द सिक्रेट- नवीन अंधश्रद्धा ?

अंधश्रद्धा या सर्व समाजांमध्ये कमी अधिक प्रमाणात आढळतात . म्हणजे भारत हा साप -हत्ती चा आणि मागासलेला देश आहे असे मानणाऱ्या युरोपिअन देशांमध्ये आणि अमेरिकेमध्ये पण अंधश्रद्धा भरभरून आढळतात . भारतात भानामती आणि अंगात येणे वैगेरे प्रकार होत असतील तर गोऱ्या लोकांमध्ये उडत्या तबकड्या , परग्रहवासी आणि dooms day वैगेरे विज्ञानाचा मुलांमा दिलेल्या अंधश्रद्धा जोरात आहेत . याचा एक दणकून पुरावा म्हणजे २१ नोव्हे . २०१२ च्या निमित्ताने उडालेला धुरळा . जग आता नष्ट होणार म्हणून अनेक लोकांची पळापळ सुरु झाली होती . शेवटी नासा ला मध्ये पडून हे धादांत खोटे आहे असे निवेदन द्यावे लागले होते . तरी पण तो दिवस उलटे पर्यंत अनेक लोकांनी आपले 'जिझस ' पाण्यात बुडवून ठेवले होते . तर सांगायचा मुद्दा हा कि खरच अंधश्रद्धा या बाबतीत खरच 'काळ -गोर ' (No pun intended ) करता येत नाही .

मला 'द सिक्रेट ' या प्रकरणाचा शोध 'चित्रलेखा ' मासिक वाचताना लागला . चित्रलेखाने चक्क या विषयावर कवर स्टोरी केली होती . काय आहे हे प्रकरण ? Rhonda Byrne या लेखिकेने हे पुस्तक लिहिले आहे . याच विषयावर एक फिल्म पण आहे . तू नळी वर तिचा काही भाग उपलब्ध आहे . तर या पुस्तकात Rhonda ने एक नियम मांडला . 'The Law of Attraction ' (आकर्षणाचा नियम ?). Rhonda च्या मते हा नियम फ़क़्त काही ठराविक लोकांनाच माहित होता . यात मोठमोठे महाराजे , कलाकार , सेनानी आणि मानवी इतिहासाला वळण देणार्या व्यक्तींचा समावेश होता . पण Rhonda च्या मते हा मानवी जीवनाला वेगळे वळण देणारा आणि मानवाच्या सगळ्या आशा आंकाक्षा पूर्ण करणारा नियम तिला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे म्हणून तिने हे पुस्तक लिहिले होते . हा The Law of Attraction 'असे सांगतो कि माणूस हा सकारात्मक विचारांच्या मदतीने आपल्याला पाहिजे ते म्हणजे भरपूर संपत्ती , प्रेम , सुदृढ तब्येत वैगेरे मिळवू शकतो . वर वर तर हे विधान /नियम निरुपद्रवी आणि खर वाटू शकत . पण ग्यानबाची मेख अशी आहे कि या नियमाला पूर्ण पुस्तकात वैज्ञानिक नियमांचं अधिष्ठान देण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे . त्यासाठी Placebo Effect च्या मागचे कार्यकारण भाव आणि Quantum Physics चे नियम याचे दाखले देण्यात आले आहेत . म्हणजे एका साध्या नियमाला तो एक त्रिकालाबाधित नियम आहे असे सिद्ध करण्याचा खटाटोप . म्हणजे या पुस्तकात वजन कसे कमी करावे किंवा घातक रोगांपासून The Law of Attraction ' वापरून मुक्ती कशी मिळवावी यावर वेगळे प्रकरण आहे . त्यावर अनेक तज्ञांनी टीका केली . म्हणजे सकारात्मक विचार करणे हि चांगली गोष्ट आहे पण दुर्धर रोगाच्या शेवटच्या टप्प्यात असणारा माणूस The Law of Attraction ' वापरून बरा होऊ शकतो का ? अनेक वैज्ञानिक आणि Medical Experts नी हे पुस्तक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईक याना खोटी आशा लावते अशी टीका केली आहे .

साहजिकच या पुस्तकावर आणि The Law of Attraction ' वर टीकेची राळ उडाली . अनेक लोकांनी यावर टीका केली आहे कि या नियमावर विसंबून राहणारे आणि प्रत्येक समस्येवर 'Instant Solution ' शोधू पाहणारे लोक आपल्या आयुष्यातील समस्येच्या root cause पर्यंत जाण्याच टाळतात आणि हे त्यांच्यासाठी धोकादायक आहे .आता या पुस्तकातल्या Quantum Physics च्या दाखल्या बद्दल Rhonda Byrne ने विज्ञान या विषयाचा कधी अभ्यास पण केला नव्हता . तरी पण तिच्या दाव्यानुसार The Law of Attraction ' वापरून अतिशय क्लिष्ट अशा Quantum Physics चे नियम समजून घेतले . तिच्या या दाव्यावर सडकून टीका होणारच होती आणि तशी ती झाली देखील .

शिवाय आपल्यासोबत घडणारया सर्व वाईट घटना आपणच नकारात्मक विचार करून आपल्याकडे आकर्षित करून घेतो हा The Law of Attraction चा व्यत्यास पण तितकाच धोकादायक . म्हणजे दिल्ली बलात्कार प्रकरणातील बलात्कारित मुलीने नकारात्मक विचार करून तो बलात्कार ओढवून घेतला होता का ? किंवा लातूर मध्ये झालेल्या भूकंपात मरण पावलेल्या किंवा सर्वस्व गमावलेल्या लोकांनी हा भूकंप नकारात्मक विचार करून घडवून आणला होता का ? साहजिकच victim असणाऱ्याला दोषीच्या पिंजर्यात हा नियम उभा करतो .

पाश्चात्य लोकांकडून आलेलं सगळ भारी अस मानून चालणार्या आपल्याकडे पण या पुस्तकाचा खप चिक्कार वाढला आहे . माझे काही मित्र पण यात आले . ते कायम आम्ही सध्या किती आनंदी आहोत आणि सकारात्मक आहोत हे दाखवत असतात आणि कुठलाही प्रश्न शेयर करायला गेल कि Think Positive ' चा डोक्यात जाणारा सल्ला देतात . इतकेच नाही तर आम्ही द सिक्रेट वाचल आहे हे status of symbol समजणाऱ्या लोकांचा संप्रदाय आपल्याकडे पण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे . अनेक बापू -महाराज -साध्वी यांचे संप्रदाय कमी होते कि काय म्हणून यात या नवीन cult ची भर . आता तर The Law of Attraction चे दाखले अनेक महाराज लोक पण आपल्या प्रवचनात द्यायला लागले आहेत . हा नियम वापरून प्रबोधन करणार्या Motivational Speakers चे तांडे पण तैयार झाले आहेत . हो आणि ते Speakers आपल्या प्रबोधनासाठी भरभक्कम फी आकारतात . The Law of Attraction वापरून पैसे
कमवत नाहीत . यालाच विरोधाभास म्हणतात कि काय ?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.8
Your rating: None Average: 3.8 (5 votes)

माझ्या एका अगदी जवळच्या परिचिताचा दावा आहे की त्याची आयायटीची एंट्रन्स फक्त "द सिक्रेट" मधील पद्धत अवलंबल्याने क्लीअर झाली.
स्वतःच्याच (खरोखरच घेतलेल्या भरपूर) प्रयत्नांना, अभ्यासाला व कष्टांना तो ज्या हिरीरीने दुय्यम ठरवत असतो ते बघुन हसावे, कीव करावी की चकित व्हावे या संभ्रमात मी पडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषीकेश आपले म्हणणे पटते. असा समज म्हणजे तद्दन वेडेपणा वाटतो.
तुम्ही दिलेल्या उदाहरणावरुन अन स्वतःच्या उदाहरणावरुन एक खात्री पटली की आय आय टी मध्ये जाऊ इच्छिणारी बरीच मुलं "डे-ड्रीम" करतात. अगदी मी देखील in vivid colors & nuances हे स्वप्न पहायचे की मी आय आय टी ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले आहे, व सर्वांना आनंद झाला आहे.
पण त्या दिवास्वप्नामुळे ती क्लिअर झाली हे म्हणणं धाडसाचे ठरेल. त्या वयात स्वप्न ही पाहीलीच जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कळतात हो,कळतात आम्हाला ही बोलणी? आमचे ईन्जिनेरीन्ग non-iit मध्ये खम्पलेट (चार वर्षापल्याड) केल म्हणून कित्तीबाई छळण ते.
iit,aiims,iit+iim ह्या उच्च कालेजीय व्यवस्थेचा जाहीर निषेध Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.

हाहाहा अहो पण आय आय टीयन मी काही म्हणजे काहीच दिवे लावलीले नाहीयेत. ते वन-साँग वंडरसारखं झालय. जाऊ दे जाचे त्याचे दु:ख त्यालाच ठावे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्याच्यात "द सिक्रेट" ऐवजी इतर प्रेरणा जसे जात, धर्म, 'मर्दानगी', पाचुचे का तसलेच कसलेतरी खडे असे काहीही,अगदी काहीही फिट्ट होऊ शकते. शेवटी ज्याची त्याची प्रेरणा. मग "द सिक्रेट"लाच कशाला विरोध करा? अन् तसही त्याच उत्तर 'फक्त विश्वास ठेवणार्याला कळेल/फळेल/लाभेल' टाईप असत.
मी सुद्धा subramanian swami fanclub member होतो का-तर की एवढा harward चा माणूस hindu धर्माच खोट bragging कशाला करेल म्हणून? krishna subconcious ची भक्ती करणारा एक पन्थ ज्यात मी जायचो(केवळ उत्तम खायला मिळत म्हणून). तिथ त्यान्चे भक्त किवा admirer सान्गायचे हे ---नन्द coep चे topper होते म्हणुन(आईला!!) तेही अभ्यास न करता(आईला!!उईमा!!) all thanx to concentration power gained or acquired or inherited due to lord krishnaas devotion ( albeit unflinched devotion or you will not get it). पण त्या भक्ताला ते हे ही सान्गायचे की अभ्यास कर नाहीतर आमच्यावर नाव येइल टाईप.
त्यान्च्या एका lecture मध्ये त्यानी सान्गितल की jesus krishnaचा अवतार आहे म्हणून.
------
iit-iim चे लोक हुशार असल्याने प्रामाणिक असतात हा पण एक अन्धविश्वास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.

लोक हुशार असल्याने प्रामाणिक असतात हा पण एक अन्धविश्वास

हो. अभ्यासात हुशार असलेले लोकं सगळ्याच पातळीवर प्रामाणिक असतात असा अंधविश्वास असतो खरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>generally egineering/medical life मध्ये बी.पी., स्मोकिन्ग(धुम्रपान फक्त मराठी जाहिरातीत असत),पव्वा(याला अश्र्लीलपणे काही लोक दारु असे म्हणतात),GF/BF(लफडी)केलेली असतात. म्हणून सगल्याच engineer कडे सगले engineer 'अपना भाई/यार' या नजरेने बघतात.
--------
अवान्तर college चे अनुभव
>>sir/madam च्या blue eyed girl/boy ला boy ला चाटु तर girl ला रन्डी असे हमखास सम्बोधले जाते.
>>पोरीवर लाईन मारणारा मास्तर(professor चे नामाभिधान),रागीट मास्तर म्हणजे लग्न न झालेला/बायकोशी भान्डण केलेला/प्रोमोशन हुकलेला असेही म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.

krishna subconcious
ची भक्ती करणारा एक पन्थ ज्यात मी जायचो(केवळ उत्तम खायला मिळत
म्हणून). >> पुण्यात कुठेय हे? खायला द्यायच्या आधी प्रवचन ऐकणे कंप्लसरी आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिल्ली, बंगलोर, ऋषिकेश या तिन्ही ठिकाणी श्री कृष्णाच्या कृपेने उत्तम भोजन मिळते. तृप्त होऊन ढेकर दिल्यावर प्रभूचे नामस्मरण होतेच म्हंटलेच आहे 'भुके पेट भजन न होय गोपाला'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे coep/vjti असल्या engineering institute व b.j./g.m./l.t. असल्या top medical colleges मध्येच एखाद्या specific दिवशी उदा. मन्गलवार lecture + प्रसाद(brunch एवढा पण dinner इतका नाही) ठेवतात. college मध्ये pass नाही मागत पण मुख्य देवलात मागतात (तेथे सुग्रास जेवण भेटते ) पण बाहेरच्याना invite(आणि invitation नसेल तर allow) करतात की नाही देव(फक्त क्रिष्णच) जाणो.
----
अजून थोडे -
ते english मध्ये lecture देत असल्याने इतर बाबान्पेक्षा ते great आहेत अस वाटत राहत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.

ओके. कॉलेजात लेक्चर्स असायची होय!
पुर्वी कँपमधे कृष्णाच्याच कोणत्यातरी पंथाचा देऊळ की मठ होता. नंतर ती जागा कमी पडायला लागली म्हणून ते कोंढव्याला गेले. हे तेच असावेत अशी शंका आलेली.
इंग्लिश तर इंग्लिश... आपल्याला काय कोणत्याही भाषेत ऐच्छीक बहिरेपण वापरता येतं!

------------

बाकी लेखातल्या law of attraction ची प्रचीती आली कालच. फुकट खाणे कुठे मिळतेय याचा माझ्या मनाने फारच ध्यास धरला असणार. घराजवळच्याच स्वामी समर्थ मठात दर गुरूवार, शनिवारी रात्री जेवण मिळतं हे एकांकडून विनाकारणच कळालं. Power of subconscious ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचन थोडेफार असेल तर समोरच्या वक्त्याचे( इथे ---नन्दान्चे)बहूतेक द्रुष्टान्त उदाहरणे (उदा.महाभारत english मधून)आधीच माहीत असल्याने जे बाकीच्यानी पहिल्यान्दा ऐकले असायचे , ते उदाहरण त्याच किवा रुपान्तरीत (म्हणजे मराठीत) स्वरुपात परिचयाचे असल्याने मला ते तितके great वाटत नसत. दरवेली मी आज नवीन किती additional माहिती,विचारसरणी मिलाली हे काढायचो ८०% already माहीत असायची.
त्यान्चा भक्त माझ्या मागे लागला होता - सुट्ट्यात नाशिकच्या कसल्यातरी यात्रेला चल म्हणून. मला नाही म्हणवत नाही म्हणून घरच्याना विचारले. घरचे मला म्हणाले,"अस करुनच नादाला लावतात". माझी पण इच्छा नव्हती. मग त्याचे call घेणे बन्द केले. त्याला बघू ,करु म्हणत कटवला. मग सुट्टीत घरी गेल्याने वाचलो. पुढे अनेक दिवस त्याला बघताच कसनुस वाटायच. पण रहाटगाडग्यात सवय होऊन गेली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.

आमच्या ओळखीच्या एका काकूंनी त्या चेन मेंबरशीपवर चालणार्‍यांपैकी एका कंपनीची एजन्सी घेतली. आणि ते नवीन मेंबर जॉईन होताना ह्या पुस्तकावरून बनवलेली फिल्म दाखवतात (म्हणजे गळ्यात मारताना) 'मोटिवेट' करायला म्हणे. मला काही कळं ना. म्हणजे सि़क्रेटच्या नियमानुसार हे नवीन बकरे करणार काय? खप नसतांनासुद्धा माल जाम खपतोय असं वाटंत घेत राहून उगाच माल भरत राहणार की काय कोण जाणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तर हा प्रकार "असेल हरी तर देईल खाटल्यावरी" असा वाटला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नकारात्मक मानसिकतेमुळे संधी निसटतात. तुमचं नशीब तुमच्या मानसिकतेनुसार बदलतं. एव्ह्ढाच त्या पुस्तकाचा संदेश आहे. नथिंग मोअर नथिंग लेस...

डे-ड्रिमिंगमुळे (पक्षी व्हिज्युअलायझेशन) मी ब-याच गोष्टी मिळवल्या असल्यामुळे मी त्यांचा समर्थक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0