अलिकडे काय पाह्यलंत ?
आपण सर्व अधूनमधून काही ना काही सिनेमे/नाटकं/अवांतर फिल्म्स पहात असतोच. यातलं काही संस्मरणीय , इतरांना सांगण्यासारखं असतं. अनेकदा विसरण्यासारखं. या सर्वांबद्दल यथास्थित , संगतवार सांगोपांग विचार करून लेख लिहायला आपल्याला आवडेल; परंतु , लेट्स फेस इट : जितकं पाहून होतं त्याच्या प्रमाणात त्याबद्दल लिहायला वेळ होतोच असं नाही.
या वरचा उपाय म्हण्टलं तर सोपा आहे. या धाग्याच्या शीर्षकात म्हण्टल्याप्रमाणे , तुम्ही अलिकडे काही पाहिलं असेल त्याचं, कमी अधिक प्रमाणात जे काही मत तुमच्या मनात तयार झालं असेल ते नोंदवणं. एखादं नाटक, चित्रपट, डॉक्युमेंटरी अशी येते की काहीतरी स्वतंत्र लिहावं म्हणून आपल्याला प्रवृत्त करते. एरवी एखाद्या धाग्यावर आपापली मतं मांडत राह्यलो तर इतराना त्यात इंटरेस्ट वाटेल, आपापलं मत नोंदवता येईल, किंवा या धाग्यावर नावाजल्या गेलेल्या चित्रपटाला आपापल्या यादीत समाविष्ट करता येईल.
कालच "थँक यू फॉर स्मोकींग" हा २००५ सालचा सिनेमा पाहिला. अतिशय आवडला.
म्हण्टलं तर कथानक आहे बलाढ्य सिगरेट कंपन्या आपल्या चतुर प्रवक्त्यांच्या मार्फत आपल्या उत्पादनांच्यामुळे होणार्या भीषण परिणामांवर पांघरूण कसं घालतात त्याबद्दल. यामधे एरन एकहार्ट हा नट त्या प्रवक्त्याची भूमिका निभावतो. त्याने निभावलेली "निक नेलर" ही व्यक्तिरेखा ही त्यातली प्रमुख भूमिका. चित्रपटाचा पर्स्पेक्टिव्ह नेलरचाच आहे आणि सुरवातीपासूनच, पार्श्वभूमीमधे चालू असलेला नेलरच्या स्वगताचा धागा त्यात ओवला गेलेला आहे. त्याचं स्वत:चं "तत्वज्ञान" , त्यातला थंड , रोकडा सूर आणि त्यातून निर्माण झालेला डेड-पॅन विनोद हे सगळं अतिशय क्रिस्प आहे. चित्रपट आवडण्याचं कारण असं की एकंदर सटायर परिणामकारक झालेलं आहे. या निमित्ताने "लॉबिंग" करणं म्हणजे काय , त्यातले माणसांचे , संस्थांचे एकमेकांशी असलेले संबंध कसे असतात, त्या संबंधांमधे अगदी शांतपणे , रोकडेपणे कसं एकमेकांना वापरलं जातं आणि एकंदर दशकानुदशकं ही उत्पादनं कशी समाजात प्रसृत केली जातात हे फार सुंदर दाखवलंय. या चित्रपटाचा एक फार महत्त्वाचा पैलू म्हणजे , निक नेलर हा कसा खलनायक आहे या पेक्षा , यंत्रणा कशी चालते , ती कशी चालते हे ज्याला अचूक समजतं त्या व्यक्ती ती कशी वापरतात , या सार्याचा लोकांच्या आरोग्याशी आणि त्याचबरोबर त्यांच्या निवडीच्या स्वातंत्र्याशी , एकंदर या व्यवसायातल्या नैतिकतेशी कसा संबंध येतो ते छान उलगडत जातं. किंबहुना निक नेलर हा, या व्यवस्थेतला एक अचूक ठिकाणचा खिळा कसा याचंच भान इथे येतं.
थोडक्यात : चित्रपटाची शिफारस मी करतो आहे.
नोव्हेंबर २०११ - डिसेंबर २०११ मध्ये पाहिलेले चित्रपट
इझी रायडर, लॉ अबायडिंग सिटीझन, बकेट लिस्ट, ड्युअल, स्टोन कोल्ड.
रॅबिट होल, वॉलेस अँड ग्रॉमिट
"रॅबिट होल" चित्रपटाचे परीक्षण बहुधा चिंतातुर जंतु यांनी काही महिन्यांपूर्वी लिहिले होते.
एका तरुण दांपत्याचा एकुलता एक चार वर्षांचा मुलगा अपघातात मृत्यू पावला आहे. अपघात खरोखरच दुर्दैवी होता, कोणाचीच चूक नव्हती. नवरा आणि बायको दोघेही शोकदग्ध आहेत. पण त्या दोघांची शोक अनुभवण्याची तर्हा अतिशय वेगवेगळी आहे. उदाहरणार्थ :वडील मुलाच्या बागडण्याची व्हीडियो टेप पुन्हापुन्हा बघून चांगल्या आठवणींची उजळणी करतो, आणि शोक कमी करण्यासाठी अशाच पुत्रशोकी लोकांच्या सपोर्ट ग्रूपमध्ये जातो.आईला मुलाशी संबंधित कुठलीही गोष्ट घरात बघून इतके अनावर दु:ख होते, की त्याची खेळनी, त्याचा आवडता कुत्रा, कपडे... सगळे काही घरातून दूर करते.
नवरा-बायको दोघांना एकमेकांच्या वेदना "सारासार विचार करता" कळतात, पण मनापासून अनुभवता येत नाही.त्यामुळे त्यांच्यातली दरी वाढत जाते. नवर्याला मुलाची खेळणी घरातून काढून टाकणे पटत नाही. त्याच्या भावनांची पायमल्ली वाटते.
पुन्हा मूल होऊदे म्हणून नवरा शरिराने जवळ येऊ बघतो, तर बायकोला ते कसेनुसे वाटते. ती पहिल्याच मुलाच्या दु:खाने जळत आहे, तर हा दुसरे मूल व्हावे, असा विचार तरी नवरा कसा करू शकतो...
नवरा-बयको मग एकमेकांपासून मोठी धोकादायक गुपिते ठेवू लागतात. नवरा त्याच्या "दु:खी सपोर्ट ग्रूप"मधल्या एका बाईशी एकटाच भेटी घेऊ लागतो. (शरीरसुखासाठी नाही, पण तिचे दु:ख भोगणे त्याच्यासारखे असते.) बायको अपघाताच्या ड्रायव्हरची भेट घेते - तो पौगंडावस्थेतील मुलगा असतो - भेटत राहाते.
खरेखुरे प्रेम असून या जोडप्याचा पुत्रशोकाच्या दोन तर्हा त्यांचे सहजीवन फाडून टाकतील काय? पुढे मी काही सांगत नाही. पण जे काय होते, ते उत्तर साधेसुधे "हो" किंवा "नाही" असे नाही.
- - -
वॉलेस अँड ग्रॉमिट : हा अॅनिमेशन चित्रपट खूप गमतीदार आहे. याचे आनिमेशन चित्रे चितारून केलेले नाही. "क्ले" (कणकेसारखा किंवा शाडूसारखा पदार्थ) घेऊन त्याच्या बाहुल्या बनवायच्या आणि त्यांची मांडणी करून फोटो घ्यायचे. मग बाहुल्यांचा आकार, त्यांची मांडणी बदलून फोटो घ्यायचा... अशा खूप-खूप फोटोंची मिळून चित्रफीत बनते.
चित्रपटातली कथा छोट्या-मोठ्यांना आवडण्यासारखी आहे. वॉलेस हा एक सज्जन पण मठ्ठ बेकरीवाला असतो. त्याचा कुत्रा ग्रॉमिट हा चतुर असतो. त्याला सगळे-सगळे करता येते (ब्रेड बनवणे, गाडी चालवणे, वगैरे). पण बोलता येत नाही. एक माथेफिरू बाई एकामागोमाग एक असे बेकरीवाल्यांचे खून करत असते. आपल्याला, आणि ग्रॉमिटला हे आधीपासून माहीत असते, पण मठ्ठ वॉलेसला कळत नाही. तो उलट खुनशी बाईच्या प्रेमात पडतो. ग्रॉमिट मग कुठल्या क्लृप्त्या करून वॉलेसचा जीव वाचवतो? त्यासाठी चित्रपट बघाच.
क्ले अॅनिमेशन
'रॅबिट होल'चं परीक्षण इंद्रराज पवार यांनी लिहिलं होतं - http://www.misalpav.com/node/16590
'वॉलेस अॅन्ड ग्रॉमिट' मला आवडतात त्याची दोन कारणं - त्यातला ब्रिटिश विनोद आणि क्ले अॅनिमेशन. पोलंड आणि चेक रिपब्लिकसारख्या देशांत बनलेले अनेक सुंदर क्ले अॅनिमेशन चित्रपट पूर्वी पाहिले होते. या देशांमध्ये एकंदरीत फार वेगळ्या प्रकारच्या अॅनिमेशनची परंपरा आहे. यान स्वांकमायर, यिरी ट्रिन्का, वालेरिअन बोरोव्चिक आणि कारेल झेमन हे कदाचित त्यांतले सुपरिचित दिग्दर्शक म्हणता येतील. यांचं काम जरूर पाहावं अशी शिफारस करेन.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
रोचना यांच्या परीक्षणामुळे
रोचना यांच्या परीक्षणामुळे 'त्या वर्षी' पुन्हा वाचली.
फ्यूच्युरामा ही अॅनिमेटेड टीव्ही मालिका पुन्हा एकदा बघत आहे. ३१ डिसेंबर १९९९ साली क्रायोजेनिक लॅबमधे पिझा डीलीव्हरी करणारा फ्राय फ्रीज होतो आणि ३१ डिसेंबर २९९९ मधल्या न्यू न्यूयॉर्कमधे बाहेर येतो. त्याच्या दृष्टीकोनातून तेव्हाचं जग दाखवलेलं आहे. अर्थात हजार वर्ष पुढे जाऊनही मनुष्यस्वभाव बदलत नाही. बड्या कंपन्या फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात असा एक एपिसोड आहे. अमेरिकेतली शीतपेयांची क्रेझ असा एका एपिसोडचा विषय आहे. काही एपिसोड्स विनोदासाठी विनोदी आहेत. सामान्य फ्रायच्या दृष्टीने अमेरिकेबाहेर जग नसणं, अमेरिका सोडून एकूण इतर देश, खंड, ग्रह, यांच्याबद्दल असणारी तुच्छता निर्हेतुक असल्यामुळे काहीशी करूण पण बरीचशी विनोदी आहे. सरळमार्गी म्युटंट लीला (तीच जी माझ्या प्रोफाईल चित्रात आहे) आणि बेंडर नामक अल्कोहोलिक रोबोट हे दोन २"शिकलेले" म्हणावेत असे त्याचे मित्र, एक बिनडोक बाहुली एमी, विसरभोळा प्राध्यापक, कंपनीच्या फायद्यापलीकडे काहीही विचार न करणारा एचारवाला, अशी इतर मजेशीर पात्रंही या मालिकेत आहेत. बाई-रोबोट पाहून बेंडरचे डोळे बाहेर येणं असा विनोद फिका वाटावा अशी मजेशीर वाक्य अधेमधे येतात.
'सिम्सन्स' बनवणार्या लोकांनीच ही सायफाय आणि डोकेबाज कॉमेडी काढलेली आहे, त्यामुळे अनेक चेहेरे दोन्हींमधे समान दिसतात. पण 'सिम्सन्स' त्यामानाने बाळबोध वाटतं.
नेटफ्लिक्सावर उपलब्ध असल्यामुळे २२ मिनीटांचा टाईमपास आठवड्यातून दोन-तीनदा तरी होतो. पाचातले दीड सीझन बघून झालेले आहेत.
आजच पुन्हा एकदा २००६ मधे रिलीज झालेला, नागेश कुकुनूरचा 'डोर' पाहिला. सशक्त स्त्री व्यक्तीरेखा असल्यामुळे मला हा चित्रपट विशेष आवडतो. सौदीमधे नोकरीसाठी गेलेल्या दोन पुरूषांच्या पत्नी, झीनत (गुल पनाग) आणि मीरा (आयेशा टाकीया). छोट्या-छोट्या गोष्टींमधे आनंद शोधणार्या मीराचा नवरा अपघातात मरतो आणि त्याचा आळ झीनतच्या नवर्यावर, आमीरवर, येऊन त्याला मृत्युदंड होतो. मीराने माफीनाम्यावर सही केल्यास आमीरला माफी मिळू शकेल अशी बातमी झीनतला मिळते. इकडे इतर काही मार्ग काढता येऊ शकतो हे माहितच नसल्यामुळे विधवेचं जिणं मीराने नाखुषीने पण पूर्णतया स्वीकारलेलं आहे. तिच्या आयुष्यात येते ती तत्त्वनिष्ठ आणि कणखर झीनत. झीनतमुळे मीराला अशाही परिस्थितीत आयुष्य आनंदात जगता येतं हे मान्य होतं तर मीरामुळे झीनतलाही भावभावनांचं महत्त्व समजतं. एकमेकींवर प्रभाव पाडणार्या या दोन स्त्रियांबरोबर चित्रपटात आणखी एक मजेदार पात्र आहे बहुरूप्याचं (श्रेयस तळपदे). मुख्य कथानकांत या पात्राचा फार परिचय नसला तरी श्रेयस हे पात्र जिवंत करतो.
एकेकाळी पूर्ण पाऊंड मोजून डीव्हीडी विकत घेतल्यामुळे स्क्रीनशॉट वगैरे घेताना गैर वाटलं नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सिमसन्स
सिमसन्स बाळबोध नाहीए. सिमसन्स अमेरिकन लाईफ स्टाईलवर केलेलं सटिरीकल कार्टून आहे. अमेरिकन लाईफ स्टाईलच्या गमतीजमती माहित असतील तर सिमसन्स आवडेल. तीच गोष्ट 'फॅमिली गाय'ची. फक्त फॅमिली गाय साठी थोडा टॉलरन्स जास्त लागतो. सगळ्यांवर कडी म्हणजे 'साऊथ पार्क', अमेरिकेत, जगात, धर्मावर राजकारणावर यांनी केलेली पॅरडी अफाट असते. पण साऊथ पार्क बघण्यासाठी कमकूवत हृदय असून चालायचे नाही.
बाकी विषयाला धरूनः परवा जोशांच्या सुमीला पाहिलं.. काय जाड झालीए!! आमच्याबरोबर कालेजात गेली असं कोणी म्हणणार सूद्धा नाही! ...
-Nile
'फ्युच्यूरामा'ही तसंच आहे, पण
'फ्युच्यूरामा'ही तसंच आहे, पण त्यातले विनोद गीकी आहेत. मी ते आधी पाहिलं म्हणून 'सिम्सन्स' बाळबोध वाटतं. 'फॅमिली गाय' वाईट नाही, पण निष्कारण कमरेखालचे विनोद असतात जे कधीमधी चीप वाटतात. शिवाय त्यातल्या बाईचा चिरका आवाज मला सहन होत नाही आणि अमेरिकन आकाराची पात्रंही थोड्या वेळाने डोळ्यांना त्रास द्यायला लागतात. 'साऊथ पार्क' त्यामानाने ठीकठाक वाटतं. पण एकाच विषयावर किती बघायचं असं वाटतं. साय-फाय असल्यामुळे का काय, 'फ्युच्युरामा' मला काकणभर सरस वाटतं. त्यातून टीका करून लोकं सुधारतात यावर माझा विश्वास नाही, पण 'फ्युच्युरामा' पाहून माझी उत्तम आणि उच्चभ्रू करमणूकही होते; शिवाय लीलाचं पात्र स्ट्राँग हेडेडही आहे त्यामुळे मला इतर मालिका आवडत नाहीत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
असेच, शिवाय
शिवाय यू. एस. उच्चारांत सिम्प्सन मधील p लोप पावत नाही.
फ्यूचरामा मधील विनोदाची शैली आणि सिम्प्सनमधली विनोदाची शैली मला तुल्य वाटते.
दोन्ही आवडतात, पण मी खुद्द फ्यूचुरामाचे अधिक अंक बघितलेले आहेत.
तशीच असेल
< पीजे मोड सुरू >
अरे ती तशीच असेल परवा तिला अलिकडे पाहिल्याने (धाग्याचे नाव बघा) ते जाणवलं असेल.. पलिकडे असताना काय दुरून डोंगर
< पीजे मोड संपला >
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
झोपी गेलेला जागा झाला
सुनील बर्वे कलाकृती ('सुबक') 'हर्बेरिअम' अंतर्गत तर्फे सादर केलेले 'झोपी गेलेला जागा झाला' हे नाटक नुकतेच पाहिले. विजू खोटे, सुनील बर्वे, भरत जाधव, सतीश पुळेकर, भार्गवी चिरमुले (इतर नावे विसरलो, क्षमस्व) अशी जबरा टीम. विजय केंकरेंचे दिग्दर्शन, उत्तम निर्मितीमूल्ये (आणि तितकेच जबरदस्त महागडे तिकीट!). शो अपेक्षेप्रमाणेच 'हाऊसफुल्ल' होता.
या जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन केल्याबद्दल (आणि या वयात इतके तरुण दिसत राहिल्याबद्दल) सुनील बर्वेचे अभिनंदन केले पाहिजे. ( हे लिहिताना माझ्या कानावर क्षितिजापलीकडून 'डाऊन विथ..' अशी आरोळी येत आहे, पण मी तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे ;-)) . बबन प्रभूंचे हे नाटक जुने आहे, आणि ते या काळातही तसेच टवटवीत राहिले आहे असे मी तरी म्हणणार नाही. थेट, धाडसी विनोद आता मराठी नाटका-सिनेमांना वर्ज्य राहिलेला नाही, त्यामुळे प्रभूंचा सूचक विनोद हा थोडासा आंबूस वाटतो. ('पळा, पळा...' मधला विनोद अधिक ताजा वाटतो!). संशयी बायको, लठ्ठ सासू, सतत मागे लागणारा बॉस या सगळ्या आता वहात वहात सागरार्पणमस्तु झालेल्या गोष्टी आहेत. या नाटकात या विषयांवरचा विनोद फार फार तर 'टंग इन चीक' या स्वरुपाचा असाच वाटतो. या नाटकाचा हा कमकुवत दुवा सोडला तर बाकी प्रयोग बघायला मजा आली. एकतर संपूर्ण भरलेले थिएटर, प्रयोग पुण्यात असूनही प्रयोगाला आलेले सुसंस्कृत प्रेक्षक ( नाट्यगृहात प्रयोगादरम्यान पसरलेले मोगर्याच्या गजर्याचे आणि उंची अत्तरांचे (आणि पहिल्या-दुसर्या अंकांनंतर एखाद्या चुकार सिगरेटचे!) वास आणि नसलेला गुटख्याचा वास!),प्रेक्षकांचे प्रचंड हशे आणि टाळ्या, अंकांदरम्यान सुनील बर्वेला लोकांनी 'तुम्हाला वेळ कमी पडत असेल तर 'कुंकू' सारख्या मालिकांमध्ये काम करणे थांबवा पण हा उपक्रम बंद करु नका' अशी केलेली प्रेमळ विनंती ('झोपी..' हे हर्बेरियममधले शेवटचे नाटक आहे), सर्व कलाकारांचा ताजा, नैसर्गिक अभिनय आणि चांगले तीन अंकी खणखणीत लांबीचे नाटक - एकूण मजा आली. या प्रकारच्या नाटकांनी 'जागतिक रंगभूमीवर चालू असलेल्या आधुनिकोत्तर चळवळींना अशा प्रकारच्या जुनाट प्रयोगांनी खीळ बसते आहे का?' अशा कपाळावर आठ्या टाकून करायच्या चर्चेला खतपाणी मिळत असेल तर मिळो बापडे, पण जनतेला आनंद मिळवून देणे हेही नाटकसिनेमांचे मोठे यश आहे, आणि त्या अर्थाने 'झोपी गेलेला..' हे यशस्वी नाटक आहे, असे मला वाटले.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
सांगण्यासारखे बघितलेले नाही
सध्या वाचायला वेळ मिळत असल्याने.. बर्यापैकी वाचन चालु आहे मात्र फारसे काहि आवर्जुन सांगण्यासारखे बघितलेले नाही
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
एव्हरीथिंग इज इल्युमिनेटेड,
एव्हरीथिंग इज इल्युमिनेटेड, बानी अँड क्लाईड, सनसेट बुलेव्हार्ड, द काईट रनर अजुनही बरेच पाहीलेत. नावं कै आठवत नैत.
http://shilpasview.blogspot.com
"होम" डॉक्युमेन्टरी
गेल्या महिन्यात केरळमध्ये नोकरीत असलेल्या एका समवयस्क आणि समव्यसनी मित्राचा फोन आला आणि इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्यावर त्याने विचारले, "हल्ली काय पाहिलेस नवीन ?". त्याला मग नेहमीप्रमाणे दोनचार इंग्लिश चित्रपटांची नावे सांगितली जी त्याने पाहिली होतीच. त्याला मी काही विचारायच्या अगोदरच त्यानेच प्रतिप्रश्न केला, "पिक्चर्चना मार गोळी. 'होम' ही डॉक्युमेन्टरी पाहिलीस का ?" अर्थात माझे नकारार्थी उत्तर होते. त्यावर त्याने अत्यंत आग्रहाने ही डॉक्युमेन्टरी मला डाऊनलोड करायला सांगितली, तात्काळ, वरतून हेही सांगितले की रात्री बारानंतर शांतपणेच तिचा आनंद घे. एकमेकाच्या आवडीनिवडीवर विश्वास असल्याने मी ते ऐकले. आणि ज्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास 'होम' ही यान आर्थस-बर्ट्रांड यांची मुख्यत्वेकरून इकॉलॉजिकल बॅलन्सवर असलेली सुमारे दीड तासाची सर्वांगसुंदर डॉक्युमेन्टरी पाहिली आणि संपल्यावर तसाच अगदी दहा मिनिटे खुर्चीतच बसून राहिलो.
२००९ मध्ये तयार करण्यात आलेला "होम" हा माहितीपट पृथ्वीच्या उगमापासून आजतागायतचे मानवाचे "घर" कल्पनेशी असलेले नाते सांगत असतानाच पर्यावरण, हवामानशास्त्र आणि ग्लोबल वॉर्मिंग यांच्या दृष्टीने अनेकविध प्रश्नांचा उहापोह करतो. या डॉक्युमेन्टरीची निर्मिती जाणीवपूर्वक "हवाई चित्रण" पद्धतीने करण्यात आली असून प्रेक्षक जणू स्वतःच एकट्याने एका छोट्याशा विमानात बसून पृथ्वीची विषयाच्या दृष्टीने "अभ्यासपूर्ण पाहणी" करीत आहे असा आभास निर्माण करण्यात आला आहे. "हाय डेफिनिशन" तंत्राने सारे शूटिंग झाले असून या माहितीपटाच्या निर्मितीस जो काही खर्च आला आहे तो वेगवेगळ्या जाहिरात कंपन्यांनी पुरविला आहे ("होम" टायटल या कंपन्यांच्या नावातूनच साकारले जाते). पृथ्वीच्या निर्मितीपासूनची कालक्रमणा आणि वातावरणशास्त्राचा इतिहास अत्यंत रोचकपणे निवेदिका सांगत जाते (अर्थात 'एरिअल शॉट' पद्धतीने वातावरणाचे थक्क करणारे दर्शन घडते) ~ सुरुवातीस तर केवळ "जंगल" हाच घटक, मग समुद्रकिनारे तसेच नदीकिनारी होत गेलेली मानववस्ती, त्याची जगण्याची धडपड, त्यातून प्राणीवस्तीचा होत गेलेला संकोच, मग 'घर' ही संकल्पना, त्यातून निर्माण झालेल्या सोयीसवलती, आणि मग पुढे अपरिहार्यरित्या समोर 'आ' वासून ठाकलेले हवामानशास्त्र आणि वातावरणाच्या "बॅलन्स' विषयीचे सदोदित भेड्सवणारे प्रश्न. एक खरे की, यात कुठल्याही घटकावर "टीका" नसून फक्त जे घडत गेले/चालले आहे त्याचे चित्रिकरण आणि त्यालाच अनुसरून सुंदर भाषेतील निवेदन [हे निवेदन तर टिपून घ्यावे इतका मोह होतो.] या प्रश्नासंदर्भात जगातील "भव्यदिव्यते' कडे झुकलेल्या शहरांची निवड करण्यात आली आहे, त्यात अर्थातच प्रामुख्याने न्यू यॉर्क, लास वेगास, टोकिओ, दुबई आहेतच पण त्याचबरोबर चीनमधील शांघाय आणि भारतातील मुंबई यांचाही समावेश आहे.
फार लिहावेसे वाटत आहे या प्रेमात पडायला लावणार्या 'होम' डॉक्युमेन्टरीवर, पण इथल्या सदस्यांनी ती प्रत्यक्ष पाहून तो आनंद प्रत्यक्ष अनुभवावा यासाठी इथेच थांबतो. या विषयावरील तळमळ निर्माते आणि दिग्दर्शकांनी जाणली असल्याने त्यानी स्वतःच एका प्रेस कॉन्फरन्समध्ये जाहीर केले की, "हा विषय महत्वाचा असल्याने आम्ही तो मुद्दाम कॉपीराईटपासून मुक्त करीत आहोत. जगातील कुठल्याही टीव्ही चॅनेलने केव्हाही तो विनाअट प्रदर्शित करण्याची आम्ही परवानगी देत आहोत तसेच खाजगी पातळीवरसुद्ध यू ट्युब आणि टोरेन्ट माध्यमाने 'होम' कुणीही डाऊनलोड करून घ्यावा."
सध्या या देशात एका गाण्याच्या हिट्स मोजण्याचा काहीतरी प्रकार सुरू झाला आहे (जो आता थंडावलाही असेल), पण 'होम' रिलीज झाल्यावर आणि तो कॉपीराईट मुक्त आहे हे जाहीर झाल्याच्या २४ तासाच्या आत संपूर्ण जगातून चार लाखांपेक्षा जास्त प्रतिक्रीया नोंदविल्या गेल्या आहेत, हा एक विक्रमच असेल.
जरूर 'होम' माहितीपट पाहावा अशी आग्रहाची सूचना या निमित्ताने इथे करीत आहे.
अशोक पाटील
मस्त!
तुमचा प्रतिसाद वाचल्याबरोबर होम शोधून पाहिली. अप्रतिम चित्रीकरण आहे. ते पाहून आपण काय गमावतोय आणि प्रगतीच्या नावाखाली आपण आणि आपल्या पुढच्या पिढ्या कसलं आयुष्य जगणार आहोत हे पाहून वाईट वाटले.
नॅटजिओवर "Kingdom of The Forest" नावाची अशीच एक अप्रतिम डॉक्युमेंट्री पाहिली होती. त्याची ही झलक.
किंगडम ऑफ द फॉरेस्ट
"Kingdom of The Forest ची लागलीच झलक पाहिली. चटकन पूर्ण डॉक्युमेन्टरी मिळवावी असा मोह झाला आहे. तिथे उपलब्ध असलेली अधिकची माहिती मुद्दाम वाचली. सुपर स्लो मोशन आणि मॅक्रो फोटोग्राफीचा खास उल्लेख आहे. या तंत्रामुळे अविश्वसनीय असे प्लॅन्ट्स आणि जंगल लाईफ हालचाल पाहायला मिळतात याचा अनुभव मला याअगोदर बीबीसीने प्रकाशित केलेल्या अॅटेनबरोंच्या अशाच विषयावरील डॉक्युमेन्टरी पाहताना आला आहे. ती सीरिजही अगदी दृष्ट लागण्यासारखीच आहे.
[अशा थक्क करणार्या माहितीपटातील तितक्याच तोलाचे 'निवेदन' ही एक खास कलाच असली पाहिजे. कित्येकवेळा आपण त्यातील चित्रीकरणामुळे गुंगून जातो की त्या प्रभावी निवेदनामुळे ? असा प्रश्न पडत राहतो.]
अशोक पाटील
"स्वदेस" पुन्हा पहिला
मागच्याच विकेंडला "स्वदेस" पुन्हा पहिला. टुकटुक खानचा असून परत बघितला . नासा मधे प्रोजेक्ट मॅनेजर असलेला मोहन भार्गव, लहानपणी त्याला सांभाळणारी दाई कावेरीअम्माला भेटायला भारतात येतो, गावकऱ्यांच्या मदतीने बल्ब पेटवतो ह्या दोन्ही गोष्टी पिक्चर आवडून देखील खटकत राहिल्या. पण दिग्दर्शकाच कौशल्य हेच कि, खटकणाऱ्या गोष्टी चित्रपटाला सशक्त बनवतात. एका संथ लयीत चित्रपट चालत राहतो, आणि प्रेक्षक फारशी चुळबूळ न करता चित्रपट बघत बसतात. अगदी कमी वेळा असा ईफेक्ट चित्रपट बघताना येतो. ( निदान माझी तरी अशी अवस्था झाली होती ).
बोलायचं झालं तर ग्रास रूट लेव्हल वर लोकांना भेडसावणाऱ्या काही समस्यांविषयी भाष्य करणारा चित्रपट असा दिग्दर्शकाचा प्रयत्न. मग ती विजेची चोरी असो किंवा गावात वीज नसणं, बहुरंगी, बहुढंगी जातीव्यवस्था, शिक्षणव्यवस्था अशा काही गोष्टीत कळत नकळत गुरफटत जाणं. इथली व्यवस्था vs अमेरिकेतली व्यवस्था यावरून गीता, गावकरी यांचाशी उडालेले खटके, 'तुम लोग बदलानाही नही चाहते' हा डायलॉग. तर दुसरीकडे मोहनच गीता मधे गुंतत जाणं या सर्व गोष्टी एका फ्लो मधे येत जातात. 'अपने पानी में पिघल जाना बर्फ का मुक्कदर होता है' या संवादानंतर मोहनच्या भारतभेटीला वेगळी कलाटणी मिळते - आणि इथून त्याचा स्वतःला शोधायचा प्रवास सुरु होतो. पुढची स्टोरी सांगत बसत नाहीं, कारण ती सगळ्यांना माहितेय.
सुंदर लोकेशन्स, सुरेख छायाचित्रण, ए आर रेहमानच संगीत, कलाकारांची निवड या बाबतीत आशुतोष गोवारीकरला A ++++. सर्व कलाकारांची कामं खूप सुंदर आहेत. मोहन भार्गवच्या ठिकाणी टुकटुक खान शिवाय इतर कोणी पाहूच शकत नाहीं इतकी ती व्यक्तिरेखा डोक्यात फिट झाली. गायत्री जोशीची व्यक्तिरेखा खरंच आवडली ( खरंतर गायत्री जोशीच आवडली होती ). टुकटुक खान सारख्या तगड्या अभिनेत्यासमोर काही प्रसंगात भाव खाऊन गेली.
अवांतर : या चित्रपटात रामलीलेच गाणं आहे, त्या मधे राम- वानरांसमवेत लंकेवर लढाई करायला येतो असा एक शॉट आहे. माझ्या एका मित्राने एक value addition केली होती - वानर म्हणून शाहरुखला दाखवलं असतं तर बरं झालं असतं. ऍट लिस्ट प्रसंग एकदम वास्तवदर्शी झाला असता .
वसाहतवादी स्वदेश?
नासामधला शाहरुख खान एका खेड्यात येऊन तिथे सुधारणा घडवून आणतो हे काहीसं वसाहतवादी वाटतं - म्हणजे आफ्रिकेतल्या जंगलातल्या पिग्मींवर राज्य करणारा गोरा 'फँटम' उर्फ वेताळ जसा वसाहतवादी वाटतो तसा. या पार्श्वभूमीवर मग रामलीलेचं गाणं फिट्ट बसतं, कारण रामाची दक्षिणस्वारी ही आर्य-द्रविड चौकटीतले द्रविड वसाहतवादी मानतात.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
"मिर्च"
मिर्च हा मागील वर्षी आलेला झणझणीत हिंदी सिनेमा पुन्हा एकदा पाहिला.
कुणाला चावट कथा वाटतील तर कुना प्रसंगावधानाचे किस्से किम्वा विनोदी कथा वाटतील असा ढाचा आहे.
एकूनात एकदा तरी पहावा असा आहे.(टीप :- १८+ सिनेमा आहे.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
पीजे मोड
पीजे मोड सुरु
अरे ती तशीच असेल परवा तिला अलिकडे पाहिल्याने
का बुवा? तुम्ही हिंदुत्ववादी दिसत नाही.
आम्ही तर 'गणेश'कडे पाहतो बुवा!
पीजे मोड संपला
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
यू टू ब्रुटूस?
यू टू ब्रुटूस?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आम्ही तर 'गणेश'कडे पाहतो बुवा!
म्हणजे तुम्ही जोश्यांच्या सुमीकडे पाहणार्यांतले नसून 'गणेश'कडे पाहणार्यांतले आहात असे सांगायचे आहे का?
एग्झॅक्टली
अगदी अगदी. सुमीची सध्याची अवस्था बघता तिच्यापेक्षा गणेश बरा असे म्हणावेसे वाटते.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
मुझसे फ्राण्डशिप करोगे
लाईट रोमॅण्टिक काहीतरी आणायची सक्ती झाल्याने आणला होता. काहीही अपेक्षा नसताना पाहिला आणि अजिबात बोअर झाला नाही. खरोखरचे कॉलेज मधे वाटणारे तरूण लोक - जरी सुरूवातीला "लाईकेबल" वाटले नाहीत तरी स्क्रिप्ट चांगले असल्याने कथा जशी पुढे जाते तसे आवडू लागतात. उगाच करण जोहर छाप बास्केटबॉल खेळणारा हीरो, बाजूला ज्यूस घेउन बसलेल्या हीरॉइन्स, "इस साल के डान्स कंपिटिशन मे" वगैरे प्रकार नाहीत. संवाद मस्त लिहीलेले आहेत.
एका अर्थाने "यू हॅव गॉट मेल" ची फेसबुक आवृत्ती म्हणता येइल. हॉलीवूडच्या हायस्कूल कॉमेडीज असतात तसा आहे ("शी इज ऑल दॅट" नावाचा एक होता, तो पाहिलेल्यांना त्याचीही आठवण येइल). एकूण मजेदार आहे. पाहा - बोअर नक्कीच होणार नाही
(थॅऩ्क यू फॉर स्मोकिंग मलाही खूप आवडला होता).
लव का द एण्ड
यशराज फिल्म्सने नवख्या कलाकारांना प्रमुख भूमिकेत घेऊन सादर केलेली एका यूवतीची ही सूडकथा अतिशय आवडली.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
मर्डर-२
काल मर्डर-२ बघितला.. आवडला. कथा छान घुमवली आहे..
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
द मॅजिक ख्रिश्चन
विकेण्डला 'द मॅजिक ख्रिश्चन' पाहिला. पीटर सेलर्सचा 'डॉ स्ट्रेंजलव्ह' आणि 'द पार्टी' आवडले म्हणून हा चित्रपट मागवला होता. अनार्किस्ट असं या चित्रपटाचं वर्णन नेटफ्लिक्सवर सापडलं. चित्रपटात अपेक्षेप्रमाणे ब्रिटीश पद्धतीचा मिश्किलपणा आहे. पण मला थोडा कंटाळवाणा वाटला. एखाद्या मालिकेचा एपिसोड इतपत लांबी योग्य वाटली असती. पण मिळालाच तर एकदा बघायला हरकत नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
Thank you for recommendation
कालच 'थ्यँक यू फॉर स्मोकिंग' पाहिला. शिफारशीबद्दल धन्यवाद. चित्रपट फारच आवडला. फक्त शेवटी सिनेटरच्या कमिटीच्या साक्षीनंतरचा निक नेलरचे स्वगत आणि पत्रकार फ्लॉरीडातल्या वादळात उभी राहून बातमी देत आहे हे दोन त्यामानाने cheesy प्रसंग कापले असते तर बरं झालं असतं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मस्त.
आवडला होता, निक केलर शेवटी बाजू मांडतो ते हिरोइक होते, तो सांगतो ते बरोबर का चूक ह्यावर नक्कीच चर्चा होउ शकेल, पण ते मत अमेरिकेच्या भुमिकेला फिट्ट बसते, तो युक्तिवाद फारच आवडाला होता.
सिगारेट कंपन्या दोषी आहेत की नाही हे ठरवणे खरेच दुस्तर वाटते.
५०/५०
नुकताच ५०/५० हा चित्रपट पाहिला. वयाच्या २७ व्या वर्षी कॅन्सर डिटेक्ट झालेल्या एका तरुणाची, त्याच्या संघर्षाची ही एक तरल सत्यकथा आहे. आवर्जून पाहावा असा चित्रपट.
"फादर ऑफ द ब्राईड" हा नितांत
"फादर ऑफ द ब्राईड" हा नितांत सुंदर सिनेमा पाहीला. स्टीव्ह मार्टीन ने खूप छान विनोदी भूमिका केली आहे. मुलीच्या बाबतीत पझेसीव्ह वडील छान रंगविले आहेत. डिआन कीटन प्रत्येक सिनेमात डीआन कीटनच वाटते .... मला तरी.
मार्जिन कॉल
नुकताच 'मार्जिन कॉल' हा चित्रपट पाहिला. कथेवरून लीमन/लेहमन ब्रदर्स वर बेतल्यासारखा वाटतो. केविन स्पेसीचे बहुतांश चित्रपट चांगले असतात. हा ही अपवाद नाही. २००८ पर्यंत अमेरिकेत आर्थिक क्षेत्रातील कंपन्यांत जे गोंधळ चालू होते, ते उघड होऊ लागतानाच्या एका २४ तासाच्या काळाची कथा, जबरदस्त घेतली आहे.
१००% रेकमेन्डेशन.
किंचित अवांतर
'मार्जिन कॉल'ची नेटफ्लिक्सावर डीव्हीडी दिसते आहे, यादीत टाकली आहे.
नेटफ्लिक्स आणि तत्सम सुविधांमुळे आता निदान अमेरिकेततरी वाय-फायची सुविधा असणारे टीव्ही आणि डीव्हीडी प्लेयर मिळतात. नेटफ्लिक्सच्या स्ट्रींमिंगवरही उत्तम चित्रपट मिळतात, ते सुद्धा लॅपटॉप न हलवता टीव्हीच्या मोठ्या पडद्यावर बघता आणि चांगल्या स्पीकरमधून ऐकता येतात. नेटफ्लिक्स याच आठवड्यात यू.के. आणि आयर्लंडमधे गेलं आहे. भारतातही ते लवकरच (काही वर्षांत) येईल अशी आशा आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
द येस मेन.
द येस मेन यांचा फिक्स द वर्ल्ड हा दुसरा सिनेमा पाहिला. लौकिकार्थाने ही डॉक्युमेंटरी आहे. http://en.wikipedia.org/wiki/The_Yes_Men
तुम्हाला जर येस मेन माहिती नसतील तर त्यांचा पहिला येस मेन सिनेमा जरूर पहा. कॉर्पोरेट कंपन्यांनी चालवलेल्या मनमानीची, पिळवणूकीची कथा हे आपल्याच पद्धतीने मांडतात. डाव केमीकल्सचा रिप्रेझेंटेटीव्ह बनून बीबीसीवर मुलाखत द्यायला हे लोक जातात. तिथे डाव ने भोपाळ दुष्काळग्रस्तांसाठी १२ बिलियन डॉलर्सची नुकसान भरपाई मंजूर केली आहे असे जाहीर करतात. त्यांचं भांडं फूटल्यावर जेव्हा त्यांना "हा भोपाळग्रस्तांसाठी क्रूर विनोद आहे असे वाटत नाही का?" असा प्रश्न विचारला जातो. त्यावर त्यांचं स्पष्टीकरण. पूढे भोपाळमध्ये येऊन इथल्या ग्रस्तांना भेटणं? ग्रस्तांचं बीबीसीवरील होक्स बद्दल मत विचारणं वगैरे फारचं परिणामकारक वाटतं.
आपादग्रस्तांच्या मढ्यावरचं लोणी पळवणार्या कॉर्पोरेट कंपन्यांच विदारक सत्य पाहिल्यावर कोणाचाही जीव कासावीस व्हावा. न्यु ऑर्लिन्स ग्रस्तांना बळजबरीने नवीन घरं बांधायला लावून कंपन्या कसे पैसे बनवत आहेत. न्यु ऑर्लिन्सच्या मदतीसाठी म्हणून निर्मिलेल्या बिझनेस एक्स्पोमध्ये आलेल्या अमेरिकन कंपन्या वास्तवात मिलिटरीसाठी बाँब इत्यादी बनवणार्या आहेत. तिथे न्यु ऑर्लिन्सला मदत म्हणून आलेला एकमेव ग्रुप इजिप्तचा असतो. आपादग्रस्तांसाठी मदत म्हणून त्यांनी खास इजिप्शियन तंबू पाठवलेले असतात. पण त्या तंबूत मध्ये कोणाला इंटरेस्ट नसतो. आणि त्या पार्श्वभूमीवर आपादग्रस्तांसाठी ते तंबूतले इजिप्त्शियन्स गात असलेल्या गाण्याचे शब्द डोळ्यात पाणी आणतात.
कॉर्पोरेटजगताच्या ह्या हास्यास्पद प्रतिमेचा बुरखा फाडण्याकरता हास्यास्पद प्रोडक्ट्स एक्स्पोत प्रेझेंट करतात. त्यावर तिथल्या व्यापार्यांची मतं ऐकण्यासारखी आहेत. ह्या दारुण परिस्थितीची जाणिव यावी म्हणून एक्झॉन मोबीलचे प्रवक्ते म्हणून एका कॉन्फरसमध्ये जातात. इतरांना उपयुक्त अशी उत्पादनं बनवताना ह्या कंपन्या कशा इतरांच्या जीवाशी खेळतात हे दाखवण्याकरता ते एक बेत बनवतात. एका कलाकाराला एक्झॉनचा सफाई कामगार बनवला आहे. तो कॅन्सरने पिडीत आहे. शवापासून इतरांना उपयुक्त अशी उत्पादनं बनवण्याचा एक्झॉनचा प्लान आहे असे त्यात दाखवले जाते. हे ऐकुन तो कामगार त्याचा देह या "सत्कार्याला" देण्यास तयार होतो. या सगळ्याचा एक व्हिडिओ बनवला जातो आणी तो एका कॉन्फरंसमध्ये दाखवला जातो. व्हिडिओ दाखवतना लोकांना मेणबत्या दिल्या जातात, त्या पेटवल्या जातात. शेवटी सांगितले जाते की ह्या मेणबत्या त्याच्या देहापासून बनवल्या गेल्या आहेत.
वेगवेगळे प्रयोग करूनही कॉर्पोरेट जगतात काही फारशी जागृती होत नाहीए असे त्यांना जाणवत राहतो. म्हणून वैज्ञानिकांच्या एका कॉन्फरंसमध्ये जाऊन अशीच इतरांच्या "मढ्यावरचं लोणी खाऊन" फायदा करण्याची कल्पना ते मांडतात. तिथे मात्र वैज्ञानिकांकडून त्यांच्या कल्पनेला विरोध होतो, मान्यता मिळत नाही. वैज्ञानिकतरी इतरांचा विचार करत आहेत हे पाहून त्यांना हायसे वाटते.
जगभरात कार्पोरेट कंपन्यांनी चालवलेल्या मूस्कटदाबीविषयी करत असलेली धडपड पाहून या लोकांचं फार कौतुक वाटतं. त्यांच्या कार्यात खारीचा वाटा म्हणून तरी किमान त्यांच्या सिनेमांविषयी तरी कुठेतरी लिहावं, चार लोकांना सांगाव हे वाटत राहतं.
त्यांची वेबसाईटः http://theyesmen.org/
-Nile
रोचक
रोचक. ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
फुल् मॉन्टी आणि ट्रेनस्पॉटिंग
फुल् मॉन्टी आणि ट्रेनस्पॉटिंग
दोन्ही सिनेमे ब्रिटीश धाटणिचे आहेत.
फुल् मॉन्टी हलकाफुल्का-विनोदी आहे, ब्रिटीश उच्चारामुळे बघण्यास मला गंमत वाटली, चित्रपटाच्या नावावरुन आचरट बोध होत असला तरी चित्रपट हलकाफुल्का आहे, त्यातले गाणेदेखिल गाजलेले आहे.
डॅनी बॉयलचा ट्रेनस्पॉटिंग गांज्याच्या आहारी गेलेल्या ब्रिटीश तरुणांशी निगडित आहे, त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित चित्रपट बर्यापैकी सिरिअस आहे, त्यातिल काही दृश्ये पाहिल्यावर मी निदान ती रात्र झोपु शकलो नव्हतो. ट्रेनस्पॉटिंग हे नाव "रेल्वेगाड्या बघण्यात वेळ घालवणे" ह्यासम गर्दच्या नशेत आयुष्य आणि वेळ वाया घालवणे आहे हे सांगण्यासाठी वापरले आहे.
डाऊन्टन अॅबी
पीबीएस वाहिनीवर गेल्या वर्षी 'डाऊन्टन अॅबी (Downton abbey)' ही लघु-मालिका प्रसारित झाली. शंभर वर्षांपूर्वीच्या इंग्लंडमध्ये घडणारी. एकीकडे गडगंज इस्टेट, तिच्या वारसाबद्दलचे नियम, जेन ऑस्टिनच्या कादंबर्यांप्रमाणे सतत लग्न जमवण्याच्या खटपटीत असलेल्या तिघी बहिणी अशा पारंपरिक कथानकासोबतच ह्या प्रासादतुल्य घरात असलेली नोकरांची पलटण, त्यांची अंतर्गत उतरंड आणि हेवेदावे आणि या सगळ्याला पहिल्या महायुद्धाच्या चाहुलीची आणि पर्यायाने बदलत्या समाजव्यवस्थेची पार्श्वभूमी असा एकंदरीत जामानिमा आहे. मालिका फार थोर नसली तरी चोख अभिनय, प्लॉट्स-सबप्लॉट्स आणि अस्सल तिखट विलायती इंग्रजीतले क्रिस्प संवाद यामुळे नक्कीच प्रेक्षणीय झाली आहे. नेटफ्लिक्सवर पहिल्या सीझनचे सारे भाग आहेत. दुसर्या सीझनचा पहिला भाग नुकताच प्रसारित झाला, तो (आणि पहिल्या सीझनचे भाग) पीबीएसच्या संकेतस्थळावर पाहता येतील.
डबल पोस्ट
प्रकाटाआ
कॉलिन फर्थ
मालिकेत कॉलिन फर्थ किंवा अॅलन रिकमन आहेत का?
काही वर्षांपूर्वी "द फॉर्साइट सागा" बघितलेला आठवला. मुख्य पात्रातली स्त्री अभिनेत्री अगदीच सो-सो होती, पण मुख्य पुरुष पात्र आणि विल्हन जॉन फॉर्साइट ची भूमिका केलेल्या डेमियन ल्युइस ने मात्र कमाल केली होती.
मी नुकतेच "घाशीराम कोतवाल" चे नवीन प्रोडक्शन पाहिले. मला फार आवडले, पण मूळ प्रोडक्शन आणि अभिनेत्यांच्या समोर हे काहीच नाही असे ऐकले. घाशीराम सादर केलेले एकदाचे पाहिला मिळाले यातच मी आनंद मानला!
बाकी कुणी हे प्रोडक्शन पाहिलेय का?
मॅगी स्मिथ
नाही, हे दोघेही नरपुंगव यात नाहीत. परिचित असा चेहरा म्हणजे मॅगी स्मिथ.
प्लेअर्स
काही कारणाने दोनतीन तास कुठेतरी घालवायचे होते म्हणून अभिषेकादी मंडळींचा 'प्लेअर्स' हा चित्रपट पाहिला. एखाद्या गुन्ह्याची कबुली द्यावी तसे हे लिहीत आहे.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
भगवंतास्टीक
'प्लेअर्स' या नावाचा चित्रपट आहे ही एक माहिती. शिवाय कमीतकमी शब्दांत केलेले बोळवणवजा परीक्षण माहितीपूर्ण असलं तरी दुसर्याच्या दु:खावर हसण्याची सवय जाणार नाही. म्हणून प्रतिसादाला विनोदी म्हटलं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
स्टीव्हन स्पिएलबर्गचा 'वॉर हॉर्स'
"ऐसी अक्षरे" वर बरेच सदस्य असे दिसले की ते इंग्रजी चित्रपट प्रेमी आहेत. या सर्वांनी आपल्या मुलांबाळांसमवेत "पाहिलाच" पाहिजे असा एक चित्रपट म्हणजे स्टीव्हन स्पिएलबर्गचा "वॉर हॉर्स" जो यंदाच्या ऑस्कर शर्यतीतील एक आघाडीचा उमेदवार नक्की ठरणार आहे.
स्टीव्हन स्पिएलबर्ग रॉक्स अगेन इन 'वॉर हॉर्स्' असेच म्हटले पाहिजे. चित्रपटाच्या नावात 'वॉर' आहे, कथेचा निम्म्याहून अधिक भागही वॉरशीच संबंधित आहे, चित्रीकरणही वॉरचेच आहे. असे असूनही हा चित्रपट म्हणजे एक कविता आहे. एका छोकर्याच्या जिद्दीची आणि त्याच्या 'जोए' नावाच्या अफलातून घोड्याची ही एक हृदयस्पर्शी कहाणी जी पाहाणार्याला दोन तास अक्षरशः खिळवून ठेवते. स्पिएलबर्ग म्हणजे कॉम्प्युटर ग्राफिक तंत्राचा बेताज बादशहा समजले जाते, पण 'वॉर हॉर्स' मध्ये एका इंचाने मोजावा इतकाही त्या गिमिक्सचा मागमूस नाही. आहे तो मन प्रसन्न करणारा निसर्ग, साधेसोपे कौटुंबिक संवाद, युद्धभूमीचे रोखठोक वातावरण आणि त्या घोड्याचा एका मालकाकडून दुसर्याकडे होणारा अटळ प्रवास. घोड्याचा "अभिनय" ही एक कमालीची गोष्ट झाली आहे या चित्रपटात.
स्पिएलबर्ग आणि दुसरे महायुद्ध घडामोडीवरील त्याचे चित्रपट हे एक गाजलेले समीकरण बनले आहे. हॉलीवूडच्या चित्रपट इतिहासात दुसर्या महायुद्धावरील 'शिंडलर्स लिस्ट', 'सेव्हिंग प्रायव्हेट रायन", "१९४१", "फ्लॅग्ज ऑफ अवर फादर्स" आदी चित्रपट तसेच "बॅण्ड ऑफ ब्रदर्स" ही टीव्ही सीरिज, आदींशी स्टीव्हन स्पिएलबर्गचे नाव निगडित आहेच. पण पहिल्या महायुद्धावरील कोणत्याही घटनेवर त्याने चित्रपट निर्माणही केला नव्हता की एखाद्याचे दिग्दर्शनही. मात्र त्या काळातील घटनेवर आधारित कादंबरी वाचल्यावर मात्र त्याचा निर्धार झाला आणि मग तो काळ त्याने असा काही प्रभावी निर्माण केला आहे की तो पाहताना प्रेक्षक १९१४ ते १९१८ याच कालखंडात वावरतो.
ऑस्कर शर्यतीत बेस्ट पिक्चर वा बेस्ट डायरेक्टरचे अवॉर्ड हुकले तरीदेखील फोटोग्राफी आणि संगीत तरी पारितोषिकापासून दूर जाणार नाहीत असा माझा विश्वास आहे.
अशोक पाटील
छान यादी
काय काय पहायचं राहून गेलय ते समजले!
"होम" डाउनलोड करायला टाकलाय.
अलिकडे पाहिलेल्यापैकी
अलिकडे पाहिलेल्यापैकी उल्लेखनीय म्हणजे संजय काक यांनी बनवलेली काश्मीरवरची डॉक्युमेंटरी "जश्न ए आझादी". (या लघुपटकर्त्यांचा ब्लॉग : http://kashmirfilm.wordpress.com/) .
या बद्दलची उत्सुकता चाळवण्याचे कारण म्हणजे गेल्या एखाद दोन महिन्यामधे पुण्यातली सिंबायोसिस ही संस्था एका परिसंवादाचा भाग म्हणून ती दाखवणार होती. यावेळी त्याच्या निर्मात्यांची भाषणे इत्यादि गोष्टीही अपेक्षित होत्याच. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ती दाखवू नये म्हणून संस्थाचालकांवर दबाव आणल्यावर विशेष कुठल्याही प्रकारची बोलणी वगैरे न करता अगदी लगेचच हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
सुदैवाने ही डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्स वर आहे आणि मला मागवता आली. यामधे गावागावांमधे जाऊन, दहशतवादी आणि भारतीय सेना या दोन्ही बाजूंकडून विविध प्रकारचा दबाव, खासगी हक्कांवरचं अतिक्रमण आणि हिंसा यांचा सामना कसा करावा लागतो याबद्दलच्या मुलाखती आहेत. डॉक्युमेंटरीमधे सुमारे १९८९ पासूनची फूटेजेस आहेत. गिलानी , यासीन मलिक वगैरे लोकांची भाषणे आहेत. डॉक्युमेंटरी १९८९ पासूनचं समग्र चित्र रंगवण्याचा , सर्व ऐतिहासिक , राजकीय बाबींचा विचार केल्याचा दावा करत नाही. दिडेक तासांत अनेक क्षणचित्रे येतात, त्यात भारतीय सेनेचा जनसंपर्काचा प्रयत्न येतो, बेघर झालेले लोक येतात , माथं भडकावणार्या नेत्यांची भाषणं येतात आणि जोरजोरात मातम मनवल्या जात असलेल्या शवयात्रासुद्धा. निदान माझ्या दृष्टीलातरी एकंदर संकलन सम्यक् आणि संयमित वाटलं. अभाविप चा विरोध (अर्थातच) अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करणारा, सिंबायोसिसचा बुळेपणा त्यांची दिवाळखोरी दर्शवणारा आहे हे माझ्यापुरतं मला पटलं.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
संपूर्ण सिनेमा
संपूर्ण सिनेमा या दुव्यावर उपलब्ध आहे.
द ग्रेट इंडियन बटरफ्लाय
मागच्याच आठवड्यात " द ग्रेट इंडियन बटरफ्लाय " पहिला .
सार्थक दासगुप्ता लिखित - दिग्दर्शित , बॉंलीवूडचा विंग्रजी चित्रपट .. सुखाच्या शोधार्थ निघालेल्या एका तरुण जोडप्याची गोष्ट .. थोडीशी आपल्या " सुखी माणसाचा सदरा " शोधण्याच्या गोष्टी सारखीच ...
क्रिश आणि मीरा - कॉर्पोरेट जगात आपापल्या करियरच्या मागे अफाट वेगाने धावणारं एक जोडपं .. वर वर पाहता सुखी, आनंदी पण जीवनाच्या वेगात आयुष्याचं वेगळेपण हरवून बसलेलं .. तो त्याच्या हापिसात आणि ती तिच्या कामात व्यग्र .. एकमेकांना पुरेसा वेळ देऊ ना शकणारे ते दोघं .. तो , अजूनही आपल्या जुन्या प्रेयसीच्या संपर्कात .. ती घरच्या आणि दारच्या तापत्रयांना वैतागलेली .. कामात यशस्वी होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या विविध तडजोडींनी गांजलेली , वैतागलेली ती दोघं निघतात सुख-शांतीच्या शोधात .. कॅर्दिगोझ नामक एका पोर्तुगीस फिरस्त्याने लिहून ठेवलेल्या एका भारतीय फुलपाखराच्या शोधात ..
वैचित्र्यपूर्ण क्षमता असणारं , ज्याला सापडेल त्याला " जगी सर्व सुखी " बनवण्याची ताकद असणारं एक फुलपाखरू .. हा प्रवास त्यांना घेऊन जातो गोव्यापर्यंत .. गोव्याची फ्लाईट चुकलेले ते दोघं हा प्रवास स्वतःच्या गाडीने करतात .. एकमेकांबरोबर घालवलेला तो वेळ .. तो प्रवास त्यांना कुठे घेऊन जातो याची ही रंजक गोष्ट ..
जगात खरच सर्व सुखी असा कोणी आहे का ? सुख असं शोधून मिळतं का ? यावर मार्मिक भाष्य करणारा हा चित्रपट ..
थोडासा स्लो वाटला .. पण जरा वेगळे चित्रपट बघायची आवड असलेल्यांना नक्कीच आवडेल असा ...
बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "
गेम चेंज
एचबीओ ने बनवलेला "गेम चेंज" हा सिनेमा पाहिला. २००८ च्या अमेरीकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक सेराह पलीनची केलेली निवड आणि पडद्यामागच्या घडामोडींवर बनवलेला २ तासांचा सिनेमा एकदम वेगवान आहे. सिनेमातल्या बर्याचशा घटना माहित असूनही सिनेमा कुठेही कंटाळवाणा होत नाही. वास्तवात रिअॅलिटी शो ठरलेले "सेराह पलीन" कँपेन पडद्यामागच्या गोष्टींमुळेमात्र अगदी खिळवून ठेवते.
सेराह पलीनचा रोल ज्युलियन मूरने चांगला केलाय पण तिच्यापेक्षाही एड हॅरीसने वठवलेला जॉन मकेन मस्त जमलाय. मकेनची डाव्या हाताची लकब, थोडीशी वाकडी मान, मान वळवतानाचा क्लम्जीपणा हुबेहुब जमलाय. सेराह पलीनची घाईन अन निष्काळजीपणे केलेली निवड, कँपेन मॅनेजर मंडळींची उडालेली तारांबळ, मकेनचा प्रामाणिकपणा आणि शांत वृत्ती इत्यादींमुळे दिग्दर्शनालाही भरपूर गुण द्यावे लागतील. एकंदरीतच नक्की बघावा असा सिनेमा.
-Nile
रिकाऊंट
बघावा म्हणतोय, अशाच धाटणीचा जॉर्ज बुश वि. अल गोर निवडणूकीतील पुर्नमतमोजणीवर आधारीत केव्हिन स्पेसीचा 'रिकाऊंट' चित्रपट देखील बरा होता.
ब्लड सिम्पल
एथेन आणि जोएल कोएन या दिग्दर्शक जोडीचा जॉर्ज क्लूनी अभिनीत "O Brother Where Art Thou" पाहिला होता आणि त्यापाठोपाठ २००७ चे सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शकाचे ऑस्कर्स विजेता 'No Country for Old Men' हा चित्रपटही. या दोन चित्रपटांबद्दल मित्रांसमवेत चर्चा करताना त्यातील एकाने याच जोडीचा पहिला चित्रपट "Blood Simple" ची जोरदार शिफारस केली. चुकवू नये असाच हा चित्रपट. १९८४ चा, आणि तरीही कसा काय हुकला याचे आश्चर्य नक्कीच वाटले, चित्रपट पाहून संपल्यानंतर.
टेक्सास बारचा मालक, त्याची पत्नी आणि दोन अटेन्डंट या चार पात्रांभोवती गुंफलेली ही 'मर्डर मिस्ट्री' कहाणी अक्षरशः जीवघेणी ठरेल अशी या कोएनबंधूनी निर्माण केली आहे. आपली पत्नी या दोन अटेन्डंटपैकी एकात गुंतली आहे या संशयावरून बारमालक एका खाजगी डिटेक्टिव्हची पुराव्यासाठी मदत घेतो. डिटेक्टीव्ह हे उपरे पाचवे पात्र, पण याचा 'तलाश' च या चित्रपटाचा प्राण आहे. अभिनेत्री फ्रान्सेस मॅक्डोर्मन्ड ही एक गुणी अभिनेत्री आहे हे तिने या चित्रपटात सिद्ध केले आणि पुढे हिला 'फार्गो' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे ऑस्कर मिळालेही [योगायोगाने 'फार्गो' हाही कोएनबंधू दिग्दर्शित चित्रपट].
अ मस्ट सी मूव्ही. पण रात्रीच (मोबाईल स्वीच ऑफ करून) पाहावा असा आहे.
अशोक पाटील
माझे आवडते दिग्दर्शक! ओ ब्रदर
माझे आवडते दिग्दर्शक! ओ ब्रदर वेर आर्ट दाव तर धमाल आहेच. ३०च्य दशकातल्या अमेरिकेतल्या डिप्रेशनच्या निरनिराळ्या बारीक छटा चित्रपटात मस्त उमटल्या आहेत. माझे एक अमेरिकन इतिहास शिकवणारे कलीग आवर्जून हा सिनेमा वर्गात दाखवत. प्रथम पाहिला तेव्हा गाणी ऐकूनच मला वेड लागलं होतं.
ब्लड सिंपल आणि मिलर्स क्रॉसिंग मला तेवढा नाही आवडला, पण इन ऑर्डर ऑफ प्रेफ्रेन्स कोएन बंधूंचे पाहिलेले सिनेमे:
१. ओ ब्रदर
२. फार्गो
३. द बिग लेबौस्की
४. बार्टन फिंक
५. द मॅन हू वॉसन्ट देर
६. हडसकर प्रॉक्सी
७. रेजिंग अॅरिझोना
या पैकी फार्गो आणि बिग लेबौस्की तर अफलातून आहेत. नो कंट्री आणि त्या नंतरचे मी पाहिले नाहीत, कधी संधी मिळाली तर पाहीनच. इंटॉलरेबल क्रूएल्टी म्हणून एक होता, तो मात्र आवडला नाही.
ओ ब्रदर गाणी.
"ओ ब्रदर...." गाणी. ग्गॉश, मी विसरलोच त्याच्याविषयी लिहायला. विशेषतः क्लूनी आणि त्याच्या दोन मित्रांचे त्या 'कंट्री सॉन्ग' च्या रेकॉर्डिंगचे शूटिंग इतके धमाल आहे [त्यातही रेकॉर्डिस्ट आंधळा.....सोबत फक्त एक गिटारिस्ट] की ते पाहाण्याची मजा औरच.
'ब्लड सिम्पल' आवडला नाही ? पण मी तर भेटेल त्याला या चित्रपटाची शिफारस करीत आहे. १९८४ चा आहे हे लक्षात ठेवून त्याच्या सादरीकरणाकडे पाहिले पाहिजे. असो. मात्र 'नो कंट्री.....' तुम्हाला नक्कीच आवडेल. २००७ चा ऑस्करविजेता चित्रपट आहे.
अशोक पाटील
सहमत
'बर्न आफ्टर रीडींग' पण मस्त आहे! परवाच राहून गेलेला त्यांचा लेडी किलर्स पाहिला तो तेवढा जास्त नाही आवडला.
कहानी चित्रपट बघितला--
कहानी चित्रपट बघितला-- रहस्याचा अंदाज अर्ध्या चित्रपटाच्याही आधी आला तरी उत्सूकता शेवटपर्यंत टिकली.. एकुणात आवडला!
शिवाय आज नव्या संचातले घाशीराम कोतवाल पाहिले!
त्यातील विषयापेक्षा एक युरोपियन संगितीकांच्या बाजाचा प्रयोग म्हणून हे नाटक मला आवडते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
'तुकाराम'बद्दल कुणी न
'तुकाराम'बद्दल कुणी न लिहिल्यामुळे न राहवून या धाग्याला हात घातला.
१. संत, विठ्ठलभक्त, चमत्कार करणार्या, आख्यायिकांतून भेटणार्या तुकारामापेक्षा सिनेमातला तुकाराम वेगळा आहे. सामाजिक दंभावर कोरडे ओढणारा, रोखठोक, मनस्वी जगणारा आणि कवी असलेला तुकाराम सिनेमात आहे. तो जराही तुपकट, ओशट, गहिवरलेला वाटत नाही. लोभसवाणा, उत्कट वाटतो. हे मला सिनेमा आवडण्याचं मुख्य कारण.
२. सिनेमा बघताना कुठेही कंटाळा येत नाही, नि तरी एकामागोमाग एक नुसत्या घटनांची जंत्रीच दिली आहे असंही वाटत नाही.
३. एकाहून एक चोख अभिनय. तुकाची पहिली बायको (रखमा - वीणा जामकर) नि दुसरी बायको (आवली - राधिका आपटे) खणखणीत आहेत. नि जितूला एकदाची त्याच्या करियरमधली महत्त्वाची, निर्णायक ठरेलशी भूमिका मिळाली असावी. त्याच्याकडून अपेक्षितच होतं, पण त्याने त्याहून चांगलं काम केलं आहे. निव्वळ त्याच्या कामासाठीही सिनेमा पाहायला हरकत नाही.
४. दिसायला देखणा आणि तरी खोटा न वाटणारा आहे सिनेमा.
दिवाकर बॅनर्जीचा 'शांघाय'पण पाहिला. तोही आवडला. प्रेक्षकाला सगळं सोप्पं करून भरवलं नाही, तरी चालेल अशा भूमिकेतून काढलेला नि त्यामुळे स्मार्ट वाटला. पण गोष्ट मात्र काही नवी नाही. तेच ते भ्रष्टाचार, कृष्ण्कृत्य, राजकीय हस्तक्षेप, खून, बदलती मूल्यं इत्यादी इत्यादी. एका देओलच्या ऐवजी दुसरा वेगळ्या प्रकारचा देओल, इतकंच. पार्श्वसंगीत मात्र उल्लेखनीय सुरेख वाटलं.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
एका देओलच्या जागी दुसरा हे
एका देओलच्या जागी दुसरा हे थोडं आश्चर्यजनक वाटलं. अभिनय करता येणारा एकमेव देओल म्हणजे अभय देओल असा माझा समज होता. दिवाकर बॅनर्जी, अभय देओल या नावांमुळे 'शांघाय' बघण्याची इच्छा होतीच.
तुकारामबद्दल उत्सुकता जागृत झाली आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हो, अभय देओल वेगळा आहेच. पण
हो, अभय देओल वेगळा आहेच. पण भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध स्टायलिश पद्धतीनं आणि प्रामाणिकपणे लढणारा माणूस याहून त्यानं केलेली भूमिका वेगळी नाही, इतकंच मला म्हणायचं होतं. सनी देओल हातपाय वापरतो नि अभय देओल थोडं डोकं, इतकंच. टिप्पणी सिनेमाच्या जातकुळीवर करायची होती, अभय देओलच्या अभिनयातल्या वेगळेपणाबद्दल नव्हे.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
अभय देओलच्या मताविषयी
अभय देओलच्या मताविषयी सहमत
सोचा ना था मधूनच त्याच वेगळेपण दिसल होतं
शांघाय मलाही पाहायचाच आहे
.
शांघाय, अभय देओलसाठी बघणार
शांघाय, अभय देओलसाठी बघणार आहे. त्याचे इतर सिनेमेही हटके आहेत. मनोरमा, ओय लक्की , देव.डी , जिंदगी ना ..
गुड विल हंटींग
"गुड विल हंटींग" हा सिनेमा दीर्घकाल लक्षात रहातो तो रॉबी विलीअम्स च्या मानसोपचारतज्ञाच्या भूमिकेमुळे तसेच मॅट डॅमनच्या "समुपदेशन घेणार्या पेशंट" च्या भूमिकेमुळे.
९ अॅकेडमी अॅवॉर्डस करता शिफारीस झालेला हा चित्रपट मी सलग ३ दिवस ३ वेळा पाहीला. इतका आवडला होता.
एखादा हिमाचा गोळा डोंगरावरून वेगाने दरीमध्ये कोसळण्यास निघाला आहे आणि तो थोपवायचा आहे अशी कल्पना करा - तद्वत मॅट डॅमन वेगाने स्वविनाशाकडे कूच करत आहे आणि रॉबी विलीअम्स ला केवळ शब्दांच्या सहायाने, मॅटच्या भावनांना हात घालून त्याला योग्य त्या मार्गावर आणायचे आहे. वरवर बेदरकार, उर्मट, एकलकोंडा, वाया गेलेला भासणार्या मॅट डॅमनला समुपदेशन देता देता रॉबी विलीअम्स आणि मॅट डॅमनचे नाते फुलते का ,मॅटचे मन रॉबी वळवू शकतो का, त्याचे भविष्य घडवू शकतो का? की गर्तेत कोसळण्याचे ठाम ठरविलेला मॅट आपल्या विनाशाकडेच आगेकूच करत राहतो?
+१
अतिशय आवडलेला सिनेमा. माझा सर्वात आवडता सीन :
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
घाशीराम कोतवाल
यूट्यूबवर "घाशीराम कोतवाल" पाहिलं. हे बघणं फारच वेगळा अनुभव होता.
पहिला अंकं निम्मा होईपर्यंतं पुढे काही होणार आहे की नाही वगैरे मनात येऊ लागलं होतं...पण नंतर नाटक जी काही पकड घेतं की बोलायची सोय नाही. हे प्रत्यक्षं सादर झालेलं पहायची इच्छा आहे.
दोन अंकांच्यामध्ये (यूट्यूबवरच्या चित्रफीतीत) असलेली भास्कर चंदावरकरांची (या नाटकाचं संगीत त्यांनी केलं आहे) टिप्पणीसुद्धा फार आवडली.
नाहीद सिद्दिकी की कथा
नाहीद सिद्दिकी की कथा ही डॉक्युमेंटरी पाहिली.
नाहीद सिद्दिकी या महाराज गुलाम हुसेन या प्रख्यात कथक नर्तकांच्या शिष्या. बर्मिंगहॅम रॉयल बॅलेत आमंत्रित केल्या गेलेल्या या पहिल्या साउथ एशीयन नृत्यदिग्दर्शीका. जन्माने पाकिस्तानी असलेल्या नाहीदना, नृत्यसाधना करताना, त्यांच्या जन्मभूमीत ज्या प्रकारच्या मानहानीला सामोरे जावे लागले, त्याची ही दुर्दैवी कथा. धर्मात स्थान नसलेल्या नाच-गाण्याचे एका स्त्रीने जाहीर कार्यक्रम करणे, नृत्य शिकवण्याच्या नावाने, तरुण मुलींना नादी लावणे असे अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले. पाकिस्तानात कार्यक्रम करण्यापासून त्यांना बंदी घालण्यात(त्यापुर्वी त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यावे लागे.) आली. गंमत म्हणजे पाकिस्तानचा प्राईड ऑफ परफॉर्मन्स हा सर्वोच्च किताब त्यांना देण्यात आला आहे.
रजत कपूरचा 'मिक्स्ड डबल्स'
रजत कपूर, कोंकोणा आणि रणबीर शौरीचा 'मिक्स्ड डबल्स' आत्ताच पाहिला. २००६ चा चित्रपट आहे, पण आत्ताच पाहिला. झकास आहे.
लग्नाला दहा वर्ष झालेलं जोडपं, रणबीर आणि कोंकोणा. आपसांत भांडणं अशी नाहीत, नेहेमीच्या कुरबुरींपलिकडे फार नाही. पण रणबीरच्या डोक्यात आयुष्य मसालेदार बनवण्यासाठी वाईफ स्वॉपची कल्पना येते. त्यांना त्यासाठी जोडपं भेटतं ते म्हणजे रजत कपूर आणि कोयल पुरी. कोंकोणाचा या वाईफ स्वॉप प्रकाराला अॅब्स्ट्रॅक्ट कल्पना असल्यापासून चौघांची भेट झाल्यानंतर, अगदी त्या दिवसापर्यंतही विरोध असतो. पुढे जे होतं ते काही फार कल्पनातीत नाही. माणसांची चित्रं छानच रेखाटलेली आहेत. पुरूषांनी काहीही केलं तर चालून जातं, पण स्त्रियांनी पतिपरमेश्वर सोडून इतर कोणाचा विचारही करू नये असा विचार करणारा विनय पाठक, तुझी बायको तुझ्यावर एवढं प्रेम करते आणि तू तिला फसवतो आहेस हे योग्य नाही असं म्हणणारा सौरभ शुक्ला, मित्रासमोर खोटं बोलून डिंग मारणारा रणबीरचा मित्र, अशी सगळी पात्ररचनाही यथायोग्य आहे.
पुढे किंचित अधिक वर्णन आहे, ज्यांना चित्रपट बघायचा आहे आणि गोष्ट वाचायची नाही त्यांनी वाचू नये.
फार काही कल्पनाशक्ती नसणारा, म्हटलं तर एकदम "पर्फेक्ट नवरा मटेरियल" रणबीर कोंकोणाला आवडत असतो. स्वतःला चेटकीण म्हणवून घेणारी, अंगात आत्मे येतात असं म्हणणारी, एकंदरच वेगळी कोयल पुरी त्याला झेपत नाही. तिला तर तो प्रचंड रटाळ आणि पकाऊच वाटतो. स्वतःच्या इच्छेविरोधात रजत-कोयलच्या घरी आलेली कोंकोणा आपली नाराजी लपवू शकत नाही. रजतलाही या गोष्टीत फार रस नाही हा एकसमान दुवा त्यांच्यात असतो. "हा समजूतदार आहे", अशी कोंकोणाची खात्री पटल्यावर ती रजतसमोर आपलं दु:ख मांडते. एक रात्र रजत-कोयलच्या घरी घालवून रणबीर-कोंकोणा निघतात तेव्हा रणबीरचं शारीर एकपत्नीव्रत तुटलेलं नसतं, पण त्याचा दुटप्पीपणा समोर येतो.
दीड तासाचा चित्रपट आहे, मजा आली. पुरूषांनी शेण खालं तरी खपून जातं पण बायकोने सती सावित्रीच असावं या पारंपरिक विचारसरणीला मारलेला झकास टोला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हं
प्रत्यक्षात अशी कल्पना फक्त पुरुषांच्याच डोक्यात येते की कसे ते माहित नाही पण यासाठी योजलेला "वाईफ स्वॅपिंग" हा शब्द, हा खेळ पुरुषांनीच सुरु केला असावा, असे समजण्यासाठी पुरेसा आहे असे वाटते.
थोडा छिद्रान्वेषः स्वॉप की स्वॅप? स्वॉप शब्द फक्त फिनॅन्शियल अदलाबदली कंत्राटांबद्दल वापरतात असे वाटते. चु.भू.दे.घे.
लिंगनिरपेक्ष
माझ्या वाचीव + ऐकीव माहिती नूसार या प्रकारची कल्पना + आवड लिंगनिरपेक्ष आहे.
अधिक संदर्भ/माहितीसाठी व्यनीच योग्य ठरावा
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अदलाबदल किंवा swap
swap या शब्दाचा मी ऐकलेला ब्रिट उच्चार स्वॉप. डिक्शनरी.कॉमवरही उच्चार तोच दिलेला आहे. (भारतात अनेक लोक याचा उच्चार स्वॅप असा करतात. स्वाईप आणि स्वॉप या शब्दांची अदलाबदल, अर्थात स्वॉपिंगही, पाहिलेलं आहे.)
http://dictionary.reference.com/browse/swap?s=t
लिनक्स ओएसवर एक, छोटंसं 'स्वॉप' पार्टीशन असतं. मुळात अदलाबदल करणं हे फक्त वस्तूंच्या बाबतीतच शक्य आहे. (उदा: शरीरांची अदलाबदल शक्य नाही. कल्पनांची देवाणघेवाण होईल, अदलाबदल नाही.) लिनक्सच्या संदर्भात अदलाबदल डेटाची होते.
शब्दावरूनच कल्पना पुरुषांच्या डोक्यातली आहे हे समजलं (अर्थात बायकोचं वस्तूकरण). या प्रकारावर नैतिक आक्षेप नाही. आपल्याला दुसर्याची बायको आवडली फक्त म्हणून आपल्या बायकोला तिच्याच नवर्याशी शारीरिक संबंध ठेवायला सुचवणं हे "खून का बदला खून" यापलिकडचं वाटत नाही. (इथे नवरा-बायको हे शब्द परिवर्तनीयतेने वापरता, वाचता येतील.) पण चौघांच्याही परस्परसंमतीने चालत असल्यास चालू द्यात. मराठीत त्यापेक्षा जुना शब्द साटं-लोटं आहे त्याला नवीन अर्थ जोडता येईल. त्यात वस्तूकरण नसावं (चूभूदेघे).
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
परफोरमन्स आर्ट
मी अलिकडे इंदर सलिम या परफोरमन्स आर्टिस्ट चा प्रयोग पाहिला. त्याविषयी मी इथे लिहिले आहे:
http://ashupotdar.blogspot.in/2012/11/on-inder-salim-performance-artist....
शेरलॉक होम्सच्या आवडीमुळे
शेरलॉक होम्सच्या आवडीमुळे नवीन आलेल्या एलेमेंटरी या मालिकेचा एक भाग पाहिला. एकच पाहू शकले. कमालीचा ड्रग अॅडिक्ट दिसणारा आणि होम्सच्या कल्पनेच्या आसपासही न जाणारा होम्स आणि वॅटसनच्या ठिकाणी चायनीज बाई काही झेपलं नाही.
-मस्त कलंदर
उदरभरण नोहे
असेच म्हणते.
असेच म्हणते.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
मी अलिकडेच नवीन 'शरलॉक'
मी अलिकडेच नवीन 'शरलॉक' मालिकेचे दोन-तीन एपिसोड पाहिले. अजिबात आवडला नाही - तो बेनेडिक्ट क्युकम्बरपॅच का कोण तो तर अजिबातच नाही. जेरेमी ब्रेट ने साकारलेल्या होम्स नंतर हा अगदीच ठोकळा वाटला, आणि गोष्टींचे नवीन ट्विस्ट फारसे आवडले, पटले नाहीत. हे माइनॉरिटी ओपिनियन आहे हे जाणून व्यक्त करायचे धाडस करत आहे - आता या शरलॉक नंतर लूसी लिउ ला वॉटसनच्या रूपात बघायचे धाडस मात्र नाही.
अरे अरे! अगदी वाईट
अरे अरे! अगदी वाईट वाटले.
तुम्हांला शेरलॉक आवडला असता, तर मला फार आवडले असते. याला तार्किक कारण काही नाही.
असो, असे होते.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
हा हा हा
>>>तो बेनेडिक्ट क्युकम्बरपॅच का कोण तो <<<
हा हंत हंत ! (I mean हा हा हंत हंत ! )
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
हुह...जालावरच्या
हुह...
जालावरच्या थोरामोठ्यांकडून इतक्या सुमार विनोदनिर्मितीची आणि काव्यशास्त्रविनोदाची अपेक्षा नव्हती हो. आमचा भ्रमनिरास झाला आहे...
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
:-)
काय करू, त्याचं नाव ऐकलं की काकडीचं शेतच दिसतं डोळ्यासमोर!
:ऑ
:O
राधिका
+१
+१ :-o
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
श्लेष
भारतातील परिस्थिती पहाता "माइनॉरिटी ओपिनियन" मधे चांगलाच श्लेष आहे. :).
बाकी, तुम्हाला पिटर सेलर्सचा पिंक पँथर आवडत असणार, के.एन. सैगलचा देवदास आवडत असणार. नाही?
छे हो
छे हो, शॉरोतबाबूंच्या पुस्तकातल्या वोरिजिनल देवदासानंतर हा काजळ लावलेला, उर्दूत गाणी म्हणणारा पडद्यावरचा सायगल कसला? फारच मॉड. नापसंत!
नेक्स्ट.
आर्थर कॉनन डायल- शरॉत चंद्र?
मग जेरेमी ब्रेट आर्थर कॉनन डायलच्या शरलॉक पेक्षा उत्तम होता असा अर्थ घ्यावा काय?
त्याला माझी काहीच हरकत नाही!
त्याला माझी काहीच हरकत नाही!
धन्यवाद
thanks for making my point*.
*not as old to like Sherlock, not as young to like Benedict. (कृ.ह.घ्या.)
:-(
कोई ’क्युकम्बरपॅच’ न बुलाओ, मै जिसकी दिवानी हू उसको...
((माझे बरेचसे विनोद हल्ली वाया जात असल्याने) टीप: वरील ओळ ’कोई पत्थर से ना मारो, मेरे दिवाने को’ या गाण्याच्या चालीवर जमेल तशी म्हणावी)
राधिका
बाई ग
तुझे आणि मेघनाचे दु:ख पाहून पुन्हा एकदा काकडोबाला चान्स द्यावा असं म्हणतेय.
काकडोबा? बाणेदार मोड सुरू:
काकडोबा?
बाणेदार मोड सुरू: तुम्हांला बेनेडिक्ट आवडला नाही तर नुकसान त्याचे नाही, तुमचे असणारेय. ध्यानी असू द्या. बाणेदार मोड संपला.
:D>
(आयला, टाळ्या वाजवणारी स्मायली का चालेना?)
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
छान
हे वाचून आनंद झाला.
हे चित्र आठवले.
http://www.facebook.com/photo.php?fbid=251663338293837&set=pb.2502872984....
संपादकांसः http://www.aisiakshare.com/node/12 या लेखात दिलेल्या सर्व गोष्टी करूनही मला येथे चित्र चिकटवता येत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
संपादक : चित्र डकवले आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवा - निव्वळ चित्राचा दुवा नको, तर जेपीजी/जीआयएफ वगैरे फॉर्म्याटमधली प्रतिमा गरजेची आहे. आपण दिलेल्या दुव्यावर जाऊन तिथे राइट-क्लिक करून 'शो इमेज'वर क्लिक केले. मग ब्राउजरमध्ये जो दुवा मिळाला तो तुम्ही दिलेल्या दुव्याहून निराळा, म्हणजे जेपीजी इमेजचा होता. तो इथे वापरला.
राधिका
धन्यवाद
चित्र डकवून दिल्याबद्दल आणि शंकानिरसन केल्याबद्दल धन्यवाद.
राधिका
राधिका
eeeeeek!
हाहाहाहाहा!
लेस्पॅरगस आणि मोरिआर्टिचोक लै भारी!!
थट्टा बाजूला ठेवून
तुम्हाला बेनेडिक्टचा अभिनय आवडला नाही हे पूर्णपणे समजू शकते. किंवा कथेतले ट्विस्ट्स इ. इ. आवडले/पटले नाहीत हेही समजू शकते. परंतू
हे विधान पचायला बरंच जड गेलं. त्याचा स्क्रीन प्रेझेन्स, त्याच्या नजरेच्या हालचाली, त्याच्या चेहर्यावरले हावभाव, त्याची देहबोली, त्याच्या आवाजातले चढउतार यांत तो बरंच बरंच वैविध्य दाखवतो. इतकंच नव्हे, तर प्रसंगानुचित आणि पात्रानुचित असतं. हे झालं त्याच्या वैयक्तिक अभिनयाबद्दल. तो आणि फ्रीमन यांचं एकत्र वावरणं यात देखील त्यांच्या अधिकाधिक घट्ट होत जाणार्या नात्याचं प्रतिबिंब पडतं. (एका दृश्यात फ्रीमन हा बेनेडिक्टकडे न पाहता पेन फेकतो आणि बेनेडिक्ट हा फ्रीमनकडे न पाहता ते पेन झेलतो. ते दृश्य मस्त आहे) तुम्ही जो 'ठोकळा' हा शब्द वापरला आहे, तो असं अभिनयवैविध्य बेनेडिक्ट दाखवत नाही या अर्थाने वापरलाय, की तो ते पुरेशा परिणामकारक प्रमाणात दाखवत नाही या अर्थाने वापरलाय की आणखी कोणत्या ते जाणून घ्यायला आवडेल. कारण, पहिला अर्थ असेल, तर तुम्ही ती मालिका परत पहायला हवी असं मी म्हणेन. पण दुसरा अर्थ असेल, तर ती तुमची वैयक्तिक आवड असल्याने ती मालिका परत पाहूनही काही फरक पडणार नाही.
तुम्ही जेरेमी ब्रेटचं नाव घेतलंय म्हणून मुद्दाम त्यालाच लक्ष्य करतेय असं नाही. परंतु मला व्यक्तीशः जेरेमी ब्रेट आवडत नाही याचं कारण तो ओव्हरअॅक्टिंग करतो असं माझं मत आहे म्हणून. तो होम्सचा विक्षिप्तपणा जसा साकारतो, त्यापेक्षा बेनेडिक्टने आणि अगदी रॉबर्ट डाउनी ज्युनियरने देखील वठवलेला विक्षिप्तपणा जास्त आवडतो. या दोघांच्या अभिनयात 'मेथड इन मॅडनेस' जास्त चांगली दिसते, तर ब्रेटच्या अभिनयात फक्त मॅडनेस दिसतो असंही वाटतं. असो. बेनेडिक्टचा शेरलॉक डोळ्यासमोर येईपर्यंत ब्रेटचं दिसणं होम्सच्या जास्तीत जास्त जवळ जातं असं माझं मत होतं, हेही नमूद करून ठेवते.
राधिका
राधिका
एक्सलण्ट फॅण्टेस्टिक डन. चलो!
एक्सलण्ट फॅण्टेस्टिक डन. चलो!*
*संदर्भासाठी पाहा**: डीडीएलजे. अनुपम खेर पहिल्यांदा काजोलला पाहून शाहरुखला सर्टिफिकीट देतो तो प्रसंग.
**संदर्भ दिला खरा. पण डीडीएलजेसारख्या थोर्थोर सिनेमातल्या ड्वॉयलॉकसाठी संदर्भ द्यावा लागावा, अं? ड्वॉले पानावले.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
मला जेरेमी आणि त्याचा वॅटसनही
मला जेरेमी आणि त्याचा वॅटसनही हे दोन काका लोकांची जोडगोळी वाटते. साहसी माणूस डॅशिंग असावा/दिसावा या माझ्या अपेक्षेवर दोघेही अगदी हंडाभर पाणी टाकतात. तरी त्यातल्या त्यात जेरेमी बरा असं म्हणायची वेळ येते. तो मला बराच नाटकी वाटतो, किंबहुना त्याची संवादफेक जणू तो रंगमंचावर उभा आहे अशीच जास्त वाटते. त्यामानाने बेनेडिक्ट आणि फ्रीमन हे दोघे खूपच चांगले वाटले. जुन्या शेरलॉक होम्समध्ये हिरवेगार परगणे, विस्तीर्ण हवेल्या वगैरेमधून दिसणारं इग्लंड मला अधिक आवडतं. (हे जरा जास्तच पुणेरी झालं का?)
-मस्त कलंदर
उदरभरण नोहे
मला जेरेमी आणि त्याचा वॅटसनही
थोडक्यात कोणाला कोण आवडतो ते सांगितलं तर वयं लपवता येत नाहीत असं म्हणावं का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हो, बेनेडिक्ट कंबरबॅच च्या
हो, बेनेडिक्ट कंबरबॅच च्या नावाच्या विकृतीकरणामुळे विनोद लांबला, पण सीरियसली सांगायचे तर मला त्याच्या अभिनयाची तेवढी तक्रार नाही. मी पाहिलेल्या एपिसोड्स मधे त्याचा अभिनय तेवढा वैविध्यपूर्ण जाणवला नाही, पण ते अजून दोन-तीन बघितल्याने, त्याच्या 'टिक्स' ची सवय झाल्यावर सुधारलेले वाटेलही. मी ब्रेट ची मालिका काही वर्षांपूर्वी एका झटक्यात पूर्ण पाहिली तेव्हा त्याचा काहीसा 'एक्झॅजेरेटेड' होम्स मला फार आवडला होता.
म्हणजे दुसरा होम्स होणे नाही वगैरे काहीच नाही. मला एकूण मूळ होम्स कथांचे हे आधुनिकीकरणच फारसे आवडले नाही, आणि त्यातला 'कूलपणा' - एस-एम-एस चा वापर, भरभर बोलणे आणि सेकंद-दोन सेकंदाचे शॉट्स, डिजिटल इमेज द्वारा होम्सच्या विचारशक्तीची आणि तिच्या वेगाला दर्शवणे, मूळ कथांमधील बदल - मला तेवढा भावला नाही. हे सर्व सापेक्ष आहे हे मी मानते. आणि आधुनिकीकरण किंवा अॅडॅप्टेशन नकोच, केव्हाही मूळ संहितेपेक्षा कमी दर्ज्याचेच असते वगैरे ठाम मतही नाही. पण ही मालिका बघताना तेवढी मजा नाही आली हे कबूल करते! यात १९व्या शतकातल्या, घोडांच्या टप-टप-टप आणि धुक्याने गुरफटलेल्या लंडन मधे होम्सला पहाण्याची सवय, पूर्वग्रह निश्चित असावेत. पण त्या गोष्टी त्या वातावरणात नेमक्या बसतात असे समाधानही होते; इरेने अॅडलर (स्कँडल इन बेल्ग्रेविया) चा एपिसोड पाहिल्यावर त्या फारशा यशस्वी 'अपडेट' झालेल्या मला तरी जाणवल्या नाहीत - अगदी कराचीत शिरच्छेद पर्यंत अतिच ताणला गेला. पण मी अजून काही एपिसोड बघितल्यावर मत बदलायला तयार आहे!
ब्रेकिंग बॅड
'ब्रेकिंग बॅड' ही मालिका आवडली. शाळेत रसायनशास्त्र शिकवणारा शिक्षक स्वतःला कॅन्सर आहे हे समजल्यानंतर मेथॅम्फिटामाइन (methamphetamine) बनवून पैसा कमावू लागतो. न्यु मेक्सिकोचा लॅन्डस्केप, मध्यमवर्गीय-हिशोबी-काळसर धाडस आणि खरीखुरी भासणारी पात्रे यामुळे मला सर्वच भाग आवडले.
'शेरलॉक' बद्दल रोचना यांच्याशी सहमत आहे. मार्टिन फ्रीमनने साकारलेला वॉटसन मात्र आवडला. बीबीसीचीच 'वॉलॅन्डर' ही स्विडिश पोलिस इन्स्पेक्टरवर बेतलेली मालिका आजकाल आवडत आहे.
नुकतंच द कंपनी थिएटरचं
नुकतंच द कंपनी थिएटरचं Twelfth Night हे हिंदी नाटक पाहण्यात आले. शेक्सपियरच्या त्याच नावाच्या मूळ फार्सिकल नाटकाचे हे हिंदी रुपांतर आहे आणि मूळ नाटकातल्या पात्रांची नावं तशीच ठेवून त्याला लोकनाट्यासदृष फॉर्म(!?)मध्ये टाकून एक धुमाकूळ घालणारी कॉमेडी बनवली आहे.
आजच 'सूरज का सातवाँ घोडा'
आजच 'सूरज का सातवाँ घोडा' पाहिला. आवडला. एक गांव, तेथील पात्रे, त्यांच्या निरनिराळ्या परंतु एकमेकांत गुंफलेल्या कथा हा सिनेमाचा गोषवारा होऊ शकतो. परंतु तो अत्यंत उत्तम पद्धतीने सादर केला आहे. रजत कपूरचा हा पहिला सिनेमा असावा (त्याला इंट्रोड्यूसिंग असं टायटल्स मध्ये लिहिलं होतं.) पण तसं वाटत नाही.
या सिनेमाची खासियत म्हणजे एकच प्रसंग वेगवेगळया कथेत किंव वेगळ्या पात्राच्या दृष्टिकोनातून येताना संवाद तेच परंतु ते प्रत्येकाच्या दृष्टिने कसे घडले आहेत हे वेगळेपणाने दाखवले आहे. एकूनात उत्तम दिग्दर्शन, उत्तम अभिनय आणि सादरीकरण!
-मस्त कलंदर
उदरभरण नोहे
लाईफ ऑफ पाय: मी काही मूळ
लाईफ ऑफ पाय: मी काही मूळ पुस्तक वाचलं नव्हतं. त्यानं मला काहीच फरक पडला नाही.
फार देखणा, उत्कंठावर्धक नि अद्भुत गोष्ट सांगणारा, एकरेषीय गोष्ट असूनही तिला अर्थांच्या अनेक पातळ्या देणारा सिनेमा आहे.
फक्त त्यातला देवाशी जोडलेला बादरायण संबंध खटकला.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन