नक्की कोणता मी प्राणी ...!

मान हलवता सर मजला
'नंदीबैल' पहा म्हणती -
हुषार नाही म्हणून मजला
मित्र किती 'गाढव' म्हणती !

डबे शोधतो हळू नेहमी
'बोका' म्हणते आई मला ,
नुसता चरतो इकडे तिकडे
'घोडा' म्हणती वडील मला !

दादा म्हणतो 'लबाड कोल्हा'
पुढेपुढे मी करताना -
'माकड' समजे ताई मला
गडबड माझी बघताना !

'गरीब गाय' म्हणते मला
आजी माझी आवडती ,
जवळ घेउन आजोबा तर
माझा 'वाघोबा' म्हणती !

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

डुप्रकाटाआ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

चालते-बोलते प्राणिसंग्रहालय आहे हा छोकरा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा!
'मी कोण' हा प्रश्न लहानग्यांस पडावा असे वागतात खरे हे घोडे आय मीन मोठे! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!