ओलीताचं अंकुर कोरडवाहूत फुलेल का,
जाशील जरी कुठे,
तुझ्यात तुझं काही उरेल का.
भास जरी जगण्याचा कुशीत नवऱ्याच्या तुझ्या,
कर सारे प्रयत्न,
पण तुझ्यातला मी कधी मरेल का.
थंडीचे ते दिवस तुला नक्कीच ताप आणतील,
वाचव तू स्वतःला,
आठवणींचे वार तुझा नक्कीच घात करतील
खुशाल टाक पाऊल तुझ्या नव्या संसारात,
पण सांभाळून जरा,
पैंजणाचे आवाज माझं गाणं गातील.
गंध मोगऱ्याचा माझ्या आलिंगनात,
दरवळेल तोच सुगंध,
त्यानी आणलेल्या गजऱ्यात.
गुलाबाचा हट्ट कर मोगऱ्याला म्हण नाही,
पण लक्षात असू दे,
टवटवीत गुलाबाचा गंध कधीच दाटत नाही.
भातुकलीच्या खेळात तुझ्या मीच खरा राजा,
मात्र तुझ्या खऱ्या संसारात,
फक्त भातुकलीचेच राणी राजा.
दुसऱ्या कुणासाठी आरश्यात सजणं जमेल का,
जमला जरी शृंगार,
माझ्या हातांच्या कंबरपट्ट्याविना रूप तुझं खुलेल का.
ओलीताचं अंकुर कोरडवाहूत फुलेल का,
जाशील जरी कुठे,
तुझ्यात तुझं काही उरेल का.
मस्त रे आशिष. ही कविता सुद्धा
मस्त रे आशिष. ही कविता सुद्धा छान जमलीय.
छान
एक भुमिका म्हणून कविता छान (मात्र भावना पटली नाही)
अर्रर्र..
वेगळीच कविता असेल असं वाटलं होतं.. सद्ध्याच्या दुष्काळाचे परिणाम दुसरं काय... असो. ;-)
दिशाभूल साठी क्षमस्व
शीर्षक कदाचित चुकीचे दिले गेले असेल..........दिशाभूल साठी क्षमस्व!!!!!!!!!!!!!!!!!!!!
असू दे हो
क्षमस्व वगैरे काय उगाच..
बरं झालं............
सगळे बेशिस्तच म्हणतात म्हणून म्हटलं बघावेत पाळून शिष्टाचार.................... पण बरं झालं तुमच्या प्रतिक्रीयेनी वाईट रस्ता सुरु व्हायच्या आधीच संपला .
नवी कॉमेंट. स्क्रीप्टने…
नवी कॉमेंट. स्क्रीप्टने लिहील्येय. -- 20250114___002059