(काय साला त्रास आहे!)
प्रेरणा : - इथे! मूळ कविता फारच सुंदर आहे. तिला मी दिलेली दाद समजा.
भर दुपारी चाललेला गायनाचा तास आहे
सांग कैसी काढु डुलकी, ताप हा डोक्यास आहे
झोप येता धावली ती बावळी कार्टीं तुझी गं
सोड तू छंदास या, हा मद्गळ्यासी फास आहे
तान लावोनि भसाडी, रेडक्याला साजिरीशी
गंध नाही त्या सुरांचा.. च्यायला! वनवास आहे
'सा' मधूनी 'रे' निघाला, बांधली पेटी कुणी गं?
सूरसूर्या लागलेले त्वदग्रहण खग्रास आहे!
रोज शिक्षा कृष्ण-पाण्याची, जरा बक्षी जिवाला
चार क्षण झोपेन म्हणता, काय साला त्रास आहे!
|- त्रासलेला निद्राप्रेमी -|
(रोजचंच आहे. तारीख कुठली द्यायची?)
मात्रा : गानत्रागा गानत्रागा गानत्रागा गानत्रागा
वृत्त : नीजभंगा
प्रतिक्रिया
झकास...
मूळ कवितेच्या तोडीचं (कवितेला तोडणारंच म्हणा की) विडंबन आहे. कदाचित कांकणभर सरसच. अजून येऊ द्यात.
मागे तुम्ही सामान्य कवितांवर टीका केली होतीत, पण सर्वच कवी गप्प झाले तर विडंबकांना खाद्य कसं मिळणार हाही प्रश्न आहेच.
त्रासलेला निद्राप्रेमी, तारीख कुठची, गानत्रागा, आणि नीजभंगा यामुळे विडंबन सोन्याहूनही जांभळं झालेलं आहे...
मात्र मूळ कवितेचा दुवा चुकला, तो दुरुस्त करावा ही विनंती.
अत्र्यांचे मत थोडे वेगळे पडते
रविकिरण मंडळाच्या कवितांची विडंबने आपण का करतो? तर त्या कविता खर्या तर आवडतात. आवडत असून त्यातील एखादा दोष विशेष आवडत नाही, तो ठळक करून दाखवतो... वगैरे.
रटाळ कवितांवर विडंबन केले, म्हणा. ते रटाळ कवितेपेक्षा काकणभर सरस असले, तरी ते कमकुवतच राहाते.
लोक आपली प्रतिभा वाया घालवतात, याबाबत पूर्वी थोडे वाईट वाटत असे. परंतु ते त्या व्यक्तीचे स्वातंत्र्य आहे, हे आता मला अगदीअगदी पटलेले आहे. जर प्रतिभावंताला प्रतिभेचा भुगा करताना आनंद होत असेल, तर होऊ दे ना.
(आत्महत्या करणे हादेखील मानवाचा अधिकारच आहे. हे मला पुरेपूर पटते. तरी कोणी आत्महत्या केल्याची बातमी ऐकली की थोडीशी हळहळ वाटते. जुन्या सवयीचे अवशेष - आणखी काही नाही.)
आवडले
विडंबन आवडले. विडंबकांच्या सोयीसाठी (तरी) सुमारसाहित्य निर्माण होत राहिले पाहिजे या राघांच्या मताशी सहमत.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
=))
हे हे हे!
हा तर मस्त तडका आहे!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
गानत्रागा आवडला. हे वाचून मूळ
गानत्रागा आवडला. हे वाचून मूळ कवीच 'काय साला त्रास आहे' म्हणाला नाही म्हणजे मिळवलं!
"भर दुपारी"मधेच वृत्तात मार खाल्ला, बाकी वृत्तबद्धतेमुळे विडंबन जास्तच आवडले.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.