विचारवंताचा सल्ला....

दुपारच्या वेळी एडव्होकेट बॉबी केसकर आपल्या ऑफिसात बसले होते,षेजारीच माश्या मारायचे रॅकेट ठेवले होते, त्यातुन जळकट वास येत
होता..आजचे काम संपल्याचा तो पूरावा होता..
बॉबी केसकर तसा मॉड माणूस ,त्यांच्याकडे प्रचंड बुद्धीमत्ता असल्याने त्यांच्या कडे एकही 'केस' फिरकत नव्हती. एवढेच काय
त्यांच्या बुद्धीमत्तेतुन तापलेल्या त्यांच्या मेंदुरुपी प्रोसेसरने एकही केस त्यांच्या गाडगेछाप डोक्यावर शिल्लक ठेवला नव्हता..
शेजारच्या न्यू हेवन मटणशॉप आणि केसकर यांचे ऑफिस, यात" कुणाकडे जास्त माश्या घोंघावतात "याचीच स्पर्धा लागालेली असायची..
कधीकधी तर बॉबी यांच्या डोक्यावर (कि टकलावर?)इतक्या माश्या बसायच्या की त्यांच्या बायकोला आपल्या 'ह्यांचे' केस परत
आल्याचा 'क्षणभंगुर' आनंद मिळायचा..पण बॉबीकडे खरी 'केस' येत नसल्याचे तुकतुकीत दुख तिला सतावत होते..
बॉबी स्वतःला गावातला मोठ्ठा वकिल समजायचे ..पण घरी रोज बायको चौदावे रत्न दाखवायला लागली..
" अहो, काहीतरी काम करा ,ऑफिसमध्ये कुणी येत नसेल तर तुमी कोर्टात जा ,कुणाचे एपीडेव्हीट कुणाचे काय अन काय खरडुन द्या..कोर्टात
पट्टेवाल्याची नोकरी मिळाते का ते बघा.. तेवढेच पैसे तरी मिळतील!,पलिकडचा लॉण्ड्रीवाला तुमचा वर्षाचा इन्कम एका दिवसात
कमावतो !!! काही लाज वगैरे शिल्लक आहे काय?"
बायकोचे असे बोल ऐकल्यावर ऐड. केसकर यांनी टकलावर चापट्या मारुन घ्यायला सुरवात केली .अति राग आला कि त्यांची ती 'पेटंट' एक्शन
असायची..
आता काय करायचे ,एखादा विचारवंतच गाठायला पाहिजे.. तोच विचारी मार्ग दाखवेल, एवढे म्हणुन ते एका ओळखिच्या विचारवंताकडे गेले...
त्यांच्यावर झालेल्या उच्चसंस्कारानुसार दरवाजा नॉक न करताच ते आत गेले
" आत येऊ का विचारवंतऽऽऽऽ "
"अरे केसकर, प्रसिद्ध विकारवंत ..आपलं ते कायदेवंत.. या या ऽऽ ,कसे येणं केलत आणि हे कायऽऽ,,, संडासमध्ये वापरायच्या चपला घालून का फिरत
आहात?"
"तोच तर प्रौब्लेम झालाय ना! "
"काय,ऽऽऽऽ बद्धकोष्ठ झालाय.. मग तुमी पुण्यात डॉ.मेरुमंदार जोशींकडे जा. बद्धकोश्ठतज्ञ आहेत ते. FSNCTGJMADनावाची पदवी इंग्लंडातून
त्यांना नुकतीच भेटलीय.."मेरुमंदार बद्धकोष्टाज" नावाचे त्यांचे पहाडी क्लिनिक आहे तिथे"त्यांची पत्नी डॉ.ट्युलिप जोशी पलिकडेच "नवांकुर आयुर्वेदीक
मुळव्याध उपचार केँद्र "चालवते..डॉ.नवीन धुमारेंसोबत
' मेरुमंदार' असे कसले हो नाव ठेवले त्याचे!" बॉबी खेकसत म्हणाले..
" आहो, त्यांच्या तीर्थरुपांना वाटले की आपल्या पोटी पहाड जन्माला आला आहे, पण ती तर झोपडपट्टीच्या पाठीमागची अतिक्रमण
झालेली टेकडी निघाली.. बरं ते असो "
आहो ,तसे नाहि विचारवंत ,मला तसला बद्धकोष्ठ नसून.." आर्थिक बद्धकोष्ठ झालाय" ..मागच्या ३३१ दिवसात माझ्याकडे एकही केस
आलेली नाही! , जरा मदत करा"
"करतो..., पण तुमचे डोके शाबुत आहे का बघण्यासाठी आधी माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्या"
बरं देतो!
" दोन आणि दोन किती?"
"बाविस"
"चूक, चार.
पुढचा प्रश्न, ११ २१ ५१ १०१ या संख्यांमध्ये काय कॉमन आहे?
"हे माझ्या मागच्या चारवर्षातले इन्कमचे आकडे आहेत"
" चूक. या विषम संख्या आहेत"
" कोंबडी आधी की अंड आधी?
.
.
.
"एक मुर्ग मुस्सलम आणाऽऽऽऽ"
.....(बराच वेळ विचार करुन बॉबीने उत्तर दिले...)
आँ!!!...काय हे केसकरऽऽऽऽ..
ओ के केसकर ,मी तुमच्या केसचा अभ्यास केला आहे..तुमी वैचारीक उर्मीचा निचरा करण्याची घाई झालेल्या कुत्र्याप्रमाणे आहात ..हावरे !
त्याचबरोबर तुमाला आर्थिक बद्धकोष्ठ नसुन वैचारीक बद्धकोष्ठ होत आहे.. मी मघाशी म्हणालो तसे पुण्यात डॉ .जोशींकडे तुमी जा.. ते
तुमाला जालीम औषध देतील!काही दिवसांपुर्वीच "सायकोलॉजीकल एण्ड इकॉनॉमिकल क्रायसिस ड्यु टु एन्डेमिक बद्धकोष्ठाज इन अर्बन
एण्ड रुरल इंडीया VOLUME १,२,३ हा त्यांचा तीन खंडातला ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे.."आहात कुठे!
आहो ,पण मला तुमचाच सल्ला हवाय."
सॉरी, एडव्होकेट मी' गॉन केस' घेत नाही, चला एक वाजला, माझी झोपण्याची वेळ झाली. आमच्याकडे खरच सगळं शिस्तबद्ध
असतं ,शिस्तीच्या नावाखाली फक्त 'बद्धकोष्ठ' नसतं. या तुमी आता केसकर..
गपचूप उठुन केसकर बाहेर जाऊ लागले.., आवारातली आपली विन्टेज जमान्यातल्या भगव्या रंगाची कुरकुरणारी सायकल ते शोधत होते.. सोबत
टकलावर जोरजोरात चापट्या मारत होते.

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (8 votes)

प्रतिक्रिया

अं???
सुरवात मस्त! पुढे शेवट काही झेपलाच नै!

पुन्हा वाचावं लागेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0