सांग माझी दारू काय वाईट आहे???

छान कारण शोधलसं मी आज प्यालो म्हणून
भान ठिकाणावर आणलंस नशेखोर म्हणून
दारू फक्त निमित्त तुला कारण हवं होत
आज शुद्धीवर आणलंस सोडून जाईल म्हणून

जर गुंगीत ठेवूनही तूच चांगली आहे
तर सांग माझी दारू काय वाईट आहे?

तुझ्या भेटीगाठी तुझे प्रेमाचे देखावे
उगाच रंग भरून स्वतःच दूर व्हावे
मी केले प्रेमच तू जोपासलास छंद
देखावेच होते तुझे आता मिळालेत पुरावे

जर चित्र खोडूनही तूच चांगली आहे
तर सांग माझी दारू काय वाईट आहे?

अखंड साथ लिहिलीस वापरून स्पर्शाची शाई
क्षणाची सोबत आणि दुःखाची अमर्याद खाई
नक्कीच जाशील तू, ती अखंड साथ सोडून
पण स्पर्श तुझा आठवेल मला टोचल्यावर सुई

जर भावनांशी खेळूनही तूच चांगली आहे
तर सांग माझी दारू काय वाईट आहे?

रोजच दिसतात तुझ्या नकारात्मक खुणा,
नक्कीच तू जगशील माझ्याविना
हात तर माझा तू कधीच सोडला आहे
आता वाट फक्त कधी मिटतील पाऊलखुणा

जर वाटेत सोडूनही तूच चांगली आहे
तर सांग माझी दारू काय वाईट आहे?

बस झालं तुझं बस झाली नाटकं
सगळं उघडं पडायला तुझं प्रेमच होत फाटकं
नको विचार आता
काय चांगलं काय वाईट आहे
सध्यातरी माझी ही दारूच चांगली आहे.!!!

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

क्या बात है! कविता मनापासुन आवडली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भिषण भालो एकदम!
फारच छान मुड पकडाला आहे. जनरली मी कविता वाचत नाही, म्हणजे मला त्यातले जास्त कळत नाही.
पण ही कविता 'दारु' ह्या माझ्या आवडत्या विषयावर असल्यामुळे वाचली आणि मनापासून आवडली.

- (कवितेवर पहिलाच प्रतिसाद देणारा) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचा प्रतिसाद वाचून आनंद झाला................... प्रयत्न करेन तुमच्या आवडत्या विषयावर परत काही लिहण्यासाठी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पहिल्या धारेची आहे हो अगदी.... Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

सगळ्यांचे धन्यवाद! माझ्या पहिल्या प्रयत्नाला दुजोरा दिल्या बद्दल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त

भीषण सुंदोर

कवितेच विडंबन पाडायचा मोह होतोय;-)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

करा कि विडंबन........ कवितेची दुसरी बाजू कळेल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टाइट आहे.अवडली Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

गद्य म्हणून आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0