृत्व केल असा जावई शोध त्यांनी लावला असून वर कॉंग्रेस च्या पराभवाच खापर पण जोगी यांच्या डोक्यावर फोडलं आहे . तसच अब्दुल्ला घराण्यां मधल यापूर्वी कोणीही निवडणुकीत पडल नाही अस विधान बेधडक पण केल आहे . वास्तविक पाहता उमर अब्दुल्ला एकदा यापूर्वी पण निवडणुकीत पडले आहेत . ज्या गोष्टी राजकारणात रस असणारया सर्वसामान्य लोकाना पण माहित असतात त्या गांजलेल्या शेतकऱ्यापासून देशाच्या पंतप्रधाना ना उपदेशाचे डोस पाजणार्या लोकसत्ता काराना माहित नसाव्यात याचे अमळ आश्चर्य वाटून राहिले भौ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

या बातमीचा काँटेक्स्ट कोणी मला देईल का ?

It Has Been Proved That Rahul Gandhi Has Failed As A Leader _______ Kumar Ketkar

कुमार केतकर खरंच असं म्हणाले ??? Did he mean to say what he said ? की हा एवढाच ६ सेकंदांचा भाग (क्लिप) आऊट ऑफ काँटेक्स्ट उचलून दाखवण्यात आलेला आहे ??? या क्लिप चा संपूर्ण व्हिडिओ शोधायचा यत्न केला मी. पण काही सापडला नाही.

-
-
-

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजा ते बोलले असतील तसं तर त्यात आश्चर्यकारक काय आहे?

मी पूर्वी विठोबा म्हणून एक अ‍ॅनालिसिस मांडले होते. त्याच्या शेवटी "काँग्रेस टिकायला हवी, म्हणून विठोबा हवा. कारण विठोबाच्या अस्तित्वाने काँग्रेस टिकते" असे म्हटले होते.

केतकरांचेही असाच व्ह्यू असेल तर त्यांनाही काँग्रेस टिकणे हेच महत्त्वाचे वाटत असेल. करंट विठोबाच्या नेतृत्वात काँग्रेसचा उद्धार करण्याची शक्ती नसेल तर त्या विठोबावर टीका करणे साहजिक आहे.

केतकरांची निष्ठा विठोबावर नसून काँग्रेस*वर आहे हेच या वक्तव्यातून लक्षात येते.

*काँग्रेस= व्हॉटेव्हर इट इज पर्सिव्ह्ड टु स्टॅण्ड फॉर.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदचित असे तर नसेल कि नरेन्द्र मोदिंचा प्रभाव पुन्हा पुन्हा अनुभवून , डॉ. अमर्त्य सेन यांच्याप्रमाणे ,कुमार केतकरांचे ही मत परिवर्तन होवू घातले असावे ? निमित्त अर्थात राहुल गांधीचे सततचे अपयश ! !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावर्षीचा भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आणि पं. मदन मोहन मालवीय यांना जाहीर करण्यात आला आहे.

Bharat Ratna for Atal Bihari Vajpayee and Madan Mohan Malaviya

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संसदेचे अधिवेशन कालच संपले आणि आज सरकारने विमा विधेयक आणि कोळसा विधेयक यांचा अध्यादेश काढण्यास मंजुरी दिली आहे.
http://ibnlive.in.com/news/cabinet-approves-ordinances-for-coal-auction-insurance-reforms/519646-3.html

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!