न्यू एज शॉप

आज मनःशांती विकणार्‍या , सुगंधी द्रव्ये व सुगंधी उदबत्ती तसेच सुगंधी मेणबत्ती यांची खैरात करणार्‍या "न्यू एज" शॉप मध्ये गेले होते. मूलाधार चक्रा पासून ते सहस्त्रार चक्रापर्यंतच्या सर्व एकाक्षरी बीज-मंत्रांच्या लहानशा पताका विकायला होत्या. लं-वं-यं- ॐ म्हणाल त्या बीजमंत्रांच्या मेणबत्ती (त्त्या?) हाझीर होत्या. गणपती , लक्ष्मी या एव्हरग्रीन देवतांच्या मांडीस मांडी लावून विविध पोझमधले बुद्ध, कुआन यिन, अवलोकितेश्वरा, अमिताव आदि देवता बसल्या होत्या. रोझ क्वार्ट्झ, अमेथिस्ट, कार्नेलिअन आदि नाना प्रकारचे स्फटीक अन त्यापासून बनवलेले मेणबत्ती स्टँडस तर होतेच पण विविध प्रकारच्या स्फटीकांच्या जपमाला रांगेने मांडलेल्या होत्या.

म्हणजे एकंदर वातावरण अक्षरक्षः स्वर्गीय अन हायली "स्पिरिच्युअल" होते. ज्याला ज्या लेव्हलची मनःशांती हवी ती तिथे मिळेलच याची हमी होती. रेकी पासून ते जपानी मसारु इमोटो यांच्या जलस्फटिकाच्या प्रयोगापर्यंत, हस्तसामुद्रिकापासून ते मदत करणारे देवदूत/एंजल्स्/गार्डिअन एंजल्स आदि विषयांवरील पुस्तकांची रेलेचेल होती. अर्थात जर इतक्या अध्यात्मिकतेने भारलेल्या वातावरणातही जर कोणाची "भौतिक जगाची लोलुपता" टिकून राहीली तर त्यांना भुरळ घालण्याकरीता अमाप चमचमणार्‍या व ऊंची ऊंची स्फटीक, सेमीप्रेशिअस खड्यांच्या अंगठी, बांगड्या (ब्रेसलेट) मांडलेल्या होत्या.

एकंदर तुमच्या खिशाला चाट लावण्याचा जय्यत जामनिमा होता. आत वातावरण अक्षरक्षः स्वर्गीय सुवासाने अतिशय भारलेले होते, कुठुनतरी मंद संगीताचे स्वर भरुन राहीले होते. म्हणजे आपण ढगांतून चालतो आहोत असा भास व्हावा अशी मंद प्रकाशयोजना व समोर सुबक, आकर्षक अन ओढाळ वस्तू. अशा दुकानांमध्ये काय की नकळे पण नेहमी प्रचंड आकर्षक व नेप्च्युनिअन अर्थात शब्द-अर्थाच्या पकडीत न येणारे सौंदर्य लाभलेल्या सेवातत्पर सुंदरीच काम करतात - असे आढळले आहे.

मी देखील अर्थातच ,मनःशांती खरेदी करायला, गेले होते, अन खिशाला भरपूर खार लावूनच बाहेर पडले. पण सांगायचा मुद्दा तो नाही. त्या विक्रेत्या सुंदरीबरोबर माझे जे लहानसे संभाषण झाले ते असे.-

मी - तुमच्याकडे तुलसीमाला नाही का?
विक्रेती सुंदरी - ते काय असतं?
मी- नाही या बर्चवुड, रोझवुड, चंदन आदि लाकडासारखी तुळस या लाकडाची जपाची माळ आहे का? तुळस ही एक पवित्र वनस्पती आहे.
वि सुं - (दुकानात सुधारणा आणण्याच्या संधीवर उत्तेजित होऊन) ओह रियली? मला स्पेलिंग सांग मी इंडियातून मागवते.
मग बर्‍याच अ‍ॅक्सेंटच्या ओढाताणीनंतर स्पेलिंग वगैरे समजलं अन त्याबरोबर हे देखील की मी भारतीय आहे.
वि सुं - इंडिया किती सुरेख देश आहे. प्रत्येक वेळी कोणी नाव काढलं की मलाही पाठीवर बोचकं (सॅक) टांगून निघावसं वाटतं.
मी - होय फार सुंदर देश आहे.
वि. सुं - इंडिया फार छान आहे. सर्वच किती स्वस्त आहे.
ह्म्म म्हणून आवडतो काय भारत??
मी - मुख्य म्हणजे तिथे उर्जा आहे. लोक आहेत, लोकं दिसतात, अ‍ॅबन्डन्स ऑफ एनर्जी आहे.
आतापावेतो माझी पावती फाडून झाली असल्याने मीही निघाले.

नंतरही मनात खूप काळ तिचे शब्द आठवत राहीले -

इंडिया फार छान आहे. सर्वच किती स्वस्त आहे.

अन कुठेतरी बोचत राहीलं या ज्या १० प्रकारच्या उदबत्ती मी विकत घेतल्या आहेत त्या कोणी बालकामगाराच्या चिमुकल्या हाताने तर बनविल्या गेल्या नसतील?
काही प्रश्न मनात येत राहीले - किती सहज त्या स्त्रीने "युटिलिटी" मूल्य माझ्या देशाला चिकटवून टाकले. माझा देश सुंदर आहे का तर तिथे सर्व स्वस्त आहे.

----------------
मला मांडता येत नाही किंवा मी उगाचच अति भावनाप्रधान होत असेन, पण त्या वाक्याने मला एकदम कसेतरीच झाले. जणू काही आपल्या संस्कृतीचे, अध्यात्माचे "बिकाऊ" दाम लावल्यासारखे. अन ते लावलेही होते हे खरेच आहे. त्यात खरं तर काही गैर वाटावे असे नव्हते. कारण ते एक दुकान होते. पण मखमली जाजमाच्या एखादा कोपरा उसवून अचानक चिंधी नजर यावी तसे काहीसे मला झाले.

नक्की काय टोचलं ते माहीत नाही पण यापुढे जाइन तर मुकाटपणे हव्या त्या वस्तू घेऊन बाहेर पडेन. कारण एक तर परदेशात हारीने विकायला मांडलेले ते गरीब देव बघवत नाहीत. अन शिवाय उगीचच नॉस्टॅल्जिक व्हायला होतं का मन:शांती विकत घेणाबद्दल गुन्हेगारी वाटतं कोणास ठाऊक. पण काहीतरी जाम टोचतं. Sad

हा एक अनुभव येथे मांडला आहे. I wish I was more & better eloquent. पण आज जाम त्रास झाला. अन कशाचा तेही नीट कळलं नाही.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

एवढं सारकास्टिक वर्णन केलंय पहिल्या परिच्छेदांत की मग इतकं दिसत समजत असूनही अश्या ठिकाणी स्वत:ही मन:शांतीच खरेदी करायला गेले होते आणि तिथले जिन्नस घेऊन आले अन येतायेता टिप्पिकल असल्या जागी जाणा-या लोकांनाच बोचणारे गादीखालचे कोणतेसे भारत देशविषयक अन बालमजुरीचे पीस बोचले आणि तिथेच पुन्हाही जाईन पण... इ इ. हे खूप विरोधाभासी वाटले.. क्षमस्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याचे एक कारण आहे की अमेरीकेत काही भागात देवळे/मंदीरे नसतात, असलीच तर लांब असतात. सर्वांकडेच कार असतेच असेही नाही, इन फॅक्ट सर्वांकडे फॅमिली सपोर्टही नसू शकतो...... एनीवे! मग देवाची सुंदर मूर्ती/ उदबत्तीचा सुवास अशा जागांचा अन एक प्रकारचा शांततेचा ऑरा या अशा दुकानांतच सापडतो. अन कितीही ड्रगड/अ‍ॅडिक्टीव्ह अन बेगडी शांती असली तरी त्या दुकानांत परत जाऊन ती घ्यावीशी वाटते.

भारतातील काही जणांना हे बेगडी अन ढोंगी वाटण्याची शक्यता आहेच. त्याबद्दल माफी मागायचे कारण नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न्यु एज मध्ये अनेक गोष्टी येतात
हाय प्रोफाइल स्पीरीच्युअल टीचर्स गुरु
क्रॉसवर्ड आदि त पुस्तकांचा एक सेक्शन दिसतो खास न्यु एज चा त्यात मोटीव्हेशनल इन्स्पायरेशनल टाइप पुस्तक दिसतात
( या पुस्तकांच कव्हर चित्र प्रिंटिंग उच्चतम दर्जाची अति सुंदर असते टाइम्स ची ती पुरवणी स्पीकींग ट्री म्हणजे न्यु एज पुरवणी असे म्हणता येईल त्यातल्या ज्योतिषांच्या नाडी वगैरे ग्रंथ पाहणारे वगैरे ते हि मोठे हाय प्रोफाइल असतात
त्यांचे चेहरे तजेलदार व पोषाख व्यवसायानुरुप खास असतात) त्यांच्या भव्य जाहीराती असतात
टाइम्स म्युझिक चे खानदानी धार्मीक अलबम गणेश आदि वरचा ते हि न्यु एज म्युजिक टाइप असत
न्यु एज चे ग्राहक अति उच्च वर्गातील सहसा असतात
रेकी रविशंकर इनफीनीटीवाला तो दाढीवाला मद्रासी का कोण तो लॅन्डमार्क सब कुछ न्यु एज टाइप च लगता है
फेंगशुइ पिरॅमीड इ.
आणि एक न्यु एज मध्ये काही खास म्युझिक येते एनिग्मा अलबम पण न्यु एज मध्ये येतो तो खुप आवडतो मात्र
राहुल शर्मा जे व्हाइट आदि अलबम बनवतो न्यु एज फॉरेन ग्राहकांसाठी ( मधन मधन मंत्राज वगैरे च चँटींग असत) ते पण खुप आवडत बाकी
मनशांती साठी नाही निखळ आनंदासाठी मला ते ऐकावस वाटत आवडत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय ते चँटींगचे आलबम्स अतिशय मधुर असतात. मग देव प्रेमल असो, क्रिष्णा दास असो वा अन्य.

( या पुस्तकांच कव्हर चित्र प्रिंटिंग उच्चतम दर्जाची अति सुंदर असते टाइम्स ची ती पुरवणी स्पीकींग ट्री म्हणजे न्यु एज पुरवणी असे म्हणता येईल त्यातल्या ज्योतिषांच्या नाडी वगैरे ग्रंथ पाहणारे वगैरे ते हि मोठे हाय प्रोफाइल असतात
त्यांचे चेहरे तजेलदार व पोषाख व्यवसायानुरुप खास असतात) त्यांच्या भव्य जाहीराती असतात

+१ कसे काय इतके ग्लॅमर आणतात काही कळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अश्या स्पिरिच्युअल shopping करणा-या लोकांना मन:शांतीची गरज नसून ओलरेडी मन:सन्नाटा आहे आणि उलट एखादी दात नसलेली बिनधोक अस्वस्थता हवी आहे असं वाटतं. लेखिकेबद्दल व्यक्तिगत नव्हे तर एकूण प्रातिनिधिक "न कळणारी एक काहीतरी अस्वस्थता दाटण्याविषयी" आहे. मी खुद्द देखील या मांदियाळीत कधीतरी पूर्वी सामील असू शकतो ..वेगळ्या संदर्भात..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"न कळणारी एक काहीतरी अस्वस्थता दाटण्याविषयी"
अशी अस्वस्थता तर प्रत्येकालाच कितीदातरी जाणवते हो
फार कमी असतील ज्यांना अस कधीच जाणवत नसेल
उपाययोजनांविषयी मतभेद असु शकतात , वाद असु शकतात फेस कस करायच ज्याचा त्याचा प्रश्न
पण
न कळणारी अस्वस्थता तर प्रत्येकालाच कुठे ना कुठे
कधी ना कधी एकट्यात गाठतेच गाठते..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या सहानुभूतीपूर्वक प्रतिसादाबद्दल धन्यवाद मारवा. जस्ट अ फेझ. कोणीही त्यातून जाऊ शकतो.

फार कमी असतील ज्यांना अस कधीच जाणवत नसेल

अगदी खरे आहे. विशेषतः अर्धी वाट सरल्यावरही अज्जिबात चूका न केलेले नगण्यच असतील बहुधा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न कळणारी अस्वस्थता तर प्रत्येकालाच कुठे ना कुठे
कधी ना कधी एकट्यात गाठतेच गाठते..

अगदी खरयं.

बरेचदा आपल्याला मनाला पटत नसणार्‍या गोष्टी आपण करत रहातो. त्या कुठल्या हे शोधलं आणि कोणी काही काही म्हणो त्या नाकारायचं धैर्य दाखवलं तर अस्वस्थता बरीच कमी होते.
अध्यात्म हा उपाय असल्याचं वाटतं पण तसं नसतं, असं मला तरी वाटत-- (उगाच वाद नकोत त्यावरून).

आवडत्या कविता वाचणं, गाणी ( किंवा खास करून सतार ) ऐकणं हे उपाय मन ताळयावर आणतात. मला वाटतं एखाद्या झाडाकडे बघत रहाणं हा सुद्धा चांगला उपाय आहे. मी अस्वस्थ असले तर माझ्या खिडकीतून दिसणार्‍या विलायती चिंचेच्या बारीक पानांच्या झाडाकडे बघत बसते. चिमण्या खेळत असतात तिथे. थोड्या वेळाने मनातील खंत, विषाद काही उरत नाही. मनाची सारखी चालणारी किरकिर छानपैकी थांबून जाते.

कधी कधी खण, कपाटं साफ करणं, व्यवस्थित लावणं हाही उपाय कामी येतो. आपणच लावलेल्या छान स्वच्छ नीट्नेटक्या कपाटाकडे बघताना मनातली जळमटांचाही मागमूस उरत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडत्या कविता वाचणं, गाणी ( किंवा खास करून सतार ) ऐकणं हे उपाय मन ताळयावर आणतात. मला वाटतं एखाद्या झाडाकडे बघत रहाणं हा सुद्धा चांगला उपाय आहे. मी अस्वस्थ असले तर माझ्या खिडकीतून दिसणार्‍या विलायती चिंचेच्या बारीक पानांच्या झाडाकडे बघत बसते. चिमण्या खेळत असतात तिथे. थोड्या वेळाने मनातील खंत, विषाद काही उरत नाही. मनाची सारखी चालणारी किरकिर छानपैकी थांबून जाते.

मस्त! हे मला तरी जमलेले नाहीये. प्रयत्न केला आहे.

बरेचदा आपल्याला मनाला पटत नसणार्‍या गोष्टी आपण करत रहातो.

अगदी अगदी.

कधी कधी खण, कपाटं साफ करणं, व्यवस्थित लावणं हाही उपाय कामी येतो. आपणच लावलेल्या छान स्वच्छ नीट्नेटक्या कपाटाकडे बघताना मनातली जळमटांचाही मागमूस उरत नाही.

अतिशय सुंदर उपाय आहे हा. माझा आवडता आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गवि,

Let me come out clean. ह्म्म्म थोडा ढोंगीपणा आहे या लेखात पण अगदी नावापुरता. "मी मनःशांती विकत घ्यायला गेले होते" हे phony वाक्य आहे. हे वाक्य फक्त एवढ्याकरता पेरलेले आहे की मलाच स्टार फील यावा. म्हणजे कसं, आता पैशाच्या चिंता बुवा संपल्यात अन तारे-तारका कशा या अध्यात्मिक रिसॉर्ट वरुन त्या अध्यात्मिक रिसॉर्टला वार्‍या करतात अन त्यांना अध्यात्माचा अचानक पुळका येऊ लागतो, पुलंच्या भाषेत अध्यात्माची खाई-खाई सुटते तसे Wink

In reality,मला मनःशांती ची ना कमी आहे ना ती विकत घेण्याइतका पैसा आहे. इन फॅक्ट सध्या अगदी मस्त मी एकटी सुंदर घरात रहाते आहे अन कधी नव्हे ते solitude अन स्वातंत्र्य उपभोगत आहे. Smile

तर back to the point, ते वाक्य सोडलं तर बाकी सर्व प्रांजळ आहे. उदबत्ती विकत घेतल्यानंतर घरी आल्यावर मला आठवले की बालकामगार हे उदबत्तीच्या व्यवसायात व toxic वातावरणात काम करतात. अर्थात हे घेताना ना आठवले ना मी आता लगेच त्या उदबत्ती फेकून देतीये. मी त्या वापरते आहे पण परत घेणार नाही त्याऐवजी माझ्याकडे सुगंधी मेणबत्तींचा पर्याय आहे.

पण मला त्या बाईने भारत देशाकडे फक्त एका utilitarian दृष्टीकोनातून बघून , "स्वस्त" या एकाच विशेषणाने बोळवण करणे मला खटकले होते पण ती तर काय परकी बाई होती.

असो. आपल्याला व्यनि करणार होते पण वाटले इथेच लिहावे.

तर होय थोडा ढोंगीपणा लेखात आहे पण चिमूटभरच. Smile
______
थोडंही ढोंग हे कुंडलीतील धनु राशीचे शुक्र्/गुरु/सूर्य न राहू करुन देत नाहीत बुवा Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इट्स ऑल पार्ट ऑफ बीइंग अ ह्यूमन.

माझाही कुठे छद्मी सूर लागला असेल तर सॉरी. मारवा यांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाला कधी ना कधी अशी अस्वस्थता जाणवतेच हे खरं. फक्त भारताला स्वस्त म्हणून युटिलिटी व्हॅल्यूच फक्त चिकटवण्याबद्दलः त्या अमेरिकन (अ‍ॅश्युमिंगली) व्यक्तीने भारताला आर्थिक बाबतीत काहीही म्हणणे ही कॉम्प्लिमेंटच असू शकते असा काळ सध्या आहे. तेव्हा.. चिल..!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ती ढोंगीपणाची एक चिमूट असे सदर चालू होणार का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

. भौतिकतेत बरबटलेले अध्यात्म कुठून शांती देणार. पैश्यानी सुख सुविधा मिळतात, मन:शांती नाही. त्यासाठी मनालाच शांत करावे लागते. बाकी स्त्रिया देशी असो वा अमेरिकेतल्या एक दुसर्याला 'शालजोडे' मारण्यात पटाईत असतातच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझाही दुखवायचा हेतू नसतो /नाही आणि परंतू तिरकस बोलण्याची सवय आहे. अचरट नावावर हे खपवतो दुसरं काय ?

स्त्रियांच्या तोंडून परिस्थिती बोलत असते असे माझे प्रांजळ मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्त्रियांच्या तोंडून परिस्थिती बोलत असते

नक्की काय म्हणायचं ते कळ्ळ नाहीये पण वाक्य आवडलं (भांडताना वापरता येइल) Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनुष्य आपल्याच नादात असतो बाई त्याला बोलून जागे करते. "अहो आपलं घर, संसार, मुलांचं बघा. तुमचे छंद ठेवा बाजूला."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0