मला बी प्रेम करू द्या की रं - आदित्य जोशी

मला बी प्रेम करू द्या की रं - आदित्य जोशी

लेखिका - मस्त कलंदर

काही काळापूर्वी मी एक बातमी पाहिली होती. त्यात एका कलाकृतीबद्दल वार्तांकन होतं. ती वस्तू, कला किंवा इन्स्टॉलेशन म्हणजे एक मोठं, अजस्र चाक होतं. ते एका भिंतींला अडकवलं होतं. त्या चाकाच्या आतल्या बाजूला जीवनोपयोगी गोष्टी चिकटवलेल्या होत्या. ते चाक सतत फिरत राहण्यासाठी त्याला एक मोटर जोडलेली होती. आणि ते बनवणारा कलाकार त्यातच दिवसभर राहत होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत, ठरलेल्या वेळात, कोणीही, कधीही येऊन ते बघून जायचं. ते पाहून आपल्या मनात काही विचार येतील. कोणाला तो वेडपटपणा वाटेल, कोणाला हे काहीतरी प्रचंड आकर्षक वाटेल, काहींना आपणही असं काहीतरी करू असं वाटेल. हीच त्यातली कला. आपल्या कला-कृतीतून दुसऱ्यांच्या मनात काही विचार येणं ही त्यांची व्याख्या.

आदित्यला मी विचारलं, "विद्यार्थी म्हणून तू आम्हां शिक्षकांमध्ये आवडता होतास. गुणाचा बाळ म्हणावास तसा! मग तुझ्या सेक्शुअल ओरिएंटेशनबद्दल आम्हाला सांगावंसं का वाटलं? तू गे आहेस, स्ट्रेट आहेस याच्यामुळे आम्हांला काय फरक पडणार आहे?". आदित्यचं उत्तर महत्त्वाचं आहे, "फरक पडतो. आपल्या आजूबाजूच्या लोकांशी बोलल्यामुळेसुद्धा फरक पडतो. तुम्हां लोकांचं माझ्याशी असणारं नातं यामुळे बदलत नाही. सगळ्यांच्या बाबतीत हे तसंच असेल असं नाही. मला कॉलेजमधल्याच एका शिक्षिकेकडून वेगळा अनुभव आला आहे. पण पुढच्या वेळेस तिला कोणी असा गोंधळलेला विद्यार्थी दिसेल तेव्हा तिच्याकडे एकतरी डेटा पॉईंट असेल."

- मस्त कलंदर

----

या चळवळीचा भारतातला इतिहास पाहिला तर चळवळ मुंबईमध्ये सुरू झाली. महेश्वरी उद्यान नावाचं जे उद्यान आहे दादरच्या जवळ, ते खूप लोकप्रिय क्रूझिंग प्लेस होतं. साधारण १९७० च्या सुमारापासूनच दर शनिवारी आणि रविवारी त्या ठिकाणी गे लोक जमत असत. काही जण सेक्शुअल जोडीदारही शोधत असत. पण ती नुसत्या भेटीगाठींचीही जागा होतीच. कारण भेटण्यासाठी इतर कुठलीच जागा लोकांकडे नव्हती. हे उद्यान आणि फोर्ट भागापाशी असलेलं मैदान. अशी दोनच ठिकाणं होती. तिथे जमणाऱ्या लोकांनी ठरवलं की आपण समाजप्रबोधनासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी एक मेणबत्ती मोर्चा काढला. साधारण १९८७-८८ च्या सुमारास. हा मोर्चा फार मोठा नव्हता. लोकांना कॉण्डोम्सबद्दल सांगावं आणि सुरक्षित सेक्सबद्दल जागरूक करावं इतकाच उद्देश होता. त्यामुळे सुरुवातीला तरी या कार्यक्रमाचा मुख्य फोकस आरोग्यावरच होता. ही खूपच जुनी गोष्ट आहे, कोणीतरी हे सुरू केलं असेल. पण त्या काळामधे इंटरनेटही नव्हतं. 'वर्ड ऑफ माउथ'मधून जितक्या लोकांपर्यंत पोचेल, तितकं पोचेल.

अजून एक मार्ग म्हणजे म्हणजे 'टू बाय टू'. हे अजूनही लोकप्रिय आहे, वापरलं जातं. जे लोक इंटरनेट वापरत नाहीत, त्यांना इतर लोकांना भेटण्याचा, सेक्शुअल पार्टनर शोधण्याचा दुसरा कुठला पर्याय आहे? तर 'टू बाय टू' हाच एक पर्याय आहे. इंटरनेटशी संबंध नसलेल्या अनेक लोकांसाठी आपल्या भावनांना वाट करून देण्यासाठी मुंबईत आजही ही एकच जागा उपलब्ध आहे. बरेच लग्न झालेले पुरुषही तिथे सापडतात. हात वगैरे लावून घेतात. हासुद्धा मुंबईचाच एक भाग आहे.

मग अशोक रावकवींचं 'बॉम्बे दोस्त' सुरू झालं. त्यांचं 'बॉम्बे दोस्त' एक मासिक होतं फक्त. लोकांपर्यंत पोचायचा दुसरा मार्गच तेव्हा माहीत नव्हता. 'बॉम्बे दोस्त'चा एक पी.ओ. बॉक्स होता. लोक तिथे पत्रं पाठवत. ती पत्रं 'बॉम्बे दोस्त'मध्ये प्रकाशित होत. बास, इतकंच. सीएसटी स्टेशनाच्या बाहेर रस्त्यावरती आणि इतर काही ठिकाणी हे लोक 'बॉम्बे दोस्त' विकायचे. वितरण वगैरे काही नाही. मी एक कॉपी पाहिल्ये. आपलं टिपिकल सरकारी पत्रक कसं असतं? तसं 'बॉम्बे दोस्त' असायचं. एक रंगीत कव्हर. आत पत्रं छापलेली पानं. टॅब्लॉइड आकार आणि सेलोटेप. बास. अगदी बेसिक. पण अनेक लोक ते वाचत असत. आणि अनेक लोकांना त्याची खूप मदत झाली.

अशोक रावकवी हे निश्चितच आघाडीचे कार्यकर्ते आहेत. 'हमसफर ट्रस्ट'ची स्थापना रावकवींनीच केली. 'हमसफर ट्रस्ट' या क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या मुख्य संस्थांपैकी एक आहे. त्यांची एक लेस्बियन विंग आहे, तसंच ट्रान्सजेंडर्सकरताही त्यांनी बरंच काम केलेलं आहे. पुण्यामध्ये 'समपथिक ट्रस्ट' नावाची एक खूप चांगली संस्था आहे. एका मराठी इंजिनियर माणसानं स्थापन केलेली ती संस्था आहे. लग्न-घटस्फोटाच्या अनुभवातून गेल्यानंतर, लोकांपर्यंत पोचण्याची निकड त्याला जाणवायला लागली आणि त्यानं इंजिनियरिंगचा जॉब सोडून 'समपथिक ट्रस्ट' या 'एनजीओ'ची सुरुवात केली. या ट्रस्टच्या लोकांकडून पुण्यातल्या सगळ्या स्टेशन इन्स्पेक्टरांसाठी सेशन्स घेतली जातात; समलैंगिक लोकांच्या समस्या कशा हाताळाव्यात, त्यांची टिंगल-टवाळी होऊ देऊ नये, काही अप्रिय घटना घडली, तर ती कशी हाताळावी, अशा विषयांबद्दल. वृत्तांकन करताना कशा प्रकारची भाषा वापरावी, सनसनाटी कशी टाळावी, वगैरे विषयांसाठी पत्रकारांबरोबरही सेशन्स घेतली जातात. ही इज डूइंग एक्सलंट वर्क. दिल्लीत एक 'नाझ ट्रस्ट'सुद्धा आहे. मी जसं विद्यार्थ्यांसोबत काम करतो, तसं करणाऱ्यांमध्ये 'साथी आय.आय.टी.' ही काही काही पहिली संस्था नव्हे. मला माहित आहे त्याप्रमाणे, दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पहिल्यांदा असं काम सुरू झालं.

आपल्या लैंगिकतेचं भान येणं ही सगळ्यांच्या बाबतीत एक प्रक्रिया असते, माझ्याही बाबतीत होती. हे भान आल्यावर लगेच संस्थांत्मक कामाबद्दल समजलं असं नाही. साधारण २००० च्या सुमारास मला जाणवायला लागलं, की मी गे आहे. मी साधारण नववी-दहावीत असेन. तेव्हा मुलांबद्दल फक्त आकर्षण होतं. मी लगेच स्वत:ला थांबवायचाही प्रयत्न केला. कारण हे काहीतरी चुकीचं आहे असं डोक्यात होतं. मी एखाददोन मुलींना प्रपोजही केलं. आता लक्षात येतं, त्या मुलींबद्दल मला तसं आकर्षण नव्हतं. फक्त पीअर प्रेशरमुळे मी त्यांना प्रपोज केलं होतं. मी अकरावी-बारावीत असताना आमच्याकडे इंटरनेट आलं आणि मी इंटरनेटवरून माझ्यासारखे लोक शोधायला सुरुवात केली. आधी मी मुलीच्या नावानं चॅट करायला सुरुवात केली. एकदम सही वाटायचं. मग 'मॅन टू मॅन' चॅटरूमचा शोध लागला. मग तिकडे जाऊन मी चॅटिंग करायला सुरुवात केली. मी हे नक्की काय करतोय, याचं मला स्पष्ट भान नव्हतं. मग एकदा हिंमत करून तिकडे माझा लॅण्डलाइन नंबर दिला. लोकांना भेटायला वगैरे लागलो. पण तेव्हा मनात फार चलबिचल व्हायची. मी लोकांना भेटायचो आणि मग नंतर त्यांना सांगायचो, “मी काही गे नाहीये हां. मी असंच एक्सपेरिमेंट करत होतो. फक्त रिसर्च करत होतो बरं का.” हे असं बराच काळ चाललं. माझ्याच डोक्यात गोंधळ होता. मला स्वत:ची भीती वाटत होती. ही स्वत:ला स्वीकारण्याची भीती आणि शाळेत 'बायल्या' म्हणून चिडवलं जाणं या दोन्ही गोष्टी एकाच वेळी चालू होत्या. शाळेमधे मला फारच चिडवायचे लोक. त्या वेळी माझं हे इंटरनेटवरून गोष्टी एक्स्प्लोअर करणंही सुरू झालं होतं. त्यामुळे बारावीला मला माझ्या तोवरच्या मार्कांमध्ये सगळ्यांत कमी मार्क्स मिळाले. भावनिकदृष्ट्याही तो सगळ्यांत कठीण काळ होता. माझ्या रोमॅण्टिक भावना तीव्र होत्या. इंटरनेटच्या माध्यमातून मी एक संपूर्ण नवीन जग अनुभवत होतो. त्यामुळे अभ्यासातलं लक्ष उडालंच. परिणामी आत्मविश्वासही गमावला. 'सोमय्या'मध्ये कसाबसा प्रवेश मिळाला. नंतर माझ्या लक्षात यायला लागलं, की ठीक आहे, झालं ते झालं. आता शांत राहिलं तरी चालेल. फार काही भयंकर घडलेलं नाहीय. २००४ पर्यंत मी स्वत:ला गे म्हणायला लागलो होतो. पण त्याबद्दल मोकळेपणानं जाहीर बोलायला सुरुवात केली ती २०१३ मध्ये. तेव्हा मी चळवळीचा भाग झालो, असं म्हणता येईल.

लैंगिकता हा आयुष्याचा एक भाग असतो, ती एक आयडेंटिटी असते. आपली आयडेंटिटी ठरवणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्यातल्या कितीतरी गोष्टींबद्दल चळवळ सुरू असेल तरी आपण त्याला पाठिंबा देऊच असं नाही. मी गे आहे, म्हणून गे-राईट्सच्या चळवळीत मी सक्रियपणे सहभागी होईनच असं नाही.

चळवळीशी जोडून घ्यावं असं वाटण्यामागे मात्र काही मोठी प्रक्रिया नव्हती, ते एका क्षणात झालं.

११ डिसेंबर २०१३ ला सर्वोच्च न्यायालयाचा ३७७ व्या कलमाबद्दलचा निकाल आला. मी तेव्हा ऑस्ट्रेलियामधे होतो. आय वॉज डीपली हर्ट बाय दी डिसिजन. पाठोपाठ माझी अशी प्रतिक्रिया झाली, “फक इट. आता मी गप्प बसू शकत नाही, मला बोललंच पाहिजे.”

११ डिसेंबरला तो निकाल आला आणि १५ डिसेंबरला मी माझा पहिला व्हिडिओ रेकॉर्ड केला. बऱ्याच भारावलेल्या वगैरे मन:स्थितीमध्ये. दॅट वॉज द ट्रिगर पॉइंट. तेव्हा मी ठरवलं, आता मागे फिरायचं नाही. काहीही झालं तरी मला त्याची पर्वा नाही. मला माहीत होते माझ्यासारखे लोक. 'हमसफर ट्रस्ट' माहीत होता त्याआधीही. पण तोवर मी त्यात सहभागी नव्हतो. ११ डिसेंबरला मात्र माझ्या स्वच्छ लक्षात आलं, की मला क्लोजेटमधे राहायचं नाहीय. मला मोकळेपणानं बोलायचं आहे.

लैंगिकता न लपवणं वेगळं आहे आणि चळवळीत काम करणं वेगळं आहे. मला त्या क्षणी वाटलं, "माझ्यावर प्रचंड अन्याय झालेला आहे. यापेक्षा वाईट काही होऊच शकत नाही. आता परिणामांची पर्वा कशाला करायची!" तोपर्यंत मी वैयक्तिक आयुष्यात भेटणाऱ्या लोकांच्या वाईट प्रतिक्रियांकडे कानाडोळा करायला सुरुवात केलेली होती. आय डिण्ट केअर, इफ आयम मॉक्ड ऑर नॉट. आत्तापर्यंत आयुष्यभर लोकांनी माझी टिंगल केली होती; माझ्यावर त्याचा ढिम्म काही परिणाम होत नाही. पण या निर्णयाचा अर्थ वेगळा होता. माझ्या देशातला कायदा मला अधिकृतपणे खिजवून दाखवतो आहे, असा त्याचा अर्थ होता. माझ्यावर अक्षरश: गुन्हेगार म्हणून शिक्का मारण्यासारखं होतं ते. त्यानं माझ्यावर उलटा परिणाम झाला. इट पुश्ड मी आउट; इट इजेक्टेड मी आउट ऑफ माय शेल.

पण इतर बरेच लोक पुन्हा क्लोजेटमध्ये गेले, हेही खरं आहे. आपल्या पालकांना सांगण्याचा निर्णय घेऊ पाहणारे लोक पुन्हा 'नको, लोक काय म्हणतील?' अशा द्विधा मन:स्थितीत गेले. ज्यांनी आपल्या आईबाबांना नुकतंच सांगितलं होतं, त्यांना आईबाबांकडून प्रतिक्रिया मिळाली, 'बघ, आम्ही तुला म्हणत होतो ना, हे चुकीचं आहे? आता कायदाही तसंच म्हणतो आहे.' या निर्णयाचे सामाजिक परिणाम मोठेच होते. फक्त एक कागद नव्हता तो. त्याचा लोकांच्या जगण्यावर मोठा परिणाम झाला. काही बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांच्या एलजीबीटीक्यू गटांसाठी एच. आर. प्रोग्रॅम्स असायचे, ते त्यांना थांबवावे लागले. कारण ते एका प्रकारे गुन्ह्याला प्रोत्साहन देणं ठरलं. या निकालाला माध्यमांतून इतकं कव्हरेज मिळालं की त्यामुळे ब्लॅकमेलिंगचे प्रकारही खूप वाढले. सार्वजनिक ठिकाणीही गे लोकांना ब्लॅकमेल केलं जाणं आणि त्यात पोलिसांचाही सहभाग असणं ही अगदी सर्वसामान्य घटना होऊन बसली. सुदैवाने डेट शोधायची असेल तर कुठे काय शोधायचं हे मला माहीत आहे. मी इंटरनेट वापरू शकतो त्यासाठी. प्रत्यक्ष भेटल्यावर मला कुणी ब्लॅकमेल करू शकतं, त्यामुळे हेसुद्धा १००% सुरक्षित नाहीच. पण बरेच लोक पब्लिकली डेट शोधतात आणि पोलीस फक्त पैसे काढण्यासाठी फास टाकतात, असे प्रकार त्या निकालानंतर वाढले.

मी जाहीरपणे बोललो २०१३ मध्ये. त्याआधी २००५ मध्ये माझ्या मैत्रिणीला सांगितलं होतं. तिला त्याचं गांभीर्य कळलं नाही. ती इतर लोकांपाशी जाऊन पचकली. त्याचा मला फार त्रास झाला. पण माझे मित्र, माझी चुलत बहीण, माझा भाऊ आणि वहिनी यांच्याकडून मला टोकाची होमोफोबिक प्रतिक्रिया कधीही मिळाली नाही. पीपल वेअर ऍट लीस्ट टॉलरन्ट, इफ दे वेअर इग्नरन्ट. पूर्वी मी लोकांना समजवायचा प्रयत्न करायचो, "हे नैसर्गिक आहे," वगैरे. हल्ली मी त्या फंदात पडत नाही. मला लहानपणी मित्र असे नव्हतेच. माझी चुलतबहीण हीच माझी एकमात्र मैत्रीण होती. त्यामुळे मी तिला हे इतकी वर्षं सांगितलं नाही, याचंच तिला वाईट वाटलं. नंतर मात्र ती अगदी ठामपणे माझ्या पाठीशी उभी राहिली. आजपर्यंत. पण माझ्या आईवडिलांना मात्र वेगवेगळ्या लेव्हल्सवर धक्का बसला. पहिली प्रतिक्रिया म्हणजे 'त्याला वाढवण्यात आपली काही चूक झाली आहे का?' दुसरी प्रतिक्रिया म्हणजे 'आपणच भूतकाळात काहीतरी वाईट केलं होतं आणि आपल्याला त्याची शिक्षा मिळते आहे.' आणि मग नेहमीचे प्रश्न, की 'तुझ्यावर शाळेत कुणी रेप केला होता का', 'तुला ही सवय, चटक कशी लागली', 'हे अमेरिकेतल्या हिप्पी कल्चरसारखं काही फॅड आहे का', वगैरे वगैरे.

माझे आईबाबा मानसोपचारतज्ज्ञाकडे गेले होते. त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं, हे मला आजही माहीत नाही. पण त्यांना असं सांगण्यात आलं, की हे 'बरं' करता येत नाही. 'बदलता' येत नाही, असं आपण म्हणू. 'बरं करण्या'मध्ये समलैंगिकता म्हणजे काहीतरी आजार असल्याचं गृहीतक आहे. पण बरेच गल्लाभरू डॉक्टर्स या गोष्टीला आजार म्हणणारेही आहेत. फक्त पैसे मिळवण्यासाठी ते पेशण्टला अ‍ॅण्टिडिप्रेसण्ट्स देतात आणि त्याच्या मानसिक स्वास्थ्याची वाट लावून टाकतात. मला असे अनेक लोक माहीत आहेत, त्यांच्या लग्नाचा विषय निघाल्यावर त्यांना डॉक्टरांकडे नेण्यात आलं आणि त्यांच्या आरोग्याची पुरती वाट लागली. एका मुलाला त्याचा जॉब सोडावा लागला. जवळजवळ दोनेक महिने तो घरी होता. त्याचं पुढे काय झालं हे मला आजही माहीत नाही. त्याचं लग्न झालं असेल अशीही शक्यता आहे. त्याच्या बायकोचं काय झालं असेल, माहीत नाही. अर्थात सगळ्याच डॉक्टर्सचा उद्देश पैसे काढण्याचा असेल असं नाही. काही जणांचं घोर अज्ञानही असू शकेल. एखादे डॉक्टर नावाजलेले आहेत, याचा अर्थ ते देव आहेत असा होत नाही.

लोक मला देवाच्या संदर्भात विचारतात, "समलैंगिकता देवाच्या नजरेत नैसर्गिक कशी काय?" अशा लोकांना मी कायम एक उदाहरण देतो. समजा एखाद्या फुलाला हिरव्या पाकळ्या आहेत. मग त्या फुलाला तुम्ही अनैसर्गिक म्हणता का? नाही. तुम्ही म्हणता, 'निसर्ग किती थोर आहे, बघा! बघा, निसर्गात किती वैविध्य आहे!' पण जेव्हा एक माणूस दुसऱ्या माणसावर थोडं वेगळ्या प्रकारे प्रेम करतो, तेव्हा तुम्ही त्याला अनैसर्गिक म्हणता. काळ्या हंसांचं - ब्लॅक स्वॅन्सचं – उदाहरण माहीत आहे की आपल्याला. जोवर ऑस्ट्रेलियात काळे हंस आढळले नव्हते, तोवर ती कविकल्पनाच मानली जात होती. आता ते सापडल्यावर अनैसर्गिक मानतो का आपण त्यांना? पण मी हे स्पष्टीकरण शोधायला जात नाही, हा माझ्या आयुष्याचाच एक भाग आहे. हे वाचणाऱ्या बहुतेकांसाठी कदाचित हा एक संशोधनाचा विषय असेल, फक्त एक ’इश्यू’ असेक; पण मी माझ्या अस्तित्त्वाबद्दल प्रश्न का विचारू? माझं जे काही चाललंय ते चांगलं आहे की.

आता काही हेटरोसेक्शुअल लोकही लग्न ही संस्था नाकारताना दिसतात. एक होमोसेक्शुअल माणूस म्हणून लग्नसंस्थेचा कायदेशीर पर्याय उपलब्ध असणं मला आवश्यक वाटतं. मी तसा पारंपरिक माणूस आहे. मला आवडेल लग्न करायला. प्रेमानं बांधून घेणारं नातं हवं की कायदेशीर लग्नबंधन हवं असे दोनच पर्याय कुणी माझ्यासमोर ठेवले, तर मात्र मी प्रेमाच्या नात्याची निवड करीन. नुसत्या लग्नाच्या लेबलाची नाही. आजही भारतात अनेक गे लोक तशाच नात्यांमध्ये सुखात राहतात. ते डेटला जातात. आपला पार्टनर शोधतात. त्यांना लग्नाच्या पर्यायाची गरज वाटत नाही. पण हा फारच वैयक्तिक प्रश्न झाला. मला स्वत:ला लग्न ही संस्था आकर्षक, अपीलिंग वाटते. माझ्यासोबत बांधून घेणारा माणूस एक दिवस अचानक उठून चालता होणार नाही, याची गॅरण्टी असते लग्नात. शिवाय मला लहान मुलंही आवडतात. पस्तिशीपर्यंत मी एकटा राहिलो, तर मी मूल दत्तक घेण्याचा विचार करीन.

पण अडचण अशी आहे की, समलैंगिक लोकांना लग्न जुळवण्यासाठी आयतं सामाजिक वर्तुळच उपलब्ध नाही. मी जर स्ट्रेट असतो आणि आईला सांगितलं असतं की मला लग्न करायचंय; तर १५ दिवसांत माझं लग्न ठरलं असतं. आम्ही दोघांनी 'इएमाय'वर घर घेतलं असतं. त्या 'इएमाय'च्या पोटी आणि नंतर येणाऱ्या मुलांच्या कारणानं तरी आम्ही एकत्र राहिलो असतो आणि ते लग्न टिकलं असतं. लग्न तशीच टिकतात आणि ते ठीकच आहे. तडजोड करावी लागतेच. पण माझ्यासाठी ही अरेंज्ड मॅरेजची सोयही उपलब्ध नाही. माझ्याकरता जोडीदार शोधायला जे सामाजिक वर्तुळ लागेल, ते माझं मलाच बनवायला लागेल - आजही काही अंशी मी ते स्वत:च उभं केलं आहे.

कायद्याची मान्यता नसली, तरीही भारतात काही गे लोक लग्न करतात. अगदी विधीही करतात. हिंदू धर्मामध्ये लग्न हे दोन आत्म्यांचं मीलन असतं. हिंदू धर्म लग्नाबाबत अगदी जेंडरन्यूट्रल आहे. त्यामुळे तशी काही तांत्रिक अडचण येत नसावी! हे अगदी खाजगीपणे, पण रोजराज चालतं. अशा प्रकारे धर्मशास्त्र आपल्या गरजेप्रमाणे बदलून देणारे पुराणिक सगळ्या धर्मांमध्ये मिळतात. नेहमीच्या लग्नाचे एक हजार रुपये घेत असतील, तर अशा लग्नाचे पाच हजार रुपये मोजून घेतात!

जवळचे नातेवाईक काय म्हणतील, परिचित लोक काय म्हणतील, हे फार मोठं दडपण भारतात असतं. एखाद्या व्यक्तीमुळे काहीही अडचण आली, की सगळ्यांची एक बैठक बोलावून त्या व्यक्तीवर सामूहिक दडपण आणणं, हे अजून एक तंत्र! दुसरं आवडतं धोरण म्हणजे, 'तुम्ही काही विचारू नका, आम्ही काही सांगत नाही.' असं करायला लोकांना फार आवडतं! सगळ्यांना सगळं माहीत असतं, पण धोरणच असं की, 'होय, काय चाललं आहे ते आम्हांला माहीत आहे. पण आपण त्याबद्दल काहीच बोललो नाही, तर फार बरं होईल.' डोण्ट आस्क, डोण्ट टेल!

ही एकूणच आपल्याकडे सेक्सकडे ज्या नजरेनं पाहिलं जातं, त्यातून येणारी अडचण आहे. सेक्सबद्दल बोलतोच कुठे आपण? गंमत बघा, 'तुमच्या दोघांचं आहे का?' असं विचारतो आपण. 'अफेअर', 'रिलेशनशिप', 'प्रेम' हेही शब्द बोलायला लाजतो. दारूबद्दलही तेच. 'तू प्यायला आहेस का?' किंवा 'तू घेतली आहेस का?' असं विचारतो आपण. 'दारू' हा शब्दच मुळी उच्चारायचं टाळतो! तसंच हेही.

लैंगिकतेच्या प्रदर्शनाबद्दल बोलायचं तर, अगदी पुरोगामी म्हणवणाऱ्या लोकांचाही बऱ्याचदा 'एलजीबीटीक्यू' चळवळीला विरोध दिसतो, कारण त्यांना लैंगिकतेचं प्रदर्शन खटकतं. पण माझा प्रश्न वेगळा आहे. तुम्ही कधी 'पाणीपुरी लव्हर्स'ची चळवळ ऐकली आहे का? नाही ऐकलेली. पण 'एलजीबीटीक्यू’ची चळवळ ऐकलीय. का बरं? कारण 'पाणीपुरी लव्हर्स'वर अन्याय होत नाही. या चळवळींचा उगम अन्यायातून होतो. अन्याय होतो म्हणून काही लोकांना वाटतं, की समाजव्यवस्थेमध्ये बदल व्हायला हवा. असा बदल घडवून आणण्यासाठी चळवळ होते. मग लैंगिकतेवर होणाऱ्या अन्यायाला विरोध करणाऱ्या चळवळीतलं लैंगिकतेचं प्रदर्शन कसं टाळणार?

काही लोक बायल्ये असतात. पण आपण 'बायल्ये' हा शब्द नको वापरू या. तो अपमानकारक आहे. आपण स्त्रीसदृश किंवा स्त्रैण म्हणू. तर - काही लोक तसे असतात. पण ते हेटरोसेक्शुअलही असू शकतात. त्यामुळे त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही. बरेच कोब्रा लोक ज्या पद्धतीनं बोलतात आणि आर्टिक्युलेट करतात, त्यावरून ते मला स्त्रैण वाटतात. पण ते गे नसतात. तसंच आहे ते. मला बरीच मॅस्क्युलाइन कपल्स माहीत आहेत. पण कसं होतं माहीत आहे का? तुम्ही स्ट्रेट लोक स्त्रैण असणं हा गे असण्याचा पुरावा मानता. तुमच्यासाठी दिसू शकेल असा पुरावा तेवढाच असतो. एखादा पुरुष 'पुरुषी' असेल, तर तो गे आहे की नाही हे ओळखण्याचं दुसरं काहीच साधन तुमच्याकडे नाही. त्यानं तुम्हांला असुरक्षित वाटतं. म्हणून तुम्ही स्त्रैण असणं आणि गे असणं यांच्यात काहीतरी कोरिलेशन जोडता. पण तसं असतंच असं नाही. तसंच स्त्रीसुलभ आणि पुरुषसुलभ भावनांचं. कुणालातरी काहीतरी करून खाऊ घालावंसं वाटणं, गॉसिप करायला आवडणं... म्हणजे स्त्रैण भावना - आणि शरीरसंबंधांत डॉमिनन्ट असणं, महत्त्वाचे निर्णय स्वत: घेणं... म्हणजे पुरुषी भावना - असं म्हणून आपण मोकळे होतो. तसं करायला नको, असं माझं मत आहे. कुणापाशीही कुठल्याही भावना असू शकतात, त्या बदलत राहू शकतात, बदलू शकतात. त्यानं तुमचा बाईपणा किंवा बाप्यापणा डिफाइन होण्याची काहीच गरज नाहीय. आपण लोकांना अशा बॉक्सेसमध्ये नको घालू या. मी माझ्या व्यक्तिगत नात्यांमध्ये अतिशय डॉमिनन्ट माणूस आहे. पण माझ्या इतर आयुष्यात मी अगदी सबमिसिव्ह माणूस आहे. वर्गात लेक्चर देत असताना मी अतिशय डॉमिनेटिंग असतो. विद्यार्थी म्हणून मी अतिशय सबमिसिव्ह आहे. त्यामुळे कप्पे करणं टाळू या आपण.

अशा प्रकारचं कंडिशनिंग होण्यामागे माध्यमांचा मोठी हात असतो. चित्रपटांमध्ये आपण अमुक एक पाहतो, म्हणून अमुक अमुक आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे असं बऱ्याचदा म्हणतो आपण. चित्रपटांमध्ये स्मोकिंग दाखवल्यामुळे लोक बिघडतात असंही आपणच म्हणतो. तुम्ही हिंदी चित्रपटांतलं गे पुरुषांचं चित्रण पाहिलं आहे? कसं असतं ते? आजूबाजूच्या सगळ्या पुरुषांच्या गळ्यात पडणारी व्यक्ती म्हणजे गे व्यक्ती, असं दाखवलेलं असतं. हीरोच्या गळ्यात पडणारा एक माणूस. तो हीरोला हात लावणार, मग हीरो त्याला झिडकारणार, वगैरे. या प्रतिमेमुळेच, मी जेव्हा लोकांना माझ्याबद्दल प्रथम सांगतो, तेव्हा लोक म्हणतात, 'ओके, पण आमच्यावर लाइन मारू नकोस.' मग मी त्यांना बजावतो, 'स्वत:ला इतके भारी नको समजूस. माझ्याकडे इतर बरे पर्याय आहेत!' एक हेटरोसेक्शुअल तरुण दिसेल त्या प्रत्येक पोरीला पटवायला बघत असतो असं आपल्याला वाटतं का? नाही. पण होमोसेक्शुअॅलिटीला मात्र हा न्याय! हिंदी सिनेमाचं एक जाऊ द्या. आपण मराठी चित्रपटांना प्रगल्भ मानतो. पण मराठी चित्रपटांतलं गे पुरुषाचं चित्रण परिस्थितिजन्य समलैंगिकतेच्या - सर्कमस्टॅन्शिअल होमोसेक्शुऍलिटीच्या – पलीकडे जात नाही. उदाहरणार्थ 'नटरंग'. गुणा 'मर्द' असतो. पण 'तमाशासाठी त्याला बाईसारखं वागावं लागतं!' 'जोगवा'. पुन्हा एकदा 'तो 'मर्द' असतो. पण अंधश्रद्धेमुळे त्याला बाईसारखं वागावं लागतं!' 'बालगंधर्व'. 'फक्त कलेसाठी त्यांना बाईची भूमिका करावी लागते!' येतंय लक्षात? म्हणजे तथाकथित संपूर्ण पुरुष असणं हे काहीतरी थोर आहे, आणि बाईपणा इन्फिरिअर आहे. त्यासाठी काहीतरी अपरिहार्य अडचणीचं समर्थन असावंच लागतं. कुठल्याही प्रकारे त्यांना हीरोची 'मर्दानगी' अधोरेखित करायची असते. खरं तर हा पुरुषी मानसिकतेतल्या भीतीचा आविष्कार आहे. अगदी क्वचितच याहून वेगळं चित्रण पाहायला मिळतं. 'फॅशन', 'बॉम्बे बॉईज', 'रूल्स - प्यार का सुपरहिट फॉर्म्युला'. बस. आणि हो, 'बॉम्बे टॉकीज'. त्यातली करण जोहरची गोष्ट आणि झोया अख्तरचीही गोष्ट. खूप आवडला होता मला तो सिनेमा. तो सिनेमा संपल्यावर थेटरमधे मी टाळ्या वाजवल्या जोरजोरात. तर ऑडियन्समधून कुणीतरी जोरात ओरडलं, 'कोई गे आया लगता है!' तर हे असं आहे!

मी आय. आय. टी. मध्ये पी.एच.डी करतो आहे. इथले लोक समंजस, विवेकी आहेत. तुम्ही काही सांगायला गेलात, तर तुमचं ऐकून घेतलं जातं. लोक तुमच्याही सहमत नसले, तरी ते तुम्हांला मारायला धावणार नाहीत, याची खातरी असते. अशा वातावरणाचा नक्कीच फायदा होतो. दुसरी गोष्ट म्हणजे मी फार 'सटल' आहे. माझ्यामुळे कुणाला अवघडल्यासारखं होणार नाही, याची मी काळजी घेतो. कारण साधंसरळ आहे, मी मुळातच तसा आहे. पण माझी लैंगिकता हा माझ्या व्यक्तिमत्त्वाचा फक्त एक लहानसा भाग आहे. तो सोडून बाकीही बऱ्याच गोष्टी माझ्यात आहेत. त्यामुळे मुद्दामहून त्याबद्दल प्रश्न विचारल्याखेरीज मी कुणाला सांगायला जात नाही. ज्यांना माहीत असतं, त्यांना माहीत असतं. बस. मी म्हटलं ना, टोकाची होमोफोबिक प्रतिक्रिया मला कधी मिळालेलीच नाही.

गे असल्यामुळे मी अल्पसंख्याक आहे, तरी पुरुष म्हणून मला बऱ्याच गोष्टींचं स्वातंत्र्य मिळतं. पण लेस्बियन मुलींच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. एक म्हणजे लैंगिकतेचं भान येण्याची वेळ. त्या बाबतीत मुलींची परिस्थिती फारच जास्त वाईट असते. आपण लेस्बियन आहोत, हे बऱ्याचदा मुलींना आपल्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्री कळतं. हे भयानक आहे. बऱ्याच लेस्बियन्स अशा आहेत, ज्यांना त्यांचा नवरा गेल्यावर वयाच्या पंचेचाळिसाव्या वगैरे वर्षी त्यांची लाइफ पार्टनर भेटलीय आणि आता त्या सुखात राहतायत. दुसरं म्हणजे गुप्तता. मुंबईतल्या लेस्बियन ग्रुप्सच्या मीटिंग्स कमालीच्या गुप्तपणे होतात. जितक्या मोकळेपणानं गे मीटिंग्जची जाहिरात करता येते, तितक्या खुलेपणानं लेस्बियन कार्यक्रमांची जाहिरात केली जात नाही. कारण सेटपच वेगळा असतो. तिकडे येणाऱ्या लोकांना संपूर्ण गुप्तता हवी असते. गे कार्यक्रमांना येणारे लोकही आउट असतात असं काही नाही. पण लेस्बियन कार्यक्रमांची गुप्तता गे कार्यक्रमांपेक्षा खूपच जास्त असते.

कारण त्या स्त्रियांना भीती वाटते. आपल्याकडे स्त्रियांकडनं असलेल्या अपेक्षा वेगळ्या, खूप जास्त आणि निरर्थक असतात हे तुम्हांलाही मान्य असेल. बऱ्याचदा स्त्रियांवर लग्नाची जबरदस्ती केली जाते. लग्न केलं की सगळं काही ठीक होईल, असा काहीतरी युक्तिवाद असतो त्यामागे. त्यांच्यातला वेगळेपणा दडपून टाकण्याकरता काही जणींवर बलात्कारही केला जातो. उलट्या बाजूनं गे पुरुषांशी लग्न झालेल्या बायकांचही तसंच असतं. बाहेर फसवाफसवी करणाऱ्या पुरुषांना त्या सांभाळून घेतात. आर्थिक अवलंबित्व असतं. मानसिकरीत्याही अवलंबून असणं असतं मोठ्या प्रमाणावर. सामाजिक दबावही असतो. बदनामी टाळायची असते. 'पदरी पडलेलं पवित्र करून घेणं' बायकांना मुळी शिकवलेलंच असतं. वर पुन्हा 'घटस्फोट झाला तर काय', 'माझं याच्याशिवाय कसं होणार', 'हे असंच करायचं असतं', असं कल्चरल कंडिशनिंगमधूनच त्यांच्या मनावर बिंबवलं जातं. व्यावहारिक पातळीवरच्या अडचणीही येतात. घरातून हाकलून देणं, घर बदलण्याशिवाय दुसरा पर्याय न ठेवणं अशा गोष्टी सर्रास होतात. बरीच जोडपी अशी आहेत, ज्यांना दर तीन-चार वर्षांनी भाड्याचं घर बदलत राहावं लागतं. गे नेटवर्क्सतर्फे फक्त गे लोकांना भाड्याचे फ्लॅट्स उपलब्ध करून दिले जातात. हा चळवळीच्या कामाचाच एक भाग आहे.

हा काहीसा जातीय बंधुभाव असल्यासारखा प्रकार आहे. पण हे हिजडा संस्कृतीहून वेगळं आहे. हिजड्यांमध्ये सगळ्या गोष्टींची पक्की श्रेणीव्यवस्था असते. त्यात शिरल्यानंतर तुम्हांला एक गुरू असावाच लागतो, जो तुम्हांला त्या व्यवस्थेमध्ये रुजायला मदत करतो. गुरू, नायक, अजून वर कुणीतरी, अशी ती चढती भांजणी असते. त्यामुळे त्यात सामाजिक संरक्षण असतं. घरातून बाहेर पडावं लागतं, हे तर वाईटच आहे. पण कमीत कमी त्यांना स्वीकारणारं हिजडा संस्कृतीतलं एक कुटुंब असतं. अशी व्यवस्था गे लोकांकरता अस्तित्वात नाही. उदाहरणार्थ, माझे काही गे मित्र आहेत, काही स्ट्रेट मित्र आहेत. माझं स्वत:चं सामाजिक वर्तुळ आहे. पण मला हे प्रयत्नपूर्वक कमवावं लागलं. वैयक्तिक पातळीवर मुद्दाम सोशल नेटवर्क्समधून लोकांना भेटून, प्रयत्नपूर्क त्यांच्यासोबत वेळ घालवून मित्र मिळवावे लागतात, हा अनेकांचा अनुभव आहे. संस्थात्मक पातळीवरही तसंच. लोकांना एकत्र आणणं कार्यक्रमांतून साधावं लागतं. मुंबई, पुणे, हैदराबाद आणि इतर मोठ्या शहरांमधून हे कार्यक्रम राबवले जातात. चित्रपट, नाईटक्लब्जमधल्या पार्ट्या, कॉमेडी इव्हेंट्स, कधी कुटुंबीयांसोबतच्या पार्ट्या, कधी मित्रांसोबतच्या पार्ट्या, असे अनेक कार्यक्रम होतात. त्यांची नेटवर्किंगसाठी मदत घ्यावी लागते. पण - उद्या तुम्ही इथे एका माणसाला उभं केलंत आणि म्हणालात, की 'हा गे आहे, बोल याच्याशी.' तर मी नाही बोलू शकणार. मला नाही आपुलकी वाटणार त्याच्याबद्दल. माझ्याशी कुणी मराठीत बोलायला सुरुवात केली, की मला त्या माणसाबद्दल जवळीक वाटते. त्या प्रकारची जवळीक कुणी गे आहे, म्हणून मला त्या माणसाबद्दल नाही वाटणार. अर्थात याला अपवाद असतो. ज्या लोकांची प्रचंड लैंगिक उपासमार झालेली आहे, अशा लोकांना गे माणूस दिसल्यावर त्याला सोडूच नये असं वाटेलही. पण मग हे हेटरोसेक्शुअल माणसांच्या बाबतीतही तितकंच खरं आहे.

ही चळवळ अजून शहरांमधूनही स्थिरावलेली नाही. मग छोट्या गावांपर्यंत कधी आणि कशी जाणार? 'समपथिक ट्रस्ट' आहे पुण्यातली. ते पुण्याच्या आसपासच्या गावांमध्ये प्रबोधनाचं काम करतात. सध्या त्यांनी हिजड्यांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. पण असं पहा, आय.आय.टी.सारख्या संस्थांच्या कॅम्पसमध्येही 'साथी'च्या कार्यक्रमांना गे लोक येतातच असं नाही. काही लोकांना आपली लैंगिकता जाहीर करण्याची भीती वाटते. तर काही लोकांना वाटतं, की मी गे आहे म्हणजे मी सगळ्या गे इव्हेंट्सना यायलाच पाहिजे पाहिजे, असं काही नाही. बऱ्याच लोकांना चळवळीचा भाग असायचं नसतं. मी गे माणूस आहे. पण मी चळवळीमधे सक्रिय असावं असं मला वाटत नाही, असं त्यांचं म्हणणं असतं. उदाहरणार्थ, मी स्वत:ला कोकणस्थ ब्राह्मण म्हणवतो. ज्यांना कोकणस्थ ब्राह्मणांसाठी आरक्षण हवं असतं अशाही संस्था असतात. पण मी त्या संस्थांमध्ये भाग घेऊ इच्छित नाही. तसंच हेही आहे. शहरांतूनच ही परिस्थिती. अशात लहान गावांमध्ये काय असेल, कल्पनाच केलेली बरी.

आपल्याकडे अजून गे, लेस्बियन, ट्रान्सजेंडर्स, बायसेक्शुअल्स आणि क्वीअर यांच्यात फरक करायचा असतो, याचंही भान लोकांना नाही. क्वीअर ही दोन प्रकारे वापरली जाणारी संज्ञा आहे. गे, लेस्बियन, ट्रान्सजेंडर्स आणि बायसेक्शुअल्स या सगळ्यांसाठी वापरली जाणारी सर्वसमावेशक संज्ञा म्हणून 'क्वीअर' हा शब्द वापरला जातो. तसंच या चार प्रकारांत न बसणाऱ्या, उदाहरणार्थ एसेक्शुअल, लोकांसाठीही हा शब्द वापरला जातो.

गे पुरुषांसाठीचे कार्यक्रम जास्त असतात, कारण पुढाकार घेणारे आणि कार्यक्रमाला येणारे लोकही खूप असतात. पण स्त्रियांसाठीही कार्यक्रम होतात. हिजड्यांसाठीही काम केलं जातं. पण या गोष्टी 'एलजीबीटीक्यू'चा भाग म्हणून पाहिल्या जात नाहीत. असं इतरही बऱ्याच गोष्टींबद्दल होतं. मी माझ्या लैंगिकतेबद्दल कुठलाही गंड न बाळगता खुलेपणानं बोलणं, हाही लोकांचा दृष्टिकोन बदलण्याचाच एक मार्ग आहे. पण त्याला 'लैंगिकतेचं प्रदर्शन' मानलं जातं! मी माझं 'कमिंग आउट'चं आर्टिकल जेव्हा लिहिलं होतं एका वेबसाइटसाठी, तेव्हा मी त्याची सुरुवात अशी केली होती: 'जेव्हा जेव्हा मी एखाद्या नवीन माणसाला माझ्या लैंगिकतेबद्दल सांगत असतो, तेव्हा तेव्हा मी त्याच्याकरता माहितीचं एक नवं दालन खुलं करत असतो. हिंदी चित्रपटातली साचेबद्ध प्रतिमा किंवा लैंगिकतेबद्दलचे संवेदनाहीन विनोद, यांतून जे मिळत नाही, असं काहीतरी देऊ करत असतो. आपल्याबद्दल इतरांना - जवळच्या आणि इतर लोकांना सांगणं - हाही चळवळीचा एक भागच आहे असं मी मानतो.' कारण जर तुम्ही जवळच्या लोकांचं मन बदलू शकलात, तर तुम्ही एका प्रकारे सामाजिक परिवर्तनालाच हातभार लावत असता.

कोणत्याही आंदोलनातले प्रयत्न दोन पातळ्यांवर होतात. एक म्हणजे रूढ अर्थानं केलं जाणारं संस्थात्मक काम. दुसरं म्हणजे कला, साहित्य अशा माध्यमांतून केलं जाणारं प्रबोधन. उदाहरणार्थ विनोद. हिटलरच्या आमदानीत ज्यूंनी हे विनोदाचं हत्यार प्रभावीपणे वापरलं. अमेरिकन संस्कृतीत 'एलजीबीटीक्यू' गटानं अशा प्रकारचे विनोद यशस्वीपणे वापरलेले दिसतात. होमोफोबियाची टर उडवणारे असे विनोद आपल्याकडे मात्र अजून आढळत नाहीत. अजून एलजीबीटीक्यू गट इतके सक्षम झालेले नाहीत. मॅस्लो हायरारकी ऑफ नीड्सचं उदाहरण आहे हे.

एक समलैंगिक माणूस म्हणून माझ्या लोकांकडून फार मोठ्या अपेक्षा नाहीत. लोकांचा दृष्टिकोन बदलावा, बस. माझं स्पष्ट मत आहे, की त्यासाठी आपण लोकांशी प्रादेशिक भाषांमधून बोलायला सुरुवात केली पाहिजे. मी जेव्हा माझ्या आईवडिलांशी माझ्या गे असण्याबद्दल इंग्लिशमधून बोललो, तेव्हा ते माझ्यापासून अधिकच तुटल्यासारखे झाले. हे काहीतरी फॉरेनचं फॅड आहे, कुठल्यातरी इंग्लिश सिनेमातून मी हे शिकलो आहे, असा त्यांचा ग्रह झाला. साहजिक होतं ना ते? आधीच मी त्यांना त्यांच्या जगाबाहेरचं काहीतरी सांगत होतो. त्यात भाषाही परकी. म्हणजे ते समजून न घेण्याची शक्यताच जास्त. हे माझ्या लक्षात आलं, तेव्हा आम्ही 'साथी आय. आय. टी. बॉम्बे'तर्फे भारतीय भाषांमधून व्हिडिओ बनवण्याचा कार्यक्रम हातात घेतला. 'द फर्स्ट लव्ह' हा आमचा पहिला व्हिडिओ. ओरिएण्टेशनच्या वेळी नवीन विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी आम्ही तो केला होता. त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांशी बोललो. तेव्हा आमच्या लक्षात आलं, की '३७७ म्हणजे काय', 'एलजीबीटीक्यू हा कशाचा शॉर्टफॉर्म आहे', 'गे असलेला संगणक शास्त्रज्ञ कोण' या प्रश्नांची उत्तरं बऱ्याच जणांना माहीत होती. मला खूपच आनंद झाला या गोष्टीचा. या पिढीला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत. आम्हांला या गोष्टी माहीत नव्हत्या त्या वयात.

वयाप्रमाणे किंवा शिक्षणामुळे लोकांच्या प्रतिक्रियांमध्ये फरक पडतो असं मला वाटत नाही. माझ्या एका गे मित्राची आई अशिक्षित कोळीण आहे. आहे. जेव्हा त्यानं तिला त्याच्या गे असण्याबद्दल सांगितलं, तेव्हा तिनं ठणकावून सांगितलं, 'तुला जर कुणी काही वेडंवाकडं बोललं तर मला सांग. मी त्याला कोयत्यानं कापून काढीन.' याउलट माझे पदवीधर आईबाबा मला म्हणाले, 'कुणाला काही सांगू नकोस, बरं का.' माझ्या २२ वर्षांच्या भावाला जेव्हा माझ्याबद्दल कळलं, तेव्हा तो म्हणाला, 'ओके. फाइन.' पण आपल्याच भावंडांना त्यांच्या लैंगिकतेबद्दल हसणारे विशीबाविशीतले इतर लोकही मला माहीत आहेतच. एका शीख मुलाला रात्रीच्या रात्री घरातून हाकलून देण्यात आलं. एका मराठी मुलाबद्दलही असं घडल्याचं मला माहीत आहे. त्यामुळे वय, शिक्षण, भाषा, प्रांत यांमुळे काहीच फरक पडत नाही. तुम्ही मनानं किती मोठे आहात, तुम्ही किती विवेकी विचार करू शकता, यावरूनच तुमच्या प्रतिक्रिया ठरतात.

म्हणूनच प्रादेशिक भाषांमधून लोकांपर्यंत पोचण्याचा, त्यांना बोलतं करण्याचा मुद्दा खूप महत्त्वाचा वाटतो. बोलल्याशिवाय संज्ञा जन्माला येणार कशा! 'समपथिक ट्रस्ट'नं प्रकाशित केलेली काही मराठी पुस्तकं आहेत. ‘मनाचिये गुंती' नावाचं एक पुस्तक आहे. 'एलजीबीटीक्यू' लोकांच्या पालकांनी लिहिलेल्या कथा त्यात आहेत. एक 'पार्टनर' नावाचं पुस्तक आहे, ते बिंदुमाधव खिरेंचं आत्मचरित्र आहे. 'मानवी लैंगिकतेचे पैलू' (का 'मानवी लैंगिकता - एक प्रामाणिक ओळख') असं शास्त्रीय माहिती असणारं एक पुस्तक आहे. ही मला खरोखरच फार आवडलेली पुस्तकं आहेत. मराठी साहित्यातलं 'कोबाल्ट ब्ल्यू' हे एक महत्त्वाचं नाव आहे. ते अप्रतिम आहे.

माझ्या 'कमिंग आउट'मुळे मला खूप फायदा झाला. माझ्या मनावरचं एक भलं मोठं दडपण दूर झालं. माझा आत्मविश्वास कमीत कमी तिपटीनं वाढला. सत्य न कचरता सांगणं ही कसली भारी गोष्ट असते, ते माझ्या लक्षात आलं. त्यानं मला एकदम मुक्त झाल्यासारखं वाटायला लागलं. इट लिबरेटेड मी. अनेक गोष्टींबद्दलची माझी अनाठायी भीती निघून गेली. आत्मविश्वास खूपच वाढला माझा. आधी मी जेव्हा लोकांशी बोलायचो, तेव्हा नेहमी माझ्या मनात हे दडलेलं असायचं की मी त्यांच्यापासून एक महत्त्वाची गोष्ट लपवून ठेवली आहे. ती गोष्ट जेव्हा सांगून टाकली, तेव्हा मनावरचा ताण खूप कमी झाला. हलकं हलकं वाटायला लागलं. मी स्त्रैण असण्याचा जो काही न्यूनगंड मला होता, तो माझ्या मनातून नाहीसा झाला. 'आहे हे असं आहे. काय म्हणणं आहे?' असं म्हणण्याइतपत बदल माझ्यात झाला. कसलाही आव आणणं बंद झालं. प्रामाणिकपणा वाढला स्वत:बद्दलचा. लोक काय म्हणतील, या गोष्टीबद्दलची भीती हद्दपार झाली. मजा बघा, शाळेत असताना, मला बायल्या म्हणून चिडवलं जात असे. याउलट आयायटीत एम. टेक. करत असताना मी मुद्दामहून तथाकथित मर्दानगी सिद्ध करणाऱ्या गोष्टी करत राहायचो. एका विशिष्ट पद्धतीनं चालणं, एका विशिष्ट पद्धतीनं शिव्या देत स्वत:ला एक्स्प्रेस करणं, फिक्शनल गर्लफ्रेंड्सबद्दल थापा मारणं, इत्यादी. आज मात्र मी अशा टप्प्याला आहे, जिथे कसलाही आव न आणता मी माझं अस्तित्व स्वीकारलेलं आहे. आय ऍम हॅपी विथ व्हॉट आय ऍम. काही गोष्टी मी बायकी पद्धतीनं करतो, काही गोष्टी पुरुषी पद्धतीनं. मग? जगात संपूर्णपणे बायकी आणि संपूर्णपणे पुरुषी असं काही असत नाही. माझी हल्ली कुणाशी नवी मैत्री झाली, तरी जोवर मी त्याला माझ्या व्यक्तिमत्त्वाचा हा भाग सांगत नाही, तोवर तो माझा जवळचा मित्र होत नाही. माझ्या डोक्यामध्ये हे हार्डवायर्ड झालेलं आहे. 'जर तुला नुसत्या मैत्रीपासून जवळच्या मैत्रीत शिरायचं असेल, तर माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या या पैलूबद्दल तुला माहीत असलं पाहिजे आणि त्याचा तू स्वीकारही केलेला असला पाहिजेस.' जर तसं घडलं नाही, तर माझ्यात आणि त्या मित्रात आपोआप अंतर पडत जातं.

मी ऑस्ट्रेलियामधे असताना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मला टोकाचा संताप आला आणि हे बोलून दाखवावंसं वाटलं. असंही वाटलं तेव्हा, की माझ्या अस्तित्वाला इथे कायदेशीर मान्यता आहे, तर मी इथेच राहतो. नको मला माझा देश जिथे कोणताही गुन्हा न करताच मी गुन्हेगार ठरतो आहे...

पण आता मी त्या ट्रिगर पॉइंटपासून पुढे आलो आहे.

अजूनही काही लोकांना वाटतं, की गे-लेस्बियन लोक भारतात असतीलच कितीसे? पाच? दहा? वीस? चाळीस? नाही. भारतीय लोकसंख्येपैकी १३ टक्के लोक ’एलजीबीटीक्यू’मध्ये येतात, असं युनायटेड नेशन्सच्या सर्वेमध्ये दिसून आलंय. नुकत्याच प्रकाशित केलेल्या एका बातमीनुसार भारतात जवळ जवळ ३० ते ४० लाख गे आणि बायसेक्शुअल पुरुष आहेत. ही एखाददुसर्‍या माणसाची गोष्ट नाही. भीतीच्या अंधारात घाबरून लपलेल्या लाखो भारतीयांची गोष्ट आहे. आणि तरी लोकांमधे याबद्दल प्रचंड अज्ञान आहे.

हेटरोसेक्शुअल लोक मला माझ्या सेक्शुऍलिटीबद्दल प्रश्न विचारतात तेव्हा त्यांचं अज्ञान बघून मला हसायला येतं. 'तू छक्का आहेस का?', 'तुझ्यावर लहानपणी रेप झाला होता का?', 'मेरे को देख के तेरा खडा होता है क्या?', 'तू ट्रेनमधे आणि पब्लिक टॉयलेटमधे लोकांना हात लावायला जातोस का?', 'तू कधी साडी नेसतोस का?', 'तुझ्या पॅण्टमध्ये काय आहे?', 'तेरा खडा होता है क्या?', 'तू लहानपणी बहिणीसोबत फिरायचास म्हणून असा झालास का?', 'तुझ्या बाबांनी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून असं झालं का?', 'तुझ्या आईचा डायव्होर्स झालाय का?', 'तू मागच्या जन्मी बाई होतास का?'... असे का-ही-ही असंबद्ध प्रश्न विचारतात. पण संयमानं, शांतपणे, न चिडता, न हसता उत्तरं देणं ही मला माझी जबाबदारी वाटते. या सगळ्या प्रश्नांचा उगम अज्ञानात असतो. माहीत नसतं, म्हणून तर विचारतात ना लोक? माहीत करून घ्यायचं आहे लोकांना, हेही मोठं आहे. ज्यांना काही पडलेली नाहीय, असे लोक प्रश्न विचारण्याच्या फंदातही पडत नाहीत. आपल्या धारणा, पूर्वग्रह, समज... घट्ट कवटाळून बसतात. माध्यमांतून दिसणाऱ्या प्रतिमा बघून आपली मतं ठरवतात आणि मोकळे होतात. असंही दिसून आलेलं आहे, की जे पुरुष या गोष्टीवर आक्रमकपणे हल्ले चढवत असतात, ते स्वत:ची होमोसेक्शुऍलिटी नाकारण्याचा प्रयत्न करत असतात. तो त्यांचा डिफेन्स मेकॅनिझम असतो. चिडायला होतं क्वचित. हसायला येतं. पण त्यावर मात करून उत्तर देत राहणं माझी जबाबदारीच आहे, नाही का? कारण लोकांच्या दृष्टिकोनामध्ये बदल होणं ही माझी गरज आहे!

माझ्या आईवडलांना अजूनही फोन येतात, लोक आडून आडून विचारतात, "आदित्यबद्दल आम्ही असं वाचलं! काय चाललंय त्याचं!!" आता त्यांनासुद्धा या सगळ्याची गंमत वाटते. एवढंच नाही, आता माझे बाबाही मला म्हणतात, "’साथी आय. आय. टी. बॉम्बे’च्या इव्हेंटचे फोटो पाहिले, मला तुझ्याबद्दल अभिमान वाटतो."

----

डिस्क्लेमर - ही आदित्यची व्यक्तिगत मतं आहेत. एलजीबीटीक्यू गटाची प्रातिनिधिक मतं नाहीत.

शब्दांकन - मस्त कलंदर, मेघना भुस्कुटे, निखिल देशपांडे
फोटोश्रेय - आदित्य जोशी
चित्ररेखाटन - अमुक

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (12 votes)

प्रतिक्रिया

लेखातली काहीकाही वाक्यं प्र-चं-ड आवडली.
... कुठल्याही प्रकारे त्यांना हीरोची 'मर्दानगी' अधोरेखित करायची असते. खरं तर हा पुरुषी मानसिकतेतल्या भीतीचा आविष्कार आहे.
माझी लैंगिकता हा माझ्या व्यक्तिमत्त्वाचा फक्त एक लहानसा भाग आहे. तो सोडून बाकीही बऱ्याच गोष्टी माझ्यात आहेत.
सेक्सबद्दल बोलतोच कुठे आपण? गंमत बघा, 'तुमच्या दोघांचं आहे का?' असं विचारतो आपण. 'अफेअर', 'रिलेशनशिप', 'प्रेम' हेही शब्द बोलायला लाजतो.
'स्वत:ला इतके भारी नको समजूस. माझ्याकडे इतर बरे पर्याय आहेत!'

'गुन्हेगार' असा शिक्का बसूनही कुठेही उपेक्षित असल्याचा भाव/आव न आणल्यामुळे हे प्रकटन फारच आवडलं. 'राईट टू पी'च्या मुमताज आणि सुप्रिया यांचा दृष्टिकोनही असाच होता. तरुण वयाचे, १९९१ च्या सुमारास लहान असलेल्या लोकांकडे ही वृत्ती अधिक असते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्यवाद अदिती!

-आदित्य जोशी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनोगत आणि आत्मकथन आवडले.

> आधी मी जेव्हा लोकांशी बोलायचो, तेव्हा नेहमी माझ्या मनात हे दडलेलं असायचं
> की मी त्यांच्यापासून एक महत्त्वाची गोष्ट लपवून ठेवली आहे. ती गोष्ट जेव्हा
> सांगून टाकली, तेव्हा मनावरचा ताण खूप कमी झाला. हलकं हलकं वाटायला लागलं.

ही बाब किती महत्त्वाची आहे, ते पुष्कळदा लोकांच्या लक्षात येत नाही. मोकळेपणासाठी अजून तयार न झालेल्या समलिंगी लोकांनाही या भावी मनःशांतीबाबत कल्पना नसते. हे ठाऊक असते, तर कित्येक समलिंगी लोकांनी मोकळेपणासाठी इतका उशीर केला नसता.

अर्थात ज्या लोकांना घरातून काढले जाते, वगैरे, त्यांना जबरदस्त किंमत भरावी लागते. त्यामुळे मनातही स्वतः स्वतःशी प्रामाणिक होण्यापूर्वी आर्थिक स्वातंत्र्य असलेले बरे. म्हणजे पौगंडावस्थेतील भावनिक डोंगरदर्‍या घरादाराच्या शाश्वतीत झोकून अनुभवायला मिळत नाहीत...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्या प्रतिसादाशी मी पूर्ण-पणे सहमत आहे.

आदित्य जोशी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आदित्यने उल्लेख केलेल्या मॉस्लोच्या पिरॅमिडची समलैंगिक व्यक्तीसाठीची सिद्धता अस्वस्थ करणारी वाटली. हवा तसा जोडीदार मिळणे आणि त्याच्याबरोबर हवे तसे प्रेमाचे बंध निर्माण करणे या एका भिन्नलिंगी व्यक्तीसाठी अतिशय स्वाभाविकपणे गृहित धरलेल्या गोष्टी समलैंगिक व्यक्तीसाठी सामाजिक, ़कौटुंबिक आणि कायदेशीर पातळीवर किती अवघड असतात हे असे प्रत्यक्ष कोणाकडून ऐकले की अस्वस्थ वाटते, समाज म्हणून आपण इतरांच्या नागरी स्वातंत्र्याबद्दल किती उदासीन असतो हे लक्षात येतं.
एक गंमतीशीर अनुभव आठवतोय, एका जवळच्या नातेसंबंधातल्या व्यक्तीची समलैंगितेबद्दलची अज्ञानमूलक मते ऐकून फार चमकले होते. ही व्यक्ती तशी प्रेमळ आहे आणि इतर विषयांत बर्यापैकी उदारमतवादी आहे हे जाणविल्याने मी संवाद चालू ठेवला आणि म्हटले "अशा बाबतीत माणसांना चेहेरे दिले की त्याविषयाबद्दल संवेदनाशीलपणे विचार करता येतो, समज की मला उद्या कळले की माझा भाऊच समलिंगी आहे तर तुला त्याबद्दल काय वाटेल?" त्यावर ती व्यक्ती फार अस्वस्थ झाली आणि तिला वाटायला लागले की मी हे काय बोलतेय? मी हे उदाहरण म्हणून देते आहे म्हणजे माझ्या कुटुंबात खरेच कोणी समलिंगी आहे की काय म्हणून घाबरून गेली. मी हे फक्त उदाहरण म्हणून सांगतेय यावर अखेरीस विश्वास बसल्यावर "हे फारच वाईट उदाहरण होतं" म्हणून माझ्यावर वैतागली. तेंव्हा मला जाणवले की एखाद्या असाध्य रोगाचे उदाहरण म्हणून घरच्या व्यक्तीचे उदाहरण दिले तर लोक जितके अस्वस्थ होतात तितकेच त्यांना समलैंगिकतेबद्दल वाटते, हे किती अज्ञानमूलक आहे, ़किती दुर्दैवी आहे!
आदित्यला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा आणि लेखासाठी ऐसीचे आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चुकीचे उदाहरण मुळीच नाही, बरोबरच आहे. पण हे सगळे अज्ञानामुळे होते. माहितीच नसेल तर काय सान्ग्णार.

"टी वी मधून येणारा प्रकाश आपल्याला गिळून टाकतो", असा लोकान्चा पूर्वी अमेरिकेत समज होता. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मजा आली होती आदित्यशी बोलून.

ही मुलाखत जेवढी विचार करायला भाग पाडणारी होती, तेवढीच आनंददायी - हलकीफुलकी - मित्राशी गप्पा मारण्याइतकी सहज होती, हे आवर्जून सांगायला पाहिजे. मराठी आंतरजालावर समलैंगिकता हा अनेक वेळा आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारे डिस्कस केला गेलेला मुद्दा आहे. त्यामुळे त्या विषयामुळे स्कॅण्डलाइज होण्याचा प्रश्नच नव्हता. पण आपली लैंगिकता खुलेपणानं स्वीकारणारे आणि 'हा माझ्या व्यक्तिमत्त्वाचा फक्त एक भाग आहे. ते असूच दे, बाकी काय म्हणता?' असं सहजपणानं म्हणून आपलं 'नॉर्मल' असणं अधोरेखित करणारे कुणीच समवयस्क माझ्या मित्रवर्तुळात नव्हते, हेही खरं आहे.

समलैंगिकता म्हणजे ज्याबद्दल सतत गंभीरपणे भूमिका घेऊन कटोविकटीचे वाद घातले पाहिजेत, ज्यातून प्रचंड दु:ख आणि दडपणूक आणि अन्याय यांपेक्षा निराळं काहीच निष्पन्न होत नाही, जे चुकीचं नक्की नसलं - तरी चार लोकांपेक्षा निराळं आहे, असं काहीतरी... असं माझ्या डोक्यात कळत नकळत तयार झालेलं चित्र होतं.

आदित्यची तरुण भाषा ('पचकली', 'आरोग्याची 'वाट' लावून टाकतात...', 'फक् इट' =))),

'बरेच कोब्रा लोक ज्या पद्धतीनं बोलतात आणि आर्टिक्युलेट करतात, त्यावरून ते मला स्त्रैण वाटतात. पण ते गे नसतात..’ (पुन्हा एकदा =))) हे त्याचं हहपुवा एक्स्प्रेशन,

’आपल्याकडे स्त्रियांकडनं असलेल्या अपेक्षा वेगळ्या, खूप जास्त आणि निरर्थक असतात हे तुम्हांलाही मान्य असेल..’ हे म्हणतानाची त्याची ठाम सहजता...

यांमुळे माझ्या डोक्यातलं एलजीबीटीक्यूबद्दलचं ठोकळेबाज चित्र बदललं आणि ते अजून मानवी-नॉर्मल-सहज झालं. थॅंक्स मकी, थॅंक्स आदित्य!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धन्यवाद मेघना.

"हे अमेरिकेत होते, आपल्याकडे नाही", "हे श्रिमन्तान्कडे होते, आपल्याकडे नाही", "हे फिल्म्वाल्यान्मध्ये होते, आपल्याकडे नाही" - अशी अनेक कारणे लोक देतात. ह्याचे कारन हेही असते, की कोणी गे आहे, हे माहितीच नसते. त्यामुळेच माझा हा छोटा प्रयत्न. वाचकान्ना कसलेही प्रश्न, शन्का असल्यास, जरूर इथे लिहा!

मलाही तुम्हा तिघान्शी गप्पा मारुन खूप बरे वाटले. मज्जा आली त्या दिवशी. तुमची ही मकी म्हणजे माझ्या कोलेजातल्या मास्तरीण् बाई. त्यान्ना आणि त्यान्च्या कुन्कवाला स्पेशल थन्क्स.

-आदित्य जोशी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनोगत आवडले.
आदित्यला शुभेच्छा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद टिन्कू!

-आदित्य जोशी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोर मुलाखत आहे. आवडलीच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

धन्यवाद आदूबाळ!

-आदित्य जोशी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुलाखत थोर आहे खरीच. अन अगदी नेमकी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद!

तुम्ही जर ते "गोथॅम"नगरचे बॅटमॅन असाल, तर मी तुमचा खूप मोठा पन्खा आहे.

-आदित्य जोशी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद Smile

-ब्रूसभाऊ वायणे-पाटील ऊर्फ वाल्गुदाचार्य.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चळवळीच्या अनेक अंगांना स्पर्श करत, योग्य ते संदर्भ (पुस्तकांचे, दुव्यांचे) वेळोवेळी पेरत, तपशिलात प्रातिनिधिक नसली तरी चळवळीची मध्यवर्ती कल्पना स्पष्टपणे मांडत, चळवळीत असलेल्या-नसलेल्या प्रत्येकाच्या मनातलं नेमकं सामोरं आणणारी आणि एवढं सगळं सांभाळून वाचनओघ अतिशय प्रवाही ठेवणारी ही मुलाखत. ही अगदी प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात वाचकांसमोर न आणता लेखाच्या रूपात आणल्याबद्दल 'ऐसी..'च्या चमूचे अभिनंदन.
--
आदित्यचे अनेकानेक आभार आणि दिवाळीनिमित्त अभीष्टचिंतन !

एक-दोन प्रश्न :

१. समाजव्यवस्थेने स्वीकारण्याआधीही, स्वतःचं असं वर्तुळ कष्टपूर्वक निर्माण करणं, ही अतिशय थकवून टाकणारी प्रक्रिया आहे, असं वाटतं का तुला ?

२. भारतातील लग्नव्यवस्था ही प्रेमापेक्षाही कमिटमेन्टला, दिलेल्या शब्दाला आयुष्यभर सचोटीने बांधील असणे यावर आणि सामाजिक/आर्थिक सुरक्षिततेवर बरीच भिस्त ठेवून आहे. समलैंगिक संबंधांत, मुळात दोन जिवांनी एकत्र येणे हेच प्रेम या भावनेवर आधारित असल्याने, या कमिटमेन्टला, सुरक्षिततेला महत्त्व येईल/आहे असं तुला वाटतं ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समाजव्यवस्थेने स्वीकारण्याआधीही, स्वतःचं असं वर्तुळ कष्टपूर्वक निर्माण करणं, ही अतिशय थकवून टाकणारी प्रक्रिया आहे, असं वाटतं का तुला ?

माझे उत्त्तरः

नक्कीच! "कशाला सांगायला हवे? राहू दे न आपले हे गुपीत", "सांगू खोट्या-खोट्या गर्ल्फ्रेन्ड बद्दल!"मध्येच बहुतेकांची गाडी अडते. पुढची पायरी असते, "जवळचयांना सांगूया!" आणि मग हळू हळू सांगू लागलो. प्रत्येकाच्या प्रतिक्रिया वेगळ्या, प्रश्न वेगळे आणि माझ्याबद्दल वाटणार्या काळज्या वेगळ्या! स्वतःचा नोकरी, अभ्यास साम्भाळून आजू-बाजूच्या लोकांना सांगत जाणे नक्कीच खूप श्रम-दायक असते. ही थकवणारी गोष्ट नक्कीच आहे.

पण ऊर्जा आणि शक्ती प्रत्येक "कमिंग आउट" नन्तर वाढत जाते. उदा: रोज भेटणारे ओफिस् चे लोक जर मला स्विकारत अस्तिल तर पाच महिन्यातून एकदा भेटणार्या (आणि नसत्या चौकश्या करणार्या) दूरच्या मामीने बोलणे वगैरे थाम्बविले तर चिन्ता फारशी वाटत नाही. बोलणे टाकणारे असम्ख्य असतात, पण त्याकडे दुलक्श करणे भाग असते! आणि ती शक्ति आपल्या जवळच्या व्यक्तिंनी स्वीकर केले असेल तर नक्की मिळते.

२. भारतातील लग्नव्यवस्था ही प्रेमापेक्षाही कमिटमेन्टला, दिलेल्या शब्दाला आयुष्यभर सचोटीने बांधील असणे यावर आणि सामाजिक/आर्थिक सुरक्षिततेवर बरीच भिस्त ठेवून आहे. समलैंगिक संबंधांत, मुळात दोन जिवांनी एकत्र येणे हेच प्रेम या भावनेवर आधारित असल्याने, या कमिटमेन्टला, सुरक्षिततेला महत्त्व येईल/आहे असं तुला वाटतं ?

"दो दिलों का मिलन" असे सुन्दर वर्णन आपल्याकडे करतात. "दिल"ला लिन्गभाव नाही, ही किती सुन्दर गोष्ट आहे.

सगळ्या लग्नांना एका साच्यात टाकता येत नाही. अनेक लग्नांमध्ये प्रेम टिकून राहते, अनेक लग्न "कशाला डाय्वोर्सची नसती कट्कट" वर टिकून राहतात", तर अनेक "आमच्या नशीबात हेच ध्यान लिहिले होते, आता काय करणार" वर अडकतात. प्रत्येक लग्न वेगळे कारण त्यातले जोडीदार वेगळे.

त्याच प्रमाणे भारतात "कमिट्मेन्ट"च्या जोरावर वीस-तीस वर्षांपासून एकत्र राहणारी अनेक समलैन्गिक जोडपी आहेत. लोकांसठी "ते दोघे/त्या दोघी ना.. एकत्र राहतात" असे असले तरीही. अनेक नाती तुटतातः भांडणे होऊ लागली म्हणून, किंवा मुलिशी लग्नाचे प्रेशर असह्य झाले म्हणून (इत्यादि). त्यामुळे भिन्न-लिंगी लोकांमध्ये असनारी वैविध्यता इथेही आढळ्ते.

पण, महत्वाचा मुद्दा (आणि लेखाचे शिर्षकही) "प्रेम" आहे. प्रेमावर टिकणार्या लग्नांना सलाम. पण!!!!!! लग्नाचा धागा बान्धून ठेवायला असल्याने रेटणार्या लग्नांपेक्षा लग्नाचा धागा नसतानाही प्रेमाच्या ताकदीवर टिकणारी ही "प्रेमं" मला जास्त सशक्त वाटतात.

-आदित्य जोशी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रश्न आणि त्याची उत्तरे दोन्ही फार आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद आदित्य.
लग्नाचा धागा बान्धून ठेवायला असल्याने रेटणार्या लग्नांपेक्षा लग्नाचा धागा नसतानाही प्रेमाच्या ताकदीवर टिकणारी ही "प्रेमं" मला जास्त सशक्त वाटतात.
......माझे दोन्हीही प्रश्न हे प्रेम करणारी व्यक्ती मिळवण्यासाठी असलेल्या धडपडीशी आणि त्यायोगे येणार्‍या मानसिक बळाशीच संबंधित होते. 'प्रोजेक्ट बोलो'अंतर्गत बिंदूमाधव खिरे यांच्या प्रदर्शित झालेल्या मुलाखतीत, शेवटी त्यांच्या एका वक्तव्याने, माणूस प्रेमासाठी किती आसुसलेला असतो व त्यासाठी किती अथक प्रयत्न करण्याचे बळ त्याच्या अंगी येते, हे पाहून चमकलो होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरोबर आहे. नक्कीच!

ही धडपड मीही अनुभवली आहे. पण म्हणून मी स्वतःला अभागी वगैरे मानणार नाही.

काहींना रोजच्या जेवणासाठी लढावे लागते. काहींना परदेशी जाता यावे म्हणून. स्ट्रेट पुरुषाचीसुद्धा स्वतःचे "स्ट्रेट"त्व सिद्ध करण्यासाठी ओढाताण होतेच. ("मेन डोन्ट क्राय", "पर्फोर्मन्स प्रेशर", "बायको-बॉस इत्यादि). त्यामुळे त्रास हा सगळ्यांना होतो, कोणाचेही दु:ख मोठे वा छोटे नाही. Smile

मग माझे हे आर्टिकल का? तर बहुतांश लोकांना हे पैलु माहित नसतात म्हणून. एवढच! गे लोक सर्व्साधारणपणे अशक्य "पिचलेले" असतात म्हणून नाही.

-आदित्य जोशी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"दो दिलों का मिलन" असे सुन्दर वर्णन आपल्याकडे करतात. "दिल"ला लिन्गभाव नाही, ही किती सुन्दर गोष्ट आहे.

वा! सही कहा आपने. शरीरातील ६ महत्वच्या चक्रांपैकी, आपण कोणत्या चक्रावर आपली नाती आणून ठेवायची ते आपल्याच हातात असतं. "मूलाधार" चक्र हे अगदी खालती गुदद्वार आणि गुप्तांगाच्या मधे असते तर अनाहत चक्र हे हृदयापाशी असते.
प्रत्येक नातं हे मुलाधारापर्यंत जर सिमीत करायचे की त्याला पुढे पुढे नेत ते अनाहतापर्यंत विकसित करायचे, हे आपल्यावरच अवलंबुन असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमुक, तो पक्षी तारेवरून उडून चाललाय की आत्ता थव्यात येतोय? दोन्ही अर्थ लावता येतायत आणि हो, हे देखिल चित्र सुंदर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद.
पक्षी उडून चालला आहे. (तारा काटेरी आहेत हे बहुधा स्पष्ट दिसत नाही आहे. कदाचित अधिक मोठ्या आकारात अर्थ साहजिक कळला असता.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे खरच की! अमुक मस्त आहे चित्र. खूप अर्थपूर्ण. म्हटला तर एकटा पडलेला पक्षी, म्हटली तर भरारी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रामाणिक आणि मनमोकळी मुलाखत आवडली. मुलाखत घेणार्‍या चमूचेही आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद मिहिर!

-आदित्य जोशी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुलाखत भारि आहे. पट्लि. पण शिर्षक थोड उथळ वाटल. एव्ढ्या धाडसि आणि अप्रतिम मुलाखतिला न्याय देत नाहि. पण तो दुय्यम मुद्दा आहे हे मान्य

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

अहो, ऑस्कर वाइल्डनं* म्हटलं आहे ना, "नावात काय आहे?!" Wink

गंभीरपणे: आवडीनिवडी सापेक्ष हे खरंच. पण तरीही मला उलट हे शीर्षक चपखल वाटलं. तुम्हांला का बुवा उथळ वाटलं हे शीर्षक? आपण प्रेम ही काहीतरी उच्चार न करण्याची ("...'तुमचं आहे का?' असं विचारतो आपण. प्रेम हा शब्द नाही वापरत... " (पाहा: वरील मुलाखत!)), उथळ गोष्ट मानतो, म्हणून तर नाही?

***
*श्रेयाव्हेरः ही अफलातून कोलांटी सलिल (लि र्‍हस्व) यांजकडून ऐकलेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सुरूवातीला हे शीर्षक मला थोडं गोंधळलेलं वाटलं.

लेखाचा एकंदर रोख, मुख्य मुद्दा, एलजीबीटीक्यू आणि एकंदरच लैंगिकतेबद्दल बोला, त्यातून आजूबाजूच्या लोकांचं प्रबोधन होईल, असा वाटला. त्यातून मुंबईचा, आयआयटीत शिकणारा आदित्य (आणि या वर्गातले लोकही) "मला बी प्रेम करू द्या की रं" अशी भाषा वापरत नाही. पण तरीही हे शीर्षक आवडलं, कारण तो भारतीय भाषांमधून या विषयावर बोललं जावं, त्याबद्दल काम करावं, असंही म्हणतो. शिवाय शीर्षकातून, एलजीबीटीक्यू असणं हे काही शहरी फॅड नाही असंही सुचवलं जातं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे टायटल मी सुचवले होते. " काठी न घोन्गडे घेउ द्या की रं...." च्या चालीवर...आवडले नसल्यास, माझी चूक आहे! Smile

-आदित्य जोशी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आदित्य आपली मुलाखत आवडली. बर्‍याच शंकांचं निरसन झालं अन मुख्य हे लक्षात आलं की समलैंगिक संबंधांचा गाभा प्रेम असतो/असू शकतो. हा विचार खूप नवा वाटला अन आवडला.
____
अमेरीकेत मी आतापर्यंत ३ (उघड) गे लोक पाहीले. तीघेही कॅलिफोर्नियात. पैकी दोघांचा अनुभव तितकासा चांगला आला नाही. तीसर्‍या मनुष्याशी संबंधच आला नाही. आता या दोघांबद्दल बोलू यात - एक जण स्वतःच्या लैंगिकतेबद्दल ऑबसेसिव्ह अन अति-व्होकल होता. म्हणजे ऑफीस पार्टीत सगळे टेबलवर बसले असताना उगाचच मी गे आहे हे त्याने मोठ्यांदी मला सांगीतले होते. अन मी मनात म्हटले होते "टेल मी इफ आय गिव्ह अ डॅम!!! " अन ते खरं ही होतं मी काय करु नाचू? हेच माझ्या मनत आले होते. सांगायचा मुद्दा हा तुझी आयडेंटिटी भले "गे" असेल, माझ्या काठीनी कशाला साप मारतोस? अन हेच इन्ट्युशन पुढे खरं ठरलं ते येडं मला सांगू लागलं - ह्म्म मग भारतात किती गे असतात? तू तिथे जाशील तेव्हा कोणत्या दृष्टीने पहाशील? तू त्यांना स्वीकारशील का?
बरं हा कॅनेडीयन मनुष्य अतिशय अत्यंत रेशिस्टही होता. त्यामुळे मला अप्रिय होता. ऑफीसमधील एक प्रकल्प पूर्ण झाल्याचे सेलिब्रेशन म्हणून ३ पुरुष व मी अशा टीमला तो एका गे रेस्टॉरंटात घेऊन गेला. मी मनात म्हटलं "अरे बावळटा आधी प्रोफेशनल हो. मग तुझा झेंडा मिरव."
असो.
दुसरा गे मनुष्य होता तो बायकांकडे "रायव्हल" या दृष्टीने पहात असे, असा अनुभव आला. उगाच बायकांना कमी लेखणे आदि प्रकार घडत.
____
सगळे असे असतीलच असे नाही. पण माझे अनुभव इथे नमूद करणे इष्ट समजते. बाकी ती मुलगी "पचकली" ही तुमची "तरुण भाषा" त्याबद्दल मला विचारायचं आहे की तुमचं जजमेन्ट चुकलं असं नाही तुम्हाला वाटत? इतक्या नाजूक गोष्टीचे सुतोवाच करण्याकरता तुम्ही तरी विचारपूर्वक निवड केलीत का? अन मग यात चूक त्या मुलीची की तुमची?
_________
वरती म्हटल्याप्रमाणे, आपल्या मुलाखतीतून बर्‍याच शंका दूर झाल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या माहितीतही लैंगिकतेबद्दल ऑबसेसिव्ह असणारे अतिव्होकल लोक आहेत. बारमध्ये, बॅटमिंटन कोर्टवर, कामाच्या ठिकाणी, लेक्चर ऐकत असताना, दुकानात खरेदीला गेलं असताना ... अशी कोणतीही जागा सोडलेली नाही जिथे या लोकांनी आपली लैंगिकता उघड केली नाही. किती बोलतात हे लोक लैंगिकतेसंदर्भात! सुदैवाने हे सगळे लोक माझे मित्र होते, आणि समोरून दिसणारी एखादी मुलगी, स्त्री त्यांना किती आकर्षक वाटते याबद्दल ते बोलत होते. पण ते माझ्याशी इतर मुलींबद्दल बोलत असताना "टेल मी इफ आय गिव्ह अ डॅम!" असं काही मला वाटलं नाही. मला वाटलं, हे माझेच मित्र आहेत. यांनाही यांच्या काही भावना, नैसर्गिक उर्मी वगैरे आहेत. त्याबद्दल कोणाला judge करणं योग्य नाही. शिवाय आत्ता यांनी माझ्यासमोर त्या मुलींबद्दल काही कॉमेंट्स केल्या नसत्या तर मला तर हे गे वाटले असते. मग कित्ती बदनामी झाली असती त्यांची माझ्यासमोर!

आता या मित्रांनी माझ्यासमोर अशा कॉमेंट्स, मला मैत्रीण समजून, केल्या. त्यांची नावं आणि त्या कॉमेंट्स मी इथे पचकले तर पुन्हा कोणी माझ्यासमोर आपली गुपितं उघड करेल का?

आणि बायकांना कमी लेखायला मनुष्य गे असण्याची काय गरज आहे. बायका आणि एलजीबीटीक्यू लोकांना कमी लेखण्याची उदात्त परंपरा जागतिक आहे असं वाटत नाही का?

बोले तो, तुम्हाला भेटलेले हे लोक कोणासोबत बेडरूममध्ये जातात याचा त्यांच्या अन्य वर्तनाशी संबंध लावण्याचं कारण काय?

---

प्रतिसादातला आशय पटला असेल, नसेल तरीही एखाद्या प्योर व्हेज हॉटेलात तुला घेऊन जाईन, दिवाळी पार्टी म्हणून. मी शाकाहारी आहे याचा झेंडा मिरवते असं म्हणत असेल कोणी तर म्हणू देत ब्वॉ. मला नाही लाज वाटत माझ्या शाकाहारी सवयींची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्या जॉबवरचा माझा २ रा दिवस होता. मी ट्रेनिंगमध्ये होते. हा मनुष्य माझा मित्र तर नव्हताच सहकारी होता. तेही मॅनेजर सॉर्ट ऑफ. २ र्‍या दिवशी नवीन सहकार्‍यापुढे आपली लैंगिकता उघडी करावी याचं आश्चर्य अन मूर्खपणा वाटला तो मला. त्याचा हेतू हाच होता की १०-१५ लोकांच्या त्या ग्रुपमध्ये ओरडून सांगणे की तो गे अहे. नंतरही या "तावातावाने स्वतःचे गे पण" सांगणारी वृत्ती सतत दिसत राहीली. माझ्या मनात अढी आहे या लोकांबद्दल. मला वाटतं ते स्त्रीद्वेष्टे असतात कारण या २ उदाहरणांपलीकडे मी अन्य पाहीले नाहीत.
पण एक अपवाद आहेत इथले ऐसीवरचे एक सदस्य. संतुलित, अभ्यासपूर्ण लेखन अन सतत स्वतःची लैंगिकता हाच विषय न चघळणे. किंबहुना ते नसते तर माझी ही अढी अधित तीव्र असती. या सदस्यांमुळे निदान अन्य गे व्यक्तींना बेनेफिट ऑफ डाऊट द्यावासा वाटतो. अर्थात माझ्या सर्टिफिकेटकरता कोणी तिष्ठत उभे नाहीत हेही मला माहीत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रिय अपुली-गपुली,

१) मी स्त्री-द्वेश्टा मुळीच नाही. सगळे कोब्रा चिक्कू नसतात. सगळे गे स्त्री-द्वेश्टे नसतात! माय क्लोसेस्ट फ्रेन्ड्स आर विमेन. इन फेक्ट, गे मेन मेक अमेझिंग फ्रेन्ड्स टू "अ कपल" - विमेन आणि देयर हस्बन्ड्स बोथ.माझ्या इन्ग्रजी लेखातील एक वाक्यः (दुवा वर आहे) As for them, I am the guy who drinks beer with them and goes shopping with their girlfriends!

२)
तुमची कमेंन्ट एका अर्थी मला पटते - दुसर्याला बोर करण्यासाठी सारखे शो माण्डू नये. तुम्ही सान्गितलेल्या गोष्टींचे साधर्म्य पुलंच्या "आमच्या वेळी असे नव्हते" हे वारंवार ऐकवणार्या लोकान्प्रमाणे वाटते, हे नक्की. दोन्ही वाक्य जास्त वेळा ऐकली तर बोर होणॅ सहाजिक आहे.
पण... ह्या सीचुएशन्चा एक दुसरा पैलु ही आहे. तुम्ही ज्या न्यायाने "आय डोन्ट गिव अ डम्न" म्हणता, तसेच...

"माझ्या नवर्याने काल माझे पाय चेपुन दिले", "माझी मुलगी खूप छान गाते", "माझ्या लग्नाचा दहावा वाढ दिवस आहे आज. मी आज लवकर घरी जाणारे", हे मला सान्गितले तर मी "व्हाय आर यू फोर्सिन्ग यूवर स्ट्रेट्नेस्स ओन मी? ठीक आहे, तू स्ट्रेट आहेस, पण हे सारखे सारखे सिद्ध का करायला हवे?" असे म्हणणे बरोबर ठरेल का? मग कित्पत बोलणे म्हण्जे "केझुअल" आणि किती म्हणजे टू मच ह्याचा फैसला कोणी करावा?

तुझ्या सम्पर्कात आलेल्या गे लोकांनी अती केले असेलही. मी ते मुळीच नाकारत नाही. असतात काही लोक तसेच. पण सगळ्या गे लोकांना "डोन्ट स्क्रीम युवर सेक्षुआलिटी फ्रोम रूफ टौप बरं का!!!!!!!!!!!!!!" असा सरसकट उपदेश देणे बरोबर नाही, असे मला वाटते.

मी गे असल्याचे मी एका जोब इन्टर्व्यु मध्ये सान्गितले. कारण मला नन्तर "डिस्क्रिमिनेशन" नको होते. त्यामुळे कोणी कधी स्वतः गे असल्याचे सान्गावे हा ज्याचा त्याच प्रश्न आहे.

-आदित्य जोशी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्या सविस्तर प्रतिसादाबद्दल आभीरी आहे. प्रतिसाद आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्त्रीने माझा नवरा हा उल्लेख तिचे भिन्नलिंगी ओरीयेण्टेशन दाखवणारा असू शकतो पण मुले,लग्नाचा वाढदिवस हे उल्लेख कुणीही करू शकते. परदेशात गे स्त्री-पुरुषही करतात. भारतात गे लग्नाला कायदेशीर मान्यता नाही म्हणून भारतीय स्त्री माझी बायको असा उल्लेख करू शकत नाही (केला तरी तो अयोग्य ठरेल). पण भारतात ही काही लेस्बियन स्त्रियांना मुले असतात, त्यांना लग्नाचे (रिलेशनशिपचे) वाढदिवस असतात. त्या ह्या सगळ्या गोष्टी बोलू शकतात. आपला मुद्दा योग्य असला तरी उदाहरण पटत नाही.

परदेशात नवरा/बायको असे उल्लेख टाळावे अशी पॉलिसी अनेक ऑफिस मध्ये असते. पार्टनर, स्पाउस वापरावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला काही स्त्रिया दिसतात; तावातावाने आपलं स्त्रीपण दाखवणाऱ्या, मेकपचे थर, रंगीबेरंगी कपडे, सातत्याने केस-कपडे सावरत रहायचे ... आणि काही पुरुष माहीत आहेत जे आपलं 'पुरुषत्व दाखवण्यासाठी' दाढी-मिश्या वाढवतात, मिशांवर ताव भरतात, दाढी कुरवाळत बसतात ... पण मला त्यांचं "तावातावाने लिंगभाव दाखवणं" अंगावर येत नाही.

आपलं स्त्री, पुरुष असणं जितकं नैसर्गिक आहे तेवढंच गे लोकांचं गे असणं (किंवा लेस्बियन, ट्रान्सजेंडर, बायसेक्शुल, क्विअर असणं) आहे.

याच दिवाळी अंकात 'मल्लिकाचा किस' ही कथा लैंगिकतेबद्दलच आहे ... पण ती स्ट्रेट पुरुषांची लैंगिकता आहे. त्याबद्दल बोलताना मात्र "अनोळखी वाचकांसमोर लैंगिकता उघडी करणं याचं आश्चर्य अन मूर्खपणा वाटत" नाही. स्ट्रेट लैंगिकता चघळली तर कथेचं स्वागत होतं पण एलजीबीटी लोकांनी लैंगिकता चघळली तर मात्र अढी!

स्टीरीओटाईप, सरसकटीकरणाचे साचे कसे बनवले जातात, याचं उदाहरण म्हणून मला हा प्रतिसाद "आवडला".

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हेच लिहायला आले होते.

लैंगिकतेचं आपल्याला आधीच वावडं. आणि त्यातही ती स्ट्रेट नसेल, तर मग झालंच. अब्रह्मण्यम. त्यांच्या वर्तनाची चिकित्सा करायला आम्ही सगळ्यांत पुढे. सुदैवाने आम्ही चौकटबद्ध आणि त्यातही स्ट्रेट असल्यामुळे आम्हांला तो जन्मदत्त अधिकार.

अवांतरः

बादवे, आपण आज-आत्ता स्ट्रेट आहोत आणि त्यामुळे मुख्य प्रवाहात आहोत हे ठीकच आहे. पण उद्या आपल्याला आपल्याच लिंगाच्या एखाद्या व्यक्तीबद्दल अनिवार आकर्षण, अपार प्रेम वाटणारच नाही, याची खातरी लोक कुठल्या आधारावर बाळगूत फिरतात, ते कळत नाही. माझी तर आसुरी म्हणावी अशी इच्छा आहे, अशा प्रकारचे आकर्षण या व्यक्तींना अनुभवायला मिळावे. मग सगळ्या नैतिकतांचे तराजू काय सांगतात, त्याचे विश्वरूपदर्शन घडेल. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

माझी तर आसुरी म्हणावी अशी इच्छा आहे, अशा प्रकारचे आकर्षण या व्यक्तींना अनुभवायला मिळावे. मग सगळ्या नैतिकतांचे तराजू काय सांगतात, त्याचे विश्वरूपदर्शन घडेल. असो.

कट्टर डाव्यांना, मार्क्सिस्टांना, अ‍ॅनार्किस्टांना आणि सेकुलरांना उजव्या विचारसरणीचा साक्षात्कार व्हावा अशी आसुरी इच्छा असणे आणि वरील इच्छा यात फारसा फरक दिसत नाही. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बादवे, आपण आज-आत्ता स्ट्रेट आहोत आणि त्यामुळे मुख्य प्रवाहात आहोत हे ठीकच आहे. पण उद्या आपल्याला आपल्याच लिंगाच्या एखाद्या व्यक्तीबद्दल अनिवार आकर्षण, अपार प्रेम वाटणारच नाही, याची खातरी लोक कुठल्या आधारावर बाळगूत फिरतात, ते कळत नाही.

बादवे, आपण आज-आत्ता डावे/लिबरल/सेकुलर/सूभ्रमन्नम आहोत आणि त्यामुळे मुख्य हुच्चभ्रू प्रवाहात आहोत हे ठीकच आहे. पण उद्या आपल्याला उजव्या/काँझर्व्हेटिव्ह विचारसरणीबद्दल अनिवार आकर्षण, अपार प्रेम वाटणारच नाही, याची खातरी लोक कुठल्या आधारावर बाळगूत फिरतात, ते कळत नाही.

तेव्हा दोहोंतील खात्री सारख्याच प्रकाराची/तीव्रतेची असेल असे म्हणता यावे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझ्या अशा विश्वासाच्या आधारावर मी माझ्यापेक्षा निराळी मनोभूमिका असणार्‍यांशी थेट सामाजिक भेदभाव केला असता, तर तुझं म्हणणं योग्य ठरलं असतं. एरवी नाही. याहून पुढे चर्चा (वाद, भांडण, हमरीतुमरी, व्हॉटेव्हर) करायची असल्यास खरडवहीत करू या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मी फक्त दोन्ही केसेसमधल्या खात्र्यांचं सामांतर्य (धन्यवाद धनंजय) अधोरेखित केलं. बाकीचे मुद्दे मध्ये न आणता त्यात काही चूक असल्यास सांगावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अपर्णाच्या प्रतिसादावर अतिशय मार्मिक व संयत प्रतिसाद आदित्यने दिला आहेच!

तरी तुझा आणि आदितीचा लगेच हे "स्टीरीओटाईप, सरसकटीकरणच" आहे असा यावर हिरिरीने प्रतिसाद आला म्हणून हे उत्तर!

मला जर कोणी जुजुबी ओळखीवर मी "गे" आहे हे सांगायला आले तर मलापण वैताग येईल. माझ्या जवळच्या व्यक्तीने सांगितले तर नाही! (माझ्या ओळखीत अजूनतरी कोणी गे अथवा लेस्बियन नाही)

हाच वैताग - आपण छान दिसतो म्हणून मुरडणार्‍या, स्वतःच्या छान दिसण्याचे भांडवल करू पाहणर्‍या मुली, दिसताक्षणी एम सी पी टाइप म्हणून ओळखू येणारे पुरूष, आपण लैला-मजनूच आहोत अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी गळ्यात गळे घालणारी जोडपी व अशा अन्य अनेक गोष्टींनी येतो.

आणि तू जे बोललीस आता त्याबद्दल!

आज जर मी स्वतःला प्रश्न विचारला माझे कोणावर निस्सिम प्रेम आहे तर पहिले नाव माझ्या मैत्रिणीचे येते. सर्वात जास्त मी कोणावर प्रेम केले याची क्रमाने यादी बनवायची ठरवली तर नंतरची दोन तीन नावे पण मैत्रिणींची येतील ज्यांच्याबद्दल मी त्या त्या काळात वेडी होते.

- मी मुलांकडे पाहाते पण माझे लक्ष मुलींकडे जास्त असायचे आणि असते (आणि हे फक्त कपडे आणि दागिन्याच्या फॅशनकरता नसते)
- जेव्हा मी माझ्या त्या त्या वेळच्या आणि (आताच्या कायमच्या) प्रिय मैत्रिणीच्या सानिध्यात असायचे, मला नक्कीच माहित होते - आय युज्ड टू बी इन अ टर्न्ड ऑन स्टेट!
- पण मग मी शारिरिक पातळीवर या प्रिय मैत्रिणींच्या कितपत जवळ गेले तर आलिंगन व हात हातात धरणे यावर मला कधी जावेसे वाटले नाही.
- सिडने शेल्डनचे ब्लडलाइन (वा नेकेड फेस - आठवत नाही) हे वाचले असेल तर त्यातल्या नायिकेला जसे स्वत:चे सेक्श्युअल ओरिएन्टेशन एका प्रसंगातून कळते त्याच प्रकारचा अनुभव पौंगडावस्थेत एक्दा आल्यावर मला मी स्ट्रेट आहे हे नक्की माहित झाले होते.

मला स्वत:ला असे वाटते, एखाद्या माणसाबद्दल प्रेम असणे/आकर्षण वाटणे आणि एखाद्या (जेंडरच्या) माणसाशी सेक्श्युअल रिलेशनशिप असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सहसा त्या बरोबर जातात पण तो काही नियम नाही, असू नये!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

मी या मुलाखतीच्या कामात सहभागी असल्यामुळे काही प्रश्नांवर मी उत्तरणं योग्य वाटलं नव्हतं, म्हणून तो मोह आवरला होता. पण हे थेट मला उद्देशून आहे. त्यामुळे इथे उत्तरलं पाहिजे. तुझं मोकळं, व्यक्तिगत स्वरूपाचं उत्तर वाचून बरं वाटलं. मात्र मी तुझ्याशी सहमत नाही.

आपल्या लैंगिकतेबद्दल कुणीही काहीही सांगितलं, तरी मला अवघडल्यासारखं होत नाही. त्याची कारणं तीन.

एक म्हणजे: आपल्याकडे लैंगिकता हा दडपला गेलेला विषय आहे. त्याबद्दल बोलणं टॅबू. वाचणं म्हणजे काहीतरी लाजिरवाणा गुन्हा करण्यासारखं. लिहिणं आणि पुढाकार घेऊन कृती करणं म्हणजे तर... अब्रह्मण्यम. या सामाजिक पाबंदीचे अनेक तोटे असतात. शारीरिक (शरीरव्यवहार, शरीरसंबंध, स्वच्छतेची गरज, रोगप्रसार यांबद्दलचे घोर गैरसमज), मानसिक (इच्छा दडपण्यातून आणि लादण्यातून येणारे ताणतणाव, खंती, गंड) आणि सामाजिक (विनयभंग आणि बलात्कार, पुरुषांवरची अपेक्षांची ओझी, मुलगा हवा हे दडपण). या बंदीला माझा विरोध आहे. म्हणून.

दुसरं कारण म्हणजे: समलिंगी (आणि उभयलिंगी, तरललिंगी) लोकांवर ही दडपणं त्याहून अधिक. त्यांना स्वतःशी गोष्टी मान्य करण्यासाठीही खूप झगडे करावे लागतात. अशा झगड्यानंतर त्यांना हे कोणत्याही परिचयाच्या सुरुवातीला एस्टॅब्लिश करावंसं वाटलं आणि त्यातून पुढचे संभाव्य अनावश्यक अपमान, दुखावलं जाणं, अपेक्षाभंग... टाळावेसे वाटले, समोरच्या व्यक्तीच्या मनोभूमिकेची माहिती आधीच करून घ्यावीशी वाटली, तर मला ते रास्तच वाटतं. त्यातून कितीतरी ताकद वाचत असणार, नक्कीच. भिन्नलिंगी मैत्य्रा करतानाही दुसरी व्यक्ती आणि मी एकाच फूटिंगवर असू, तर पुढे बराच त्रास टळतो, त्याचंच हे वाढीव स्वरूप आहे. त्यातून जी मानसिक आश्वस्तता मिळते, ती त्यांनाच काय, आपल्या सगळ्यांनाच मिळावी, असं मला वाटतं. म्हणून.

तिसरं आणि त्याहून महत्त्वाचं: आपल्या लैंगिकतेची कल्पना दुसर्‍या व्यक्तीला स्पष्टपणे देणं आणि दुसर्‍या व्यक्तीवर शाब्दिक-शारीरिक-सामाजिक आक्रमण करणं - या दोन गोष्टींमध्ये एक सुस्पष्ट रेषा असते. ती मला ओळखता येते. पलीकडल्या माणसाला मी ती ओलांडू देणार नाही, असा मला आत्मविश्वास आहे. त्यामुळे आक्रमणाला भिऊन त्या रेषेच्या आसपासही फिरकायला नको... असं म्हणून अनेक नवीन माणसं आणि अनुभव सोडून द्यावेत, असं मी आता मानत नाही.

परिणामी लैंगिकतेचा उच्चार म्हणजे माझ्या स्पेसवर आक्रमण असं मी मानत नाही.

पुरवणी: केवळ भिन्नलिंगी व्यवहार म्हणजेच नैसर्गिक, योग्य, आरोग्यपूर्ण आणि अपरिहार्य अशी समजूत असेल, तर वरची भूमिका घेणं जड जातं असं दिसतं. किंबहुना दुसर्‍या बाजूला चुकून - आवर्जून - योगायोगानं - नैसर्गिकपणे - काही काळाकरता पाय टाकलेले लोक अधिक खुले, स्वीकारशील, समजूतदार असतात, असाही अनुभव. वर व्यक्त केलेल्या असुरी इच्छेमागे हा अनुभव आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कारण क्रमांक २ व पुरवणी १००% पटली आहे.

आता या विषयाचा विचार करता माझ्या मनात हा विचार नेहमी येतो जशी तू स्ट्रेट लोकांबद्दल म्हणालीस तसेच वेगळी लैंगिकता असणारे सगळे लोक १००% आप्ल्या या निवडीबद्दलतरी शुअर असतात का? कारण इतर कोणत्याही गोष्टीप्रमाणे वेगवेगळ्या कारणांसाठी ही निवड लोक करतात

१. खरेच नैसर्गिकरित्या कल तसा असणारे

२. कुतुहल म्हणून या वाटेला गेलेले

३. खरेतर प्रेम/आपुलकी हवी असलेले पण ती भिन्नलिंगी व्यक्तीकडून मिळाली नाही व समानलिंगी व्यक्तीकडून मिळाली तेव्हा तेच आपले सेक्श्युअल ओरिएन्टेशन आहे असे समजणारे

४. दुसया कोणत्याही गोष्टीचे फॅड/क्रेझ असते तसे चित्रपट व इतर प्रसिद्धीमाध्यमांतून ह्याबद्दल सतत आल्यामुळे तसे करणारे

क्र.१ प्रकार बद्दल माझे काही म्हणणे नाही

क्र.२ प्रकार सुद्धा जर ही गोष्ट कायम रमण्यासारखी वाटली नाही तर सोडून देतात.

क्र.३ प्रकार बद्दल मात्र मला विचार करावासा वाटतो.

आणि

क्र.४ प्रकार तर थिल्लर असे मी म्हणॆन.

अन्य कोणत्याही कॅटेगरीखाली येण्याआधी सगळे आधी "व्यक्ती" असतात. व्यक्ती प्रगल्भ असते, संवेदनशील असते, सहनशील असते, पोरकट किंवा उथळसुद्धा असते.

स्त्री आहे म्हणजे ती सहनशील, क्षमाशील व अन्याय झालेली असतेच असे नाही, पाताळयंत्री, खुनशी बायका सुद्धा असतात. म्हणूनच कधी कधी स्त्री-मुक्ती या नावाखाली जेव्हा अशा बायकांना सॊफ्ट कॊर्नर मिळतो तेव्हा ते चूकच असते.

त्याचप्रकारे गे/लेस्बियन आहेत म्हणजे बाय डिफॊल्ट ते संवेदनशील, गांजलेले किंवा कुचंबणा झालेले असतात हेही सरसकटीकरण नकोच व त्यांनी स्वत:ची एखाद्या व्यक्तीशी जुजुबी ओळख असताना व्यक्त केलेली लैंगिकता दरवेळी तू सांगितलेल्या कारणांसाठी असतेच असेही नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

आपल्या लैंगिकतेबाबतचा निर्णय फक्त आणि फक्त आपला स्वतःचा असतो. त्यामुळे कॅटेगर्‍या करून त्यांना कमीजास्त मान्यता देण्याशी मी पुन्हा एकदा असहमत आहे.

बाकी कुणालाच कसलाच गैरफायदा मिळू नये, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. ती तर पूर्वअटच आहे. मग तुमची लैंगिकता कोणतीही असो. हा गैरफायदा मिळू न देण्यात कारण क्रमांक ३ महत्त्वाचं ठरतं. कोणत्याही लिंगाची व्यक्ती माझ्या स्पेसवर आक्रमण करत असेल, तर ते गैरच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

किन्सी स्केलबद्दल तुम्हाला माहीत असेल असं गृहीत धरते.

मुळात मेघना आणि मी दिलेले प्रतिसाद एकाच कारणासाठी आहेत -
कोणी नैसर्गिकरित्या ठराविक पद्धतीचे असतील नाहीतरी टोकाच्या स्त्रीवादातूनही समलैंगिक बनलेल्या असतील, कोण-कोणाबरोबर झोपतं आणि कोण-कोणावर प्रेम करतंय, याच्याबद्दल 'थिल्लर आहे', 'मच्युअर आहे' छापाचं भलंबुरं बोलणारे आपण कोण? आणि कोण-कोणाबरोबर झोपतं किंवा किन्सी स्केलनुसार ०-६ मध्ये कुठेही असण्याचा त्यांच्या प्रगल्भ, संवेदनशील, सहनशील, पोरकट किंवा उथळ असण्याशी संबंध काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१) मेघनाच्या कारण क्रमांक एक आणि तीन मुद्द्यांबद्दल काय असहमती आहे?

कुतुहल म्हणून या वाटेला गेलेले, खरेतर प्रेम/आपुलकी हवी असलेले पण ती भिन्नलिंगी व्यक्तीकडून मिळाली नाही व समानलिंगी व्यक्तीकडून मिळाली तेव्हा तेच आपले सेक्श्युअल ओरिएन्टेशन आहे असे समजणारे, दुसया कोणत्याही गोष्टीचे फॅड/क्रेझ असते तसे चित्रपट व इतर प्रसिद्धीमाध्यमांतून ह्याबद्दल सतत आल्यामुळे तसे करणारे

२) ही तुमची निरिक्षणे आहेत की तुम्ही हे कोठे वाचले आहे? माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत उपलब्द्ध असलेल्या संशोधनानुसार समलैंगिकतेच्या ऊर्मी निसर्गदत्त असतात, मागे धनंजयचाही एक लेख याविषयी वाचला होता.
३) समलैंगिक व्यक्तींना इतक्या प्रकारच्या हेटाळणीला आणि कुचेष्टेला सामोरे जायला लागते की कोणी फॅड्/क्रेझ म्हणून समलैंगिक बनत असेल हा तर्क विचित्र वाटत नाही का?
४)प्रसिद्धीमाध्यमे आणि चित्रपट यातून आल्यामुळे आपली लैंगिक ओळख दडपून टाकलेले समलैंगिक ती ओळख उघड करत असतील तर त्याला फॅड/क्रेझ म्हणणे अन्यायकारक वाटत नाही काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गे ऑर नॉट गे हे नैसर्गिक असतं असं म्हणतात खरंच.

पण

http://www.aisiakshare.com/node/3378#comment-79031

इथे 'टोकाच्या स्त्रीवादापायी समलिंगी बनलेल्या स्त्रिया' इ.इ. वाचून तसा ग्रह होणे स्वाभाविक नाही काय? हां आता याला पुष्टिकारक विदा असेल तर पहायला आवड्डेलच म्हणा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्याच प्रतिसादातला 'किन्सी स्केल'चा दुवा वाचला असेलच.

राजकीय, आर्थिक कारणांसाठी लोक पूर्वी पाच-सात लग्नं करायचे, अजूनही लोक सोयीची लग्नं करतात तशाच अमेरिकेत, दुसऱ्या स्त्रीवादी लाटेतल्या काही स्त्रिया फक्त समलिंगी संबंध ठेवत. (त्यातल्या काही मुळातच समलैंगिक होत्या.) पण ठरवून कोणी समलिंगी बनत असत, ही शब्दरचना, आकलन चुकीचं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'टोकाच्या स्त्रीवादापायी समलिंगी' ही शब्दयोजना तर तेच सुचवते. तेव्हा तसं जर म्हणायचं नसेल तर दोष त्या बेशिस्त शब्दयोजनेचा आहे, आकलनाचा नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत उपलब्द्ध असलेल्या संशोधनानुसार समलैंगिकतेच्या ऊर्मी निसर्गदत्त असतात

माझ्या माहितीही अशीच आहे.
पण मेघनाचा

किंबहुना दुसर्‍या बाजूला चुकून - आवर्जून - योगायोगानं - नैसर्गिकपणे - काही काळाकरता पाय टाकलेले लोक अधिक खुले, स्वीकारशील, समजूतदार असतात, असाही अनुभव. वर व्यक्त केलेल्या असुरी इच्छेमागे हा अनुभव आहे.

हा प्रतिसाद वाचला. अधिक खुले, समजूतदार होण्यासाठी काही काळासाठी आवर्जून समलैंगिक व्यवहार करून पाहणारे विषमलैंगिक असतील ब्वॉ!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समजूतदार होण्यासाठी आता पोरी सोडून पोरांमागे फिरले पाहिजे हा नवीन शोध लागला आता. समजूतदारांचा समजूतदारपणा त्यांना लखलाभ असो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

२००९ च्या आसपास समलैगिंकतेच्या बाजूने कोणतातरी कोर्टाचा निर्णय लागला होता (मला डिटेल्स माहित नाहीत) तेव्हा जरा चॅनेल्स सर्फ करायला पाहिजे होते तुम्ही!

मी केला आणि बरेच लोक जल्लोष करताना दाख्वत होते, कॅमेरासमोर विवाह करत होते इत्यादी.. ते लोक थिल्लरच होते!

प्रसिद्धीमाध्यमे आणि चित्रपट यातून आल्यामुळे आपली लैंगिक ओळख दडपून टाकलेले समलैंगिक ती ओळख उघड करत असतील तर त्याला फॅड/क्रेझ म्हणणे अन्यायकारक वाटत नाही काय?

- घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्यात रासभरोहणं . येन केन प्रकरेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्.

हा विचार इकडे लावून बघा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मी मुळीच सहमत नाही. शक्य असेल तर, जरा ह्रुदयापासून विचार करून पहा.

मुलीच्या पाठवणीच्या वेळेस आईच्या डोळ्यात येणारे अश्रू आणि आयुष्यात पहिल्यांदा आपल्या प्रेमाबद्दल मान्यता मिळालेली ऐकून अनावर होणारे लोक ह्यातील साधर्म्य लक्शात येउ शकेल क?.

गणपतीच्या मिरवणूकीत दारु पिउन नाचणारे थिल्लर? की अमुक राजकारणी गेला म्हणून इस्पितळात तोड्फोड करणारे थिल्लर? की प्रेमाला पहिल्यांदा मान्यता मिळाली म्हणून आनंद व्यक्त करणारे थिल्लर?

गे आणि स्ट्रेट, दोनीही लोकांबरोबर सम्पर्कात असल्याने ह्या दोन गोष्टींमधली समानता मला सहज लक्षात येते. गे असल्याने मला लोकांच्या भावना समजणे आणि त्या भावनांचा आदर करणे सोपे वाटते. "२५-३० वय झाले की लग्न होतेच. आपोआप", अशी विचारसरणी असणारे लोक माझ्या ह्या कमेंट्ला समजून घेण्याचा प्रयत्न करुन पाहतील का?

-आदित्य जोशी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तेव्हा मी जितके पाहिले त्यात दोन समलिंगी पुरूष, पैकी एक अगदी पंजाबी ड्रेस, ओढणी इत्याही घेऊन आलिंगने, चुम्माचाटी (शब्द साभार तात्या) इत्यादी कॅमेराला दाखवून दाखवून करत होते. समलिंगी लग्नाला परवानगी - हे वाक्य स्क्रीनवर दहा वेळा दाखवत असताना हार वगैरे घालून पैकी एकाने अगदी वधूची घुंगट उचलणे प्रकार करतात तसा त्याचा साथीदाराचा उचलला. आणि कमी अधिक फरकाने अशाच प्रकारच्या जोड्या जल्लोष करताना मी किमान दोन-तीन चॅनेलवर पाहिले.

हा प्रकार फक्त आणि फक्त थिल्लरच होता.

ह्यात खरे प्रेम, आनंद किती आणि येन्केन प्रकारेण कॅमेरासमोर येणे किती?

आणि त्याच न्यायाने
- आयपीएस अधिकार्‍याने स्वतःला मीरा म्हणवून घेत लेंहंगा/घुंगट घेऊन फिरणे
- तुम्ही वरती दर्शविलेले गणपतीच्या मिरवणूकीत दारु पिउन नाचणारे
- अमुक राजकारणी गेला म्हणून इस्पितळात तोड्फोड करणारे

हेही प्रकार माझ्या लेखी थिल्लरच आहे. त्यात मी समलिंगी/विषमलिंगी हा भेद करत नाहीये.

जेन्युईन आनंद झालेले पण असतीलच आणि कॅमेरा आसपास आहे की नाही याची फिकिर न करता स्वतःचा आनंद व्यक्त करणारे लोकही असतील - त्यांना मी "मुलीच्या पाठवणीच्या वेळेस आईच्या डोळ्यात येणारे अश्रू " याच्याशी थोडेफार रिलेट करू शकेन. वरचे प्रकार नाही.

माझे म्हणणे इतकेच - समलिंगी मनुष्य आहे - तो स्वतःची लैंगिकता समोरच्याला सांगतो आहे - म्हणजे तो कुचंबणा झालेला संवेदनशील व्यक्ती बाय डिफॉल्ट आहे आणि त्यामुळे त्याच्या अभिव्य्क्तीचा आदर करा - हे सरसकटीकरण नको.

सर्व प्रकारच्या व्यक्ती सर्व प्रकारच्या समूहात असतात. समोरची व्यक्ती बघून अमुक वर्तनाबद्दल आदर ठेवणे, दुर्लक्ष करणे किंवा टिका करणे यापैकी किंवा अजून दुसरा कुठला पर्याय मी अनुसरेन. त्या व्यक्तीला लागलेले - विशिष्ट जात्/समाज,स्त्री/पुरूष,विषमलिंगी/समलिंगी हे लेबल बघून नव्हे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

अवांतर आहे.

सविता, थिल्लरपणा (तुझ्या, माझ्या वा कुणाच्याही व्याख्येनुसार) आणि एका विशिष्ट व्यक्तिसमूहाच्या भावना (थिल्लर वा कशाही) व्यक्त करण्यावर बंदी या दोन्हीत कमी गंभीर काय आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आदित्य, प्रतिक्रिया आवडली. किंचित भर घालावीशी वाटते.

गे असल्याने मला लोकांच्या भावना समजणे आणि त्या भावनांचा आदर करणे सोपे वाटते.

दडपशाहीविरोधात लोकांच्या भावना समजणे, त्यांचा आदर करणे यासाठी गे असण्याची गरज नाही.

मार्टिन निमलरच्या "First they came for ..."चा अर्थ समजण्याचा लैंगिकता, जात, लिंगभाव अशा 'जन्मदत्त निष्ठां'शी काही संबंध नसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

This comment has been moved here.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

याच दिवाळी अंकात 'मल्लिकाचा किस' ही कथा लैंगिकतेबद्दलच आहे ... पण ती स्ट्रेट पुरुषांची लैंगिकता आहे. त्याबद्दल बोलताना मात्र "अनोळखी वाचकांसमोर लैंगिकता उघडी करणं याचं आश्चर्य अन मूर्खपणा वाटत" नाही. स्ट्रेट लैंगिकता चघळली तर कथेचं स्वागत होतं पण एलजीबीटी लोकांनी लैंगिकता चघळली तर मात्र अढी!

परत एकदा वाचकांसमोर लैंगिकतेचं प्रदर्शन मांडाणं वेगळं अन २ दिवसांच्या सहकार्‍यासमोर वेगळं. ही जी मुलाखत आहे ते म्हणजे आदित्यने केलेले अंगावर येणारे त्याच्या सेक्शुअ‍ॅलिटीचे प्रदर्शन असे मला अज्जिबात वाटत नाही अन तीच गोष्ट "मल्लिकाचा किस" बद्दल.
आक्षेप आहे तो कामाच्या ठिकाणी अनाठाइ प्रदर्शनास.

मला काही स्त्रिया दिसतात; तावातावाने आपलं स्त्रीपण दाखवणाऱ्या, मेकपचे थर, रंगीबेरंगी कपडे, सातत्याने केस-कपडे सावरत रहायचे ... आणि काही पुरुष माहीत आहेत जे आपलं 'पुरुषत्व दाखवण्यासाठी' दाढी-मिश्या वाढवतात, मिशांवर ताव भरतात, दाढी कुरवाळत बसतात ... पण मला त्यांचं "तावातावाने लिंगभाव दाखवणं" अंगावर येत नाही.

पुरषांना मेक अप लावू नका असे कोणीही सांगीतलेले नाही. रंङीत कपडे घालू नका, केस वाढवू नकाही सांगीतलेले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लैंगिकतेचे आणि प्रेमाचे प्रदर्शन याबाबतीतले नियम समलिंगी लोकांसाठी वेगळे असावेत की काय? पार्किंग लॉटमध्ये, बागांमध्ये चुम्माचाटी करणारी अनेक भिन्नलिंगी युगुले दिसतात तेंव्हा आम्ही म्हणायचे, "काय रोमँटिक युगुल आहे नाही!", बसमध्ये ट्रेनमध्ये हातात हात घालून बसतात तेंव्हा आम्हाला हे प्रदर्शन वाटत नाही उलट फारच गोड-प्रेमळ वाटतं, आपल्या कपड्यांमधून, केशभूषेमधून भिन्नलिंगी लोक आपली लैंगिकता उघड करतात त्याने आम्ही अजिबात ऑफेन्ड होत नाही पण समलिंगी व्यक्तीने आपली लैंगिकता आपल्याजवळच ठेवावी ही मात्र आमची अपेक्षा का बरे असावी? शिवाय 'हे लोक' असा सगळ्या समलिंगी व्यक्तींना एका माळेत ओवणारा उल्लेख करणे आम्हाला त्यांचा अपमान करणारे वाटत नाही! या सगळ्यावरून "जोपर्यंत तुम्ही आम्हाला तुमच्या लैंगिकतेबद्दल कळू न देण्याची काळजी घ्याल तोपर्यंत आम्ही तुमचे अस्तित्व सहन करू" असा अतिशय सरळ सूर दिसतो जो मला निव्वळ होमोफोबिक वाटतो. मला जगात तीन लाख भिन्नलिंगी लोक माहिती आहेत आणि त्यातले दोन लाख लोक मला वैतागवाणे वाटतात म्हणून बहुतांश भिन्नलिंगी लोक वैतागवाणे असतात असा निष्कर्ष मी काढला तर दोष माझा आहे, लोकांचा नाही.
स्पष्ट बोलल्याने वाईट वाटले असेल तर माफ करा पण मला जे चुकीचे वाटते ते चुकीचे आहे असे सार्वजनिक व्यासपीठावर म्हटले नाही तर नाही तर आपण नकळत त्याला मूक पाठिंबा दिल्यासारखा वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पार्किंग लॉटमध्ये, बागांमध्ये चुम्माचाटी करणारी अनेक भिन्नलिंगी युगुले दिसतात तेंव्हा आम्ही म्हणायचे, "काय रोमँटिक युगुल आहे नाही!", बसमध्ये ट्रेनमध्ये हातात हात घालून बसतात तेंव्हा आम्हाला हे प्रदर्शन वाटत नाही उलट फारच गोड-प्रेमळ वाटतं, आपल्या कपड्यांमधून, केशभूषेमधून भिन्नलिंगी लोक आपली लैंगिकता उघड करतात त्याने आम्ही अजिबात ऑफेन्ड होत नाही

सार्वजनिक ठिकाणी केल्यास अनेकजण या गोष्टींनीही ऑफेण्ड होऊ शकतात, एवढेच नजरेस आणून देऊन खाली बसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरे आहे, लोक फार सहजासहजी कशानेही ऑफेन्ड होऊ शकतात पण भिन्नलिंगी लोकांना त्यासाठी त्रास भोगावा लागतो असे क्वचितच होते; निदान प्रगत देशांत तरी. पण तिथेही समलैंगिक लोकांना फार वेगळी वागणूक मिळते हे तितकेच खरे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सार्वजनिक जागी चाललेल्या, भिन्न लिंगियांच्या चुम्माचाटीबद्दलही मला घृणाच आहे. अगदी खरं सांगायचं तर कोणी बोटं चाटत डोनट खात असेल तर त्याबद्दलही तीच भावना होइल.
त्यामुळे समलैंगिकांच्या ओव्हर्ट अभिव्यक्तीबद्दलच नव्हे तर इन जनरल अशा गोष्टी किळसवाण्या वाटू शकतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दलित साहीत्य जेव्हा नव्याने प्रकाशित होउ लागल तेव्हा त्याच अफाट अस स्वागत अ-दलितां कडुन झाल. दलित लोकांचे आतापर्यंत माहीत नसलेले विश्व त्यांनी भोगलेल्या वेदना याचे जळजळीत वास्तव जस जसे समोर येउ लागले तस तसे. अ-दलितां कडुन त्याला मोठ्या प्रमाणात सकारात्मक रास्त अशी सहानुभुती व पाठींबा मिळाला. मात्र या चळवळीतील लोकांनी पुढे जो आक्रस्ताळेपणा चा सुर लावला व दलित असणच हे जणु काही पुरेस आहे. कींवा तुम्ही आम्हाला समजुच शकत नाही. इ.इ. त्याने हळुहळु दलित साहीत्य आणि एकुण चळवळीविषयीचा अ-दलितांचा दृष्टीकोण नकारात्मक होत गेला.
तसाच प्रकार गे चळवळीचा ही होत आहे असे मला वाटते.
अपुली यांच्या विचारांशी मी काही प्रमाणात सहमत आहे. मला देखील त्यांच्या प्रमाणेच काही गे लोकांचे वाईट अनुभव आलेले आहेत. तरी देखील मी असे म्हणत नाही की सर्व गे असेच वागतात मात्र एकुण प्रमाण अस वाढलेल दिसतय
गे लोकांना आपल " वेगळ" असण हेच जणु काही "विशेष" आहे अस वाटण्याच प्रमाण वाढतय हे नक्की. त्यातुन अनेक गे व्यक्तीमंध्ये अगोदरच्या लज्जे ची जागा एका विचीत्र उद्दामपणाने घेतलेली आहे.

एक उद्दामपणाची वागणुक काही गे मंडळी वरील अपुली च्या अनुभवाप्रमाणे करत असतात. काही कारण नसतांना योग्य अस ओकेजन नसतांना व मुख्य म्हणजे समोरच्याला कुठलाही रस नसतांना ही हे लोक आपल्या गे असण्याची गे संदर्भातील गोष्टींची अश्लील विनोदांची अतिशय तिटकारा वाटावा इतपत जाहीरात केल्यासारखी अभिव्यक्ती करत असतात. यात ही समोरचा जर स्ट्रेट आहे व काही त्याच्या कंडीशनींग संस्कारांमुळे म्हणा त्याला गे हा विषय विचलीत करत असेल तर असे बघुन ही मंडळी अजुन च चेव आल्यासारखी समोरच्याला कुंचंबणा होइल असे बोलण सुरु करतात. एक प्रकारची व्हर्बल अब्युज वा शाब्दीक हिंसा करतात. हा आक्रमक पणा व उद्दामपणा जी काय चांगली बाजु गे ची असेल ती झाकुन मग स्ट्रेट व्यक्तीचा गैरसमज वाढविण्यास आणखीच कारणीभुत होते.
वरील लेखात लेखक ज्या करण जोहर च्या चित्रपटासाठी उभे राहुन टाळ्या वाजवल्या म्हणतात त्याच चित्रपटातील जे प्रमुख समलैंगिक पात्र असलेला मुलगा त्याची वागणुक देखील अशीच उद्दाम अरेरावीची दाखविलेली आहे. तो चित्रपट बघतांना आणि तो संपल्यावर लेखक जोरजोरात उभे राहुन टाळ्या वाजवतो हे बघुन जो थर्ड पर्सन आहे या विषयाशी अनभिज्ञ त्याला काय वाटेल की अरे ही गे मंडळी अशीच उद्दाम असतात् किमान लेखकाने तेव्हा तरी तसे करणे टाळावयास हवे होते.
या भडक अभिव्यक्तीची इतकी पुनराव्रुत्ती होत असतांना दिसतेय की ती प्रातिनीधीक आहे की काय असे वाटते. या आक्रमक भडक आक्रस्ताळेपणामुळे गे चे मुळ प्रश्न बाजुला पडुन त्यांचे मोठे नुकसान च होण्याची शक्यता मला दिसत आहे. अर्थात हे सर्व मी गे चळवळीला आपला विचार पोहोचवण्याची कऴ़़कळ आहे असे समजुन बोलत आहे. की त्यांनी हा प्रकार टाळावा.
आपल्या संयमी वागणुकीने आपला विचार अधिक प्रभावीपणे पोहोचवावा ही अपेक्षा या निमीत्त्ताने येथे करणे अस्थानी ठरणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोचक निरीक्षण. असे आरडाओरडा करणारे गे लोक कधी पाहण्यात आले नाहीत. तशांचं % वाढत असेल तर तीही चिंतेची बाब आहे. अशाने शेवटी दलित चळवळीप्रमाणेच दशा होईल हेवेसांनल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गे संदर्भाततील एक मुद्दा कोणी कधी मांडतांना दिसत नाही या साइटवर तर नाहीच ( इथे दोन विषय समलैंगिकता व उत्क्रांती या विरोधात बोलण ब्लास्फेमी सारख ट्रीट केल जातं) व तिसर एक प्रातस्मरणीय प.पु महापुरुष या बाबतीत कल्ट ला तोंडात मारेल असा भक्तीभाव दिसतो. असो. तर वर लेखात लेखक म्हणतो की जे समलैंगिकतेला आक्रमकपणे विरोध करतात ते स्वतःच गे असतात त्या संदर्भात तो म्हणतो

असंही दिसून आलेलं आहे, की जे पुरुष या गोष्टीवर आक्रमकपणे हल्ले चढवत असतात, ते स्वत:ची होमोसेक्शुऍलिटी नाकारण्याचा प्रयत्न करत असतात. तो त्यांचा डिफेन्स मेकॅनिझम असण्य

हे फार रोचक वाक्य आहे फार च महत्वाच यात लेखकाचे शब्द बघा अस दिसुन आलय ( एरवी पावलोपावली विदा मागणारे इथे सर्व खपवुन घेताय अरे हो २ पैकी एक विषय आहे का मग ठीक आहे)
खर या विरोधात दिसुन येत ते अस की अनेक गे लोक ही जे कोणी पुर्णपणे स्ट्रेट आहे त्यांना तु गे च आहेस पण तु हे तुझ्या स्वतःशी नाकारतोय तु हे स्वीकार कर असा विचीत्र आग्रह करतांना दिसतात. याने जसा गे ला हेट्रो विवाहात बांधण्याने जसा त्रास होत असतो तसाच त्रास जो मुळात स्ट्रेट आहे त्याला अस सारख सारख त्याच्या लैंगिकतेविषयी फोर्स केल्याने होत असतो. अनेक गें चा गोड गैरसमज असतो की हा हा स्ट्रेट म्हणवतोय हा गे च आहे पण हा लपवतोय. मग ते त्याला विनाकारण ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न करतात. याची स्ट्रेट असलेल्या व्यक्तीला प्रचंड किळस वाटते, त्रास होतो. ( जसा गे ला हेट्रो लैंगिक संबधात होतो तस्साच) हा गे मध्ये स्ट्रेट लोकांना त्यांच्या लैगिक कला विषयी संभ्रमित करण्याचा दबाव आणण्याचा ट्रेंड दिसुन येतोय. ते सारख सारख फोर्स करतात.
अजुन एक मुद्दा वर लेखात जे स्पष्टपणे आलेल नाही ते ही सांगतो आता तुम्ही म्हणाल हे तुम्हाला कस माहीत ? तर माझा अनुभव आहे स्वतःचा कुठल्याही सार्वजनिक मुतारीत सध्या गे लोकांचा वावर वाढलाय ते शेजारी उभे असले तर अतिशय घाणेरड्या पद्धतीन हातवारे इशारे व स्पर्श लगट करण्याचा प्रयत्न करतात. या प्रकाराने जो स्ट्रेट माणुस आहे त्याला प्रचंड किळस निर्माण होत असते. मात्र गे ला वाटत असत की सर्वच गे आहेत,

आता अजुन एक केस बघा सोनु निगम च्या बाबतीत झालेली एका गे पत्रकाराने सोनु निगम चा प्रचंड मानसिक छळ केला होता. तो त्याला अनेकदा फोन कॉल करत असे व जबरद्स्ती शरीर संबंधाची मागणी करीत असे. शेवटी वैतागुन सोनु निगम ने पोलिसात तक्रार ही दिली होती व पत्रकार परीषद ही घेतली होती. हा गे पत्रकार स्ट्रेट सोनु निगम वर प्रचंड दबाव आणत होता. यात विचारणीय गोष्ट अशी आहे की सोनु निगम सारखा सधन व वरच्या स्तरातला व्यक्ती ही इतके दिवस हा त्रास का सहन करत होता व इतक्या उशीरा त्याने ही बाब का उघड केली.? कारण किळस लज्जा नकोशी वाटणारी बाब जो स्ट्रेट आहे त्याला जे गे साठी आनंदाचा विषय आहे तो त्याला कीळसवाणा प्रकार वाटु शकतो
इस्लामी संस्क्तुतीत पॉवरफुल असणार्या गे नवाबांनी राजांनी अनेक स्ट्रेट मुलांच त्यांच्या इछ्चे विरोधात लैंगिक शोषण केलेल आहे ताजबाजी लौंडेबाजी मधेय झालेल शोषण हे गे लोकांनी च केलेल आहे. सर्व च मुल गे होती वा सर्व च मुल स्ट्रेट होती हे दोन्ही असत्य लक्षात घेतली तर काहींवर तर अन्याय झालाच की नाही ?
गे रॅगिंग हा प्रकार पण आहे पण पुरावा देता येत नाही
असो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्याला या मुलाखतीमध्ये नक्की कोणत्या प्रकारचा उद्दामपणा दिसला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पीएचडी करणारा, हुशार, संयत गे मुलगा आहे तर तो आम्हाला आवडेल. पण कोणी फार बुद्धी नसणारा, उथळ गे असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. हे लोक मान खाली घालून जगतात म्हणून आम्ही त्यांना खपवून घेतोय ना! आमचं कंडीशनिंग, आमचे संस्कार कसे चुकलेले असतील? कायदासुद्धा आमच्या बाजूचा आहे, आमचं बहुमत आहे, आम्ही काहीही मनःपूत गैरसमज करून घेतले तरी तुम्ही कोण आम्हाला बोलणारे!

आदित्य लेखातच म्हणतो, "पाणीपुरी लव्हर्सची चळवळ नसते..." साहजिकच आहे, ज्यावर बंधनं आहेत त्या वर्तनाबद्दल लोक अधिक उसळून बोलणार. क्विअर लोकांवर सामाजिक दडपण, कायद्याने त्यांना लैंगिक आनंद मिळण्यापासून रोखलेलं, तरीही त्यांनी 'भडक आक्रस्ताळेपणा' न करता मान खाली घालूनच जगावं अशी अपेक्षा व्यक्त करणं हीच ती संवेदनाहीनता आहे. बाँबे टॉकीजच्या करण जोहरच्या गोष्टीत, गे मुलाच्या बापाची दाखवलेली आहे तसलीच.

'भडक आक्रस्ताळेपणा' कोणता, तर आवडलेल्या गोष्टीसंदर्भात टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करणं.

(आत्ता 'बाँबे टॉकीज' चित्रपटगृहांमध्ये सुरू असेल तर टाळ्या वाजवणे आंदोलन सुरू करायला हरकत नाही. एवढ्या साध्या आनंदाने जर कोणाच्या भावना दुखावत असतील तर जरूर अशी गांधीगिरी करावी. कायदेभंगसुद्धा करायला नको.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

करण जोहर च्या गोष्टीत राणीची ट्रॅजीडी इकवली इम्पॉर्टंट आहे. करण जोहर चा हेतु ती हायलाइट करण्याचा नसला तरी त्याच्या नकळत ती झालेली आहे. राणी एक हेट्रोसेक्स्रुअल आहे आणि विवाहाची अनेक वर्ष तिला एका होमोसेक्स्युअल सोबत (ज्यात स्वत:च्या लैंगिकतेला स्वीकारण्याच धाडस नाही जो इतर पर्याय जसे अविवाहीत राहणे इ. चा अवलंब करुनही राहु शकला असता(सुशिक्षीत व आर्थिक स्वावलंबी असुनही) जाणीवपुर्वक विवाहात उतरण्याचा व त्यानंतर नाटक ही कंटीन्यु करण्याचा प्रयत्न करतोय अशा दांभिक भ्याड समलैंगिकाची कथा आहे की ज्याच्या कृतीने त्याने राणी या निरागस स्ट्रेट स्त्रीला नरकवास भोगावा लागलाय.
त्यानंतर जीची काहीही चुक नसतांना हा मुलगा जेव्हा तिला सत्य सांगायला जातो ते त्याने किमान संवेदनशीलतेने ही सांगु शकतो तो ऑफीस मध्ये अचानक घुसुन राणी क्लायंटशी बोलत असतांना तिच्या नवर्याची लैंगिकता उघड करतो. का अशा रीतीने तो करतो. ? तिला समजावुन ही सांगु शकला असता हळुवारपणे पण का नाही?
कारण करण जोहर च्या द्र्ष्टीकोणातुन जी काय वेदना आहे ती समलैंगिकाचीच महत्वाची आहे त्याच तो कीती प्रामाणिक आहे सडेतोड आहे सामाजिक संकेतांची किमान मॅनर्स ची त्याला कशी पर्वा नाही कारण हे सर्व तर त्या फालतु दांभिक स्ट्रेट लोकांचे संकेत आहेत. मी गे आहे मला काय घेण देण त्याच्याशी आणि तिच्या दु:खाशी तिला धक्का बसेल एकदम इतक कठोर सत्य तिला पेलवेल की नाही अरे जा मला काय त्याच्याशी
मी तर सत्याचा कैवारी मी जाउन सरळ तिला काय वाटेल याचा विचार न करता सगळ सत्य कस चमकवुन सांगणार
मात्र विरोधी बाजुने मी समाजाने मला समजावुन घ्याव माझ वेगळेपण मान्य कराव माझ्याशी संवेदनशीलतेने वागाव हे ही मी अपेक्षा करतच राहणार.
या गे पात्राची जी इतरांकडे बघण्याची तुचछतापुर्ण दुष्टी आहे तिच सार्वत्रिकीकरण होण्याची सुरुवात झालेली दिसतेय या पात्राची उद्दामता ही करण जोहर ने व्यक्त केलेली प्रातिनीधीक नेणीवे च्या पातळीवर अभिव्यक्ती आहे.
@ भुस्कुटे- या लेखात उद्दामपणा आहे असे मी कुठेही म्हटलेले नाही एका अक्षरानेही नाही खर म्हणजे लेखकाची शैली आवडली म्हणुन च हा प्रतिसाद दिला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या सगळ्यात मला आवडलेली गोष्ट म्हणजे राणी मुखर्जीचं पात्र. उगाच निरागस, अबला, संस्कृतीप्रेमी छापाची बाई न दाखवून करण जोहरनी आधीची पापं धुवायचा विडाच उचललेला आहे.

वेळप्रसंगी हात उचलू शकणाऱ्या, 'विचारवंत' नवऱ्याशी प्रसंगी वैचारिक पंगा घेण्याची तिची पत आहे, आपली लैंगिकता (मेकपचे थर वापरून, इ.) दाखवण्याची तिची तयारी आहे. अशी स्त्री या प्रकारात दुखावली गेली तरीही "माझी काहीही चूक नाही" हे समजण्याची तिची बौद्धिक कुवत आहे. तिच्यावर अन्याय झालेला असला तरीही उगाच तिला गरीब-बिचारी दाखवण्याऐवजी मुक्त स्त्री दाखवून करण जोहरने भरपूर कूल पॉईंट्स मिळवले आहेत.

गे लोकांनी मान खाली घालून असावं आणि बायकांनी सतत अबला आणि दुःखात असावं अशा काही अपेक्षा असतील तर मात्र प्रश्नच मिटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कारण करण जोहर च्या द्र्ष्टीकोणातुन जी काय वेदना आहे ती समलैंगिकाचीच महत्वाची आहे त्याच तो कीती प्रामाणिक आहे सडेतोड आहे सामाजिक संकेतांची किमान मॅनर्स ची त्याला कशी पर्वा नाही कारण हे सर्व तर त्या फालतु दांभिक स्ट्रेट लोकांचे संकेत आहेत. मी गे आहे मला काय घेण देण त्याच्याशी आणि तिच्या दु:खाशी तिला धक्का बसेल एकदम इतक कठोर सत्य तिला पेलवेल की नाही अरे जा मला काय त्याच्याशी

मला तरी असं वाटलं नाही. राणीच्या पात्राचं वैफल्य खूप व्यवस्थित अधोरेखित केलेलं आहे. आणि पात्राची तुच्छतापूर्ण दृष्टी बहुधा defense mechanism असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

> हिंदू धर्मामध्ये लग्न हे दोन आत्म्यांचं मीलन असतं. हिंदू धर्म
> लग्नाबाबत अगदी जेंडरन्यूट्रल आहे. त्यामुळे तशी काही तांत्रिक
> अडचण येत नसावी!
ही एक स्तुत्य धर्मसुधारणा असू शकेल. आहेच, म्हणावे. लिंगनिरपेक्ष लग्नाची प्रथा हिंदू धर्मात प्रचलित व्हावी, हे बरेच.
वरील वाक्ये पुन्हा-पुन्हा म्हटलेली आहेत - माझा हिंदू धर्मातील भविष्यातील प्रवाही प्रथांना विरोध नाही, हे पुन्हा-पुन्हा स्पष्ट करण्यासाठी.

-----------------------------------
(लग्न या विधीबाबत)
परंतु पारंपरिक विधिवत् केलेले हिंदू लग्न हे जेंडर-न्यूट्रल नाही - आणि ते तसे करण्यास फारच मोठी कसरत करावी लागेल.

अगदी "वर" आणि "वधू" यांच्या ठिकाणी "व्यक्ती" आणि "व्यक्ति" असे योजले तरी बरेच विधी बदलावे लागतील. म्हणजे "कन्यादान" हे "व्यक्ति"च्या वडील वा आईने "व्यक्ती"च्या हाती करून चालायचे नाही. लिंग-निरपेक्ष (वा role-निरपेक्ष) विधी म्हणजे बहुधा मग "व्यक्ती"च्या वडील वा आईने "व्यक्ति"च्या हाती दान दिले पाहिजे. "दान" शब्दाचा अर्थही बदलला पाहिजे.

त्याच प्रमाणे सप्तपदी, होम वगैरे सर्व विधींमध्ये बदल केला पाहिजे.

(लग्न या संस्थेबाबत)
याबाबत आपल्याला स्मृतींमधून माहिती मिळते, त्यात नवरा आणि बायको यांचे बंधनात अगदी वेगळे स्थान आणि कर्तव्ये सांगितलेली आहे. श्रुतींपैकी ऋग्वेदातील १०.८५ सूक्त (सूर्याचा विवाह) हे आपल्याला याबाबतीत काही सांगते. हे अत्यंत सुंदर आणि आनंदी सूक्त आहे. परंतु त्यात "पत्नी ही पतीच्या घरी जाते आहे, आणि त्याअनुषंगाने तिचे चांगले भाग्य, अभीष्टचिंतन, सासर्‍यांबाबत जबाबदार्‍यांची जाणीव" तसेच "पती पत्नीला घरात स्थान देत आहे, तिला सौभाग्य देत आहे" याबाबत वर्णने येतात. या दीर्घ (४७ ऋचांच्या) सूक्तात, शेवटच्या ऋचेत "आपणा दोघांची हृदये जोडली" असा उल्लेख येतो, आणि तो आवडण्यासारखाच आहे. परंतु हा लिंगनिरपेक्ष उल्लेख असला तरी बाकी सर्व उल्लेखांवरून ही संस्था gender role निरपेक्ष होती असे नव्हे. (आत्म्यांचे/हृदयांचे मीलन ही बाब चांगलीच, पण काहीशी afterthought वाटते, लग्नाच्या व्याख्येत असलीच, तर दुय्यम असावी.)

-----------------------------------

हिंदू धर्म हा प्रवाही आहे, आणि वर्तमानकाळात प्रचलित लग्नसंस्थेकरिता श्रुति-स्मृतींचे प्रमाण मानायची गरज नाही, हे खरेच. [वर्तमानकाळातलेविधी मात्र श्रुति-स्मृतींप्रमाणेच होतात, हे मात्र मी बघितलेले आहे.] तरी सध्या प्रचलित हिंदू लग्नसंस्थेत लिंग-आणि-role-निरपेक्ष हृदयसंगम सर्वसामान्य नसावा, असे माझ्या निरीक्षणातून वाटते. हे भविष्याकरिता ध्येय असावे हे प्रशंसनीय आहेच, परंतु ही प्राचीन परंपराही नाही, आणि वर्तमान प्रचलनही नाही.

-----------------------------------

(अ) समाजसुधारणा म्हणून जुने विधी दुरुस्त करून नवीन विधी आणि विवाहसंस्था तयार करणे आणि (आ) जुनेच विधी खरे म्हणजे लिंगनिरपेक्ष आहेत असे म्हणणे -- (अ) आणि (आ) यांच्यात धोरणात्मक फरक आहे. तो बदल घडवण्याकरिता काय कृती करावी लागेल त्यांचा कार्यक्रम वेगळा असेल.

-----------------------------------

पुनश्च, गैरसमज नसावा : लिंगनिरपेक्ष हृदय-जोडणारी लग्नसंस्था आणि त्याबाबत विधी हिंदू धर्मात भविष्यात प्रचलित झाले, तर ती समाजसुधारणा मला हवीहवीशीच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"हे असं असं आहे. आणि माझी त्याबद्दल अशी अशी मतं आहेत" - हे कुठल्याही अभिनिवेशाशिवाय सहजतेने सांगितल्याबद्दल अभिनंदन.
खूप वाक्यं आवडली, पुन्हा नोंदवत नाहीये, तरी सर्वात आवडलेलं/पटलेलं वाक्य -

सत्य न कचरता सांगणं ही कसली भारी गोष्ट असते, ते माझ्या लक्षात आलं. त्यानं मला एकदम मुक्त झाल्यासारखं वाटायला लागलं.

आणि हो, मुलाखतीतली सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे प्रांजळपणा! जियो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद अस्वल (लोल.. हसू आले. गंमतशीर नाव आहे!)

-आदित्य जोशी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय आवडलेला लेख, आणि आदित्यने मोकळेपणाने दिलेले सविस्तर प्रतिसादही! भारतातील एलजीबीटीक्यू चळवळ आणि त्याच्या इतिहासाबद्दल फार माहीती नव्हती ती या निमित्ताने मिळाली.

लेखासाठी मेहनत घेणार्‍या सर्वांचे आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद केतकी!

-आदित्य जोशी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या सगळ्या गोष्टींशी सामना करणे अवघड आहे, वाचुन आदित्यने काय सहन केले असेल ते लक्षात येते, पुढील काळासाठी आदित्यला शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहन सगळेच करतात.

फक्त ह्या प्रकारचे सहन करणे काय असते हेय चट्कन लोकांच्या लक्षात येत नाही, म्हणून हा प्रयत्न.

अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. दिवाळीच्या शुभेच्छा!

-आदित्य जोशी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय मनमोकळेपणाने मांडलेले विचार आवडले. अर्थात या एका प्रकारच्या शांत मोकळेपर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच बराच संघर्ष करावा लागला असणार. पण संघर्षातून कधीकधी निर्माण होणारा कडवटपणा कुठेही दिसला नाही हे विशेष. त्याबद्दल आदित्य यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

मुलाखत घेणार्‍या टीमचेही हार्दिक अभिनंदन.

स्वगतः माझ्या परिचयात एकही व्यक्ती गे नाही. जर भविष्यात असा प्रसंग आला तर माझी प्रतिक्रिया काय असेल? 'सो व्हॉट?' अशी असावी अशी प्रार्थना!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि जर जवळच्या व्यक्तीने स्वतः गे असल्याचे सांगितले, तर फक्त "सो व्होट" वर न थांबता, "सो व्होट, यू आर स्टिल्ल अ फ्रेन्ड एन्ड आय स्टिल्ल लव यू" हेही सांगायला विसरू नका! Smile

-आदित्य जोशी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नुसती "छान मुलाखत आणि या दिवाळी अंकातील महत्त्वपूर्ण मुलाखत" इतकाच प्रतिसाद देणे योग्य नव्हते म्हणून थांबलो होतो. आणि वेळेअभावी अधिक लिहिणे शक्य नाहीये.

तेव्हा तपशीलवार प्रतिसाद नंतर वेळ मिळाल्यावर देईलच. तुर्तास छान, अभिनिवेषरहित मुलाखतीबद्दल ही निव्वळ पोच आणि स्वत्त्व राखल्याबद्दल अभिनंदन! Smile

जाता जाता:

हेटरोसेक्शुअल लोक मला माझ्या सेक्शुऍलिटीबद्दल प्रश्न विचारतात तेव्हा त्यांचं अज्ञान बघून मला हसायला येतं. 'तू छक्का आहेस का?', 'तुझ्यावर लहानपणी रेप झाला होता का?', 'मेरे को देख के तेरा खडा होता है क्या?', 'तू ट्रेनमधे आणि पब्लिक टॉयलेटमधे लोकांना हात लावायला जातोस का?', 'तू कधी साडी नेसतोस का?', 'तुझ्या पॅण्टमध्ये काय आहे?', 'तेरा खडा होता है क्या?', 'तू लहानपणी बहिणीसोबत फिरायचास म्हणून असा झालास का?', 'तुझ्या बाबांनी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून असं झालं का?', 'तुझ्या आईचा डायव्होर्स झालाय का?', 'तू मागच्या जन्मी बाई होतास का?'... असे का-ही-ही असंबद्ध प्रश्न विचारतात. पण संयमानं, शांतपणे, न चिडता, न हसता उत्तरं देणं ही मला माझी जबाबदारी वाटते. या सगळ्या प्रश्नांचा उगम अज्ञानात असतो. माहीत नसतं, म्हणून तर विचारतात ना लोक? माहीत करून घ्यायचं आहे लोकांना, हेही मोठं आहे. ज्यांना काही पडलेली नाहीय, असे लोक प्रश्न विचारण्याच्या फंदातही पडत नाहीत. आपल्या धारणा, पूर्वग्रह, समज... घट्ट कवटाळून बसतात. माध्यमांतून दिसणाऱ्या प्रतिमा बघून आपली मतं ठरवतात आणि मोकळे होतात. असंही दिसून आलेलं आहे, की जे पुरुष या गोष्टीवर आक्रमकपणे हल्ले चढवत असतात, ते स्वत:ची होमोसेक्शुऍलिटी नाकारण्याचा प्रयत्न करत असतात. तो त्यांचा डिफेन्स मेकॅनिझम असतो. चिडायला होतं क्वचित. हसायला येतं. पण त्यावर मात करून उत्तर देत राहणं माझी जबाबदारीच आहे, नाही का? कारण लोकांच्या दृष्टिकोनामध्ये बदल होणं ही माझी गरज आहे!

समलिंगी व्यक्तींनी आपली लैंगिकता भिन्नीलिंगी व्यक्तींपुढे का जाहिर करावी? करावी का? इत्यादीचे याहून मार्मिक उत्तर देता येणे शक्य नाही. त्याबद्दल अधिकचे आभार! Smile

माझ्या परिचयात आलेल्या पहिल्या गे व्यक्तीने माझ्या या अश्या अज्ञानमूलजनक/जन्य प्रश्नांना शांतपणे उत्तरे दिली नसती तर कित्येक गैरसमज आणि पारंपरिक कंडिशनिंग करायला तत्पर असलेल्या समाजाने माझे मन अशा व्यक्तिंबद्द्ल कडवट कधी केले असते मला कळलेही नसते. तेव्हा असे अतिशय ठामपणे व प्रकटपणे परिचित चेहरा असलेल्या व्यक्तीने सांगण्याला खूप महत्त्व आहे हे पल्याडची (ही फॅक्ट ऐकणार्‍या बाजूची) व्यक्ती म्हणून खात्रीने सांगु शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पल्याडची व्यक्ती म्ह्णून तुमची प्रतिक्रिया खूप महत्वाची वाटली. आणि, ओब्वियसली पटलीदेखील.

धन्यवाद!

-आदित्य जोशी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या विषयावर वाचण्याऐकण्यात आलेल्यांपैकी अभिनिवेशविरहीत सहज सरळ असं हे पहिलंच मनोगत वाटलं.

मुळात लैंगिकता ही दोन व्यक्तींमधलीच गोष्ट असतानाही ती एकूण व्यक्तीविषयीच्या ३६० डिग्री जजमेंटकरता वापरणं ही सवय समाजात कुठून आली असेल हे शोधणं कठीण आहे. पण धर्म, जात, आहारपद्धती या व्यक्तिगत गोष्टी वगळून मनुष्याकडे बघणं जसं समाजाला अशक्य होत होतं तसंच लैंगिक ओरिएन्टेशनच्या बाबतीत होताना दिसतं. पण काळाबरोबर या गोष्टीची धार बोथट होत जाईल. काळ हाच या सर्वावर उपाय आहे.

आधी या गोष्टीला अवास्तव "निगेटिव्ह" महत्व असेल आणि हळूहळू काही वर्गात काही काळापुरतं कदाचित वेगळं पॉझिटिव्ह स्थान आणि आदरही मिळेल.. पण "वेगळेपणा"ची जाणीव हाच एक अत्यंत दुरित भाव आहे. त्यामुळे पुरेसा काळ लोटल्यानंतर विविध प्रकारच्या लैंगिकता, धर्म, आहारपद्धती, भाषा या एका मोठ्या प्रवाहात मिसळून त्या नव्हे तर त्यांचं "वेगळेपण" नष्ट होईल..कोणताही वैयक्तिक आचारविचार बेस्ड भेदभाव हा रद्द होण्यापूर्वीच त्याची रद्दी होईल अशी आशा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असेच म्हणतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूप सूंदर-शांत-संयमी मुलाखत. आदित्य ने संघर्ष केला आहे आणि नक्कीच बरच सहनही केलं आहे/असावं पण त्याच्या ह्या मुलाखतीत कुठेच त्याचा झेंडा मिरवल्याचं जाणवत नाही ह्या बद्दल त्याचं विशेष कौतूक. तू म्हणतोस ते बरोबर आहे, इथे संघर्ष प्रत्येकालाच आहे मग तो स्ट्रेट असो वा गे - त्यात भेदभाव कशाला? आणि गे/स्ट्रेट ह्यातल्या भेदभावांना इथेच आणि नेहमीच असा छेद द्यायला हवा. कायदा/हक्क हे सगळं जरा बाजूला ठेवून समाजाने निदान त्यांना समान वागणूक द्यायला हवी असं वाटतं. अर्थात समाज समान वागणूक देत नाही म्हणून एलजीबीटीज लाचार्/हतबल आहेत असं नाही पण समान वागणूक मिळाली तर निदान जे क्लोजेट मधे आहेत ते तरी मो़कळेपणाने बाहेर येतील - त्यांची घुसमट थांबेल असं वाटतं.

समान - अगदी शहरातले सुशिक्षित लोक असा विचार करतात की मला त्या गे बरोबर कोणी बोलताना /वावरताना पाहिलं तर मलाही लोक गे समजतील - जणू 'गे' हा संसर्ग जन्य रोगच आहे. किंवा रोजच्या पहाण्यातला एखादा माणूस गे असल्याचं समजलं की त्याच्याकडे मग तो अगदी 'एलीयन' असल्यासारखे बघतात, त्याने मग अगदी सहज साधं स्माईल दिलं तरी तो इशारा करतोय- लाईन मारतोय असं समजतात. असा हा आपल्या विचारांमधला 'वेगळेपणा' थांबवून समान वागणूक द्यायला हवी. शेवटी दोष हा पहाणार्‍याच्या नजरेत असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नक्कीच. स्वतःच्या लैन्गिकतेबद्दल उघड नसलेले लोक नेहमी भीतीखाली वावरतात. परिणामी, त्यांचे अभ्यास्/जोब मधले परफोर्मन्स खूप अफ्फेक्ट होते. आणि भारतात भेदभाव न करण्याबद्दल्चे "नियम"/"कायदे" रूढ नसल्याने त्यांना सतत भीतीच्या सावटाखाली रहावे लागते. "आउट" व्हायचे की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे - पण चिडवले न जाता शांत्पणे शाळा-ओफिस्मध्ये रहण्याचा सगळ्यांचा "समान" हक्क आहे.

ह्याचा अर्थ असा आहे का, की मी आउट असल्याने सगळे चान्गले झाले, सगळे समान झाले? नाही. उदा: पी एच डी विद्यार्थी अनेकदा एम टेक किव्वा बी टेक विद्यार्थ्यान्ना प्रोजेक्टमध्ये मार्गदर्शन करतात. माझ्या पाठीमागे काही विद्यार्थी (सगळे नाही) "आदित्यकडे नको जायला. तो गे आहे." अशा गोष्टी बोलतात. मी आउट नसतो तर कदाचित हे सगळे झाले नसते. गंमत आहे ना?! Smile पण द लोस्स इज देअर्स.

-आदित्य जोशी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वतःच्या लैन्गिकतेबद्दल उघड नसलेले लोक नेहमी भीतीखाली वावरतात. परिणामी, त्यांचे अभ्यास्/जोब मधले परफोर्मन्स खूप अफ्फेक्ट होते.

अभ्यास आणि जॉब याठिकाणी लैंगिकतेमुळे परफॉर्मन्स कसा अफेक्ट होतो ते समजले नाही. अर्थात आहे त्यापेक्षा वेगळ्या लैंगिकतेत स्वतःला कल्पणे शक्य होत नसल्यानेही समजण्यात काही कमी होत असेल.. पण तरीही, शाळाकॉलेजात अभ्यास आणि त्याहूनही जास्त स्पेसिफिकली कंपनीत काम करताना आपण कोणत्या लैंगिकतेचे आहोत याचे प्रकटन जाहीर केलेले असणे किंवा नसणे यामुळे परफॉर्मन्सवर वाईट परिणाम होण्याचं काय कारण ? आपल्या आसपासच्या सर्व व्यक्ती, निश्चित हीटरोसेक्षुअल असल्याचे माहीत असलेल्या व्यक्ती यादेखील लैंगिकतेचा अजिबात उल्लेख न करताही आपल्या कार्यक्षेत्रात नक्कीच उत्तम परफॉर्मन्स दाखवत असणार. लैंगिकतेचे प्रकटन हे फारफारतर त्यांच्या लैंगिक आयुष्याशी संबंधित परिणाम करत असेल. पण हपीसातल्या लोकांशी काडीचीही लैंगिक देवाणघेवाण नसणे हे अगदी शक्य, योग्य आणि सर्वत्र आढळणारे आहे. तिथे आपण हीटरो, होमो अथवा बायसेक्षुअल आहोत हे सांगणे किंवा लपवणे दोन्ही इक्वली अप्रस्तुत वाटते. आणि ते न सांगितल्यामुळे मनावर दडपण अथवा भीती असण्याचं कारण समजून घेता येत नाहीये. पुन्हा एकदा.. कदाचित आपण स्वतः हीटरोसेक्शुअल म्हणजे समाजमान्य "नॉर्मल" आहोत हे कायमचे गृहीत धरले जात असल्याने त्याउलट बाजूच्या मानसिकतेच्या चौकटीत जाऊन विचार करता येत नसल्याने असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी जरा "घाण" उदाहरण घेतो पण.. अगदी सूचक आहे. समजा की मी ओफ्फिस्मध्ये मीटींग्मध्ये पादलो. पहिले तीस-सेकन्द माझे लक्श मीटींगवर राहाणार नाही. "कोणी ऐकले का? कोणाला वासामार्फत सुगावा लागला का?" हे चाचपडत पाहिन. अन काही वेळाने सगळे (होपफुल्ली) सुरळीत होईल.

जे लोक आउट नसतात आणि घाबरलेले असतात, त्यान्ना वरती लिहिलेल्या परिस्थितीहूनही अधिक शरमजनक आपली लैन्गिकता वाटते. वरच्या उदाहरणाप्रमाणे "कोणाला सुगावा लागला का? लागेल का? मी असे बसलो, असे चाललो तर लोकांना शंका येइल का?" ह्याची भीती बराच काळ मनामध्ये घुटमळत रहाते. आपण हेसुद्धा लक्शात घेउयात की भारतामध्ये बहुतांश ओफिस आणि कोलेजांमध्ये "एन्टि-डिस्क्रिमिनेशन" कायदे नसतात!! त्यामुळे, अश्या परिस्थितीत अभ्यास आणि ओफिस ह्या दोहोंवर परिणाम होण्याची शक्यता असते.

शाळा आणि ओफिस ह्या दोन्ही परिस्थितीमध्ये घाबरून राहणारे असंख्य गे लोक आहेत. त्यांमध्ये मीही होतो - आणि ट्र्स्ट मी.. असे "भय इथले सम्पत नाही" चालीवर जगणे खूप कठीण असते.

-आदित्य जोशी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अभिनिवेशरहित प्रांजळ आत्मकथन आवडले. शीर्षकही अगदी चपखल वाटले. याहून चांगले शीर्षक दुसरे कोणतेही वाटले नसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

पाने