कावळा म्हणाला...

कावळा म्हणाला
मी नाही काळा
मी तर आहे
जरासा सावळा

बगळा म्हणाला
मी नाही पांढरा
मी तर आहे
गोराच गोरा

पाहा पाहा इकडे
म्हणाला कोंबडा
आहे का कुणाला
तुरा असा तांबडा

तितक्यात तिथे
मोर नाचत आला
सगळ्यांनी त्याला
नमस्कार केला

- ग्लोरी

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

बालगीत / कविता छान आहे .

पण सगळ्यांनी मोराला नमस्कार का केला ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

सरळ आहे. वरील एकरंगी पण आपापल्या रंगांचं वर्णन वाढवून सांगणार्‍या पक्ष्यांच्या गटासमोर एकदम रंगाच्या शेकडो छटा आणि झळाळी असलेला मोर येऊन उभा राहिला तर काही त्याने स्वतःच्या रंगाविषयी काही न बोलताच सर्वजण नमस्कारच करणार की..

कविता छान आहे..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्तंय! (बाकी कोंबड्याकडेही विविध रंग असतात हा!)
छोट्यांसाठी या नव्या सदराबद्द्ल ऐशा-संस्थापनाचे (ऐसीअक्षरेच्या संस्थापनाचे Smile ) आभार

यावरुन एक कविता आठवली:

कुणा आवडतो मोर पिसार्‍याचा
कुणी असतो नादिष्ट पोपटाचा
कुणा असतो छंद कोकीळेचा
मला परी नाद आहे कोंबड्याचा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लहानपणीची बालगीतं व बडबडगितं आठवली.
ह्या सगळ्याचा(चांदोबाची होडी वगैरे) एक संग्रह करून प्रकाशित करण्यासारखं नक्कीच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कविता गोडुली आहेच पण मला मेलीला तो कावळाच आवडतो बगा..!! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

कविता छान आहे...पण मलाही प्रथम नमस्काराचं कारण कळलं नाही...गविंचा खुलासा वाचल्यावर लक्षात आलं...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येस्स गविनी सांगितल्यावर नमस्काराच कारण कळल

आधीच्या कविताप्रमाणेच ही देखील कविता छान आहे
एकदम सोपी सहज म्हणता येईल अशी
पुलेशु

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

धन्यवाद गवि खुलासा केल्याबद्दल.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेहमीप्रमाणेच ग्लोरियस Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

"कावळा म्हणे मी काळा, पांढरा शुभ्र तो बगळा" आठवले. Smile

(परंतु ती कविता निर्दय विनोदी शोकांतिका आहे. या कवितेत कावळा-बगळा-कोंबडा मोराला बघून नम्र होतात. म्हणजे सगळेच मनातून खरे तर शाहाणे आहेत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपण काळे नसून सावळे आहोत हे सांगणार्‍या कावळ्यामुळे घरातल्या एका संवादाची आठवण झाली. चुकून एखादा पदार्थ खारट झालाच तर सासूबाई म्हणायच्या, खारट नाही काही, मीठ जरा पुढे आलं आहे इतकच!

असो. कवीता छान आहे. पण नेहेमीप्रमाणे जमली नाही असे वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0