राजकारण्यांची वैयक्तिक आयुष्य आणि भारतीय जनमानस

अशात बघण्यात आणि वाचण्यात आलेले दोन प्रसंग - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू असताना वर्तमान पत्रात कुणी राजकुमारी कौल वारल्याची बातमी वाचण्यात आली . त्यांच्या अंतिम संस्काराला अरुण जेटली , ज्योतिरादित्य शिंदे आणि इतर बरेच दिग्गज उपस्थित होते . कोण होत्या या राजकुमारी कौल ? वाचून अनेकाना धक्का बसेल पण दिल्ली च्या राजकारणी वर्तुळात त्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या 'Constant Companion ' म्हणून प्रसिद्ध होत्या . वाजपेयी यांच्यासोबत एका घरात त्या अनेक वर्षांपासून राहात होत्या .ज्या दिवशी कौल वारल्या त्यादिवशी सोनिया गांधी वाजपेयी यांच सांत्वन करायला त्याना भेटल्या . मनमोहन सिंग यांनी पण दूरध्वनी वरून संपर्क साधला . नंतर बदनाम झालेले वाजपेयी यांचे 'मानलेले' जावई रंजन भट्टाचार्य हे कौल यांच्या मुलीचे श्रीमान . Indian Express ने 'Mrs Kaul, Delhi’s most famous unknown other half, passes away' असा मथळा देऊन हि बातमी छापली . वाजपेयी यांनी 'मै कुंवारा हु , ब्रम्हचारी नही ' असे विधान केले होते तरी हे संबंध कायम सर्व सामान्य लोकांसाठी 'under the wraps ' होते किंबहुना जाणून बुजून ठेवण्यात आले होते . अटलजी ची सर्वसामान्य लोकांमध्ये जी प्रतिमा होती ती ढासळू न देण्यासाठी हा खटाटोप होता .

दुसरा प्रसंग - १४ नोव्हे . ला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो . पण त्यादिवशी 'कुजबुज ब्रिगेड ' च्या लोकांनी फेसबुक वर नेहरूंचे सिगरेट शिल्गाव्णारे , मद्याचा चषक हातात असणारे , महिलांसोबत जवळीक दाखवणारे (त्यातले बरेचसे Photo Shopped ) फोटो पसरवायला सुरुवात केली . उद्देश अर्थात नेहरू कसे बदफैली होते हे सिद्ध करण्याचा होता हे उघड होते . पण लेखाचा मुख्य मुद्दा हा नाही . नेहरूंचे सिगारेट पितानाचे फोटो टाकणारे अनेक परिचित स्वतः सिगारेट ओढतात . नेहरूंचे स्त्रियांसोबत फोटो टाकणारे अनेकजण स्त्रियांबद्दल काय 'नजरिया ' बाळगतात हे पण माहित होत . पण त्यांची अपेक्षा नेहरू हे आपले पंतप्रधान होते म्हणून त्यांनी काही गोष्टी करू नये अशी बालिश होती .

राजकारणी हि पण माणस असतात आणि सर्वसामान्य लोकांसारखी स्खलनशील असतात हे भारतीय जनमानस का मान्य करत नाही ? धुम्रपान व मद्यपान ह्या जगातले अनेक लोक सहज करत असणारया गोष्टी पण राजकारण्याना चार चौघात करण्याची मुभा नसावी ? काही दिवसांपूर्वी प्रफुल पटेल यांचा एका पार्टी मध्ये हातात कॉकटेल चा ग्लास असणारा फोटो आल्यावर एका प्रतिष्ठित वृत्तपत्राने त्यावर गहजब केला होता . म्हणजे वाजपेयी यांनी आजन्म ब्रम्हचारी राहील पाहिजे किंवा कुठल्या मोठ्या पदावरच्या माणसाने धुम्रपान करू नये अशा भाबड्या अपेक्षांचे काय करायचे हा प्रश्न आहे . कुठल्याही नेत्याचे मूल्यमापन करण्याचे निकष काय असावेत ? वैयक्तिक चारित्र्य का तो /ती त्याचे काम किती कुशलतेने करतो हा ? देश अस्थिरतेच्या गर्तेत असताना देशाला एक स्थिर सरकार
देणे असो वा अर्थव्यवस्था वाढीचा वेग वाढवणे ; वाजपेयी यांचे हे कर्तुत्व ते एका महिलेसोबत राहतात यामुळे कमी होईल असे तत्कालीन भाजप नेतृत्वाला का वाटले असावे ? देशात लोकशाही रुजवणे , अनेक मुलभूत बदल घडवणे आणि स्वातंत्र्य लढ्यातल कर्तुत्व हे नेहरूंचे 'तसले ' फोटो टाकल्याने झाकोळून जाइल हा आत्मविश्वास त्यांच्या विरोधकांमध्ये कसा येतो .

बिल क्लिंटन यांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष च्या पहिल्या टर्म मध्ये मोनिका लेविन्स्की प्रकरण उघड झाले आणि मोठा गहजब उडाला . पण अमेरिकन जनतेने दुसऱ्यांदा पुन्हा बिल यांना निवडून दिले कारण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले , अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेचा दबदबा पुन्हा प्रस्थापित केला . अमेरिकन जनतेने त्यांच्या देश चालवण्याच्या कौशल्याला दिलेली हि दादच होती . त्यासाठी त्यांनी क्लिंटन यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या त्या 'प्रकरणाकडे ' कानाडोळा' केला . दुटप्पी पणाची मोठी परंपरा असलेल्या आपल्या देशात असे होईल ?

भारतीय नेते पण आपली 'Holier than cow ' अशी प्रतिमा बनावी यासाठी धडपडत करत असतात . आपण धुम्रपान /मद्यपान / सुंदर स्त्रियां सोबतचे छायाचित्र प्रसिद्ध होऊ नये यासाठी त्यांची धडपड चालू असते . बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा एखादा दिलदार नेता त्याला अपवाद . आपले हेनिकेन बीअर चे प्रेम बाळासाहेब यांनी कधी लपवले नाही . त्याना सतत ओढायला पाईप लागायचा . तुमच्या आवडी निवडी बद्दल तुम्ही unapologetic असाल तर तुमचे अनुयायी पण तुम्हाला स्वीकारतात ह्याचे बाळासाहेब ठाकरे हे उदाहरण . पण बहुतांश नेते लोकापवादाला घाबरून राहण्यातच धन्यता मानतात .

राजकारणी आणि त्यांच्या आयुष्यात येणार्या स्त्रिया हा विषय राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य लोकांमध्ये चवीने चघळला जाणारा विषय . नेहरू आणि लेडी Mountbatten हे याचे उदाहरण . त्यांच्यामध्ये कशा प्रकारचे संबध होते याची चर्चा आपण चवीने करणे हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आपण करत असलेले आक्रमण नाही का ? सध्या मोदींच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा चालू आहे . त्यांनी सोडलेल्या त्यांच्या बायकोपासून ते 'पाठलाग ' करत असणारया स्त्रीपर्यंत अनेक विषयावर चवीने चर्वित चर्वण चालू आहे . हे सगळे जरी खरे आहे असे मानले तरी 'पंतप्रधान ' मोदी यांचे मूल्यमापन करण्याचा हा निकष असू शकतो का ? त्यांचे मूल्यमापन करण्याचा निकष त्यांनी महागाई कशी नियंत्रित केली , परराष्ट्र धोरण कसे राबवले , भ्रष्टाचार कसा नियंत्रित केला हा असायला नको का ? नेत्यांची वैयक्तिक आयुष्य आणि राजकीय आयुष्य यांच्यात फरक केला पाहिजे असे माझे मत आहे . (एन . डी . तिवारी सारख्या नेत्याला अपवाद ठेवावे काय ?)
अर्थातच हे अवघड आहे . लोकांना मोठ्या लोकांबद्दल आणि एकूणच gossiping करायला आणि ऐकायला आवडत . पण जेंव्हा नेता निवडीची वेळ येते तेंव्हा कुठल्या निकषांना जास्त महत्व देणे गरजेचे आहे हे लोकांनी ठरवायचे आहे . राजकारणी हि कितीही तिरस्करणीय जमात बनली असली तरी त्याना एवढा favor भारतीय जनते ने करावा .

(लेखात थोडा preaching चा टोन आला असल्यास क्षमस्व )

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (4 votes)

सुब्रमण्यन स्वामीची पोस्ट--http://lm.facebook.com/l.php?u=http%3A%2F%2Fshankhnaad.net%2Findex.php%2...

zWkchqf4v9QbOQF57qFz5CLm0H9tEORuN1PYxKraDcn0XNUbLJHnerNqM1TA0E1cn5g8uUnynVdPq8vNP2jVXVECYR1&s=1https://m.facebook.com/drsubramanianswamy/photos/a.118146701658320.18858...

यान्ची मुक्ताफळे-
सोनिया-बारगर्ल राहूल-पप्पू प्रियन्का-अल्काहोलिक शशी थरुर- वाईफ मर्डरर.
हा म्हणतो मूस्लीमान्चा मताधिकार काढा. त्याना मताधिकार पाहिजे तर मान्य करा म्हणाव की ते हिन्दु आहेत म्हणून. अजुन हे सान्गतात की माझा मुस्लीमानविरोधी नाही म्हणुन. कशावरु तर माझ्या मुलीन (suhasini haider) मुस्लीमाशी लग्न केल म्हणुन.

पण एका गोष्टिसाठी त्यान्चे आभार मानले पाहिजे. त्याने केलेला बाजारु पञकार अर्णबचा (हे असले पञकार केवळ चिञपटात काम नाही म्हणुन व tv वर दिसतो म्हणुन पञकारिते आले.)पचका.

http://m.youtube.com/watch?v=3LW8XI76xUA

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.

त्याने केलेला बाजारु पञकार अर्णबचा

अधोरेखित शब्दात एक हलंत आणि एक 'च' राहिला आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण स्वरचक्रमध्ये काही कळा काम करत नाहीत. उदा. अनुस्वार, अर्धचन्द्र इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.

अधोरेखित शब्दात अनुस्वार अथवा अर्धचंद्र यांपैकी कशासही कोठेही जागा असल्याचे आढळले नाही.

(तसेही, 'ऐसी'वर टंकण्याकरिता - अगदी मोबाइलवरूनही - 'स्वरचक्र'ची गरज असल्याचे आढळले नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अधोरेखित शब्दात अनुस्वार अथवा अर्धचंद्र यांपैकी कशासही कोठेही जागा असल्याचे आढळले नाही.
>>> उदा. हिन्दु,यान्चे,ञ, इ.

ऐसी वर टंकण्याकरिता काय व कोठे सोय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.

'पत्रकार' या शब्दात अनुस्वार वा अर्धचंद्र नेमका कोठे येतो?

बाकी, 'स्वरचक्र' का वापरता? महातापदायक प्रकार आहे, शिवाय त्याची (किमानपक्षी 'ऐसी'वर टंकताना तरी, अगदी मोबाइलवरूनसुद्धा!) गरजही नाही. सरळ नेहमीचा रोमन कीबोर्ड वापरून स्पेलिंगान्वये टंकत जा; अक्षरे आपसूक देवनागरीत उमटतील. (वेल, अगदी स्पेलिंगान्वये नव्हे; त्याचेही काही ठराविक म्यापिंग आहे, परंतु त्याचीही सवय होते लवकरच.) तेवढा एक अवग्रह वगळल्यास बाकी देवनागरीतले जवळपास सर्व टंकता येते. (अवग्रह अँड्रॉइडवरून टंकता येत नाही; ल्यापटॉपादि बिगरमोबाइलांतून त्यालाही अडचण येत नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पत्रकार ऐवजी पञकार असे लिहावे लागते ह्याबद्दल म्हणत होतो. पण आताच असे लक्षात आले की त+र=त्र असे लिहता येते.
तुम्ही सान्गितल्याप्रमाणे english मध्ये टाईप केल्यावर आपोआप मराठीत टाइप होते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.

निदान विंडोज आणि अ‍ॅण्ड्रॉइड डिव्हाइसवर होतेच.

वरील विंडोज हे viMDoj असे टायपवले की देवनागरी उमटते. [कुठलेही पॅकेज, कीबोर्ड न वापरता]

तुमचे नाव युगांतर टाइप करायला yugaaMtar असे फोनेटिकली टाइप करायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महत्त्वाचा मुद्दा चर्चेला आणल्याबद्दल धन्यवाद.

नेत्यांची वैयक्तिक आयुष्य आणि राजकीय आयुष्य यांच्यात फरक केला पाहिजे असे माझे मत आहे .

याच्याशी १०० टक्के सहमत. राजकारणच काय, सर्वच व्यवसायांबाबत प्रसिद्ध व्यक्तीचं त्या व्यवसायातलं काम आणि त्याचं व्यक्तिगत आयुष्य यात फरक केला पाहिजे. मग सचिन तेंडुलकर साईबाबांवर विश्वास ठेवतो का, किशोरी आमोणकर लोकांशी खडूसपणे वागतात का, यासारख्या गोष्टींवर चर्चा करणं हा वेळेचा अपव्यय आहे. इतर वेगळ्या प्रकारची उदाहरणंही दिसतात. म्हणजे आइन्स्टाइन किंवा श्रोडिंजर सामान्य लोकांसमोर काय बोलले याचे वेगवेगळे अर्थ काढले जातात. त्यांनी जर्नल्समध्ये काय लिहिलं हे अधिक खरं, आणि इतरत्र जे बोलले, लिहिलं ते तितकं खरं नाही हे लोकांच्या लक्षात येत नाही.

पण अशी रेषा आखणं स्वाभाविक नाही. ते प्रयत्नपूर्व करावं लागतं.

लेखाबद्दल एक आक्षेप म्हणजे अमेरिकेत काही प्रचंड वेगळी परिस्थिती आहे असं नाही. बिल क्लिंटनचंच उदाहरण द्यायचं झालं तर मोनिका ल्युइन्स्की प्रकरणापोटी आणि इतर विवाहबाह्य संबंधांपोटी तो इंपीच झाला. अगदी आत्ताआत्तापर्यंत आपण गे आहोत असं कुठचाही राजकीय नेता सांगू शकत नसे. अजूनही जाहीरपणे नास्तिक असल्याचं कोणीच सांगू शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजूनही जाहीरपणे नास्तिक असल्याचं कोणीच सांगू शकत नाही.

बहुदा श्री.शरद पवार असे जाहिरपणे सांगतात.

बाकी, मुळ चर्चेबद्दल फारसे काही मत नाही.
गॉसिप ही अशी गोष्ट आहे की फावल्यावेळेत चघळायला बरी असते. तेव्हा गॉसिप तर होणारच. त्यावरून कितीही नाही म्हटले तरी त्या व्यक्तीशी संबंधित काही बाबतीतले मतही बदलत जाणारच. त्याला इलाज नाही.

मात्र अशा गोष्टींमुळे त्या व्यक्तीबद्दलचे मत काही बाबतीत बदलले तरी त्यामुळे त्या व्यक्तीने केलेल्या मुळ कार्यावर वा एकुणच व्यक्तीच्या इतर आयामांवर शिंतोडे न उडवता त्या कार्याकडे पहाण्याइतके "मॅच्युअर्ड" असले की झाले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> आपण गे आहोत असं कुठचाही राजकीय नेता सांगू शकत नसे.
टेक्साससारख्या काँझर्वेटिव्ह राज्यातही, ह्यूस्टनची मेयर अनीस पारकर ही उघडपणे लेस्बियन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टेक्साससारख्या काँझर्वेटिव्ह राज्यातही

टेक्सास हे काँझर्वेटिव्ह आहे पण तसेच लिबर्टेरियन सुद्धा आहे असा माझा समज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॅनडमधील ऑन्टारिओ प्रान्ताची सध्याच्या प्रीमिअर बाई, कॅथलिन विन (Kathleen Wynne), ह्या उघडपणे लेस्बिअन आहेत. अर्थात अशी अन्य उदाहरणे आहेतच.

आता एक टवाळ विनोद, जो वरील क्लिंटन अफेअरच्या उल्लेखावरून आठवला. क्लिंटनसाहेब एकदा पोपसाहेबांना भेटायला गेले होतो. व्यासपीठावर दोघेहि बसलेले असतांना क्लिंटन आणि पोप ह्यांचे काही कुजबुजत्या आवाजात डोक्याशी डोके भिडवून बोलणे चालू होते. ते काय बोलत आहेत हे ऐकण्याचा आसपास उभे असलेले फ्लंकीज खूप प्रयत्न करीत होते पण त्यांना काहीच ऐकू येत नव्हते.

अखेर कुजबूज थांबली आणि आणि दोघेहि खुर्चीत सरळ झाले. क्लिंटनसाहेबांचे एकच अखेरचे वाक्य निसटते ऐकू आले. ते म्हणाले, "If you do exactly as I did, you would still be celibate."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजकारण्यांचे खाजगी आयुष्य या विषयापेक्षा मतदारांचे/नागरिकांचे खाजगी आयुष्य कसे खाजगी राहील व त्यातील बाबी कशा चव्हाट्यावर येणार नाहीत याबद्दल विचार करणे मला जास्त महत्वाचे वाटते. नागरिक पॉर्न बघतात की नाही, घरात बसून बघत असले तर कुणाच्या व कोणत्या अधिकारांचे उल्लंघन होते ? याबद्दल कायदे करण्याचा अधिकार सरकारला असावा का ? सरकारला माझ्या आय-एस-पी वर माझ्या ब्राऊझिंग पॅटर्न ची हिस्टरी रेकॉर्ड ठेवायला जबरदस्ती करायचा अधिकार असावा का ?? मी फेसबुकावर कितीही प्रक्षोभक कॉमेंट लिहिली तरी (व त्यातून दंगली झाल्या व त्या दंगलीत लक्षावधी लोक मेले तरी) माझ्या व असरकारी कंपनीतील (फेसबुक) व्यवहारावर नियंत्रण ठेवायचा किंवा किंवा वचक ठेवायचा अधिकार असावा का ???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://timesofindia.indiatimes.com/india/Jawaharlal-Nehrus-personal-pape...

घ्या. नेहरूंची व्यक्तीगत पत्रे व त्याबद्दल असलेले "कुतुहल".

किंचित अवांतर - आरेसेस ने नेहमीच नेहरू व लेडी माऊंटबॅटन वगैरे बद्दल विशेष कुतुहल युक्त बकवास केलेला आहे. नेहरू अय्याश होते हा आरेसेस वाल्यांचा इतका आवडता विषय आहे की - एक पूर्णवेळ प्रचारक मला म्हणाला की नेहरूंचा फोटो व "क्षक्षक्ष" चा फोटो शेजारीशेजारी ठेवून बघ म्हंजे कळेल. (ही १९९२ च्या आसपास ची घटना आहे. हा पूर्णवेळ प्रचारक कोल्हापूर जिल्ह्यात आरेसेस चा प्रचार करीत असे.)

क्षक्षक्ष - एक खूप प्रसिद्ध व्यक्ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मजबूरी का नाम महात्मा गाँधी' या (अश्लील, निंदाजनक परंतु तितक्याच कल्पक) म्हणीचा उगम नक्की कोठला असावा? ('कोठला' बोले तो, भौगोलिकदृष्ट्या नव्हे. तो बहुधा दिल्लीच्या बाजूचा असावा अशी अटकळ आहे. (चूभूद्याघ्या.) विचारण्याचा मतलब, या म्हणीच्या उगमाचा संबंध एखाद्या गोटाशी असावा काय?)

(
बृहदवांतर: या प्रकारास ('गधेगाळी'च्या धर्तीवर) 'गांधीगाळ' असे संबोधता यावे काय? (तांत्रिकदृष्ट्या कदाचित 'गाळ' म्हणता येण्यासारखी नसली - किंवा असलीच, तर कदाचित 'स्वगाळ' म्हणण्यासारखी असली - तरी?)
)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतिहासजमा झालेल्या नेत्यांबद्दल चारित्र्य अन राजकीय कारकीर्द वेगळी ठेवण्याचा आग्रह करणारे लोकही वर्तमानकाळात मात्र तीच चाळणी लावायला नाखूष का असतात ते कळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दोन्ही लोक एकच असतात याविषयी साशंक आहे.

उदा. नेहरूंचे चारित्र्य वेगळे ठेवावे असे म्हणणारे* लोक "सहसा" वाजपेयींच्या/मोदींच्या कुठल्या प्रकरणाची चर्चा करताना दिसलेले नाहीत.

जे लोक मोदींच्या चारित्र्याची अशी चर्चा करतात ते सहसा नेहरूंचे चारित्र्य असे नव्हतेच असा क्लेम (डिनायल) करत असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

काही केसेसमध्ये पाहिले आहे म्हणा तसे. पण इन जण्रल सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'पाठलाग' प्रकरणात सरकारी यंत्रणा वापरली गेल्यामुळे तिथे सरळच लोकांचा, लोकांनी भरलेल्या कराचा संबंध येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

yugaaMtar

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.

उजवीकडे 'लिपी'मध्ये 'देवनागरी' निवडा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0