बोका : एक धुणे!

बोका : एक धुणे!
पूर्वपक्ष:
बोका चांगला चांगला, खोटा कधी म्हणू नाही,
बायलीच्या मांजराले , सोटा कधी हाणू नाही!

उत्तरपक्ष:
दारी चपला नी बूट, जाला चिखल नी माती,
बोका तयामाझी लोळे , त्याला कशाची ना क्षिती !

बोका मळला मळला , बायलीले मान्य नसे
रंग पांढरा पांढरा, पोट कसे काळे दिसे ?

बोका धुतला धुतला, जेंव्हा हाती सापडला
असा क्रूर अत्याचार, त्याले नाही रे भावला

बोका ओरडे धडपडे, बोका टबासी आदळे
बोका हाता ओचकारी, रक्त त्यामाजी सादळे !

अरे संसार संसार , जसा बोका मांडीवर
नाकी साबणाचे फुगे, तेंव्हा चमके मांजर

वगैरे......
: मिलिंद पदकी

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

महाकवी "ग्रेस" यांना बदकाचे साकडे

प्रथम तुझे मी/वंदितो चरण
भाषा-आभरण/ महान ते!
थोर केले तुवा/मराठी साहित्य
कृतक-लालित्य/मुळी नसे.
आता ऐक माझी/ही एक तक्रार
जिवा माझ्या फार/त्रास झाला
व्यर्थ व्यामिश्रता/काय ही कामाची
आत्म्याच्या रामाची/घालमेल.
"कावळे उडाले स्वामी"/"बेडूक बुडाले नामी"
यांचा अर्थ आम्ही /लावू कसे?
"चंद्र-माधवी" ही तुझी/नव्हे केवळ "चांदणे"
गर्भात म्हणणे /तुझे काय?
"सांज-भयाच्या साजणी"/उभ्या अर्थाची भाजणी
अनर्थाची आणीबाणी/ काव्य-प्रांती.
"विद्यावाचस्पती" /नव्हे हा वाचक
अर्थाचा याचक /लहानगा.
ज्ञानदेवे केली /गीतेलाही सार्थ
बोधाचा अनर्थ/मुळी नसे.
दुर्बोधता नसे/ अलंकार "ग्रेस"
फुका तोंडी फेस/ "बदका"च्या!

: लघुकवी "बदक" (मिलिंद पदकी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

"तू खाजव Xडव्या डोके"

ग्रेस ने कवीता लिहिली
तू खाजव Xडव्या डोके
"सरणावर वैष्णव-पक्षी
भयसुंदर ओके बोके"

ग्रेस ने कवीता लिहिली
तू खाजव Xडव्या डोके
"संभोग-सतीच्या मरणी ...
नाचती स्तनावर बोके"

ग्रेस ने कवीता लिहिली
तू खाजव Xडव्या डोके
" कृष्णेस फुलांची नाती
जळते जळात खोके!"

ग्रेस ने कवीता लिहिली
तू खाजव Xडव्या डोके
"स्त्रग्धरेस मधुगर्भाच्या
मी जावळ होऊन येते!"
xxx
मिलिंद पदकी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

"धूर्त, चतुर वगैरे ..."

पुण्याच्या छप्पन्न वर्षे पाहिलेल्या धूर्त, चतुर वगैरे मित्रांची
वयस्क केसाळ कांती कलत्या उन्हात
चमकत असते.
मुलांनाही आता मुलं होऊ घातलीत आणि बायको
विरागिणी.
शेजारच्या सिगारेटच्या धुराचा
त्रास होत नाही: (पुण्यात आता चांगले
कॅन्सर हॉस्पिटल आहेच.)
पोटही तसे हात फिरवायला...
जॉगिंग वगैरे नसते धंदे नकोच या वयात.
अमेरिकेतून आलेल्या त्रस्त युद्ध्ग्रस्तांना ते विचारतात: भलत्या
जड तलवारी उरापोटी उचलायला तुला
कोणी सांगितलं रे माठ्या ? दूरच्या खिंडींवर
विकतची लढाई!
आमच्या टेकडीवरच्या खिंडीतून आम्ही जातो
सहज पलीकडे,
स्कूटरवरून !

: मिलिंद पदकी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

"या चमकदार अमेरिकेत"

या चमकदार अमेरिकेत चमकदार स्टील बार्स खाली
चमकदार अमेरिकन बायका व्यायाम करतात
घामाचे चमकदार बिंदू पांढऱ्या टॉवेलने पुसत
लिंबू पिळलेला चहा पिताना त्यांची नजर असते
आपल्या चमकदार दातांनी चमकदार लालभडक सफरचंदे
खाणाऱ्या पुरुषांवर, जे पांढऱ्या स्वच्छ टॉवेलच्या गाऊनमधून
कसलेल्या चमकदार मांड्या दाखवीत,
"पुरुषांच्या आरोग्या" वरची चमकदार
मासिके चाळत असतात. त्यांच्यासाठी
मेदाहारी आयुष्यवर्धक पेयांच्या चमकदार बाटल्या
शिस्तबद्ध शांततेत शेल्फांवर
वाट बघत असतात . या चमकदार दुनियेत
शार काळ्या तळघरातल्या ओलेत्या
भिंतींवर धडका मारून
रक्तबंबाळ होण्याचा
काही उपयोग नाही,
हे त्या छोट्या पाखराला
मी
कसे समजावू?
xxx

: मिलिंद पदकी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

ऐसी अक्षरेवर स्वागत आहे!
बोक्याची कविता आवाडली.

इतर कविता प्रतिसादात देण्यामागचे कारण कळले नाही. काही दिवसांच्या अंतराने कविता स्वतंत्र धागा म्हणून दिलीत तर अधिक वाचकांपर्यंत पोचेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कविता चांगल्या आहेत. चमकदार अमेरिकेचा शेवट थोडा अश्लील वाटला बॉ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला त्यात थोडीशी खट्याळ अमेरिका दिसली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लॉल Biggrin धाग्यातली कविता गमतीदार आहे.
बाकीच्याही रोचक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भलत्याच बिनबोभाट कविता गतीमानही वाटल्या. इतरत्र रडतराऊ आणि दोरीने खेचत आणलेल्या मरतुकड्या गझलनामक कुतरड्यांपेक्षा {XXX टाकण्याचे टाळून}हा माजोरी बोका आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0