पतियाळी बैंगन

एक चटकदार व लज्जतदार भाजी

साहित्य
वांगी छोटी (शक्यतो कमी बिया असलेली) – 1/2 किलो, टोमॅटो (मध्यम आकाराचे) – 2 किंवा 3 नग
कांदे - 2 नग, भोपळी मिरची - 1 नग, हिरवी मिरची (मध्यम लांबीची) – 1 नग, आल्याची पेस्ट -1 चहाचा चमचा, लसूण पेस्ट - 1/2 चहाचा चमचा. तेल, फोडणीचे साहित्य - कांदा बी, मोहरी, मेथी-दाणे, बडीशेप, जिरे, रगडलेले धने
तयारी
वांग्याचे पातळ काप (पाव इंचापेक्षा कमी जाड) करून पाण्यात टाकावे. जरा वेळाने काप बाहेर काढून पेपर टॉवेलवर ठेवून कोरडे करावे. टोमॅटो व भोपळी मिरची यांचे अर्धा इंच लांबीचे तुकडे करावे. कांदा बारीक (पाव इंच जाडीचे तुकडे) चिरून घ्यावा. हिरव्या मिरचीला लांबीच्या दिशेने अर्धा छेद घेऊन आतील बिया काढून टाकाव्या.
कृती
1. कढईत 2 वाट्या तेल गरम करून त्यात वांग्याचे काप, हलका ब्राऊन रंग येईपर्यंत, मंद आंचेवर तळून घ्यावेत.
2. दुसर्‍या कढईत 1 टेबल स्पून तेल घेऊन फोडणी करावी. फोडणी करताना सढळ हाताने फोडणीचे साहित्य घालावे.
3. फोडणीमध्ये, चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आले, लसूण पेस्ट घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा. नंतर चिरलेले टोमॅटो व भोपळी मिरची टाकून, परत परतून घ्यावे. मीठ व थोडी साखर चवीनुसार घालावी
4. थोडी हळद व आवश्यकतेनुसार तिखट घालून कढईवर झाकण ठेवावे आणि एक किंवा दोन वाफा येऊ द्याव्यात.
5. तयार झालेल्या भाजीत, वांग्याचे तळलेले काप घालावेत व हलक्या हाताने भाजी ढवळावी. कढईवर परत एकदा झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी.
6. तयार भाजी बोल मध्ये काढून वर कोथिंबीर पेरावी. भाजी गरमागरम सर्व्ह करावी.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

छान छान. भाजी एकदम टेम्प्टींग दिसतेय. Smile अशी भाजी, सोबत तांदळाची भाकरी + मिरचीचा खर्डा आणि ताक! अहा! स्वर्ग!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हेच म्हणतो. झकास रेसिपी.

अवांतर : ऐसी अक्षरे वर मनःपूर्वक स्वागत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

भाजी एकदम मस्त दिसतेय
गरम भाकरीसोबत हादडायला मजा येईल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

अहाहाहाहा!
'चंद्रशेखर' आणि 'पाककृती' ही जोडगोळी बघुन चकीत झालो. आणि धागा उघडल्यावर दिलेली चटकदार पाककृती बघुन या लेखनाने आनंदलो. मस्तच..! हा विकांत मिस झाला.. आता पुढल्या विकांताला ही पाकृ नक्की करून बघणार!

ऐसी अक्षरेवर मनापासून स्वागत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वांगी हा वीक पॉईंट असल्यामुळे भाजी विकेण्डची वाट न पहाता या आठवड्यातच करून पहाते. पण तळण किती होईल या बाबतीत शंका आहे. त्यापेक्षा वांग्याचे काप शॅलो-फ्राय केले तर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शॅलो फ्राय केले तरी चालेल. खमंगपणा थोडा कमी होईल एवढेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय छान लागत असणार...गरम भाकरी (पोटात तुप सोडलेली) तिळकुट,कारळे,शेंगदाण्याची चटनी,दही आणी ही भाजी एखाद्या निवांत दुपारी हादडून,वरती १ डबल किमामचं कडक १२०/३०० पान लावलं,की माग या मेनुची सांगता होइल...आणी वर दुपारची डाराडुर झोप असं जमुन आलं,तर याच्या इतकी चांगली ध्यानं/धारणा दुसरी कोणती असणार..!? चंद्रशेखरराव,,,थंडीचा एकदम फर्मास मेनु दिलात हो...काय खत्री स्वप्नरंजन झालं बघा. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

छान दिसते आहे.

पटियाला गावच्या पाककलेचे काही वैशिष्ट्य? फोडणीमध्ये वेगळे साहित्य असते का? - की नेहमीचे मोहरी-हळद-हिंगच? तेल सरसूंचे किंवा असे काही?

(मी काहीही रांधतो, आणि ते सगळे चवीला "रुचिरा"च होते.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पतियाळा संबंधी मला बैंगन आणि पेग या दोनच गोष्टी माहीत असल्याने तिथल्या पाककलेचे वैशिष्ट्य सांगण्यास समर्थ नाही. नेहमीचेच मसाले वापरावे. तेल जे आवडते ते वापरावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वांगे वैश्वीक भाजी आहे. मस्त.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

आजच ही पाकृ आमच्या मातोश्रींनी केली होती. मस्त झाली होती भाजी. आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0